फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
7 Jul 2015 - 9:39 pm

फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ?

वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे.
आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती.

हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे.
सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना
जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे.

.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

7 Jul 2015 - 9:56 pm | काळा पहाड

आत्ताची नवीन बातमी: केंद्र सरकारने हे इन्स्टिट्युट बंद करायचा किंवा ते पुण्याला हलवण्याचा विचार सुरू केला आहे. तसा प्रस्ताव मांडला गेला आहे.
हे खरं तर असं वाचता येईल: शरद पवारचा एफटीआयआय च्या जागेवर डोळा आलेला आहे. आणि त्यानं आपले केंद्रातले संबंध वापरून त्याबद्दल प्रयत्न सुरू केले आहेत. थोड्याच दिवसात तिथे कोलते पाटिल किंवा अविनाश भोसले चा बोर्ड दिसू लागेल.

काळा पहाड's picture

7 Jul 2015 - 9:56 pm | काळा पहाड

* मुंबई ला हलवण्याचा विचार.

व्यापम घोटाळ्यात साहेबांचा हात असल्याच्या आरोपावरून त्यांचा राजीनामा ( कशाचा ते नका विचारू) अजून कुणीच कसा बरं नाही मागितला ?

बाकी जमीन हडपण्याची बातमी खरी असेल तर अध्यक्ष म्हणून अचूक व्यक्ती हुडकण्याच्या शक्कलेला दाद द्यावी लागेल. नाहीतरी बारामतीत साज-या झालेल्या व्हॅलेंटाईन डे च्या आणाभाका जनता अजून विसरलेली नाही.

dadadarekar's picture

7 Jul 2015 - 10:38 pm | dadadarekar

अरे वा ! येऊ दे मुम्बैला.

बाजपेयींच्या कविता वाचल्या की फेणाणीला पद्मश्री मिळते... मग भाजपाचा प्रसार केल्यावर युधिष्ठिराला असे पद लाभले तर त्यात आस्चर्य ते काय !

काळा पहाड's picture

7 Jul 2015 - 11:05 pm | काळा पहाड

आणि आयएसआय ची कामं केली की दावूद ला पाकिस्तानात सिक्युरिटी मिळतेच की. तुम्ही कधी घेताय लाभ तुमच्या कर्मभूमीच्या ऑफर चा? का घरवापसी करायचा विचार आहे? नाही, तसं सुद्धा आम्ही ते घडवणारच आहोत म्हणा. बघा जाताय का ते.

dadadarekar's picture

8 Jul 2015 - 8:04 am | dadadarekar

शांती !

पवित्र महिना सुरु आहे.

( आमची घरवापसी झाली.. जन्मल्यापासून सुमारे चार दशके चुकीच्या घरात होतो. आता मजेत आहे. सध्या उपवास सुरु आहेत. )

नाखु's picture

8 Jul 2015 - 8:59 am | नाखु

देव तुम्हाला सुबुद्धी देवो.

डाल्डा द रेकर

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2015 - 9:36 am | अत्रुप्त आत्मा

@ डाल्डा द रेकर >> ठठो! :-D

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Jul 2015 - 11:21 pm | अनिरुद्ध.वैद्य

आम्हाला त कोणी विचारलं पण नव्हत कोणते सर हवे ... जे येणार त्यांकडून शिकून घ्यायचं! हे नवच नाटक सुरुये :D

बाकी सरकारनी फिल्म शिक्षण देणाऱ्या शाळा कशाला चालवायला हव्यात? इथ सरकारी इंजीनरिंग मेडिकल कॉलेजस चालत नाहीयेत आणि मंडळी फिल्म इन्स्टिट्यूटवर कोणालातरी नेमल तर ह्या बोंबा मारत सुटलीय!

बंद केलं तर फारच चांगल!

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 12:16 pm | कपिलमुनी

सरकारी इंजीनरिंग मेडिकल कॉलेजस चालत नाहीयेत

कोणता सरकारी इंजिनीयरींग , मेडिकल कॉलेज चालत नाहीत ? २-४ नावे द्या

काय शिकवतात म्हणे इथं?

विकास's picture

8 Jul 2015 - 12:16 am | विकास

सर्व प्रथमः गजेंद्र सिंग चौहान हे नाव माझ्या लेखी केवळ महाभारतापुरतेच मर्यादीत आहे. तसं म्हणायचे तर युधिष्ठीर ही काही माझी आवडती व्यक्तीरेखा नाही. त्यामुळे त्याने केलेले काम कसे होते वगैरे काही असले तरी त्याचा माझ्यावर परीणाम घडलेला नाही... त्या व्यतिरीक्त या कलाकाराचे कुठलेही चित्रपट मी पाहीलेले नाहीत.

एफ टी आय आय अथवा अजून कुठलीही संस्था असेल तेथे सरकारकडून व्यक्ती नियुक्त होत असताना ती अनुभवी असणे (good qualification) महत्वाचे आहे. तसेच जर ती जागा ही प्रशासकीय सेवेतली नसेल तर त्यासाठी योग्य अशी इंटरव्ह्यू प्रोसेस असणे बंधनकारक असले पाहीजे असे वाटते. मग त्याजागी चौहान असोत, बेनेगल असोत अथवा कर्नाड असोत. त्यांना त्या प्रोसेस मधनंच घेणे महत्वाचे असले पाहीजे.... या अर्थाने आणि एकूणच मर्यादीत अनुभव असलेली व्यक्ती म्हणून चौहान यांची नियुक्ती केली नसती तर बरे झाले असते. ज्यांच्यावर आक्षेप करता येणार नाही असे अनेक कलाकार मिळू शकले असते... अर्थात तरी देखील जर सरकारला हक्क असेल आणि आजपर्यंतच्या सर्व सरकारांनी तो वापरला असेल तर त्यावर आत्ता कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

इतके तेल नमनाला वापरून झाल्यावर आता वर उल्लेखलेल्या An Open Letter To Gajendra Chauhan From An FTII Student या निनावी पत्राचा आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा विचार करूयात.

