सिनेमे पाहायचेत.
कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण एक फिल्टर आहे, तो ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत काय पाहावं हा. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे हा प्रश्न पडला आहे.
या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल अशी कोणतीही भीतीदायक दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.
थोडक्यात मुलाची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायचीय. तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं?
चित्रपट..
मालिका..
शाॅर्ट फिल्म्स..
इन्स्पिरेशनल व्हिडिओज..
यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतील?
प्रतिक्रिया
16 Jul 2015 - 8:05 am | इनिगोय
मला चटकन आठवलेले काही...
मुलांची शेती या धाग्यात मुविंनी नोंदवलेला 'वेट अन्टिल डार्क'
बेब अ लिटल् पिग (हा पुस्तकावरून बेतलेला आहे)
कराटे किड
हनी आय श्रंक द किडस्
अॅलिस इन वंडरलँड (नवा, त्याचा आवडता सिनेमा आहे)
(पहिल्या तीनांचे दुवे नाहीयत.)
16 Jul 2015 - 8:06 am | श्रीरंग_जोशी
चीपर बाय द डझन या प्रसिद्ध पुस्तकावर आधारीत
अन हे काही.
अधिक आठवले की लिहिनच.
16 Jul 2015 - 8:37 am | उगा काहितरीच
धागा वाचून तुमचीच आठवण झाली.
16 Jul 2015 - 8:41 am | रातराणी
आपला तारे जमींपर छान आहे. जुन्यामधे परिचय आहे. मराठीतला आता आलेला एलिज़ाबेथ एकादशी पण मस्त आहे, फक्त मुलांसाठी असा जुना मराठी चित्रपट आता आठवत नाहीये. अजून काही आठवले कि लिहते.
16 Jul 2015 - 3:36 pm | विजुभाऊ
तारे जमींपर हा माझ्या मते पालकांसाठी आहे.
16 Jul 2015 - 11:14 pm | अभिजीत अवलिया
सहमत.
17 Jul 2015 - 12:07 am | रातराणी
माझ्या माहितीतली लहान मुलेही आवडीने पाहतात हा मूवी.
17 Jul 2015 - 11:41 am | द-बाहुबली
आणी मग वेडीवाकडी अक्षरे काढायला सुरुवात करतात ;) (हे घडलेले आहे).
16 Jul 2015 - 9:44 am | पगला गजोधर
साउण्ड ऑफ म्युसीक
कुंग फू पांडा १, २
16 Jul 2015 - 9:47 am | पगला गजोधर
,
16 Jul 2015 - 9:49 am | पगला गजोधर
गांधी, लाईफ इज ब्युटीफुल
16 Jul 2015 - 9:53 am | पगला गजोधर
मुलान, श्रेक, मादागास्कर १,२, ३ आइस एज १, २, ३
एक बंदर होटल के अंदर, ज्युरासिक पार्क, हरी पॉटर,
16 Jul 2015 - 9:45 am | अमृत
एक अतिशय सुंदर डोक्युमेंट्री आहे 'होम' जरूर दाखवा.
https://en.wikipedia.org/wiki/Home_(2009_film)
16 Jul 2015 - 12:08 pm | इनिगोय
विषय खूपच आवडला. विकांताला शोधते. यूट्यूबवर आहे असं विकिपानावर दिसतंय.
16 Jul 2015 - 10:56 am | मी-सौरभ
स्वदेस आणि चक दे पण दाखवा..
16 Jul 2015 - 11:07 am | तिमा
जुने गाजलेले, एपिक सिनेमे आता यू ट्यूब वर आहेत. मी लहानपणी बघितल्यापैकी
सॅमसन अँड डिलायला, क्वो वादिस, हर्क्युलिस आणि असे अनेक सिनेमे आहेत तिथे.
16 Jul 2015 - 11:21 am | आदूबाळ
दहा वर्षांच्या मुलाला "लहान मुलांचे" या ट्यागपलीकडे जाऊन मोठ्यांचेही सिनेमे दाखवता येतील.
जुन्या मालिका:
- ब्योमकेश बक्षी
- उड़ान
- साराभाई वर्सेस साराभाई
चित्रपट
- लाखाची गोष्ट
- गोलमाल
16 Jul 2015 - 12:06 pm | इनिगोय
होय, हेच अपेक्षित आहे. मुलांचे साधे विषय घेऊनही खूप छान कलाकृती बनतात. जरूर सुचवा.
उदाहरण द्यायचं तर माजिद माजिदीचा चिल्ड्रन आॅफ हेवन, (बहिणीसाठी बूट जिंकणार्या मुलाची गोष्ट) कलर आॅफ पॅराडाईज (शेवट जरा गंभीर आहे बहुधा)... पेशाने पोस्टमन असलेल्या बापलेकाची गोष्ट (नाव आठवत नाहीय) असे बरेच सिनेमे यात घेता येतील.
