फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ?
वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे.
आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती.
हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे.
सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना
जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे.
प्रतिक्रिया
8 Jul 2015 - 2:41 pm | मृत्युन्जय
:) ;) + १
8 Jul 2015 - 3:15 pm | नाव आडनाव
मी कुठे म्हणतोय मी तुम्हाला विरोध करतोय? पाठिंबा / विरोधाचं काही नाही साहेब. तुम्ही बोलला तसंच दुसरं उदहरण दिलं एव्ह्ढंच :)
एखादा माणूस डायरेक्ट मुख्यमंत्री / पंतप्रधान झाला तर ती त्याची लायकी होती म्हणूनच.
8 Jul 2015 - 3:37 pm | बबन ताम्बे
उदा.
" हे खरं तर असं वाचता येईल: शरद पवारचा एफटीआयआय च्या जागेवर डोळा आलेला आहे. आणि त्यानं आपले केंद्रातले संबंध वापरून त्याबद्दल प्रयत्न सुरू केले आहेत. थोड्याच दिवसात तिथे कोलते पाटिल किंवा अविनाश भोसले चा बोर्ड दिसू लागेल."
काहीही!! उचलली जीभ, लावली टाळ्याला. विषय फिल्म इन्स्टीट्युट आणि गजेंद्र चौहान यांचा चाललाय.
खरेच शरद पवार एव्ह्ढे भ्रष्ट आहेत का हो? की केवळ काही शरद पवार द्वेष्ट्यांनी हा धुरळा उडवलाय? एक वेगळा धागा होऊनच जाऊ द्या ह्यावर.
8 Jul 2015 - 3:43 pm | होबासराव
अरे काय चाललय काय :(
पुर्वि दुरदर्शन वर मराठि तमाशापट असायचे..त्यात काहि तरि असेच असायचे..सवाल-जवाब का काय्..त्यात म्हणायचे
.... होउन जाउद्या.
8 Jul 2015 - 2:08 pm | काळा पहाड
पॉप क्विझ:
The students at FTII have sharply questioned Mr. Chauhan’s “creative credentials” and whether he has the requisite vision in guiding the institute that has been earlier helmed by internationally-renowned luminaries such as Adoor Gopalakrishnan, Girish Karnad, U.R. Ananthamurthy, and Shyam Benegal, who have graced Indian theatre, cinema and literature.
चला आता गुगल न करता सांगा बघू अदूर गोपाल्क्रीश्णन काय आहेत आणि त्यांनी काय निर्माण केलंय.
8 Jul 2015 - 2:24 pm | dadadarekar
धर्मराजाने काय निर्माण केलेय हे तर गुगलूनही मिळणार नाही. फार्फार तर गुगल पोखरून एखादा उंदीर मिळेल.
8 Jul 2015 - 2:29 pm | काळा पहाड
हितेश राव, मग मला सांगा अदूर गोपालाक्रीश्णन चांगले का आणि धर्मराज का वाईट? दोघेही जर कुणी न बघणार्या पिक्चर शी संबंधित आहेत तर?
8 Jul 2015 - 4:28 pm | अनिरुद्ध.वैद्य
कृपया, धर्मराज याच्यात ओढू नका. त्या माणसाचे नाव गजेंद्र चव्हाण आहे. तेव्हा उगाच महाभारतातील व्यक्तिरेखांवर काड्या टाकू नका.
धन्यवाद.
8 Jul 2015 - 2:31 pm | कपिलमुनी
ते मल्याळम चित्रपट निर्माते , दिग्दर्शक आहेत. एवढी तोंडओळख
आता तुम्ही अदूर गोपाल्क्रीश्णन आणि गजेंद्र चौहान यांना गुगलून बघा आणि कोण लायक आहे ते सांगा !
8 Jul 2015 - 2:59 pm | काळा पहाड
मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा नाही हो. स्ट्रेटेजि ठरवणे, सरकारबरोबर को-ओर्डिनेट करणे, बजेट वाढवून घेणे, सुव्हिधा वाढवणे, नवीन टेक्नोलॉजी आणण्याबद्दल विचार करणे, विद्द्यार्थ्यांच्य रोजी रोटी ची सोय होईल (क्रूड लिहितोय थोडंसं) असं पहाणे अशी कामं असतात. मला सांगा, अदूर साहेबांनी या सगळ्यात प्राविण्य मिळवलंय का हो? नाही, कारण विद्यार्थी तो एक मुद्दा उचलतायत. भले चौहान साहेबांना हे येत असेल किंवा नसेल, अदूर साहेबांना किंवा बाकीच्यांना हे येतंय का?
दुसरा मुद्दा म्हणजे, शरद पवारांना क्रिकेट किती येतं? मग तिथे ही बोंबाबोंब का होत नाही बरं?
8 Jul 2015 - 3:14 pm | कपिलमुनी
गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत?
तेवढा सांगा ओ !
8 Jul 2015 - 3:27 pm | काळा पहाड
ते कसे नालायक आहेत आणि बाकीचे कसे लायक आहेत ते सांगा आधी. मगाचपासून हेच दुसर्या तर्हेनं विचारतोय काय समजत नाहीये का?
8 Jul 2015 - 3:50 pm | कपिलमुनी
बाकीच्यांना कमीत कमी चित्रपट क्षेत्रामधला निर्मिती,लेखन, दिग्दर्शन यांचा अनुभव आहे.
या लोकांच्या कलाकृती देशात , जगात गाजल्या आहेत आणि यांना बर्याच प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. जास्त माहितीसाठी इथे पहा
श्याम बेनेगल यांनी इथेच शिकवले आहे. त्यामुळे ते विद्यार्थांशी जास्त चांगले कनेक्ट होउ शकतात .
गिरिश कर्नाड हे ऊतम अभिनेते , लेखक , दिग्दर्शक आहेत
He served as director of the Film and Television Institute of India (1974–1975) and chairman of the Sangeet Natak Akademi, the National Academy of the Performing Arts (1988–93).
यांना या व अशाच पदाचा अनुभव आहे.
वरील दोन्ही उमेदवार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आणि कलेची जाण असलेले म्हणून ओळखले जातात
आता २ वाक्ये चौहान यांच्यवर लिहा .
8 Jul 2015 - 4:38 pm | काळा पहाड
मुनीश्वर, एडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी वेगळ्या आणि आर्ट स्किल्स वेगळी. श्याम बेनेगलांबद्दल माझं काही म्हणणं नाही paN हे बाकीचे कन्नड आणि केरळी चेहरे म्हणजे सभ्य चेहृयातले कम्युनिस्ट आहेत. कर्नाड सतत कसले ना कसले वाद ओढवून घेतात.
http://indiafacts.co.in/girish-karnad-medicine/
http://indiafacts.co.in/how-girish-karnads-plays-distort-indian-culture-...
