एवढ्यातच दादा कोंडके यांचे 'एकटा जीव' हे आत्मचरित्र वाचले होते. धमाल आली होती वाचताना. त्यात 'शेणसार बोर्ड' नावाचे एक प्रकरण आहे. दादा कोंडक्यांनी त्यात त्यांचे सेन्सॉर बोर्डाबरोबर, विषेशतः बोर्डावरील स्त्रियांबरोबर, झालेले वादविवाद मजेशीर पद्धातीने कथन केलेत. श्लील - अश्लील, अभिरुचीहीनता, चावट - वात्रट ह्यातली धूसर रेषा, चांगले-वाईट ह्यावरची त्या उच्च्विद्याविभूषित (?) महिलांची दादांशी चर्चा करताना उडालेली त्रेधातिरपीट त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सादर केली आहे.
त्यात त्यांनी मोरोपंतांच्या एका चावट वाटणार्या आर्येचा दाखला (ती आर्या इथे द्यायचा मोह टाळतोय, उगा कोणाच्या भावना दुखावल्या जाउन आक्षेप व्हायला नको) शांता शेळकेंना देऊन, चागले काय वाईट काय हे प्रेक्षकांना ठरवू द्या, चांगले नसेल तर प्रेक्षकच स्विकारणार नाहीत हे समजावून सांगितले होते.
दादांची काय अवस्था त्यावेळी होत असेल हे खरोखर पटते आणि 'दादा, तुस्सी ग्रेट थे' असे वाटून जाते.
प्रतिक्रिया
9 May 2012 - 8:58 pm | मन१
लेख अपूर्ण राहिलाय काय?
सोत्रिचा अदवाइज फॅन
9 May 2012 - 9:13 pm | बॅटमॅन
सोत्रि, ती आर्या व्यनि करा ना प्लीज प्लीज :P
9 May 2012 - 9:28 pm | आबा
मला पण !
फारच थोडक्यात परिचय करून दिलात हो सोत्री !
9 May 2012 - 9:42 pm | यकु
काय आहे सोकाजीराव, काही लोकांना काही गोष्टी 'इन देअर होल स्पिरिट' जाणवत नाहीत.
त्यांची ग्रहण क्षमता कमी असते कदाचित किंवा पक्के रुतून बसलेले पूर्वग्रह असतील - या पूर्वग्रहांनाच असे लोक 'तत्त्वे' मानत असतील. आणि मग हे लोक काही गोष्टी स्वत:च्या जीवंत अनुभूतीतून जाणवून घेण्याऐवजी मद्दड तत्वांवर घासून बघत असतील.
मग कसं जमायचं हो? त्या बोर्डाचं शेणसार बोर्डच होणार!
आपण काय चार घटका सिनेमा पहायला जाणार - त्यात हसणार, रडणार, जीवंत माणसं हायत ना आपण! तो आपला दोष.
बाकी जास्त काय बोलायचं.. आपल्या आयुष्यात आपण कधी कोणती तत्वं ठरवली नाहीत - जेव्हा हसू येतं तेव्हा हसतो न् हसवतो - दादा कोंडक्यांसारखंच. रडू येईल तेव्हा धाय मोकलून रडतो..
जमत नाही देवा सगळ्याच गोष्टी एक्सप्लेन करुन दाखवणं..
नाहीतरी काय, चार लोकांसोबत पटलं नाही, म्हणून दादा कोंडकेंचे पिक्चर बंद थोडेच पडले? तसंच हे.
9 May 2012 - 10:05 pm | सोत्रि
हे दोन्ही 'बघण्याचे दृष्टीकोन' उधृत करून 'दादां'ना जे नेमके म्हणायचे होते ते तु अचूक पकडलेस यक्कु, त्याबद्दल तुला एक जहाल कॉकटेल माझ्याकडून! :)
हे जेव्हा सर्वांना कळेल तो आंजावरचा सुदिन, तेव्हा मी तुझ्याबरोबर परिक्रमेला नक्की येइन ;)
- (दादांचा ग्रेटनेस मान्य केलेला) सोकाजी
9 May 2012 - 10:51 pm | यकु
तुम्ही काही म्हणा सोकाशेठ सर्व माणसे सारखीच! कॉकटेल ! ;-)
हॅहॅहॅ
कल्पांत.. कल्पांत उलटेल हा सुदिन उगवायला. आपल्या आधीच्या बर्याच लोकांचे सुदिन येणे अजून बाकी आहे ;-)
पण खयाल अच्छा है ;-)
9 May 2012 - 9:47 pm | अँग्री बर्ड
कृपया , मला पण व्यनी करा. ;)
पण मला आधी वाटलं की कलकत्त्याच्या प्रिन्स बद्दल बोलताय. पण तुम्ही मूळ पोस्ट फारच छोटी टाकली की वो, की फक्त आर्येसाठी लेखन प्रपंच केलात :)
10 May 2012 - 2:23 pm | कपिलमुनी
दादा ...तुस्सी ग्रेट नही हो ..
http://www.youtube.com/watch?v=izsJ3X2g6w0&feature=share
9 May 2012 - 9:57 pm | प्रचेतस
स्वस्त्री घरात नसता...
