उफ़्फ़... ये गालिब - २

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जनातलं, मनातलं
2 Feb 2012 - 11:17 am

उफ़्फ़... ये गालिब - १

गालिब हे एक अजब रसायन होते, खुप थोड्या शब्दात खुप काही सांगून जायचा. वयाच्या अकराव्या वर्षापासून गालिबने लिहायला सुरवात केली. त्याच्या शायरीची मुळ भाषा उर्दु, पण घरामध्ये पर्शियन आणि फारसीही बोलली जायची, त्यामुळे त्या भाषांचाही प्रभाव त्याच्या शायरीवर दिसतो. आज त्याच्या सर्व भाषांमधील शायरीचे जवळपास सर्व अशियायी भाषांमधले भाषांतर उपलब्ध आहे. इंग्रजीमध्ये तर विपुल प्रमाणात लिहीले गेले आहे. आणि त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. गालिबच्या रचनांशी प्रत्येकजण कुठुन ना कुठुन जोडला जातो. त्याची शायरी फक्त प्रेम या विषयावर नाहीये, तर तत्त्वज्ञान, रोजच्या जिवनात येणारे साधे साधे प्रसंग आणि अगदी भावभावनांचा कल्लोळ यावरही त्याची शायरी तेवढीच प्रभावी आहे.

विरहात जळणार्‍या प्रेमविराची कैफियत मांडणे हि तर गालिबची खास हातोटी. हा एक शेर पहा:

वो फिराक़ और वो विसाल कहाँ |
वो शब-ओ-रोज-ओ-माह-ओ-साल कहाँ ||

फिराक़ म्हणजे फारकत, विसाल म्हणजे मिलन. गालिब म्हणतो, आता ते भेटणे नाही, दुरावणे नाही, त्यामुळे विरहाची गोड हुरहुर पण नाही, मिलनाची मस्ती नाही, आता ते ना दिवस राहिले, ना रात्र, ना महिने, ना वर्ष. म्हणजे संपूर्ण फारकत झाली आहे आणि आता परत मिलन होण्याची शक्यताही दुरावली आहे.

स्व:ताबद्दल त्याने काही दोन-चार शेर असे लिहीले आहेत कि, त्याचे व्यक्तिमत्व एकदम नजरेसमोर उभे राहते:

है और भी दुनियामें सुखनवर बहोत अच्छे |
कहते है के गालिब का है अंदाज-ए-बयाँ और ||

हा शेर माहित नसलेला शायरीचा दिवाना सापडणे विरळाच!

शायर तो वो बहोत अच्छा है |
पर बदनाम बहोत है ||

इतक्या बेधडकपणे तो स्वःताला व्यक्त करतो. त्याचे समकालिन त्याच्याबद्दल काय बोलत होते हे त्याला माहित होते पण त्याला त्याची फारशी पर्वा नसे. खालच्या शेर मध्ये तो फार मार्मीक विधान करतो:

"गालिब" बुरा ना मान जो वाईज बुरा कहे |
ऐसा भी कोई है के सब अच्छा कहे जिसे ||

वाईज म्हणजे सज्जन माणूस.

तो ज्या काळात वावरला तो काळ म्हणजे इंग्रजांचा भारतामधला प्रभाव वाढणारा काळ होता. अनेक संस्थाने इंग्रज गिळंकृत करत होते. मोगलशाही जवळ जवळ संपुष्टांत येण्याच्या मार्गावर होती. सगळं काही विकले जात होते. या परिस्थितीने त्याच्यासारखा संवेदनशील कवी अस्वस्थ झाल्याशिवाय कसा राहील?

बस के दुशवार है हर काम का आसॉं होना |
आदमी को भी मयस्सर नही इन्साँ होना ||

मयस्सर म्हणजे शक्य. आता काहीही होणे शक्य नाही, माणूस माणसाला दुरावत चालला आहे. हि त्याची खास शैली. इंग्रज अत्यंत हुशारीने समाजात फुट पाडत होते आणि हे फार थोड्या लोकांना समजत होते. गालिबला हे सगळे दिसत होते, पण तो फार काही करु शकत नव्हता. त्याची हिच भावना ह्या खालच्या शेरामध्ये उतरली आहे:

फ़िक्र-ए-दुनियाँमे सर खपता हुं |
मै कहाँ और ये वबाल कहाँ ||

त्याच्या आजुबाजुची परिस्थिती एका झटक्यात नजरेसमोर उभी राहते ती खालच्या रचनेतूनः

बाजी चा-ए-अतफाल है दुनिया मेरे आगे |
होता है शब-ओ-रोज तमाशा मेरे आगे ||

चा-ए-अतफाल म्हणजे लहान मुलांच्या खेळण्याचे मैदान, तर हे सारे जग माझ्यासमोर लहान मुलांच्या खेळण्याचे मैदान आहे आणि रोज माझ्या समोर त्यावर नविन नविन खेळ होत असतात.