खालील लिंक्स पहा:
१. रविंद्रनाथ टागोर सेकंड रेट प्ले रायटर आहेत:
http://timesofindia.indiatimes.com/india/Rabindranath-Tagore-a-second-ra...
२. अनंत मूर्ती बद्दल
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/karnad-ura...
३. नॉय पॉल बद्दल
http://blogs.hindustantimes.com/medium-term/?p=547
४. Calling the move to introduce the Bhagavad Gita in primary schools across the State another step in “cultural terrorism”, Jnanpith award winner Girish Karnad lambasted the State Government for this “communal” proposal here on Friday.
http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/bhagavad-g...
http://www.patheos.com/blogs/drishtikone/2012/11/girish-karnad-ahmednija...
त्यातून हे आर्टीस्ट्स म्हणजे भडक डोक्याचे प्राणी. तेव्हा कर्नाड सारख्याला तिथे आणून ठेवलं तर तिथे एफटीटीआय आणि त्यांचं पुरस्कृत सरकार यांच्यात भांडण सुरू झालंच म्हणून समजा.
8 Jul 2015 - 4:43 pm | कपिलमुनी
आता २ वाक्ये चौहान यांच्यवर लिहा .
हा मुद्दा सोडून दुसरेच लिहित आहात.
दुसरा किती वाईट यावर चौहानांचा चांगलेपणा आहे का ? गजेंद्र चौहान हे वादातीत उत्तम कलाकार किंवा एडमिनिस्ट्रेटर असतील तर सांगा , सर्वजण आनंदाने मान्य करतील.
8 Jul 2015 - 4:34 pm | अनिरुद्ध.वैद्य
पवारांना मध्ये आणल्याबद्दल निषेध निषेध!!!
बर ते सोडा … ह्या गजेंद्र भाऊंनी किती पिक्चरे गेल्या ५ वर्षात केलीत? त्याचं सध्याच्या तंत्रज्ञानाबद्दल काय मत आहे? वगरे वगरे सांगू शकाल का? त्यांनी काय व्यवस्थापन केलाय आधी हे तरी सांगा? नाही म्हणजे गल्ली निवडणुकांच व्यवस्थापन आणि FTII च व्यवस्थापन … काही तर फरक असेल ?
7 Aug 2015 - 10:12 am | थॉर माणूस
शरद पवार कंट्रोल बोर्डावर निवडून आले होते. गजेंद्रला आणून बसवलाय. ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे. ही शिक्षण संस्था आहे. शरद पवार नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचे अध्यक्ष नव्हते.
आता कुठलेही लॉजिक कुठेही लागायला सुरू झालंय. :)
8 Jul 2015 - 2:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
त्या संस्थेचे जे माजी विद्यर्थी आहेत व ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात काही भरीव काम केले आहे अशांची सा़क्ष काढावी असे ह्यांचे मत. संस्थेचे काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी-
मिथुन चक्रवर्ती,जया बच्चन,राजकुमार हिरानी,रझा मुराद,शत्रुग्न सिन्हा,ओम पुरी,संजय लीला भंसाळी..
https://en.wikipedia.org/wiki/Film_and_Television_Institute_of_India
ह्यांच्या करियरमध्ये तत्कालीन संचालकांचा सहभाग/वाटा किती ह्यावर मत मिळाले की मग पुढचे बघता येईल.
8 Jul 2015 - 2:54 pm | मृत्युन्जय
ज्जे बात, मला वाटते हा प्रतिसाद अतिशय योग्य आहे.
अवांतरः आयुष्यात कधी माईशी सहमत व्हावेसे वाटेल असे वाटले नव्हते,
8 Jul 2015 - 3:13 pm | संदीप डांगे
मस्त हो माई. ह्या लॉजिकने तर मग संचालकच नको ना?
उगा वडाची साल पिंपळाला...
8 Jul 2015 - 5:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
संचालक हवा तर.म्हणूनच तर हे सगळे चालू आहे. पण तत्कालीन संचालकांचा माजी विद्यार्थ्यांवर काय प्रभाव पडला,त्यावेळच्या संचालकांनी कोणते धाडसी निर्णय घेतले,त्यांचा अभ्यासक्रमांतला हस्त़क्षेप....हे जर मुद्दे पुढे आले तर सरकारला विरोध करताना काही अर्थ राहील. संस्था मोठी आहे,तिच्यातून लोकप्रिय्,करमणूकप्रधान हलके फुल्के सिनेमे देणारे लोक तयार होतात हे ही मान्य पण गजेंद्र चौहान ह्यानी बर्लिन्,कान्समध्ये जाऊन चेहरा रंगवला नाही म्हणून ते संस्था चांगल्या तर्हेने चालवू शकणार नाहीत हा अजब तर्क झाला असे ह्यांचे मत.
8 Jul 2015 - 5:24 pm | नाव आडनाव
तुम्ही "ह्यांना" मिसळपाव वर यायला सांगा. तुम्हाला लई टाईप करायला लागतंय.
8 Jul 2015 - 3:13 pm | नाखु
कायतर शिणेमा संस्थेच्या तमाशाचे मिपावर नाटक (वस्त्रहरण) झाले आहे.
पिटातील प्रेक्षक
नाखु
8 Jul 2015 - 3:20 pm | कपिलमुनी
शिट्ट्या मारा :)
9 Jul 2015 - 6:00 pm | gogglya
+१११११११११११
8 Jul 2015 - 3:27 pm | बॅटमॅन
भक्तांचा नंगानाच बघून डोळे पाणावले. उद्या भाजपाप्रणीत नेमणूकीत राखी सावंत जरी निवडून आली तरी तिलाच सपोर्ट करतील हे वेगळे सांगणे न लगे.
8 Jul 2015 - 3:30 pm | काळा पहाड
राखी सावंत बद्दल काय बोलायचं काम नाही हां. नाही तर 'आठवले' ना सांगीन.
8 Jul 2015 - 3:35 pm | बॅटमॅन
=))
10 Aug 2015 - 3:01 pm | आशु जोग
तिलाच सपोर्ट करतील
तिच्यामागे उभे राहतील असे तुम्हाला म्हणायचे आहे का...
बाकी सगळं छान मराठी लिहीलंत पण तेवढंच इंग्रजी लिहीलंत म्हणून एक शंका... !