हीच ती मोरोपंतआंची आर्या काय हो सोत्री गुर्जी?
9 May 2012 - 10:10 pm | सोत्रि
_/!\_
चरण करा पुढे!
- (वाकलेला हे अभिरूचीहीन समजले जाईल म्हणून खोडलेला) सोकाजी
9 May 2012 - 11:14 pm | प्रचेतस
चला, दोघेही मोरोपंतांचे चरण धरूयात.
त्या काळात अशी अद्भूत आर्या लिहिणं म्हणजे कमाल आहे. :)
9 May 2012 - 11:16 pm | JAGOMOHANPYARE
स्वस्त्री घरात नसता ... असे गुगल केले. लगेच मिळाली. :) दादा एक महान कवी होते. हे अंजनीच्या सूता, ढगाला लागली कळ मधील शेवटचे कडवे त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.
11 May 2012 - 12:44 pm | बॅटमॅन
मिळाली हो आर्या.....खल्लास झालो बघा वाचून...उगीच नाही म्हणत पंत ग्रेट होते :)
9 May 2012 - 11:36 pm | चिंतामणी
हा श्लेष प्रसिद्ध आहे, अनेकांना त्याचा अर्थ माहिती असेलच असे नाही.
10 May 2012 - 11:58 am | विकाल
.... जिभेचा समानार्थी शब्द तो.. लागला का अर्थ?
13 May 2012 - 2:22 am | निशदे
हे मोरोपंत अन वल्ली दोघांनाही........
कहर आहे..........
9 May 2012 - 10:59 pm | धनंजय
जुनी चावट काव्ये खूप होती. पण मोरोपंतांची आर्या म्हणजे जरा अवजड शब्द असण्याची शक्यता अधिक वाटते.
त्यापेक्षा शाहिरी काव्यांचे दाखले दिले असते, तर अधिक सापडले असते. आणि वात्रटपणा समजायला सोपेही असते.
9 May 2012 - 11:07 pm | यकु
10 May 2012 - 5:56 pm | मस्तानी
धन्यवाद यक्कू !
9 May 2012 - 11:31 pm | JAGOMOHANPYARE
एकदा दादाना असेच सेन्सर बोर्डाने अडवले म्हणे, तर दादा म्हणाले म्हणे तुम्हाला द्वि अर्थी जाहिराती चालतात, मग माझे संवाद का नाही चालत? ते म्हणाले कुठली जाहीरात? दादा म्हणाले.. जरा सा रीन थोडा सा रीन ( जरा सारीन थोडा सारीन .. :) )
9 May 2012 - 11:59 pm | दादा कोंडके
कॉलेजात असताना तेरी चू चू चू आणि मेरा लं लं लं असं काहितरी अशक्य गाणं ऐकून पो :) ट दुखेपर्यंत हसलो होतो!
10 May 2012 - 10:45 am | गणामास्तर
दादांचा असाच एक ऐकलेला किस्सा.
एकदा दादांची सेन्सॉर बोर्ड बरोबर नेहमी प्रमाणे जुगलबंदी चालू असताना कुणी तरी विचारले कि दादा तुम्ही कौटुंबिक किंवा धार्मिकचित्रपट का नाही बनवत कधी? दादा म्हणाले बनवतोय ना एक धार्मिक चित्रपट.
समोरच्या व्यक्तीने विचारले कुठला?
दादा उत्तरले, "चोखा म्हणे माझा"..
10 May 2012 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार
किस्से वाचून जाम धमाल आली.
सोत्रि ये टैम तुझे लेखन अपेक्षापुर्ती करणारे झाले नसल्याची खंत व्यक्त करतो आहे रे.
मला पण एकदम दादांच्या कोर्टातल्या साक्षीतला 'मामाच्या पोरीला फ्रिझ..' वाला किस्सा आठवला.
बाकी वरती भिडे साहेब म्हणाले तसेच मला पण दादाचा आयपीएल मधला भरघोस परफॉर्मन्स बघून काही लेख आला असावा असेच वाटले.
