दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा”

विटेकर's picture
विटेकर in जनातलं, मनातलं
14 Feb 2014 - 12:41 pm

दासनवमीच्या निमित्ताने श्री समर्थ चरित्राचा अभ्यास व्हावा म्हणून काही प्रश्न काढले आहेत , त्यातील पहिले २५ प्रश्न :
१ श्री समर्थांचे पूर्ण नाव काय ?
२ श्री समर्थांच्या मातोश्रींचे नाव काय ?
३ श्री समर्थांचा जन्माचा वार, तिथी व शालिवाहन शक कोणते ?
४ श्री समर्थांचे जन्मगाव कोणते ?
५ श्री समर्थांच्या जन्मगावी असणार्‍या नदीचे नाव काय ?
६ बखरीप्रमाणे श्री समर्थांना रामरायचा अनुग्रह केव्हा झाला ते शालिवाहन शक कोणते ?
७ आजही समर्थांच्या लग्नावेळचे बोहले दाखवण्यात येते, ते गाव कोणते ?
८ श्री समर्थांची नियोजित वधू कोणाची मुलगी व तिचे नाव काय ?
९ श्री समर्थांनी विवाहमंडपातून पलायन केले ते शालिवाहन शक कोणते ?
१० श्री समर्थ नाशिकला पंचवटीत आले ते शालिवाहन शक कोणते ?
११ श्री समर्थांचे साधनास्थळ कोणते ?
१२ तेथे कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे ?
१३ साधंनास्थळी श्री समर्थांनी स्वहस्ते लिहिलेला सध्या उपलब्ध असलेला ग्रंथ कोणता ?
१४ साधनास्थळी श्री समर्थांनी कोणत्या मंत्राचे पुरश्चरण केले ?
१५ श्री समर्थांनी साधनाकाळात केलेल्या रचना कोणत्या ?
१६ करुणाष्टकांची रचना कोणत्या मंदिरात झाली ?
१७ समर्थांचा पहिला शिष्य कोण ?
१८ समर्थ स्थापित पहिला मारुती कोठे आहे ?
१९ त्याच्यासाठी रचलेले प्रसिद्ध स्तोत्र कोणते ?
२० टाकळीतील वास्तव्यात ग्रंथलेखनात कोणाचे साहाय्य झाले ?
२१ समर्थांनी दसपंचक गावच्या कुलकर्ण्याचे प्रेत उठवले या घटनेचे शालिवाहन शक कोणते ?
२२ समर्थांना ‘रामदास’ हे नाव कोणी दिले ?
२३ समर्थांनी भारतभ्रमणास प्रारंभ कोठून केला ?
२४ समर्थांच्या साधनेचा कालावधी किती वर्षे ?
२५ समर्थांच्या भारतभ्रमणाचा कालावधी किती वर्षे ?

माहीत असलेली उत्तरे प्रतिसादात लिहायला हरकत नाही.
वास्तविक सर्वच संतांच्या/ महापुरुषांच्या चरित्रांचा अभ्यास या पद्धतीने व्हायला हवा. .. (परिप्रश्नेन सेवया.. )
संदर्भासाठी पुस्तके :-
१. दासायन - श्री, अनंतदास रामदासी
२. त्रि खंडात्मक समर्थ चरित्र - नानासाहेब देव
३. समर्थ चरित्र - सं ख आळतेकर
दासनवमी ( २४ /०२/२०१४) नंतर उत्तरे www.dasbodhabhyas.org येथे मिळतील , पण तत्पूर्वीच येथे उत्तरे मिळतील अशी खात्री वाटते .
जय जय रघुवीर समर्थ !

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

आतिवास's picture

14 Feb 2014 - 1:07 pm | आतिवास

कल्पना चांगली आहे.
कदाचित असेच प्रश्न समर्थांच्या विचारांवर/ग्रंथावर आवडतील मला. करुणाष्टक कुठे रचले गेले यापेक्षा त्यात काय आहे हे कदाचित मला जास्त रोचक वाटेल जाणून घ्यायला. आपापली आवड - उणेदुणे काही नाही त्यात!
अर्थातच चरित्र अभ्यासाला विरोध नाही.
अवांतरः 'पत्रद्वारा दासबोध' उपक्रमाची आठवण झाली. तो अजून चालू आहे का?

