आभासी उपकरणन-२

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
3 May 2012 - 9:02 am

परिशिष्ट

इंग्रजी शब्द आणि त्यांचेकरता
'आभासी उपकरणन'
या लेखात वापरलेले मराठी प्रतिशब्द, इथे दिलेले आहेत. बव्हंश औद्योगिक शब्द, `शाब्दिका' नामक अधिकृत शब्दसंग्रहातून घेतलेल्या हिंदी प्रतिशब्दांच्या आधारे बनवलेले आहेत. इलेक्ट्रॉन = विजक यांसारखे काही शब्द मीच घडविले आहेत.
त्यावर यथोचित टिप्पणी, चर्चा करावी ही विनंती.

ऍबिलिटी = क्षमता
ऍक्युरेट = यथातथ्य
अचिव्हमेंटस = श्रेये
ऍक्विझिशन = अधिग्रहण
अलार्म = लक्षवेधक
ऍनालॉग सिग्नल इंडिकेटर = निरंतर संकेत दर्शक
ऑडिओ-व्हिजुअल = दृक-श्राव्य
बार टाईप इंडिकेटर = दंडदर्शक
बियॉन्ड मेझरमेंट लिमिटस = मापनसीमापार
ब्लॉक डायग्राम = घटकचित्र
बस = तारगुच्छ
चॅनेल = वाहिनी
सर्कुलर चार्ट रेकॉर्डर = गोलाकार आरेखक
कॉम्प्लेक्स = क्लिष्ट
कॉम्पॅटिबल = परस्परानुकूल
कॉम्प्लिमेंटरी = परस्परपूरक
कॉन्सेप्ट = संकल्पना
कंडिशनर = स्थितिनिवारक
कॉन्फिगरेशन = आकृतिकल्पन
कनेक्ट = संबंधन
कनेक्शन = संबंध
कंटिन्युअस = अविरत
कंट्रोल = नियंत्रण
कंट्रोल नॉब्स = नियंत्रण खिटया
कंट्रोल पॅनेल = नियंत्रण पटल
कन्व्हिनियंट = सुलभ
कन्व्हेन्शनल = पारंपारिक
कन्व्हर्टर = प्रवर्तक
डाटा = माहिती, विदा
डाटा/इन्फॉर्मेशन लिस्ट = माहितीसूची
डाटा/इन्फॉर्मेशन टेबल = माहिती सारणी
डेव्हलपमेंट एन्हिरॉन्मेंट = विकसन-पर्यावरण
डिजिटल इंडिकेटर = अंकदर्शक
डिजिटल सिग्नल इंडिकेटर = अंकित संकेत दर्शक
डिजिटल सिग्नल = अंकित संकेत
डिजिटायझर = अंकक
इझी टू कंस्ट्रक्ट = रचनासहज, रचनासुलभ
एफिशियंट = कार्यक्षम
इलेक्ट्रॉन = विजक
इलेक्ट्रॉनिक्स = विजकविद्या, विजकशास्त्र
एक्झाक्ट = हूबेहूब
एक्सर्पट्स = झलकी
एक्श्चेंज = विनिमय
एक्स्टेंशन = विस्तार
फॅसिलिटी = सुविधा
फास्ट = दृतगती
फिचर = रुपकसाधन
फिगर = आकृती
फाईल = संचिका, कोषिका
फ्लेक्सिबल = लवचिक
फॉर्मॅट, आऊटलाईन = आकृतीबंध, रूपरेषा
फ्रिक्वेन्सी आऊटपुट = आवृती-जनक
फ्रंट पॅनेल = अग्रपटल
फन्क्शन = प्रकार्य
ग्राफिक = चित्रनिर्भर
हार्डवेअर = साहित्य
ह्यूज = अजस्त्र
आयकॉन = प्रकटनचिन्ह
इम्प्लिमेंटेशन = समायोजन
इन्कार्नेशन = अवतार
इंडिकेटर = दर्शक
इन्फॉर्मेशन = माहिती
इन्ट्रुमेंट = उपकरण
इन्ट्रुमेंटेशन = उपकरणन
इंटरकनेक्ट = अनुबंध
की-बोर्ड = कुंजीपट
मॅप = नकाशा
मेनु = प्रसूची
मेसेज कॅरिंग = संदेशवहन
माऊस = मूषक, उंदीर
मल्टिप्लेक्सर = चयनक
ओपन = खुली
पाय = गोलाकार हिस्सा
प्लॅन्ट = संयंत्र
पॉइंटर = सुई
पोर्टेबल = जंगम, सुटसुटीत
प्रेसेंटेशन = सादरीकरण
प्रेशर इंडिकेटर = दाबमापक
प्रोसेस = प्रक्रिया
प्रोसेस स्टेटस इन्फॉर्मेशन = प्रक्रिया-स्थिति-सूचना
पर्पज = प्रयोजन
पुश बटन = दाबकळ
रेंज = पट्टी, पल्ला
रिअल टाईम = यथाकाल
रिऍलिटी = तथ्य
रिझोल्युशन = सापेक्षपृथकता
रूम = कक्ष
रोटेटिंग नॉब्स = चक्रनियंत्रक
स्काडा = पनिवमा, पर्यवेक्षी नियंत्रण व माहिती अधिग्रहण
स्केल = मापनपट्टी
स्क्रिन्स = पडदे
सेन्सर = संवेदक
सिग्नल = संकेत
सिन्गल ऑपरेटर रन = एकचालकानुवर्ती
स्केच = रेखाटन
सॉफ्टवेअर = कार्यप्रणाली
स्पेशॅलिटी = खासियत
स्पेसिफिकेशन = विशिष्टता
स्टेटस इंडिकेटर= स्थितिनिदर्शक
स्टोअरेज = साठवण
स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर = पट्टरूप आरेखक
सुपर्वायझरी = पर्यवेक्षी
स्विचेस = खटकें
सिम्बॉल = चिन्ह
सिस्टिम = प्रणाली
टेप = फीत
टेम्परेचर इंडिकेटर = ताप मापक
थम्ब व्हिल = अंगुष्ठवर्तित चक्र
टूल = अवजार
ट्रॅन्समिशन = पारेषण
अन्डरस्टॅन्डिंग = आकलन
युज = वापर
युजर = उपभोक्ता, वापरदार
व्होर्टेक्स फ्लो मीटर = चक्रवर्ती प्रवाह मापक
वाईड रेंज = रुंदपट्टी
वाय-टी रेकॉर्डर = य-काल आरेखक
एक्स-वाय रेकॉर्डर = य-क्ष आरेखक
.
http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