मालिका नोंदवल्यात. :)
16 Jul 2015 - 12:18 pm | आदूबाळ
एक विसरलो:
सत्यजित रें चा "शोनार केल्ला" हा बंगाली फेलूदापट. समजतो.
14 Sep 2016 - 10:15 am | महामाया
टीनएजर मुलाच्या भावविश्वावर एंडी हार्डी सीरिज मधे खूप छान चित्रपट आलेत...
इंग्रजी देखील कसं सोपं आहे...
गावात राहणारया जज हार्डी यांचा मुलगा एंडी. वयोमाना प्रमाणे त्याच्या समोर येणारया प्रसंगांना तो कसा सामाेरा जातो याचं झकास चित्रण आहे या चित्रपटां मधे.
75 व्या ऑस्कर सोहळ्यात कर्क डगलस सोबत माइकल डगलसला बघतांना मोठी मौज वाटत होती. बाप-लेक दोघं स्टेज वर होते. लेकाला दोनदा ऑस्कर मिळालंय, पण मला मात्र याने हुलकावणी दिली, ही खंत कर्कने बोलून दाखविली. नंतर नाॅमिनीचं नाव वाचून झाल्यावर माइकल नी लिफाफा आपल्या बापाला दिला.
ते लिफाफा उघडूं लागले, तर माइकल म्हणाला-लिफाफा उघडण्या अगोदर म्हणावं लागतं-
‘एंड दि ऑस्कर गोज टू...’
तिकडे दुर्लक्ष करून ‘एंड दि विनर इज...’ म्हणत कर्कनी लिफाफा उघडून कागद अलगद बाहेर काढलां, त्याचे दोन तुकडे केले. एक माइकलला दिला आणि माइक समोर दोघे एकत्रच ओरडले-’शिकागो...’
छोटया पडद्यावर कर्क डगलसचा ‘स्पार्टाकस’ बघितला होता. सर लाॅरेंस ऑलिव्हिए समोर स्पार्टाकसच्या भूमिकेत कर्क डगलस शोभून दिसला होता. फार पूर्वी त्याचा ‘दि बोल्ड एंड दि ब्यूटीफुल’ बघतांना नकळत गुरुदत्तचा ‘कागज के फूल’ हा चित्रपट आठवला होता. विन्सेंट व्हेन गॉगच्या जीवनावर आधारित ‘दि लस्ट फॉर लाइफ’ देखील अप्रतिम होता. यात त्याचा सोबत एंथनी क्वीन होता...ही सगळी हॉलीवुडची दादा मंडळी...
पण त्यादिवशी त्या सोहळ्यातील ऑस्कर एलबम मधे मिकी रूनी, मारग्रेट ओ ब्रायन ला बघून अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. तेवढ्या वेळांत मिकी रूनी चे एंडी हार्डी सीरिजचे चित्रपट डोळ्यासमोर तरंगून गेले. ‘दि ह्यूमन कॉमेडी’ मधे पोस्टाची तार घरापर्यंत नेऊन त्यातील मजकूरा प्रमाणे वागणारा, ‘ब्वायज टाऊन’ मधे हाॅलीवुडचा दादा कलाकार असलेल्या स्पेंसर ट्रेसी समोर धिटाईने वागणारा छोकरा, ‘पपांनी आपल्या पहिल्या प्रेमपत्रांत तुला काय लिहिलं होतं’ (हे थेट आपल्या आईलाच विचारणारा) अशी मिकीची कितीतरी रूपे मला आठवली.
भारतीय चित्रपटांमधे बाल कलाकारांच्या मानसिकतेची जाण ठेवून काढलेले चित्रपट बोटांवर मोजण्या इतकेच असतील. त्यांत देखील सुरवातीपासूनच केंद्र स्थानी नायक-नायिकाच. आयुष्याची पस्तीशी गाठली, तरी ती नायिकाच. त्या मानाने हॉलीवुडच्या मेट्रो गोल्डविन मेयर (एमजीएम) कंपनीने काढलेले एंडी हार्डी सीरिज चे चित्रपट अमेरिकेत कमालीचे लोकप्रिय ठरले.
1937 ते 1958 च्या दरम्यान या मालिकेचे एकूण 16 चित्रपट आले. 1937 साली ‘ए फैमिली अफेयर’ पासून या मालिकेची सुरवात झाली व 1958 साली ‘एंडी हार्डी कम्स होम’ वर थांबली. खरं म्हणजे या दोन्हीं चित्रपटांची गणती या मालिकेत केली जात नाही. ही मालिका सुरू झाली ती 1938 साली आलेल्या ‘यू आर ओन्ली यंग वन्स’ आणि 1946 साली ‘लव लाॅफ्स एट एंडी हार्डी’ सोबतच संपली.