एफटीआयआय चे चेअरमन (चौहान) जरी मोदी सरकारने आत्ता नियुक्त केले असले तरी त्यांच्या पाठोपाठचे डायरेक्टर पद असलेले डि. जे. नारायन हे युपिए सरकारने नियुक्त केलेलेच आहेत. हे नारायन महाशय रॉक बँड सिंगर आहेत. (गंमत म्हणजे नावाचे इनिशिअल डिजे आहे!).

पत्रामधे संस्थेच्या Freedom of thought, Freedom of speech, Individuality and unbridled self-expression, Justice and fairness in all areas to all sections of society, या तत्वांवर भर दिला आहे. सगळी तत्वे आदर्शच आहेत. पण ती केवळ "मला हवी तशी वापरली तरच" असे पत्र वाचल्यावर वाटले. म्हणजे असे की "‘Khuli Khidki’ isn’t exactly cinema" असे टोमणा मारणारे विधान केले जाते. मग तेथे Freedom of thought, Freedom of speech, कुठे बोंबलायला गेले?

मध्यंतरी चौहान यांच्या काही चित्रपटातील शरीर संबंध दाखवणार्‍या दृश्यांची फित तयार करून हा कलाकार कसली कामे करतो असे दाखवण्यात आले होते. आता यातील कुठलाच चित्रपट मला बघायाला आवडला नसता / आवडणार नाही, तरी असे दाखवत एक उदात्त पणा दाखवण्याचा जो काही प्रयत्न केला ते बघताना फारच करमणूक झाली. म्हणजे असे की उठताबसता सेक्स या विषयाशी संबंधीत बोलणार, कोणी विरोध केला तर उजव्या विचारसरणीचा, मागासलेला म्हणून हिणावणार पण मग स्वतःला हवे तेंव्हा अशाच आंबट दृश्यांचा विरोधासाठी वापर करणार! हे पटणारे नाही. पण असे ते वागले याचा धक्का अर्थातच बसला नाही!

बरं या पत्रात विरोध करताना दोन-तीन वेळेस परत परत हे व्यक्तीगत नाही म्हणणार, तरी देखील ही संस्था काय आहे ते तुम्हाला माहीत नसेल म्हणून खिजवणार -- हे असले विद्यार्थी उद्या जर निर्माते झाले तर खिचडीच काढणार का काय असे वाटले!

मुलांना विरोध करायचा असेल तर ते त्यांचे मर्यादीत का होईना पण स्वातंत्र्य आहे असे मी म्हणेन. मर्यादीत अशासाठी की ही सरकारी संस्था आहे आणि इथले शिक्षण हे इतर सरकारी संस्थांसारखेच प्रचंड प्रमाणात सब्सिडाईझ्ड आहे. त्यामुळे करदात्याच्या पैशाने होत आहे. उगाच संस्था बंद करून विरोध करणे मान्य होत नाही.

बरं एफटीआयआयशी आधी संलग्न असलेली अथवा विद्यार्थी असलेली व्यक्तीच अध्यक्ष व्हावी हा हट्ट अतिरेकी वाटतो. त्या व्यतिरीक्त जर प्रस्थापित पद्धती-नियमांनुसार नियुक्ती झाली असेल तर त्या व्यक्तीला वेळ देणे महत्वाचे वाटते. केवळ लायकी काढणे, बौद्धीक कुवत वगैरे शब्द वापरणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण वाटत नाही. (यात " सुसंस्कृत" म्हणजे "decency" या अर्थाने घ्यावात. संस्कृती या शब्दाशी संबंधीत म्हणून नाही...!)

थोडक्यात, जरी चौहान मान्य नसले तरी हा विरोध हा राजकीय हेतूंनी प्रेरीत आहे असे वाटते.

हे असले टाळायचे असेल तर माझ्या लेखी एक उपाय आहे जो भारतीय मनाला (आणि मुख्यत्वे सवयीला) पटणार नाही... या संस्था निमसरकारी करा. त्यावरील नियुक्त्या करण्यासाठी एक विशिष्ठ पद्धती आणि नियम तयार करून वापरा. कदाचीत तरी देखील सरकारी मदत लागेल पण ती कमी करता येईल. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना देखील जास्त पैसे द्यावे लागतील. पण एकदा का संस्था ही बाहेरच्या (कायदेशीर) पैशावर अधिक अवलंबून झाली की कुठल्याही सरकारचा आग्रह चालवून घेण्याचे बंधन रहाणार नाही.

dadadarekar's picture

8 Jul 2015 - 5:53 am | dadadarekar

चौहान हे अ‍ॅडल्ट पोर्नो फिल्मात काम करत होते. खुली खिडकी , जंगल लव्ह ... इ ई सिनेमे आहेत.

संस्था सरकारी असो वा निमसरकारी , उपलब्ध उमेदवारांतून योग्य उमेदवार निवडावा असा दंडक असतोच. या जागेसाठी इच्छउक असलेले इतर कलाकारही दिग्गजच होते.

विद्यार्थ्यानी मुकाट्याने शाळा शिकावी हे मान्य. पण सरकार अशा पदांवर आपल्या मर्जीतील लोक घुसडत असतेल तर विद्यार्थी विरोध करु शकतात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Jul 2015 - 7:08 am | अनिरुद्ध.वैद्य

बाप्ये वाटत होते ... ४ ४ ५ ५ वर्ष एकाच वर्गात बसतात म्हणे. येवढा त्रास आहे तर द्यावी सोडून ... २ वर्षाचा अभ्यासक्रमाला ५ वर्षे घेणारे विद्यार्थी म्हणे!

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 10:29 am | काळा पहाड

सरकार अशा पदांवर आपल्या मर्जीतील लोक घुसडत असतेल तर विद्यार्थी विरोध करु शकतात.

सरकार वरच जर उमेदवार नेमणुकीची जबाबदारी असेल तर सरकार आपल्याच मर्जीचा माणूस घुसावेल ना.. किंबहुना सरकार नेमणूक करणारा माणूस हा सरकारी मर्जीतालाच असणार. तिथं कपिल सिब्बल ला टाकेल का सरकार?

कपिल सिब्बल पेक्षा क्वालिफाईड मिनिस्टर आहे की सध्या त्यांच्या खात्याला..