10 May 2012 - 1:07 pm | सहज
सोत्रीसाहेबांना त्यांच्या उडालेल्या लेखाचा त्यातल्या त्यात सौम्य निषेध व्यक्त करायचा असेल म्हणून हा लेख आला असावा असा माझा अंदाज. खुलासा सोत्रीसाहेब करतीलच. तरीपण हा लेख स्वांतसुखाय का तक्राराय म्हणतात तसा असावा अशी माझी अटकळ. पक्षी: हा लेख अपेक्षापूर्ती कम और इच्छापूर्ती ज्यादा.
याच बरोबर कदाचित माझ्या अटकळीला असहमतीचा, तुझ्या तक्रारीला पोच देणारा व रसिकजनांच्या पसंतीला पात्र असा नवा लेख लवकरच लिहीन असे आश्वस्त करणारा प्रतिसाद सोत्रीसाहेबांकडून येईल असे वाटतेय.
10 May 2012 - 1:33 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा
असे असल्यास सोत्रिअण्णाला अजून कोणाकडून आणि काय अपेक्षा ठेवव्यात हे लक्षात आलेले नाही हे बघून दु:ख व्यक्त करतो.
10 May 2012 - 2:03 pm | विकाल
सोत्रि अण्णा
राव दादांच्या लेखाला असच काय तरी दादा एशटाईल नाव द्यायचं ना.. बघा म्हणजे ... दादा तुमचं लै दांडंग होतं... जीवन ओ..!!!
बघा सुचतयं का अजून काही...
10 May 2012 - 2:31 pm | वसईचे किल्लेदार
हा हा हा ... दादा वाचताय होय ... तरीच "एक किस्सा – दगड आणि खड्डे" आठवला!
सलाम तुम्हाला ☺
10 May 2012 - 3:42 pm | अन्या दातार
शांताबाईंबरोबर झालेले घुंगराबद्दलचा उतारा (पुस्तकातील वेचा! नाहीतर सोत्रिंचा धागा आहे म्हणून वेगळाच 'उतारा' वाटेल म्हणून हे स्पष्टीकरण ;) ) देऊ शकाल काय??
नीटसा आठवत नाहीये तो सगळा प्रसंग; फक्त एक वाक्य देतो: "तुम्हाला वाटते तितके खाली येत नाही घुंगरु"
10 May 2012 - 6:56 pm | jaypal
सभसदाच्या अॅडिशन साठी जागा असावी म्हणुन सोकाजीरावांनी लेख लहान केला असावा.
सोत्री आपण पण दादांचे फ्यॅन आहात मग आता खुब जमेगा रंग.
दादा गिरीची एक झलक
11 May 2012 - 8:01 am | योगी९००
बर्याच दिवसांनी मि.पा. वर आलोय...दादांवर लेख म्हणून प्रतिक्रिया देतोय.
"एकटा जीव" हे अपर्णा पाध्ये यांचे पुस्तक. यात दादांचे बरेच किस्से आहेत.
व्ही शांताराम यांच्या मुलाचे किस्से, मासळीबाजारतले ठरकी शेठ, लता, आशा आणि उषा चव्हाण यांचे किस्से वाचून धमाल आली.
काही चावट किस्से टाकायचा मोह होतोय...पण त्यासाठी माझ्यामते वेगळा धागा उघडलेला चांगला...
11 May 2012 - 8:42 am | सोत्रि
बर्याच दिवसांनंतर मिपावर येताय म्हणून एक फुकटचा सल्ला, हा मोह टाळा!
जर टाळू शकणार नसालच तर दादांचे चावट किस्से तर अज्याबात टाकू नका ते समजण्यासाठी आणि पचवण्यासाठी छाती काळीज मोठे असावे लागते :D
तुम्ही फारतर आपण जे १-४ थीत असताना जे चावट ज्योक सांगायचो ना (हत्ती पादला पू पू वगैरे) ते चावट किस्से इथे टाका! उडंड स्मायल्या मिळतील.
- (मोह टाळू न शकलेला) सोकाजी
11 May 2012 - 10:58 am | वसईचे किल्लेदार
राग (निषेध) व्यक्त करण्याची आपली पध्द्त आवडली बरं!
खजुराहोच्या शील्पकलेचा आणी दादांचाहि चाहता
12 May 2012 - 8:03 am | चिंतामणी
बाकी मिपाच्या व्यथेवर अचूक बोट ठेवले हो सोत्री तु.
11 May 2012 - 1:33 pm | गवि
हा बराच संशयास्पद मुद्दा आहे. सेन्सॉर नसावं हे ठीकच पण म्हणून लोक चांगलं वाईट असा फरक करतील असं सांगणं कठीण आहे. मुळात चांगलं वाईट हेच इतकं रिलेटिव्ह आहे की त्यावर निष्कर्ष काढताच येत नाही.