त्याच्या काही काही रचना तर पार आरपार निघून जातात. ये ना हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता, हजारो ख्वाहिशे ऐसी, घर जब बना लिया तेरे दर पर कहे बिगर, हर एक बात पे कहते हो तु कि , तू क्या है अशा काही रचना तर सर्वश्रुत आहेत. ह्या रचना तर वेड लावतातच. पण इतर काही रचना ज्यांनी मला वेड लावले. त्यातल्या काही इथे देतो:

फिर कुछ इस दिल को बेक़रारी है |
सीना झोया-ए-जख्म-ए-कारी है ||

झोया म्हणजे मागणारा, याचक आणि जख्म-ए-कारी म्हणजे खोल जखम. आज परत या हृदयात खळबळ चालू झाली आहे. परत एकदा माझी छाती एक नविन जखम मागतेय. हा झाला शब्दाशः अर्थ. पण जरा विचार केला तर त्याच्या खाली दडलेला अर्थ असा होतो, कि या गझलेतील नायकाला आता जखमांची, दु:खाची इतकी सवय झाली आहे, कि एखादा दिवस तसं काही झाले नाही तर त्याला "बेक़रारी" होते. काय जिवघेणा प्रकार आहे हा!! हिच भावना त्याने आपल्या एका दुसर्‍या रचनेत पण मांडली आहे, तितक्याच प्रभावी पद्धतीने:

रंजसे खुगर हुआँ इन्साँ, तो मिट जाता है रंज |
मुश्किले मुझपर पडी इतनी कि आसाँ हो गयी ||

रंज म्हणजे दु:ख आणि खुगर म्हणजे सवयीचे होणे. आता या शेराचा अर्थ देण्याची काही गरज आहे असे मला वाटत नाही. अशीच अजुन एक रचना पहा:

फिर जिगर खोदाने लगा नाखून |
आमद-ए-फस्ल-ए-लालाकारी है ||

आमद म्हणजे येण्याची सुचना आणि फस्ल म्हणजे सुगीचा काळ. परत एकदा माझी नखे शिवशिवतायेत, हृदयात झालेल्या खोल जखमांवर जी खपली येत होती ती खपली कुरतडून काढायला. बहुतेक सुगीचा काळ जवळ आला आहे. आता हि सुगी म्हणजे काही आनंदाची चाहुल नाही, तर नव्या जखमा होण्याची सुगी. किती भयंकर आहे हे सगळे, पण हे खुप थोड्या शब्दात गालिब सांगून मोकळा होतो.

गालिबच्या प्रत्येक रचनेमध्ये त्याच्या किंवा त्याच्या आजुबाजुच्या परिस्थितीचे यथार्थ वर्णन दिसून येते. आणि त्याची प्रत्येक रचना कुठे ना कुठेतरी आपल्याही जिवनाशी नाते सांगते. म्हणूनच त्या आपल्याला जवळच्या वाटतात, मनाला भिडतात. कुठल्याही साहित्यीक रचनेचे हेच यश असते. जर ती रचना जास्तित जास्त लोकांच्या मनातील भावना व्यक्त करु शकली तर तिचे यश नक्की असते. आणि अशा रचनांना लोक डोक्यावर घेतल्याशिवाय कसे राहतील?

गालिबच्या अश्याच अजुन २ शेरांची मला झालेली अनुभुती इथे देत आहे:

२.

त्या गल्लीतले हे शेवटचे घर..
मोडकळीस आलेले.. पण चिवटपणे उभे असलेले
अंगणातला मोगरा मात्र सदा बहरलेला
कोणासाठी? कुणास ठाऊक!
फुलांचा सडा ओजंळीत भरून घ्यायला
ती नव्हतीच तिथे.. ती तर कधीच निघून गेली होती
दुर, खुप दुर.... कधीही परत न येण्यासाठी
.
थी वो एक शख्स के तस्सव्वुर से
अब वो रानाँ-ए-खयाल कहाँ
.
उफ़्फ़... ये गालिब!

