(निवृत्ती)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Jul 2008 - 9:02 pm

चार दिवस गावाला गेलो होतो येऊन बघतो तो काय निवृत्ती?
गुरुवर्य केशवसुमारांच्या ह्या'निवृत्ती'ने आमच्या भावना उचंबळून आल्या.
घेतला वसा टाकणे ही तर विडंबनाशी प्रतारणाच, शिवाय गुरुवर्यांना काय वाटेल? छे, छे हे घोर पाप आम्ही करणार नाही असा तत्क्षणी निश्चय केला आणि लगेच विडंबनधर्माला जागलो ते असे -

धावा सार्‍या कवीजनांचा फळतो आहे
निवृत्तीचा विचार 'केशा' करतो आहे

वा वा टवळ्या खपला आता पाडा कविता
जथा कवींचा पहा कसा ओरडतो आहे

बरा फासला टीकेच्या जाळ्यात पहा तो
सुटका आता कोण तयाची करतो आहे

'मित्रांनी'ही सावज केले होते त्याला
नक्राश्रूचा थेंब पहा ओघळतो आहे

डोळ्यांमध्ये धुंदी आता त्या कवितेची
इथे लिहू की तिथे, कवी चाचपतो आहे

खेळा झटपट पहा कसे मैदान मोकळे
विदूषकाचा तोल कसा हा ढळतो आहे

टाका गाडुन प्रतिमेच्या भिंतीत आता ह्या
हाच ओरडा, हाच चौघडा झडतो आहे

साद घालती मला खुळे आभास कवींचे
जाल कुठे? हा पहाच 'रंगा' येतो आहे

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Jul 2008 - 9:52 pm | प्राजु

रंगराव... आपल्याला दंडवत...

वा वा टवळ्या खपला आता पाडा कविता
जथा कवींचा पहा कसा ओरडतो आहे

बरा फासला टीकेच्या जाळ्यात पहा तो
सुटका आता कोण तयाची करतो आहे

'मित्रांनी'ही सावज केले होते त्याला
नक्राश्रूचा थेंब पहा ओघळतो आहे

हे एकदम मस्त...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

21 Jul 2008 - 10:22 pm | वरदा

बरा फासला टीकेच्या जाळ्यात पहा तो
सुटका आता कोण तयाची करतो आहे


ह्म्म्म एकदम खरं चतुरंग..
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

बेसनलाडू's picture

21 Jul 2008 - 10:29 pm | बेसनलाडू

वा रंगराव,
गुरुजींनी बॅटन पास केलेली दिसते ;) या या पुढच्या १०० मी. साठी आम्ही वाट बघत आहोत.
(धावपटू)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 9:16 am | विसोबा खेचर

साद घालती मला खुळे आभास कवींचे
जाल कुठे? हा पहाच 'रंगा' येतो आहे

हे मस्त रे रंगा! :)

अनिल हटेला's picture

22 Jul 2008 - 9:45 am | अनिल हटेला

श्रीमान रन्गाराव यासे !!!
छान जोरात विडम्बन चालू आहे!!!

मस्त येउ देत अजुन !!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चेतन's picture

22 Jul 2008 - 10:58 am | चेतन

'मित्रांनी'ही सावज केले होते त्याला
नक्राश्रूचा थेंब पहा ओघळतो आहे

एकदम मनातलं लिहलतं राव

(केशवसुमारांचा पंखा) चेतन

केशवसुमार's picture

23 Jul 2008 - 10:29 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
एकदम जबर्‍या विडंबन..
"केश्या"ची ही जागा "रंग्या" भरतो आहे.. चालू द्या..
(निवृत्त)केशवसुमार

रंगराव,
उत्तम....

"केश्या"ची ही जागा "रंग्या" भरतो आहे असेच म्हणतो.

आंबोळी