Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 7:37 am

वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो.

गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं. ठाण्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत वीरगर्जना कडक घुमली; लोकं थिरकली; लोकं शहारली.

या वादनाची मी टिपलेली काही छायाचित्रं इथे देत आहे.
सहभागी होण्यासाठी फेसबुक ग्रूपचा पत्ता हा
ब्लॉग दुवा हा

1
2
3
4
5
6
7
8
9

कलासाहित्यिकसमाजजीवनमानछायाचित्रणसमीक्षालेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Mar 2015 - 10:52 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो मस्तं

खटपट्या's picture

23 Mar 2015 - 11:49 am | खटपट्या

खूप छान फोटो. पुढच्या वर्षी मिरवणूकीत सामील होण्याचा प्रयत्न करेन.

रच्याकने - ढोलताशे नावाचे जुने नाटक उगाच आठवले.

प्रचेतस's picture

23 Mar 2015 - 12:50 pm | प्रचेतस

फोटो छान.
पण हे मिरवणुकांचं फ्याड थांबायला हवं.

अनुप ढेरे's picture

23 Mar 2015 - 1:46 pm | अनुप ढेरे

हेच बोल्तो. आजकाल दर दोन दिवसांनी मिरवणूका, ढोल ताशे, स्पीकर्सच्या भिंती दिसतात. आज काय एक शिवजयंती, उद्या दुसरी, पर्वा गुढिपाडवा, तेरवा तमुक कुठली तरी जयंती... रोज वैताग तिज्यायला...

वेल्लाभट's picture

23 Mar 2015 - 1:26 pm | वेल्लाभट

का बरं?
फॅड कसलं आणि?

मान्य की आधी या मिरवणुका/स्वागतयात्रा नसायच्या. पण असं बघा की आता या असायलाच हव्यात. काय आहे माहित्ये का? गप्प राहणा-याला नगण्यच धरलं जातं. गूगल 'नवरोज़' चं डूडल काढतं, पण पारशांपेक्षा कित्येक पटीने अधिक संख्येने असलेल्या हिंदूंच्या नववर्षाचं डूडल काढत नाही.

गूगल चं एक झालं. पण एकंदरितच जो कलाकलाने वाढणारा आपल्या इंपॉर्टन्सचा, रेकग्निशन चा प्रश्न आहे तो आटोक्यात ठेवायला शोभायात्रा हव्यातच असं माझं मत आहे. ट्विटर वर 'व्हाट आय हेट अबाउट मुंबई इज द नॉइजी फेस्टिव्हल्स' अशा कमेंट्स करायचं डेअरिंग करणारी लोकं बघितली की वाटतं पाहिजेतच स्वागतयात्रा. पाहिजेतच. होऊदे कल्ला.

भिंगरी's picture

23 Mar 2015 - 2:41 pm | भिंगरी

सहमत

धर्मराजमुटके's picture

23 Mar 2015 - 2:47 pm | धर्मराजमुटके

शोभायात्रा असाव्यात की नसाव्यात हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा पण पारशांनी वेगवेगळ्या प्रकारे शोभायात्रा काढून आपला इंपॉर्टन्स, रेकग्निशन वाढविलाय का लोकोपयोगी कामे करुन ?

त्यांनी इंपॉर्टन्स/रेकग्निशन कसं वाढवलंय माहीत नाही. पण गूगल ने दखल त्यांची घेतली ना?...आपली नाही. ....
तोही मुद्दा अलाहिदा.

नेहमी आपणच फ्याड, गोंगाट, इत्यादीचा विचार का करावा? मला नाही वाटत स्वागतयात्रेत काही गैर. Or any festivals for that matter. Even If; I say even if I agree that excessive festivities can be a nuisance at times, but I believe that if nuisance IS the way people claim their spot, which is a true statement for our country, then I am in favor of such nuisance done by our people.