भाषातंत्रविज्ञानशिक्षणप्रकटनअनुभवमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

3 May 2012 - 9:50 am | चौकटराजा

तिक्तातू नीरेय- अमोनियम हैड्र्ऑक्साईड
उदजन - ओक्सीजन
कर्बद्वीप्राणील - कार्बन डाय ऑक्साइड
मृदुमुलायममाल - सॉफटवेअर
कठीण माल - हार्ड वेअर
पश्चमस्तिकपुच्छ- मेड्योला ऑबलॉंनगेटा

हायड्र्क्साईडला नीरेय शब्द आवडला!

उद्जन = हायड्रोजन

चौकटराजा's picture

4 May 2012 - 1:26 pm | चौकटराजा

सॉरी नव्हे क्षमा करा mistake नो नो माफी असावी प्रमादा बद्द्ल !

इंग्रजी शब्दांना एकच एक प्रतिशब्द ठरवता येत नाही; कारण बर्‍याच वेळा वापर वैविध्‍यपूर्णपणे आलेला असतो, आणि अनुवादकाचं इमान इंग्रजी शब्दांचा वापर ज्या आशयाने झाला असेल तो आशय एका भाषेतून दुसर्‍या भाषेत सही सही वाचकांपर्यंत पोहोचवणं हे असायला हवं.

