उफ़्फ़... ये गालिब - अंतीम

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जनातलं, मनातलं
23 Feb 2012 - 11:43 am

उफ़्फ़... ये गालिब -२

गालिब एक स्वप्नरंजन आहे, तो एक रम्य गुढ आहे, तो वेदना आहे, तो आनंद आहे, तो निराशा आहे, तो चिवट आशाही आहे.

देके ख़त, मुँह देखता है नामा-बर
कुछ तो पै़गाम-ए-ज़बानी और है

नामा-बर म्हणजे मराठीत पोस्टमन. तर पत्र देऊन पोस्टमन माझ्या चेहर्‍याकडे पाहत राहतो, माझे पत्र वाचुन होण्याची वाट पाहत राहतो. कां? पत्रात काहीतरी लिहिता आलेले नाही ते तोंडी सांगायचे आहे कां? हा झाला त्या शेरांचा प्रकट अर्थ. आणि न लिहीलेला गर्भितार्थ असा कि "असे तर नाही कि ते पत्र वाचतांना माझा चेहरा वाचून पत्र पाठवणार्‍याला ते भाव कळवायचे आहेत." याला म्हणतात "reading between the lines" चा उत्कृष्ट नमुना!! हे एक रम्य गुढ नाही कां?

वेदना व्यक्त करणे हि तर गालिबची खास शैली.

गालिब-ए-ख़स्ता के बगैर कौनसे काम बंद है?
रोयीये ज़ार-ज़ार क्या, किजीये हाय हाय क्यु?

ख़स्ता म्हणजे दुर्दशा. गालिबची दुर्दशा कशी होईल, त्याचे वाईट कसे होईल याशिवाय दुसरे काही विचार नाही त्याच्या डोक्यात. असे असेल तर उगाच धाय मोकलून रडण्यात काय अर्थ आहे.

जेव्हा गालिब आग्र्याहून दिल्लीला आला, तेव्हा दिल्लीच्या दरबारात त्याला सहजासहजी स्थान मिळाले नाही, त्याला स्वतःला आधी सिद्ध करावे लागले. दिल्लीचे प्रतिथयश शायर त्याला पाण्यात पाहत होते. आणि कारण अगदी सहाजिक होते, त्याच्या शायरीतली सहजता, त्या शायरीची गुणवत्ता, त्या प्रतिथयश लोकांपेक्षा खुप उंच होती. आणि असे काही पचवणे माणसाला जरा जडच जाते. मग त्या दु:स्वास करण्यार्‍या लोकांनी त्याच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण केल्या. पण शेवटी गुणवत्तेला कोणी झाकू शकत नाही. ती उजेडात आल्याशिवाय राहत नाही. आणि तेच झाले. या सगळ्यावर भाष्य करतांना तो म्हणतो:

हर एक बात पे कहते हो तुम के तु क्या है?
तुम्ही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगु क्या है?

गालिब वाचतांना त्याच्या रचनांच्या प्रेमातच पडायला होते. तुमचे 'हाल-ए-दिल' तो सहजपणे 'बयान' करुन जातो. मानवी मनाची गुढता आणि त्यातील गुंतागुंत इतकी प्रभावीपणे मांडता येणार्‍या फार थोड्या कवींमध्ये गालिबचा नंबर फार वरचा आहे.

दिल ही तो है न संग-ओ-खिश्त, दर्द से भर न आये क्यु?
रोयेंगे हम हजार बार, कोई हमे सताये क्यु?

संग म्हणजे दगड आणि खिश्त म्हणजे वीट. शेवटी हे माझे हृदय आहे, दगड किंवा वीट नाही, एका क्षणी भरुन येऊ शकते. त्या क्षणी मी कां रडू नये? मोकळेपणे रडण्यावरही कोणाची हरकत कां असावी? पण हे रडणे किती तीव्र आहे याची कल्पना तुम्हाला सहज येणार नाही, ती करुन देण्यासाठी तो म्हणतो:

ऐसा आसाँ नही लहूरोना
दिल मे ताक़त, जिगर मे हाल कहाँ?

इथे हाल चा अर्थ आहे, spiritual esctacy. तर हे रडणे इतके सोपे नाही, ते सहन करण्यासाठी तुमचे हृदय तितकेच कठोर हवे, त्या सर्वशक्तिमान जगनियंत्यावर भरोसा पाहिजे. मनातल्या त्या कमालीच्या तीव्र भावनेला तो असा मोकळे करतो.

