कै. भाऊसाहेब पाटणकर यांची माफी मागून हि वि-चित्र कविता प्लास्टर ऑफ पॅरीसच्या हुतात्म्यांना
सांगेल काही भव्य ऐसा वि-चित्रकार मी नव्हे
तो निराकाराचा मान, इतुकी पायरी मम साकाराची नव्हे
आम्ही अरे साध्याच आपुल्या वि-चित्र जीवना संमानितो
संमानितो वि-चित्र, तसे या निराकाराने काढलेल्या साकारांनाही संमानितो
जाणतो अमूर्ता की, आम्हाला क्षणभरी अमूर्तच आहे व्हायचे
नाही तरी, नरकातील शिक्षा घेण्या मूर्त पुन्हा असते व्हायचे
मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे,
मानतो इतुकेच कि, तो वि-चित्रकार आमुचा कोणी नव्हे
निराकारा तू काढलेल्या साकार वि-चित्रात
आम्ही असू बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे
मेलो तरी वाटेल, निराकार मेला दुसरा कोणी वि-चित्रकार नव्हे
हाय तू आहे तरीही आम्हा असा धोका दिला
स्वतः साकार वि-चित्रे अनंत रंगवूनी,
तुझे वि-चित्र रेखाटणारा रंगकर्मी तू मारीला
असा धोका मृत्यो, तुला आहे कधी का मानवी रंगकर्मीने दिला ?
मर्त्य माणसांना, नावे किती तुझी अन तुझ्या दूतांची
कि या जन्मांतरी क्षणो क्षणी आम्ही दूत तुमचा --
वि-चित्र साकार मर्त्य माणसात, तुमचेच सर्वोत्कृष्ट वैचित्र्य म्हणूनी पाहीला
हातचे टाकून आलो हे वि-चित्र काव्य लिहिण्या मी -
हे सांगण्या की, आदर्श तुझा अन तुझ्या दूताचा-
त्यांच्यात आम्ही कधी ना पाहीला.
दोष नसता दिला जरी का तू मर्त्यास विसरला
देवेंद्रा तूही दारात अतीरेक्यांच्या इमान आहे विसरलास
रंगकर्मीचा साकार वि-चित्र प्लास्टर ऑफ पॅरीस फोडू तू लागलास
अप्सरांना त्यांच्या आम्ही आदाब केला शेवटी
मृत्यूवरीही, हाय, रंगकर्मीं हुतात्म्यांच्या त्यांचीच सत्ता शेवटी
तू तरी त्या अप्सरांच्या, नादी असा लागू नको
सांगूच का मृत्यो तुला मी का असे म्हणतो नको
दुर्दशा मानवी रंगकर्मीपरी ऐसी जरी आली तुला
कुठवरी रडशील येड्या मरणही नाही तुला.
प्रतिक्रिया
8 Jan 2015 - 10:12 am | एस
आवडली.
11 Jan 2015 - 9:36 pm | पैसा
कविता आवडली.
31 Aug 2015 - 1:52 am | माहितगार
प्रतिसादांसाठी आभार