मिपा बुलेटिन-आजच्या ठ्ळ्ळ-क बातम्या..(अंक दुसरा)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
8 Mar 2012 - 4:13 pm

[या बातम्यांचा मुख्‍य उद्देश विनोदनिर्मिती नसून फक्त रिपोर्टींग आहे. एक टैम्पास कल्पना म्हणून आनंद घेणेत यावा इति विज्ञापना.]

नमस्कार!
मिपा बुलेटिनमध्‍ये सादर आहेत आजच्या ठ्ळ्ळ-क* बातम्या (*मनसेच्या खळ्ळं-फट्याक सारखं हे ठ्ळ्ळ-क वाचावं)

मिपावार अचानक-काम वाढलं
आमचा वार्ताहर कळवतो....सध्या मिपावर कामात बरीच वाढ झाली आहे. वस्तुतः सदर कामात अग्रे-सर डॉ.दिवटे यांचा हात-खंडा असुनही अनेकांना तो अजुनही थंडाच असल्याचा भास होतो आहे,पण सदर लेखक यामुळे अजिबात न डगमगता ''सगळे धागे उडाले तरी चालतील,पण मी टाकतच राहिन'' अश्या निर्धाराने लेखन करीत आहे.पण त्याचेमुळे मिपाचे मानसीक आरोग्य बिघडत चालल्याचा अनेक संवेदनशील आयडींना भास होत आहे.म्हणुन आंम्ही डॉ.दिवटे यांस फोनवले असता,त्यांनी -हम्म,,,'बोला काय काम काढले आज अमच्याकडे..?' असा प्रश्न विचारुन,आंम्हास मुलाखतीचे प्राथमिक बीज-पेरणे अशक्य करुन फाट्यावर मारले.

ताजी बातमी-यात भरिस-भर म्हणुन एका नवागतानी ''समलिंगी संमंध'' नवाचा खळबळ जनक धागा काढल्याचेही कळले आहे,त्या धाग्याबद्दल विशेष वृत्तांकन करण्यास आमच्याच काही वार्ता-हरांनी चिंताजनक नकार दर्शविल्यामुळे त्या धाग्यावर आलेल्या एकुण प्रतिक्रीयकांपैकी बहुसंख्य उत्तर-क्रीयकांचा विचार करु जाता,तो धागा बराचसा सम-लैंगिकच राहिला हे विशेषत्वाने नमुद करावेसे वाटते.

नव अभ्यागतांचे जागरण/गोंधळ
सध्या मिपावर नवकविंचे सुप्रजनन जोरात सुरु असुन,त्यांच्या जिलब्यांनी हैराण होऊन मिपावरचे २नवविडंबक शुंभ/निशुंभ कोलित घेऊन त्यांच्या पाठिस पडले आहेत.त्यामुळे नवागतांच्या(ही) गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.याबाबतीत स-खोल तपास केला असता,हाती आलेल्या वृत्तानुसार,एका नवकवीने खाजगीत शुंभ/निशुंभास ''जिवंत सोडण्याचे..? किंवा,अर्धमेलं करण्याचे किती आणी काय घ्याल..?'' असा प्रश्न विचारल्याचे कळले आहे.यामुळे बेचैन होऊन दोहोतल्या एका विडंबकानी पूर्ण मारण्याच्या विडंबन पद्धतीवरुन-''अ व्ह्यु टु अ किल'' नावाची कादंबरी लिहायला घेतल्याचे समजते,दुसर्‍यानेही ''अर्ध-मेलं'' या विषयाला धरुन ''हाफ/फ्राय'' नावाचे खंडन/मंडनात्मक काव्य प्रसवावयास घेतल्याचे आमचा वार्ताहर सांगतो.ही परिस्थिती चिंताजनक असुन यावर लवकरच कारणे व उपाय शोधण्यासाठी मिपाप्रशासन काही जुने खंदक-कवी नेमण्याच्या विचारात आहे,असे समजते.
अत्ताच हाती आलेल्या ताज्या वृत्तानुसार यातल्याच एका खंदक-कवीने,नवकवींचा पक्ष उचलुन धरण्यासाठी-'' नवकविंची दैना-कुंथले तरी होइना'' या मथळ्या खाली एक सदर चालवुन विडंबकांचा कोथळा काढण्याचे योजिले आहे,असे कळते.