योजना नव्हती: खरंं म्हणजे एमजीएम ची एंडी हार्डी वर मालिका (सीक्वल्स) काढण्याची काहीच योजना नव्हती. पण ‘ए फैमिली अफेयर’ मधील एंडी हार्डीच्या भूमिकेत मिकी रूनी शोभून दिसला, त्याचा अभिनयामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला. या यशामुळे एमजीएम ने पुढे मालिका तयार करण्याचं ठरवलं. ‘ए फैमिली अफेयर’ हा चित्रपट आयरानिया रावेरोल च्या ‘स्कीडिंग’ नाटकावर आधारित होता. यात जज हार्डींची भूमिका लियॉनाल बेरीमोर व मिसेस हार्डीची भूमिका स्प्रिंग ब्यिंगटन नी साकारली होती. हा चित्रपट हिट ठरल्यामुळे पुढचा चित्रपट ‘यू आर ओन्ली यंग वन्स’ आला, त्यांत याच भूमिका क्रमश: लेविस स्टोन आणि फे. होल्डन नी साकार केल्या. सोबत मिकी रूनी, सिसिलिया पार्कर व सारा हेडन देखील होते. याशिवाय एंडीची गर्ल फ्रेंड पाली बेनेडिक्ट बनली होती एन रदरफोर्ड. या टीम मधील मिकी रूनी व मिसेस हार्डी (फे. होल्डन) शेवट पर्यंत या चित्रपटांत त्याच भूमिकेत वावरले, इतर पात्र मात्र बदलत गेले.
सुरवातीचे चित्रपट कुठल्याच पात्रावर (कैरेक्टर) केंद्रित नव्हते. त्यांचं कथानक ठळक पणे हार्डीच्या फैमिली भोवती केंद्रित होतं. पण मिकी रूनी च्या असामान्य प्रतिभेमुळे, त्याने साकारलेली एंडी हार्डीची भूमिका अमेरिकन टीन एजर्स मधे खूपच लोकप्रिय ठरली. हा व्रात्य, खोडकर, थोडासा आगाऊ असलेला ‘छोकरा’ किशोरवयीन मुलांमधे खूपच लोकप्रिय ठरला. म्हणून मग चौथ्या चित्रपटापासून एंडी केंद्रीय पात्र ठरला व त्याचं नाव चित्रपटाच्या शीर्षकातच सामील करण्यांत आलं.
सर्वश्रेष्ठ चित्रपट: ‘लव फाइंड्स एंडी हार्डी’ पासून या मालिकेची खरी सुरवात मानली जाते. या चित्रपटा पासूनच एंडीच्या व्यक्तिरेखेचं महत्व वाढलं, अाणि ते 1946 पर्यंत अबाधित होतं. त्याच प्रमाणे हा चित्रपट या मालिकेतील सर्वश्रेष्ठ चित्रपट समजला जातो. यात मिकी रूनी सोबत जूडी गारलैंड व लाना टर्नर देखील होत्या.
फर्स्ट फैमिली: 15 ऑगस्ट 1941 साली हॉलीवुडच्या ग्राउमन्स चाइनीज थिएटर मधे झालेल्या एका सोहळ्यांत या मालिकेतील प्रमुख कलावंत व सदस्यांनी एका फलकाचं उद्घाटन केलं. त्यावर लिहिलं होतं-
‘I, Mayor Fletcher Bowron, on behalf of the citizens of this community, Do hereby proclaim the family of Judge James K. Hardy, The first Family of Hollywood.’
हा फलक थिएटरच्या भिंतीवर लावण्यांत आला होता. पुढे 1943 साली एंडी हार्डी मालिकेच्या चित्रपटांना विशेष अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यांत आलं.
16 Jul 2015 - 1:48 pm | अमृत
हा जरा ऑडमॅन आउट वाटतोय. कित्तेक मोठ्यांनादेखील यातले ऊच्चकोटीचे विनोद कळणार नाहीत.
- साराभाई वर्सेस साराभाई चा चहाता
16 Jul 2015 - 9:53 pm | आदूबाळ
सगळे विनोद समजले पाहिजेतच असं अर्थातच अपेक्षित नाही. साराभाई वर्सेस साराभाई सध्याच्या जगावर जबरदस्त तिरकस टिप्पणी करतं. त्यासाठी दाखवायला पाहिजे.
हे जरी सोडलं तरी त्याच्या नुसत्या करमणूक मूल्याविषयी शंकाच नाही. उदा. रोसेशच्या कविता किंवा दुष्यंतचा गॅजेटवेडेपणा. त्याचा आनंद घेता येईलच.