उदा.
ऍक्युरेट = यथातथ्य (अचूक?)
अचिव्हमेंटस = श्रेये (हा his achievement असा येतो तेव्हा त्याची यशस्विता, यशप्राप्ती किंवा यश असा करावा लागतो )

तुम्ही योजलेल्या मराठी तांत्रिक संज्ञा मात्र आत्ताच मुंज होऊन त्या माथ्यावरील संजाबावर हात फिरवताना दिसत आहेत. या तांत्रिक संज्ञा आपल्या बापजाद्यांच्या भाषेत असणंच शक्य नाही, कारण या संज्ञांचा जन्मच ‍पश्चिमेत झाला - त्यामुळं या संज्ञांना मारून मुटकून मराठीत बसवण्यात अर्थ नाही असे वाटते.

भाषांतरकाराकडे योग्य त्या वेळी, योग्य तो शब्द योग्य त्या आशयाने वापरणारा माणूस म्हणून पहायला हवे, म्हणजे कुठे कोणता शब्द वापरायचा हे पूर्णपणे त्याच्या बुद्धीनुसार ठरवायला हवं. पण हे होताना दिसत नाही. व्यावसायिक अनुवादाच्या क्षेत्रात तर एक वाइट प्रथा आहे. म्हणजे प्रोजेक्ट आला की क्लाएंटला ग्लॉसरी द्यायची. आणि त्या ग्लॉसरीमध्‍ये जी शब्दांची काशी घातली तशीच काशी प्रोजेक्टभर घालत रहायची, नो... नो.. तुम्ही मूळ वापराप्रमाणे काही मोडतोड करायला गेलात की लगेच युनिफॉर्मिटी बोंबलली म्हणून क्लाएंटचा मॉडरेटर ओरडू लागतो. आता ह्या येडबंबूंना कसं सांगायचं की ग्लॉसरी हा काही धर्मग्रंथ नाही (आणि ती अनुवादकानंच तयार केली असल्याने तो हवा तेव्हा शब्दबदल करु शकतो) , मूळ भाषा वापराशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.
अशा प्रकारे आम्ही प्रत्येक प्रोजेक्‍टची सरकारमान्य काशी घालतो.

यकु,
प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

इंग्रजी शब्दांना एकच एक प्रतिशब्द ठरवता येत नाही; कारण बर्‍याच वेळा वापर वैविध्‍यपूर्णपणे आलेला असतो, आणि अनुवादकाचं इमान इंग्रजी शब्दांचा वापर ज्या आशयाने झाला असेल तो आशय एका भाषेतून दुसर्‍या भाषेत सही सही वाचकांपर्यंत पोहोचवणं हे असायला हवं.>>>> बरोबर आहे.

उदा.ऍक्युरेट = यथातथ्य (अचूक?)>>>>
अचूकच! यथातथ्य हा संदर्भाला अनुसरून अर्थ काढलेला आहे.

अचिव्हमेंटस = श्रेये (हा his achievement असा येतो तेव्हा त्याची यशस्विता, यशप्राप्ती किंवा यश असा करावा लागतो )>>>> बरोबर आहे.

तुम्ही योजलेल्या मराठी तांत्रिक संज्ञा मात्र आत्ताच मुंज होऊन त्या माथ्यावरील संजाबावर हात फिरवताना दिसत आहेत. या तांत्रिक संज्ञा आपल्या बापजाद्यांच्या भाषेत असणंच शक्य नाही, कारण या संज्ञांचा जन्मच ‍पश्चिमेत झाला - त्यामुळं या संज्ञांना मारून मुटकून मराठीत बसवण्यात अर्थ नाही असे वाटते.>>>> हे आपले म्हणणे मला पुरतेपणी कळले नाही.