मद्याचार्य सोत्री यांचा ट्रिपल दणका...
गेल्या काही दिवसात मिपाचे आद्य मद्याचार्य सोत्री यांनी सामान्यपणे एकाच अठवड्यात तिन निरनिराळ्या विषयांना हात घालुन आपले सो-त्री हे आयडीनेम सार्थ केले आहे. ''विषय कोठलाही असला तरी शेवट पर्यंत घट्ट पकड'' हे त्यांचे अभ्यासू वैशिष्ठ्य ओळखुन मिपाचे आद्यखाद्य साहित्तीक-मा.गणपाभाऊ त्यांचा कोंबडी देऊन उदर सत्कार करणार असल्याचे समजते.याविषयी अधिक जाणुन-घेण्यासाठी आमचे एक विशेष वार्ताहर त्यांचेकडे गेले असता,ते सध्या मिपावरिलच एक अट्टल तंबाखुबाज सदस्य ''अत्रुप्त आत्मा'' यांना 'गाथा तंबाखुची' नावाचे सदर सुरु करण्यास मदत करायला गेल्याचे समजले. (त्यावेळी अत्रुप्त आत्मा,हे खाता तंबाखु-ही किकं लागे जीवा नावाचे विडंबन काव्य लिहिण्यात दंग होते,असेही समजले ;-) )

मदनाच्या-बाणाने कबुतरे उडाली
येथिल हौशी फोटुग्राफर या उपनामाभिधानाने वावरणार्‍या एका पक्षीप्रेमी आयडीने थंड-पडलेल्या कलादालनास नवचैतन्याचे धुमारे फोडल्याचे आम्चा वार्ताहर सांगतो. या धाग्याबाबत ''अप्रीय पण वेचले पाहिजे'' अश्या धोरणानी काढलेले कबुतरांचे फोटो पाहाण्यास पक्षी-प्रेमींनी एकच गर्दी केल्याचे समजते.विशेषतः शेवटच्या तिन/चार फोटोस दाणे टाकावयास आलेल्या काही नवोत्सुक पक्षीप्रेमींची ''अरे यांचे मिलन पाहु नका, त्यातुन पुढे सं-कटाची चाहुल लागते'' असे भविष्य वर्तवुन मा.किचेन तैंनी या नवोत्सुकांस कबुतरांसारखे पांगवले.परंतु शेवटी/शेवटी,,,'' हे कबुतर नसुन-पक्षी-पारवा आहे'' असा एकांनी मराठमोळा वाद उपस्थित करुन स-मस्त कबुतर्‍यांचे चबुत्रे उडवले.या वादास अजुन एक खमक्या मिपा सदस्या...पियुशा यांनी फक्त याच आयडीच्या धग्यावर वापरायचे,स्पेशल मुन्नाभाई हिंदी टिकास्त्र काढुन समस्तांची बोळवण केली.परंतु या उप्परही अनेकांनी या पक्ष्याची यथेच्छ घाण काढुन बर्‍यापैकी विरोध नोंदवल्याचे कळते.

पाक-कृती विभागावरिल प्रस्थापितांची पकड ढिली
मिपा बुलेटिन पाक्षिकाचे गेल्या संपूर्ण पंधरवड्याचे जमेस पडणारे वृत्त म्हणजे वरिल मथळ्यातील आशय...या विभागात अनेक नविन खेळाडुंनी दणक्यात हजेरी लावल्याचे आग्रहाने नमुद करावेसे वाटते..तरिही प्रस्थापितांना हादरा देणारी तशी एकही पाक-कृती यात आलेली नाही.हा नवोदितपणाही लक्षात घेण्याजोगा असल्याचे आमचा(एक) वार्ताहर म्हणतो.