17 Jul 2015 - 11:14 am | अमृत
:-) :-) :-) मेरी प्यारी मॉमा.....
17 Jul 2015 - 3:03 pm | सूड
बेटा अमृत, ये ऐसे किसी साईट पे लिखना इज कॅटॅगॉरिकली मिडलक्लास!! =))
17 Jul 2015 - 3:15 pm | टवाळ कार्टा
=))
16 Jul 2015 - 11:41 am | द-बाहुबली
The Three Investigators and the Secret of Skeleton Island आणी The Three Investigators and the Secret of terror castle बच्चे कंपनीसाठी मस्त सस्पेंन्स चित्रपट आहेत. Home Alone सुधा चान सेरीज आहे. बाकी कार्टुन चित्रपटांची नावे घेतानाच दमछाक होइल...
16 Jul 2015 - 12:11 pm | इनिगोय
याची चिंता नाही, पुष्कळसे त्यालाच तोंडपाठ आहेत! म्हणूनच जरा वेगळं काही दाखवायचंय.
16 Jul 2015 - 12:10 pm | रायनची आई
Childern of heaven हा अतिशय सुंदर इराणी चित्रपट आहे. दिरदर्शक व लेखक माजिद मजीदी यांचा..तो दाखवा. क्लासिक आहे.
16 Jul 2015 - 12:17 pm | प्यारे१
http://misalpav.com/node/29125
लेखात उल्लेखलेला अभय चित्रपट, halo, मकड़ी, ब्लू अम्ब्रेला, पकपक पकाक
16 Jul 2015 - 1:58 pm | प्यारे१
यांबरोबरच मालिकांमध्ये राजा शिवछत्रपती, चाणक्य (डॉ. चन्दप्रकाश द्विवेदींची), जंगल बुक, सुरभि, भारत एक खोज अशा मालिकाचे काही भाग हे कलेक्शन म्हणून चांगलं आहे. ८ ते १० नंतर पुन्हा १० ते १२/१५ वयोगट असणार आहेच की ;)
पुस्तकांमध्ये (दृक्श्राव्य नसूनही) दीनानाथ दलालांची चित्रं असलेलं राजा शिवछत्रपति छान आहे वाचायला....
16 Jul 2015 - 2:44 pm | बॅटमॅन
राजा शिवछत्रपती म्हणून १९५३ चा सूर्यकांत मांडरे अभिनीत पिच्चर आहे तो दाखवा. मालिका भंगार आहे. पिच्चर ब्लॅकेंडव्हाईट असला तरी एकदम जबराट आहे.
16 Jul 2015 - 2:53 pm | प्यारे१
मालिका भंगार का म्हणे? अमोल कोल्हे भारी आहे की!
बाकी महाराजांचं चरित्र माहिती होणं जास्त महत्त्वाचं असल्यानं कुठल्याही मार्गे माहित करुन घ्यावं.
16 Jul 2015 - 6:05 pm | बॅटमॅन
नुसतं दिसणं महत्त्वाचं असेल तर असो बापडं. बाकी मालिका त्या पिच्चरच्या तुलनेत भंगारच आहे. तुम्हांला नाय ना पटत, राहिलं तर मग.
16 Jul 2015 - 6:35 pm | प्यारे१
आवो तसं न्है पाटील.
आम्ही त्या मालिकेतल्या त्रुटी विचारतोय.
अभ्यास कमी की भव्यता कमी की आणखी काही. अशा दृष्टीनं.
17 Jul 2015 - 4:00 pm | बॅटमॅन
बटबटीतपणा हे त्या मालिकेचे वैशिष्ट्य आहे. भव्यदिव्य वगैरे चांगलेच आहे. अभ्यासही फार उणा नसला तरी खटकणार्या गोष्टी जास्त आहेत. त्यातला शिवाजी जास्त लाउड वाटतो. इतका लाउड शिवाजी न करताही बरेच काही दाखवता आले असते.
17 Jul 2015 - 4:06 pm | प्यारे१
ती वाहिनीची आणि प्रेक्षकांची गरज असावी असं मानू!
16 Jul 2015 - 2:54 pm | इनिगोय
या अभयबद्दल माहीत नव्हतं, शोधेन नक्की. हॅलो, आणि ब्लू अम्ब्रेला आठवून दिल्याबद्दल आभार.
16 Jul 2015 - 12:42 pm | काळा पहाड
रानी और लाल परी: https://www.youtube.com/watch?v=unWTrT1URbQ
हातिम ताई: https://www.youtube.com/watch?v=VX26dYyVxbc
16 Jul 2015 - 12:48 pm | स्नेहल महेश
jumanji हा चित्रपट पण खूप छान आहे
16 Jul 2015 - 2:02 pm | इनिगोय
पुण्यात लहान मुलांच्या सिनेमांचं स्क्रीनिंग होतं त्याबद्दल कोणाला काही माहीत आहे का? मुलांसाठी सिनेमे दाखवणारा एक क्लब असून ते दर महिन्याला एकदा असे देशोदेशीचे चित्रपट दाखवतात बहुधा.
