पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg
इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे
अवधूत गुप्ते यांची माफी मागून…
----------------------------------------------------------
सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS
आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती
गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS...
पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS
पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता...
दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती
एकटेच बसावे...इथे नको साथी
गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई
लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती
पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती
गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
प्रतिक्रिया
27 Apr 2015 - 5:01 pm | पलाश
सहमत.
27 Apr 2015 - 5:39 pm | गवि
याच अशा वेळी याच अशा अवस्थेत एखादी म्हैस द्रुतगतीने आपल्याकडे चाल करुन येऊ लागल्याचा अनुभव कोणाला आहे का? अनुभव आणि उपाय, दोन्ही एकातच साधते. असो. हल्ली कोण खेडेगावात जातो हे अनुभव घ्यायला..?
27 Apr 2015 - 7:08 pm | टवाळ कार्टा
अग्गाग्गा :)
27 Apr 2015 - 7:17 pm | गवि
.."त्याचजागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी माझ्यानंतर"..ही कवितेची ओळ ऐकलीयेत का?
27 Apr 2015 - 7:35 pm | टवाळ कार्टा
नै ओ...लिंक द्या
27 Apr 2015 - 7:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लोलचं!!!
27 Apr 2015 - 7:45 pm | जेपी
च्यामारी आमच्या लेखाला 25 प्रतिसाद मिळायची मारमार..आन हिकड...
27 Apr 2015 - 7:59 pm | टवाळ कार्टा
जळू नक्को...गुर्जींच्या संप्रदायात ये
28 Apr 2015 - 10:02 pm | प्रसाद गोडबोले
९९
28 Apr 2015 - 10:17 pm | सुबोध खरे
१००
आता वाचतो
28 Apr 2015 - 11:25 pm | सूड
काय ठरलं मग?
28 Apr 2015 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
ताब्यांचे प्रकार आणि उपप्रकार ठरवण्यासाठी पेशल कमिटी 'बसवली' आहे. ;) तिचं काम उरकलं की आलेल्या रिपोर्टवरून कोणता तांब्या योग्य ते ठरवता येईल. :)
29 Apr 2015 - 11:38 am | टवाळ कार्टा
कमिटीचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? ;)
15 Jul 2016 - 4:21 pm | सूड
एका शिष्योत्तमाच्या कवितेचे स्मरण.
15 Jul 2016 - 4:44 pm | टवाळ कार्टा
कस्ले शिष्योत्तम...अम्हाला मिसळीचे निमंत्रण्सुध्धा मिळ्ळत नै
15 Jul 2016 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा
=))
20 Jul 2016 - 3:37 pm | नाखु
मिसल किंवा पावभाजी निमंत्रण अजून आमच्या कक्षेबाहेर आहे..
गावकुसाबाहेरचा नाखु
20 Jul 2016 - 3:50 pm | टवाळ कार्टा
"गुर्जींचे परममित्र" हा मिसळीच्या पाककृतीतलाच एक जिन्नस आहे...त्यामुळे तो नसेल तर मिसळ बनत नाही...तस्मात मिसळीची भूक लोणावळ्याच्या बुवा मिसळीवर भागवावी म्हणतो
15 Jul 2016 - 8:17 pm | जावई
गुड मॉर्निंग पथक दाखल झालय...मिपावर