9 Jul 2015 - 1:31 pm | ईश्वरसर्वसाक्षी
http://www.misalpav.com/comment/709519#comment-709519
http://www.misalpav.com/comment/691072#comment-691072
http://www.misalpav.com/comment/607658#comment-607658
जरा आरशात बघा..इतरांच्या धाग्यांना आपण वर्तमानत्री धागे म्हणता.
9 Jul 2015 - 2:06 pm | प्रसन्न केसकर
गजेन्द्र चौहान यांच्या आधी त्या पदावर कोण होते? आणि त्यांच्या आधी? ते लोक पण चित्रपट क्षेत्रातले नामवंत होते का? जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.
9 Jul 2015 - 11:35 pm | खटासि खट
मी काय म्हणतो अडवाणी, जेठमलानी, कंदाहार फेम माजी मंत्री इत्यादींपैकी कुणालाही बनवलं असतं तरी चाललं असतं की, भाजप खासदार धडकेशमालिनी पण चालल्या असत्या आणि गरम धरम~, शॉटगन सिन्हा यांनी काय पाप केलं होतं ? विनय सहस्त्रबुद्धे , समीर धर्माधिकारी किंवा किरण खेर यांचे पतीदेव पण चालले असते.
नाहीतर निवडणुकीत मोदींसाठी न्यूड फोटो दिलेली ती कुठली बया यांचा पण विचार करायला पायजेल होता. जाऊ द्या आता हत्तीचं वाहन तर हत्तीचं वाहन.
9 Jul 2015 - 11:58 pm | dadadarekar
...
11 Jul 2015 - 3:38 pm | dadadarekar
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48030061§ion=top-sto...
अमिताभ , रजनीकांत , अनुपम खेर असे दिग्गज सोडुन धर्मराज , राहूल सोलापूरकर वगैरे भाजपभाटांची वर्णी लावली
11 Jul 2015 - 8:22 pm | कपिलमुनी
राहूल सोलापूरकर चांगला अभिनेता आहे , तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या भूमिका छान करता
11 Jul 2015 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
मुनिवरच ते. शालजोडीतले मोठ्या खुबीने हाणणारच ! =))
12 Jul 2015 - 6:48 am | dadadarekar
डॉक्टर हा एक अॅक्टर असावा लागतो. असं आमचे मास्तुरे सांगायचे.
18 Jul 2015 - 2:32 pm | आशु जोग
खासदार रामदास आठवले यांनी चौहान यांच्या नेमणुकीवरून होणारा प्रचंड विरोध पाहता त्यांनी तातडीने संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या चित्रपट शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर आठवले यांनी ही मागणी केली.
सविस्तर वृत्त येथे पहा
11 Jul 2015 - 4:20 pm | महासंग्राम
ए-दिले-नादां तुझे हुआ क्या आखिर इस दर्द कि दवा क्या है
11 Jul 2015 - 4:54 pm | धर्मराजमुटके
नका रे अशी माझ्या नावावर चिखलफेक करु !
आपल्या एका मिपाबंधूची भुमिका केलेल्या नटाला एवढ्या मोठ्या पदाचा मान मिळालाय तर मिपाकरांनी खुश नको का व्हायला ? शांत व्हा. नायतर भीमार्जुनाला पाठवू काय ? नको, त्यापेक्षा कृष्णालाच पाठवतो. कृष्णनितीशिवाय हा पेच सुटायचा नाही.
11 Jul 2015 - 11:45 pm | खटासि खट
बाबा बाबा, आपण ना
पांढरा हत्ती आणायचा..
बाळ इंद्राचा गज आणून
चुहा हाणायचा..
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/amitabh-bachchan-couldve-b...
12 Jul 2015 - 12:36 am | आशु जोग
इंद्राचा गज आणि गजेंद्र यात फरक आहे ना रे बेटा
12 Jul 2015 - 6:31 am | खटासि खट
अरेच्चा ! माहीतच नव्हतं बघा.
12 Jul 2015 - 5:49 pm | निनाद मुक्काम प...
विद्यार्थ्यांनी संचालकांच्या नियुक्ती वर आक्षेप म्हणजे त्यांच्या फिल्मी भाषेत सांगायचे तर तिसर्या फळीतील दिग्दर्शकाने पटकथा व नायकाच्या भूमिकेसाठी त्यांची मते विचारात न घेण्याच्या निषेधार्थ संप पुकारण्याचा सारखे आहे.
महत्त्वाचा प्रश्न असा आहे किं अमिताभ रजनी ह्यांच्याकडे ह्या संस्थे कडे द्यायला वेळ आहे का
आणि त्यांची ह्या पदाच्या साठी होकार होता का हा प्रश्न प्रसार माध्यमांनी न विचारता शिमगा सुरु केला.
12 Jul 2015 - 6:31 pm | dadadarekar
त्यांच्या होकार नका४आबाबत नंतर.
यादीतील एकही व्यक्ती न घेता दुसरीच नावे जाहीर केली गेली.
12 Jul 2015 - 6:56 pm | आशु जोग
दुसरीच नावे
पहीलं नाव तुमचं होतं वाटतं... मग बरोबर आहे...
असो
विनोद बाजूला राहू द्या. पण याद्या बनवणारेही तेच आणि अंतिम निवड करणारेही तेच... काय बोलणार
12 Jul 2015 - 6:59 pm | प्यारे१
काय ठरलं शेवटी?
12 Jul 2015 - 7:09 pm | आशु जोग
सुरुवातीला विरोधकांनी मोदींवरही अशीच प्रचंड टिका केली होती. त्यातूनच ते मोठे होत गेले...
गजेंद्र यशस्वी होणार असे दिसतेय
12 Jul 2015 - 11:49 pm | dadadarekar
व...
रीकामटेकडेपण या निकषवर निवड करणार का ?
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48037730§ion=pune-home
राखी सावंत , सलमा आगा , हेमंत बिर्जे हेही विरोध करणार आहेत.
20 Oct 2015 - 5:18 pm | आशु जोग
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातील (एफटीआयआय) एक किस्सा ऐकून सुन्न झालो. गोष्ट जरा जुनी आहे, रसूल पोकुट्टी यांना ध्वनिलेखनासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला तेव्हाची. "स्लमडॉग मिलिनेअर‘चे संगीतकार ए. आर. रहमान यांनाही "जय हो‘ गाण्यासाठी ऑस्कर जाहीर झाले होते. या दुहेरी यशामुळे सारे भारतीय कलाक्षेत्र आनंदात न्हाऊन निघाले होते. रसूल हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी. त्यामुळे तेथील अध्यापक, विद्यार्थ्यांना आनंद होणे स्वाभाविकच; पण विद्यार्थ्यांना जरा जास्तच कैफ चढला होता. कॅम्पसमध्ये रस्त्यावर पार्ट्या रंगल्या. कोणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. एकच कल्ला. शिक्षकांचेही कोणी मनावर घेत नव्हते...
