(सुटलेल्या पोटाची कहाणी)

यकु's picture
यकु in जे न देखे रवी...
18 Jan 2012 - 3:28 pm

प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी

घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी
काचलेला लालेलाल वळ उठे झणी
रोजचेच झाले आता नवे काही नाही
इन कशी करु आता मला सांगा कुणी
झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी
निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी
सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला
सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला

ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

दाटदाट नगरात गर्दी होई सारी
घामाघूम राजा नाही तरी एसीचा हा वारा
रोज सकाळीच राजा निघताना बोले
जिम मारायचे काल रा‍हूनिया गेले
जमलेच नाही जरी चालायाला कधी
आज परि चालतच मी येणारच घरी

स्वप्नातल्या मांड्‍यांवरी मारु ताव थोडा
ढेरी कमी झाली स्वप्नी पाही वेडा
येता घरी दोन पेग मारु आज थोडे
दोनच पेग त्यामुळे फार काही न घडे
सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

ऑफिसात उशीरा मी राही सदा बसून
थंडावले जाल सारे लोक गेले उठून
तास-तास गेला कसा प्रतिसादी निघून
एक-एक भिडू गेला हळूच निघून
अशा वेळी कसे सांगू काय-काय वाटे
ढेरीपाशी हात जाई वेड्‍यापरी धावावेच वाटे
वाटे मज सदासाठी रहावे उपाशी
उगाचच पळावे नि खावी फळे खाशी

उतरत उतरत उतरेल काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया दोस्तलोग मारतील ढुशा
बसूनच स‍ेलिब्रेट करु आता उठ लेका नशा
नको नको म्हणताना
मारु दोन-दोन पेग
क्षणोक्षणी ढेरी वाढे मज येई राग
सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला
सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला

ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

पीतापीता केव्हा तरी येईल जांभई
जाऊ घरी हळूहळू जरी पाय धरवणार नाही
झोपू मग दिवसभर तंगडे पसरुनी असे
पूर्वीपेक्षा वाढे ढेरी असे उगा वाटे

ढेरीच ती सांगताहे ऐक बाळा उगा
तुझीच रे सदा आता मी
तुज कधी सोडणार नाही
सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला
सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला

ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

भयानकहास्यबिभत्सकरुणसंगीतकथाकविताविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

गणपा's picture

18 Jan 2012 - 3:32 pm | गणपा

आयला! इथे तर प्रतिसाद द्यायचीच गोची! ;)

सागर's picture

19 Jan 2012 - 11:51 am | सागर

आयला! इथे तर प्रतिसाद द्यायचीच गोची!
गणपा मित्रा,
माझी पण तीच गोची झालीय ;)

श्रावण मोडक's picture

18 Jan 2012 - 5:53 pm | श्रावण मोडक

परिक्रमेचा लाभ काय रे हा? अर्ध्यामुर्ध्या परिक्रमेचा? भारीच!
बादवे, आता 'हळव्या' प्रतिसादांची प्रतीक्षा करतोय. ;)

मोडक,
अहो काही लोकांना तर लाभ कमावण्यासाठी अर्धीमुर्धीही नर्मदा परिक्रमा करावी लागत नाही. ;-)
आलं लक्षात की उकल करुन सांगू? ;-)
हळवे प्रतिसाद बरेच आलेत. पाहून घेतले ना?

प्रास's picture

18 Jan 2012 - 3:54 pm | प्रास

धन्य आहात....

__/\__

जाई.'s picture

18 Jan 2012 - 4:04 pm | जाई.

_/\_

Maharani's picture

18 Jan 2012 - 4:10 pm | Maharani

भारीच!!

गणेशा's picture

18 Jan 2012 - 4:18 pm | गणेशा

विडंबन आवडले.. मजा आली वाचताना

बाकी
बोळ्क्या मधे लुक - लुकलेला ह्या गद्य ओली राहिल्या की वो .. देतो.

बोळ्क्या मधे लुक - लुकलेला तुझा पहीला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा मऊ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतलास जेंव्हा घराचा ताबा
लूटू लूटू उभ रहात टाकलस पाऊल पहिल दूर च् पाहत राहिलो फक्त जवळच पाहायच राहून गेल,

कमरेवरच ओघळलेला तुझा पहिला घाट, आणि पहिल्यांदाच घेतले जेंव्हा तुला प्रेमाणे आत
ओह म्हणण्या आधीही म्हणालो होतो बास, हळु हळु घेतलास जेंव्हा सर्वांगाचा घास
लुटु लुटु हालत हालत टाकलीस पहिली उडी.. लांबचे जावुद्या जवळच ही उडी मारणे जमलेच नाहि

ला लाला ला !

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2012 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा

यक्कूशेठ जियो... बेक्कार हसू येत होतं वाचताना...काही ओळींपुढे तर ---^---
@निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी

@येता घरी दोन पेग मारु आज थोडे
दोनच पेग त्यामुळे फार काही न घडे

@हसूनिया दोस्तलोग मारतील ढुशा
बसूनच स‍ेलिब्रेट करु आता उठ लेका नशा

मेघवेडा's picture

18 Jan 2012 - 5:01 pm | मेघवेडा

एकदम झ्याक जम्या हय!

नि३सोलपुरकर's picture

18 Jan 2012 - 5:19 pm | नि३सोलपुरकर

यशवंत राव्,भट्टी मस्त जमलीय..
खूप हसू येत होतं वाचताना .....