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 1:14 pm | संदीप डांगे

तुम्ही पण ना राव! समजतच नाही तुम्हाला. असेल कपिल सिब्बल ने ढिगभर डिग्र्या आणि डोंगरभर अनुभव मिळवलेला पण मंत्री म्हणून खात्याचं काम कार्यक्षमतेनीच करेल असं सिद्ध कुठं झालंय?

माननीय आजी मंत्र्यांकडे अचूक योग्यता आहे ज्याला डीग्री अनुभवाची गरजच नाही.

जे काँग्रेसने केला तेच भाजपाने करायचा का ?
बदल घडवला पाहिजे . ही घुसवा घुसवी थांबली पाहिजे आणि योग्य माणसांना पुढे आणला पाहिजे ,

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Jul 2015 - 2:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

पण हे शहाणपण सरकार दाखवण शक्य नाही.

आपण पाहिलेत वाटतं. लिंक टाका. आम्ही पण कलात्मक आस्वाद घेऊ या चित्रपटांचा.;)

सरकारनं सनी लिओनीला विचारुन बघावं. तिनं पद स्वीकारलं तर असाच विरोध होईल काय????

नाखु's picture

8 Jul 2015 - 9:02 am | नाखु

गर्दी+दर्दी हटवायला पोलीस बोलवावे लागतील!!!!

सन्नीताईंना सेन्सॉर बोर्डाचं किंवा सांस्कृतिक महामंडळाचं अध्यक्षपद योग्य राहील.

खटासि खट's picture

8 Jul 2015 - 9:44 am | खटासि खट

यापूर्वी पण संप झालेत ना ? त्या वेळी एफटीआयच्या विद्यार्थ्यांना झोडपल्याचं आठवत नाही. भाजपशी संबंधित निर्णयांना विरोध सहन न होणं हे मूळ दुखणं आहे का ?

आशु जोग's picture

8 Jul 2015 - 10:03 am | आशु जोग

.
हलवून खुंटी बळकट करणार हे आंदोलक

मराठी_माणूस's picture

8 Jul 2015 - 10:14 am | मराठी_माणूस

क्रिकेट कंट्रोल बोर्डावरच्या लोकांचे क्रिकेट मधले योगदान, अनुभव काय असतो ?

मृत्युन्जय's picture

8 Jul 2015 - 11:05 am | मृत्युन्जय

प्रशासकीय कामांसाठी गजेंद्र चौहानच्या जागी जितेंद्र आव्हाडांची निवड झाली असती तरी त्यामुळे काही बिघडले नसते. तर मग चौहानांच्या निवडणुकीला नक्की काय आक्षेप? त्यांच्या जागी शत्रुघ्न सिन्हांची निवड झाली असती तर देखील सॅफ्रनायझेशन ठरले असते काय? विरोध सॅफ्रनायझेशनला आहे की गुणवत्तेला? बोंबलणारे दोन्ही गोष्टींवर बोंबलत आहेत. दोन्ही गोष्टींवर बोंबलण्याचा त्यांना अधिकार आहे असे वाटत नाही. त्यांनी एक काय तो मुद्दा निवडावा,

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2015 - 11:14 am | अत्रुप्त आत्मा

निर्णय सरकारच्या कित्तिही हातात असला,तरी लायक व्यक्तीला न नेमता "आपल्याला हवा तोच" माणूस नेमणं अत्यंत अयोग्य आहे.
आणि सदर व्यक्ति पदाला लायक नाही,हे ही तितकच खरं आहे.
शिवाय मोदि सर्वत्र आपला वचक ठेवल्या शिवाय काहीही पुढे सरकू देत नाहित, हे ही लक्षात घेण्यासारखं आहे. अराजक आणि हुकुमाशाहिची सध्या चाललेली टिका योग्यच वाटते ,असं काही पाहिल्यावर.

आशु जोग's picture

8 Jul 2015 - 11:23 am | आशु जोग

इथे मोदी कुठून आले. इतक्या छोट्या गोष्टीत कशाला लक्ष घालतील. काहीही. अमेरीका, मंगोलिया, चीन पुरेसे आहे ना

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2015 - 1:45 pm | अत्रुप्त आत्मा

@ इथे मोदी कुठून आले. इतक्या छोट्या गोष्टीत कशाला लक्ष घालतील. काहीही.>> न घालायला काय झालं ? आणि त्यांचा फ़ौजफ़ाटा डावे उजवे "हात" त्याच साठी तैयार केलेत त्यांनी हे तर जगजाहिर आहे. अर्थात नमोरुग्णांना हे सगळं माहीत असतच! त्या शिवाय का ते इतक्या साध्या गोष्टिम्वर अकांड तांडव करतात.

आशु जोग's picture

8 Jul 2015 - 1:52 pm | आशु जोग

मी मोदी म्हटलं... फौजफाटा वगैरे तुम्ही पघून घ्या

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jul 2015 - 2:24 pm | अत्रुप्त आत्मा

मंत्रिमंडळ/सैन्याची जबाबदारी राजावरच असते, प्रजेनि कित्तिही झिडकारलि तरी!

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jul 2015 - 11:24 am | llपुण्याचे पेशवेll

खरंतर विद्यार्थ्याना आपला शिक्षक कोण हवा हे ठरवण्याचा अधिकार तेव्हाच असतो जेव्हा ते पैसे भरून शिक्षण घेत असतील. इथे आमचे पैसे उडवून शिकतात आणि फुकटचा माज करतात. मोडून काढा आंदोलन यांचे.

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 12:44 pm | कपिलमुनी

तसे तुमचे पैसे राष्ट्रवादीच्या टग्यांनी पण उडवले पण तिथे काही बोलले की अवघड झाले असते.
ही पोरा गरीब आहेत .. काढा मोडून :)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jul 2015 - 2:28 pm | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा ... गरीब? कैच्याकै.. जर राष्ट्रवादीवाले गुंडगिरी या अर्थाने टगे असतील तर ही मुले किंवा कमीतकमी त्याना हाकणारी ताकत ही अन्य अर्थाने टगेगिरीच करत आहे.

dadadarekar's picture

8 Jul 2015 - 1:08 pm | dadadarekar

जनता जो ट्याक्स भरते त्यातूनच जनतेला सअरकार सुविधा पुरवते.

