ग्रहण-१

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
15 Sep 2011 - 7:06 pm

सायबानू मीच त्यो .... अंतिम

आता पुढे ..........

****************************************************************************

माणसाचं आयुष्य मोठं अनाकलनीय आहे. प्रत्येक पुढचा क्षण हा अनपेक्षित असतो. काही काही लोकांच आयुष्य तीस-चाळीस वर्ष तसच्या तसं जातं, काही बदल नाही..साचलेल्या डबक्याप्रमाणे.! पण काहींच आयुष्य..... असो
मी त्या भयानक साखळीचा भाग कसा झालो हे मी आत्ता सांगु शकणार नाही, त्यात गुंतलो कसा हे हि कळलं नाही. किंवा माझ्या दैवात हे भयानक सावट का यावं याचही उत्तर नाही. मनात प्रचंड वादळ उठलयं. डोकं फुटून जाईल कि काय असं वाटतयं. मी वेडा तर झालो नाहीये ना? पण पुढे जे काय मी लिहणार आहे त्याने तुम्हाला तर नक्कीच वाटेल कि वेडा आहे.

माझं नाव..काय बर माझं नाव? आणी ते सांगणं गरजेचं आहे?? ठिक आहे, सांगतो. माझं नाव 'हर्षद बोरकर', तुमच्यासारखाच मध्यमवर्गीय, डोंबिवली नामक उपनगरात एका सुखी घ्ररट्यात राहणारा.

पण हे सगळं दोन महिन्यापुर्वीचं...
आता सगळ बदललंय

दोन महिन्यापुर्वीची संध्याकाळ मला अजुन आठवतेय..
***************************************************************************************************************

"बोरकर, साल्या लटकलास बे तु." कोर्टातुन बाहेर पडता पडता पुष्करने पाठीवर जोरदार थाप हाणत बातमी दिली. त्याच्या बातम्या आजपर्यंत कधी खोट्या ठरल्या नव्हत्या. माझा स्वभाव जात्याच भित्रा.
माझ्या भेदरट नजरेकडे पाहुन त्याने जास्त न ताणता सांगितले.

"अबे तुझी बदली झालीये..नागरगोज्याला..जज पाटील यांच्या हाताखाली, त्यांनी चार्ज घेऊन महिना उलटून गेलाय पण अजुनही स्टेनोची जागा रिकामी आहे, म्हणून सध्या तुला पाठवणार आहेत."

खाडकन सगळा मुड गेला. आत्ता कुठे ६ महिन्यापुर्वी पालघर कोर्टातून बदली घेऊन 'हायकोर्टाचं' सुख अनुभवत होतो. तर ही बदलीची बातमी.

"पुष्क्या, साल्या खर बोलतोयस ना?"

"अरे मग, दिवेकर साहेबांनी तुझ्या रिलीजची ऑर्डर इश्श्यु केली सुध्दा. तुला ऑफिशियली उद्या समजेलच."
चायला, लेका नवीन लग्न झालयं माझं, सगळंच बोंबला आता."

पाठीवर हताशपणे हात मारून पुष्कर निघुन गेला.

सि.एस.टी वर आलो, डोंबिवली फास्ट लागलेली, जेमतेम चौथी सिट मिळाली, सगळ्या मुडचा सत्यानाश झालेला. घरी काही बोललोच नाही.

दुसर्‍या दिवशी साहेबांनी लेटर हातात दिलं "बोरकर, जरा गैरसोय होईल, पण सहा महिन्याचा प्रश्न आहे. एकदा भरती झाली कि तिकडचा उमेदवार घुसवू, तेव्हढी कळ काढा."

काढावीच लागणार, नाही म्हणून काय मोठा फरक पडणार होता. बदली "नागरगोजे" गावात झाली होती.
नागरगोजे!! नाव तसं परिचीत नव्हतं. सोलापुर-बीड महामार्गावर का कुठेशी होतं ते. रहाण्याची व्यवस्था होतीच सरकारी विश्रामगृहात. फक्त एकट्याला जावं लागणार होतं. उर्मिलेची नोकरी ती सहा महिन्याकरता सोडणं शक्यच नव्हतं आणी आई-बाबा थकलेले असताना त्या आडगावात नेणं तर अशक्यच होतं.

दमुन घरी आलो. उर्मिलास सगळं सांगितलं तिचा पण चेहरा पडला. पण माझा चेहरा पाहुन घरच्यांनी सावरून घेतलं. दहा-बारा दिवस हा हा म्हणता निघुन गेले. आणी अशाच एका सकाळी मी नागरगोजे गावात दाखल झालो. तालुख्याचं ठिकाणं असल्याने बर्‍यापैकी गजबजलेलं होतं. कोर्ट बरच लांब असावं, एकाही रिक्षावाला येण्यास मागत नव्हता. कसातरी एकजण तयार झाला.