बातमी इथे पहा
14 Jul 2015 - 11:59 am | आशु जोग
संप करून विद्यार्थी आपलेच नुकसान करून घेत आहेत - नाना पाटेकर

14 Jul 2015 - 1:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आपल्याकडे सर्वच क्षेत्रांमध्ये संस्थेपेक्षा व्यक्ती मोठी मानण्याचे प्रघात असल्याने हे सगळे होतेय असे ह्यांचे मत.
अमूक एक माणूस खूप मोठ्ठा बदल घडवून आणेल अशी भाबडी आशा जनता बाळगते.अशी आशा बाळगण्यात शिकलेले लोकही आघाडीवर असतात. मग 'अब्दुल कलाम नसते तर भारताचे काही खरे नव्हते..''आता मोदी पंतप्रधान झाले आहेत्,सगळे काही आता ठीक होईल..'अशी वाक्ये ऐकायला येतात.
तुमच्या त्या नासाचे संस्थापक कोण? हूवर धरण बांधले तेव्हा अमेरिकेचा अध्यक्ष कोण होता?त्याला अमेरिकारत्न मिळाले का?
14 Jul 2015 - 7:10 pm | अस्वस्थामा
माईच्या जागी आता आम्हाला चाची-४२० मधली "लक्ष्मी गोडबोले" दिसू लागली आहे हो.. :)
14 Jul 2015 - 1:34 pm | कपिलमुनी
या प्रश्नाला कोणत्याही भक्ताने किंवा कोणीही उत्तर दिले नाही.?
काळा पहाड कुठे गेले ?
14 Jul 2015 - 2:57 pm | संदीप डांगे
फारच लावून धरता बुवा तुम्ही.... हैट्ट है... ;-)
14 Jul 2015 - 3:04 pm | कपिलमुनी
श्रीगुर्जींची शिकवणी लावलीये
14 Jul 2015 - 3:28 pm | अस्वस्थामा
=))
"मारुती कांबळेचं काय झालं?"
14 Jul 2015 - 3:51 pm | मृत्युन्जय
गजेंद्र चौहान लायक का आहेत?
१. त्यांनी अनेको टीव्ही सिरियल्स मध्ये काम केले आहे.
२. त्यांनी बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.
३. त्यांनी सिंटाचे अध्यक्षपद भुषवले आहे.
४. सिंटाच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. सध्याची त्यांची अपॉइंटमेंट ही अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामांसाठी आहे असे समजते.
५. एफटीआयआय चे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी अर्ज करावा लागतो असे समजते. ज्या सगळ्यांची नावे घेतली जात आहेत त्यापैकी कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज केला नव्हता असे समजते. अश्या परिस्थितीत तयार असलेल्या कलाकाराला सरकारने नियुक्त केले.
६. त्यांनी काही अॅडल्ट चित्रपटांतुन कामे केलेली असली (पॉर्न नाही हे इथे नमूद करणॅ योग्य) तरीही त्यांनी बर्याच टीव्ही सिरियल्स मध्ये कामे केलेली आहेत (आणि ती काही अॅडल्ट नव्हती). अनेक बुजुर्ग हिंदी चित्रपट खलनायकांनी आणि चरित्र अभिनेत्यांनी देखील प्रसंगी अॅडल्ट चित्रपटांतुन कामे केलेली आहेत हे इथे नमूद करणे गरजेचे वाटते.
या कामासाठी ते क्लसे अयोग्य आहेत?
१. चित्रपट बी ग्रेड, सी, ग्रेड की झेड ग्रेड हे इथे महत्वाचे आहे असे मला वाटते. त्यांचे बहुतांशी सिनेमे झेड ग्रेड आहेत. एफटी आय आय चे आधीचे काही चेयरमन नावाजलेले आहेत असे समजते. (सगळेच काही नावाजलेले नव्हते असे समजते).
२. गजेंद्र चौहान यांनी काही अॅडल्ट चित्रपटात काम केलेले आहे. जर एफ्टीआयआय ने किंवा तिथल्या विद्यार्थ्यांनी आजवर कुठल्याच अॅडल्ट चित्रपटातुन कामे केले नसेल किंवा त्याचे दिग्दर्शन केले नसेल तर एफ्टीआयआय च्या महान परंपरेला गजेंद्र चौहानांच्या काही भूमिकांमुळे बाधा येउ शकते.
14 Jul 2015 - 5:24 pm | मृत्युन्जय
बादवे ज्या ३ चित्रपटांवरुन मुख्यत्वे गजेंद्र चौहान यांच्याबद्दल गदारोळ चालु आहे ते ३ चित्रपट आहेतः
१. खुली खिडकी - सहकलाकार होते अमजद खान, अरुणा इराणी, टिकु तलसानिया
२. जंगल लव्ह (टारझनपट) - सहकलाकार होते अरुणा इराणी आणि रिटा भादुरी
२. आज का रावण - सहकलाकार होते मिथुन चक्रवर्ती, मोहन जोशी आणि शक्ती कपूर.
14 Jul 2015 - 3:37 pm | चिगो
जरा उशीराच उतरतोय चर्चेत, पण वर कुणीतरी, मला वाटतं, डांगेसाहेब बोललेत की ह्या संस्थेची प्रवेशप्रक्रीया अगदी आयएएसच्या तोडीची असते. मी ह्या बाबतींत जास्त पडत नाही, पण आमच्या धोतराच्या पोताशीच तुलना होतेय, तर काही प्रश्न विचारतो..
१) नेमकी काय आणि कशी असते ही प्रवेश-प्रक्रीया? कुठकुठल्या विषयांतील माहिती/ज्ञान अपेक्षीत असते विद्यार्थ्यांकडून?
२) कुठकुठल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता खुली असते ही परीक्षा?
३) आवेदन/परीक्षा आणि निवड ह्यांचे गुणोत्तर (सिलेक्शन पर्सेंटेज किती)?
४) निवड प्रक्रीयेत कितपत पारदर्शिता आणि 'ऑब्जेक्टीव्हिटी' असते?
