विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा....
पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी.
अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून.
काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते. त्यामुळे लाटण्यांचा मारा त्यांना काही प्रमाणात परतवून लावता आला.
अनेक ठिकाणी लाटण्यांवर बंदी घालण्याची पुरुषांची मागणी
महिलांच्या काही मागण्या कोर्टासमोर सादरः
> आठवड्यातून दोन दिवस स्वयंपाक नवऱ्यांनी करावा
> मंगळसूत्र पुरुषांना अनिवार्य करा.
> लग्नानंतर कपाळावर पुरुषांनी टिकली सारखे गोंदून घ्यावे. त्यासाठी लग्न समारंभात नवरा-कप्पाळ-गोंदण असा
कार्यक्रम सामाविष्ट करावा.
> स्त्रीया साडी घालणार नाहीत. शर्ट पँण्ट घालतील.
महिला पोलिसांचा पुरुषांवर लाठीचार्ज. पुरुष जखमी. अनेक पुरुष चंद्रावर जाण्याच्या तयारीत. तेथे घर बांधून राहाणार असल्याची एका पिडीत नवऱ्याची प्रतिक्रीया.
प्रतिक्रिया
23 Oct 2008 - 2:29 pm | विजुभाऊ
तुम्ही गटणे तर नाही ना?
असला कौलारु धागा हा गटण्याचा हातखंडा आहे.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
23 Oct 2008 - 2:36 pm | सखाराम_गटणे™
>>तुम्ही गटणे तर नाही ना?
सांगु शकत नाही
TM पण लावले आहे.
>>अनेक पुरुष चंद्रावर जाण्याच्या तयारीत. तेथे घर बांधून राहाणार असल्याची एका पिडीत नवऱ्याची प्रतिक्रीया.
आम्ही मार खाउ पण चंद्रावर जाणार नाह्ही
सरळमार्गी गटणे
23 Oct 2008 - 2:34 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
महत्वाच्या मागण्या दिसत नाय रे घाशी रामा.
23 Oct 2008 - 4:05 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत....
मास्तर, तो घाशीराम विसरलाय... तुम्हीच मांडा आता त्या मागण्या... :)
बिपिन कार्यकर्ते
23 Oct 2008 - 4:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
> आठवड्यातून दोन दिवस स्वयंपाक नवऱ्यांनी करावा
> मंगळसूत्र पुरुषांना अनिवार्य करा.
> लग्नानंतर कपाळावर पुरुषांनी टिकली सारखे गोंदून घ्यावे. त्यासाठी लग्न समारंभात नवरा-कप्पाळ-गोंदण असा कार्यक्रम सामाविष्ट करावा.
> स्त्रीया साडी घालणार नाहीत. शर्ट पँण्ट घालतील.
सु(?)दैवानी मी त्या वेळी माझ्या नवर्याची बाजू घेऊ शकेन, अर्धा स्वयंपाक तो करतो, मी मंगळसूत्र घालत नाही, कपाळावर काही ठेवत नाही आणि माझ्या (इतर काही सुटसुटीत कपड्यांऐवजी) साडी नेसण्यावर पहिला आक्षेप माझ्या नवर्याचा असतो.
बाकी हे का चाललं आहे ते लिहिलं असतंत तर बरं झालं असतं.
23 Oct 2008 - 6:14 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
घरी आल्यावर आंघोळ करावी. भय्या लोकांचे वास घरात नको.