<<<पंगत नव मीपाकराचीं- भाग २

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
16 Nov 2014 - 4:22 pm

मागील भाग
व्यनी वाचुन मी बसल्या जागी उड्या मारायला चालु केल्या. हुर्रे !! मला संपादक मंडळावर तर
घेत नाहीत , निदान पंगतीच्या आयोजन मंडळावर तर घेत आहेत. संधि का सोडा ?
लगे हात मुविंना होकार कळवला आणी संध्याकाळची वाट पाहु लागलो.

=============================================================================
हे व्हिसी ( व्हिडीओ कॉन्फरन्स) करण म्हणजे आवघड काम होत. कारण ते आमच्या मोबल्यावर होणार नाही.
त्यासाठी एखादा चांगला सायबर कॅफे गाठणे भाग होत.मग लक्षात आल अरे आपला मित्र शेखरच सायबर कॅफे
आहे की,त्याच्या कॅफेत व्हिसीची सोय आहे.सांच्याला त्याच्या कॅफेकडे निघालो.दुरुनच आधी पाहिल ति बया (नेहा)
आहे का ? तिच काय सांगता येत नाय,आधी फक्त मालकीचेच सर्मपण करायची,आजकाल कुणाचही 'सर्मपण' करते.
आत जाऊन केबीन मधे बसलो आणी पिसी चालु करुन मुवि यायची वाट पाहु लागलो.
स्क्रीन वर अचानक सगळा धुर दिसु लागला.हे नक्कीच अआ आसणार.भितीपोटी थंड्गार केबिन मधे घामाचा एक ओघळ
पाठीवरुन खाली का वरी गेला.
पण तिथे मुवि प्रकटले.यांच प्रकटन आस होईल वाटल नव्हत.त्यांनी काय तर नवी सवय चालु केली आहे.
दुसर्या खिडकीत सातमजली हास्याच्या स्मायल्या टाकत अआ आले.सोबत आतेरेकी छाप मशीनगन होती.
मला दोघानीहि पाहीलेले नव्हते.त्यामुळे आधी परवलीचा शब्द विचारुन खात्री करुन घेतली आणी नमस्कार-चमत्कार
करुन आमचा संवाद आखेर चालु झाला.
मुवि "मंडळी, तुम्हाला तर माहीत आहे की मला सत्यनारायण घालयची किती आवड आहे.
या वेळेस मी ठरवल आहे की त्यासोबत एक पंगत हि भरवायची.
माझे काम मीपाकरांच्या मदतीशिवाय पुर्ण होऊच शकत नाही.
आता मी एक एक मुद्दा मांडतो. सगळे मिळुन काथ्था कुटु या.
आणी हि पंगत पुर्ण करु या."
यावर मी आणी गुरुजी दोघानीं माना डोलावल्या ( गुरुजी स्मायली शिवाय काहीच करत नाहित.त्या मुळे ईथे मान
हलवणारी स्मायली कल्पावी).
मुवी"तर पहिला मुद्दा आसा आहे की पंगत कुठे भरवायची ? आता मध्यवरर्ती ठिकाण आमचे डोंबिवली आहे
ते चालेल का ?"
गुरुजि "पंगती भरवणे हा पुण्यनगरीचा इतिहास आहे. त्यामुळे पंगत पुण्यातच होणार.( त वर जास्त जोर होता)
मुवी"आहो पण मला तिथे सगळी तयारी करणे जड जाईल ना ?"
गुरुजी"घाबरु नका सगळी व्यवस्था मी करतो. जागा,सामान सगळ पुरवतो."
आता मुविचांहि नाईलाज झाला.मला हि पुणे जवळ पडल आसत. ठराव २-१ ने पास झाला.
मुवी "आता दुसरा मुद्दा मेनु काय ठेवायचा. माझ्यामते जेपी ने काही काळापुर्वी मस्त शाकाहारी
थाळी बनवली होती तिच ठेवुया. जेपी करेल बल्लवाच काम. काय जेपी ?
मी शॉक.आँ मंजे मला कामाला लावायचा विचार आहे काय नाही नाही विरोध करायलाच हवा.