मराठी_माणूस's picture

23 Mar 2015 - 3:15 pm | मराठी_माणूस

nuisance ने द्खल घेतली जाईल असे वाटत असेल तर शुभेच्छा

वेल्लाभट's picture

23 Mar 2015 - 3:18 pm | वेल्लाभट

धन्यवाद :)

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 3:26 pm | टवाळ कार्टा

if nuisance IS the way people claim their spot, which is a true statement for our country, then I am in favor of such nuisance done by our people

हे म्हणजे "ते" दिवसात ५ वेळा भोंगे वाजवतात तर आपण ३ वेळा आरती करू (हे वाक्य कुठेतरी वाचलेले)...आजूबाजूला शाळा, हॉस्पिटल आहेत याकडे कोणाचेच लक्ष नसते (देव न करो पण घरातले कोणी हॉस्पिटल मध्ये असल्याशिवाय कळणार नाही हा आवाजाचा त्रास किती असतो...विशेषतः लहान बाळे आणि वयोवृध्द माणसे)

irrespective of country...nuisance IS never a sane the way people claim their spot and if educated and literate ppl like u still support above statements then nuisance will be the only way people will claim their spot

वरच्या प्रतिसादात लिहिलेले बरोबरच आहे...पारशी लोक इतके कमी असून सुध्धा गुगलने नवरोजची दखल घेतली...गुढीपाडव्याचीसुध्धा घेतील पण त्यासाठी गोंगाट करायची गरज नसावी

राहिले ढोल पथकाचे...ढोलपथक सुध्धा कमी आवाज करून "लयबध्ध...तालबध्ध" वाजवू शकतातच की...कालच बघितलेले ठाण्यात...कलर्स वाहिनीचे नव्या सीरिअलची जाहिरात करत जात होते

पण मी लिहिलेले पटणार नाहिच...कारण आवाज मोठा केल्याशिवाय "आपण मोठे" हे दाखवताच येत नाही कुणाला...त्यामुळे माझा पास

वेल्लाभट's picture

23 Mar 2015 - 3:34 pm | वेल्लाभट

टाईम विल टेल, सर. तुम्ही जी मतं मांडलीत ती आयडियलिस्टिक.. ती पटतात..... पण ती रियलिस्टिक नव्हेत. आणि म्हणून मला ती 'इथे' पटत नाहीत किंवा योग्य वाटत नाहीत. I hope Im clear.

बर, पण हे काय? हे कळलं नाही.

राहिले ढोल पथकाचे...ढोलपथक सुध्धा कमी आवाज करून "लयबध्ध...तालबध्ध" वाजवू शकतातच की...कालच बघितलेले ठाण्यात...कलर्स वाहिनीचे नव्या सीरिअलची जाहिरात करत जात होते
टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 3:44 pm | टवाळ कार्टा

आज ठाण्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी ढोल पथके आहेत...ती ज्यावेळेस राजकीय संघटनांच्या हातात जातील तेव्हा गुढीपाडव्याचा दहीहंडी व्हायला वेळ नाही लागणार (तो दिवस पण जास्त दूर वाटत नाही) कारण सामान्य माणसे मेंढरासारखी या पक्षांच्या नादाला लागण्यात काहीही चुकीचे समजत नाहीत

आणि कमी आवाजातले ढोल म्हणजे तुलनेने कमी जोरात वाजवणे

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 3:49 pm | टवाळ कार्टा

कमी आवाजातल्या ढोलाचे उदाहरण "नंदीबैल घेउन येणारा बुगुबुगु आवाज" हे असू शकते काय?

सतीश कुडतरकर's picture

24 Mar 2015 - 2:19 pm | सतीश कुडतरकर

कमी आवाजातला ढोल म्हणजे 'नवरा' अस म्हणायचं आहे का तुम्हाला?

तुमच्या माहितीसाठी.. गुगल ने आज १४ एप्रिल च्या निमित्ताने बाबासाहेबांचे डुडल काढले आहे.