असाच वार्षिक उत्सव सीएफएसआय करते असंही दिसतंय.
16 Jul 2015 - 2:35 pm | नाखु
हाफीस बहुदा नीलायम थेटराजवळ आहे.
श्रीकांत मुंदडा आणि जकातदार हे स्थापक संचालक असावेत.
जाण्कार सांगतीलच.
16 Jul 2015 - 2:31 pm | _मनश्री_
होम अलोन -३
बेबीज डे आउट
बावर्ची ,खट्टा मीठा (जुना) ,लगान
चिंटू १ आणि २
एलिझाबेथ एकादशी ,अवताराची गोष्ट
'बम बम बोले' नावाचा छान चित्रपट आहे ,अतुल कुलकर्णी आणि दर्शील सफारी आहेत त्यात
16 Jul 2015 - 2:56 pm | भिंगरी
जुना सिनेमा,.... बालक
दो कलियाँ
नन्हा फरिश्ता
16 Jul 2015 - 2:57 pm | गिरकी
गॉड मस्ट बी क्रेझी सगळे पार्ट्स.
मला मिस्टर इंडिया खूप आवडायचा लहान असताना. शिवाय हम है राही प्यार के पण आवडायचा.
आता या दोन्हीमध्ये प्रेमं बिमं आहेत. पण मी लहान असताना फार एन्जॉय केलेले हे २.
शिवाय बीबीसी वाली 'लाईफ ऑफ बर्ड्स' नावाची एक सिरीज आहे. युट्यूब वर मिळेल. फार छान आहे. नक्की बघा. पक्षांच्या जीवनातले फार सुंदर प्रसंग आणि बारकावे आहेत त्यात.
https://en.wikipedia.org/wiki/The_Life_of_Birds
16 Jul 2015 - 3:23 pm | पद्मावति
स्टॅन्ली का डब्बा, चिल्लर पार्टी हे चित्रपट छान आहेत असे ऐकले आहे. मी स्वत: नाही पण माझ्या मैत्रिणिने तिच्या दहा वर्षाच्या मुलाबरोबर बघितले ते त्याला आवडले.
मालिकांमधे माझी मुलं बालवीर बघतात. तशी माझी मुलं ८ ते १० वयोगटाहुन जरा मोठी आहेत पण तरीही बालवीर आवडीने बघतात.
दुसरी मालीका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. ही मालीका यासाठी तुम्हाला सुचविते आहे की अतिशय निखळ मनोरंजन आणि छान संदेश आहे. एका कॉलोनी मधे सगळे शेजारी कसे खेळीमेळीने, मस्ती करत एकमेकांबरोबर राहतात याचं खूप छान चित्रण आहे. फील गुड मालीका आहे. कुठेही मुलांबरोबर पाहतांना ऑक्वर्ड वाटेल असे काहीही नाही.
उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट पण मुलांनी खूप एन्जॉय केल्या होत्या. उंच माझा झोका बघतांना मुलांच मराठी खूपच सुधारलं होतं हा एक चांगला साइड इफेक्ट होताच.
16 Jul 2015 - 4:54 pm | भुमन्यु
स्टॅन्ली का डब्बा, चिल्लर पार्टी - दोन्हिही चित्रपट खुप काही शिकवुन जातात. लहान मुलांचे अतिशय सुंदर अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू
16 Jul 2015 - 4:40 pm | भुमन्यु
८ बीलो
16 Jul 2015 - 4:45 pm | भुमन्यु
द मेन हू बिल्ट अमेरिका: ही ५ भागांची उत्तम मालिका द हिस्ट्रि चॅनेल ने दाखवली होती. (मिपा वर त्यासंदर्भात एक लेख मालिका पण प्रसिद्ध झाली आहे.)
16 Jul 2015 - 5:39 pm | अन्या दातार
परवाच पाहिलेला इनसाइड आऊट अप्रतिम आहे
16 Jul 2015 - 8:42 pm | विशाखा पाटील
ऐकलंय या सिनेमाबद्दल.
https://genvideos.org/watch?v=Inside_Out_2015#video=L8ITkrfyOCuXtzIB79AF...
16 Jul 2015 - 8:44 pm | श्रीरंग_जोशी
अगोदरच्या विकांताला ११ वर्षीय भाच्याबरोबर थेटरात जाऊन पाहिला. लहान मुलांचा चित्रपट असला तरी मोठ्यांनाही विचारात पाडण्याची क्षमता आहे या चित्रपटाची.