माफ करा, पण नागरी सेवा परीक्षा आणि इतर कुठल्याही निवड-परीक्षांमधे एक मुलभूत फरक आहे, तो म्हणजे खुलेपणाचा.. बाकी बव्हांश निवड-परीक्षा त्या-त्या क्षेत्रात आवड/स्पर्धक असलेल्या लोकांपुरत्या सिमीत असतात. ही परीक्षा सगळ्यांना (अॅज मच पॉसिबल) 'लेव्हल प्लेईंग फिल्ड' देते. तुमचा भुतकाळ आणि त्यातले तुमचे यश/अपयश ह्या परीक्षेत मॅटर करत नाही.. म्हणूनच माझ्यासारखा एखादा बारावीत गणितात नापास झालेला मुलगा यशस्वी होऊ शकतो, आणि आयआयटीचे विद्यार्थीपण सगळे प्रयत्न देऊनही अपयशी होऊ शकतात. एखादा बी.ए. मराठी साहीत्य उमेदवार एखाद्या आय आय टी/आय आय एम उमेदवारापेक्षा वरची रँक काढू शकतो.. This is just to get the record straight.
आता जरा चर्चेच्या मतिथार्थाकडे वळतो. मिपावर भरपुर व्यावसायिक शिक्षण घेतलेले सभासद आहेत, जसे की इंजिनीअर्स, डॉक्टर्स, सीए इ.. ह्या सगळ्यांनी जर त्यांच्या व्यावसायिक यशापयशात त्यांच्या व्यावसायिक शिक्षण दिलेल्या संस्थेचा आणि मुख्यत्वेकरुन त्यांच्या संचालकांना कितपत वाटा होता, ह्याबद्दल कौल घेतला/दिला तर मला वाटतं, चित्र जरा स्पष्ट होईल..
बाकी रणकंदन करण्याइतक्या महत्त्वाची ही संस्था असेल-नसेल, स्वायत्त आणि 'सेंटर्स ऑफ एक्सेलंस' असणार्या संस्थाच्या बाबतीत राजकीय लुड्बूड असावी की नको, ह्या हिशेबाने चर्चा महत्त्वाची आहे..
14 Jul 2015 - 3:57 pm | मृत्युन्जय
मिपावर भरपुर व्यावसायिक शिक्षण घेतलेले सभासद आहेत, जसे की इंजिनीअर्स, डॉक्टर्स, सीए इ.. ह्या सगळ्यांनी जर त्यांच्या व्यावसायिक यशापयशात त्यांच्या व्यावसायिक शिक्षण दिलेल्या संस्थेचा आणि मुख्यत्वेकरुन त्यांच्या संचालकांना कितपत वाटा होता, ह्याबद्दल कौल घेतला/दिला तर मला वाटतं, चित्र जरा स्पष्ट होईल..
तुम्हाला एफटीआयआय, त्यांचे विद्यार्थी आणि सिनेजगत या तिभी गोष्टी किती महान आहेत हे माहिती नाही म्हणुन तुम्हाला असले फुटकळ प्रश्न पडतात. येणारचेत मोठ्ठाले धागे तेव्हा कळेलच तुम्हाला.
14 Jul 2015 - 4:36 pm | चिगो
हे तर मान्यच करतो हो मी..
वा वा.. ज्ञानवर्धनाकरीता उत्सुक आहे.. ;-)
14 Jul 2015 - 4:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आता आय आय टी,आय आय एमच्या मांडीला मांडी लावून हे एफ.टी.आय.आयवाले बसणार की काय?
ह्या मंडळींना तो हवेत सिगारटी उडवणारा रजनीकांत संचालक म्हणून चालला असता असे टी.व्ही.वर ऐकले.
हात टेकले ह्या एफ.टी.आय.आय.च्या विद्यार्थ्यांपुढे.!
14 Jul 2015 - 4:42 pm | प्यारे१
>>> हात टेकले ह्या एफ.टी.आय.आय.च्या विद्यार्थ्यांपुढे.!
तुम्ही हात टेकले की तुमच्या ह्यांनी? तुम्ही स्वतः काही करत नाही म्हणून विचारलं बरंका ;)
14 Jul 2015 - 5:12 pm | अस्वस्थामा
जावाच्या भाषेत माई इंटरफेस आहेत आणि त्यांचे हे इंप्लिमेंटेशन ..!
त्यामुळे त्यांनी हात टेकले की त्यांच्या ह्यांनी हा प्रश्न गैरलागू आहे.. ;)
14 Jul 2015 - 5:06 pm | होबासराव
:)
14 Jul 2015 - 5:26 pm | तिमा
वार्यावरची वरात, मधल्या पहिल्या भागात, पुलंचा रामागडी रात्रशाळेत साक्षर झाल्याबरोबर पहिला अर्ज मास्तरांविरुद्ध करुन त्यांना 'डिसमिस' करतो, त्याची आठवण झाली.
गजेंद्र योग्य की अयोग्य हा मुद्दा आहेच, पण असे प्रत्येक संस्थेतच जर विद्यार्थ्यांनी कुठला संचालक नेमावा, यावर हस्तक्षेप सुरु केला तर एक वेगळा पायंडा पडेल याची जाणीव ठेवावी.
बाकी चालू द्या.
14 Jul 2015 - 8:12 pm | सुबोध खरे
तिमा साहेब
बाडीस
एफ टी आय आय च्या विद्यार्थ्यांनी श्री गजेंद्र सिंह यांना नाकारावे यामध्ये त्यांची लायकी काय आहे? उद्या प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उठावे आणी सांगावे कि डॉ. तात्याराव लहाने आम्हाला जे जे चे डीन म्हणून नको किंवा डॉ सुपे आम्हाला के ई एम चे डीन म्हणून नको.
श्री गजेंद्र सिंह यांनी तीन चारच सिनेमात काम केले आहे मग या न्यायाने आपले आवडते श्री सलमान खान किंवा संजू बाबा हे त्या पदासाठी जास्त लायक ठरतील.
बाकी नेते आणी अभिनेते यांना त्यांच्या ज्ञान, शिक्षण आणी लायकी पेक्षा जास्त नाव, कीर्ती आणी पैसा मिळतो.त्यामुळे त्यांच्या बद्दल मला काडीचाही आदर नाही. ( आम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही हा भाग निराळा)
जाता जाता -- डाव्या लोकानी केशरी रंग आवडत नाही म्हणून श्रीखंडात केशर घालणे बंद केले आहे/ केशरयुक्त श्रीखंड खाणे बंद केले आहे असे ऐकतो.
