दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र दुसरे

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
17 Feb 2014 - 9:42 am
गाभा: 

मागील पानावरुन पुढे चालू.... पुढील २५ प्रश्न :

२६ समर्थांचे कृष्णातीरी आगमन झाले ते शालिवाहन शक कोणते ?
२७ कृष्णतीरी समर्थांनी पहिला मारुती कोणत्या गावी स्थापन केला ?
२८ कृष्णातीरावर समर्थ कोणत्या गावी स्थिरावले ?
२९ छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची प्रथम भेट कुठे झाली ?
३० छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची भेट झाली ते शालिवाहन शक कोणते ?
३१ चाफळचे राममंदिर कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
३२ चाफळच्या राम मंदिरात स्थापन केलेली मूर्ती कोणत्या नदीच्या डोहात सापडली ?
३३ डोहात सापडलेल्या दुसर्‍या मूर्तीची स्थापना कोठे केली ?
३४ रामनवमी उत्सवास समर्थांनी कोठे प्रारंभ केला ?
३५ चाफळच्या उत्सवास जेव्हा सुरवात झाली ते शालिवाहन शक कोणते ?
३६ समर्थ संप्रदायाचे नाव काय ? संप्रदायाचा मठ कोणता ?
३७ भारतभ्रमणात समर्थांची व कोणत्या शीख गुरूंची भेट कोठे झाली व ते शालिवाहन शक कोणते ?
३८ समर्थांना महाबळेश्वरास मिळालेले दोन शिष्य कोण ?
३९ समर्थांना कोल्हापुरात मिळालेले दोन शिष्य कोण ?
४० समर्थ शिष्या वेण्णास्वामी व अक्कास्वामी यांच्या गावाचे नाव काय ?
४१ ‘भरल्या घरात रामनाम घेऊ नका’ असे समर्थांना कोण म्हणाले ?
४२ वाई येथे समर्थांनी स्थापित केलेल्या मारूतीचे नाव काय ?
४३ वाईमधील कोणत्या तीन घराण्यातील व्यक्तींना समर्थांनी प्रथम अनुग्रह दिला ?
४४ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सातारा जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४५ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी कोल्हापूर जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४६ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सांगली जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४७ एकाच अभंगात अकरा मारूतींचा उल्लेख आहे तो अभंग कुणाचा ?
४८ दास टेकडी कुठे आहे ?
४९ समर्थांचा मठ कोणता ? त्याचा कारभार कोण पहात असे ?
५० कल्याण स्वामींचा मठ कोणता ? तो कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?

जय जय रघुवीर समर्थ !

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 2:59 pm | प्यारे१

अवघड प्रश्न आहेत.