चित्रपटात मिनेसोटा असल्याने आम्हाला अधिकच भावला :-) .
17 Jul 2015 - 4:12 pm | अन्या दातार
१००% खरंय. २७ ते ३२ या वयोगटातल्या आम्हा ४ पोरांनी एंजॉयही केला, विचारातही पडलो. डायरेक्टर, कथालेखक यांना मनातल्या मनात दंडवत घालूनच बाहेर पडलो.
16 Jul 2015 - 6:00 pm | रेवती
पूर्वीची गोट्या ही मालोका, टिपरे आजोबांची मालिका या मुलांना आवडतात. गोट्याला त्रास दिलेला त्यांना आवडत नाही व त्यांची एक्सप्रेशन्स बघताना आपल्याला मजा वाटते. मनोरंजन म्हणून मिस्टर इंडिया हा चित्रपट आवडतो. बोक्या सातबंडे हाही एक आहे.
16 Jul 2015 - 6:02 pm | रेवती
अवताराची गोष्ट हा मला आवडला पण माझा मुलगा कंटाळाला, तरी अर्धा बघितला.
16 Jul 2015 - 6:38 pm | जुइ
अजून वेगळे काही आठवल्यास भर घालीन.
16 Jul 2015 - 8:37 pm | मित्रहो
मी आणि माझ्या दहा वर्षाच्या मुलाने वळूची पारायणे केली आहेत. ग्रामीण भागाची ओळख करुन घ्यायला उत्तम.
तसा आम्ही जाने भी दो यारो पण बऱ्याचदा बघितला.
फाइंडींंग निम्मो पण बापलेकांनी मिळून बऱ्याचदा बघायचा चित्रपट आहे. तसा मला आणि माझ्या दोन्ही मुलांना कार्स १, २ फार आवडतात. आइस एज सिरीजचे पण तेच साऱ्यांनाच आवडतात.
मला फारसे न आवडनारे पण मुलांना आवडनारे क्रुड्स, फ्रोझन, प्लेन्स
शेवटी आपण कितीही प्रयत्न केला तरी मुले तेच बघतात जे त्यांना बघायचे असते. तरीही आपण आपले प्रयत्व करीत राहावे.
थोडेसे अवांतर - माझ्या मुलानी ती व्हीम्पी किड्स ची पुस्तके वाचलेली मला आवडत नाही पण त्याला तेच आवडतात.
17 Jul 2015 - 2:21 pm | इनिगोय
फायंडिंग निमो आणि आईस एज मधलं हत्ती कुटुंब खरंच पुनःपुन्हा पाहणेबल आहेतच.
खरं आहे काही अंशी. पण मग थोडी सक्ती करून आणि टार्गेट ठेवून त्याला आम्ही नवीन गोष्टी इंट्रोड्युस करून देतो.
रोआल्ड डॅल च्या कादंबर्या माझा लेक पुन्हा पुन्हा वाचतो, त्यामुळे मग अमूक पुस्तकाची दहा पानं वाचून झाली की मग मटिल्डा मिळेल, असं सांगून सांगून रुचिपालट घडवला.
तेच कार्टुन चॅनल्सचं. अॅनिमल प्लॅनेट/नॅटजिओ अर्धा तास पाहिलं तर अबक कार्टूनचा एपिसोड पाहायला मिळेल, असं करून करून आता अबक मागे पडलंय नि तो स्वतःच लक्षात ठेवून सायन्स आॅफ स्टुपिड, हाउ डू दे डू इट इ. पाहतो.
सुदैवाने त्यालाही सिनेमाची आवड आहे, आणि नंतर झालेल्या गप्पांमध्ये तो सिनेमा खरंच विचार करत 'बघतो' हे जाणवलंय. म्हणून हा खटाटोप. काल रात्री माजिद माजिदीच्या सिनेमांबद्दल सांगितलंय, तसा आता 'कधी बघूया' म्हणून तोच मागे लागलाय.
16 Sep 2016 - 9:16 am | आशु जोग
आपण कधी स्वतः खेड्यात राहिला आहेत का
नसला तर या चित्रपटावर अवलंबून राहू नका
सदाशिवातल्या गिरीश उमेश कुलकर्ण्यांनी काढलेले चित्रपट म्हणजे ग्रामीण असा एक सोयीस्कर समज अनेकांचा झालेला दिसतोय
16 Jul 2015 - 9:16 pm | मनीषा
इंग्रजी मधे लहान मुलांसाठी असे खूप चित्रपट आहेत.
त्यामानाने मराठी आणि हिंदीत खूपच कमी आहेत.