आपल्या पूर्वायुष्यात कधीही न अनुभवलेल्या प्रत्यक्षातील तत्त्वांचे वर्णन मायबोलीत करणे क्रमप्राप्तच असते. ते कसे करायचे ही आपली मर्जी. आपल्याला, आपल्या मायबोलीला आजवर माहीत असलेल्या शब्दांचे आणि संकेतांचेच आधारे ते व्हायला हवे. इतर भाषांच्या कुबड्या घेऊन नव्हे. असे होणे केव्हपासूनच (इस १०००पूर्वीपासून, १८१८ पासून, १९४७ पासून की त्यानंतर हे आपण नक्की करायला हवे आहे) बंद झालेले आहे. म्हणून ही पाळी आलेली आहे.

या संज्ञा पश्चिमेत जन्म घेत होत्या तेव्हा आपल्या पूर्वजांनी त्या इंग्रजीतच वापरल्या. तेव्हा कदाचित स्वातंत्र्य नसेल, हुरूप नसेल, गरज नसेल. आज मात्र स्वातंत्र्य आहे. हुरूप आहे आणि आवश्यकताही आहे. नवे विज्ञान आपण जर मायबोलीत सांगू शकलो नाही तर आपली मायबोली कायमच पंगू राहील.

भाषांतरकाराकडे योग्य त्या वेळी, योग्य तो शब्द योग्य त्या आशयाने वापरणारा माणूस म्हणून पहायला हवे, म्हणजे कुठे कोणता शब्द वापरायचा हे पूर्णपणे त्याच्या बुद्धीनुसार ठरवायला हवं. पण हे होताना दिसत नाही. >>>>
व्यावसायिक भाषांतरकार चौकटीतल्या व्यवहारांकरता असतो. तो कधीही परिपूर्णतेचा दावा करू शकत नाही.

नवे विज्ञान प्रथमच मायबोलीत वर्णन करणे चौकटी बाहेरचे काम आहे. त्या त्या विषयातील तज्ञांनीच ते करायला हवे आहे. भाषाभ्यासी त्याकरता केवळ उपलब्ध शब्दांच्या सूचनाचे कार्य करू शकतात. असे प्रकल्प एकूणातच भाषा विज्ञान शास्त्रात मोडतात. ज्या विज्ञानाचा अभ्यास, प्रशिक्षण इत्यादी मराठीत कधी मागे पडला हे आज सांगताही येत नाही.

व्यावसायिक अनुवादाच्या क्षेत्रात तर एक वाइट प्रथा आहे. म्हणजे प्रोजेक्ट आला की क्लाएंटला ग्लॉसरी द्यायची. आणि त्या ग्लॉसरीमध्‍ये जी शब्दांची काशी घातली तशीच काशी प्रोजेक्टभर घालत रहायची, नो... नो.. तुम्ही मूळ वापराप्रमाणे काही मोडतोड करायला गेलात की लगेच युनिफॉर्मिटी बोंबलली म्हणून क्लाएंटचा मॉडरेटर ओरडू लागतो. आता ह्या येडबंबूंना कसं सांगायचं की ग्लॉसरी हा काही धर्मग्रंथ नाही (आणि ती अनुवादकानंच तयार केली असल्याने तो हवा तेव्हा शब्दबदल करु शकतो) , मूळ भाषा वापराशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक प्रोजेक्‍टची सरकारमान्य काशी घालतो. >>>>>>
खरे तर व्यावसायिक भाषांतरकारांकरता ही अवस्था फारशी सोयीस्कर नाही. उपलब्ध कोषांचे आधारेच ते निर्णय करू शकतात. चौकटीबाहेर भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकरता समाज, शासन उत्सुक असावे लागते. तशी दुर्दैवाने आज स्थिती नाही. म्हणून व्यावसायिक भाषांतरकारांनीच पुढाकार घेऊन भाषाविज्ञानाच्या अभ्यासाची सोय निर्माण करायला हवी. असो.