कॉमन म्यान शिरल्याच्या अफवेनी मिपाकर त्रस्त
गेल्या काही दिवसापासुन मिपा शहराच्या काही जनामनातल्या गल्ल्यांमध्ये व काथ्या-कूट मेगा हायवे वर सर्व सामान्य विषयांच्या गाड्या अडवुन एका कॉमन म्यानने हैदोस घातल्याचे समजते.हा सदर इसम धाग्यावर येणार्‍या नवागतास व सर्वसामान्य आयडीस फसविणे साठी,,,साध्याविषयाचे पिठात जड शब्दांच्या गुंगीचे औषध घालुन त्याच्या प्रथमदर्शनी वाचनात पडावे अश्या म्याटरची जिल्बी खावयास देतो.व नंतर त्यांची वैचारिक लुट करतो.मिपा शहर गुप्तहेर विभाग या इसमास खराखुरा पकडण्यासाठी डोळ्यात तेल व मेंदुत त्याचे नावाचे- इ-मेल घालुन प्रचंड मेहेनत करित असल्याचे समजते.तरिही मि.पा.पोलिस निरिक्षक श्री. छोटा डॉन प्रतिहल्लावादी,यांनी सर्व मिपाकरांस अशी विनंती केली आहे,की मिपावर गर्दीचे वेळी काही विशिष्ट धाग्यांवरुन फिरताना आपले विचारधन नीट जपुन वागवावे.कुणास कुणाचाही...''हाच तो असावा'' असा संशय आल्यास...तातडिने मिपाचे बिन-तारी विभागात कळवावे...तिकडली लाइन एंगेज लागल्यास सं.पा.दक. असे आपल्या(च) मोबॉइल वर टाइपुन पुढे समस्या लिहुन तो संदेश चल-हट-चल-हट-चल-हट या नंबरवर त्वरित पाठवावा....परंतु कोणत्याही परिस्थितित कायदा कि-पॅडवर घेऊ नये.

हे पाक्षिक यक्कू प्रतिष्ठानचे परवानगिने श्री.अत्रुप्त आत्मा यांनी आज रोजी प्रसारित केले,सदर वृत्तांकामधे काही अक्षेपार्ह भाग अढळल्यास तो लेखकाच्या केवळ टंक-लिखिताचा भाग समजावा,यक्कूप्रतिष्ठान वर त्याची कोणतीही जबाबदारी नाही ;-)

वावरसंस्कृतीविनोदजीवनमानमौजमजाआस्वादबातमीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सांजसंध्या's picture

8 Mar 2012 - 4:35 pm | सांजसंध्या

:)
लिहीलंय छान

कपिलमुनी's picture

8 Mar 2012 - 4:39 pm | कपिलमुनी

१ नंबर !!

मी-सौरभ's picture

9 Mar 2012 - 11:08 am | मी-सौरभ

सहमत

ये बुलेटीन भी सही जम्या हे बॉस !!!!
बाकी मी काहीही ( जिलबी पाड्लेली नसताना) केले नसताना सदर धाग्यात आमची नोन्द घेतलीत त्यामुळ,
ड्वाले पाणावले हो ;)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2012 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा

@ड्वाले पाणावले हो >>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा...पिवशा लल्ली... हा घे लुमाल दोले पुशायला

मराठमोळा's picture

8 Mar 2012 - 4:43 pm | मराठमोळा

हॅहॅहॅ... :) येऊ द्या अजून.
हे बुलेटीन चालू रहावे.. साप्ताहिक आहे की मासिक?

छान ! तरीही पहिल्या अंका इतका दूसरा अंक उठावदार झाला नाहिये. ..
घडामोडींमध्ये वयक्तीक वार्ताहाराचे मत आल्यागत वाटले कोठे कोठे.
तिसरा अंक ठळ्ळ्.क घडामोडींची नांदी असावा.
शुभेच्छा !

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2012 - 6:14 pm | अत्रुप्त आत्मा

@छान ! तरीही पहिल्या अंका इतका दूसरा अंक उठावदार झाला नाहिये. ..
घडामोडींमध्ये वयक्तीक वार्ताहाराचे मत आल्यागत वाटले कोठे कोठे.>>>

सार्‍या पिठात का हो..?जिलब्या पाडू सुरेखं।
कधी पेपराचे सुखं,कधी अंकाचेही दु:ख्खं ॥

रोज रोज सेंच्युरी नाय बसत राव ;-) आणी बसली तरिही ती एक दिवस बसेलच ;-)
आणी गेल्या वेळेस सारख्या बाकिच्यांनीही बातम्या एडवा की...मी काय एडवणारे...स्वारी :-p अडवणारे का?

तर्री's picture

8 Mar 2012 - 4:51 pm | तर्री

मिपा टाइम्स झकस जमला आहे.