ही लोकशाही आहे , कुणाच्या उपकारावर जगायला ही पेशवाई नव्हे.

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 11:40 am | संदीप डांगे

सदर धागालेखक व प्रतिसादकर्ते यांना प्रस्तुत संस्थेचा इतिहास, कार्यपद्धतींबद्दल फारशी माहिती नाही असे दिसत आहे.

..

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 11:52 am | संदीप डांगे

भाजपने आपला माणुस तिथे बसवला, त्याला विरोध करतायत विद्यार्थी. त्या विद्यार्थ्यांना भाजपविरोधी आहेत असा रंग देणारा हा धागा आणि काही प्रतिसाद आहेत. रंगांधळ्यांना काहीही समजावून फरक पडत नाही हे आपण स्वतःच चांगले जाणता.

तस्मात... चलु द्या...

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 12:14 pm | काळा पहाड

१. वाइट एक्टर = वाइट संचालक असं काही असतं का?
२. बीजेपीचा माणूस म्हणजे काय? तो काही जेकेएलएफ चा सदस्य आहे का? की फक्त लेफ़्ट आणि कोन्ग्रेस चेच लोक तिथे असावेत असा नियम आहे? मुख्य म्हणजे ही संस्था पुण्यात, कोथरूड मध्ये आहे, जिथे भाजप चे सर्व आमदार आहेत. पटना किंवा कोलकता मध्ये नाही.

त्यांनी रहायचं तर रहावं नाही तर फ़ुटावं.

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 12:36 pm | संदीप डांगे

माझा पहिला प्रतिसाद परत एकदा वाचा.

संस्था पुण्यात आहे म्हणजे पुण्याची मालमत्ता नाही. ती देशाची संस्था आहे. इतर स्वायत्त संस्थांमधे आणि या संस्थेत बर्‍याच बाबतीत खूपच फरक आहे. ते एक वेगळं जग आहे आणि त्यासंबंधी इथे चर्चा करणार्‍यांना काहीच माहिती नाही असे दिसत आहे. शिवाय फार गुंतागुंतीचं राजकारण आहे. त्यामुळे शून्य माहितीवर डोकं ताणून तर्क लढवणार्‍यांना खुशाल लढवू द्या.

हेच कॉंग्रेसच्या राज्यात झालं असतं तर असेच प्रतिसाद आले असते का याचं कुतूहल आहे.

म्हणूनच म्हटलं.. चलु द्या...

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 12:52 pm | काळा पहाड

संस्था पुण्यात आहे म्हणजे पुण्याची मालमत्ता नाही. ती देशाची संस्था आहे.

थोडक्यात, देशाच्या जनतेनं निवडून दिलेल्या सरकारनं अधिकृत रीतीनं नेमलेला संचालक असल्यामुळे त्याबद्दल वाद उठवायचा या विद्द्यार्थ्यांना अधिकार नाही. कारण संस्था देशाची आहे. मग बीजेपी चा माणूस असो, वा आरएसएस चा. कारण ती नेमणारं सरकार हे देशासाठी निवडलं गेलंय.

इतर स्वायत्त संस्थांमधे आणि या संस्थेत बर्‍याच बाबतीत खूपच फरक आहे. ते एक वेगळं जग आहे आणि त्यासंबंधी इथे चर्चा करणार्‍यांना काहीच माहिती नाही असे दिसत आहे. शिवाय फार गुंतागुंतीचं राजकारण आहे. त्यामुळे शून्य माहितीवर डोकं ताणून तर्क लढवणार्‍यांना खुशाल लढवू द्या.

उलट तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही ती सांगायला पाहिजे. लोक तसंही मोदी कसे धोका देतायत आणि अर्थव्यवस्था का उभारी घेत नाहीये यावर माहित नसताना चर्चा करतातच. लोक त्यांना जे दिसतं त्याचा विचार करतात. तेव्हा तुम्ही या बाबत अधिक लिहिलत तर जास्त बरं.

शिवाय फार गुंतागुंतीचं राजकारण आहे.

सरकार राजकारण करणारच. विद्यार्थ्यांना ते करायला मनाई असावी. खास करून सरकारी संस्थेत.

हेच कॉंग्रेसच्या राज्यात झालं असतं तर असेच प्रतिसाद आले असते का याचं कुतूहल आहे.

हेच कॉंग्रेसच्या राज्यात झालं असतं तर या विद्यार्थ्यांनी असाच दंगा केला असता का याचं कुतूहल आहे.

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 1:01 pm | संदीप डांगे

माहिती तर भरपूर आहे हो.

पण इथं अशा रंगपंचमीच्या वातावरणात आत्ता देऊन काय उपयोग नाही.

जरा धुरळा बसूंदेत. मग बघू.

एक्झॅक्टली. हा प्रश्ण विद्यार्थि आणि त्यांच्यावर लादलेला संचालक ह्यांचा आहे, त्याला राजकिय रंग देण थांबवल पाहिजे.
विद्यार्थ्यांचा विरोध चौहान ला आहे, त्याना सरकार कुठल्या पार्टिच आहे ह्याच्याशि काहिहि देण्-घेण नाहि. जे जे कॉलेज सारखिच हि सुद्धा एक क्रिएअटिव्ह संस्था आहे, पण ज्या तर्‍हेचे प्रतिसाद आता येताहेत त्याना यात हि मोदि, हिंदुत्व, राहुल गांधि, सिब्बल हे घुसवायचे आहेत त्यामुळे इथे न बोललेच बर.

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 2:31 pm | संदीप डांगे

यात हि मोदि, हिंदुत्व, राहुल गांधि, सिब्बल हे घुसवायचे आहेत त्यामुळे इथे न बोललेच बर.

सहमत...

