आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी 'चांदोबा' तील चित्रांनी नक्कीच मोहवले असेल. खरोखर मासिके - पुस्तकातल्या कथांना अनुरूप अशी चित्रे बनवणे खूपच आव्हानात्मक काम असते, आणि अशी उत्तम चित्रे बनवण्यासाठी अत्युच्च दर्जाची प्रतिभा लागते.
या लेखमालेद्वारे काही प्रतिभावान चित्रकारांनी पुस्तकांसाठी बनवलेली चित्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
हेन्री जस्टिस फोर्ड Henry Justice Ford (1860–1941) हे ब्रिटिश चित्रकार सुमारे 1880 आणि 1890 च्या दशकात खूपच प्रसिद्ध होते. यांची काही चित्र:
१. सिंदबादला हत्तींनी त्यांच्या मृत्युस्थानी आणून ठेवले:
२. The Gnome Falls in Love with the Princess ~ The Brown Fairy Book ~ 1904
३.
४.
५.
क्रमशः
प्रतिक्रिया
17 May 2015 - 10:20 pm | अन्या दातार
चित्रासंबंधी कथेबद्दलही जरा लिहिले असते तर अजून चांगल्या रितीने आस्वाद घेता आला असता. सिंदबादची सोडल्यास बाकी चित्रांच्या कथांबद्दल मलातरी अजिबातच माहिती नाही. चित्रे सुंदर आहेत यात वाद नाहीच.
अवांतर - टॅरोकार्डवरही जवळपास अशाच शैलीतील चित्रे बघितली आहेत.
18 May 2015 - 4:59 pm | पॉइंट ब्लँक
+१. कमित कमी गोष्टींच्या लिंका तरि द्या.
17 May 2015 - 10:32 pm | अजया
मस्त लेखमालिका!पुभाप्र.
18 May 2015 - 11:37 am | चित्रगुप्त
खरेतर हा लेख मला खूप विस्तृत, भरपूर चित्रे असलेला असा करायचा होता, परंतु अचानक काही कारणाने मधेच थांबवे लागल्याने अगदीच तोकडा झाला. पुढील भागापासून एकच विषय घेऊन त्यावरील विविध चित्रकारांनी केलेली पुस्तकातील चित्रे देण्याचा मानस आहे. सुरुवात 'सिंदबादच्या सफरी' पासून करावी म्हणतो.
18 May 2015 - 5:13 pm | बबन ताम्बे
सुंदर उपक्रम. विषयवार चित्रे म्हणजे मेजवानीच.
18 May 2015 - 6:37 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
18 May 2015 - 4:30 pm | राजेंद्र मेहेंदळे
अजुन एक मस्त लेखमाला चालु होणार तर!! पु.भा.प्र.
18 May 2015 - 8:00 pm | गणेशा
लेखमालेस मनपुर्वक शुभेच्छा !
19 May 2015 - 1:25 am | डॉ सुहास म्हात्रे
लिहा, लिहा... अजून विस्ताराने लिहा... सचित्र लिहा !
19 May 2015 - 10:06 am | प्रचेतस
सुंदर लेखमाला.
चित्रांचे थोडेसे वर्णन, त्यांची वैशिष्ट्ये यायला हवी होती.