श्री ग्रंथराज दासबोध अभ्यास हा उपक्रम सुरु आहे , आता तो ई-मेल्द्वारे ही करता येतो.
www.dasbodhabhyas.org येथे पूर्ण माहीती आहे.

समर्थांच्या विचारांवर/ग्रंथावर ..

अशा प्रकारचा अभ्यासक्रम अतिशय क्लिष्ट होतो आणि फार लोक त्यात टि़कत नाहीत. फार तत्वज्ञान झेपत नाही. केवळ दासबोधावरच दोन अभ्यासक्रम आहेत, एकाचा तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे ३ वर्षाचा आहे ( त्यातही लोक तिसर्‍या वर्षापर्यन्त पोहोचत नाहीत ) आणि दुसरा " दासबोध सखोल अभ्यास " आठ वर्षाचा आहे. तो पूर्ण करणे महाकर्म कठीण आहे. समर्थांचे एकूण वाड्मय ३५००० ओव्यांचे आहे ! शिष्यांचे लेखन वेगळेच !
ते सगळे अभ्यासणे सोडा, वाचणे देखील अवघड आहे.
त्यातल्या त्यात आम्हा सामान्य जनांसाठी चरित्राचा अभ्यास करणे सोपे ! महापुरुषांचे जीवन हाच एक ग्रंथ असतो, आअनि समर्थांसारख्या महापुरुषाचे चरित्र तर पुरुषार्थ आणि समाजाभिमुख कर्मयोगासाठी प्रवृत्त करते,अश्या महापुरुषांची चरित्रे सार्वाकालिक दीपस्तंभासारखी असतात म्हणून चरित्राचा अभ्यास !

प्रसाद गोडबोले's picture

15 Feb 2014 - 12:24 pm | प्रसाद गोडबोले

अशा प्रकारचा अभ्यासक्रम अतिशय क्लिष्ट होतो आणि फार लोक त्यात टि़कत नाहीत. फार तत्वज्ञान झेपत नाही. केवळ दासबोधावरच दोन अभ्यासक्रम आहेत, एकाचा तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे ३ वर्षाचा आहे ( त्यातही लोक तिसर्‍या वर्षापर्यन्त पोहोचत नाहीत ) आणि दुसरा " दासबोध सखोल अभ्यास " आठ वर्षाचा आहे. तो पूर्ण करणे महाकर्म कठीण आहे. समर्थांचे एकूण वाड्मय ३५००० ओव्यांचे आहे ! शिष्यांचे लेखन वेगळेच !
ते सगळे अभ्यासणे सोडा, वाचणे देखील अवघड आहे.

मलाही वारंवार हेच जाणवतं राहिलं आहे ... खरेतर हे सारे ब्रह्मचर्य आश्रमात अर्थात शालेत असतानाच वाचुन व्ह्यायला पाहिजे होते तेव्हा केवळ "पोट भराव्याची विद्या" शिकत राहिलो आणि आता प्रपंचात पडल्यावर अजिबात वेळ होत नाही ... नोकरी ही आता आठ तासाची राहिलीनसुन १२-१४ तासांची झाली आहे , शिवाय प्रपंच सोडुन परमार्थ करणे हे समर्थांनाही आवडणार नाही ....
शिवाय नुसते वाचन करुनही काही उपयोग नाही .... अनुभव महत्वाचा ... त्यासाठी वेळ दिला पाहिजे
....
काहीतरी सुवर्णमध्य काढला पाहिजे ...