२६ समर्थांचे कृष्णातीरी आगमन झाले ते शालिवाहन शक कोणते ?
२७ कृष्णतीरी समर्थांनी पहिला मारुती कोणत्या गावी स्थापन केला ?
२८ कृष्णातीरावर समर्थ कोणत्या गावी स्थिरावले ?
२९ छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची प्रथम भेट कुठे झाली ? - शिंगणवाडी (शिंगणापूर आठवत होतं. कॉपीड)
३० छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची भेट झाली ते शालिवाहन शक कोणते ?
३१ चाफळचे राममंदिर कोणत्या नदीच्या तीरावर आहे ? -कोयना?
३२ चाफळच्या राम मंदिरात स्थापन केलेली मूर्ती कोणत्या नदीच्या डोहात सापडली ? -अंगापूर डोह
३३ डोहात सापडलेल्या दुसर्‍या मूर्तीची स्थापना कोठे केली ? -सज्जनगड, आंग्लाई देवी
३४ रामनवमी उत्सवास समर्थांनी कोठे प्रारंभ केला ? -चाफळ
३५ चाफळच्या उत्सवास जेव्हा सुरवात झाली ते शालिवाहन शक कोणते ?
३६ समर्थ संप्रदायाचे नाव काय ? संप्रदायाचा मठ कोणता ? - स्वरुप संप्रदाय अयोध्या मठ
३७ भारतभ्रमणात समर्थांची व कोणत्या शीख गुरूंची भेट कोठे झाली व ते शालिवाहन शक कोणते ? - गुरु गोविंदसिंह
३८ समर्थांना महाबळेश्वरास मिळालेले दोन शिष्य कोण ? -दिनकर गोसावी
३९ समर्थांना कोल्हापुरात मिळालेले दोन शिष्य कोण ? - उद्धवस्वामी माहिती आहेत.
४० समर्थ शिष्या वेण्णास्वामी व अक्कास्वामी यांच्या गावाचे नाव काय ? -मिरज
४१ ‘भरल्या घरात रामनाम घेऊ नका’ असे समर्थांना कोण म्हणाले ? - बहुतेक वेण्णास्वामी
४२ वाई येथे समर्थांनी स्थापित केलेल्या मारूतीचे नाव काय ? - :(
४३ वाईमधील कोणत्या तीन घराण्यातील व्यक्तींना समर्थांनी प्रथम अनुग्रह दिला ? -रास्ते, मेहेंदळे
४४ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सातारा जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ? - उंब्रज, पसरणी, वाई, चाफळ, शिंगणवाडी
४५ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी कोल्हापूर जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४६ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सांगली जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४७ एकाच अभंगात अकरा मारूतींचा उल्लेख आहे तो अभंग कुणाचा ?
४८ दास टेकडी कुठे आहे ?
४९ समर्थांचा मठ कोणता ? त्याचा कारभार कोण पहात असे ?
५० कल्याण स्वामींचा मठ कोणता ? तो कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?

३९ समर्थांना कोल्हापुरात मिळालेले दोन शिष्य कोण ? कल्याणस्वामी अन उद्धवस्वामी.

४६ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सांगली जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ? बहे-बोरगाव येथे एकच आहे बहुतेक.

५० कल्याण स्वामींचा मठ कोणता ? तो कोणत्या नदीच्या तीरावर आहे ? नदी ठाऊक नाही पण गाव बहुतेक डोमगाव असावं.

कल्याणस्वामी पण कोल्हापूरातच काय? विसरलो.
बहे बोरगाव बेटावर आहे ना? नदीपात्र दुभंगलंय त्या जागी. (ताकारी जवळ.)

डोमगाव बरोबर आहे.

कल्याणस्वामी कोल्हापुरातच. बहुतेक तिथल्या कुणा देशपांडे-कुलकर्णी घराण्यातले.

पण उद्धवस्वामी नक्की कोल्हापूर का? आता कन्फ्यूजन होतंय.

अन बहे बोरगाव बेटावरच आहे. तिथपर्यंत मोठा पूल इ. छान बांधलेला आहे.

प्रसाद गोडबोले's picture

17 Feb 2014 - 3:37 pm | प्रसाद गोडबोले

कल्याण स्वामी आणि दत्तात्रय स्वामी ...

माझ्या माहीतीप्रमाणे
साधनाकाळात समर्थांनी नाशिक / टाकळी येथे कुळकर्ण्याचे प्रेत उठवले .... पुढे त्याला १० मुले झाली , त्यामुळे त्याचे नाव दशपुत्र पडले ...
उध्दवस्वामी हे त्या दहा मधले सर्वात थोरले .!

यग्झाक्टली!!!! आत्ता क्लीअर झालं. धन्स :)

अन ते दसपंचक गावचे कुलकर्णी होते. बहुतेक गिरिधर अन अन्नपूर्णा अशी नवराबायकोची नावे होती.

बाकी, संभाजीराजांच्या काळात उद्धवस्वामी अन कल्याणस्वामी यांच्यात वाद झाला होता, बरोबर?

प्रसाद गोडबोले's picture

17 Feb 2014 - 3:46 pm | प्रसाद गोडबोले

३० छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची भेट झाली ते शालिवाहन शक कोणते ?

हा प्रश्न वादग्रस्त आहे ...
माझ्यामाहीती प्रमाणे : सांप्रदायिक मतानुसार १६४८ आणि ऐतिहासिक साधनांच्या मतानुसार १६७२ .

बॅटमॅन's picture

17 Feb 2014 - 3:48 pm | बॅटमॅन

येस!

