त्रिवेणी हा एक अनोखा काव्यप्रकार. चारोळ्या चार ओळींच्या तसे त्रिवेणी, हायकू तीन ओळींचे. त्यातही हायकूतल्या प्रत्येक ओळीतल्या अक्षरांच्या संख्येवर बंधन. कवीश्रेष्ठ गुलजारांच्या काही त्रिवेणींचा शांताबाई शेळक्यांनी केलेला अनुवाद आंतरजालावर वाचनात आला. 'साखळी हायकू' या आंतरजालीय खेळात सहभागी झालो होतो, तेव्हा त्रिवेणी जवळून पहायला व हाताळायला मिळाल्या. तेव्हा रचलेल्या काही त्रिवेणींची 'वेणी' येथे अर्पण करीत आहे.
*****************************
वाचून लोकसत्तेतल्या पुराच्या बातम्या
कोरडेटाक पडतात हल्ली डोळे
सरकार थोडंच कधी कुठे वाहून जातं?!
*****************************
जुन्या शर्टाच्या खिशात सापडली
रस्त्यावरची दोन-चार सुगंधी फुलं
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
*****************************
ठाऊक होतं येईल पत्र तुझं फक्त आजच
त्यातल्या संवादानंतर चालू होणार माझं आत्मवृत्त
इतकी कशी ही शांतता बोलभांड?!
*****************************
कुरूप वेडं बदकपिलू एका तळ्यातलं
गुंगलंय राजहंस व्हायची वाट बघण्यात
पण शेवटी हिणवणारच सगळे 'अल्पसंख्यक' म्हणून!
*****************************
प्रतिक्रिया
16 Oct 2008 - 12:26 am | प्राजु
मस्त आहे हा प्रकार..
एकदम आवडून गेला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Oct 2008 - 12:27 am | मुक्तसुनीत
आवडल्या. कमी शब्दात नेमका आशय.
16 Oct 2008 - 1:43 am | लिखाळ
शर्टाच्या खिशातली फुलं फारच सुगंधी आहेत.
वेणी आवडली.
--लिखाळ.
16 Oct 2008 - 4:01 am | धनंजय
जपानी हायकूपेक्षा खूपच वेगळा प्रकार.
सगळ्यात मोठा धोका आहे उथळ "बों मो" किंवा "एपिग्रॅम" होण्याचा.
बहुतेक त्रिवेण्यांत हा धोका टाळला आहे, आणि थोड्या शब्दांत खूप आशय सांगितला आहे.
16 Oct 2008 - 9:46 am | ऋषिकेश
वा !एक एक त्रिवेणी म्हणजे आशयघन कविताच आहे..
अतिशय सुंदर. दुसरी तर फारच आवडली :)
इथे दिल्याबद्दल धन्यु!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
16 Oct 2008 - 9:52 am | पद्मश्री चित्रे
या काव्यप्रकारात पहिल्या दोन ओळी परस्परांना पूरक असतात.
तिसर्या ओळीत 'ट्वीस्ट" -अनपेक्षीत वळण असते..
ते जितके छान तितकी चारोळी खुलते...
मला तिसरी चारोळी खुप आवडली
16 Oct 2008 - 9:58 am | बेसनलाडू
माझ्या माहितीप्रमाणे तिसरी ओळ 'ट्विस्ट्' वाली नसली आणि पहिल्या दोन ओळी 'उचलून धरणारी' असली तरी चालते. पहिल्या दोन ओळी परस्परपूरक हे अगदी बरोबर. पण तिसर्या ओळीबद्दल अधिक माहितीचा दुवा सापडल्यास शोधतो.
(दुवादार)बेसनलाडू
16 Oct 2008 - 10:03 am | पद्मश्री चित्रे
मी तरी असंच वाचल होतं असं वाटतं. गुल्हार यांच्या त्रिवेणी संबंधात्.पण दुवा मिळा तर द्या या बाबतीत.
16 Oct 2008 - 10:13 am | बेसनलाडू
हा पहा.
गुलजार यांनी इतकी सुंदर व्याख्या केली आहे त्रिवेणीची, मजा आ गया!
येथे गुलजार यांनीच म्हटल्याप्रमाणे -
त्रिवेणी न तो मसल्लस है,ना हाइकू,ना तीन मिसरों में कही एक नज़्म। इन तीनों ‘फ़ार्म्ज़’में एक ख़्याल और एक इमेज का तसलसुल मिलता है। लेकिन त्रिवेणी का फ़र्क़ इसके मिज़ाज का फर्क है। तीसरा मिसरा पहले दो मिसरों के मफ़हूम को कभी निखार देता है,कभी इजा़फा करता है या उन पर ‘कमेंट’ करता है। त्रिवेणी नाम इस लिये दिया गया था कि संगम पर तीन नदियां मिलती हैं। गंगा ,जमना और सरस्वती। गंगा और जमना के धारे सतह पर नज़र आते हैं लेकिन सरस्वती जो तक्षिला(तक्षशिला) के रास्ते बह कर आती थी,वह ज़मीन दोज़ हो चुकी है। त्रिवेणी के तीसरे मिसरे का काम सरस्वती दिखाना है जो पहले दो मिसरों में छुपी हुई है।
(दुवादार)बेसनलाडू
16 Oct 2008 - 10:33 am | मनिष
बेला -- सगळ्याच त्रिवेणी मस्त आहे!