" ओ ते नाय जमणार आपल्याला.एवढ्या लोकांसाठी थाळी बनवने मंजे खायच काम नाही "
गुरुजी" घाबरु नको जेपी मी तुझ्या हाता खाली दोन तिन मुल देतो.त्याच्यां मदतीने करुन टाक.
त्यात काय आवघड आहे.पुरणाच्या पोळी पेक्षा दुसरा एक गोड पदार्थ मी बनवतो"
शेवटी माझा नाईलाज झाला.ठराव २-१ ने पास.
मुवि"आता तिसरा मुद्दा आसा आहे की कुणाकुणाला बोलवायचे ?पुर्वीच्या पंगतित फक्त सिद्धहस्त लेखकांना बोलवले
होते.पण आता सिद्धहस्त कुणाला म्हणायचे हे कळत नाही"
यावर बराच काथ्था कुटला पण काय सुचना गेल.शेवटी गुरुजी म्हणाले आपण पहिल्या पंगतीला जे आले होते
त्यांना सल्ला विचारु या.
मुवि नि शोध चालु केला.जुन्या पंगतीला जे हजर होत त्यापेकी पिवळा डांबिस काका आजकाल येतात बाकीचे नाही.
मग मुवि नें संपर्क करुन पिडां काकाला व्हिसी मधे पाचारण केले.काका आले, नमस्कार करुन झाला आणी संवाद सुरु.
काका "बोला नवमिपाकरांनो काय काम काढलत ?"
मुवि"काका आम्हाला नवमिपाकराचीं पंगत भरवायची आहे.यावर काही काथ्था कुटत आहोत. एका मुद्दावर आडकलो आहोत
तर जरा सल्ला हवा आहे."
काका" हम्म,बघु काय काथ्था कुटला आहे."
आमी कुटलेला काथ्थ्य काकाकडे सरकवला.
काका निं काथ्था पाहीला आणी भडकले " शिंच्यानो आसला कसला काथ्था कुटला आहे.यात तर कायच मसालाच नाय"
आम्ही घाबरलो एका सुरात ओरडलो " काका ,नया हय हम"
काका"क्या नया हय तुम.चला उठा आणी आंगठे पकडा"
आता मुविचं वय पाहता आणी गुरुजींचि बंदुक पाहता.हे काम मलाच कराव लागणार.मी हाताचा अगंठा पकडुन उभा राहीलो.
काका "अरे, हाताचे नाय मेल्या.पायाचे पकड"
मुवि " काका नया हय वह"
काका" अरे फिर नया हय वह.मय क्या बोल रहा हु तुम क्या बोल रहे हो.मय शिकणे के बारे मे बोल रहा हु"
मी "आहो काका जाऊ द्यानां. शिकतो आहे हळुहळु."
बर्याच वेळाने काका शांत झाले.म्हनाले" बर बोला काय सल्ला हवा ?"
मुवि" काका पंगतिला सिद्धहस्त लेखकानां बोलवायचे आहे.पण कुणाला सिद्धहस्त म्हणावे ते कळत नाही.
काही लोक आपला सिद्धस्तपणा लेखातुन दाखवतात,तर काही प्रतिसादातुन.मग आता कुणाला
सिद्ध्हस्त लेखक म्हणावे."
काका" बस्स आसला छोटा प्रश्न! साला तुम्हा नव्यामिपाकरांना मिसळपाव कश्याशी खातात ते माहित नाही का ? सिद्धहस्तपणा मारा फाट्यावर आणी बोलवा ज्यांना बोलवायचे आहे ते. हॅ हॅ हॅ."
काकानीं एका फट्क्यात मुद्दा सोडवला. ठराव सर्वानुंमते पास.
मुवि"धन्यवाद काका.आपले आभारी"
काका"ते आभार घाला चुलीत.मला एक शिवास रिगल पाठवा.सल्याची फिस म्हणुन.काय हॅ हॅ हॅ !."
मुविनिं ति जबाबदारी घेतली.
आता सगळे मुद्दे संपले होते.पंगतीची तारीख ठरली. गुरुजीनीं निरोपाचे विडे दिले आणी निरोप घेतला.
मी कुटलेला काथ्था पोत्यात भरला.वाया जायला नको.घरी जाऊन दोर वळत बसलो.
भेटु आता पंगतीत.