एक खुसपट काढतो फक्त: तुम्ही दिलेले आकडे शालिवाहन शक नाहीत, तर इसवी सन आहेत.

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 4:03 pm | प्यारे१

ते १६५९ मध्ये अफजलखानाला मारलं तेव्हा 'विजापूरचा सरदार निघाला आहे' वगैरे लिहीलेलं पत्र तेही चुकीचं आहे का?

प्रसाद गोडबोले's picture

17 Feb 2014 - 4:28 pm | प्रसाद गोडबोले

प्रक्षिप्त आहे :D

अ‍ॅक्चुअली शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करताना रामदासी संप्रदायातील कोणतीच गोष्ट खरी मानु नये ह्या मताचा मी आहे ....कारण ह्या कथा लिहिणारे सांप्रदायिक लोक होते ... ते भक्तीभावाने लिहिणारच ...पण भक्तीच्या जागी भक्ती आणि इतिहासाच्या जागी इतिहास...

आता उदाहरणार्थ : गडावर समर्थ , तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज चर्चाकरत बसले आहेत असे एक चित्र आहे , आता एक रामदासी सांप्रदायिक म्हणुन मला ते चित्र अत्यंत आवडते ... पण इतिहासाच्या दृष्तीने ते खरे असणे अशक्यप्राय आहे तुकारामांचा जन्म १५७७ , रामदास १६०८ आणि शिवाजी महाराज १६३० . आणि शिवसमर्थांची पहिली भेट १६७२ साली शिंगणवाडी येथे झाली हे पुराव्यानिशी शाबित करता येते ... आता अगदी तेव्हा तुकारामही तेथे होते असे मानले तरी त्यांचे वय ९५ वगैरे भरेल ...

असो .

वैराग्याचा लेश नाही माझे अंगी | बोलतसे जगी शब्दज्ञान |
देह हे कारणी लावावे नावडे | आळस आवडे सर्वकाळ |
रामदास म्हणे, लाज तुझी तुझ । कोण पुसे मज अनाथासी ।|

प्यारे१'s picture

17 Feb 2014 - 5:02 pm | प्यारे१

>>>तुकारामांचा जन्म १५७७

नक्की? माझ्या माहितीप्रमाणं तुकाराम महाराज नि रामदासस्वामी १६०८ चेच.
तुकाराम महाराज १६५० साली सदेह वैकुंठगमन करते झाले.
शिवाजीमहाराज १६८० साली गेले नि रामदास स्वामी १६८२ ला.

बाकी चित्राबद्दल माहिती नाही नि सनावळ्यांची फारशी गरजही वाटत नाही.
तिघंजण भेटले काय नि नाही भेटले काय?

मला माझ्या आयुष्यात शिवाजी महाराजांसारखं वागणं, समर्थ रामदासांसारखा सूक्ष्म विचार करणं नि तुकारामांसारखं तळमळ असलेला भक्त बनणं जमलं नाही तर (किमान एक तरी) सगळ्या माहितीचं फलित... भोपळ्याएवढं शून्य असेल.

अनन्त अवधुत's picture

20 Feb 2014 - 2:29 am | अनन्त अवधुत

विकी वर १५७७ चा उल्लेख आहे पण श्रीधर मोरेंच्या पुस्तकात १६०९ चा उल्लेख आहे. उतारा खालील प्रमाणे
"महान भगवत् भक्त बोल्होबा आणि माता कनकाई यांचे उदरी शके १५३० ( इ.स. १६०९ )मध्ये तुकोबांचा जन्म झाला. घरची श्रीमंती असल्यामुळे बालपण मोठया कोडकौतुकात आणि खेळण्यात गेल. प्राथमिक शिक्षण पंतोजीकडून मिळाले. पंतोजी हातांत पाटी घेऊन मुलांचा हात धरून मुलांना शिकवीत"

विटेकर's picture

4 Mar 2014 - 3:12 pm | विटेकर

http://dasbodhabhyas.org/literature/Samarth_Charitra_Prashna_Manjusha_an...

प्रश्नमंजुषेची उत्तरे अपलोड केली आहेत !