यकु's picture

3 May 2012 - 4:32 pm | यकु

>>>हे आपले म्हणणे मला पुरतेपणी कळले नाही.

-- मला असं म्हणायचं आहे की उदा.
पुश बटन = दाबकळ
इंग्रजीत Push म्हणजे ढकलणे, दाबणे हे आपल्याला माहित आहे आणि Push Button म्हणजे दाबून काहीतरी क्रिया केली जाण्‍याचं साधन आहे हेही ठिकच.

पण Push Button ला आपण ''दाब कळ'' म्हणू तेव्हा तो हास्यास्पद शब्दप्रयोग वाटतो. कारण मुळात Push Button नावाचं जगात जे काही अवतरलं ते इंग्लिश लोकांच्या आयुष्‍यात, इंग्लिश लोकांनी Push Button चा वापर केला असे मानू, मग ते सर्वदूर गेलं..
(आता मराठी लोकही काही गोष्‍टी दाबत असतील, म्हणून दाब कळ म्हणायला हवे असे नाही )

मग अचानक Push Button ला Push Button न म्हणता ''दाब कळ'' म्हणण्‍याचा अट्टाहस कशासाठी? 'मराठी जीवंत रहाण्‍यासाठी हे' उत्तर पटत नाही, कारण अशा शब्दांमुळे मराठी आणखीच मरते आहे आणि लोक तिच्या वापरापासून दूर पळत आहेत असे वाटते.

तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हा झाला प्रतिवाद. मात्र समाधानकारक वाटला नाही.

पुश बटन ला पुश बटन, ब्रदर-इन-लॉ ला ब्रदर-इन-लॉ, कॉल-बेल ला कॉल-बेल असेच जर आपण म्हणत राहिलो तर...

"आमचे ब्रदर-इन-लॉ आलेत, त्यांनीच कॉल-बेल पुश केली"

अशासारखी वाक्ये उदयास येतच राहतील. आपण आज थांबवू शकणार नाही. उद्या ती आपणही बोलू. परवा तीच मायबोली ठरेल. देशाच्या सीमावर्ती भागांतून हे प्रयोग सुरूच आहेत.

मराठीत होऊ नयेत हीच इच्छा आहे! तुम्ही काय म्हणता?

'ब्रदर इन लॉ' छानपैकी मेहुणा हा शब्द आहे की.

प्रतिसाद दुप्पट झाल्याने वगळला आहे!

उदाहरण चुकीचे आहे.

"आमचे ब्रदर-इन-लॉ आलेत, त्यांनीच कॉल-बेल पुश केली"

असं नाही होत..

मेहुण्याला मूळ शब्द मराठी त उपलब्ध असूनही "ब्रदर इन लॉ" हा शब्द वापरणं हे इंग्रजाळलेपण वेगळं आहे आणि ते अशा मराठीकरणाच्या मार्‍याने थांबण्यासारखं नाही कारण ते अ‍ॅक्वायर्ड आहे (याला मराठी शब्द काय रे यकु?)

"पुश केली" बद्दलही तेच.. दाबली हा शब्द मराठीत आधीच आहे.. पुश बेल हा शब्द पूर्वीपासून नाही. तरीही घंटी असं कोणी म्हणेलही.

त्यामुळे वास्तविक रुपांतर आमच्या मेहुण्यांनी बेल दाबली इतपत होईल..

प्रत्येक शब्दाला मराठी शब्द हवाच हा अट्टाहास मात्र अगदी कर्मठ वाटतो हे खरं.

पुन्हा भाषा टिकली पाहिजे म्हणजे काय, अन भाषा कशाला टिकवायची, ती बळजबरीने सक्तीने टिकवून धरता येते का.. असे अनेक प्रश्न मुळातूनच चर्चा करण्याजोगे आहेत.

