मला आवडलेले ऋतुरंग २०१४

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
3 Jan 2015 - 4:07 pm

हे दिवाळी अंकाचे समीक्षण नाही किंवा जाहीरातही नाही.
मला या अंकात भावलेले लिखाणाचा आकलन लेखा-जोखा म्हणा (फारतर) आहे.
विषय घेतला आहे स्थलांतर
===========================================
अनेक नावाजलेल्या लेखकांचे लेखन सशक्त अनुवादित आहे.
१.गुलजार =रावीपार (विजय पाडळकर)
फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय चटका लावणारी कथा
२. करतारसिंह दुग्गल= माणुसकी(वसंत आबाजी डहा़के)

उपरोक्त कथा आवडल्या पण मला विशेष जाणवलेले तीन सरळ सत्य अनुभव कथन:

१.कुलदीप नय्यर (सियालकोट हून दिल्लीला)
लेखकाने फाळणी जाहीर झाल्यापासून दिल्ली गाठेपर्यंतचे तपशीलवार वर्णन्,सामाजीक स्थित्यंतरे लोकांच्या आपाआपसातील बिघडलेले संबध तर कधी माणुसकीची झुळुक असलेले सुखद प्रसंग तटस्थपणे मांडले आहेत.समारोपाचा परिच्छेद टाकावाच लागेल किमान समजायला !
"हा सगळा प्रकार फार उलथा-पालथ करणारा होता.ऊच्चभ्रू,उच्चशिक्षीत आणि आपल्या व्यवसायात मुरलेल्या मुसलमानांनी पाकिस्तानात जाण्याचा पर्याय स्वीकारला.मागे राहिलेले मुसलमान हे गरीब,अशिक्षीत आणि लघुउद्द्योग करणारे कारागीर होते.पाकीस्तानची मागणी ही सर्व मुसलमानांची असल्याने त्यांनीही उचलून धरली होती.पण ती करताना त्यांच्या हे लक्षात आले नव्हते किंवा त्यांना ते उमगलंही नव्हतं की त्यांना आपल्या पूर्व़जांच्या भूमीचा त्याग करून एका नव्या वातावरणात पुन्हा नव्याने रूजावं लागणार आहे"

२.आखातातील थरार :मिलिंद मनोहर चोबळ
ही एक विलक्षण सत्य-अनुभव आहे सुशिक्षीत व्यक्तीपण कशी धर्मवेडाने (त्यातल्या विशीष्ट पंथाच्या मायाजालाने )कर्मठ आणि कठोर बनते आणि जीवनात एका क्षणी आपल्या धर्मातिरेकाने आपला आणि स्वतःच्या बाळाचा जीव देण्याचा प्रमाद करते (सुदैवाने दोघीही वाचतात) पण झापडबंद विचारसरणीतून बाहेर यायला (तेही ५-६ वर्षांनंतर) कारणीभूत ठरते एक पत्र जे वाचण्याची ईच्छा त्या स्त्रीला ५-६ वर्षांनी होते.त्यातील एक परिच्छेद चांगला "अंजन" घालणारा आहे
३.माझा देश त्यांचा देश (यशवंतराव गडा़ख)
राजकारणातील व्य्क्तीने लिहिलेला लेख असूनही संवेदनशील मन आणि सरकारव्यवस्थेचे अपयश विनाशर्त मान्य करणारा दृष्टीकोण मला जास्त प्रांजळ वाटला.
लेख अदिवासी-बहुल मेळघाटातील भेटीवर आधारीत आहे पण ही दोन अवतरणे मात्र मला अजूनही अंतर्मु़ख करतात.
"मेळघाटहून निघताना अत्यंत वयस्क बाई मला म्हणाली "तुमचा देश दाखवा ना आम्हाला तिला गाव म्हणायचं होतं तिच्या बोलण्याने मी अस्वस्थ झालो...त्या स्त्रीला काय उत्तर देणार ? रस्ते नाही,वीज नाही,फोन नाही,शाळा-दवाखाने नाहीत्,कुपोषणाने लहान मुले दगावतात, गेली ५०-६० वर्षे त्या बाईने गवताच्या साकारलेल्या झोपडीत काढलेत, लाज झाकणं फक्त, अंगावर पाऊस्-पाणी,ऊन्-वारा यांच्याशी टक्कर देत.."
"परिस्थीत घायाळ झालेल्या आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या नवर्‍याला आणि मुलांना सांभाळत,प्रसंगी त्यांचा मार खात्-खात्,सगळ आयुष्य पणाला लावणार्या,समर्पण करणार्या त्या स्त्रीला, स्वातंत्र्य आले,लोकशाही आली,जग आता खूप बदलले आहे,सगळ्या आत्याधुनिक सुवीधा आल्या आहेत हे माहीतच नाही. मी तिला माझा कुठला देश दाखवणार होतो"

=====
तुम्हालाही काही भावले असेल किंवा शिफारसदखल वाटेल ते लिहावे.
मला या विषयावर लिहिते करण्याचा मान वल्लीदांचा आहे
मी यातला तज्ञ नाही एक वाचक याच भूमीकेतून लिखाण आहे चू.भू.दे.घे.

साहित्यिकआस्वादलेखअनुभवशिफारसमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Jan 2015 - 4:27 pm | प्रचेतस

संक्षिप्त पण छान परिचय.
फाळणीच्या विषयावरील लेखाबद्दल तुमच्या तोंडूनच ऐकले होते.

लिहिते झाल्याबद्दल धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jan 2015 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा

छान

बहुगुणी's picture

3 Jan 2015 - 7:16 pm | बहुगुणी

इतरही वाचक त्यांनी वाचलेल्या दिवाळी/ विशेष अंकांबद्दल लिहितील तुम्ही सुरूवात करून दिल्यानंतर, पण तुमच्याकडूनच आणखी वाचायला आवडेल. हा अंक आंतर्जालावर उपलब्ध नाही असं दिसलं (बुकगंगा, ग्रंथद्वार, पुस्तकजत्रा), 'मायबोली'वर आहे पण त्याचं मुखपृष्ठ वेगळं दिसतंय. तोच अंक आहे का? आणि हो, तुम्हाला लिहायला भरीला पाडल्याबद्दल वल्लींचे आभार!

नाखु's picture

5 Jan 2015 - 11:54 am | नाखु

तो out of print दिसतोय :-(

नमस्कार, धन्यवाद माहितीबद्दल,

फाळ्णीबद्द्ल वाचायला फारसं नाही आवडत, फार रडायला येतं म्हणुन नाही वाचत.

तरीपण प्रयत्न करुन पाहेन वाचायचा..

लिहिते झाल्याबद्दल अभिनंदन

नाखु's picture

5 Jan 2015 - 9:04 am | नाखु

बहुगुणी :हा तो नव्हेच.
सूचना स्वागतार्ह. मराठी टंकलेखनात अगदी बिगारीत असल्याने सलग लिहिण्याचा टंकाळा आहे.
पन्नास फक्त: नक्की वाचा. वास्तव कितीही दाहक असलं तरी त्यापासून विन्मुख राहून आपण एका सत्यकथनाला मुकत आहोत हे वाचल्यावरच लक्षात येइल्.(कदाचीत त्यातूनच तुमच्या कथेला पूरक कथाबीज देऊ शकेल)