Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १
Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग २ - स्पायडरमॅन एक स्वप्न
स्पाइडरमॅनची चित्रपट मालिका परत का सुरु कली? फॅन्टास्टिक फोर चित्रपटांची पहिल्या मालिकेला फारसे यश मिळाले नव्हते तरी दूसरी मालिक त्यांनी का तयार केली? व्होलव्होरिन ह्या महानायकाचे फ़क्त त्याच्यावर संबंधित चित्रपट चालत नाहीत पण त्याचे सतत चित्रपट बनत आहेत, असे का होत आहे? ह्या सर्व प्रश्नांचे फ़क्त एकच उत्तर आहे, त्यांचे हक्क आपल्या कंपनीकडे टिकवण्यासाठी.
अव्ही अराडला मार्वल टिकवण्यासाठी फ़क्त एक उपाय दिसत होता. तो म्हणजे त्यांच्या महानायकांवर चित्रपट बनवणे. मार्वलने ह्या आधी १९८६ साली एक चित्रपट बनवला देखील होता. त्या चित्रपटाचे नाव होते "हॉवर्ड द डक". पण हा चित्रपट सपशेल आपटला. (गार्डियंस ऑफ़ दी गॅलेक्सी च्या एन्ड क्रेडिट सीन मध्ये "हॉवर्ड द डक" ला दाखवण्यात आले आहे)
मार्वलची परिस्थिती चांगली नव्हती त्यामुळे ते काही स्वतः चित्रपट निर्मिती करण्याचे स्वप्न देखील पाहू शकत नव्हते. त्यामुळे अव्हीने मार्वलच्या पात्रांचा चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांबरोबर करार करण्याचे ठरवले. स्पायडरमॅन हा आधीच कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. त्यामुळे मार्वलने त्याचे लक्ष्य इतर पात्रांकडे वळवले.
स्पायडरमॅन नंतर मार्वलकड़े चांगला खप असणारे कॉमिक्स होते "एक्स मेन" आणि "फॅन्टास्टिक फोर". अव्ही अराडने एक्स मेन एनिमेटेड सीरीजच्या यशाच्या जोरावर ते "२०थ सेंच्युरी फॉक्स" ला विकण्याचा प्रयत्न करत होता. पण ही बोलणी काही लवकर होत नव्हती. त्यावेळी अव्हीने लायन्स गेट आणि न्यू लाइन सिनेमा बरोबर सुद्धा कराराची बोलणी चालू केली. आणि ह्यातून छोटे का होईना पण पाहिले यश त्यांच्या हाती पडले. मार्वलचा लायन्स गेट बरोबर "ब्लेड" ह्या चित्रपटासाठी करार झाला. ब्लेड हा मार्वल कॉमिक्स मधील एक व्हॅम्पायर हंटर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची स्वतःची कॉमिक्स सीरीज़ सुद्धा आहे पण ती ठिकठाक चालत होती. अशा या पात्रावर चित्रपट बनेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण हा चित्रपट बनला आणि त्याला चांगले यशही मिळाले. मार्वलचा हा पहिला "R" रेटेड सिनेमा होता. ब्लेडने यु.एस. बॉक्स ऑफिसवर ७० मिलिअन मिळवले. मार्वलला त्यातून फक्त २५०००$ च मिळाले. पण इथुनच मार्वलचे नशीब बदलू लागले.
फॉक्स बरोबर एक्स मेनचा करार सुद्धा पार पडला आणि त्यांनी एक्स मेन चित्रपटाची सुरवात केली. २००० साली एक्स मेन चित्रपट सिनेमा गृहांमध्ये झळकला. ह्या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. पण त्यातून मार्वलला मोजकाच हिस्सा मिळाला.
स्पायडर मॅनचे हक्क कोलंबिया आणि त्यांची सबसायडरी असणाऱ्या सोनीच्या हातात पडले. आणि त्यांनी लागलीच स्पाइडर मॅन ला सुरवात केली. २००२ साली हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आला. ह्याच चित्रपटाने सुपरहिरो चित्रपटांना खऱ्या अर्थाने पुनरोजीवित केले. ह्या चित्रपटामधुन सुद्धा मार्वलला फायदा झाला पण तोही तोड़काच होता. सोनी आणि फॉक्सचे पॉट भरल्यानंतर उरलेले मार्वलला मिळत होते पण तेव्हढे त्यांच्या चित्रपट क्षेत्रात वास्तव्य निर्माण करण्यास पुरेसे होते. ह्या चित्रपटांचा फायदा घेऊन इतर पात्रांचा बाकी चित्रपट निर्मिती गृहांबरोबर करार करण्यास मार्वलने सुरवात केली आणि त्यांना बऱ्यापैकी यश मिळत होते.