प्यारे१'s picture

14 Feb 2014 - 1:13 pm | प्यारे१

१ श्री समर्थांचे पूर्ण नाव काय ? - नारायण सूर्याजीपंत ठोसर
२ श्री समर्थांच्या मातोश्रींचे नाव काय ? -
३ श्री समर्थांचा जन्माचा वार, तिथी व शालिवाहन शक कोणते ? - रविवार, नवमी
४ श्री समर्थांचे जन्मगाव कोणते ? -जांब, औरंगाबाद
५ श्री समर्थांच्या जन्मगावी असणार्‍या नदीचे नाव काय ?
६ बखरीप्रमाणे श्री समर्थांना रामरायचा अनुग्रह केव्हा झाला ते शालिवाहन शक कोणते ?
७ आजही समर्थांच्या लग्नावेळचे बोहले दाखवण्यात येते, ते गाव कोणते ?
८ श्री समर्थांची नियोजित वधू कोणाची मुलगी व तिचे नाव काय ?
९ श्री समर्थांनी विवाहमंडपातून पलायन केले ते शालिवाहन शक कोणते ?
१० श्री समर्थ नाशिकला पंचवटीत आले ते शालिवाहन शक कोणते ?
११ श्री समर्थांचे साधनास्थळ कोणते ? - टाकळी नाशिक
१२ तेथे कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे ?
१३ साधंनास्थळी श्री समर्थांनी स्वहस्ते लिहिलेला सध्या उपलब्ध असलेला ग्रंथ कोणता ?
१४ साधनास्थळी श्री समर्थांनी कोणत्या मंत्राचे पुरश्चरण केले ? -गायत्रीमंत्र आणि श्रीराम जयराम जयजयराम
१५ श्री समर्थांनी साधनाकाळात केलेल्या रचना कोणत्या ? - करुणाष्टके, चौपद्या
१६ करुणाष्टकांची रचना कोणत्या मंदिरात झाली ? -काळाराम मंदिर, नासिक
१७ समर्थांचा पहिला शिष्य कोण ? -उद्धव स्वामी
१८ समर्थ स्थापित पहिला मारुती कोठे आहे जवळ्?- चाफळ जवळ?
१९ त्याच्यासाठी रचलेले प्रसिद्ध स्तोत्र कोणते ? -भीमरुपी महारुद्रा
२० टाकळीतील वास्तव्यात ग्रंथलेखनात कोणाचे साहाय्य झाले ? - कुलकर्णी
२१ समर्थांनी दसपंचक गावच्या कुलकर्ण्याचे प्रेत उठवले या घटनेचे शालिवाहन शक कोणते ?
२२ समर्थांना ‘रामदास’ हे नाव कोणी दिले ? -मारुती
२३ समर्थांनी भारतभ्रमणास प्रारंभ कोठून केला ? -नासिक
२४ समर्थांच्या साधनेचा कालावधी किती वर्षे ? - २४ वर्षे
२५ समर्थांच्या भारतभ्रमणाचा कालावधी किती वर्षे ? -१२ वर्षे

मृगनयनी's picture

14 Feb 2014 - 1:24 pm | मृगनयनी

शिवगुरु समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव- नारायण सूर्याजीपन्त ठोसर. आईचे नाव- राणुबाई सूर्याजीपन्त ठोसर. समर्थ रामदासांनी लिहिलेला ग्रन्थ- दासबोध!.. आणि "मनाचे श्लोक".
शिवगुरु समर्थ रामदास स्वामींची नियोजित वधू ही त्यांच्याच सख्ख्या मामाची मुलगी होती.

ते जन्म साल इसवीसनानुसार १६०८ आहे. शालिवाहन शक माहिती नाही ब्वा. (काहीतरी ७०-८० वर्षांचा फरक असतो ना?)
बोहल्यावरुन पलायन नि नाशिक आगमन इसवीसन १६१६ (८ व्या वर्षी) शालिवाहन शक माहिती नाही ब्वा.
नद्यांच्या संगमातली एक नदी गोदावरी फिक्स आहे. दुसरी तापी आहे का?
समर्थ स्वलिखित 'अकरा लघुकाव्यं' असावा.

(वरची सगळी उत्तरं कॉप्या न करता दिली आहेत)

गोदावरी आणि दारना या नद्यांचा संगम टाकळी येथे आहे.

मला वाटते जांब समर्थ ,तालुका - घनसावंगी ,जिल्हा- जालना

कवितानागेश's picture

14 Feb 2014 - 1:17 pm | कवितानागेश

नाई माहित.. :(

ज्ञानव's picture

14 Feb 2014 - 1:58 pm | ज्ञानव

श्री नारायणराव बोहल्यावरून पळून गेल्या कारणाने त्या वधूचे पुढे काय झाले?

मोठे भाऊ गंगाधर पंत ठोसरांना नारायणाची ग्यारन्टी नव्हतीच. आईच्या आग्रहापोटी नारायण बोहल्यावर उभा राहिला होता. संध्याकाळचा मुहूर्त होता. जसं सावधान म्हटलं गेलं हा बाबा पसार. तेव्हा गंगाधरपंतांनी तिथेच दुसर्‍या एका मुलाला उभं करुन त्या मुलीचं लग्न लावून दिलं.