वेल्लाभट's picture

14 Apr 2015 - 2:03 pm | वेल्लाभट

ठाऊक आहे

सतीश कुडतरकर's picture

23 Mar 2015 - 2:28 pm | सतीश कुडतरकर

छान

एक दिवस असणारी शोभायात्रा सोसत नाही, रोज सकाळी साडेपाचला झोपमोड करणारी बांग चालते?

वेल्लाभट's picture

23 Mar 2015 - 3:20 pm | वेल्लाभट

नेहमी आपणच आपल्याच सण समारंभांच्या स्वरूपात तडजोड करायची. का?

दिवाळीत फटाक्यांवर झोड उठवतात. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? ३६५ दिवस होणारं प्रदूषण नगण्य. चार दिवस वाजणारे फटाके मात्र वाईट. वा रे वा.

अनुप ढेरे's picture

23 Mar 2015 - 3:42 pm | अनुप ढेरे

चार दिवस

दंगा चारच दिवस असेल तर काहीच तक्रार नाही. पण या मिरवणूका दर २-३ दिवसांनी येतात. कुठल्या ना कुठल्या तरी कारणास्तव. ते डोक्यात जायला लागलं आहे.

राजकीय मिरवणुकांचं समजू शकतो. पण बाकी कुठल्या येतात २-३ दिवसांनी?

आता तर म्हणे भिक्षावळीला बंदी आहे. परवानगी घ्यावी लागते पोलिसांची. म्हणजे मला प्रश्नच पडतो की आपण राहतो कुठे? भिक्षावळीला बंदी वगैरे हा टोट्टल चावटपणा आहे.

आत्ता दोन शिवजयंत्या झाल्यात. दोन्हीच्या मिरवणुका. आदल्या दिवशी बारा वाजता बाईक रॅली, हॉर्न वाजवत. मग दिवसा डोल्बीवर पोवाडे. संध्याकाळी मिरवणुका. मग होळी. धुळ्वडीला परत डोल्बीच्या भिंती. बर सगळे धुळ्वडीला रंग खेळतात असं नाही. रंगपंचमीला परत तेच. मग संभाजी पुण्यतिथी. तेव्हा परत पोवाडे वगैरे... मग गुढीपाडवा. त्याच्याही मिरवणुका. आता आंबेडकर जयंती येइल थोड्या दिवसांत. परत तेच. मग लग्नाचा सीजन. मग श्रावणात दहिहंडी आहेच. नंतर गणपती, नवरात्र, दिवाळी... थोडक्यात काय पब्लिकला रस्त्यावर फु़कटात धिंगाणा घालायला निमित्त हवं असतं. मग ओकेजन काहिही असो. सणांचा अभिमान वगैरे सेकंडरी.

मराठी_माणूस's picture

23 Mar 2015 - 5:07 pm | मराठी_माणूस

एव्हढे कष्ट घेउन सुध्दा ते गुगल वाले ढुंकुन पण बघत नाहीत :)

काळा पहाड's picture

24 Mar 2015 - 4:25 pm | काळा पहाड

आता बघायचं संभाजी ब्रिगेड वाले, पतीत पावन वाले, रामदास आठवले वगैरे गूगलच्या अमेरिकेतल्या हेड ऑफिसवर कधी मोर्चा काढतात ते.

खेडूत's picture

24 Mar 2015 - 9:00 pm | खेडूत

सहमत.
हे सगळे धरून सध्या तीसेक दिवस बिनडोकपणा चालू असतो. याशिवाय आमच्या भागातल्या दोन शैक्षणिक (?) संस्थांचे ग्यादरिंग, माजी विद्यार्थी (?) मेळावा, पदवीदान, क्रीडा महोत्सव आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाचे पुण्य (!) स्मरण धरून वर्षाचे चौसष्ठ दिवस धुमाकूळ ! कुणी नगरसेवक झाला / कसल्या समितीवर गेला तर काढ मिरवणूक.
एव्हढ्यावर झालं म्हणता? छे! वेगवेगळी एफेम च्यानल्स / जाहिरात कंपन्या त्यांचे रियालिटी शोज ट्रकवर संगीत (!)घेऊन दिवसभर बाप मेल्यागत ठो-ठो करत असतात. रुग्ण आणि परीक्षा यांचं भान कुणालाही नाही! कुणाच्या घराजवळ लग्नाची लॉन असेल तर तो गेलाच कामातून!
यामध्ये कंत्राटदार आणि व्यावसायिकांचा काळा पैसा येत असल्याने कारण मिळाले तर वर्षाचे सर्व दिवस उत्सव /मिरवणुका काढू शकतील हे निश्चित. नाचायला येणारे रिकामटेकडे वर्षभर उपलब्ध आहेत.