हिंदी :-
१) बहादूर बच्चे
२) मकडी
३) बालगणेश
४) हनुमान
मराठी :-
१) पक पक पकाक
२) एलीझाबेथ एकादशी
इंग्लीश :-
१) मेरी पॉपीन्स
२) लायन किंग
३) ३६ थ चेंबर ऑफ शॉवलीन
४) ब्लॅक बिअर्ड घोस्ट
५) शॅगीडीए
६) गॉड्स मस्ट बी क्रेझी , भाग १,२
७) श्रेक भाग १,२
टी. व्ही सिरीयल :-
१) मालगुडी डेज
२) स्वामी
३) कच्ची धुप
४) फेमस फाईव्ह (इंग्लीश)
17 Jul 2015 - 11:35 am | मनीषा
वरील यादीतील "स्वामी", ही हिंदी सिरीयल आहे बरं का , मराठी नाही.
आर. के लक्षमण यांचे कथालेखन आहे .
17 Jul 2015 - 1:50 pm | मनीषा
चुकुन मिष्टेक झाली .:(
आर के नारायण ... लक्ष्मण नाही
17 Jul 2015 - 2:40 pm | इनिगोय
तोच विचार आला, आभार. यादीबद्दल सुद्धा.
16 Jul 2015 - 9:36 pm | इनिगोय
मस्त होते आहे यादी.
व्हिडिओज, शाॅर्ट फिल्म्स देखील सुचवा कोणीतरी. इन्स्पिरेशनल व्हिडिओज पैकी काही?
16 Jul 2015 - 9:47 pm | प्यारे१
सा म्हैन्यानं प्वार् आब्ब्यास करीत न्हाय म्हून वरडू नगासा म्हंजी झालं!
16 Jul 2015 - 10:26 pm | बहुगुणी
It's a long way to sea!
जानू बरुआ यांचा हा आसामी चित्रपट त्यातल्या दहा-बारा वर्षांच्या अभिनेत्यामुळे लक्षात राहीलः
16 Jul 2015 - 10:48 pm | पैसा
खूप छान यादी तयार झालीय!
16 Jul 2015 - 10:56 pm | सतिश गावडे
Life Is Beautiful हा चित्रपट आवर्जून दाखवा. कदाचित आवडेल त्याला.
माझा अकरा वर्षांचा भाचा त्याला कंटाळा आला की हा चित्रपट पाहात असे आणि एकदम खुश होत असे.
17 Jul 2015 - 11:31 am | मनीषा
थोड्या मोठ्या मुलांसाठी ... ( कदाचित १२. ते १४ वयोगटातील ), त्यांना आवडतील असे काही मराठी चित्रपट आठवले .
१) २२ जून १८९७
२) बालशिवाजी
३) नेताजी पालकर
४) सर्जा
17 Jul 2015 - 11:51 am | क्रेझी
श्यामची आई हा पण छान सिनेमा आहे.
17 Jul 2015 - 12:17 pm | टवाळ कार्टा
हा कधीच दाखवू नका
17 Jul 2015 - 2:49 pm | तुषार काळभोर
एक जुनी चर्चा आठवली...
17 Jul 2015 - 11:46 am | द-बाहुबली
खरं सांगायच तर मुलांना मोठ्यांचे चित्रपटच बघायचे असतात. त्यांना मुलांसाठी म्हणून विषेश मागणी नको असते म्हणूनच हॅरी पॉटर सुधा अबालव्रुध्दांचा लाडका असतो फक्त मुलांचा न्हवे. तेंवा जमलच तर आज मुलांना बजरंगी भाइजान किंवा किमान बाहुबली अवश्य दाखवाच.
म्हटलं तर अवांतरः- ती सिगमा सिरीअल पण मस्त होती, दुरदर्शनने तारा, शक्ती सारखी भारतीय नावे व कलाकार घेउन यशस्वी स्पे-साय्फाय काढ्ली होती हे एक आश्चर्यच. कुठे बघायला मिळेल का ती ? (नंतरच्या फालतु कॅप्टन व्योम मधे मात्र अजिबात मज्या न्ह्वती.)
17 Jul 2015 - 12:40 pm | काळा पहाड
लै शोध घेतला भावा, कुठे मिळतच नै ती. यू ट्यूब वर तर नाहीच, एक दोन ठिकाणी सोडलं तर बाकी सुद्धा कुठे काही उल्लेख नाही. मिळाली तर सांग.
13 Jun 2017 - 10:12 pm | एकुलता एक डॉन
कॅप्टन व्योम नव्याने आले
https://www.youtube.com/playlist?list=PLwMNlhB9pzRqLAt2FVpoRVxpB7XUX2kIz
17 Jul 2015 - 4:10 pm | बॅटमॅन
अगदी बरोबर आहे. मुद्दाम डंब डाऊन केलेले पिच्चर मुलांना फार आवडत नाहीत.
18 Jul 2015 - 8:23 pm | द-बाहुबली
मोठ्यांनाच तर बालचित्रपटाची गरज आवर्जुन असते...!
