विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 3
बुद्धिप्रामाण्यवाद आणि परामानसशास्त्र
प्रस्तावना
विश्वाचे ज्ञान केवळ पाच ज्ञानेंद्रियांमार्फतच ( किंवा त्यांची शक्ती वाढवणाऱ्या वैज्ञानिक उपकरणांमार्फतच होऊ शकते असे बुद्धिवाद मानतो. विश्वाचे ज्ञान तर्काने होऊ शकते - विश्व बुद्धिगम्य आहे - या बुद्धिवाद्यांच्या श्रद्धेला आधुनिक भौतविज्ञानातील शोधांनीच त़डा गेला असून ही श्रद्धा भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने तरी निराधार असल्याचे दिसून आले आहे. हे मागील दोन प्रकरणात आपण पाहिले. प्रस्तूत तिसऱ्या प्रकरणात मानवाच्या पंचेंद्रियांमार्फतच विश्वाचे ज्ञान होऊ शकते ही बुद्धिवाद्यांची जी दुसरी श्रद्धा आहे , ती कितपत बरोबर आहे हे पाहावयाचे आहे.
ऐतिहसिक दृष्ट्या अतींद्रियशक्ती हा विषय भुताटकी, अंगात येणे, जादू टोणा, चेटूक आदी गोष्टींशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे पहाण्याचा माणसांचा दृष्टिकोण कधीच निःपक्ष किंवा शास्त्रीय राहू शकलेला नाही. नेहमीच तो भावनात्मक राहिला आहे. त्यामुळे याविषयाच्या बाबतीत नेहमीच अगदी टोकाचे दृष्टिकोण आढळून येतात.
एकः याविषयी आंधळी श्रद्धा बाळगणे म्हणजे याविषयी पुराव्यांचा विचार न करता सर्व काही खरे असते असे मानणे.
दुसरेः याविषयी आंधळी अश्रद्धा बाळगणे म्हणजे याविषयी पुराव्याचा विचार न करता सर्व काही खोटे असते, असे मानणे. याविषयी खरे खोटे निवडणारा शास्त्रीय दृष्टिकोण असू शकतो हे कळायला मनुष्याला नेहमी जड गेल्याचे दिसून येते.
याबाबतीत पुरुषाच्या स्त्रीकडे पाहण्याच्या ऐतिहासिक दृष्टिकोणाची तुलना करण्यासारखी आहे. इतिहासावरून दिसून येते की, पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोण कधीच निःपक्ष किंवा शास्त्रीय राहिलेला नाही नेहमीच तो भावनात्मक राहिलेला आहे. या ऐतिहासिक - पौराणिक दृष्टीतून पाहता असे दिसून येते की, पुरुषाने स्त्रीला एक तर देवता (किंव जगन्माता) मानलेली आहे, नाहीतर चेटकीण (भोगदासी) मानलेली आहे. तिला बरोबरीचा माणूस म्हणून मानणे त्याला नेहमीच जड गेल्याचे दिसून येते. समाजशास्त्राने स्त्रीचा शास्त्रीय दृष्टीकोणातून विचार करून तिला जसे पुरुषाबरोबरीचे समाजात स्थान दिले आहे तसे परामानसशास्त्राने अतींद्रिय विषयाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहून त्याला विज्ञानात इतर वैज्ञानिक विषयाबरोबरीचे मानाचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्रीला भोगदासी (किंवा चेटकीण) मानणाऱ्या जुन्या पुरुषप्रधान समाजातील पुरुषांप्रमाणे किंवा तिला देवता मानणाऱ्या धर्ममार्तंडांप्रमाणे अतींद्रिय हे थोतांड मानणारे प्रस्थापित विज्ञानवादी व बुद्धिवादी आणि अतींद्रियातील सर्वच चमत्कार खरे मानणारे अंधश्रद्धाळू हे दोघेही अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे!