माहितीतल्या एका व्यक्तीचा इमारत थरथरुन -अति आवाजाने मृत्यू झालेला आहे. झोपमोडीमुळे वाढलेल्या रक्तदाबाचे रुग्ण तर हजारो सापडतील. तुमची चाळीशी उलटल्यावर तुम्ही याचं समर्थन कराल असं वाटत नाही.

बाकी तुम्ही आत्मसात केलेले स्किल कौतुकास्पद आहे, पण ते योग्य प्रकारे वापरण्याची अक्कल सध्या समाजात नाही. तेव्हा कांही वर्षे हे उत्सव दडपशाहीने बंद करणे आवश्यक झाले आहे. न्यायालयाचा आदेश दहा मिनिटे तरी मोडणे हे या विकृत लोकांच्या मोठेपणाचं मोजमाप झालं आहे. उत्सव शिस्तीत आणि ठरलेल्या वेळेत कसे साजरे करतात हे युरोपात कार्निव्हलच्या वेळी पहावे! चांगलं असेल तर दखल आपोआप घेतली जाते !

+१
@हे या विकृत लोकांच्या मोठेपणाचं मोजमाप झालं आहे. >>>
विकृतीच!

टवाळ कार्टा's picture

23 Mar 2015 - 3:47 pm | टवाळ कार्टा

मी मुसलमान नसलो तरी ती बांग मी "गोंगाट" या कॅटेगरीमध्ये नाही पकडणार...त्या बांगेतसुध्धा एक लय असते असे माझे निरिक्षण आहे

बरोबर आहे. ढोल आणि ताशे वाजवायला कुठे लय आणि ताल लागतात, नाही का!! लोक उगाच प्रॅक्टिस वैगरे करतात. घाम आटवतात. वेडे कुठले!! :)

वेल्लाभट's picture

23 Mar 2015 - 4:15 pm | वेल्लाभट

ळॉळ

वेल्लाभट's picture

23 Mar 2015 - 4:14 pm | वेल्लाभट

गाढा अभ्यास दिसतो तुमचा. निरीक्षण कसलं ! :) पण ढोल ताशांचा अभ्यास नाही केलात वाटतं.

सतीश कुडतरकर's picture

24 Mar 2015 - 2:09 pm | सतीश कुडतरकर

त्या बांगेमागे 'लय' नाही हो, सकाळची जोराची 'कळ' असते.

सस्नेह's picture

23 Mar 2015 - 3:45 pm | सस्नेह

फोटो म्हणून छान आहेत.
nuisance च्या बाबतीत वर टका यांच्याशी सहमत.
फटाके दिवाळीत चार दिवस वाजवायला हरकत नाही. पण त्यामुळे कानाचे पडदे फाटण्याइतका आणि एखाद्या आजाऱ्याला अ‍ॅटॅक येण्याइतका मोठा आवाज असू नये.
शिवाय ते जर लग्न, बारसं, वाढदिवस, क्रिकेट मॅच अशा प्रसंगात म्हणून महिन्यातून वीस दिवस वाजू लागले, तर nuisance च तो.