14 Jul 2015 - 8:14 pm | प्यारे१
गजेन्द्र चौहान. सिंह नव्हे.
14 Jul 2015 - 8:26 pm | कपिलमुनी
डॉ. तात्याराव लहाने = गजेंद्र चौहान ?
आपापल्या क्षेत्रामध्ये दोघांची कामगिरी एकच आहे का ?
"नेते आणी अभिनेते यांना त्यांच्या ज्ञान, शिक्षण आणी लायकी पेक्षा जास्त नाव, कीर्ती आणी पैसा मिळतो.त्यामुळे त्यांच्या बद्दल मला काडीचाही आदर नाही "
हे बरेचसे खरे असले तरी १०० % खरे नाही , आज नवाजुद्दिन सिद्दिकी, राजकुमार राव यांसारखे चांगले अभिनेते कोणत्याही बॅकग्राउंड शिवाय आले आहेत . आणि FTII मध्ये फक्त अभिनेते नाहीत तिथे तंत्रज्ञ आणि चित्रपट तंत्र शिकायला आलेले पण विद्यार्थी आहेत.
आणि गजेंद्र चौहान एवजी दुसरी नावे चर्चेमध्ये होती ती संजू किंवा सलमानची नव्हती ज्यांना या तंत्राची , माध्यमाची जाण आहे , ज्यांचे काम जागतिक , राष्ट्रीय स्तरावर नावाजले आहे अशांची होती.
त्यांना डावलून गजेंद्र चौहान ला पुढे आणण्याचा अट्टाहास का ?
"तो भाजपाचा आहे म्हणून त्याला हे पद मिळालेले आहे " हे सत्य तरी मान्य करा आणि
अशा संस्थांमध्ये राजकीय ढवळाढवळ अयोग्य आहे.
( पूर्वी काँग्रेसने किंवा इतर कोणी असेच केले असेल तर ते चूकच आहे . त्यांनी केले म्हणून भाजपाचे बरोबर असले गुर्जीय समर्थन योग्य नाही)
14 Jul 2015 - 8:47 pm | सुबोध खरे
मुनिवर
गजेंद्र चौहान काळा का गोरा हे हि मला माहित नाही आणी जाणून घ्यायची इच्छा हि नाही. त्या ऐवजी शिवराज पाटील किंवा अनंत्मुर्थी असो.
मला फक्त खटकले ते डाव्या लोकांनी विद्यार्थ्यांना यात उतरवले ते. विद्यादान आणी विद्यार्जन हे राजकारण विरहीत असावे या मताचा मी आहे. भाजप ला विरोध करायचा तो संसदेत करा विद्यापीठात कशाला?
या विद्यार्थ्यांची लायकी काय आहे कि संस्थेचा चालक कोण ते ठरविण्याची? या न्यायाने ८० % इंजिनियरिंग कॉलेजचे मुख्याध्यापक काढून टाकावे लागतील. तेथे कोणी राजकारण करत नाही कारण त्याला कुत्रही विंचारत नाही.
सिनेमा क्षेत्र आणी राजकारण याबद्दल मला काडीचाही आदर नाही हे मी पहिल्यान्दाही म्हणालो आहे. तेंव्हा डॉ. तात्याराव लहाने यांचे नाव केवळ संस्थेचे संचालक या नात्याने आणले आहे. त्यांची श्री गजेंद्र चौहान यांच्याशी तुलना करण्याचे कारणच नाही.
14 Jul 2015 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
जाता जाता -- डाव्या लोकानी केशरी रंग आवडत नाही म्हणून श्रीखंडात केशर घालणे बंद केले आहे/ केशरयुक्त श्रीखंड खाणे बंद केले आहे असे ऐकतो.
हे लय भारी !!! =)) =)) =))
आतापर्यंत, ते मॉस्कोत बर्फ पडले की दिल्लीत शिंकायला सुरुवात करतात आणि बायजिंगमध्ये पाऊस पडला की मुंबईत छत्री उघडतात इतकेच ऐकून होतो. त्यात या नविन गुणधर्माची भर पडलेली दिसतेय ! :)
15 Jul 2015 - 4:11 am | निनाद मुक्काम प...
शोले मधील सांबा ह्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला गुणी अभिनेते राष्ट्रीय पुरस्कार देण्याच्या समितीवर जातो आपल्या नातलग अभिनेत्री रवीना ला पुरस्कार देतो किंवा सैफ ला पद्मश्री दिली जाते
तेव्हा हे बॉलीवूड वाले गुणी कलाकारांच्या बाजूने बोलतांना दिसत नाही
14 Jul 2015 - 8:21 pm | खटासि खट
http://www.youthconnect.in/2015/07/13/gajendra-chauhan-video/
गजेन्द्रबाबूंच्या प्रेरणादायी कारकिर्दीचा एक धावता आढावा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. असे संचालक बदनाम संस्थेत आणि बेशिस्त विद्यार्थ्यांच्या सेवेत नेमल्याने राष्ट्रकार्यासाठी उमद्या व्यक्तींचा तुटवडा निर्माण झाला तर यास कोण जबाबदार ?
एखाद्या महत्वाच्या उदा. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमधे वगैरे त्यांची प्रतिष्ठापणा व्हावी
14 Jul 2015 - 8:33 pm | कपिलमुनी
गजेंद्र चौहान यांनी रेपिस्ट किंवा इतर भूमिका केल्या असतील तर त्या केवळ भूमिका आहेत. त्याचा आधार विरोधासाठी घेणा चुकीचा आहे.
अशा न्यायाने निळू फुलेंना काय म्हणाल ? पण प्रत्यक्षात ते सद्गृहस्थ होते.
14 Jul 2015 - 9:01 pm | खटासि खट
गजेन्द्र चौहान यांच्याशी निळू फुले, के एन सिंग, अमरीश पुरी, सदाशिव अमरापूरकर, परेश रावल यांची तुलना होईल का ? कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे .... बी ग्रेड काय सी ग्रेड सिनेमे सुद्धा आपल्या अभिनयाच्या जोरावर चालवण्य़ाचं त्यांचं विस्मरणात गेलेलं कसब तुमच्या प्रतिसादामुळे लक्षात घेतलं जाईल अशी आशा करूयात. बाकी प्रतिसाद पूर्ण वाचला असेल तर तुम्ही जे म्हणत आहात त्याच्यापेक्षा काही वेगळं काय आहे हो त्यात ?
14 Jul 2015 - 9:05 pm | खटासि खट
अशा न्यायाने निळू फुलेंना काय म्हणाल ? पण प्रत्यक्षात ते सद्गृहस्थ होते. >>> हा न्यूटनचा नियम होऊ शकेल का ?