अहो गावाकडे शीडफामवर ग्येल्तो असं म्हणतात, ते सर्वांना कळतं. वळूबीज गुणन प्रक्षेत्रात गेलो होतो असं म्हणण्याची जरुरी नाही.. त्यात काही भाषा मरत नाही.

लव्हाळ्याप्रमाणे लवलवणारी भाषा जगते.. ताठ उभा वृक्ष कोसळायचाच..

>>कारण ते अ‍ॅक्वायर्ड आहे (याला मराठी शब्द काय रे यकु?)
-- अंगात भिनणे, भिनलेलं असणे ;-)

>>लव्हाळ्याप्रमाणे लवलवणारी भाषा जगते.. ताठ उभा वृक्ष कोसळायचाच..
-- सोला आना सच्ची !

गविंनी मला जे म्हणायचं होतं ते अतिशय सोप्या प्रकारे म्हटलेलं आहे, त्यामुळे गोळेकाका तुम्हाला वेगळा प्रतिसाद देत नाही. :)

शब्द तयार करण्याचा अट्टाहास न बाळगता परभाषेतील शब्द स्वीकारण्याने भाषा जास्त समृद्ध होते..
अवजड शब्दांमुळे भाषा केवळ लोकांपासून दूर जाते..
वाक्यरचना मराठीत असेल तर काही परभाषीय शब्द वापरले म्हणून मराठी भाषा मरणार नाही..

नरेंद्र गोळे's picture

4 May 2012 - 6:38 pm | नरेंद्र गोळे

शब्द तयार करण्याचा अट्टाहास न बाळगता परभाषेतील शब्द स्वीकारण्याने भाषा जास्त समृद्ध होते..>>>
हे तुमचे मत आहे.

अवजड शब्दांमुळे भाषा केवळ लोकांपासून दूर जाते..>>>> सत्यवचन!

आबा's picture

3 May 2012 - 5:26 pm | आबा

पाय = गोलाकार हिस्सा
:) :)

असो, शुभेच्छा !

"भाकरतुकडा आलेख" शब्द कसा वाटतो "पाय चार्ट"ला..?

आबा's picture

3 May 2012 - 6:17 pm | आबा

:) छान आहे !

- ऑन अ सिरियस नोट :
मिपावरतीच विदा हा शब्द वाचला होता.
बहुतेक "सांख्यिकिय माहिती" असा त्याचा अर्थ असावा.
पण सोपेपणामुळे "विदा" येवढा डोक्यात बसला, की आजकाल विदा हाच शब्द वापरला जातो.
असे शब्द सहज रुळतात, उगिच "चक्रवर्ती प्रवाह मापक" वगेरे शब्द तयार करण्यात काय अर्थ आहे?

आता एक पराकोटिचा छिद्रान्वेश
"एक्स-वाय रेकॉर्डर = य-क्ष आरेखक".... असं का हो? "क्ष-य आरेखक" असं का नको ? :)

>>>पण सोपेपणामुळे "विदा" येवढा डोक्यात बसला, की आजकाल विदा हाच शब्द वापरला जातो.

---- विदा ची नेमकी फोड काय आहे ते मला माहित नाही. पण विदा म्हणजे विशेष दाखला असं काही आहे का हे या निमित्ताने विचारुन घेतो.

आबा's picture

3 May 2012 - 6:37 pm | आबा

माहित नाही राव... कोणाला माहित असेल तर सांगा रे,

श्री's picture

3 May 2012 - 6:58 pm | श्री

विदा = डेटा

नरेंद्र गोळे's picture

4 May 2012 - 9:03 am | नरेंद्र गोळे

विद्या, विद्वान इत्यादी मूळ संस्कृत शब्दांच्याच उगमापासून विदा शब्दाची निष्पत्ती झालेली आहे.
मनोगतावर ह्याची चर्चा आपण पाहू शकाल. तुम्हाला विदा शब्द पटला आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

नरेंद्र गोळे's picture

5 May 2012 - 8:58 am | नरेंद्र गोळे

भाकरतुकडा हा उत्तम शब्द आहे पाय चार्ट करता.