हा भाग प्रक्षिप्त आहे. शोधल्यास मिळेल. :)

तेव्हा गंगाधरपंतांनी तिथेच दुसर्‍या एका मुलाला उभं करुन त्या मुलीचं लग्न लावून दिलं.

याला काही आधार आहे का? मी दोन तीन ठिकाणी त्या मुलीने विहिरीत जीव दिला असं वाचलं आहे. अर्थात माझ्याकडे काही तसा संदर्भ नाही.

प्यारे१'s picture

14 Feb 2014 - 2:33 pm | प्यारे१

सुनिल चिंचोलकर हे समर्थ रामदास (आणि स्वामी विवेकानंद) : व्यक्ती आणि त्यांचे समग्र साहित्य ह्यांचे अथॉरिटी मानले जातात.
त्यांचा संपर्क क्रमांक व्यनि करतो आहे. त्यांच्या पुस्तकात/ व्याख्यानात वाचलं/ऐकलं आहे.

धन्या's picture

14 Feb 2014 - 2:38 pm | धन्या

आता उत्कंठा चाळवलीच आहे तर मी ही संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करतो.

विटेकर's picture

14 Feb 2014 - 3:56 pm | विटेकर

Sunil Chincholkar" ,

जरुर शोध घ्या, अभ्यास करा. त्यासाठी तर हा प्रश्न मंजुषेचा आटा-पिटा !

मदनबाण's picture

14 Feb 2014 - 2:16 pm | मदनबाण

सुंदर उपक्रम ! :)
वाचतो आहे...

मला आवडलेला स्वामींचा एक श्लोक इथे देतो...

मदें डोलसी बोलसी साधुवॄंदा |
कसें हीत तूं नेणसी बुद्धिमंदा ||
रिकामाचि तूं गुंतशी वाउगा रे |
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||

संदर्भ :- || राम मंत्राचे श्लोक ||

मध्यंतरी एका पुस्तकात कथेच्या माध्यमातून समर्थांच्या नियोजित वधूचे भावविश्व चितारलेले आठवतंय.

त्या मुलीने नंतर विहीरीत जीव दिला हे खरं आहे का?

धन्या's picture

14 Feb 2014 - 2:28 pm | धन्या

मनाच्या श्लोकांमधले मृत्यूबद्दलचे चार पाच श्लोक दहा पंधरा दिवस सतत ऐकले की "आपण एक दिवस मरणार" आहोत ही जाणिव मनात पक्की होते. :)

धन्या's picture

14 Feb 2014 - 2:37 pm | धन्या

मना सांग पां रावणा काय जालें ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडालें ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं ।
बळे लागला काळ हा पाठिलागीं ॥ १३ ॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥

मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥ १५ ॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥

यातील "कर्मयोगे जन्म होतो " आणी "मागुता जन्म घेते" एव्हढा भाग सोडला तर बाकीचा भाग लाख मोलाचे शब्द आहेत.

विअर्ड विक्स's picture

14 Feb 2014 - 2:37 pm | विअर्ड विक्स

अशी जाणीव _____ विचार मंचावरील वाचनानंतर होते...

मी फक्त दासबोध वाचलय त्यामुळे पास . पण तुम्ही मागे खफ वर प्रश्नमंजुषेची pdf फाईल लिंक दिले होती . ती उतरवुन मामाला दिली आहे . त्यांच चालु आहे सोडवण .

अर्धवटराव's picture

14 Feb 2014 - 11:14 pm | अर्धवटराव

समर्थ...बस्स नाम हि काफि है.

भौतेक प्रश्नांची उत्तरे वर दिली गेलीच आहेत. पैकी बहुतेक माहिती होते, तर काही नव्याने कळाले. उर्वरित प्रश्नांच्या उत्तरांच्या अपेक्षेत.

बाकी, समर्थांनी टाकळी गावी राहून पुरश्चरण केले ते १२ वर्षे अन ते संपल्यावर भारतभ्रमण केले तेही १२ वर्षेच असे वाचले आहे.