सोनी असोत, फॉक्स असोत की इतर कोणी, मार्वलने सर्वांबरोबर करार करताना करारामध्ये एक मेख मारून ठेवली होती; ती म्हणजे "जर सात वर्षांमध्ये करार केलेल्या पात्रावर एकही चित्रपट बनला नाही तर त्या पात्राचे सर्व हक्क मार्वलला परत मिळतील". ह्या कराराचा मार्वलला बराच फ़ायदा झाला. बरीच पात्रे ज्यांच्यावर चित्रपट निर्माण झाला नाही ती मार्वलला परत मिळाली. पण ह्या कराराबरोबर काही इतर कडु गोष्टीही मार्वलला मान्य करून घ्याव्या लागल्या. ज्या पात्रांचा चित्रपटासाठी करार झाला आहे ते पात्र कॉमिक्स शिवाय इतर कुठेही वापरु शकत नाहीत. ज्या महानायकाचा करार झाला आहे त्याच्या संबंधित इतर सर्व पात्रे म्हणजे नायिका, खलनायक, सहनायक ह्यांचाही वापर मार्वल करू शकणार नाही.
अशा ह्या करारामुळे मार्वलचे एक्स मेन वरील पात्रांवर काहीही अधिकार राहिला नाही. मार्वल फ़क्त कॉमिक्स मधेच ही पात्रे वापरु शकणार आहे. पुढे जाऊन फॉक्सने तर "म्यूटंट" ह्या शब्दाचाही कॉपीराइट बनवाला. फॉक्स शिवाय हा शब्द इतर कोणत्याही कॉमिक्स संबंधित चित्रपटात कोणीही वापरु शकत नाही. मार्वलला काहीही करुन चित्रपट बनावयचे होते त्यामुळे ते ह्या सर्व गोष्टींसाठी तयार झाले.
ह्या चित्रपटांचा परिणाम मार्वलच्या कॉमिक्सच्या वितरणात दिसू लागला. थोडासा मिळत असला तरी मार्वलकडे कॅश फ्लो वळू लागला होता. २००३ साली David Maisel हा एक कल्पना घेऊन मार्वलचा प्रमुख अधिकारी Isaac Perlmutter ची भेट घेतली. त्याची संकल्पना अशी होती की ज्याप्रमाणे कॉमिक्समध्ये सुपरहिरोंचे सीमोल्लंघन (Crossover ) असते तीच शैली आपण चित्रपटांमध्ये सादर करायची. आणि ह्याचे चित्रपटाचे एक विश्व बनवायचे (Cinematic Universe). ह्यातूनच मार्वल चित्रपट विश्वाची सुरवात होणार होती. त्याचे म्हणणे होते की मार्वलने ह्या चित्रपटांची निर्मिती स्वतः करावी म्हणजे त्यामधील गोष्टींवर मार्वलचे नियंत्रण राहील. हा मास्टर प्लॅन डेव्हिडने मार्वलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना पटवून दिला. पण चित्रपट निर्मितीसाठी फार मोठ्या रकमेची गरज होती. ह्या काळापर्यंत बरेचसे सुपरहिरो चित्रपट निर्मिती न झाल्यामुळे मार्वल कडे परत आले होते. २००५ साली मार्वलने वॉल स्ट्रीटवरील "Merrill Lynch" ह्या फर्म बरोबर "५२५ मिलिअन्सचा" सात वर्षाचा करार केला. ह्या रकमेसाठी तारण म्हणून मार्वलने Captain America, Thor, Nick Fury, Black Panther, Ant-Man, Cloak & Dagger, Doctor Strange, Hawkeye, Power पाचक आणि Shang-Chi ही पात्रे ठेवली. हा एक खूप मोठा जुगार मार्वलने खेळला. जर त्यांच्या चित्रपटांना अपयश आले आणि ही रक्कम जर ते परत केरु शकले नाहीत तर ते ह्या पात्रांवरचा हक्क कायमस्वरूपी गमावणार होते.