सर्व शब्द कठीण नाहीत पण काही शब्द डोक्यावरुन जात आहेत.
इंग्रजी भाषेतही अनेक शब्द बाहेरील भाषांमधून आले आहेत,
http://en.wikipedia.org/wiki/List_of_English_words_of_Indian_origin
जर त्यांनी Sanskrit मधील हिमालय (Himalayah)ला 'Place of Snow' असे राहू दिले असते तर,
पण त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे Himalaya असे केले.

ईथे देखील काही सभासद फेसबूक ला चेपू म्हणतात, ते बरोबर नाही असे मला वाटते.

वर म्हटल्याप्रमाणे
लव्हाळ्याप्रमाणे लवलवणारी भाषा जगते.. ताठ उभा वृक्ष कोसळायचाच

रामपुरी's picture

4 May 2012 - 4:05 am | रामपुरी

"जर त्यांनी Sanskrit मधील हिमालय (Himalayah)ला 'Place of Snow' असे राहू दिले असते तर"
भाऊ, हिमालय हे विशेषनाम आहे. विशेषनामाचे भाषांतर होत नाही. सगळ्या बर्फ पडलेल्या डोंगरांना हिमालय म्हणतात का?

स्मिता.'s picture

4 May 2012 - 1:42 pm | स्मिता.

एवढ्या सगळ्या औद्योगीक आणि तांत्रिक इंग्रजी शब्दांना त्यांच्या कार्य/उपयोगानुसार मराठीप्रतिशब्द तयारच केले आहेत तर 'माऊस' करताही त्याच्या उपयोगावरून शब्द का नाही?

माऊस = मूषक, उंदीर हे तर कोणत्याही इंग्रजी - मराठी डिक्शनरीमधे सापडेल. संगणकाला जोडणारा उंदीर नक्कीच घरात, गोदामात आढळणार्‍या उंदराचसारखे काम करत नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 May 2012 - 2:11 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी सहमत आहे. चुपके चुपके मधला धर्मेंद्र आठवतो अशावेळी. लोहपथगामीअग्निरथ वाला... किंवा परिक्षण निरीक्षण वाला... आणि मग मला केश्टोसारखी अवस्था झाल्याचा भास होतो.

प्रतिशब्द आणायचाच तर मग तो उपयुक्ततेनुसार आणावा. किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन असेही वाटते की आधुनिक संज्ञांसाठी तेच शब्द का नाही वापरू? मराठीमधे संस्कृतोद्भव नवीन शब्द आणायचा अट्टाहास का? हे घेट्टो मनोवृत्तीतून येत असावे का? मी केवळ अट्टाहासापुरतं हे घेट्टो मनोवृत्तीचं म्हणतोय.

मला नेहमी फ्रेंच आणि इंग्रजांची आठवण होते. फ्रेंच लोक असेच भाषेबद्दल खूप संवेदनशील आहेत. भाषेच्या संवर्धनासाठी, नियमांसाठी वगैरे एक संस्थाही आहे. आणि ती खूप काटेकोरपणे आणि जागरूकतेने काम करत असते. त्याउलट इंग्रजी. अशी काही एखादी सेंट्रल रेग्युलेटिंग संस्था इंग्रजी भाषेबद्दल काम करते आहे असे कधी ऐकले नाहीये. आज इंग्रजी जगाची भाषा झाली, मिसळणारे प्रवाह सामावून घेत, त्यांना प्रतिष्ठा देत पुढे गेली. फ्रेंच मात्र संकुचित राहिले, इंग्रजांवर जळत राहिले.

जयंत कुलकर्णी's picture

5 May 2012 - 9:24 am | जयंत कुलकर्णी

फ्रेंच मात्र संकुचित राहिले, इंग्रजांवर जळत राहिले, आणि हरतही राहिले....