फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ?
वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे.
आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती.
हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे.
सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना
जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे.

प्रतिक्रिया
15 Jul 2015 - 11:17 pm | dadadarekar
आतापर्यंतच्या चेअरमनने सहाच विजिट केल्या म्हणुन पुढच्यानेही तसेच करावे असा नियम आहे का ?
15 Jul 2015 - 11:58 pm | सव्यसाची
ते कमी पण विजिट करू शकतात आणि जास्ती पण.
बाकी त्या मुलाखतीत बर्याच गोष्टी आहेत.
16 Jul 2015 - 5:22 am | विकास
विरोध काय व्हिझिट्स किती होतात यावरून होता का? बेनेगल यांची उत्तरे काय आहेत ती वाचा आणि मुद्द्यांना उत्तरे द्या...
आणि हो आधीच्या संचालकांनी नक्की संचालक म्हणून काय केले ते देखील सांगा.
15 Jul 2015 - 7:57 pm | ईश्वरसर्वसाक्षी
एक जुनी स्वाक्षरी थोडा बदल करुन
हिंदुद्वेष्टे संघटित झाले कि कोणाच्या बापाचे ऐकत नाहि
15 Jul 2015 - 9:50 pm | संदीप डांगे
हिंदुद्वेष्टे ??? इथं हिंदू, प्रेमी, द्वेष्टे यांचा काय संबंध?
तसेच
हिंदुप्रेमी संघटित झाले कि कोणाच्या बापाचे ऐकतात?
15 Jul 2015 - 10:36 pm | आशु जोग
बर बर व्यत्यासही खरा दिसतोय
15 Jul 2015 - 9:58 pm | ईश्वरसर्वसाक्षी
डांगे साहेब माझा तो हेतु नव्हता, लेखक महाशयांचि स्वाक्षरी होति पुर्वि मिपा वर
"हिंदु संघटित झाला कि कोणाच्या बापाचे ऐकत नाहि"
इथे ह्या धाग्याला जो रंग दिला जातोय त्या अनुषंगानेच मि ति स्वाक्षरी 'थोडा बदल करुन' वापरली.
15 Jul 2015 - 10:02 pm | संदीप डांगे
वो के साsssर
नो प राब्लम...
15 Jul 2015 - 10:40 pm | आशु जोग
हाऊ दा
15 Jul 2015 - 10:10 pm | ईश्वरसर्वसाक्षी
योग्य आणि समर्पक उत्तर डॉ.खरे सरानी दिलच आहे.
18 Jul 2015 - 4:29 pm | सुनील
जो गजेंद्र चौहानच्या नियुक्तीविरुद्ध बोलेल तो हिंदुद्वेष्टा, असं आता ठरलय!
मंडळी, तुमचं काय ठरतय आता?
18 Jul 2015 - 4:31 pm | सुनील
योग्य दुवा -
http://indianexpress.com/article/india/india-others/rss-mouthpiece-sings...
21 Jul 2015 - 1:56 am | विकास
जो गजेंद्र चौहानच्या नियुक्तीविरुद्ध बोलेल तो हिंदुद्वेष्टा, असं आता ठरलय! मंडळी, तुमचं काय ठरतय आता?
असं इंडीयन एक्स्प्रेस ने सवंग शिर्षकासाठी लिहीले असावे असे वाटते. त्यांनी शेवटचे वाक्य असे लिहीले आहे: “anti-Hindu fringe elements did what they are best at. They started protesting…”
याचा शोध घेण्यासाठी ऑरगनायजर च्या संस्थळावर मुळातून FTII Row : Protest or ‘Conspiracy’? हा लेख वाचला. त्यात असे म्हणले आहे:
यातील प्रत्येक व्यक्तीवरचे विधान अगदी संघ/भाजपा विरोधकास देखील पूर्णपणे अमान्य होण्यासारखे नसावे असे वाटते. पण जर गजेंद्र सिंग यांना विरोध केलात तर तुम्ही अँटी हिंदू असे म्हणले असे कुठे वाचताना वाटले नाही. त्यातून त्यात नक्की चुकीचे काय आहे ते सांगावेत ही विनंती.