३.

उणीपुरी २० वर्षे लोटली आता
इतक्या वर्षाने झालेली ती भेट
.
आधी ओळखच देणार नव्हतो
पण नाही जमले
.
खुप बदल झाला आहे तुझ्यात
पण
डोळ्यांची धार अजुनही तशीच आहे
बरेच काही विचारणार होतो... मग म्हटले
जाऊ दे
.
खरे तर तू माझ्या डोळ्यात
अगदी आत आत उतरुन अशी काही बघत होतीस
कि...
.
जला है जिस्म जहाँ, दिल भी जल गया होगा
खुरेदते हो जो अब राख, जुस्तजू क्या है?
.
उफ़्फ़ ये गालिब!!

(क्रमशः)

कवितागझलसाहित्यिकजीवनमानआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2012 - 11:24 am | बिपिन कार्यकर्ते

दमदार! क्वालिटी मेन्टेन्ड!

रुपांतरणं आवडलीच.

वपाडाव's picture

2 Feb 2012 - 2:16 pm | वपाडाव

शब्दशब्दाशी सहमत...

मी-सौरभ's picture

2 Feb 2012 - 7:21 pm | मी-सौरभ

मी पण

कवितानागेश's picture

2 Feb 2012 - 11:29 am | कवितानागेश

परत परत वाचण्यासारखे आहे.....

sneharani's picture

2 Feb 2012 - 11:39 am | sneharani

मस्त्!हाही भाग सुंदर झालाय!
:)

प्रास's picture

2 Feb 2012 - 12:14 pm | प्रास

हे प्रकरण भारी सुंदर आहे बुवा!

आवडले.

पुलेप्र

सुहास झेले's picture

2 Feb 2012 - 12:42 pm | सुहास झेले

अप्रतिम... हा भाग देखील आवडला.

पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत :)

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2012 - 1:33 pm | नगरीनिरंजन

आवडले!

मिक्या... मस्त लीव्तोयेस रे...
एक एक पाकळी मस्त उलगडत नेतोस.. नायतर आम्हाला असले उर्दू शेर कधी समजले असते?

लेखमाला रंगणार हे नक्की

चायला
त्या गल्लीतले हे शेवटचे घर..
मोडकळीस आलेले.. पण चिवटपणे उभे असलेले
अंगणातला मोगरा मात्र सदा बहरलेला
कोणासाठी? कुणास ठाऊक!
फुलांचा सडा ओजंळीत भरून घ्यायला
ती नव्हतीच तिथे.. ती तर कधीच निघून गेली होती
दुर, खुप दुर.... कधीही परत न येण्यासाठी

:(
:(

पैसा's picture

2 Feb 2012 - 2:36 pm | पैसा

शेरांचा अर्थ, आणि रसग्रहण सगळं फार सुरेख जमलं आहेच, पण तुमच्या दोन्ही कविता मूळ शेरांची शोभा वाढवणार्‍या मस्त झाल्यात!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2012 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेरांचा अर्थ, आणि रसग्रहण सगळं फार सुरेख जमलं आहेच,

सहमत आहे. रसग्रहण वाचतांना मजा येत आहे. अजून येऊ द्या....!

तुमच्या दोन्ही कविता मूळ शेरांची शोभा वाढवणार्‍या मस्त झाल्यात!

हम्म......!

-दिलीप बिरुटे

फिझा's picture

2 Feb 2012 - 2:44 pm | फिझा

अप्रतिम...!!! खुपच छान !! उफ्फ ये गालिब ३.......मस्त आहे ......!!

खरे तर तू माझ्या डोळ्यात
अगदी आत आत उतरुन अशी काही बघत होतीस
कि...
.
जला है जिस्म जहाँ, दिल भी जल गया होगा
खुरेदते हो जो अब राख, जुस्तजू क्या है?

क्या बात है !!!

दादा कोंडके's picture

3 Feb 2012 - 1:57 pm | दादा कोंडके

अप्रतिम...!!! खुपच छान !! उफ्फ ये गालिब ३.......मस्त आहे ......!!

कृपया "उफ्फ ये गालिब ३" ची लिंक द्याल का मला?

मोहनराव's picture

2 Feb 2012 - 2:48 pm | मोहनराव

एकदम मस्त!!
फक्त वाचतच बसावेसे वाटतं. तुमची ही मालीका वाचनखुण म्हणुन साठवतोय!! पुलेशु!