आणि गुलजारची व्याख्या - अप्रतिम!!!!!!!!!!!!
अजून लिहिल्या असशील तर इथे लिही ना!
16 Oct 2008 - 9:56 am | अनिल हटेला
शर्टाच्या खिशातली फुलं फारच सुगंधी आहेत.
वेणी आवडली!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Oct 2008 - 9:58 am | सहज
हा प्रकार आवडला.
पहीली, शेवटची त्रिवेणी [सगळ्याच म्हणा] मस्त!!
16 Oct 2008 - 10:16 am | नंदन
सार्याच त्रिवेणी आवडल्या.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Oct 2008 - 10:37 am | आनंदयात्री
छान आहेत हायकु. सगळे आवडले.
हायकुला मराठीत त्रिवेणी म्हणतात हे पहिल्यांदा कळाले.
16 Oct 2008 - 10:50 am | बेसनलाडू
तीन ओळी या सांगाड्याव्यतिरिक्त रचनात्मक दृष्टीने (येथे पहिल्या दोन ओळींत काय हवे, तिसरीत काय इ. विचारात घेतले नाही; तर फक्त फॉर्म फ्याक्टर विचारात घेतला आहे) हायकू != त्रिवेणी. हायकूच्या पहिल्या व तिसर्या ओळींत पाच अक्षरे आणि मधल्या ओळीत सात अक्षरे हवीत. तसेच हायकूमध्ये वापरण्यात येणारे शब्द हे सामान्य, प्रमाणभाषेतील अगर बोलीभाषेतील असून चालत नाहीत; तर ते खास काव्यात्मक (कविता स्पेशल छापाचे जसे तुला ऐवजी तुज, मला ऐवजी मज यासारखे) शब्द असले पाहिजेत, असे आहे. त्रिवेणीमध्ये असे काही बंधन नाही.
(स्पष्टीकारक)बेसनलाडू
16 Oct 2008 - 11:21 am | आनंदयात्री
हायकु:
आत्मचरित्रं
टिका समिक्षा लिही
बेसनलाडु
त्रिवेणी:
जुन्या इमेल्स चाळतांना सापडले
काही बोचरे शब्द अन आरोपांच्या फैरी
माझ्या खांद्यावर डोकं ठेवून चालली होतीस कधी काळी
बरोबर का शेठ ?
16 Oct 2008 - 11:25 am | बेसनलाडू
बरोबर!
एक सुधारणा -
जुन्या इमेल्स चाळतांना सापडले
काही बोचरे शब्द अन आरोपांच्या फैरी
माझ्या नावाने कविता लिहून चालवली होतीस गोळी कधी
(शिकारी)बेसनलाडू
16 Oct 2008 - 11:26 am | आनंदयात्री
ठ्याssssssssss
=)) =)) =))
लै भारी बेला राव !!! तोडलत तोडलत तुम्ही !!
साला मजा आ गया .. यु मेड माय डे !!
16 Oct 2008 - 12:17 pm | घाटावरचे भट
दूरच्या प्रवासाला निघताना मनात
सलत होते सतत काहीतरी...
आईच्चा घो, ति़कीट विसरलो वाटतं!!!
(आचरट) भटोबा
16 Oct 2008 - 12:31 pm | आनंदयात्री
जवळच्या सहवासाला निघताना मनात
सलत होते सतत काहीतरी...
आईच्चा घो, टोपी विसरलो वाटतं!!!
-
(दहा आचरट) आंद्या
(अवांतरः अन त्यांचा वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आजच्यापुरता सुटला होता असे टाकले की चारोळी पण होईल ;) )
16 Oct 2008 - 11:02 am | दत्ता काळे
त्रिवेणी, अप्रतिम. . .
मला हायकूवरून, रॉय किणीकरांच्या रुबायांची आठवण झाली.
रुबायांमध्येसुध्दा ओळींची संख्या मर्यादीत असते, पण शेवटी बहुतेकवेळा यमक जुळवलेले असते.
16 Oct 2008 - 11:22 am | रामदास
ही नवी कृती करून बघतो.(पॉवर पॅक्ड काँपॅक्ट )डायनामाईट आहे.
धन्यवाद
16 Oct 2008 - 11:56 am | स्वाती दिनेश
सगळ्याच त्रिवेणी आवडल्या रे बेला..
स्वाती
17 Oct 2008 - 3:53 pm | विसोबा खेचर
सर्व त्रिवेण्या सुंदर आहेत...!
अजूनही वाचायला आवडतील..
तात्या.
17 Oct 2008 - 4:46 pm | अवलिया
ज्याच्या असण्या नसण्याची ना फिकिर कधी
पाहुनी त्याची जाहिरात दुरचित्रवाणी मधी
ऑ ! ये तो बडा Toing है!!
(पहीलाच प्रयत्न आहे. संभाळून घ्या)
17 Oct 2008 - 4:58 pm | विजुभाऊ
असाच एक प्रयत्न आम्हीही एकत्रीतपणे केला होता
सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी http://misalpav.com/node/1108
यात धमाल रावानी लग्न होण्याच्या अगोदर एक मस्त चारोळी/तीरोळी पाडलेली आहे.
मजा आला होता.:)
आणि चारोळी वर एक व्याख्या या इथे
चारोळी म्हणजे http://misalpav.com/node/1079 या इथे आहे.