बहे बोरगाव अन चाफळ येथील मारुतीस गेलो होतो ते आठवले. कृष्णेतील बेटावरचा हा मस्त मोठा मारुती आहे. शंकराच्या देवळातील नंदीचे शिल्पही वैशिष्ट्यपूर्ण आहे. चाफळची गुहा पाहून अंमळ जीएंच्या कथेतील स्वामी नामक कथेची आठवण आली होती, तदुपरि तेथील मंदिराचा जीर्णोद्धार करून बांधलेले नवीन मंदिर मस्त आहे. वल्लीला आवडलं असतं. लै शिल्पे आहेत-व्याल इ.इ. खच आहे नुस्ता.

शशिकांत ओक's picture

15 Feb 2014 - 11:04 pm | शशिकांत ओक

मित्रा,
मध्यंतरी आपण मला तमिळ भाषेच्या लिपीमध्ये लिहिलेले ताडपट्टीवर लेखन वाचायला सहज जमेल असे म्हणून त्या लिपीच्या ताडपत्रावरील लेखनाचा फोटो सादर करण्यासाठी म्हणून विचारणा केली होती. आपल्या वरील प्रतिसादातून तमिळ लिपीमध्ये अक्षरे वाचायला मिळाली. त्यावरून आठवून विचारावेसे वाटले की माझ्याकडून सादर केलेल्या पुराव्यातील लिखाण आपल्या माहितीच्या तमिळ भाषेच्या तज्ज्ञांनी वाचून आपल्याला त्यातील लेखनाबद्दल माहिती करून दिली असेल...
नसल्यास आणखी किती काळ लागेल असे ते म्हणतात?
तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून अधिक अभ्यास करायला आपण मदत करायला पुढे याल अशी अपेक्षा करतो...

उद्धव गोसाव्यासंबंधी संभाजी महाराजांनी सज्जनगडाच्या किल्लेदारास लिहिलेले अस्सल पत्र आठवले.

शशिकांत ओक's picture

16 Feb 2014 - 12:08 am | शशिकांत ओक

असे काय लिहिले होते त्या अस्सल पत्रात?

समर्थांनी सज्जनगडावरील काही एक व्यवस्था भानजी व रामाजी गोसावी यांजकडे सुपूर्द केल्या. त्यासाठी छत्रपती शिवाजी आणि तद्नंतर संभाजीराजांनाही त्याला अनुदान चालूच ठेवले. समर्थांच्या मृत्युनंतर मात्र उद्धव गोसाव्याने द्रव्यलोभासाठी कटकटी सुरु केल्या. उद्धवास सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर हा सुद्धा सामील झाला. ह्या गोष्टी कानावर जाताच संभाजीराजांनी २/६/८२ रोजी जिजोजी काटकरास आज्ञापत्र लिहिले. त्याचा मूळ मायना पुढीलप्रमाणे.

श्री स्वामी अवतार पूर्ण करण्यागोदरच आज्ञा केली होती. ऐसे असतां उधव गोसावी उगीच द्रव्यलोभास्तव भानजी व रामाजी गोसावी यांसी कटकट करितांत, तुम्ही ही उधव गोसावी यांशी द्रव्ये, पात्रें व वस्त्रे भानजी व रामाजी गोसावी यांकडून श्री स्वामींची देवविली म्हणोन कळू आले. तरी तुम्हांस ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उधव गोसावी यासी कटकट गरज काये. याउपरि जे जे वस्त्राभाव व द्रव्य उधव गोसावी याचे आधीन तुम्ही करविले ते मागतें भानजी व रामाजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करो न देणे. श्री स्वामीची पहिलीच आज्ञा करणे...वेदमूर्ति दिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे तों होईल...या उपरि ये घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामीच्या समुदायांसी काडीइतके अंतर पडो न देणे...या पत्राप्रमाणे राहाटी करणें.

