ठपका!

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
26 Jul 2008 - 12:43 am

'ठिपका' ही सुंदर गजल घेऊन आलेल्या अनिरुद्ध अभ्यंकरांच्या वेशातल्या केशवसुमारांना आम्ही ओळखले मात्र पाठोपाठ विडंबनधर्माला जागणे आले! ;)

ठपका!

घडायचे ते घडले काही टळले नाही
पोहे खाता तुला भेटणे चुकले नाही

कळले नाही कशी अधाशी प्लेट संपली
चहा कधी मग सुरू जाहला कळले नाही

बहीण अचानक तुझी मला सामोरी आली
त्या धक्यातुन चित्त कधी सावरले नाही

मी ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना माझ्या तेही जमले नाही

नको दाखवू ओळख आता सांगत होती
तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही

शरमिंदा मी झालो होतो अखेर चुकलो
विनवुन तुजला परोपरी हे पटले नाही

बदलत गेले भाव कसे मी बघत राहिलो
नकार मजला तुझा बदलणे जमले नाही

मी जाताना नजर अशी माघारी वळली
हाय! कसे ते तुला तरी पण कळले नाही?

भाळावरती 'ठपका' घेऊन बसला 'रंग्या'
लग्नाचे हे कोडे काही सुटले नाही

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

26 Jul 2008 - 12:50 am | प्राजु

अशी गत झाली का?? :)

मस्त. केसुंच्या पावलावर पाऊल. एकदम सह्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

26 Jul 2008 - 1:41 am | बेसनलाडू

आवडले. चहा-पोहे,धक्क्यातून न सावरणे वगैरे लऽय भारी :)
ही गझल आहे की कविता हा विचार अजून करतो आहे. विडंबन नक्कीच आहे :)
(आस्वादक)बेसनलाडू

वरदा's picture

26 Jul 2008 - 4:22 am | वरदा

एकदम चपखल शब्द..भन्नाट विडंबन....
चतुरंग आणि अनिरुद्ध भाऊ भाऊ तर नाहीत्...... :?
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर's picture

26 Jul 2008 - 7:27 am | विसोबा खेचर

नको दाखवू ओळख आता सांगत होती
तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही

मस्त रे रंगा...! :)

सहज's picture

26 Jul 2008 - 9:26 am | सहज

विडंबन जास्त आवडले.

:-)

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

26 Jul 2008 - 11:50 am | अनिरुद्ध अभ्यंकर

विडंबन जास्त आवडले.
अनिरुद्ध अभ्यंकर

प्रमोद देव's picture

26 Jul 2008 - 9:43 am | प्रमोद देव

रंगाशेठ, गजलेच्या पद्धतीने लिहीलेली विडंबन कविता आवडली.
गजलेच्या वृत्तात रचलेल्या एकाच विषयावर वर्णनपर उलगडत जाणार्‍या काव्यरचनेला उर्दुत नज़्म
असे म्हणतात असे कुठे तरी वाचलंय.

बहीण अचानक तुझी मला सामोरी आली
त्या धक्यातुन चित्त कधी सावरले नाही

चित्तरंजनांचे हे गुपित तुम्हाला कसे हो कळले? ;)

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

चतुरंग's picture

27 Jul 2008 - 9:07 am | चतुरंग

नज्म बद्दल माहिती नव्हती. ती दिल्याबद्दल धन्यवाद!

चित्तरंजनांचे हे गुपित तुम्हाला कसे हो कळले?
अहो काका, 'जे न देखे रवी' असल्यामुळे आम्हाला अशी कोणतीही गुपिते माहीत असतात! ;)

चतुरंग

मदनबाण's picture

26 Jul 2008 - 11:54 am | मदनबाण

नको दाखवू ओळख आता सांगत होती
तिचे इशारे पण ते मी ओळखले नाही
व्वा सॉलिड..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

अनिल हटेला's picture

26 Jul 2008 - 12:57 pm | अनिल हटेला

रन्गाशेठ !!
एक्दम जबरा!!!

येउ देत अजुन !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

शिप्रा's picture

27 Jul 2008 - 9:30 am | शिप्रा

विडंबन खुप आवडले..

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

शितल's picture

27 Jul 2008 - 5:08 pm | शितल

सह्ही विडंबन केले आहे.