याच ऑरगानाइजरच्या लेटेष्ट अंकात आलेला याच विषयावरील FTII Controversy : Deserves an Opportunity हा लेख देखील वाचावात. त्यात अँटी काय हिंदू देखील शब्द नाही. चौहान यांची भलावण नाही, विद्यार्थ्यांचे हक्क अमान्य केलेले नाहीत. पण दोन्हीच्या मर्यादा लिहीलेल्या आहेत.
केवळ इंग्रजी अथवा मराठी वॄत्तपत्राने लिहीले म्हणून ते खरे मानणे हे खरेच बुद्धीवादाचे लक्षण राहीले आहे का असा सध्या प्रश्न पडू लागला आहे. (मी तसे मानणार्यातला होतो म्हणून असे म्हणत आहे!)
असो.
19 Jul 2015 - 8:31 am | dadadarekar
मोदी अभिनय करतात.
फोटोमध्ये पोझ देतात.
डायलॉग मारतात.
आपला कार्यक्रम व्यवस्थीत ब्रॉडकास्ट कसा होइइल याचे मार्केटिंग करतात.
निरनिराळे पेहेराव करतात.
निरनिराळी वाद्ये वाजवतात.
मोदीना अध्यक्ष नेमलं त्या शिनिमाशाळेत की ते सगळी डिपारमेंटं एकटे बघतील.
21 Jul 2015 - 4:43 am | अर्धवटराव
एक ओबीसी वर्गातला सामान्य माणुस देशाच्या सर्वोच्च पदावर पोचतो याची जळजळ अजुनही लागुन आहे वाटते.
21 Jul 2015 - 12:28 pm | dadadarekar
इश्श! आम्ही धर्मच दुसरा घेतोय म्हटल्यावर जातींच्या भिंतीत अम्ही अडकु का ?
21 Jul 2015 - 2:13 pm | पैसा
"तिकडे" अजून कॉम्प्लिकेटेड जाती असतात. आगीतून फुफाट्यात पडाल हो!
21 Jul 2015 - 2:22 pm | अस्वस्थामा
अगदी अगदी..
त्या कॉम्प्लिकेटेड कॅटेगरीज पण आधी अभ्यासून ठेवा.
ते शिया की सुन्नी की अहमदीया (अथवा प्रोटेस्टंट/कॅथलिक्/बिलिवर) मग सुन्नी असेल तर वहाबी वगैरे वगैरे पण आधीच ठरवून ठेवा हो. नै तर परत आयसिस भेटल्यावर कन्फ्युजन व्हायचं.. ;)
21 Jul 2015 - 11:55 pm | काळा पहाड
परस्पर पीडा जातीय तर मोडता घालण्याचा प्रकार का ते कळलं नाही. शिया बनवून आयसिस च्या जवळपास पाठवून द्यायचं ना.
22 Jul 2015 - 2:56 pm | अस्वस्थामा
:)))
22 Jul 2015 - 1:32 pm | मृत्युन्जय
दुसरा धर्म घ्यायच्या आधी त्यांच्यातल्या जाती अभ्यासायच्या ना आधी. बघा जमले तर शुद्धी करुन घ्या.
10 Aug 2015 - 3:06 pm | आशु जोग
दुसरा धर्म कशाला... गजेंद्र हाच महाभारतातला पहीला धर्म आहे ना...
22 Jul 2015 - 3:27 pm | आशु जोग
'एफटीआयआय' आंदोलन आता दिल्लीतही होणार
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात सुरू केलेले आंदोलन आता थेट दिल्ली दरबारी नेण्याचे भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी ठरविले आहे. हे आंदोलन अधिक परिणामकारक करण्यासाठी आंदोलक विद्यार्थी आता संसदेसमोर ठाण मांडून बसणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे त्यानिमित्त राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
6 Aug 2015 - 11:45 pm | आशु जोग
नेहमीच गरीबांचा कैवार घेणार्या राहुल यांनी याहीवेळी आपली भूमिका सोडली नाही. अलिकडच्या पुणे भेटीत राहुल यांनी एफ टी आय आय च्या प्रश्नातही लक्ष घातले.
राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक थोर नेत्यांनीही त्यांना साथ दिली
22 Jul 2015 - 5:18 pm | dadadarekar
विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे साहित्य कुणीतरी जाळून टाकले अशी दोन चार दिवसापूर्वी बातमी होती.
22 Jul 2015 - 6:33 pm | चिरोटा
टाइम्स नाउवर ह्या संबंधित कार्यक्रम पाहिला. एक न समजलेली बाब म्हणजे ह्या संस्थेच्या अध्य़क्षाचे 'जॉब प्रोफाईल' काय असते?म्हणजे रोजचे काम काय असते? विनोद खन्ना ह्यांनी हे पद भूषवले आहे.
http://timesofindia.indiatimes.com/india/FTII-students-did-not-protest-w...
ह्या बातमीत असे म्हंटले आहे-
The students did not protest against his appointment as he is an eminent actor and knows the art.
पण विकिपिडियानुसार खन्ना ह्यांना फिल्मफेयर नॉमिनेशन व (स्टार्डस्ट) वगळता आंतरराष्ट्रीय(म्हणजे कान्स्,पॅरिस्,लंडन वगैरे) अनुभव दिसत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Vinod_Khanna
26 Jul 2015 - 8:02 am | खटासि खट
खन्ना कुठल्या पक्षाकडून खासदार म्हणून निवडून येत होते ?
10 Aug 2015 - 3:11 pm | आशु जोग
कडक पवित्रा
25 Jul 2015 - 10:38 am | आशु जोग
फिल्म इंन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्यापही सुरु असून यातल्या एका बाजूकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलेले आहे
ते म्हणजे या संस्थेच्या प्रांगणात चालू असलेल्या गैरप्रकारांबाबत गुन्हा नोंदवण्यात आलाय
बातमी या पानावर पहा
अजून एक
कोण कोणावर मात करेल माहीत नाही. पण विजय सत्याचा होणार हे नक्की.
26 Jul 2015 - 4:34 am | विकास
पण सत्य नक्की काय आहे?
27 Jul 2015 - 8:07 pm | आशु जोग
फिल्म इन्स्टिट्यूट यापूर्वीही गाजत होते ते कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या वावरामुळे.
कबीर कला मंच
10 Aug 2015 - 3:03 pm | होबासराव
:))
10 Aug 2015 - 8:37 pm | निनाद मुक्काम प...
२००८ सालच्या अभ्यासक्रमांमधील विद्यार्थी होस्टेल मध्ये जागा बळकावून बसले आहेत कारण त्यांचे प्रोजेक्ट अपुरे आहेत ह्याचे खापर संस्थेच्या गलथान कारभारावर फोडून ते मोकळे झाले , म्हणजे आधीच्या कर्तुत्ववान अध्यक्षांच्या राज्यात संस्थेची ही दशा
ह्या संस्थेची माजी विद्यार्थिनी जया ह्या प्रकरणी सूचक मौन बाळगून आहे
3 Mar 2017 - 8:37 am | आशु जोग
‘एफटीआयआय’मधून गजेंद्र चौहानांना नारळ!
भाजप व संघ परिवाराशी असलेल्या संबंधांमुळे त्यांना एफटीआयआयमध्ये बसविल्याचा विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने आरोप होता. चौहान यांच्याव्यतिरिक्त संघ परिवाराशी संबंधित असलेल्या अनघा घैसास, नरेंद्र पाठक, राहुल सोलापूरकर, शैलेश गुप्ता आदींच्याही नियुक्त्यांना आक्षेप घेतला गेला. त्याची परिणती प्रदीर्घ; पण िहसक आंदोलनात झाली. दिल्लीतही त्याचे पडसाद उमटले. संसदेमध्ये गदारोळ झाला. आक्रमक विद्यार्थ्यांनी संस्थेला वेठीस धरले. संस्थेचे तत्कालीन संचालक प्रशांत पाठराबे यांना रात्रभर खोलीत कोंडले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीचा मुद्दा गाजला.