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jul 2015 - 2:32 pm | llपुण्याचे पेशवेll

नाही इतका साधा रंग नाही हा.. या विद्यार्थ्यांनी राहूल सोलापूरकरांवरही संघाशी संबंधित असल्यावरून अनावश्यक टिप्पणी केली आहे. राहूल सोलापूरकर माझ्या मते एक चांगले कलाकार आहेत. पुण्यात अनेक कार्यक्रमात त्यांनी केलेले उत्कृष्ठ सूत्रसंचाल ऐकले आहे. मग संघाशी संबंधित असण्यावरून त्यांच्यावर टीका होत असेल तर तो राजकीय रंग नाही? या आंदोलनाला योगेंद्र यादव यांचा पाठींबा कुठला 'अ'राजकीय होता?

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 3:18 pm | काळा पहाड

How has the controversy thickened?

Apart from Mr. Chauhan’s appointment, students and progressive filmmakers have looked askance at the choice of the reconstituted FTII panel where four of the eight are RSS propagandists. These include Anagha Ghaisas, who has made several documentary films of Prime Minister Narendra Modi; Narendra Pathak, a former president of the Maharashtra ABVP; Pranjlal Saikia, an office bearer of an RSS-linked organisation; and Rahul Solapurkar, who is intimately associated with the BJP.

Who are backing the students’ fight?

The battle has brought the ideological contest between the right and the left into sharp relief, with left-wing students’ organisations like the All India Students’ Association (AISA), the Kolkata-based Satyajit Ray Film Institute and students at the Jawaharlal Nehru University (JNU) all coming out strongly in support of the striking students.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2015 - 2:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरंच विश्वासू माहिती असल्यास ती स्वतंत्र धागा काढून द्या.

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 3:08 pm | संदीप डांगे

जरूर डॉक्टरसाहेब, माझे काही मित्र माजी विद्यार्थी आहेत तिथले. त्यामुळे अंतर्गत वातावरणाची माहिती आहे.

फक्त एवढंच आता म्हणू शकतो की पारंपरिक शिक्षणसंस्थांसारखी ही संस्था नाही आहे. इथे विद्यार्थ्यांचा खूप होल्ड आहे. कारण इथे विद्यार्जन म्हणजे पुस्तकी शिक्षण किंवा शिक्षकांकडून विद्यार्थीकडे असं पारंपरिक पद्धतीचं नाही. आपण ढोबळमानाने असं म्हणू शकतो की ही अशी एक जागा जिथे फिल्मजगतात असणार्‍या विविध कामांचे मूलभूत शिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण, स्वयंशिक्षण अत्युच्च तंत्रज्ञानाने होते. सिनीयर, ज्युनियर्स आणि शिक्षक यांचं एक अपारंपरिक व अनौपचारिक जग आहे. बरेच विद्यार्थी वयाच्या पस्तीवाव्या वर्षीही इथे प्रवेश घेतात. काहींचा बरेच वर्ष प्रयत्न करून नंबर लागतो. प्रवेश परिक्षाही आयएएस परिक्षेपेक्षा कमी दर्जाची नाही. प्रत्येक अभ्यासक्रम पदव्यत्तर असून फक्त १०-१२ जागा आहेत. देशभरातून चित्रपटसंबंधी करीअर करू इच्छिणार्‍यांची ही संस्था पंढरी आहे.

प्रत्यक्ष फिल्डशी कनेक्टेड अशी ही एकमेव सरकारी संस्था असावी. कारण इथल्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या विद्याकालातच फिल्मजगतातले मान्यवर लोक लक्ष ठेवून असतात. व्यवसायाच्या संधी थेट उपलब्ध असतात. इंडस्ट्रीशी कायम संवाद असतो.

वारकर्‍यांना पंढरपूर जेवढे प्रिय त्याचप्रमाणे इथले आजी-माजी विद्यार्थी ह्या संस्थेला मानतात. सर्वसामान्यांना हे माहिती नसते म्हणून या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुच्छ संबोधण्याची चूक करू शकतात.

बाकी सविस्तर लिहिन...

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Jul 2015 - 4:16 pm | अनिरुद्ध.वैद्य

धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jul 2015 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

भारतात एकतरी उच्चशिक्षणसंस्था अशी आहे की दिले जाणारे शिक्षण आणि त्याच्यातून निर्माण होणारे व्यवसाय हे घनिष्टरित्या संलग्न आहेत, हे कळले.

सविस्तर लेख जरूर लिहा.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2015 - 12:40 am | अत्रुप्त आत्मा

@वारकर्‍यांना पंढरपूर जेवढे प्रिय त्याचप्रमाणे इथले आजी-माजी विद्यार्थी ह्या संस्थेला मानतात. सर्वसामान्यांना हे माहिती नसते म्हणून या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुच्छ संबोधण्याची चूक करू शकतात.>> हे तर खरच..पण माहीत आता माहीत झालं किंवा असलं,तरी अजेंडा वाली लोकं स्वार्थापोटि उलट लिहित रहणारच. ह्या माहिती बद्दल अनेक धन्यवाद.

@बाकी सविस्तर लिहिन...>> वाट पाहतोय. नक्की लिहा. :)

खरं म्हणजे इथे आपण काय चर्चा करतो यामुळे ती संस्था, संपकरी विद्यार्थी आणि सरकार यांना काहीच फरक पडणार नाही. त्यामुळं तथ्य काय आहे यालाच महत्व असावं. तथ्याला कुणाच्या अनुमोदन्याची गरज नसते.

एफटीआयआय चे चेअरमन हे नाममात्र पद असल्याचा समज काही प्रतिसादांमधून होतो आहे. वस्तुस्थिती काय आहे ?
http://www.ftiindia.com/management.html
एफटीआयआय या संस्थेच्या संस्थळावर दिलेली माहीती पाहता चेअरमन हे अनेक समित्यांचे अध्यक्ष आहेत असं दिसतंय.

अरुण जेटली यांना संपक-यांचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं तेव्हां फाईव्ह पॉईण्ट प्रोग्रामवर चर्चा झाली. त्यामुळं चर्चा न करताच संप चालू आहे या म्हणण्यात तथ्य नाही. पूर्णवेळ म्हणून चौहान यांची तयारी होती या कारणामुळे त्यांची निवड झाली हा जेटली यांचा युक्तीवाद आणि बेनेगल यांचं सहा महीन्यातून एकदा की दोनदा व्हिजिट एव्हढंच काम असल्याचं म्हणणं यात तफावत आढळतेय.