वेल्लाभट's picture

23 Mar 2015 - 3:57 pm | वेल्लाभट

We are simply suffocating our own culture which we have once enjoyed, to let the likes of Responsibility, Open mindedness, Eco-friendliness breathe the very life out of us. - A J Oka

पॉइंट ब्लँक's picture

23 Mar 2015 - 4:56 pm | पॉइंट ब्लँक

एकदम बरोबर. एक परंपरा ह्या लोकंनी जिवंत ठेवली आणि तम्ही फोटोंच्या माध्यमातून ती आमच्यापर्यंत पोचवली ह्याबद्द्ल धन्यवाद.

जेपी's picture

23 Mar 2015 - 4:10 pm | जेपी

हम्म..

उगी आपला एक प्रश्न - शोभायात्रा सकाळी असते.लोक जर शोभायात्रेला येतात तर घरी सैपाक कोण करत ?

मी तर 11 वाजता जेवण करुन मस्त दुपारची झोप काढली.

(शांताता प्रेमी)जेपी

खटपट्या's picture

24 Mar 2015 - 12:13 am | खटपट्या

ढोल ताशे वाजवणार्‍यांना अल्पोपहार मिळत असावा. कारण ने खातापिता एवढा मोठा ढोल उरावर घेउन वाजवणे कठीण आहे.

सतीश कुडतरकर's picture

24 Mar 2015 - 2:15 pm | सतीश कुडतरकर

कधी न दिसणारे सुंदर मुखडे पाहायचे सोडून तुम्हाला जेवण आणि झोप महत्वाची वाटते. नटण्या, मुरडण्यासाठी २-२ तास खपून वेळ वाया घालवला आणि तुम्हाला कौतुकच नाही बघा. कधीतरी डोळे मोठे करून आणि तोंड उघड ठेवून सौंदर्य पाहा जरा.

नववारी साडी वर स्पोर्ट शुज ... हे सौंदर्य पहायला डोळे मिटलेले आणी तोंड बंद पायजे हि..हि..हि

सतीश कुडतरकर's picture

24 Mar 2015 - 4:39 pm | सतीश कुडतरकर

घ्या.
जिकडे बघायचे तिकडे तुमच लक्ष नाही, तुम्ही शूजचे ब्रान्ड बघत बसलाय.

तिकडे लग्नाच्या धाग्यावर आमच जुळत नाही म्हणून बोंबाबोंब चालली आहे लोकांची.

काहीही अन केव्हाही वाजवा. फक्त ध्वनीमर्यादेचा उल्लंघन होऊ देऊ नका.

फोटू आवडले, फेट्याचा लाल रंग आवडला, मात्र टका यांच्याशी थोडीशी सह्मत. भिक्षावळीवरील बंदी, त्या परवानग्या काढणे हे मलाही खटकले. पण लोकही भिक्षावळीला ढणढणाट करायला लागले तर अशा मुंजी सत्राशे साठ होतात. सारखे कुठे सहन करणार! ढोल ताशे मला आवडतात पण वर्षातून एकदा बप्पा विसर्जनाला ठीक आहे. रोज व्हायला लागले तर नको वाटते. दहीहंडी हवी पण ते थर लावून बक्षिसे व त्यातला राजकीय हस्तक्षेप नको म्हणजे हे प्रस्थ होणार नाही. मिरवणुकी, जत्रा, पथके चालतील पण त्यानिमित्ताने वेगळेच लोक हात धुवून घेतात त्याचा त्रास होतो. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, अचरट लोकांचे जमावाने थांबणे, अस्वच्छता, तब्येतीला हानिकारक आवाज, राजकीय हस्तक्षेप नको. यांचा विचार पाहिजे बाकी कै नै.

बाकी शहरांतलं माहीत नाही, पण पुण्यात याचा अतिरेक आहे. विसर्जनादिवशीसुद्धा मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या मिरवणुका बघण्यासारख्या असतात बाकीच्यात काही राम नसतो.

