व्यावसाइक कामानिमीत्त मध्यपुर्वेत, सौदी अरेबीया, रियाधला जाण्याचा योग आला. मध्यपुर्वेत जाण्याची ही पहिलीच खेप.
थोडीफार उत्सुकता होती या प्रवासाची. पण येण्यापुर्वी गुगलींग केल्यावर फारच निराशा झाली. सौदी अरेबीया, ज्या देशात मुस्लीम बांधवांची मक्का आणि मदीना ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत, हा देश पुर्णपणॆ कुराण्यातल्या 'शरिया' तत्वांवर चालतो. शरियाच्या पुर्ण कलमांचे (कायदे) काटेकोर पालन केले जाते. गैर मुस्लीमांसाठी जाचक असे खालील मुद्दे
1. सर्व स्त्रियांनी बुरखा (अबाया) घालणे अनिर्वार्य. (हा कायदा धर्मातीत आहे)
2. सार्वजनीक ठिकाणी स्त्री आणि पुरुष एकत्र येणे निषिद्ध
3. स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी जाताना पुरुषाबरोबर (पती अथवा वडील) असणे बंधंकारक
4. जगातील एकमेक देश जिथे मुव्ही थिएटरवर कायद्याने बंदी
5. दारू पिणॆ / बाळगणॆ कायद्यानुसार निषिद्ध (पकडले गेल्यास शिक्षा भय़ंकर)
6. 5 वेळॆच्या नमाजच्या वेळी दुकाने / मॉल्स कायद्यानुसार बंद
7. मुतव्वा हे धार्मिक पोलिस नमाजच्या वेळी बाहेर फिरणार्या कोणालाही पकडून मशिदीमधे घेउन जाउ शकतात
(माझ्या एका मित्राला नेले होते, बिचारा सांगुन सांगुन थकला कि तो मुस्लीम नाहीयेय :( )
पहिल्या 4 गोष्टींवर आणि शेवट्च्या 2 गोष्टींवर मला जास्त काही हरकत नव्हती / नाहीयेय, पण नंबर पाच हा मुद्दा माझ्यासाठी फारच जाचक होता. कसे होणार ह्या विवंचनेत असतनाच कळले की माझा व्हिसा ज्या प्रकारचा होता त्याने मी फक्त एक महीना सौदी अरेबीया, रियाध राहु शकतो. एका महिन्यानंतर व्हिसा एक्सटेंशन साठी सौदीबाहेर जाउन येणे बंधंकारक होते. बहरीन हा एक शेजारी देश जिथे प्रवेशतत्वावर 72 तासांचा व्हिसा मिळतो, तिथे व्हिसा एक्सटेंशन दर एका महिन्यानंतर जावे लागणार होते. मग बहरीन वर गुगलींग करणॆ आलेच. ते केल्यावर जे कळले त्याने आनंद गगनात मावेना.
बहरीन हा मुस्लीम देश असुनही पुर्ण मुक्त देश आहे. मेट्रोपोलीटन संस्कृती आपलीशी केलेला एक सुंदर देश. महत्वाचे म्हणजे सौदीतल्या पाचव्या मुद्याला फाटयावर मारणारा देश. मला तर तो मध्यपुर्वेच्या वाळवंटातील मृगजळाप्रमाणे भासला :)
सौदीतील जनता बहरीनला विकांताला (Weekend) बहरीनला जीवाचे बहरीन करण्यास जाते. त्यांच्या साठीही तो देश सौदीतील जाचक नियमांमुळॆ मृगजळच आहे. सौदीच्या सुल्तानाने सौदी आणि बहरीन ला जोण्यासाठी समुद्रावर एक पुल बांधला आहे, जो विकांताला जास्तीत जास्त वापरला जातो ;)
सौदी ते बहरीन हा 480 ते 500 किलोमीटरचा प्रवास आहे. भर वाळवंटातुन हा प्रवास करावा लागतो. आजुबाजुला प्रेक्षणीय काहीही नसल्यामुळॆ हा प्रवास फारच रुक्ष होतो, पण बहरीन गाठायच्या कल्पनेनेच तो सुसह्य होतो.
सौदीतुन बहरीनला जाण्याचा समुद्रावरील रस्ता फारच छान आहे. सौदीमधे एकंदरीतच इंफ्रास्ट्रक्चर फार छान आणि अद्यावत आहे. सर्व रस्ते अमेरिकेच्या धर्तीवर आणि आंतरराष्ट्रीय नॉर्म्सचे काटेकोर पालन करणारे आहेत.