प्रकाश१११'s picture

2 Feb 2012 - 3:43 pm | प्रकाश१११

अरे वा झकास एकदम..!!

५० फक्त's picture

2 Feb 2012 - 5:18 pm | ५० फक्त

मस्त झालंय वाचत रहावं असं वाटतंय..

उत्तम मांडणी.
शेर देताना कंजुषी करु नये असे वाटते.. त्यामुळे रंगत वाढत आहे.

--------------------------
पूछते हैं वो कि "ग़ालिब" कौन है,
कोई बतलाओ कि हम बतलायें क्या
--------------------------

मेघवेडा's picture

2 Feb 2012 - 6:40 pm | मेघवेडा

जला है जिस्म जहाँ, दिल भी जल गया होगा
खुरेदते हो जो अब राख, जुस्तजू क्या है?

!

छान उलगडून दाखवताय. अनुवादाऐवजी आपल्याला कळलेल्या शब्दांत मांडण्याची पद्धत आवडली. :)

शुभेच्छा आणि पुभाप्र.

सर्व च्या सर्व आवडले ..
मागील भाग आणि हा भाग एकत्रच वाचला ..

निव्वळ अप्रतिम .. आणि अभ्यासपुर्ण लेखन
आवडेश

अप्रतिम भाग!!!

शेवटचा शेर "जुस्तजू क्या है?" ..... आणि ती कविता तर माशाल्ला!

मस्त कलंदर's picture

2 Feb 2012 - 8:10 pm | मस्त कलंदर

दोन्ही भाग पुन्हा पुन्हा वाचले, मस्तच झाले आहेत. तू फक्त कविता करतोस इतकंच माहित होतं पण रसग्रहणही उत्तम करतोस हे ही कळाले!!

कोल्हापुरवाले's picture

3 Feb 2012 - 11:43 am | कोल्हापुरवाले

येकदम टची !!

प्यारे१'s picture

3 Feb 2012 - 12:06 pm | प्यारे१

सुभानल्लाह...!

मेजवानी आहे रे मिका.

अशा लिखाणाची वाट पहात होतो अनेक वर्षं.

बाकी आमचे भाषाविषयक ज्ञान इतके अगाध की फारशी आणि पर्शियन या भाषा वेगळ्या आहेत हे पहिल्यांदाच या लेखात कळलं.

अभ्यासपूर्णही आणि अर्थपूर्णही अशी दुर्मिळ लेखमाला चालू केल्याबद्दल अनेक धन्यवाद..

मला आठवणारा एक गालिबचा शेर

मरहम की जुस्तजू में फिरा हूं जो दूर दूर
तनके सिवा फिगार है इस खस्ततन के पांव.

उर्दू शुद्धलेखनाच्या चुका कृपया सांभाळून घेणे.

मला वाटतं याचा अर्थ असा की जखमांवर मलम शोधायला मी फार फार फिरल्याने माझ्या पायाला भेगा / जखमा झाल्या आहेत.

पुन्हा अर्थातही चुभूदेघे. कारण दहावीस वर्षांपूर्वी कुठेतरी वाचलेला शेर आणि अर्थ पूर्ण स्मृतीतून काढून टंकले आहेत.

Dari, Tajik, Farsi, Isfahani and Khurasani are different dialects of the Persian language, unlike Kurdish and Sughdian which are different languages in the Iranian branch languages.

Oficially the best form (words, accent ) of Farsi-Dari is the one spoken in Tehran (formal language). And the rest of cities in Iran (also countries like Afghanistan) speak the same language but just with different Dialect (which means the slight difference exists but as it's not a real language these differences do not exist in written form).

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Feb 2012 - 1:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हेच सांगायला आलो होतो. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2012 - 5:27 pm | बिपिन कार्यकर्ते

वाहिदा आणि मिका,

भाषांमधला हा पोटभेद मान्य आहे. आणि तो आहेही. पण गालिबच्या काळात हिंदुस्तानात मुख्यत्वे फारसीच बोलली जात असावी. त्यामुळे, मूळ लेखातल्या पर्शियन आणि फारसीबद्दल ती द्विरुक्ती आहे असे वाटते. की तुम्हाला असं म्हणायचं आहे का की त्याकाळी पर्शियन आणि फारसी अशा दोन वेगवेगळ्या भाषा (पोटभाषा) बोलल्या जात होत्या?