लोकांना सेक्सवर मारलेल्या कोपरखळ्यांनी गुदगुल्या होतात म्हणून लोकांना ते आवडतं. तिथे काही उच्च नीच असा भाव करायचाच झाला तर तो आपापल्या व्यक्तिगत पार्श्वभूमीवर (श्लेष नाही) अवलंबून आहे. .. किती पातळी म्हणजे "खालची" हे कधी कोणालाच ठरवता येत नाही.
नॉनव्हेज खातो .. पण गाय नाही बुवा..
बीफला काय प्रॉब्लेम.. उगीच धार्मिक श्रद्धा नाहीत आमच्या.. पण सापबीप अन झुरळं नाही खाऊ शकणार बुवा..किळस येते.
चावट विनोद करतो.. पण देवावर नाही बुवा..
सदा सर्वदा योग तूझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा..
यात डबल मीनिंग. शी.. श्रद्धास्थान आहे ते आमचं..
इ.इ. अशातला प्रकार कधीच संपणार नाही.
एकदा का संभोगार्थाने अर्थ काढायचेच म्हटले की मग कशातही ते शोधता येईल. अगदी गायत्री मंत्राच्या शेवटच्या दोन शब्दांतही..
11 May 2012 - 2:50 pm | वसईचे किल्लेदार
संशयास्पद किंवा वादग्रस्त मुद्दा जरी असला तरी आपण त्या मुद्द्यावर किती दिवस पांघरुण घालु शकतो? आणि का?
कोंबडे कितीही झाकले तरी ...
11 May 2012 - 11:24 pm | आशु जोग
याविषयाशी संबंधित म्हणून आठवलं
मराठीतला असा लेखक आपल्याला माहीत आहे का
की ज्याची अनेक नाटके चालली. ३, ३ नाटके एका वेळेस चालू असत.
काही नाटके आजही चालतात. ज्यांच्या कथेवरचे सिनेमे खूप हीट झाले.
यशस्वी नाटक, सिनेमांची संख्या कदाचित पुलं पेक्षाही अधिक भरेल.
--
माझा अनुभव असा आहे
यांची नाटके, सिनेमे सगळ्यांना माहीत असतात.
पण या लेखकाचं नाव फारसं कुणाच्या लक्षात नसतं .
त्यांच्या कामाची यादी -
नाटके:
विच्छा माझी पुरी करा
अप्पाजींची सेक्रेटरी
घरोघरी हीच बोंब
सिनेमे:
हर्या नार्या झिंदाबाद
बन्याबापू
सोंगाड्या
एकटा जीव सदाशिव
नवरी मिळे नवर्याला
अशी ही बनवाबनवी
गीतः
राया मला पावसात नेऊ नका
ओळखा हा लेखक--
12 May 2012 - 1:33 am | सोत्रि
काय सबंध ?
असो, उत्तर, वसंत सबनीस!
ह्यांचीही पिसे दादांनी त्यांच्या आत्मचरित्रात काढली आहेत.
- (पुलंचा पंखा) सोकाजी
12 May 2012 - 2:12 am | आशु जोग
सोकाजी
विच्छाचे वसन्त सबनीस हे जन्मदाते आहेत.
लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यातले एक कलाकार आहेत.
दादांना मोठे करण्यात त्यांचा वाटा आहे.
त्यांनीही दादांच्या खोटेपणाचे किस्से दिलेले आहेत.
सलग ७ चित्रपट ज्युबिली म्हणून गिनीज बूक मधे दादांचं नाव गेलं
ही दादांनीच प्रसृत केलेली 'बात' होती
दादांनी एकदा सबनीसांचं मोठेपण जाहीरपणे मान्य केलं
आणि त्यांना चेक दिला नि सांगितलं तुम्हाला हवी ती रक्कम घाला
नंतर चेक सबनीसांनी चेक काढून पाहीला तर काय दादांनी सहीच नव्हती केली.
दादा पैशाने असतील पण मनाने श्रीमंत होते का ?
दादांचे सिनेमे दादा गेल्यावर थिएटरला पाहीले.
नवा मराठी सिनेमा ओस पडलाय पण दादांचा सिनेमा मात्र त्याच थिएटर वर
हाऊसफुल्ल झालाय हे अनुभवलय.
दादा करोडपती असले पाहीजेत.
मग
दादांची पत्नी नि मुलगी यांना दादांनी का मदत केली नाही ?
त्यांची पत्नी हडपसरला अतिशय गरीबीत राहात असे.