गालिबच्या काही काही रचना इतक्या आत पोहचतात कि थक्क व्हायला होते:

उनके देखेसे जो आ जाती है मुहपर रौनक |
वो समझते है के बीमार का हाल अच्छा है ||

काय खयाल आहे वाह्ह!! तिच्या एका कटाक्षाने चेहर्‍यावर जी प्रसन्नता आली, त्यामुळे तिला वाटले कि मी तर एकदम आनंदात आहे. मी सगळी दु:खे क्षणभर विसरलो म्हणजे मी खुप आनंदी आहे असे नाही हो!

लौकीकार्थाने, देवाची आणि गालिबची तशी काही गट्टी नव्हती. असे म्हणतात, तो नियमीतपणे नमाज़ पढत नसे, रोज़ा ठेवत नसे. त्याला दारुचे अत्यंतिक व्यसन होते, त्यावर तो स्वत:च फार सुंदर शेर मांडतो:

ये मसाईल-ए-तसव्वुफ़, ये तेरा बयान ग़ालिब |
तुझे हम वली समझते, जो न बादा-ख़्वाऱ होता ||

मसाईल-ए-तसव्वुफ़ म्हणजे धार्मिक गोष्टी, वली म्हणजे मित्र आणि बादा-ख़्वाऱ म्हणजे अट्टल शराबी. कुठे त्याची शायरी किंवा शायरीतील विचार आणि कुठे देवधर्म! एकवेळ त्याच्या शायरीकडे दुर्लक्ष करुन त्याला एक चांगला, सज्जन माणूस मानलेही असते पण तो तर पक्का शराबी आहे! :(

त्याच्या पत्नीलाही त्याच्या या दारुच्या व्यसनाचा विषाद वाटत असे. तेव्हा तिला तो म्हणतो:

पिला दे ओक से साक़ी जो हम से नफ़रत है
प्याला गर नहीं देता, न दे, शराब तो दे

ओक म्हणजे ओंजळ. अगदी प्याला भरुन नको पण कमीतकमी ओंजळभर तर पिऊ दे!!

तर असा हा वल्ली!

काळजाला हात घालून, दाद घेणे म्हणजे काय, हे गालिब वाचल्यावर समजते. असेही दाद मनात द्यायची असते, आसमानात नाही. माझ्या गालिबपुराणात मी असे किती शेर देऊ शकणार? पण गालिब हे न संपणारे आख्यान आहे. कितीही वाचले तरी नेहमी असेच वाटत राहते कि, अजुन बरंच बाकी आहे. जसे काळाला आणि समुद्रातल्या लाटेला थांबवणे शक्य नाही तसेच गालिब वाचल्यावर 'व्वाह' थांबवणे अशक्य आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, "उफ़्फ़... ये गालिब!"

"उफ़्फ़... ये गालिब!" या मालिकेतील शेवटच्या काही रचना देतो आणि गालिबपुराणाला विराम देतो.

४.
बेचैन करणारी दुपार
अंगावर येणारी नि:शब्द शांतता
सागर तिरावर फक्त तू आणि मी
वाट्टेल ते झाले तरी
तू मला सोडून जाणार नाहीस..
असा माझा विश्वास
पण तू जे सांगीतलेस त्याने
जिवालाच तडा गेला
.
इतक्यात एक लाट जोरात येऊन पायावर आपटली
.
जाते हुए कहते हो के क़यामत को मिलेंगे
क्या खूब! क़यामत का है गोया कोई दिन और
.
उफ्फ... ये गालिब!!

५.
मयखान्यातून तो लडखडतच बाहेर पडला
नेहमीप्रमाणेच
शुद्द हरपत होती, पण तिची आठवण
ती काही सरेना
इतकी पिऊन देखिल
ती तशीच समोर होती
डोळ्यात प्रचंड आर्तता घेऊन
.
तिला वचन दिले होते
कधीही न पिण्याचे
पण आता तिच जर...
.
'गालिब' छुटी शराब, पर अब भी कभी-कभी
पिता हू रोज-ए-अब्र-ओ-शब-ए-माहताब में
.
उफ़्फ़... ये गालिब

६.
बस्स.. आता हे सहन करणे शक्यचं नाही
या जगण्याला ना संदर्भ ना अर्थ
.
फक्त एक वेडी आशा
.
तू कधीतरी परतशील
येतांना तेच फुलपाखरी दिवस आणशील
परत जीव एवढा एवढा होईल
आणि त्या सुखलहरींवर हिंदोळायला लागेल
.
पण शेवटी हि फक्त एक आशा
तिला ना आदी ना अंत
.
यार से छेड चली जाय 'असद'
गर नही वस्ल तो हसरतही सही
.
उफ्फ... ये गालिब!!