पण आता याला फ्याड ठरवून पार थांबवायच्या गोष्टी होतात तेव्हा खटकतं येवढं नक्की. बाकी चालू देत!! :)

पुण्यात याचा अतिरेक होतो. भयानक सहमत. वर लोक्स विचारतात की पुण्यात जाऊन कोणते गणपती बघू? "अरे बाबांनो जाऊच नका ना!" असे म्हणावेसे वाटते. ;)

वगिश's picture

23 Mar 2015 - 10:02 pm | वगिश

सहमत , पुर्वी जनजागृती,मनोरंजन इत्यादी साठी गणेश मंडळांचा मोठा आधार जनतेला होता, आता घरबसल्या सगळ उपलब्ध असताना त्याची गरज काय? संस्कृती जपण्याचा नावाखाली बहुतांश ठिकाणी जो गोंधळ चाललेला असतो त्याने उलट विचार करनारी जनता संस्कृती पासून दूर तर जात नाही ना याचा विचार व्हायला हवा.

धडपड्या's picture

23 Mar 2015 - 11:31 pm | धडपड्या

आमच्या सुदैवाने गणपती विसर्जनाच्या दिवशी, सकाळी तुळशीबाग आणि रात्री दगडूशेठ साठी वाजवतो.. लैच जबरा फिलींग असतं राव.. हजारो पब्लिकचे डोळे आणि कान आपल्याकडे असतात... मात्र लहान पोरांची, पोरींची सादरीकरण पथकं भाव खाउन जातात...

खटपट्या's picture

24 Mar 2015 - 12:20 am | खटपट्या

गणपतीची मिरवणूक हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. माझी सोसायटी आणि विसर्जनाचे ठिकाण यामधे अर्धा कीलोमीटरचे अंतर आहे. त्यासाठी ८० हजाराचा खर्च करणे कीती बरोबर आहे? याविरूद्ध आवाज उठवल्यावर झूंडशाही वापरण्याचा प्रयत्न झाला. विसर्जनावर होणारा जादा खर्च म्हणजे निव्वळ उधळ्पट्टी आहे.

परवा आमच्या सोसायटीतल्या कोणालातरी कुठल्याश्या मॉलच्या बक्षिसात गाडी मिळाली. ती गाडी हॉर्न वाजवत आणि पुढे मागे ढोल ताशे वाजवत त्याने सोसायटीत आणलीन. ढोल ताशा वाजवण्याएवढं त्याचं काय कर्तृत्व होतं? जर आनंदच साजरा करायचाय तर पेढे वाटा की? दणदणाट कशाला? पण कोण बोलणार ? काळ सोकावतो तो असा.

प्रसाद१९७१'s picture

24 Mar 2015 - 12:59 pm | प्रसाद१९७१

@वेल्ला भट - तुम्हाला मी सज्जन माणुस समजत होतो. तुम्ही तर अगदी सर्वसानान्य माणसाला त्रास देणार्‍या राजकारणी कॅटेगरीतले निघालात.

वेल्लाभट's picture

24 Mar 2015 - 1:45 pm | वेल्लाभट

असं की काय?.... बरं.

नाही हो, इतकेही वाईट नाहीत ते!

इतकेही वाईट नाहीत, म्हणजे थोडेसे वाईट आहेत. असंच ना? ;)

वेल्लाकाका, तुम्ही आपले वर्कआऊटवाले धागे काढत चला हो.

पुरे झाला तुझा आगलावेपणा!
तुझ्यासाठी अज्जूनही स्थळे शोधण्याची ताकद माझ्यात आहे हे विसरू नकोस. ;)
आता उगीच सन्यासच कसा चांगला हे सांगू नकोस.

काळा पहाड's picture

24 Mar 2015 - 4:15 pm | काळा पहाड

सगळे सण.. गणपती, शिवजयंती, दिवाळी, दुर्गाष्टमी, आंबेडकर जयंती, मुहर्रम, फर्स्ट इयर, सगळे बर्थडेज पब्लिक पद्धतीनं साजरे करायला कायद्यानं आणि बळाचा वापर करून बंदी आणली पाहिजे. तुमचा धर्म तुमच्या घरात. रस्त्यावर नको. इथं आधी एक गणपती म्हणजेच फक्त त्रास होता आता सगळ्या सणांना हे बेक्कार लोक डीजे आणि ढोल ताशे घेवून फिरतात. ज्यांना एवढंच नाचायचंय त्यांची रग उतरवायला पोलिसांनी सगळ्यांना परेड करून रस्त्यातले खड्डे भरायच्या आणि ट्रॅफिक मॅनेज करायच्या कामाला जुंपलं पाहिजे. जबरदस्तीनं. डेली त्रास साला.