क्रमशः

पाकक्रियाविडंबनउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारप्रकटनसंदर्भचौकशीविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वप्नज's picture

16 Nov 2014 - 4:27 pm | स्वप्नज

जेपींच्या धाग्यावर पहिला येण्याचे भाग्य लाभले... धन्य जाहलो....

प्रचेतस's picture

16 Nov 2014 - 4:47 pm | प्रचेतस

लै भारी.
मजा आली वाचून.

बाकी अ आ यांचे तोंडी दु दु न घाताल्याबद्दल निषेध.

वल्लीदा-गुरुजींनी आमच्यावर बंदुक उगारली होती,
भिती पोटी लिवल नाय.
आता ग्रिन सिग्नल मिळालय.उद्या पुन्हा वाचा.

सतिश गावडे's picture

16 Nov 2014 - 10:44 pm | सतिश गावडे

अ आ यांचे तोंडी दु दु न घाताल्याबद्दल निषेध.

अ आ यांच्या तोंडात अजुनही दुदु घालावं लागतं? कमालच आहे म्हणायची. ;)

जेप्या, लय भारी लिवलंय. मजा आली.

पंगतीची पूर्वतयारी जोरात चालू आहे तर!

जेपी's picture

16 Nov 2014 - 5:51 pm | जेपी

एक सुचना-
पंगती साठी ड्रेस कोड आहे.ऐनवेळी धोतर नाही मिळाल,माझ्याकडे नववारी नाही.
हे नेसता येत नाही.
आयते घेऊ का शिवलेले आसले प्रश्न मला विचारु नका.

पैसा's picture

16 Nov 2014 - 6:04 pm | पैसा

मस्त! मजेशीर, हलकंफुलकं!

कंजूस's picture

16 Nov 2014 - 6:28 pm | कंजूस

मिसळीचं मी बघतो .

रामदास's picture

16 Nov 2014 - 6:55 pm | रामदास

पण फोडणीचा ठसका लागत नाहीय्ये.
(रिक्तहस्त) रामदास

मुक्त विहारि's picture

16 Nov 2014 - 10:38 pm | मुक्त विहारि

झक्कास...

आवडले....

तुर्तास इतकेच...आज काम जरा जास्तच आहे....

अत्रुप्त आत्मा's picture

16 Nov 2014 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif
==================================
http://www.sherv.net/cm/emoticons/cook/master-chef-cooking-smiley-emoticon.gif
==================================
http://www.sherv.net/cm/emoticons/party/chugger-smiley-emoticon.gif
==================================
पैचान कौन???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2014 - 6:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या भागापेक्षा लेखनाचं स्ट्रक्चर (इकडचं तिकडचं पाहुन) सुधारलंय.
बाकी, पंगतीत अजून काय मजा नाय बघा. असं लेखन कसं खुसखुशीत झालं पाहिजे.

च्यायला, ज्या माणसाचं नाव घेऊ नये सकाळी सकाळी त्यांची आठवण
होते, या निमित्तानं त्यांच्या खयाली पुलावांची आठवण झाली. :)

-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)

पिवळा डांबिस's picture

17 Nov 2014 - 1:10 pm | पिवळा डांबिस

हा खयाली पुलाव पहाण्यात आलाच नव्हता.रेसेपी जरा (सहाजिकच) झणझणीत! धन्यवाद!!!
आता जेपीची पंगत कधी बसतेय ते पाहू

(स्वगत: साधा 'काका तुमीसुद्धा कट्ट्याक या' इतकापण बोलूक गावला नाय हेंका, आणि हे मेले माकां शिवास धाडतले! उगीच देखल्या देवाक दंडवत! इतको काय खुळो नाय मी!!!)
:)

अजया's picture

17 Nov 2014 - 7:22 am | अजया

पण केवढी ही पूर्वतयारी.पंगत बसवुन टाका आता लवकर!!

सूड's picture

17 Nov 2014 - 3:26 pm | सूड

ह्म्म्म!!