480 किमी अंतर कापल्यावर, हा सुंदर रस्ता आणि पूल पार केल्यावर दिसतो बहरीनचा स्वागत फलक. इथे 'या आपले स्वागत आहे' 'बहरीन वेल कम्स यु' असला काही प्रकार दिसला नाही. पण त्याचे काही वाटून घेतले नाही, सौदीमधुन घटकाभर सुटका करून देणार्या देशात स्वागत फलकापेक्षा जे हवे होते ते मिळणार होते आणि स्वागत फलकापेक्षा त्याचे महत्व कैक पटीने जास्त होते :)
सुंदर बहरीन शहर
बहरीनमधल्या सुंदर इमारती. अत्याधुनिक आणि अद्यावत आर्किटेक्चर वापरून बांधलेल्या इमारती मला फारच आवडल्या. ह्या बहरीनच्या राजेशाही कुटुंबाच्या कलात्मकतेची जाणीव करून देण्यार्या आहेत.
बहरीनचे राजे आणि राजकुमार, ह्यांच्या संमतीशिवाय इथे झाडाचे पानही हलु शकत नाही. सौदीच्या राजाशी ह्यांचा राजेशाही घरोबा आहे. बहरीन मधे जेव्हा स्वातंत्र्यासाठी जनतेचा उठाव होत होता तेव्हा सौदीने ह्या राजे आणि राजकुमारांच्या आणि बहरीनच्या संरक्षणासाठी सौदीचे लष्कर बहरीनला रवाना केले होते. (पण बहरीन एवढे मुक्त आहे की तिथल्या जनतेला अजुन काय हवे आहे ते काही मला कळले नाही, असो ते म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, तसे काहीसे असावे)
आणि आता शेवटी सर्वात महत्वाचे, जे काम करण्यासाठी येवढी यातायात केली ते काम 'मदिरापान'. मी आणि माझा कलीग संपथ मनसोक्त आणि 'हलेडुले' होइपर्यंत एका महिन्याचा कोटा पुर्ण करून घेण्यात दंग. पुढचा एक महिन्या ह्या 'हाय' वर आणि आठवणींवर काढायाचा होता :(
असे हे मला भावलेले बहरीन, वाळवंटातले मृगजळ.
प्रतिक्रिया
22 Jul 2011 - 3:30 pm | इरसाल
फोटो आवडले माझा एक मित्र बहारीन मधेच असतो.
मुद्दा क्र. ७ मुतव्वा हे मुस्लीम नसतात काय ? कारण नमाजाच्या वेळेस ते बाहेर कसे फिरू शकतात ?
22 Jul 2011 - 3:47 pm | सोत्रि
मलाही हा प्रश्न पडाला होता (जेव्हा माझ्या मित्राला पकडले तेव्हा) पण माझी तरी छाती झाली नाही तसे डायरेक्ट विचारायची. :(
असो, ते मुस्लीमच असतात, पण त्यांना डायरेक्ट अल्लाने धरतीवर धाडले आहे असा बहुधा त्यांचा समज असतो ;)
त्यामुळॆ त्यांना सगळे माफ असते.
- (हाजी) सोकाजी
22 Jul 2011 - 3:55 pm | इरसाल
कदाचित.
दुसरा मित्र सौदीला होता मुस्लीम असूनही ३ महिन्यात पळून पुन्हा दुबईला परत आला.त्यालाही विचारले होते पण तोही काही सांगू शकला नाही.
तो सांगत होता कि नमाजाच्या वेळेस बाहेर सापडलेला जर चुकून मुस्लीम निघाला तर त्याची खैर नसते.मुतव्वा काहीही बर्ताव करू शकतात आणि त्याचे भविष्य फक्त आणि फक्त मुतव्वा ज्या काजी कडे घेवून जातील त्याच्या हातात पक्षी तोंडात असते.
22 Jul 2011 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार
विकिवर पण फार थोडी माहिती मिळाली.
22 Jul 2011 - 3:45 pm | यकु
सुंदर फोटो!
बुर्ज अल अरब बहरिन मध्ये आहे काय आणि ती जहाजाच्या शिडासारखी दिसणारी इमारत बुर्ज अल अरब आहे का?
बहुधा नसावे, बुर्ज समुद्रात काही अंतरावर असल्याचे डिस्कव्हरीवर पाहिले होते.
अवांतरः बहरीनमध्ये पेयपान झाले, मग "वाळ्वंटातील मृगजळ " असे शीर्षक का? ;-)
22 Jul 2011 - 3:58 pm | प्यारे१
>>>>बुर्ज अल अरब बहरिन मध्ये आहे काय आणि ती जहाजाच्या शिडासारखी दिसणारी इमारत बुर्ज अल अरब आहे का?
बुर्ज अल अरब संयुक्त अरब अमिरातीमध्ये (दुबईमध्ये) आहे.
22 Jul 2011 - 4:38 pm | स्मिता.
अवांतरः बहरीनमध्ये पेयपान झाले, मग "वाळ्वंटातील मृगजळ " असे शीर्षक का?
त्यांना ओअॅसिस म्हणायचे असावे.
सोत्रि, बहरिनचे फोटो आवडले.
22 Jul 2011 - 4:43 pm | यकु
तसे असेल तर मग लेखाचे नामकरण सोकाजींनी "वाळवंटातील पेयस्थळ" असे करण्याची विनंती.
22 Jul 2011 - 3:47 pm | परिकथेतील राजकुमार
22 Jul 2011 - 4:14 pm | सोत्रि
- (हातचे राखणारा आणि धुळवड करणारा) सोकाजी
22 Jul 2011 - 4:06 pm | स्पा
मस्त लेख
पुढ्यात बडवायझर दिसतेय ;)
22 Jul 2011 - 4:44 pm | बिपिन कार्यकर्ते
जुन्या आठवणी जागवल्यात राव तुम्ही. आमचे "माझं खोबार..." ;)
माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७ , ... भाग ८
खोबारला असताना घराच्या ग्यालरीमधून रोज चमचमणारं बाहरीन आमच्या दृष्टीस पडायचं. क्वचित जाणंही व्हायचं. ज्याच्याकडे मल्टिपल एक्झिट्-रीएंट्री होती ते दर गुरूवारी जायचे आणि शुक्रवारी रात्री परत यायचे. त्यांचा प्रचंड हेवा वाटायचा. आम्ही मात्र बाहरीनब्रिज पर्यंतच जायचो. तिथेच पिकनिक करायचो. :)
मिपावरच्या एक ताई बहरिनला असतात (बहुतेक अजूनही).
बहरिनला कुठे उतरला आहात? तशीही आता बहरिनची चमकदमक खूपच कमी झाली आहे. साधारण साताठ वर्षांपूर्वी स्थानिक निवडणुकात शिया कट्टरपंथींचा वरचष्मा झाला आणि त्यांनी खूपसे प्रकार कमी करायला लावले.
बाहरीनची मातब्बरी तुम्हाला. पण बहुसंख्य स्थानिक जनता त्यामानाने खूपच गरिब आहे. ६५-७० टक्के शिया आणि राजा मात्र सुन्नी. त्यामुळे तिथे शियांवर अनन्वित अत्याचार होतात. त्यात परत राजघराणे मूळ बाहरिनी नाही. बाहेरून येऊन शिरजोर झालेले. स्थानिक लोकांची अवस्था वाईट आहे. राजाने, एकंदरीत शिया लोकांचा टक्का कमी व्हावा म्हणून नॉन्-शिया लोकांना (त्यात बरेच मूळ भारतिय असलेले मंगलोरी ख्रिश्चनपण आहेत) नागरिकत्व दिले आहे. गैरमुस्लिमांना नागरिकत्व देणारे बाहरीन हे एकमेव जीसीसी राष्ट्र आहे.
वेळ असल्यास मनामामधे थोडे पायी फिरा. बाब-अल-बाहरीनच्याआसपासच्या भागात. तिथे एक सुंदर देऊळही आहे. गुजराती लोकांचे, राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. प्रसन्न वाटते. तिथली बहुसंख्य दुकाने गुजराती / भाटिया लोकांची आहेत. गोल्ड मार्केट तर संपूर्ण त्यांच्या हाता आहे. देवळातून बाहेर पडलात की उजव्या हाताला चालत गेलात तर हॉटेल वुडलँड आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक साधीशीच गुजराती खाणावळ आहे. थाळी उत्तम मिळायची तिथे.
च्यामारी, खूपच आठवणी यायला लागल्या आहेत. आवरते घेतो. :)
22 Jul 2011 - 5:01 pm | श्रावण मोडक
धन्यवाद. नाही तर याही आठवणी केळीची पाने, बाकरवडी मार्गाने जायच्या. ;)
22 Jul 2011 - 5:21 pm | बिपिन कार्यकर्ते
ते भाग्य आखाताच्या भाळी कुठले यायला? त्यासाठी 'तिकडे'च जावे लागते.
22 Jul 2011 - 5:46 pm | इरसाल
ओ साहेब हे तुमचं खोबरं ....म्हणजे खोबार इतके दिवस कुठे लपवून ठेवला होतं ?
आयला जाम भारी अनुभवला मुकलो असतोना राव..............
22 Jul 2011 - 5:52 pm | बिपिन कार्यकर्ते
आम्ही काय आणि कुठे लपवणार! http://www.misalpav.com/newtracker/322 इथे होतं बघा. :)
22 Jul 2011 - 5:30 pm | प्रियाली
मला वाटतं आखाती लोकं बहारिनला आखाताची अमेरिका म्हणतात. ;)
22 Jul 2011 - 5:38 pm | इंटरनेटस्नेही
उत्तम लेख. आवडला! सोत्रि, जियो!
या लेखाच्या निमित्ताने खास एक दोन बीअर पिण्यासाठी आम्ही मुंबईवरुन पुण्याला जातो याची आठवण झाली.
-
(मुंबईच्या भौगोलिक सीमांमध्ये दारु न पिणारा) इंट्या द कंडिशनल मद्यपी.
22 Jul 2011 - 9:11 pm | पंगा
?
22 Jul 2011 - 6:41 pm | आनंद
लै भारी , बहारीन मधल्या इमारती आकाशाच्या रंगा प्रमाणे आपला रंगही बदलतात काय?चित्र क्रं ३९३८,का
फोटु गंडला आहे.
(बाकी हे असले कायदे बघुन आणि बिपीनदांच खोबार वाचुन आखातात बिझनेसचा चान्स असुनही दुर्लक्ष करणारा)
--आनंद
15 Nov 2013 - 9:58 am | झंम्प्या
बहुतके तो फोटू गाडीतून काढलाय, म्हणून वरच्या निळ्या काचेचा इफेक्
22 Jul 2011 - 7:07 pm | गणपा
मध्य पुर्वेताल्या आठवणींना उजाळा देणारा सचित्रलेख आवड्या रे सोत्री.
13 Nov 2013 - 4:48 pm | अजया
हा लेख कसा नाही वाचला? बाहरिन कदाचित इतर आखाती देशांइतके श्रिमंत राष्ट्र नसेल पण तो एक सुसंस्कृत देश आहे. मुंबईच्या माणसाला तर आपण परदेशात आहोत असे तिथे वाटतही नाही! विशेषत: इथे भारतीय माणसांचा आदर केला जातो. संपूर्ण शाकाहारी माणसांनाही अगदी उपासाच्या पदार्थांपासून चाट, पुरणपोळी, डिंकाचे लाडू खाऊ घालणारं बाहरिन चट्कन आपलसं करतच!
15 Nov 2013 - 9:49 am | झंम्प्या
आम्ही इथे फिलीपीन्स मध्ये बस्लोय मागच्या तीन महीन्यांनपासुन... धड शाकाहारी जेवण मिळ्नं अवघड आहे... बहारीन सारख का नाही यार हे....... :(:(
15 Nov 2013 - 10:28 am | प्रभाकर पेठकर
बहारेन.
अरबी भाषेत 'बहार' म्हणजे समुद्र आणि 'तिनेन' म्हणजे २ (दोन). दोन शब्दांची संधी होताना 'ति' गायब होतो. जसे 'नफर' म्हणजे माणूस आणि 'नफरेन' म्हणजे २ माणसं. तसेच, 'बहारेन' म्हणजे 'दोन समुद्रांनी वेढलेला देश'. असो.
बहारेन देशात दारू मुबलक मिळते. सौदीतील कोरड्या आयुष्याला बहारेन मध्ये ओलावा मिळतो. बहारेनची अर्थव्यवस्था सौदीच्या तेलशुद्धीकरणावर आणि सौदीच्या परदेशस्थ कर्मचार्यांच्या 'दारू' आणि 'इतर' शौक पुरे करण्याच्या कमाईवर आहे.
दारूच्या बाबतीत माझा व्यक्तिगत अनुभव अगदी 'दारूण' होता. मस्कतहून मार्गे बहारेन मुंबईस येताना एक दिवस बहारेनला वास्तव्य होते. तेंव्हा तिथल्या अरबी कस्टम अधिकार्याने माझ्याकडे असलेली १ लिटरची ब्लॅक लेबलची बाटली, जी मी मस्कत सीमाशुल्क मुक्त (ड्यूटी फ्री) दुकानातून घेतली होती, ती कचर्यात टाकायला लावली. मी त्याला समजवायचा खुप प्रयत्न केला पण तो अडूनच बसला होता. माझी पाठ वळली की कचर्यातून काढून ती बाटली स्वतःच्या वापरासाठी घरी न्यायचा त्याचा मानस अगदी उघड होता पण मी कांहीच करू शकत नव्हतो. त्याने आव तर असा आणला होता की 'मी दारूच्या बाटलीला हातही लावणार नाही. तूच तुझ्या हाताने ती कचर्याच्या डब्यात टाक.' टाकावी लागली. बहारेन मधील माझ्या मित्राला हा किस्सा ऐकवला तेंव्हा त्यालाही खुप आश्चर्य वाटले. तो म्हणाला, 'अरे, असं होत नाही कधी. दारूच्या बाबतीत इथले नियम इतर आखाती प्रदेशांइतके कठोर नाहीएत. पण बहुतेक त्याला स्वतःला फुकटात ब्लॅक लेबल मिळवायची असेल म्हणून त्याने तुला बकरा बनविला असावा.' असो. त्या नंतर दोनदा बहारेनला जायचा योग आला पण आधीच्या अनुभवावर कानाला खडा लावला होताच.