मार्वलने आधीच त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय पात्रांचे हक्क गमावले होते. आयर्नमनवर चित्रपट न बनविल्यामुळे न्यू लाईन सिनेमा कडून मार्वलला हक्क परत मिळाले होते. त्यांनी "Iron Man" पासून सुरवात करायचे ठरवले. ह्या चित्रपटाद्वारेच मार्वल चित्रपट विश्वाचा त्यांनी पाया घातला. मार्वलकडे आधीच पैसे कमी होते म्हणून त्यांनी खूप नावाजलेले कलाकार आणि दिग्दर्शक घेण्यापेक्षा नवीन कौशल्याला प्राधान्य देण्याचे ठरवले. त्यांनी आयर्नमनसाठी Robert Downey Jr. ची निवड केली. आर. डी. जे. हा त्यावेळी खूप बदनाम अभिनेता होता. कोकेन, हेरोइनच्या सेवनासाठी तो अनेकदा गजाआड देखील गेला होता. अशा माणसाला सुपरहिरोची भूमिका देणे कुणालाच पसंद पडले नव्हते. पण मार्वलने आपला निर्णय ठाम ठेवला. आर. डी. जे. ने चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्या Jeff Bridges पेक्ष्याही कमी मानधन घेऊन ही भूमिका स्वीकारली. काळाचा महिमा पहा, एव्हढ्या कमी पैशात काम केलेला आर. डी. जे. आत्ता हॉलीवूड मध्ये चित्रपटासाठी सर्वाधिक रक्कम स्वीकारतो.
हा जुगार यशस्वी ठरला. आयर्नमॅनला प्रचंड यश मिळाले. आणि त्यामुळे मार्वलकडे एक संधी चालून आली. डीसी कॉमिक्सची परिस्थिती ही सुद्धा बेताची होती पण त्यांच्या पाठीमागे वार्नेर ब्रदर्स कायम खंबीरपणे उभे होते. त्यामुळे त्यांचा मार्केटमध्ये निभाव लागत होता. असे बडे पप्पा मार्वलला कधीच लाभले नव्हते. पण आयर्नमॅन चे यश पाहून एनिमेशन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मार्वलमध्ये रुची दाखवत होती. Disney Studio ने मार्वलला विकत घ्यायचे ठरवले होते आणि २००९ साली मार्वल डिस्नीच्या हातात आले. माझ्यामते चित्रपट क्षेत्रातील सर्वात यशस्वी सौदा म्हणून आपण ह्या कराराकडे पाहू शकतो.
Quicksilver आणि Scarlet Witch ही दोन पात्रे फोक्स आणि मार्वल हे शेअर करतात. हल्कचे युनिवर्सल्सकडे तर डेअरडेवील आणि इलेक्ट्राचे फॉक्सकडे हक्क होते. त्यांनी ह्यांवर चित्रपट देखील काढला पण हे चित्रपट यशस्वी झाले नाहीत. आणि पुढील सात वर्षांमध्ये त्यांच्यावर कोणताच नवीन चित्रपट बनला नाही. त्यामुळे त्यांचे हक्क मार्वलला परत मिळाले.
सोनीचा सध्याचा अमेझिंग स्पायडरमॅन फारच संकटात आहे त्यामुळे सोनीने मार्वलसोबत नवीन करार केला. ह्या करारानुसार मार्वल स्पायडरमॅनला एकाही पैसा न देता त्यांच्या अवेन्जर्स संबंधीत चित्रपटात वापरू शकते. ह्याबदल्यात मार्वल स्पायडरमॅनच्या नवीन चित्रपटाच्या निर्माणामध्ये सोनीला मदत करणार आहे.
वरील चित्रावरून तुम्हाला कळेल कि सध्या मार्वलकडे कोणत्या पात्रांचा हक्क आहे.
प्रतिक्रिया
23 Mar 2016 - 5:42 pm | कपिलमुनी
अॅनिमेशन कॉमिक्स , सुपरहीरो या वेगळ्या दुनियेची सफर घडवणारा उत्तम लेख !
खाली क्रमशः टाकायचा विसरला का ?
23 Mar 2016 - 6:46 pm | मोग्याम्बो
माझी तर मार्वलची Captain America : Civil war पर्यंतच्या वाटचालीवर लिहिण्याची इच्छा आहे. जसा वेळ मिळेल तसे भाग लिहित जाणार आहे.
6 May 2019 - 4:42 pm | नया है वह
...
23 Mar 2016 - 6:01 pm | चांदणे संदीप
लेख प्रचंड आवडला! डीसी कॉमिक्सच्या क्यारेक्टर्स वर पण काही लिहील आहे का? सुपरम्यान आणी ब्याटम्यान यांच्या मालकांच्या आणि त्या क्यारेक्टर्सच्या प्रवासाबद्दल वाचायला आवडेल!
लेख वाचून काही प्रश्न आले मनात (आले, आता काय करणार!):
डिस्ने, मार्वल, डी सी, वार्नर ब्रदर्स, फॉक्स स्टुडिओज, ड्रीमवर्क्स, पिक्सार, सोनी, युनिव्हर्सल, प्यारामाउंट, हे सगळे आपल्याकडे का नाहीत? :(
आपल्याकडे शक्तिमानचा पिक्चर का आला नसेल?? :(
चित्रपटासाठी साजेसे भव्य-दिव्य कार्टून क्यारेक्टर्स का झाली नाहीत आपल्याकडे? मुळात एवढे मागासलेले Animation का आहे आपल्याकडे अजून??? :(
(प्रश्न पडलेला)
Sandy
23 Mar 2016 - 6:23 pm | तर्राट जोकर
उत्तरः मानसिकता, मार्केट आणि माणसे.