भांडी घासण्याची कामे तिला करावी लागत.
मुलगी कधी स्टुडीओमधे आली
तर दादा ओळख दाखवायलाही महाग होत असत.
इ इ
12 May 2012 - 12:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे
वसंत सबनीसांचे मोठेपण सिद्ध करायला दादांची साक्ष कधी पासून लागायला लागली ?? दादांचे आणि त्यांचे मतभेद असतील तर दादा पिसे काढतीलच की त्यांची... आणि आपल्याच आत्मचरित्रात एखाद्याची पिसे काढायला काय मोठी प्रतिभा लागते ? इथे जालावर पण मोठमोठ्या लोकांची पिसे काढणारे महाभाग आहेत की, त्याने काय त्या व्यक्ती लगेच लहान होतात?
12 May 2012 - 7:51 pm | रेवती
:)
11 May 2012 - 11:24 pm | आशु जोग
दादांनी स्वतः लिहिलेल्या चरीत्रानंतर
इतरांनी त्यांचे लिहीलेले चरीत्र खातरजमा करून घेण्यासाठी वाचणे गरजेचे आहे.
13 May 2012 - 4:15 am | भडकमकर मास्तर
.. +१
विशेषतः आशा भोसलेंनी त्यांना लग्ना ची मागणी घातेली होती , असे ( या आत्मचरित्रात लिहिलेले) जेव्हा वाचले तेव्हा आश्चर्य वाटले होते....
खरे खोटे ठाऊक नाही...
13 May 2012 - 9:53 am | सोत्रि
हे असे प्रश्न तर मग सगळ्याच आत्मचरित्रांबद्दल उपस्थित व्ह्यायला हवेत!
- (प्रश्नांकित) सोकाजी
12 May 2012 - 10:05 am | प्रदीप
दादांच्या कामाविषयी, व्यक्तिमत्वाविषयी मला काही म्हणायचे नाही. पण एक गोष्ट लख्ख आठवते. ८० च्या दशकात माझ्या तेव्हाच्या कामाच्या ठिकाणी, ते चित्रपटव्यवसायाशी संबंधित असल्याने, त्या व्यवसायाचे 'ट्रेड गाईड' हे साप्ताहिक येत असे. हिंदी चित्रपट व्यवसायाचे ते तेव्हाचे एकमेव ट्रेड मॅगेझिन होते. नव्या चित्रपटांच्या घोषणांची सविस्तर माहिती तसेच चित्रपटांचे वेगवेगळ्या मुलुखातले (territories) आठवड्याचे उत्पन्न इत्यादि व्यवसाय संबंधित माहितीचा मजकूर त्यांत असे. त्याचबरोबर एक टिकाटिपण्णी करणारे कॉलमही असे. दादांचा पहिला हिंदी चित्रपट तेव्हा नुकताच येऊ घातला होता (कुठला ते आता नक्की आठवत नाही, बहुधा 'अंधेरी रात मे, दिया तेरे हाथ मे' असावा). तर मुळात हे चित्रपट निर्माते 'घाटी', त्यातून अर्ध्या ढगळ चड्डीत वावरणारे, ह्या पाश्वभूमिवर उपरोक्त सदरातून त्यांची सुरूवातीस बर्यापैकी टिंगल केली गेली होती. नंतर चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच्या 'टेक्स' चे आकडे येऊ लागले. आणी हा टिंगलीचा नूर पालटला. मग दादांचे कौतुक तिथे येऊ लागले.
सांगायचे तात्पर्य, पंजाब्यांचा सुळसुळाट असलेल्या त्या इंडस्ट्रीत 'घाटी' दादांनी तेव्हा बर्यापैकी जम बसवला. ह्या अश्या दादांना, त्यांच्याच एका 'घाटी' बंधूकडून 'दादा, तुस्सी ग्रेट थे!' अशी थेट पंजाबीतून का दाद द्यावीशी वाटावी? ह्याला म्हणतात दैवदुर्विलास!
12 May 2012 - 6:57 pm | आशु जोग
थोडक्यात
पिसे काढणार्यांची आपल्या मिपावरही कमतरता नाही
12 May 2012 - 8:01 pm | बिपिन कार्यकर्ते
@प्रदीपदा : +१
12 May 2012 - 10:32 am | सोत्रि
खरंच की, अशी चुक झाली खरी :(
प्रदीप, ह्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून द्याल ती शिक्षा मान्य आहे.
- (असंख्य चुका करणारा) सोकाजी
13 May 2012 - 10:43 pm | आशु जोग
असा बालगंधर्व आता न होणे
पंजाबीत
दादा पुन्ने नही होणे