बुद्धिवाद विज्ञानाच्या प्रगतीतील एक अडथळा
मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने एक तर्क केला आहे की मध्ययुगातील अंधश्रद्धा व जादूटोणा याविरुद्ध विज्ञानाने मिळवलेला विजय अतींद्रिय शक्तिचे अस्तित्व मान्य केले तर वाया जाईल अशी शास्त्रज्ञांना भिती वाटते. व पुन्हा अंधश्रद्धेचा सुळसुळाट होईल हा तर्क कितपत योग्य आहे हे सांगता येत नाही. खरे कारण माझ्यामते भावनिक आहे. काही लोकांना आपल्या आवडत्या सिद्धांताविरुद्ध एखादी घटना घडते, हेच मान्य होत नाही. ती घडावी ही गोष्टच त्यांना आवडत नाही, आणि जी गोष्ट आवडत नाही ती घडतच नाही असे ते मानतात. मग तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा ती खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हे दोनच पर्याय त्यांच्या पुढे उरतात. ती खोटी आहे हे सिद्ध करणे कठीण असल्यामुळे याविषयी प्रयोग करणाऱ्यांच्या हेतू विषयीच मग शंका घेण्यात येते. अतींद्रिय शक्तींवरील प्रयोगाबाबत लबाडी(Fraud) चा आरोप वरचेवर का करण्यात येतो याचा यावरून उलगडा होईल.
काही शास्त्रज्ञ मात्र अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व अज्ञानातून किंवा निव्वळ आडमुठेपणातून नाकारतात, ही वस्तुस्थिती आहे. याविषयी आयसेंक हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘एखाद्या क्षेत्रात नैपुण्य(Specialization) संपादन केलेल्या शास्त्रज्ञाचे मत इतर त्याने नैपुण्य न संपादलेल्या विषयात प्रमाण म्हणून स्वीकारणे धोक्याचे असते. कारण त्यात त्याचे ज्ञान शून्य असल्यामुळे आपल्या नैपुण्यक्षेत्रातील पुर्वग्रह त्यात घुसडून तो त्या विषयी आडमुठेपणा (pigheadedness) स्वीकारतो."
बऱ्याच तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे अतींद्रिय विषयक धोरण असे आडमुठेच आहे आणि त्याचे हेच कारण आहे. आता कोणी म्हणेल की, अतींद्रिय शक्तिंचे अस्तित्व वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केल्यानंतर सुद्धा ते आडमुठेपणाने नाकारणारे शास्त्रज्ञ खरोखरीच कोणी आहेत काय? ही पहा उदाहरणे –
वॅरन वीव्हर हा कम्युनिकेशन (दळणवळण) सिद्धांताचा संस्थापक शास्त्रज्ञ म्हणतो, ‘अतींद्रिय शक्ती मला बौद्धिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी आणि मनाला यातना देणारी वाटते आणि म्हणून जे. बी. ऱ्हाईन यांनी सादर केलेले तिच्या अस्तित्वाविषयाचे पुरावे मला नाकारता येत नसले तरी ते मी स्वीकारत नाही’.
हेब हा मानसशास्त्रज्ञ खुलेपणाने म्हणतो, ‘अतींद्रिय शक्तींचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आणखी (further)पुराव्याची आपल्याला आता गरज नाही, कारण त्या शक्तीच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. ती तर्काविरुद्ध व बुद्धिला न पटणारी आहे, आणि म्हणून ती आपल्याला मुळीच मान्य नाही’.
विल्यम जेम्स या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञापुढे एका आघाडीच्या जीवशास्त्रज्ञाने पुढील उद्गार काढल्याचे जेम्स याने आपल्या, ‘The Will to Believe’ या ग्रंथात म्हटले आहे. की हा जीवशास्त्रज्ञ म्हणतो, ‘अतींद्रिय शक्ती खरी असली तरी शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ती दडपून टाकली पाहिजे. किंवा सर्वापासून ती लपवून ठेवला पाहिजे. कारण निसर्गाच्या एकवाक्यतेला (Uniformity of Nature) त्यामुळे बाधा येते व विज्ञानाचे कार्य चालणे अशक्य होते.'