23 Mar 2016 - 8:33 pm | मोग्याम्बो
डीसी कॉमिक्स बद्दलही वेळ मिळेल तसे लिहिनच.
जो पर्यंत सुपरहिरो, एनिमेशन हे फक्त लहान मुलांच्या मनोरंजनाचे प्रकार आहेत हा समज दूर होत नाही तोपर्यंत ह्या क्षेत्रात भारतामध्ये प्रगती होणार नाही.
शक्तिमान वर 10 वर्षांपूर्वीच चित्रपट बनायला पाहिजे होता. त्यावेळी त्याला प्रेक्षक वर्गही तयार होता. पण आत्ता ह्या इंटरनेटच्या युगात शक्य नाही, कारण ज्या प्रेक्षक वर्गाला सुपरहिरो प्रकारात आकर्षण आहे त्यांच्यापुढे मार्वल आणि डीसीचे जग उघडे आहे आणि शक्तिमान हा सुपरमॅन वरून प्रेरित आहे त्यामुळे त्याच्यात नाविन्य असे काही नाही.
23 Mar 2016 - 6:12 pm | नया है वह
लेख आवडला!
23 Mar 2016 - 7:49 pm | एस
छान लेख. पुभालटा.
23 Mar 2016 - 9:50 pm | साधा मुलगा
किती वेळ लावलात हो हा भाग लिहायला. पुढचा भाग लवकर लिहायला घ्या. उगीच त्या राजकारणी धाग्यांपेक्षा मार्वेल, मोसाद हे वाचायला मजा येते. डोक्याला ताप नाही.
तुम्ही मागच्या भागात स्पायडर मेन बद्दल लिहिले होते पण त्यात आणि ह्या भागात टोबी वाल्या पिच्चरचा उल्लेख आला नाही. एकदम पुढे wolverine आणि Iron man वर आलात म्हणून इचारले.
24 Mar 2016 - 1:25 am | उगा काहितरीच
मस्त ...!
हे लै जब्राट प्रकरण !
बापरे हे माहीतच नव्हते . पण आयर्नमॕनला त्याच्याशिवाय आता कुणी इमॕजीनच नाही करू शकणार . एवढा एकरूप झालाय तो भुमिकेशी. जसे जॉनी डेपशिवाय कॕप्टन जॕक स्पॕरो अशक्य आहे तसेच.
रच्याकने शक्तिमानला एकातरी मार्वल मुव्हीमधे दाखवावे अशी फार इच्छा आहे. अगदी नुसती झलक दाखवली तरी चालेल. स्टॕन ली ला जसे दाखवतात तसे. शक्तिमानचा नुसता फोटो दाखवला तरी भारतात ५-५० कोटी जास्त कमावेल मुव्ही.
24 Mar 2016 - 6:04 am | साहना
मार्वल ची पालक कंपनी डिस्नी आहे हे आपण लिहिलेले आढळले नाही पण लेख फार चांगला असून आधी नसलेली खूप माहिती मिळाली. आभार.
स्टेन ली ह्या चे आम्ही आभारी असायला पाहिजे. कुणी तरी इमेजीन केले होते कि एका रूम मध्ये Thor, Iron Man, Hulk,Captain America इत्यादी बसून ठोर च्या गदे बद्दल बोलत असतात. सर्व जण ती उचलायचा प्रयत्न करतात पण कुणालाही शक्य होत नाही (Ultron मध्ये हा सीन होता). सर्व जन थकून बसलेले असता एक जेनितर साफ सफाई साठी अंत येतो आणि झाडू मारता मारता मोजीनीर (गदा) मध्ये आली म्हणून सहज उचलून बाजूला करतो.
हा जेनितर आणखी कुणी नसून स्टेन ली असतो.
24 Mar 2016 - 6:07 am | साहना
माफ करा आपण लिहिलेले आढळले. पुन्हा लेख वाचताना समजले.
24 Mar 2016 - 6:53 am | प्रचेतस
जबराट लेख.
24 Mar 2016 - 5:04 pm | भाऊंचे भाऊ
हम्म हे करार वगैरे व्यावसायिक बाबी फार माहीत न्हवत्या... आता कळाले ती टुकार फ्यांटास्तिक फॉर अन अमेजिंग सपाय्डरमन चित्रपट का आले ते. मस्त करार आहे मार्वलचा
25 Mar 2016 - 9:55 am | कपिलमुनी
सुपरहिरोची यादी कुठे मिळेल ?