@ गणेशा ...अ‍ॅडीशन पण छान जमलीय.

michmadhura's picture

18 Jan 2012 - 5:31 pm | michmadhura

छान आहे, मजा आली वाचताना. :-)

मूकवाचक's picture

18 Jan 2012 - 5:35 pm | मूकवाचक

__/\__

सुहास झेले's picture

18 Jan 2012 - 5:49 pm | सुहास झेले

जबरा !!

उदय के'सागर's picture

18 Jan 2012 - 6:15 pm | उदय के'सागर

दमलेल्या बाबाची कहाणी ऐकतांना जेवढा 'सेन्टी' झालो नव्हतो तेवढा हि कविता वाचुन 'सेन्टी' झालो :(

असो, पोट सुटलेल्याचे दु:ख कोणाला तरी समजले .. धन्स यकुजी!!! ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2012 - 7:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आपण महान आहात. __/\__

परिक्रमा पूर्ण केली असती तर असे लिहायची वेळ आली नसती.

स्वानन्द's picture

18 Jan 2012 - 9:03 pm | स्वानन्द

हा हा!!
एकदम फक्कड. :D

गणेशाची अ‍ॅडीशन सुद्धा सही सही जमलीय!

५० फक्त's picture

18 Jan 2012 - 9:33 pm | ५० फक्त

यक्कुशेट, आमच्या वरुन लिहिलेल्या कवितेला सलाम,

आपल्याकडं ती दगडं उभी करायची पद्धत असती ना तर हीच कविता लिहायला सांगितलं असतं मी..

टुकुल's picture

18 Jan 2012 - 9:39 pm | टुकुल

एकदम झक्कास..

--टुकुल

आमचे हे एक जुने विडंबन आठवून दिल्याबद्दल आभारी आहोत! ;)

-रंगा

पैसा's picture

18 Jan 2012 - 11:06 pm | पैसा

६ महिने डाळ बट्ट्या खाऊन आणि रोज चालून सडसडीत होऊन येशील!

कवितानागेश's picture

19 Jan 2012 - 12:08 am | कवितानागेश

मीटर चुकलंय,
असे कुणी म्हणाले कसे नाही अजून? ;)

मराठमोळा's picture

19 Jan 2012 - 4:35 am | मराठमोळा

काय बोलावे यावर..
ही सुटलेल्या पोटाची कहाणी नव्हे तर 'कहानी घर घर की' आहे. ;)

प्यारे१'s picture

19 Jan 2012 - 10:16 am | प्यारे१

खी खी खी !

पियुशा's picture

19 Jan 2012 - 11:11 am | पियुशा

मस्त जमलय :)

वा वा यशवंता...

क्या बात है..

पण बेल्टमधून बाहेर ओघळलेल्या पोटाप्रमाणे अनेक ओळीत शब्द मूळ गाण्याचा मीटर फोडून फोफावलेत की.. ;)

कपड्यांचे कपाट उपसताना करुण सत्यपरिस्थितीतून मलाही "पुरानी जीन्स, और गिटार"च्या धर्तीवर

"जुनी जीन्स , पण पोट फार..
**च्या वरती चढेनाच यार.."

असं गाणं सुचलं होतं. पण ते अपुरं राहिलं.. तुझी कविता वाचून समाधान पावलो.

ते खरंय
पोएटिक फ्रिडम कायसं असतं तसं विडंबिक फ्रिडम घेतलंय ;-)

कपिलमुनी's picture

19 Jan 2012 - 12:52 pm | कपिलमुनी

नाद खुळा ....

जिकलास !!!

इरसाल's picture

19 Jan 2012 - 4:59 pm | इरसाल

हातोहात प्रत्येकाने आपला टायर कोणता तेही जाहीर करावे.................

गवि's picture

19 Jan 2012 - 5:15 pm | गवि

आमचा मिशेलिन.

आदिजोशी's picture

19 Jan 2012 - 5:12 pm | आदिजोशी

पण विडंबन मिटर मधे नसल्याने वाचायला अजिबात मजा आली नाही.

मूळ चालीत, मूळ गेयतेसकट विडंबन म्हणता आलं नाही तर ते वाचायला मजा येत नाही.

यकु's picture

19 Jan 2012 - 5:41 pm | यकु

सहमत.

आवडलं, सुदैवाने माझं पोट आटोक्यात आलं म्हणावं तर उगा झैरात केल्यासारखं वाटायचं म्हणून गप्प बसायचं ठरवलं आहे.

प्रचेतस's picture

19 Jan 2012 - 8:04 pm | प्रचेतस

माहितेय बे तू जिमला जातोस ते.
बाकी ते ट्रेडमिलचं काय झालं तो किस्सा जरा सांग की. ;)

बाकी ते ट्रेडमिलचं काय झालं तो किस्सा जरा सांग की. Wink

खाली झालंय तसं काही झालं होतं का ;-)

प्रचेतस's picture

19 Jan 2012 - 8:15 pm | प्रचेतस

ते आता सूडच सांगेल ब्वा. ;)

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2012 - 8:53 pm | कानडाऊ योगेशु

सर्व काही खाऊन सुध्दा..
माझं ताटं कसं भरलेले..
पाहील तर..मी तुझंच ताट
माझ्या समोर धरलेलं..

- द्याद्या ढेकर..

वपाडाव's picture

19 Jan 2012 - 9:23 pm | वपाडाव

अन यकु त्ये मीटर बीतर ग्येलं चुलीत.... आपाण आपली व्यथा सांगुन व्हा मोकळे....
-(समदु:खी) वपाडाव

नंदन's picture

20 Jan 2012 - 4:38 am | नंदन

लै भारी