ही पोरं सुधा मोठी होउ द्या इनिगोय सर मग बघा (नॉट अनलाइक मी)आपोआप हुडकुन बालचित्रपट स्वतःच बघायला सुरुवात करतील.
4 Aug 2015 - 7:58 pm | एस
ह्या मॅडम आहेत. :-)
17 Jul 2015 - 2:43 pm | कवितानागेश
जुने ब्लॅक न व्हाइट मराठी सिनेमे, साधी माणसे वगैरे खरच आवडण्या सारखे आहेत.
17 Jul 2015 - 4:09 pm | बॅटमॅन
ते तुम्हांलाआम्हांला, पोरांना आवडतील असे आजिबात सांगता येत नै.
17 Jul 2015 - 4:15 pm | टवाळ कार्टा
हेच्च ल्हिआयला आलेल्लो
17 Jul 2015 - 4:18 pm | प्यारे१
मग लह्यायचं की...!
-साधी माणसं मधला राजशेखर
17 Jul 2015 - 4:19 pm | प्यारे१
मग लह्यायचं की...!
-साधी माणसं मधला राजशेखर
17 Jul 2015 - 2:59 pm | प्रमोद देर्देकर
अजुन एक सिनेमा. खुप छान कुत्र्याचे काम असलेला म्हणजे "बेनजी द हंटेड" बघा.
एकही डायलॉग नाहीये या पिक्चर मध्ये.
आपल्याकडे तसा एकही डायलॉग नसलेला पिक्चर म्हणजे कमल हसनचा "पुष्पक " तो ही बघा. खुप छान आहे.
17 Jul 2015 - 3:05 pm | सिरुसेरि
परिचय , किताब , मै फीर आउंगा , जाग्रुती , बुट पॉलिश , सीमा , त्रियात्री , अपुर्व सहदरोगल , गोपाळक्रुष्ण , रामशास्त्री , संत ज्ञानेश्वर , आझादीकी ओर
17 Jul 2015 - 4:05 pm | इनिगोय
यांच्याबद्दल कधी ऎकलेलं नाही. थोडक्यात कथा सांगाल का?
17 Jul 2015 - 3:10 pm | सिरुसेरि
आम्ही जातो आमच्या गावा , छोटा जवान , हा माझा मार्ग एकला , पेडगावचे शहाणे , जिंगल ऑल द वे
17 Jul 2015 - 3:11 pm | सिरुसेरि
आम्ही जातो आमच्या गावा , छोटा जवान , हा माझा मार्ग एकला , पेडगावचे शहाणे , जिंगल ऑल द वे
1 May 2020 - 5:27 pm | समाधान राऊत
शोधलं मी , बरंच शोधलं , पण कुठे मिळाला नाही , दुवा वैगेरे असल्यास मिळावा अशी विनंती ...
धन्यवाद
17 Jul 2015 - 4:41 pm | सिरुसेरि
"त्रियात्री , अपुर्व सहदरोगल - यांच्याबद्दल कधी ऎकलेलं नाही. थोडक्यात कथा सांगाल का? "
- त्रियात्री - शाळेची/१०वी वार्षिक परिक्षा अनुत्तीर्ण झाल्याने निराश झालेले ३ मित्र. त्यातील एकाचे आजोबा त्या तिघांना जरा बदल म्हणुन सायकल वरुन भारताची सफर करायला सांगतात . या ३ मुलांना प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव , त्यांचे बदलेले विश्व अशी थीम आहे .
अपुर्व सहदरोगल -- हिंदी अप्पु राजा - कमल हासन .
17 Jul 2015 - 8:33 pm | सानिकास्वप्निल
लाईफ इज ब्युटिफूल
फ्रोझन
ब्लॅक ब्युटी
होम
चार्ली चॅप्लिनचा दी किड
तू-नळीवर लॉरेल अँड हार्डीचे अनेक व्हिडिओज आहेत
दी पोलार एक्स्प्रेस
वॉल-ई
बिग हिरो -सिक्स
हाची: हाचिको (अतिशय आवडता)
हाचीप्रमाणेच अजून एक सिनेमा आलेला रेड डॉग
Tom Sawyer & Huckleberry Finn
ह्युगो
दी बॉय इन स्ट्राईप्ड पजामास
ब्रेव्ह
The Adventures of Tintin
रँगो
Little Fugitive
Enchanted
Hotel Transylvania
Oliver Twist
स्पायडरव्हिक क्रॉनिकल्स
पुस इन बुट्स
माँस्टर हाऊस
Night at the Museum
अॅलिस इन वंडरलँड
हुक
Evan Almighty
स्मर्फ्स
जॅक फ्रॉस्ट
Beverly Hills Chihuahua