अमृत's picture

8 Mar 2012 - 4:57 pm | अमृत

आपल्या प्रत्येक कृतीवर खबरी (अतृप्त आत्म्या)ची नजर आहे.

अमृत

पैसा's picture

8 Mar 2012 - 5:02 pm | पैसा

मस्त! चालू ठेवा!

सोत्रि's picture

8 Mar 2012 - 5:28 pm | सोत्रि

गुर्जी,

कल्पना फार छान आहे, आवडली.
पाक्षिकच ठेवा, साप्तहिक केल्यास अंमळ कंटाळवाणे होउ शकेल.

- (खबरी) सोकाजी

कॉमन म्यान शिरल्याच्या अफवेनी मिपाकर त्रस्त

ख्या ख्या ख्या. खरोखरीच बातमी वाटली राव. :)

बटाटा चिवडा's picture

8 Mar 2012 - 5:55 pm | बटाटा चिवडा

लै नादखुळा .... काटाकीर्र ... झकास
ह्या ठळ्ळ्.क बातम्या वाचताना असे वाटत होते की, ... देणं न घेणं अन कंदील घेऊन येणं...... :D
पण बातम्या छान छान... :)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2012 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा

@देणं न घेणं अन कंदील घेऊन येणं...... >>> नुस्ता कंदिल नका नेऊ,पाण्याचा लोटा पण घ्या,आणी त्यात पाणी पण घ्या ;-) नायतर दगड बसवावा लागेल.. :-p

बटाटा चिवडा's picture

8 Mar 2012 - 11:22 pm | बटाटा चिवडा

पाण्याचा लोटा आणि त्यात पाणी हे सर्व तो / ती घेऊन येईल ज्याला तिथे 'काम' करायचे आहे .. :D
आम्ही फक्त अंधारात कंदील धरणारे आहोत.... म्हणून तर मिश्किलपणे नमूद केलंय की "देणं न घेणं "

तशीच, आमची या धाग्यावरची कमेंट म्हणजे "कंदील घेऊन येणं" ..असेच होते ,
म्हणून म्हणालो, "देणं न घेणं अन कंदील घेऊन येणं." ....... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2012 - 11:33 pm | अत्रुप्त आत्मा

म्हणून म्हणालो, "देणं न घेणं अन कंदील घेऊन येणं." ....... >>> व्वा...चान चान..,पुढच्या वेळी पेट्रोमॅक्स घेऊन या

बटाटा चिवडा's picture

9 Mar 2012 - 12:01 am | बटाटा चिवडा

अहो आत्माराव.. कंदील असो वा पेट्रोमॅक्स... मतलब तो उजेड पडणे से है ना.. :P
पुढच्या वेळी मी धागा लिहीन तेव्हा आपण कंदील आणा.. हाय काय अन नाय काय !!! :D

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2012 - 9:06 am | अत्रुप्त आत्मा

@पुढच्या वेळी मी धागा लिहीन तेव्हा आपण कंदील आणा.. हाय काय अन नाय काय !!! >>>ब्वार्र..ब्वार्र..!ओक्के..अत्मा खुष हुआ...

चिंतामणी's picture

9 Mar 2012 - 9:31 am | चिंतामणी

कशाला? शुटींगकरून डिटेल्स दाखवायचेत का??
Skype Emoticons

हंस's picture

8 Mar 2012 - 7:52 pm | हंस

अआभाऊ, एक राहीले की हो.................. आजचे मिपा बुलेटीन "‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे.." ह्या डॉ. साहेबांच्या धाग्याच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण वाटते. जरा ह्याला पण जरा फुटेज द्या की राव!

अन्या दातार's picture

8 Mar 2012 - 8:12 pm | अन्या दातार

हाय कंबख्त तुने तो पढाही नही!!!
सुरुवात केलीये की ओ त्यांच्या वार्तांकनानेच.

हंस's picture

8 Mar 2012 - 8:21 pm | हंस

सायेब एक डाव माफी करा!

रेवती's picture

8 Mar 2012 - 8:10 pm | रेवती

बाळसं धरायला लागलय हे पाक्षिक.;)

पिंगू's picture

8 Mar 2012 - 10:33 pm | पिंगू

जरा साप्ताहिक बाळ आणखी गुटगुटीत होऊ द्या आणि त्यासाठी खाद्यही पुरवायची व्यवस्था करा..