निळू फुलेंच्या जागी शक्ती कपूर, आदीत्य पंचोली किंवा तत्सम नावे घालून बघा बरं..
14 Jul 2015 - 8:22 pm | खटासि खट
https://video-lhr3-1.xx.fbcdn.net/hvideo-xpa1/v/t42.1790-2/11541824_8408...
14 Jul 2015 - 8:23 pm | होबासराव
जाता जाता -- डाव्या लोकानी केशरी रंग आवडत नाही म्हणून श्रीखंडात केशर घालणे बंद केले आहे/ केशरयुक्त श्रीखंड खाणे बंद केले आहे असे ऐकतो.
खल्लास्...जबरा शॉट होता हा :)
15 Jul 2015 - 4:30 am | निनाद मुक्काम प...
एक वेगळा मुद्दा जो आतापर्यंत मला सोशल मिडिया वर आढळ नाही आणि तो गजेद्र जीवतोडून सर्वांना समजून सांगत होता
माझ्या रिल आणि रिअल लाइफ मध्ये फरक आहे
थोडे विषयांतर करूया
रमाकांत आचरेकर ह्यांनी प्रत्यक्ष किती आन्राष्ट्रीय सामने खेळले होते
दुसरा प्रश्न सचिन आता पार्कात नेट लावून सचिन सोडा पण आमरे आगरकर निर्माण करू शकतो का
लता व आशा ह्या संगीत महाविद्यालयात संचालिका झाल्या म्हणून प्रती लता व आशा बनू शकतील का
हुशार कलावंत असणे वेगळे कलेच्या शेत्रात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही मात्र व्यावहारिक व्यवस्थापकीय
कार्य ते तेवढ्यास सहजतेने करू शकतील ह्याची काय खात्री
अनुपम व पंकज हे दोघेही दादा कलाकार पण दिग्दर्शक म्हणून त्यांनी निर्माण केलेले सिनेमे आठवा ओम जगदीश
व मौसम
हे नुसते पडले नाही तर त्यांच्या नशिबी सामिक्षकंची उपेक्षा आली ह्याउलट अभिनेता म्हणन नाव न काढता आलेला राकेश पुढे यशस्वी दिग्दर्शक व निर्माता म्हणून उदयास आला
अभिनेता म्हणून अयशस्वी सलीम खान पुढे लेखक म्हणून उदयास आले ,
तात्पर्य एवढेच की अभिनय करणे व निर्माता म्हणून सिनेमा निर्माण करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तसेच गजेंद्र त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करणार नाहीत कशावरून
विद्यार्थ्यांचा रोष नक्की काय आहे
गजेंद्र हे भाजपचे आहेत व केशरी राजकारण करायला आले आहेत का
ते योग्य उमेदवार नाही आहेत
बहुतांशी डाव्या संघटना व विद्यार्थी गजेंद्र ह्यांना नालायक ठरवतांना केशरी राजकारणाचा उल्लेख करत आहे
असेच करायचे असते तर संघाने अनेक लायक व्यक्ती ज्या केशरी विचारसरणीची प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जोडल्या गेले आहेत त्यांना ह्या पदावर बसवले असते
ह्या देशात दुबेजी ते अनेक महान कलाकार संघाविषयी आदर असलेले होते व आजही अनेक आहेत त्यांना आणून बसवले असते ,
मला अजूनही वाटते नाना ला आणून बसावा गजेंद्र च्या जागी
एक अभिनेता नाही तर निर्माता म्हणून सुद्धा त्याची निर्मिती प्रहार हि श्रेष्ठ कलाकृती आहे.
15 Jul 2015 - 4:47 am | विकास
मला अजूनही वाटते नाना ला आणून बसावा गजेंद्र च्या जागी
सहमत. पण तो तरी डावे मान्य करतील का? अर्थातच नाही!
15 Jul 2015 - 7:25 am | खटासि खट
सी ग्रेड सिनेमात काम केलेला मनुष्य का हवा याचे समर्थन करताना आपल्या क्षेत्रात ज्याचा वकूब आहे तो चांगला गुरू होऊ शकत नाही आणि सी ग्रेड सिनेमातला बलात्कारी अशी रील लाईफ मधील इमेज असलेला व्यक्ती छान गुरू होऊ शकेल हे ठरवण्याचे निकष काय आहेत ?
संधीच द्यायची तर अभिनयात झेंडे गाडणा-या अनुपम खेर आणि गजेंद्र चौहान या दोघातून (दोन्ही केशरी आहेत) कुणाला निवडाल ? या दोघात गजेंद्र चौहानच फिल्म इन्स्टीट्यूटचं संचालकपद भूषवायला योग्य आहे हा साक्षात्कार कसा काय झाला असावा ? ज्या माणसाला स्वतःचे करीयर नीट घडवता आले नाही तो विद्यार्थ्यांच्या करीयरबद्दल निर्णय घेताना यशस्वी होऊ शकेल हा दुर्दम्य आशावाद कुठल्या गणिती प्रमेयाद्वारे मांडला गेला आहे ?
विद्यार्थ्यांनी केशरी संचालक नको असं म्हटलं असल्यास कृपा करून ते दाखवून द्यावे. केशरी कनेक्शन असल्याने गजेंद्र चौहान सारख्या व्यक्तीची संचालकपदी नेमणूक होते आहे याचा अर्थ दिग्गज व्यक्ती केवळ केशरी कनेक्शन आहे म्हणून नको असा त्याचा अर्थ होईल का ?
आपण ज्या संस्थेत शिकतो त्या संस्थेची संचालक म्हणून असलेली व्यक्ती किमान सन्माननीय असावी अशी मागणी रास्त नाही का ?
अनुपम खेर, अमिताभ बच्चन आणि इतर अनेक कलाकारांपैकी किती जणांनी मजबुरी म्हणून खुली खिडकी किंवा तत्सम सिनेमे केले आहेत ? करीयर मधे क्षमता असताना यशस्वी न होणं वेगळं आणि करीयर कुठल्या मार्गाने आपण पुढे नेतो हे वेगळं असावं.
उद्या सनी लहानेंना संचालक म्हणून नेमलं तर गजेंद्र चौहानच्या समर्थनार्थ केलेले युक्तीवाद पुन्हा करणार का ?