अर्धवटराव's picture

16 Feb 2014 - 11:26 am | अर्धवटराव

शिव-समर्थ आजन्म एका हिमालयाएव्हढ्या उद्देशाकरता रक्त आटवत राहिले... आणि त्यांच्या चितेची राख शांत होते न होते तो त्यांच्या गादीला सुरंग लागले... अगदी त्यांच्या इन्नरमोस्ट सर्कलच्या लोकांकडुन :(

भटक्य आणि उनाड's picture

20 Feb 2014 - 11:13 pm | भटक्य आणि उनाड

१ श्री समर्थांचे पूर्ण नाव काय ? - नारायण सूर्याजीपंत ठोसर
२ श्री समर्थांच्या मातोश्रींचे नाव काय ? - राणुबाई सूर्याजीपन्त ठोसर.
३ श्री समर्थांचा जन्माचा वार, तिथी व शालिवाहन शक कोणते ? - रविवार, नवमी
४ श्री समर्थांचे जन्मगाव कोणते ? -जांब, औरंगाबाद
५ श्री समर्थांच्या जन्मगावी असणार्‍या नदीचे नाव काय ? पूर्णा
६ बखरीप्रमाणे श्री समर्थांना रामरायचा अनुग्रह केव्हा झाला ते शालिवाहन शक कोणते ?
७ आजही समर्थांच्या लग्नावेळचे बोहले दाखवण्यात येते, ते गाव - आसनगाव
८ श्री समर्थांची नियोजित वधू कोणाची मुलगी व तिचे नाव काय ? भानाजीबुवा गोसावी- मामा
९ श्री समर्थांनी विवाहमंडपातून पलायन केले ते शालिवाहन शक कोणते ?
१० श्री समर्थ नाशिकला पंचवटीत आले ते शालिवाहन शक कोणते ?
११ श्री समर्थांचे साधनास्थळ कोणते ? - टाकळी नाशिक
१२ तेथे कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे ? गोदावरी आणि नन्दिनी
१३ साधंनास्थळी श्री समर्थांनी स्वहस्ते लिहिलेला सध्या उपलब्ध असलेला ग्रंथ कोणता ? वाल्मिकी रामायण
१४ साधनास्थळी श्री समर्थांनी कोणत्या मंत्राचे पुरश्चरण केले ? -गायत्रीमंत्र आणी रामनामाचा जप
१५ श्री समर्थांनी साधनाकाळात केलेल्या रचना कोणत्या ? - करुणाष्टके, चौपद्या
१६ करुणाष्टकांची रचना कोणत्या मंदिरात झाली ? -काळाराम मंदिर, नासिक
१७ समर्थांचा पहिला शिष्य कोण ? -उद्धव स्वामी
१८ समर्थ स्थापित पहिला मारुती कोठे आहे - टाकळी
१९ त्याच्यासाठी रचलेले प्रसिद्ध स्तोत्र कोणते ? -भीमरुपी महारुद्रा
२० टाकळीतील वास्तव्यात ग्रंथलेखनात कोणाचे साहाय्य झाले ? - शास्त्रीबुवा
२१ समर्थांनी दसपंचक गावच्या कुलकर्ण्याचे प्रेत उठवले या घटनेचे शालिवाहन शक कोणते ?
२२ समर्थांना ‘रामदास’ हे नाव कोणी दिले ? -स्वतः
२३ समर्थांनी भारतभ्रमणास प्रारंभ कोठून केला ? -नासिक
२४ समर्थांच्या साधनेचा कालावधी किती वर्षे ? - २४ वर्षे
२५ समर्थांच्या भारतभ्रमणाचा कालावधी किती वर्षे ? -१२ वर्षे

महेश_कुलकर्णी's picture

21 Feb 2014 - 11:43 am | महेश_कुलकर्णी

समर्थांचे साधनास्थळ आणि 'दासबोध' ग्रंथ जन्म ठिकाण शिवथर घळ आहे असे वाटते आहे...

सस्नेह's picture

20 Feb 2014 - 11:52 pm | सस्नेह

यांचे अक्षर अन अक्षर म्हणजे जीवनातील अनुभूतींचा अन त्यामागच्या सत्याचा रसरसता प्रत्यय आहे.
त्या महान तत्वज्ञानाच्या पलीकडे जाऊन समर्थांच्या जीवनेतिहासाचा वेध घेण्याची कधी इच्छा झाली नाही.

विटेकर's picture

4 Mar 2014 - 3:13 pm | विटेकर

http://dasbodhabhyas.org/literature/Samarth_Charitra_Prashna_Manjusha_an...

प्रश्नमंजुषेची उत्तरे अपलोड केली आहेत !

प्रश्नांमध्ये सगळीकडे समर्थ लिहिल्यामुळे आधी श्री स्वामी सामार्थांबद्दल आहे असाच वाटला होतं. नंतर कळला राम्दासंबद्दल आहे