या विषयावर खालील लिंक वर गजेंद्र चौहान सहीत विद्यार्थ्यांचं मत ऐकता येईल.
https://youtu.be/B_vOORnQNJg

रणवीर किंवा इतरांचं मत
http://indianexpress.com/article/india/india-others/rishi-kapoors-advice...

विनोद खन्ना यांच्या याच पदावर झालेल्या नियुक्तीबद्दल वाद झालेला नाही. कुणाला संधी द्यायची याचे ठोकताळे व्यवहारात असतातच. केआरके - कमाल खान, वीणा मलिक किंवा बिग बॉस मधली वादग्रस्त आणि सुमार व्यक्तीमत्त्व या पदावर बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याविरोधात भगवे, लाल, हिरवे, निळे यापैकी कुणाच्याही पाठींब्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तरी त्याला पाठिंबाच राहील. अशा लोकांशी विद्यार्थ्यांनी चर्चा करण्य़ाचा संबंधच येत नाही. ज्याने नेमणूक केली त्यांच्याशीच चर्चा होऊ शकते.

http://indianexpress.com/article/india/india-others/rishi-kapoors-advice...

आशु जोग's picture

8 Jul 2015 - 1:44 pm | आशु जोग

संदीप डांगे भाव

प्रभात फिल्म कंपनी, दामले फत्तेलाल, शांतारामा, प्रभात रोड, जया भादुरी, गिरीश कर्नाड, मोहन आगाशे, सईद मिर्झा आणि त्यांची मोदींविरुद्ध सह्यांची मोहीम, शत्रुघ्न सिन्हा, शबाना आझमी, भास्कर चंदावरकर, रविंद्र साठे हे माहीत आहे. आपल्याला अधिक काही माहिती असेल तर आम्हालाही सांगा

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 1:55 pm | संदीप डांगे

सईद मिर्झा आणि त्यांची मोदींविरुद्ध सह्यांची मोहीम

तुमचा रोख फक्त इथेच आहे असं दिसतंय. त्याच्याशिवायही अजून बरंच काही आहे. पण आत्ता नको.

आशु जोग's picture

9 Jul 2015 - 11:10 pm | आशु जोग

काका

तुम्ही तेवढच कोरून काढलंत ह्यात आमचा काय दोष

सव्यसाची's picture

8 Jul 2015 - 11:58 am | सव्यसाची

दोन गोष्टी आहेत.
१. सरकारने अश्या संस्था चालवाव्यात का?
२. जर प्रश्नाचे उत्तर हो असेल, तर मग चालवायच्या कश्या?

मला वाटते कि सरकारने या गोष्टी चालवणे सोडून द्यावे आणि त्याचा ताबा चित्रपट जगताकडे देऊन टाकावा. जर तसे होणार नसेल तर IIT, Indian Statistical Institute सारखी पद्धती अवलंबावी ज्या योगे स्वायत्तता आणि दैनदिन बाबींमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकणार नाही. त्यासाठी सरकारने संसदेमध्ये विधेयक पारित करावे ज्यायोगे पुढे येणारे सरकार सुद्धा त्या कायद्याला धरून वागेल.

हे सर्व झाले भविष्याच्या बाबतीत. पण सध्याचा पेचप्रसंग कसा सोडवायचा?
कुठल्याही दृष्टीने असे वाटत नाही कि सरकार या नियुक्तीवर मागे सरकेल. आधीच सरकार इतक्या सगळ्या प्रकरणात व्यस्त आहे कि या अजून एका प्रकरणात मागे जाणे सरकार पसंत करेल असे वाटत नाही.
२-३ दिवसांपूर्वी अरुण जेटली यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतही काहीच निर्णय झालेला नाही. उलट त्या बैठकीतून बाहेर आल्यावर विद्यार्थ्यांनी असे म्हटले कि सरकार खाजगीकरणाचा विचार करते आहे, तर सरकार म्हणते आहे कि आम्ही तसे काहीच नाही म्हणालो. विद्यार्थीही कदाचित हि संस्था चित्रपटजगताने चालवावी या मताचे नाहीत.

आम्हीही स्वायत्त संस्थांमध्ये शिकलो आहे. परंतु आमच्या आवडीचा संचालक आम्हाला द्या असे कधीच पाहिले नाही.

गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवर वाद असला तरी कमीत कमी काम सुरु करण्याची संधी द्यावी. जर काम वाईट सुरु असेल तर परत ४-५ महिन्यांनी विरोधाची सर्व हत्यारे आहेतच की. उलट त्यावेळी पुरावा असेल कि हा माणूस चांगले काम करू शकत नाही वगैरे.
दुसरा मुद्दा हा आहे कि त्यांच्या भाजपा सदस्य असण्याचा. मुळातच हा मुद्दा लोकांनी आणायला नको होता. गजेंद्र चौहान यांच्या क्षमतेवरच जर लोकांनी त्यांना तसा विरोध केला असता तर तो विरोध खूपच फोकस्ड असता. परंतु, पक्षाशी निगडीत आहे असा जेव्हा आरोप होतो तेव्हा मग क्षमता आणि संस्थेची स्वायत्तता यावरुन चर्चा दुसर्याच रुळावर जाते आणि मग विषयाला फाटे फुटतात. IIT,IIM,ICHR,नालंदा अश्या अनेक ठिकाणी चर्चा फिरून येतात. मुद्दा बाजूला राहतो आणि चर्चा मग विचार, तत्वज्ञान अश्या गोष्टींमध्ये जाते जिथून सध्या सुरु असलेल्या मुद्द्याचे उत्तर मिळणे दुरापास्त होते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

8 Jul 2015 - 12:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

वाचतेय.त्या लिहिलेल्या पत्रावरून विद्यार्थ्यांना पद्मश्री वगैरे बक्षिसे मिळवलेला,बर्लिन्,मॉस्कोला चित्रपट प्रदर्शीत करणारा संचालक म्हणून हवाय.कर्नाड्,अदूर्,आनंद पटवर्धन,गुलझार वगैरे मंडळी त्या व्याख्येत फीट बसतात. गजेंद्र त्या व्याख्येत बसत नाही ही वस्तुस्थिती. पण कितीही थोर संचालक असला तरी आपल्या शि़क्षणावर खरोखरच होतो का? ह्याचा विद्यार्थ्यांनीही विचार करायला हवा.
ह्यांचा सल्ला- अमिताभ बच्चन ह्यांची नियुक्ती व्हावी.पारितोषिके अगदी डझनावारी आहेत व भाजपाचेही मित्र आहेत. कुणालाच आक्षेप असणार नाही.