(समाप्त)

कवितागझलसाहित्यिकजीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

23 Feb 2012 - 11:56 am | अन्या दातार

मिका, तुस्सी ग्रेट हो!!! डूड हो!!

अन हे काय?? एकाच लेखात किती परस्परविरोधी विधाने करायची ती??

१. पण गालिब हे न संपणारे आख्यान आहे.
२. ...आणि गालिबपुराणाला विराम देतो.

याबद्दल निषेढ :angry: :angry: :angry:

प्यारे१'s picture

24 Feb 2012 - 12:28 pm | प्यारे१

सुभानल्लाह...

इसे ऐसे मुकाम ना दो मियाँ... चलने दो ये काफिला नही कारवाँ ऐसे ही |

( धन्स स्वातीविशु फॉर वर्ड कारवाँ.. साला आठवतच नव्हता किती दिवस)

अरेरे!
लेखमाला अशी अचानक आवरती घेतल्याबद्दल वाईट वाटले.
स्थगित ठेवा, पण डायरेक्ट संपली असे म्हणू नका.
मझा येतो आहे प्रत्येक भागात.

सेम मत आहे रे भाऊ.
येव्हड्या लवकर आवरते घेवु नका !

बाकी सर्व जबरदस्तच आहे..

रानी १३'s picture

23 Feb 2012 - 12:44 pm | रानी १३

खुपच सुरेख!!!!!!! गालिबपुराण प्लीज चालु ठेवा......

कवितानागेश's picture

23 Feb 2012 - 1:02 pm | कवितानागेश

फक्त 'अंतिम' हा शब्द चुकलाय.
लेख सुंदरच आहेत.
पुढच्या लेखांची वाट बघतेय.

मेघवेडा's picture

24 Feb 2012 - 3:38 pm | मेघवेडा

तंतोतंत.

मूळ सगळेच्या सगळे शेर सुरेखच. तुमची रुपांतरणंही आवडली! अजून येऊ द्या. इतक्यात संपवू नका. :)

फार फार सुंदर.

इतक्यात संपणारा विषय नाही हा..

तुझ्या झाडाला झपाटून तुझ्यात प्रवेश करुन आणखी लिहायला लावेलच गालिब पुढे..

वपाडाव's picture

23 Feb 2012 - 1:51 pm | वपाडाव

मित्रा, अरे चुक झाली अन हे वाचायला घेतलं असं वाट्टंय... अंतिम हा शब्द खरंच नकोय रे...
येउ दे... थांबवु नको...
कधी कधी एखादाच शेर घेउन का होइना त्याचे अर्थ आम्हा नालायकांपर्यंत पोचव रे...

पैसा's picture

23 Feb 2012 - 2:21 pm | पैसा

पण लेखमालिका संपलीच का?

विसोबा खेचर's picture

24 Feb 2012 - 11:09 am | विसोबा खेचर

सहमत..

सुहास..'s picture

23 Feb 2012 - 2:30 pm | सुहास..

हुच्च !!

मस्त मस्त मस्त अजुन वाचायला आवडेल :)

मी-सौरभ's picture

24 Feb 2012 - 7:07 pm | मी-सौरभ

डोळा मारणारी स्मायली न टाकलेल्या 'पियु'शी सहमत..:)

(चला आता बाकीच्यांनी उप प्रतिसादांची रांग लावा रे)

स्वातीविशु's picture

23 Feb 2012 - 4:58 pm | स्वातीविशु

उफ्फ.... ये गालिब..

आप कह्ते हो ये अंतिम भाग है... मगर ये दिल चाहता है की कारवां युही चलता रहे...कारवां युही चलता रहे..... :-)

स्वाती२'s picture

23 Feb 2012 - 7:45 pm | स्वाती२

सुरेख लेखमाला!

असेच म्हणते. कवितादेखील आवडल्या.

जाई.'s picture

24 Feb 2012 - 8:42 pm | जाई.

हा भागही छान झालाय

प्राजु's picture

24 Feb 2012 - 11:31 pm | प्राजु

खूप खूप सुरेख!!
वाचतना एखाद्या वार्‍याच्या झुळकीसोबात आपणही लहरतोय अस वाटत होतं
मालिका संपवू नका.
प्लिज.. चालू ठेवा.

चाणक्य's picture

25 Feb 2012 - 3:02 pm | चाणक्य

मिका चालू ठेवा मालिका