दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र तिसरे

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
21 Feb 2014 - 5:03 pm
गाभा: 

आता एकदम ५१ प्रश्न आहेत .. शेवटचा हप्ता.
सोमवारी दासनवमी आहे .. तोपर्यन्त सोडविण्याचा प्रयत्न करावा, तसाही विकांत आहे.

५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ?
५२ वादविवादात पराभूत झाल्यानंतर ते विद्वान समर्थ शिष्य झाले त्यानंतरचे त्यांचे नाव काय ?
५३ त्यांची नियुक्ती कोणत्या मठावर झाली ?
५४ शिरवळ मठाचे मठाधिपती कोण होते ?
५५ शिरवळला भुईकोट किल्ला होता, त्याचे नाव काय ?
५६ पहिले दोन चरण समर्थांचे, नंतरचे दोन चरण कल्याणांचे अशी रचना आहे त्या काव्याचे नाव काय ?
५७ या रचनेत किती श्लोक आहेत ?
५८ कल्याणास सर्पदंश झाल्यानंतर विष उतरवण्यासाठी समर्थांनी कोणास नवस केला ?
५९ मिरज मठासाठी कोणत्या यवन सरदाराने जागा दिली ?
६० समर्थांच्या स्त्री शिष्यांत कीर्तनाचा अधिकार कोणाला होता ?
६१ समर्थ शिष्यांत बसून कीर्तन करण्याचा मान कोणाचा ?
६२ समर्थांचे उपलब्ध चित्र कोणत्या समर्थ शिष्याने तयार करून घेतले ?
६३ विवेक करावे साधन हे पत्र कोणाच्या हातचे ?
६४ कोणत्या गडावर समर्थांनी कीर्तन केले ?
६५ समर्थांनी शिवाजी महाराज यांना स्वप्नात प्रसाद दिला ही घटना कोणत्या गावी घडली ?
६६ समर्थांच्या झोळीत राज्य टाकण्याची घटना कोणत्या गावी घडली ?
६७ पाषाणात जिवंत बेडकी निघाली ही घटना कोठे घडली ?
६८ समर्थांनी कृष्णेकाठी ११०० सत्पुरुषांचा मेळावा घेतला ते गाव कोणते ?
६९ कीर्तनामध्ये कल्याण स्वामींना डोक्यावर टाळ मारताच अभंग आठवला ते गाव कोणते ?
७० माजलेला हत्ती कल्याण स्वामींनी शांत केला ही घटना कोणत्या गावी घडली ?
७१ समर्थांनी विठ्ठलमूर्तीची स्थापन कोणत्या गावी केली ?
७२ समर्थस्थापित कोणत्या गावचा मठ आजही पंढरपूरच्या आषाढीवारीची परंपरा सांभाळतो ?
७३ मारूतीने कोणत्या गावचा मदरसा पाडला ?
७४ समर्थ ज्या नदीच्या तळाशी पद्मासनात बसले होते त्या नदीचे नाव काय ?
७५ सज्जनगडावर रामदासस्वामी संस्थांनाची स्थापन कोणी केली ? केव्हा ?
७६ समर्थ सांप्रदायाची प्रस्थानत्रयी कोणती ?
७७ ग्रंथराज दासबोधाची रचना कोणत्या मठात झाली ?
७८ दासबोधात एकूण किती ओव्या आहेत ?
७९ दासबोधात एकाच ओवी दोनदा आली आहे, ती कोणती ?
८० समर्थांची चतुःसूत्री सांगणारी ओवी कोणती ?
८१ ‘प्र’ ने सुरू होणारे दासबोधातले पाच शब्द सांगा.
८२ समर्थांनी मनाच्या श्लोकांची रचना कुठे केली ?
८३ श्रीसमर्थ कायम वास्तव्यासाठी सज्जनगडावर केव्हा आले ?
८४ कल्याण स्वामी कोणत्या नदीचे पाणी समर्थांसाठी गडावर आणत असत ?
८५ वेण्णास्वामींनी सज्जनगडावर देह केव्हा ठेवला ?
८६ गडावरील राममंदिरात असलेल्या मूर्ती घडविणारा अंध कारागीर कोण ?
८७ समर्थांनी शेवटचे पत्र कोणास पाठवले ?
८८ समर्थांच्या नंतर चाळीस वर्षे सज्जनगडाचा कारभार कोणी पहिला ?
८९ औरंगजेबाने सज्जनगड जिंकला तेव्हा गडाचे नाव काय ठेवले ?
९० औरंगजेबाने सज्जनगड जिंकल्यावर गडावरील राममूर्ती कोठे हलवली ?
९१ समर्थांच्या निर्वाण प्रसंगी त्यांच्या सन्निध असणारे त्यांचे दोन शिष्य कोणते ?
९२ अंत्यसंस्कारानंतर समर्थांच्या अस्थी कोठे जतन केल्या होत्या ?
९३ समर्थांच्या अस्थिंचे विसर्जन कोणी व केव्हा केले ?
९४ समर्थांच्या अस्थींबरोबर कोणत्या शिष्याच्या अस्थिंचे विसर्जन झाले ?
९५ ‘बुडाला औरंग्या पापी’ असे समर्थ कोणत्या काव्यात म्हणतात ?
९६ या काव्याची रचना कोठे झाली ?
९७ छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना राज्याभिषेकाचे निमंत्रण द्यायला आले तेव्हा समर्थांनी त्यांना कोणता आशीर्वाद दिला व कोणत्या वस्तू दिल्या ?

९८ शालिवाहन शके १९३० या साली कोणत्या समर्थशिष्याची जन्मशताब्दी झाली ?
९९ त्या शिष्याचे जन्मस्थळ व समाधीस्थळ कोणते?
१०० त्यांना समर्थांनी कोठे दर्शन दिले ?
१०१ त्या शिष्याने लिहिलेल्या दोन ग्रंथांची नावे सांगा.

जय जय रघुवीर समर्थ

प्रतिक्रिया

५१ बहुतेक सदाशिवशास्त्री आठवले/येवलेकर असे काहीसे नाव आहे.

५५ किल्ले सुभानमंगळ.

५९ आदिलशाही किल्लेदार जलालखान.

६० वेणाबाई अन बहुतेक अक्का.

८४ उरमोडी नदी.

९५ आनंदवनभूवन.

सध्या इतकेच आठवते आहे.

विटेकर's picture

21 Feb 2014 - 5:11 pm | विटेकर

५९ मिरज मठासाठी कोणत्या यवन सरदाराने जागा दिली ?
काय ओ हे ? तुमी मिर्जेच नय काय ?

हो, म्हणून तर जलालखान म्हणालो. तोच तेव्हा मिरजेचा किल्लेदार होता, नै का? त्यानेच जागा दिली असे मला वाटते.

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 5:27 pm | प्रसाद गोडबोले

५१ ‘वादविवादात पराभव झाल्यास जीभ कापून देईन’ असे म्हणणारे विद्वान कोण ? >> वामन पंडीत (?)

६५ समर्थांनी शिवाजी महाराज यांना स्वप्नात प्रसाद दिला ही घटना कोणत्या गावी घडली ? सातारा - अजिंक्यतारा
६६ समर्थांच्या झोळीत राज्य टाकण्याची घटना कोणत्या गावी घडली ? सातारा

७० माजलेला हत्ती कल्याण स्वामींनी शांत केला ही घटना कोणत्या गावी घडली ? चाफळ

७५ सज्जनगडावर रामदासस्वामी संस्थांनाची स्थापन कोणी केली ? केव्हा ? >> वादग्रस्त प्रश्न
७६ समर्थ सांप्रदायाची प्रस्थानत्रयी कोणती ? मनोबोध , दासबोध आणि आत्माराम

८० समर्थांची चतुःसूत्री सांगणारी ओवी कोणती ?

८१ ‘प्र’ ने सुरू होणारे दासबोधातले पाच शब्द सांगा >>> प्रयत्न प्रचीती प्रबोध ? ?

८४ कल्याण स्वामी कोणत्या नदीचे पाणी समर्थांसाठी गडावर आणत असत ? उरमोडी / उर्वशी (?)

८७ समर्थांनी शेवटचे पत्र कोणास पाठवले ? संभाजी महाराज

८८ समर्थांच्या नंतर चाळीस वर्षे सज्जनगडाचा कारभार कोणी पहिला ?

८९ औरंगजेबाने सज्जनगड जिंकला तेव्हा गडाचे नाव काय ठेवले ? नवरसतारा

९० औरंगजेबाने सज्जनगड जिंकल्यावर गडावरील राममूर्ती कोठे हलवली ? >>> वासोटा (?)( नॉट शुअर )

९१ समर्थांच्या निर्वाण प्रसंगी त्यांच्या सन्निध असणारे त्यांचे दोन शिष्य कोणते ?

९४ समर्थांच्या अस्थींबरोबर कोणत्या शिष्याच्या अस्थिंचे विसर्जन झाले ? कल्याणस्वामीच असणार ...दुसरे कोण ?
९५ ‘बुडाला औरंग्या पापी’ असे समर्थ कोणत्या काव्यात म्हणतात ? आनंदवन भुवन

९७ छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना राज्याभिषेकाचे निमंत्रण द्यायला आले तेव्हा समर्थांनी त्यांना कोणता आशीर्वाद दिला व कोणत्या वस्तू दिल्या ?

९८ शालिवाहन शके १९३० या साली कोणत्या समर्थशिष्याची जन्मशताब्दी झाली ? श्रीधर स्वामी
९९ त्या शिष्याचे जन्मस्थळ व समाधीस्थळ कोणते? शिगेहळ्ळी कर्नाटक
१०० त्यांना समर्थांनी कोठे दर्शन दिले ? (पुण्याहुन सातारला येताना ? )

१०१ त्या शिष्याने लिहिलेल्या दोन ग्रंथांची नावे सांगा. आर्य संस्कृती आणि ?

विटेकर's picture

4 Mar 2014 - 3:11 pm | विटेकर

http://dasbodhabhyas.org/literature/Samarth_Charitra_Prashna_Manjusha_an...

प्रश्नमंजुषेची उत्तरे अपलोड केली आहेत !