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 12:41 pm | संदीप डांगे

कितीही थोर संचालक असला तरी आपल्या शि़क्षणावर खरोखरच होतो का?

फरक पडतो माईसाहेब. जेजे कला संस्था हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. जेजेची अधोगती होण्यामागे संचालकांची अकार्यक्षमता आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे.

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 12:55 pm | काळा पहाड

हो, पण चांगला आर्टिस्ट 'च' चांगला संचालक होवू शकतो असं तुम्हाला म्हणायचंय का? ते जे जे चे सर्व संचालक अकार्यक्षम असतील ही पण गजेंद्र चौहान हे अकार्यक्षम आहेत हे कुठे सिद्ध झालंय?

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 1:07 pm | संदीप डांगे

कार्यक्षम आणि पदास योग्य आहेत हे तरी कुठे सिद्ध झालंय? पक्षसेवेचे बक्षिस म्हणून त्यांना ते पद बहाल करण्यात आलंय. त्यांच्यापेक्षा कैक पटीने योग्य आणि कार्यक्षम उमेदवार अजून इंडस्ट्रीत आहेत.

आत्ता आपण चर्चा करतोय ती संस्था (सवंग अशी प्रतिमा असलेल्या) फिल्मजगताशी संबंधित आहे म्हणून तेवढे गांभिर्य वाटत नसेल पण हेच इस्रो सारख्या किंवा रॉ सारख्या ठिकाणी झालं असतं तर?

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 1:34 pm | काळा पहाड

आत्ता आपण चर्चा करतोय ती संस्था (सवंग अशी प्रतिमा असलेल्या) फिल्मजगताशी संबंधित आहे म्हणून तेवढे गांभिर्य वाटत नसेल पण हेच इस्रो सारख्या किंवा रॉ सारख्या ठिकाणी झालं असतं तर?

मूर्ख पणाचं झालं असतं. आणि तिथे माझा विरोधच असता. पण सरकार ला काहीच कळत नाही असं समजून वागणं पण बरोबर नाही. सरकारनं इस्रो सारख्या किंवा रॉ सारख्या ठिकाणी अशी नेमणूक केलेली नाही. सरकारचा जर काही शंकास्पद हेतू असता तर त्यांनी ते सुद्धा केलं असतं.

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 1:48 pm | संदीप डांगे

सरकारला काय कळतं किंवा नाही हे सरकार कोणत्या पक्षाचं आहे यावर ठरतं बहुतेक... नाही का?

असो. तुम्ही संस्थेला तुच्छच म्हटल्याने आता काय बोलून उपयोग नाहीच.

नाव आडनाव's picture

8 Jul 2015 - 1:50 pm | नाव आडनाव

सरकारला काय कळतं किंवा नाही हे सरकार कोणत्या पक्षाचं आहे यावर ठरतं बहुतेक

क्या बात ! पर्फेक्ट.

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 2:14 pm | काळा पहाड

सरकारला काय कळतं किंवा नाही हे सरकार कोणत्या पक्षाचं आहे यावर ठरतं बहुतेक... नाही का?

हो ना.
मागच्या घटना अशा आहेत:
A bureaucrat, rather than a film personality, has headed the school for the last 15 years — and critics insist civil servants with limited tenures cannot be committed to far-reaching changes. In 2012, The Indian Express had accessed documents of a governing council meeting that showed only five out of 15 members present, with many having been granted “leave of absence”. This included Raghvendra Singh, Joint Secretary (Films), and C Viswanath, Additional Secretary and Financial Advisor, both from the I&B Ministry. The last film person to head the institute as its director was Mohan Agashe, who ironically, had to go following students’ protests over his attempt to restructure some courses.
तेव्हा तर कोणी बोंबाबोंब केली नव्हती. म्हणजे तेव्हा बोंबाबोंब न करणारे सरकारच्या शहाण पानावर विश्वास ठेवून होते असंच ना? फक्त आता बीजेपी सरकार असल्याने असे प्रश्न उठतात. नाही का?

तुम्ही संस्थेला तुच्छच म्हटल्याने आता काय बोलून उपयोग नाहीच.

तुमची मर्जी.

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 12:42 pm | कपिलमुनी

या पदासाठी जी नावे "शॉर्टलिस्ट‘ केली गेली होती, त्यात प्रतिभावान कवी गुलझार आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्‍याम बेनेगल, तसेच अदूर गोपालकृष्णन यांचा समावेश होता. पण यांची पात्रता नसल्याने थोर अभिनेते आणि समाजसेवक गजेंद्र चौहान यांची या पदासाठीए निवड केली आहे.

गुलजार किंवा बेनेगल यांच्या पेक्षा ते या माध्यमाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतील असे सरकारला वाटते.
त्यांचे आजवरचे योगदान बघता अशी अपेक्षा करू या .

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 12:48 pm | कपिलमुनी

माईंना संपादक केल्यासारखा झालाय :)

इतकी वर्षं कपिलमुनी चं संपादक होते. आता माईंना संपादक केल्यावर कपिलमुनी ना वाईट वाटायचं काय कारणं? भले कपिलमुनीनी लिहिली असतील १५ काव्ये आणि १० लेख पण संचालक पदासाठी लेखन क्षमता नाही, तर एडमिनिस्ट्रेटॆव्ह क्षमता लागते त्यात कपिलमुनी तेवढेच हुशार असतील असं थोडंच आहे? फक्त कपिलमुनिच सर्व विषयात हुशार आणि बाकीचे सर्वच विषयात ढ असं तर त्यांना म्हणायचं नाही ना?

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 1:07 pm | कपिलमुनी

वाइट विद्यार्थांना वाटत आहे.
आणि एडमिनिस्ट्रेटॆव्ह क्षमता म्हणाल तर ती गजेंद्र यांनी कुठे दाखवली आहे ?
या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ?

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 1:31 pm | काळा पहाड

होना? मग अरविंद केजरीवाल नी तरी ती कुठे दाखवली होती? कुठल्या कायदा बनवणार्या संवैधानिक पदावर ते आधी आरूढ झालेले होते? एका ग्रामपंचायतीचा कारभार तरी त्यांनी पाहिला होता का? का त्यांना हे प्रश्न विचारले गेले नाहीत? एखादा माणूस साध्या आमदार पदाचा अनुभव नसताना डायरेक्ट मुख्यमंत्री बनू शकतो पण एक सामान्य माणूस फक्त तो भाजप चा सदस्य आहे म्हणून एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा समाज जीवनाशी किंवा राष्ट्रहिताशी काही संबंधच नाही) त्याचा संचालक बनू शकत नाही?

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 1:37 pm | कपिलमुनी

या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ?

या धाग्यावर याच विषयावर चर्चा करा.

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 1:47 pm | काळा पहाड

मुनीश्वर, जसं तुम्ही माई ना संपादक बनवण्याबद्दल उपहास केला होता, तद्वतच मी केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री बनवण्याच्या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तुम्ही का इकडे तिकडे फिरलात, मुनीश्वर? बाकी मी विषयापासून तसूभरही ढळलेला नाही. जर केजरीवाल मुखमंत्री बनू शकतात तर चौहान संचालक का नाही हा लॉजिकल प्रश्न आहे. यात इकडे तिकडे कुठे फ़िरलं गेलंय?

आजची सही: तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म, राधासुता?

dadadarekar's picture

8 Jul 2015 - 1:54 pm | dadadarekar

केजरीवाल हा निवडुन आलेला होता. तिथे जास्त मताधिक्य मिळवणे इतकाच क्रायटेरिया असतो.

पण फिल्म इन्स्टिट्य्ट्मधील पद हे सर्व इच्छुक उमेदवारांचा अनुभव व ज्ञान यांचा विचार करुन मग भरायचे असते.

इलेक्शन व सिलेक्शन यात फरक असतो.

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 2:21 pm | काळा पहाड

हितेश राव, ती पूर्ण दिल्लीची सत्ता आहे, ही तर फक्त एक इन्स्टिट्युट आहे.

जास्त मताधिक्य मिळवणे इतकाच क्रायटेरिया असतो

पण फिल्म इन्स्टिट्य्ट्मधील पद हे सर्व इच्छुक उमेदवारांचा अनुभव व ज्ञान यांचा विचार करुन मग भरायचे असते.

तुमच्या बोलण्यातला विनोद तुम्हाला कळतोय ना?

dadadarekar's picture

8 Jul 2015 - 2:28 pm | dadadarekar

एक इलेक्शन आहे.

दुसरे सिलेक्शन आहे.

अहो एक जनतेनं निवडून दिलेल्या सरकारनं केलेलं आहे तर दुसरं जनतेनं केलेलं आहे. आपल्या कडे रिप्रेझेण्टेटिव्ह डेमोक्रासी आहे. सगळी कामं जनता करू शकत नाही म्हणून तर सरकार आहे. सरकारचे निर्णय हे जनतेनं दिलेल्या पाठिम्ब्यावर तर घेतले जातात. तेव्हा सिलेक्शन हे इल्लिगल कसं?

कपिलमुनी's picture

8 Jul 2015 - 3:19 pm | कपिलमुनी

हे सिलेक्शन इल्लिगल नाही हे बरोबर आहे फक्त हे सिलेक्शन चुकीचा आहे.
त्या पदासाठी बरेच इतर चांगले ऑप्शन असताना त्यांना डावलून केलेला आहे . लादलेला आहे.

या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ?

केजरीवालासाठी दुसरा धागा काढा

आशु जोग's picture

8 Jul 2015 - 8:24 pm | आशु जोग

केजरीवालासाठी दुसरा धागा काढा
आता बास की. २०१४ सालीच हौस भागली नाही का...

कपिलमुनी's picture

9 Jul 2015 - 2:35 pm | कपिलमुनी

काळा पहाड यांनी केजरीवालना या धाग्यात घुसवला .
हौस त्यांना आहे मला नाही.

आशु जोग's picture

10 Jul 2015 - 12:01 am | आशु जोग

होय

संदीप डांगे's picture

8 Jul 2015 - 1:41 pm | संदीप डांगे

एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा समाज जीवनाशी किंवा राष्ट्रहिताशी काही संबंधच नाही)

वा वा वा! टाळ्या!

मग एवढ्या तुच्छ संस्थेच्या तुच्छ विद्यार्थ्यांनी केलेल्या तुच्छ आंदोलनावर एवढी आगपाखड का?

नाव आडनाव's picture

8 Jul 2015 - 1:48 pm | नाव आडनाव

जोरदार टाळ्या +

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 1:49 pm | काळा पहाड

चौहान बीजेपी चे सदस्य असल्याबाबत एवढी आगपाखड चाललीय म्हणूनच.

नाव आडनाव's picture

8 Jul 2015 - 1:47 pm | नाव आडनाव

साध्या आमदार पदाचा अनुभव नसताना डायरेक्ट मुख्यमंत्री बनू शकतो
हेच मोदींच्या बाबतीत सुध्धा म्हणता येईल. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेंव्हा, जितकं मला माहित आहे आमदार नव्हते.
तसंच अजून एक - "साध्या खासदार पदाचा अनुभव नसताना डयरेक्ट पंतप्रधान बनू शकतो" :)

काळा पहाड's picture

8 Jul 2015 - 2:17 pm | काळा पहाड

तुम्ही माझ्या मुद्ध्याला पाठिंबा देताय हे तुमच्या लक्षात येतंय का?