फेसबुक वर काही सज्जन सोनिया गांधी यांचे कॅब्रे डान्सर म्हणून असल्याचे फोटोशॉप्ड मेसेजेस फिरवत असतात आणि त्यांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करत असतात. त्यातले अनेक जण गजेंद्रच्या समर्थनार्थ रील लाईफ आणि रिअल लाईफचे युक्तीवाद घेऊन हिरीरीने मैदानात उतरलेत.
( मुद्दामच १,२ असे नंबर टाकलेले नाहीत, नाहीतर संपूर्ण प्रतिसाद कॉपी पेस्ट करून विद्वत्ताप्रचुर उत्तरे दिली जातील याची खात्री आहेच).
15 Jul 2015 - 7:32 am | खटासि खट
वरच्या प्रतिसादात राजकारण आणू नये. काँग्रेसने काय केलं हे धडे समर्थन म्हणून द्यायचे असतील तर याचा अर्थ तेव्हां कुठे गेला होता तुझा धर्म म्हणत त्याच चुका पुढे चालू राहणार आहेत. काँग्रेसला याच चुकांची शिक्षा लोकांनी दिलेली आहे, आता हेच लोक जर विद्यार्थ्यांच्या भूमिकेकडे सहानुभूतीने पाहत असतील तर ते काँग्रेसचे एजंट कसे ? आणि जर तसे पाहत नसतील तर फाट्यावर मारा ना आंदोलन.. महत्त्व कशाला द्यावं विरोधाला ?
15 Jul 2015 - 4:48 pm | विकास
विद्यार्थ्यांनी केशरी संचालक नको असं म्हटलं असल्यास कृपा करून ते दाखवून द्यावे.
“All five members have RSS or BJP connections but no one of them has strong credentials to become the member of such a premier institution. The appointments have made the government’s agenda very clear — saffronise an academic institution of this unique nature,” Kislay Gonzalvez, former general secretary of FTII Students’ Association, told Firstpost.
हा व्हिडीओ पहा:
या आंदोलनामागे AISA अर्थात कम्युनिस्ट पार्टीने १९९० साली चालू केलेली विद्यार्थी संघटना जाहीरपणे आहे.
इथे कोणिही गजेंद्र चौहान फॅन क्लब मेंबर नाही. त्यामुळे कोणी त्यांचे समर्थन करत नाही. किंबहूना या क्षेत्रातली नॉन लेफ्टीस्ट चांगली व्यक्ती मिळू शकली असती असेच आम्ही म्हणत आहोत. पण आधीच्या संचालकांनी नक्की संचालक म्हणून काय काम केले ह्याची यादी मिळेल का? (त्यांच्या ए+ सिनेमांची यादी नको. संस्थेसाठी नक्की काय केले? किती वेळ दिला?) जे बुद्धीवादी उठसुठ सेक्स अथवा तत्सम विषयांबद्दल बोलतात आणि त्याला विरोध करणार्यांना संस्कृती रक्षक म्हणून हिणावतात त्यांनी चौहान यांना त्यांच्या काही चित्रपटावरून एफटीआयआय चा धर्म बुडाला म्हणून आरोळी ठोकणे हास्यास्पद आहे.
15 Jul 2015 - 8:35 pm | खटासि खट
ओके.
15 Jul 2015 - 10:28 pm | विकास
नुसते ओके?
पण आधीच्या संचालकांनी नक्की संचालक म्हणून काय काम केले ह्याची यादी मिळेल का?
या प्रश्नाचे उत्तर आहे का तुमच्याकडे? नसल्यास कशाच्या जोरावर त्यांच्या आरत्या ओवाळणे चालू आहे ते समजेल का?
खाली सव्यसाची यांनी श्याम बेनेगल यांची मुलाखत दिली आहेच. त्यावर देखील भाष्य केले तर उत्तम. अर्थात श्याम बेनेगल पण आता सी ग्रेडचे वाटल्यास ते देखील समजू शकतो.
15 Jul 2015 - 10:54 pm | निनाद मुक्काम प...
डॉलर मिया कुठे क्रिकेट खेळले प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्यांच्या अध्यक्षतेखाली बी सी सी आय ने गरुड भरारी घेतली आर्थिक महासत्ता हे बिरुद ह्या संस्थेला चिकटले आजही ते अध्यक्ष त्याच गुणांच्या मुळे आहेत
संपात वेळ घालवण्यापेक्ष्या गजेंद्र व विद्यार्थी ह्यांनी आमने सामने येउन संस्थेसाठी तुम्ही काय करू शकता तुमचे भविष्यातील संकल्प व योजना काय आहेत ह्याबद्दल माहिती विचारावी
नाहीतर नोटीसा मिळाल्याच आहे ,
15 Jul 2015 - 11:58 pm | आशु जोग
अनंतमूर्ती मागच्याच वर्षी निवर्तले ना... मग आता
15 Jul 2015 - 8:36 am | नाखु
"पेच" आणि "पोच" यातला नेमका फरक अधोरेखीत झाला.
बाकी चालू द्या !!!
अभामिपामांकामिम संचालित मायापुरी+मनोहर कहानीयाँ वाचक संघ
15 Jul 2015 - 7:16 pm | सव्यसाची
या मुद्द्यावर आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. पण कुणीही एक प्रश्न विचारला गेला नाही आणि तो म्हणजे चेअरमन (अध्यक्ष) चे काम तरी काय असते?
२-३ दिवसांपूर्वी श्याम बेनेगल यांची मुलाखत वाचनात आली.
त्यात त्यांनी अध्यक्षाचे काम काय आहे ते सांगितले आहे:
ही व्यवस्था ही बर्याच स्वायत्त संस्थांसारखी आहे. उदा: Indian Statistical Institute (ISI)
मी आयएसआयचा विद्यार्थी असल्याकारणाने हे नक्की सांगू शकतो. गवर्निंग कौन्सिल चा अध्यक्ष आणि ते कॉलेज याचा किती संबंध येतो हे आम्ही पाहिले आहे. अध्यक्ष शक्यतो पदवीप्रदान समारंभाला कॉलेज मध्ये येतात. मला वाटते कि सीओइपी मध्ये सुद्धा हेच स्ट्रक्चर आहे. आम्ही आमच्या अध्यक्षांना क्वचितच पाहिले असेल.
तीच परिस्थिती FTII मधेही दिसते आहे.
श्याम बेनेगल यांच्या मुलाखतीतील काही रोचक प्रश्नोत्तरे
बर्याच बातम्या आल्या कि श्याम बेनेगल पण अध्यक्ष होण्याच्या लिस्ट मध्ये होते. त्याला श्याम बेनेगल यांचे उत्तर:
गजेंद्र चौहान यांच्या कामाबद्दल: