विक्रांत वर असताना एक दिवस एक परमजीत सिंघ अमर नावाचा साधारण पंचे चाळीशीचा सरदारजी अधिकारी माझ्याकडे आला त्याच्या हातात एक कोणता तरी फॉर्म चा कागद होता. आणी तो मला विचारु लागला कि डॉक्टर तुम्हाला वेळ केंव्हा आहे? मी विचारले कशासाठी? त्यावर तो म्हणाला कि माझ्या मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र हवे आहे. मी परत विचारले कशासाठी? त्यावर तो म्हणाला कि वाराणसी पासून पाटण्या पर्यंत दोनशे किमी गंगा नदीत पोहण्याची स्पर्धा आहे त्यात भाग घेण्यासाठी त्याला स्वास्थ प्रमाणपत्र हवे आहे. मी परमजीत सिंघ न विचारले तो आपला स्वतःचा मुलगा आहे का? त्यावर ते होय म्हणाले. मी एकही शब्द न बोलता तो फॉर्म घेतला त्यावरचे नाव वाचले मनदीप सिंघ अमर. त्याच्यावरच्या डॉक्टर च्या रकान्यात सही केली माझा शिक्का मारला आणी तो फॉर्म त्यांच्या हातात दिला. त्यवर ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले कि डॉक्टर तुम्ही त्याला पाहिलेसुद्धा नाही. मी शांतपणे त्यांना म्हटले कि कोण बाप इतका मूर्ख असेल कि मुलगा निरोगी आणी लायक नसताना त्याला अशा स्पर्धेसाठी दोनशे किमी पोहायला पाठवेल?ज्याअर्थी तुम्ही त्याला पाठवता आहात त्या अर्थी तो १०० टक्के स्वस्थ असणारच. यावर त्यांनी मला जवळजवळ मिठीच मारली आणी म्हणाला डॉक्टर असा सकारात्मक माणूस फार कमी वेळा दिसतो.
विक्रांतवर असे अनेक तरुण आणी सकारात्मक अधिकारी माझे मित्र होते आमचा एक असा गट तयार झाला होता. आम्ही सात आठ जण लग्न न झालेले बेफिकीर असे नेहेमी एकत्र जेवत होतो पत्ते खेळायचो गप्पा मारायचो विडीयो वर सिनेमे पाहायचो उड्डाण तळावर संध्याकाळी फिरायचो. अमर सर सुद्धा त्यात सामील होते. एकदा आम्ही त्यावेळी हिट झालेला सलमान खान आणी भाग्यश्री यांचा मैने प्यार किया हा सिनेमा पाहत होतो त्यात एक दुसरा अधिकारी गुरविंदर सिंग खेरा मला म्हणाला कि सर पहा भाग्यश्री किती सुंदर दिसते. यावर अमर सर म्हणाले कि भाग्यश्री सोडा तिची आई (रीमा लागू) पहा किती सुंदर दिसते? खेरा म्हणाला काय सर तुम्ही पण त्यावर अमर सर म्हणाले कि भाग्यश्री तो मेरी बेटी जैसी है उसकी मा देखो. यावर आम्ही सगळे इतके हसलो होतो.
नौदलातील सैनिक सुद्धा असे डांबरट असतात कि त्यांच्या कारवाया पाहून थक्क व्हायला होते. विक्रांतवर प्रत्येक सैनिकाला सुट्टीच्या अर्जावर डॉक्टरची सही आवश्यक असे. कारण एखादा संसर्गजन्य आणी लैंगिक रोग घेऊन तो घरी जाऊ नये म्हणून.
त्यावेळी काही सैनिक सुट्टी मिळवण्यासाठी वेगवेगळे बहाणे करीत. असाच एका तोफखान्याच्या(GUNNARY) सैनिकाला सुट्टीवर जायचे होते तेंव्हा तो एक तार घेऊन आला होता MOTHER SERIOUS ( आई अत्यवस्थ). मी त्याच्या सुट्टीच्या अर्जावर सही केली आणी तो गेला साधारण वीस दिवसांनी तो परत रुजू झाला तेंव्हा एकदा फिरता फिरता तोदिसला तेंव्हा मी त्याला विचारले काय रे कसा आहेस? तो म्हणाला सर मी लग्न करून आलो मी विचारले आई कशी आहे? म्हणाल आई ठणठणीत आहे मी विचारले कि मग ती तर काय होती MOTHER SERIOUS. तो म्हणाला MOTHER SERIOUS ABOUT MARRIAGE. मला हसूच आले.
अभियांत्रिकी विभागातील लोक बॉयलर सूट( डांगरी) घालत असत. त्यात सैनिक खाकी किंवा गडद निळ्या रंगाची डांगरी घालत आणी अधिकारी वर्गाची डांगरी पांढर्या रंगाची असते. या डांगरी वर छातीवर उजवीकडे नाव आणी त्याच्या खाली हुद्दा लिहिलेला असतो आणी डाव्या बाजूला रक्त गट.विक्रांत मध्ये आपल्या पाहुण्याला आणायचे असेल तर तुम्हाला गणवेशात राहावे लागे. कारण पाहुणे कोणाचे आहेत हे स्पष्ट पणॅ कळले पाहिजे
एकदा एक ME I म्हणजे MECHANIC ENGINEROOM FIRST CLASS तंत्रज्ञ प्रथम वर्ग आपल्या मैत्रिणीला विक्रांत दाखवायला घेऊन आला होता.तो तिला DG डीझेल जनरेटर रूम दाखवायला घेऊन गेला तो तिने विचारल्यावर सांगत होता कि मी मेकानिकल इंजिनियर फर्स्ट क्लास आहे. तेवढ्यात तेथे त्याचा कनिष्ठ आला ME II तर हा म्हणाला हा अजून कच्चा आहे मेकानिकल इंजिनियर सेकंड क्लास. नंतर तेथे एक LME LEADING MECHANIC ENGINEROOM आला तर याने सांगितले कि हा माझा वरिष्ठ आहे. थोड्यावेळाने त्या खोलीत एक अधिकारी पांढरी डांगरी घालून आला यावर मैत्रिणीने विचारले कि हा पांढर्या कपड्यात का आहे? त्यावर हा पठ्ठ्या म्हणाला कि आज तो आजारी आहे म्हणून पांढरी डांगरी घातली आहे.
जहाजात प्रवेश करण्यासाठी जी शिडी (GANGWAY) असते तेथे ड्युटी करणार्याला क्वार्टर मास्टर म्हणतात.( हा हुद्दा नसून तेथे काम करणाऱ्या सैनिकाला म्हणण्याचे नाव आहे) एकदा एक सैनिक आपल्या मैत्रिणीला सांगत होता कि तू विक्रांतवर फोन केलास तर क्वार्टर मास्टर बी सिंघ कुठे आहे म्हणून विचार ते मला बोलावतील.आत्ता मी क्वार्टर मास्टर आहे पुढच्या वर्षी हाफ मास्टर होईन आणी त्याच्या पुढच्या वर्षी फुल मास्टर.
आश्विनी च्या मनोविकार विभागात काम करीत असताना एक सैनिक (PETTY OFFICER) नैराश्य आणी लिंग शैथिल्य साठी भरती झाला होता. हा अतिशय रुबाबदार होता आणी अस्खलित पणे इंग्रजी बोलत असे. त्याने एम ए केले होते आणी एल एल बी चे एक वर्ष पण केले होते. हा बिहार मध्ये जाऊन एका आमदाराच्या मुलीशी लग्न करून आला होता. त्यांना राष्ट्रपतींचे परिपत्रक दाखवले कि मी भारत का राष्ट्रपती आपको पेटी अफसर का पद प्रदान करता हुं I ते पर्पत्रक सत्य होते पण पेटी ऑफिसर हा सैनिकात मोडतो अधिकार्यात नाही. त्याने पहिले काही दिवस बायकोला हॉटेलात ठेवले पण नंतर खर्च परवडेना म्हणून त्याने एक घर भागीत घेतले पण बायकोच्या इतमामाला ते साजेसे नव्हते त्यामुळे त्यांच्या वैवाहिक संबंधात बेबनाव निर्माण झाला आणी त्याची बायको त्याला सोडून गेली होती आणी या सर्व तणावातून तो आमच्या वार्डात भरती झाला होता. पेठे सरानी त्याला पंधरा वर्षे झाल्यावर नौदल सोड किंवा खात्यांतर्गत परीक्षा देऊन अधिकारी हो असा सल्ला दिला.
प्रतिक्रिया
11 May 2013 - 6:15 pm | मुक्त विहारि
आवडला
11 May 2013 - 8:30 pm | भटक्य आणि उनाड
आत्ता मी क्वार्टर मास्टर आहे पुढच्या वर्षी हाफ मास्टर होईन आणी त्याच्या पुढच्या वर्षी फुल मास्टर....
आज तो आजारी आहे म्हणून पांढरी डांगरी घातली आहे...
लै भारि... नौद्लातल्या गमती-जमती!!!!
12 May 2013 - 10:35 am | प्रभाकर पेठकर
डॉक्टरसाहेब,
हे काही पटले नाही.
२०० किलोमिटर पोहण्याची स्पर्धा?? बापरे..! आणि त्या मुलाची कुठलीही तपासणी न करता प्रमाणपत्र दिले?
बाप आपल्यामुलाबद्दल अति आणि चुकीचा विश्वास बाळगू शकतो. शिवाय नुसत्या नजरेने त्याला मुलाच्या हृदयाच्या, फुफुसांच्या स्वास्थाविषयी कसे कळणार?
सर्वसाधारणपणे एखादा स्वतःचीच अशा कारणासाठी फिटनेस टेस्ट द्यायला आला तर काय काय टेस्ट असतात?
12 May 2013 - 12:15 pm | सुबोध खरे
साहेब २०० किमी एका दिवसात नव्हते तर दहा दिवसात होते. शिवाय परमजीत साहेब आपल्या मुलाचा सराव नौदलाच्या तरण तलावात करीत होतेच. कोणीही माणूस केवळ डॉक्टर प्रमाणपत्र देतो आहे म्हणून तो पात्र नसताना आपल्या स्वतःच्या मुलाला इतकी मोठी आणि थकवणारी स्पर्धा भाग घेण्यासाठी पाठवेल किंवा एव्हरेस्ट वर चढायला पाठवेल असे वाटत नाही अगदी बरोबर. विशेषतः ज्या स्पर्धेतून कोणताही करियर च्या दृष्टीने फायदा होणार नाही
शिवाय नुसत्या नजरेने त्याला मुलाच्या हृदयाच्या, फुफुसांच्या स्वास्थाविषयी कसे कळणार?
अगदी बरोबर. म्हणूनच मी जास्त कटकट न करता ते प्रमाणपत्र दिले.ते केवळ त्या आयोजकांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी असावे .
12 May 2013 - 2:21 pm | प्रभाकर पेठकर
डॉक्टर साहेब,
ह्या वाक्यातील 'त्याला' म्हणजे त्या मुलाच्या वडिलांना.
ह्या माझ्या वाक्याला तुम्ही
असे म्हंटले आहे म्हणजे तुम्ही सहमत आहात. मग प्रश्न असा उभा राहतो की जर, मुलाच्या वडीलांना मुलाच्या स्वास्थाविषयी नुसत्या नजरेने कांही कळणार नसेल आणि तो वैद्यकिय तपासणी करून घ्यायला आला असेल तर तशी तपासणी न करता त्याच्या 'स्वस्थ विषयक अज्ञानावर' विसंबून प्रमाणपत्र कसे दिले गेले. राग मानू नये. पण मला हे सर्वस्वी चूक वाटते.
एखाद्या निष्णांत डॉक्टरलाही 'नुसते पाहून' (इथे तर त्या मुलाला पाहिलेलेही नाही) कोणाचे स्वास्थ तंतोतंत ओळखता येत नाही आणि म्हणूनच डॉक्टर वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगतात. ह्या तपासण्या करून त्या सर्व तपासण्यात (चांगल्या अंकांनी) उत्तीर्ण होऊनही अगदी दूसर्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या कथाही आपण ऐकत असतोच. अशा परिस्थितीत एखाद्या डॉक्टरने, फक्त आयोजकांची गरज म्हणून डोळे मिटून प्रमाणपत्र देणे नुसते चूकच नाही तर अनैतिक आहे.
इथे एक डॉक्टर एका मुलाच्या आयुष्याचा जुगार खेळला आहे. (आणि त्या जुगारात डॉक्टर जिंकलाही असेल) पण जर जुगार हरला असता तर कायद्याच्या चौकटीत त्याच्या जवळ काय उत्तर असणार आहे? त्याने कुठल्याकुठल्या तपासण्या केल्याचे रेकॉर्ड्स तो सादर करू शकेल?
माझ्या प्रतिसादातील शेवटचा मुद्दा अनुत्तरीत राहिला आहे. तो असा, की जर एखादा माणूस अशा कारणासाठी स्वतःची तपासणी करून घ्यायला आला तर त्याच्या कोणकोणत्या वैद्यकिय तपासण्या केल्या जातात/किंवा करणे अपेक्षित असते?
12 May 2013 - 12:22 pm | यशोधरा
म्हणूनच मी जास्त कटकट न करता ते प्रमाणपत्र दिले.ते केवळ त्या आयोजकांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी असावे >> आणि जर त्या मुलाला स्पर्धेदरम्यान काही झाले असते तर? की तुम्ही मुलाला न पाहता प्रमाणपत्र देऊ केलेत ते योग्य?
12 May 2013 - 1:14 pm | सौंदाळा
ह्म्म,
व्यक्ती तितक्या प्रकृती.
माणसे तेवढे किस्से.
तुमचे अनुभवविश्व खरोखरीच व्यापक आणि समृद्ध आहे.
12 May 2013 - 1:15 pm | कपिलमुनी
तुमचा प्रमाणपत्राचा किस्सा आणि पद्धत साफ चुकिची आहे..
कित्येकवेळा धड्धाकट माणसे स्ट्रेस टेस्ट देउ शकत नाहीत..
आइ वडीलांना मुलाबद्दल आत्मविश्वास कधी महत्वाकांक्षा असते..त्या मुळे ते भाग घ्यायला सांगत असतिल . त्यांना मेडिकल ज्ञान नसते म्हणून आयोजक डॉक्टर चे प्रमाणपत्र मागतात .. तुम्ही मुळ उद्देशाला सोडून दिले ..
तुमच्या लेखनामधे "होणार नाही" ..."असावे" अशा प्रेडिक्शन ( अंदाज ) फार दिसले या वेळेस..
आणि तपासून प्रमाणपत्र देण्यात कोणाचेच नुकसान नव्हते..
मला स्वतला तुमचा दृष्टीकोन चुकीचा आणि बेजबाबदार वाटला..
उद्या माझ्या मुलाला अशा स्पर्धेत पाठवायचे तर मी तपासूनच प्रमाणपत्राचा आग्रह धरेन ..
12 May 2013 - 3:22 pm | सुबोध खरे
क्षमा करा काही गोष्टी स्पष्ट करायच्या राहून गेल्या.
ते प्रमाणपत्र म्हणजे फक्त त्या मुलाला कोणताही संसर्गजन्य रोग नाही हे प्रथम वडिलांनी/ पालकाने प्रतिज्ञापत्र द्यायचे होते (आणि त्यासाठी त्या मुलाचा एक्स रे अश्विनीत झाला होता).आणि डॉक्टरने प्रमाणित करायचे होते. यापलीकडे काहीहि डॉक्टर कडून अपेक्षित नव्हते. एक्स रे पाहून फुप्फुसाबद्दल व हृदयाबद्दल काही सांगणे शक्य नाही त्यासाठी ECG किंवा PFT(pulmonary function test) करावी लागते.यास्तव मी ते प्रमाणपत्र दिले
गैरसमजाबद्दल क्षमस्व
12 May 2013 - 3:48 pm | यशोधरा
एक्स रे काढून संसर्गजन्य रोगाचे निदान होते?
12 May 2013 - 3:52 pm | सुबोध खरे
होय क्षयरोगाचे
12 May 2013 - 5:58 pm | यशोधरा
खाली पेठकरकाकांनी म्हटल्याप्रमाणेच माझेही मत व प्रश्न.
तुम्ही न तपसताच प्रमाणपत्र दिले, हे अतिशय चुकीचे आहे असे माझे तरे मत.
12 May 2013 - 3:56 pm | स्पंदना
डॉक्टरनी सांगितल आहेच तरीही, टीबीचा पॅच एक्सरे मध्येच दिसतो.
12 May 2013 - 4:22 pm | प्रभाकर पेठकर
अहो क्षमा वगैरे काय? असे काही लिहू नका.
ही चर्चा चालू आहे त्यातील आपले कांही मुद्दे मला पटलेले नाहीत म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.
क्ष किरण चाचणीत, माझ्या अल्पमतीनुसार, फारातफार एखाद्या व्यक्तीला टि.बी. आहे किंवा कसे हे ओळखता येईल ( तो एक संसर्गजन्य रोगच आहे) परंतू इतर संसर्गजन्य रोगांचे काय? पोहण्याने हृदयावर येणार्या ताणाचे काय?
12 May 2013 - 11:43 pm | बाबा पाटील
खरे काका.. आपल्या वैद्यकिय व्यवसायाविषयी सगळच काही खर लिहु नका.कारण कधी कधी आपण त्या व्यक्ती विषयी आपल्या दृष्टीने योग्य निर्णय घेत असतो,त्या पेशंटच्याही तो हिताचाच असतो पण तथाकथीत समाजाला त्याच घंटा काही कळत नसत्,नव्हे त्यांच्या आकलनशक्तीच्या पलिकडचा तो विषय असतो आनी त्यामुळे नसते गैरसमज पसरत जातात्, आधीच आपल्या वैद्यकीय व्यवसायाविषयी कमी गैरसमज आहेत का ? त्याच्यात गुगलमहाराजांची मदत घेउन बरेच प्राणी सुपर स्पेशालिष्ट असल्याच्या अनुभुतीत वावरत असतात्, त्यामुळे हल्ली डॉक्टरांनी स्वतःच्या व्यवसायाविषयी कमी बोललेलच बर..
13 May 2013 - 1:16 am | संजय क्षीरसागर
सुबोधजी, तुम्ही फक्त शारीरिक विषयाच्या लेखनावर भर द्या. तिथे तुमचा अनुभव दांडगा आहे. नैतिक बाबतीत प्रचंड मतांतरं असतात. स्वतःला जस्टिफाय करण्यात तुमचा वेळ आणि प्रयास वाया जाईल. आणि त्यातनं निष्पन्न तर काहीही होणार नाही.
(तुमच्या माहितीसाठी, बाबा पाटीलही स्वतः डॉक्टर आहेत)
13 May 2013 - 2:37 am | प्रभाकर पेठकर
व्वा..! चांगला सल्ला आहे.
भाषा आक्षेपार्ह आहे. (डॉ.) सुबोध खरे ह्यांच्याशी चर्चा सज्जनतेच्या पातळीवर चालली आहे. व्यावहारीक जगातही 'सेकंड ओपिनियन' घेणे सर्वश्रुत आहे. म्हणजेच, पहिल्या डॉक्टरांच्या रोगनिदानावर, निवारण पद्धतीवर विश्वास नसल्याकारणाने दूसर्या डॉक्टरकडे जाण्याचा पर्याय असतो. कायद्याचीही त्याला संमती आहेच. डॉक्टर समाजाच्या कांही कार्यपद्धती खरेच आम्हा सामान्य लोकांच्या आकलनाबाहेर आहेत म्हणूनच हा चर्चेचा पर्याय.
खरंच सर्व गैरसमज आहेत? आज किती डॉक्टर तुरूंगात आहेत? कदाचित त्यांनाही गैरसमजापोटीच तुरुंगात डांबले असावे.
उलट म्हणूनच खर्या डॉक्टरांनी इतर ढोंगी डॉक्टरांचे बिंग उघडे पाडून ह्या पवित्र व्यवसायाची लाज राखली पाहीजे.
सर्वश्री सुबोध खरे आणि बाबा पाटील ह्यांनी स्वतःबद्दलची व्यक्तिगत माहीती इतर सदस्यांपासून लपवून ठेवली आहे. (त्यांच्या खात्यावर ती दिसत नाहिए.) आता दूसरे सदस्य म्हणतात की 'बाबा पाटील डॉक्टर आहेत' तर ठिक आहे, आम्ही विश्वास ठेवू. पण आपली माहिती लपवून ठेवणे, डॉक्टर असूनही आपल्या नांवासमोर तसे न लिहीणे ह्याचे कारण कांही समजू शकत नाही. ती त्यांची व्यक्तिगत गरज असेलही. पण, त्यांच्या लेखांवर, ते देत असलेल्या माहितीवर प्रश्न विचारण्याचा आणि उत्तराची अपेक्षा करण्याचा हक्क प्रत्येक सदस्याला आहे.
13 May 2013 - 6:49 am | स्पंदना
कोणत्याही व्यावसियिकाने स्वतःच्या व्यवसायाची माहिती न देणे म्हणजे लपवुन ठेवणे नव्हे.
बाबा पाटिल हे मिपावर स्वतःच्या मनोरंजंनाकरिता येत असतील, अन त्यांना येथे वैद्यकिय सल्ले देण्यात रस नसेल तर ते केवळ एक सामान्य सदस्य म्हणुन येथे येउ शकतात. त्यासाठी माहिती लपवुन ठेवली वगैरे वाक्ये बरोबर वाटत नाहीत.
13 May 2013 - 9:24 am | संजय क्षीरसागर
इथे सेकंड ओपिनियनचा प्रश्नच नाही. सुबोधजींनी टेस्ट न करता दिलेल्या सर्टिफिकेटवरनं त्यांना वेठीला धरलं जातंय. एकतर जे झालं त्यावर आता काहीही करता येत नाही. आणि स्वतःला जस्टिफाय करण्यात त्यांचा वेळ आणि प्रयास वाया चाललाय. त्यांच्या वैयक्तिक जजमेंटसाठी ते स्वतः जवाबदार आहेत. निव्वळ नैतिकबाबींवर त्यांना स्पष्टीकरण द्यायला लावणार्या चर्चा व्यर्थ आहेत. त्यांच्या शरीराविषयक अनुभवाचा आणि ज्ञानाचा सदस्यांना उपयोग व्हायचा असेल तर त्यांना मोकळेपणानं लिहीता यावं असं वातावरण ठेवावं लागेल.
13 May 2013 - 10:32 am | प्रभाकर पेठकर
मी कुठे म्हंटलय की इतर कोणी सदस्य किंवा मिपा जबाबदार आहे?
आमचाही वेळ आणि प्रयास किमती आहे. त्यांचे लेख आणि प्रतिसाद वाचण्यात आमचाही वेळ आणि अमुल्य वेळ खर्ची पडतो आहे.
त्यांना कोणी वेठीस वगैरे धरत नाहीए. भलते शब्द वापरून चर्चा भरकटवू नका. जर (डॉ.) सुबोध खरे म्हणत असतील की मला ह्या विषयावर आता काही बोलायचे नाहीए तर मीही वाद घालणार नाही.
जे कांही बोलायचे असेल ते त्यांना बोलू द्या. तुम्ही का वकीलपत्र घेताय?
13 May 2013 - 10:51 am | संजय क्षीरसागर
इतकं उघडपणे एखाद्याला कॉर्नर केल्यावर मी त्यांच्या बाजूनं लिहीलंय.
13 May 2013 - 11:21 am | यशोधरा
कॉर्नर? ब्वॉर्र!
13 May 2013 - 10:17 am | प्रभाकर पेठकर
अगदी सहमत. माझा त्यांच्यावर (किंवा श्री. सुबोध खरे ह्यांच्यावरही) कांही आरोप नाहीए फक्त त्यांच्या वैयक्तिक खात्यात तशी नोंद दिसत नाही एवढेच मी निदर्शनास आणले.
पण मग इतर सदस्यांनी त्यांच्या डॉक्टर असण्याचा अनावश्यक उल्लेख इथे करू नये.
13 May 2013 - 11:00 am | संजय क्षीरसागर
सुबोध खरे नवसदस्य असल्यानं बाबा पाटील डॉक्टर आहेत याची त्यांना कल्पना नसेल म्हणून ते सांगितलंय. एका डॉक्टरनं दुसर्या समव्यावसायिकाला दिलेला सल्ला हा इतर सदस्यांनी त्यांच्या व्यक्तिगत निर्णयावर चालवलेल्या चर्चेत मोलाचा आहे.
13 May 2013 - 1:02 pm | प्रभाकर पेठकर
श्री. बाबा पाटील ह्यांची ही भाषा आक्षेपार्ह आणि चर्चा करणार्या सदस्यांचा अपमान करणारी आहे. चर्चा करायचीच नाही का? तसं तरी एकदा सांगा. नाही करणार. इतर सदस्य जे कांही भलंबुरं लिहीतील त्याला 'हो ला हो' भरत आणि हाताला हात लावून 'मम' म्हणण्याचे काम करू. आम्हाला खरंच ** कांही कळत नसेल तर आरतीचे तबक उचलून ओवाळण्याचे तरी काम करू. त्याला तर कांही आकलनशक्ती लागत नाही नं!
(डॉ.) सुबोध खरे आणि श्री. बाबा पाटील ह्यांना वेगवेगळे प्रतिसाद दिले आहेत. त्यांच्या भूमिका त्या प्रतिसादांच्या उत्तरातून कळतीलच.
एकमेकांना, व्यक्तिगत निरोपातून सल्ले दिल्यास अधिक श्रेयस्कर ठरेल.
13 May 2013 - 1:42 pm | संजय क्षीरसागर
मी प्रतिसादाच्या अर्थाशी सहमती दर्शवली आहे.
13 May 2013 - 7:05 pm | अप्पा जोगळेकर
आधीच आपल्या वैद्यकीय व्यवसायाविषयी कमी गैरसमज आहेत का ?
असे गैरसमज का आहेत याचा विचार व्हावा.
13 May 2013 - 1:28 am | सुवर्णमयी
लेखन आवडले.
इतर अनुभव
वाचायला आवडतील
13 May 2013 - 10:29 am | विसोबा खेचर
सोनालीशी सहमत..
13 May 2013 - 7:11 pm | आजानुकर्ण
तात्यांशी सहमत..
बाकी डॉ. खरे यांचा तपासणी न करता सर्टिफिकेट देण्याचा निर्णय आणि नंतर त्याचे समर्थन हे दोन्हीही पटले नाही.
13 May 2013 - 8:51 pm | पैसा
एकूण गमतीजमती किस्से आवडले.
वैद्यकीय प्रमाणपत्रावरून वाद बघते आहे. कधी कधी आपल्याला सुद्धा दुसरी कसली रजा शिल्लक नसेल तर रजा मिळविण्यासाठी आजारी असल्याची खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळवावी लागतात आणि वैयक्तिक संबंधांमुळे डॉक्टर लोकांना ती द्यावी लागतात. त्यात इतर कोणाला काही नुकसान नसतं.
13 May 2013 - 9:00 pm | यशोधरा
पण हे रजेसाठी नव्हते ना पैसाताई? २०० किमी पोहण्याच्या स्पर्धेसाठी हवे होते.
13 May 2013 - 9:27 pm | सुबोध खरे
पेठकर साहेबाना दिलेला प्रतीसाद मी परत सर्वांसाठी पाठवत आहे. मला वाटले वादळ शमले.
असो
पेठकर साहेब
एक महिन्यानंतर वाराणसीला होणार्या पोहोण्याच्या स्पर्धेसाठी उमेदवाराला संसर्गजन्य रोग ( यात इंफ्ल्यूएन्झा, टायफोईड, गोवर कांजिण्या किंवा कावीळ असू शकते ) नाही हे प्रमाणपत्र कोणता डॉक्टर कसा देणार होता? पुढच्या एक महिन्यात काही रोग होईल कि नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषीच लागेल. त्या वैद्यकीय प्रमाणपत्राचे तर्कशास्त्रच मला समजले नाही. त्यातल्या त्यात क्षयरोग नाही एवढे पाहणे शक्य होते तेवढेच केले. एवढेच्मी सांगू इच्छितो बाकी मला जे म्हणायचे आहे ते मी म्हटलेच आहे.
धन्यवाद
14 May 2013 - 2:49 am | प्रभाकर पेठकर
ह्या वरील स्पष्टीकरणावर मी खालील प्रत्युत्तर पाठवले आहे.:
मान्य आहे.
सर्वसाधारणपणे, जेंव्हा वैद्यकिय तपासणी होते तेंव्हा 'त्या घडीला' कुठलाही संसर्गजन्य रोग नाही एवढेच प्रमाणित केलेले असते. महिन्याभरानंतरची भविष्यवाणी वैद्यकिय अधिकार्याकडून अपेक्षितही नसते.
इथे आखातात येताना आणि त्या नंतर दर दोन वर्षांनी अशा संसर्गजन्य रोगांच्या तपासण्या करून घ्याव्या लागतात त्यामुळे एक 'रुग्ण्' (हाच शब्द योग्य असेल तर) म्हणून मला बर्यापैकी अनुभव आहे.
एकंदरीत घटनेची मांडणी चुकीची झाली आहे (त्यामुळे गैरसमज पसरले) असे म्हणावेसे वाटते.
उत्तराबद्दल धन्यवाद.
14 May 2013 - 9:26 am | सुनील
प्रमाणपत्र हे २०० किमी पोहोण्याबद्दलच्या शारिरीक क्षमतेविषयी नसून संसर्गजन्य रोगाविषयी हवे होते, हे मूळ लेखात पुरेसे स्पष्ट न झाल्यामुळे गैरसमज झाले, असे दिसते.
असो, अनुभव वाचीत आहेच.