बुद्धिला पटत नाही म्हणून किंवा मनाला यातना होतात म्हणून एखादे सत्य झाकून ठेवून विज्ञानाचे कार्य करणाऱ्या या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक दृष्टिकोणाविषयी काय बोलावे! नको असलेले वैज्ञानिक सत्य दडपून टाकू इच्छिणारे हे शास्त्रज्ञ मूल रडू लागले तर त्याला स्तनपान देण्याऐवजी त्याच्या तोंडात बोळा कोंबायला सांगतील अशा पद्धतीने विज्ञानाचे कार्य करणे बुद्धिद्यांना आवडत असले तरी शास्त्रज्ञांनी तसे करणे ही विज्ञानवृत्तीशी प्रतारणा ठरेल. कारण बुद्धिला न पटणाऱ्या गोष्टी स्वीकारणे, हे विज्ञानाचे पहिले आद्यकर्तव्य असल्याचे विज्ञानाच्या जन्माचा इतिहासच सांगतो.
याशिवाय इथे वाचा
· विश्वाकडे पहायच्या वैज्ञानिक दृष्टीत क्रांती
· भौतिक वादाला कायमची मूठमाती
· अतींद्रिया बद्दल अपप्रचार
· अतींद्रिय संशोधकांविषयी काही गैरसमज
प्रतिक्रिया
16 Jun 2012 - 12:52 am | चित्रगुप्त
पतंजलींच्या योगसूत्रात ज्ञान-प्राप्तीची तीन साधने सांगितली आहेतः
' प्रत्यक्षानुमानागमः प्रमाणानि '
यातील "प्रत्यक्ष" हे इंद्रियातीत - अंतःस्फुरणेने मिळणारे ज्ञान.
16 Jun 2012 - 4:37 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
अंतः स्फुरण हे ही अतींद्रिय ज्ञान मानावे काय?
तर मग गळतगे जे परामानस शास्त्राच्या विरोधात असलेल्यांबद्दल म्हणतात की -
अतींद्रिय शक्ती मुळात अस्तित्वातच नाहीत, असे अगोदर गृहीत धरण्याच्या विज्ञानवृत्तीला न शोभणारा पुर्वग्रहदूषित दृष्टिकोण स्वीकारून, केवळ काही भोंदूगिरी करणाऱ्यांची उदाहरणे निवडून व काही घटनांचा चुकीचा अर्थ लावून अभिनिवेशयुक्त उथळ व प्रचारकी थाटाचे लिखाण करणाऱ्या श्रीलंकेच्या कोवूर या भौतिकवाद्याच्या 'Begone' व 'Godmen, Gods, Demons and Spirits' ....या दोन्ही पुस्तकात परामानसशास्त्रातील शेकडो खऱ्या व प्रमाणीभूत (Documented) घटनांपैकी एकाही घटना उल्लेखलेली नाही. व जे बी. ऱ्हाईन यांच्यावर खोटी टीका करणाऱ्या काही अप्रसिद्ध बुद्धिवाद्यांच्या मतांचा उल्लेख आवर्जून केला आहे.
यावर आपल्याला काय वाटते?
16 Jun 2012 - 5:09 pm | चित्रगुप्त
तुम्ही उल्लेखिलेल्या पुस्तकांपैकी एक ही वाचलेले नसल्याने आम्ही काय बोलणार?
तसेच अतिंद्रीय ज्ञानाचा साक्षात अनुभव घेतल्याखेरीज काहीही बोलणे, हे अनुमान व आगम यात मोडते.
16 Jun 2012 - 9:21 pm | शशिकांत ओक
चित्र गुप्त,
या धाग्याशी काही नाते नसेल तरीही आपल्या अन्य ध्याग्यांवरील कलाकृतीवर इथे लिहावेसे प्रकर्षाने वाटून ...
आपली चित्रे इतकी सुंदर व अप्रतीम आहेत, त्याची निर्मिती करत असता जसे बालक मोठ्या निरागसतेने कलाकृतीकडे पाहून त्यातील रंग-रेषांचा आत्मिक आनंद नुसत्या हुंकाराने व हात हालवून करून संतोषते, तसे इथले मिपाकर आपल्या कुंचल्याच्या करामतीवर फिदा आहेत त्यातलाच एक मी.
18 Jun 2012 - 5:39 pm | शशिकांत ओक
मित्रा,
जर वाचले नसेल तर वाचा. वाचून मग सांगा.
मी ती माहिती वा पुस्तके वाचणार नाही, कारण ते विचार माझ्या पुर्वग्रहामुळे बदलणारे नाहीत असे मी आधीच ठरवलेले असेल तर त्याला कितीही पुरावे वा लिखाण कमीत पडणार....