- पिंगू

प्रचेतस's picture

8 Mar 2012 - 11:10 pm | प्रचेतस

-'' नवकविंची दैना-कुंथले तरी होइना''

अरारारारारा.....
आमचे भटजीसुद्धा सुरुवातीला एक नवकवीच होते याची आठवण झाली. :P

अत्रुप्त आत्मा's picture

8 Mar 2012 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

@आमचे भटजीसुद्धा सुरुवातीला एक नवकवीच होते याची आठवण झाली>>> अरे व्वा...! काय ओळखलत पण मला वल्ली तुंम्ही,म्हटलेलच आहे...चोराला ओळखावयास चोरच लागतो...

सुहास झेले's picture

8 Mar 2012 - 11:42 pm | सुहास झेले

हा हा हा ... एकदम धम्माल :) :)

बरें हों बुंवा. कोंणत्यांतरीं दैंनिंकात नांव काढाल. असो.

भारी जमलंय ओ बुवा, मागच्या १५ दिवसांत बरेच सदस्य भुमिगत राहिले त्याबद्दल काही कलम टाकत जा जरा, तेवढीच जरा चार लोकं जागी होतील.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2012 - 9:03 am | अत्रुप्त आत्मा

@मागच्या १५ दिवसांत बरेच सदस्य भुमिगत राहिले त्याबद्दल काही कलम टाकत जा जरा, तेवढीच जरा चार लोकं जागी होतील.>>> येस येस हे पण डो़क्यात आहेच...स्थगित व मृतवत आयडींना पुन्हा जागे करण्यासाठी एक नवसंजिवनी श्राद्ध विभाग लवकरच उघडावयाचा आहे... सगळ्यांचे पिंड अगदी हसत हसत ठेवण्याची सोय झाली पाहिजे ;-)

प्रचेतस's picture

9 Mar 2012 - 9:19 am | प्रचेतस

भानामतीकार ओक रहस्यमयरित्या गायब

मिपावर गळतग्यांच्या ब्लॉगचे रतीब घालून सातत्याने अंनिसविरोधी प्रचार करणारे विंग कमांडर ओक मिपा दरबारातून सध्या रहमस्यरित्या गायब झाल्याने त्यांच्या येथील चाहत्यांत प्रचंड अवस्थता पसरलेली दिसून येत आहे. ओकांना मिपावर हजर करण्यासाठी त्यांचे तथाकथित चाहते कायद्याची मदत घेण्याच्या विचारात असून सुप्रीम कोर्टात लवकरच हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याच्या विचारात असल्याचे समजते.

ओकांनी मात्र आपण एका अज्ञात स्थळी सुखरूप असून लवकरच एका नविन लेखासह प्रकट होवू असा आशयाचे निवेदन प्रसृत केले असून चाहत्यांना जरा दमाने घेण्याचा संदेश दिला आहे असे आमचा खात्रीलायक वार्ताहर कळवतो.

छान, परंतु मागल्या वेळचे अधिक आवडले..:)

किचेन's picture

9 Mar 2012 - 8:32 pm | किचेन

चांगला झालाय.माननीय लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.सन्माननीय पराकाकांच्या अनेक अर्धवट कथांबद्दल लिहायचं राहिलंय.
आता मिपावर फार जपून रहाव लागेल.मिपावर कोणीतरी स्कार्फ च दुकान उघडा रे! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2012 - 10:07 pm | अत्रुप्त आत्मा

@सन्माननीय पराकाकांच्या अनेक अर्धवट कथांबद्दल लिहायचं राहिलंय. >>> यांच्या अर्धवटपणा बद्दल यांनी स्वतःच लिहिलय हे माहिती नव्हतं मला,बघु...पुढच्या अंकात अंकित करु यांना ;-)

@आता मिपावर फार जपून रहाव लागेल.मिपावर कोणीतरी स्कार्फ च दुकान उघडा रे! >>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा..! सज्जन माणसांना आत्मे झपाटत नाहीत, चिंता नसावी

जेनी...'s picture

9 Mar 2012 - 9:29 pm | जेनी...

भन्नाट ...

:D

खूप आवाडलं......

मी-सौरभ's picture

15 May 2012 - 11:13 am | मी-सौरभ

उद्या बुधवार आहे.

तेवढ वृत्तांताच जमवा :)