वेल्लाभट's picture

24 Mar 2015 - 5:25 pm | वेल्लाभट

बरं.
मात्र; तुमच्यासारख्यांनी
१) आताच्या मुलांना काही संस्कृती/परंपरा माहिती नाहीत
२) आमच्यावेळी काय धमाल असायची गणपतीत
३) हे शहरातले सण कसले चार भिंतीतले!
असल्या बोंबा मारायच्या नाहीत हं.

मुळात कुठल्याही साजरीकरणालाच जर विरोध असेल तर मग तुम्ही........

वेल्लाभट's picture

24 Mar 2015 - 5:33 pm | वेल्लाभट

असा विचार जंगलात राहणारी माणसंच करू जाणोत.

आजानुकर्ण's picture

24 Mar 2015 - 6:54 pm | आजानुकर्ण

सहमत. बाकी गूगलमध्ये नवरोजचे डूडल आल्याने आणि गुढीपाडव्याचे न आल्याने 'मराठी माणसाला' नक्की काय फरक पडला आहे बॉ?

अवतार's picture

24 Mar 2015 - 9:40 pm | अवतार

नुसताच आवाज वाढवण्यापेक्षा एकजूट अधिक महत्वाची. ज्याप्रमाणे त्यांचे सण एकाच दिवशी एकाच दिशेला तोंड करून देशभरात साजरे केले जातात तसे आपले किती सण आहेत? स्वत:च्या अनुयायांना एकत्र येण्याची प्रेरणा धर्मच देऊ शकत नसेल तर असले तात्पुरते उपाय योजणे भागच पडते.
नुसता आवाज वाढवून कट्टरता निर्माण करता येत नाही. धर्माधारित राष्ट्रवाद जनतेच्या गळी उतरवण्याआधी मुळात धर्माबद्दल अनुयायांच्या मनात कितपत आदर आहे हे तपासले पाहिजे.
प्रत्येक वेळी इतर धर्मियांच्या आक्रमक वृत्तीच्या भयानेच जर आमचा धर्माभिमान उफाळून येणार असेल तर आमच्या धर्माशी आमचे नेमके नाते काय हा प्रश्न विचारणे अतिशय गरजेचे आहे.

हाफशेंच्युरी निमीत्त फक्त श्री.वेल्लाभट यांचा सत्कार आsssऑsssऑsssआ अशी गर्जना करुन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

चला आजचा कोटा संपला *wink*

वेल्लाभट's picture

24 Mar 2015 - 11:29 pm | वेल्लाभट

हातिजायला. गुढीपाडवा,स्वागतयात्रा,ढोलताशे,आपले सण्,गूगल डूडल इथपासून विषय सज्जनपणा,सत्कार्,सन्यास इथवर गेलाय तर.
जय हो!

उठसुठ म्हणजे निवडणूक जिंकल्यावर, लग्न इत्यादी वेळी पारंपारिक ढोलताशे वाजवून (घेऊन) त्यांची एक्स्क्लुजिविटी गेलीय याचा मलाही त्रास होतो. जातिवंत पथकं त्याबाबत काळजी घेतात हेही नमूद करतो. (जातिवंत म्हणजे काय यावर चर्चा रंगेल अशी अपेक्षा आहेच) पण ज्या पथकांनी बिजनेस म्हणूनच याकडे बघितलंय, त्यांना वाढदिवस काय किंवा शोकसभा काय. ढोलताशे वाजवतील ते. पण हा विषयच वेगळा आहे.

गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेचे फोटो टाकले होते राव ! कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा !?!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 8:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वेल्लाभटच्या मतांशी सहमत आहे. कधीही बघा हिंदुंच्या सणवारांवरच गदा आणायचा प्रयत्न होतो. म्हणे दिवाळीला फटाके फोडु नका. सालं भकाभका सिग्रेटचा धुर काढणार्‍या, गाड्या विनाकारण उडवणार्‍या लोकांकडुन असे सल्ले ऐकले की डोकं फिरतं. हां असं म्हणा की कर्णकर्कश्श आवाजाचे फटाके उडवु नका. ध्वनिप्रदुषण बंदिच्या जागांवर फटाके उडवु नका.. हे ठिक आहे.

एक लिमिटेड सण ठरवा ज्यात मिरवणुका काढायला परवानगी द्या जसं की गणपतीविसर्जन, वीरगर्जना, महाराष्ट्र दिन, संघाची जांबोरी वगैरे. बाकी तोरणाच्या मिरवणुका वगैरे नव्या टाकाउ प्रथा आणु इच्छिणार्‍यांच्या पार्श्वभागावर पोकळ बांबुचे फटके दिले तरी काही हरकत नाही. ते डी.जे. बी.जे. वर बंदी घाला. फक्त पारंपारिक वाद्य हाच एक निकष ठेवा. आणि सर्व धर्मांना समान नियम असु द्या. नाहीतर पुढाकार घेउन पहाटे पहाटे जोरदार आवाजात काकड आरत्या चळवळ सुरु करावी लागेल.

ते मधे एक बातमी वाचलेली संभाजी ब्रिगेडमुळे एका गावात गुढ्या उभारल्या गेल्या नाहीत. आपल्या प्रथा संपवुन टाकायचा हा डाव आहे. हिंदु परंपरांच पालन करायलाच पाहिजे. आपले सण दुसर्‍याला त्रास नं होउ देता साजरे केलेच पाहिजेत.

टवाळ कार्टा's picture

25 Mar 2015 - 10:15 am | टवाळ कार्टा

+१११११११११

सुबोध खरे's picture

25 Mar 2015 - 10:43 am | सुबोध खरे

सर्व धर्मांना समान नियम असु द्या.
शांत आवाजात सनई सह मिरवणूक ठीक आहे. पण ढोल बडवीत लोकांना कानठळ्या बसविण्यात कोणती संस्कृती आहे?
एका विशिष्ट पातळीच्या वर ध्वनी प्रदूषणाला परवानगी देऊच नये. कुणाचाही सण असो बारसे असो कि मयत असो. आणि ध्वनिप्रदूषण केल्यास सज्जड असा दंड म्हणजे दर एक मिनिटाला २५ हजार रुपये सारखा ठेवा. एक तासाला पंधरा लाख रुपये दंड भरून किती लोक संस्कृतीचे रक्षण करू इच्छितात ते तरी पाहू.
ठणठणाट आवाज करणे कोणत्या संस्कृतीत बसते? पारंपारिक संस्कृती म्हणायचे आणि आधुनिक विज्ञानातील उपकरणे वापरून भयानक आवाज करायचा याला संपूर्ण आळा बसला पाहिजे. मग तो मोहरम असो कि गणेशोत्सव.

टवाळ कार्टा's picture

25 Mar 2015 - 10:49 am | टवाळ कार्टा

+११११

जुन्या काळात जेव्हा ढोल वाजवायचे...त्यावेळेस सामान्य जीवनात ध्वनीप्रदूषणाचा त्रास नव्हताच त्यामुळे ढोल कितीही जोरात बडवला तरी त्याचा त्रास तुलनेने कमी असावा

तो मोहरम असो कि गणेशोत्सव.

अगदी, फक्त तथाकथित अल्पसंख्यांकांनी 'आईऽऽऽ, माझं चॉकलेट घेतलंऽऽऽऽ' टाईप भोकांड पसरत रडारड सुरु केली की ती रडारड थांबवून नियम कसे गळी उतरवायचे याचाही बॅक अप प्लान रेडी असला पाह्यजे.