वरील म्हणणे मलाही लागू पडते असे कोणी तर्क करेल पण मी अनुभव घेऊन विशेषतः नाडी बद्दल पुराव्यानिशी लिहितो. अन्य बिना पुराव्याने किल्ला लढवायचा प्रयत्न करतात. ते गळतगे यांच्या कथनाप्रमाणे विज्ञानाशी प्रतारणा करतात.
16 Jun 2012 - 4:46 pm | राजघराणं
पराशेठ च्या मनाचा अभ्यास गळतगेनी कधिपासून सुरू केला ?
परामानसशास्त्र
16 Jun 2012 - 3:02 pm | प्यारे१
< घनाची आई मोड> अगं बाआआआई, आले का हे? या म्हणावं की काआआआय म्हणावं हेच सुचेनासं झालंय < घनाची आई मोड>
16 Jun 2012 - 3:52 pm | नाना चेंगट
<घनाचा बाबा मोड> हे बघ प्यारे, आपल्या हातात काही आहे का? यायचं तर येतील ते नाही तर नाही. आपण काळजी करायची नाही. < / घनाचे बाबा मोड>
<राधा मोड> हे बघा मि ओक तुम्ही असं केव्हाही ये जा करायची नाही. एक दिवस ठरवून घ्या बघु तुम्ही आठवड्यातला< / राधा मोड>
<घना मोड> आले का? ओक ,..ओक काका. ओ हाय कसे आहात? नाही मी जरा मधे बिज बिज्जी होतो. एकदा यायचं आहे तुमच्याकडे नाडि पहायला. नाही म्हणजे मला अमेरीकेला जाता येईल की नाही हे बघायचं होतं. बाकी विशेष नाही.. आपलं असंच.. येउ ना? < / घना मोड>
असो. बाकीचे मोड परत कधीतरी...
18 Jun 2012 - 10:59 pm | शशिकांत ओक
आणि किती चेंगटपणा करणार?
17 Jun 2012 - 5:05 pm | चित्रगुप्त
ओक साहेब, तुमची अभ्यासू वृत्ती, स्वतंत्र विचार करायची क्षमता, एखाद्या विषयाचा पाठपुरावा करण्यातील चिकाटी इ. गुण वाखाणण्यायोग्य आहेत, परंतु तुम्ही गळतगे, चितळे बाबा, नाडीवाले वा अन्य कुणा-कुणाची तळी उचलून धरण्यापेक्षा अगदी स्वतःचे असे काही मौलिक अनुभव निष्पक्षपणे सांगितलेत, तर ते जास्त भावेल.
17 Jun 2012 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा
@अगदी स्वतःचे असे काही मौलिक अनुभव निष्पक्षपणे सांगितलेत, तर ते जास्त भावेल.>>>++++++++++++++++++ ११११११११११११११११११११११११
18 Jun 2012 - 5:16 pm | शशिकांत ओक
मित्रांनो व चित्रगुप्त,
आपणच म्हणता -
असे जर आहे तर अन्य कोणते ही लिखाण वा कृती ही स्वतंत्र वा मौलिक असू शकेल काय? अगदी काढलेले चित्र वा फोटो किंवा धाग्यातील विचार आत्मसाक्षात्काराशिवाय असल्यास ते देखील कोणाची तरी तळी उचलून घरणारे असणार.
आणि मला भावलेले विचार वा वाङ्मय जर मी अनुभव घेऊन लिहित आहे, आणि जर ते विज्ञानाचे पहिले आद्यकर्तव्य असेल तर मग आपल्याला ते वावगे नसावे.
6 Jul 2012 - 11:49 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
ज्या लोकांची मनोवृत्ती प्रा. गळतगे म्हणतात त्या प्रमाणे आडमुठेपणामुळे परामानसशास्त्राला नाकारण्याची आहे. याचे खरे कारण भावनिक आहे.
ते कसे... ते त्यांच्या लेखातील अतिंद्रिय संशोधनाविषयी काही गैर समज यामधे वाचावेत
ते असो...
बुद्धिवादाने विज्ञानाची प्रतारण कशी ठरते यावर प्रा. गळतगे यांचे काय विधान मान्य नाही ते लिहा.