मला ही गोष्ट मिकाच्या मूळ लेखातही खटकली होती पण लेख इतका सुंदर आहे की उगाच गालिब विषयाला अवांतर नको म्हणून नाही लिहीले.

पण भारतात त्याकाळी फारसी च बोलली जायची . पर्शियन अन फारसी अश्या दोन वेगवेगळ्या भाषा नाहीतच मुळात.
जसे ,
American, British, Canadian, and Australian English are all dialects of the English language.
dialects ला मराठीत काय म्हणतात मला खरंच माहीत नाही रे बिप्स.
(तुला कसे समजवू... या संभ्रमात .. असो वरिल उदाहरणामुळे बराचसा गुंता सुटेल )
बाकी, The Ball is in Mika's court
( Mika = मिसळलेला काव्यप्रेमी :-) )

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Feb 2012 - 5:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ते खरे तर असे आहे कि, मराठी वेगळी आणि खान्देशी वेगळी, पण तरी दोन्ही मराठीच! :)

केओस's picture

4 Feb 2012 - 8:47 pm | केओस

त्या म्ह्न्न्जे बोली.
बाकि क्वविता सुन्दर आहेत.

इन्दुसुता's picture

5 Feb 2012 - 9:14 am | इन्दुसुता

जला है जिस्म जहाँ, दिल भी जल गया होगा
खुरेदते हो जो अब राख, जुस्तजू क्या है?

क्या बात है....

लेखन मालिका खूप आवडतेय , पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

छान
शेर व त्याचे रसग्रहण चांगले जमलेय

सुमो's picture

5 Feb 2012 - 11:42 am | सुमो

वाचनखूण साठवली आहेच आणि दोन्ही भागांच्या प्रिंट्स सुद्धा काढून ठेवल्या आहेत.

प्रतिक्रिया द्यायला जरी नाही जमलं तरी वाचतो आहे आणि प्रचंड आवडलं आहे हे नमूद करतो.

लगे रहो...

आनंदी गोपाळ's picture

5 Feb 2012 - 11:27 pm | आनंदी गोपाळ

बल्ली मारां के मुहल्ले की वो पेचीदा तंग गलीरों
की सी गलियां
सामने टाल के नुक्कड पे बटेरों के कसीदे
गुडगुडाती हुई पान की पीकों में होता हुआ वाह
वाह
चंद दरवाजों पे लटके हुए बोशीदा से कुछ टाट के परदे
एक बकरी के ममियाने की आवाज
और धुंधलाई हुई शाम के बेनूर अंधेरे ऐसे मुंह जोड के
चलते हैं यहां
चूडी बालान के कटरे की बडी बी जैसे
अपनी बुझती हुई आंखों से दरवाजे टटोले
इसी बेनूर अंधेरी गली कासिम से
एक तरतीब चरागों की शुरू होती है
एक कुरानी सुखन का सफा खुलता है
असदउल्लाह खां 'गालिब' का पता मिलता है.....

वाहीदा's picture

6 Feb 2012 - 12:07 am | वाहीदा

यह मेरे खयाल से मआरूफ और मशहूर शायर गुलजार की पेशकश हैं !
हि रचना येथे दिल्याबध्दल धन्यवाद !

कुछ यकीं कुछ गुमान की दिल्ली,
अनगिनत इम्तिहान की दिल्ली !
ख्वाब, किस्सा, ख्याल, अफसाना...
हाय, उर्दू जबान की दिल्ली !
बेजबानी का हो गयी है शिकार
असदुल्लाह खान की दिल्ली... !! :-(
--अनवर जलालपुरी

सुहास..'s picture

7 Feb 2012 - 12:22 pm | सुहास..

मस्त च रे मिका !!

आवडेश !!

जरा स्त्री - सौंदर्य आणि देशभक्ती पर गालिब पण येवु द्यात !!

गालिब हे एक अजब रसायन होते, खुप थोड्या शब्दात खुप काही सांगून जायचा. >>>.

एकदमच !! उदा.

" ईष्क ने गालिब निकम्मा कर दिया "
" वरना हम कभी आदमी थे काम के "

विसोबा खेचर's picture

10 Feb 2012 - 7:29 pm | विसोबा खेचर

क्लासिक..!

पुढील भागांची वाट पाहात आहे..

तात्या.

वपाडाव's picture

13 Feb 2012 - 4:04 pm | वपाडाव

गालिब-३ का इंतजार है...