जुलै महिन्याची सुरूवात असल्याने भयंकर पाऊस कोसळत होता. गजबज मागे पडली, आणी गाव सुरू झालं. गावातला कोणताही रस्ता रुंद नव्हता त्याच्बरोबर सर्व घर जुनाट पध्दतीची, चुना फासलेली होती. घर जुनाट, माणसं जुनाट. सर्व वातावरण काळवंडलं होतं, एकदम विचित्र वाटत होतं. एका वळणावर आल्यावर कोर्टाची इमारत दिसायला लागली. रिक्षातुन उतरलो तेवढ्यात एक मुलगा पुढे धावत आला. बहुतेक मी येणार हे त्याला माहित असावं.

"बोरकर सायेब?"

मी हो म्हणालो.
"सायेब म्या रंगा, चला." माझ्या परवानगीची वाट न बघता तो बॅगा उचलुन तरातरा चालायला लागला.

कोर्टाची इमारत सुरेखच होती. संपुर्ण दगडी बांधकाम, भव्य पोर्श, आजुबाजूला मोकळं आवार, मागे चिंचेचं बन आणी समोर आंब्याचे डेरेदार वृक्ष, त्या टेकडीला कोर्टाच्या इमारतीमुळे शोभा आलेली. आत गेलो ते गेलोच. मग याला त्याला भेटणे, फॉर्म वैगेरे भरणे, फाईली चाळणे या सगळ्यात चार कसे वाजले ते कळलंच नाही. दुपारचं जेवणही तिकडेचं झाल. बाहेर सर्वत्र अंधार दाटलेला आणी पाऊसही प्रंचड कोसळत होता. त्या दगडी इमारतीला हिरवट शेवाळी झाक आलेली होती. वातावरणात एक प्रकारचा धुकट गारवा पसरलेला होता.

चहा घेता घेता जज साहेबांच्या आणी माझ्या गप्पा सुरू झाल्या. त्यांना गावाबद्दल माहिती विचारली, बोलता बोलता त्यांनी सांगितलं गावातल्या एका वाड्यात ते भाड्याने राहत होते. मी आश्चर्याने विचारलं "भाड्याने? अहो सरकारी क्वॉर्टर्स आहेत ना?"

त्यांचा चेहरा खाडकन उतरला. त्यांच्या डोळ्यात दिसलेलं भय मी आजही विसरू शकणार नाही. पण क्षणार्धात त्यांनी स्वतःला सावरलं, क्वॉर्टर्स आहेत म्हणाले पण त्या इथे मागे आहेत कोर्टाच्या शिवाय गाव एवढं लांब, काही लागलं सवरलं कि एवढ्या लांब कोण जाणार. आणी माझं कुटूंबही बरोबर आहे, येण्याजाण्याच म्हणाल तर गाडी आहे की. तुम्ही पण इथे राहण्याच्या फंदात पडू नका. आपण शोधू कि जागा भाड्याने, रोज माझ्या गाडीने एकत्रच येऊ.
पण मला काही ते कारण खर वाटलं नाही. त्यांच्या डोळ्यात दाटलेली भिती काहितरी वेगळंच दर्शवत होती. पण मुलखाचा कंजुषपणा मला भोवणार होता.

"कशाला? मी राहीन कि इथेच, एवढ्या जवळ क्वॉर्टर्स असताना लांब गावात कशाला राहायचं, उगाच दमछाक (आणी त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर डोबिवली-सि.एस्.टी प्रवास उभा राहिला) आणी मला एकांतच आवडतो. आठवड्याचं सामान भरलं कि काही लागत नाही हो." मी सारवा सारव करत म्हणालो
तेवढ्यात ....कडाsssssड कड..! करत माळावर कोसळलेल्या विजेने आमचं संभाषण खुंटलं. घड्याळाचा काटा ७ वर स्थिरावला होता. तो पाहुन जजसाहेब एकदम दचकले.
"अरे बापरे! मी निघतो आता, पाऊस कमी झालाय. रस्ता खुप खराब आहे, तुम्ही नक्की येत नाहीयेत ना?" त्यांनी मला हरप्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो.

एव्हाना सगळं कोर्ट रिकामं झालं होतं. मी बाहेर आलो, हुडहूडी भरेल असं भणाण वार सुटलं होत. वर आकाशात गर्जत होत, लख्खन वीज चमकत होती. त्या घडीला माळरानावर कोर्टाची ती दगडी इमारत जरा भयाणच वाटत होती. आजूबाजूला किर्र झाडी .. अंधुकसा निळा प्रकाश , दूर दूर जाणारी पाटलांची काळी फियाट .
तेव्हढ्यात गावात जाऊन आलेला रंगा समोरून आला.
"सायेब, तुमी इतच रानार? नक्की?"

आता परत त्याच्या प्रश्नांना उत्तर देण्याएवढी ताकद माझ्यात राहिली नव्हती. मी हो म्हणून त्याला क्वॉर्टर दाखवायला सांगितली. मग मुकाटपणे तो मला कोर्टाच्या मागच्या भागात घेऊन गेला. मागे पण तशीच विस्तृत जागा होती. आठ-नऊ टुमदार क्वॉर्टर्स समोरासमोर होत्या पण बहुतेक सर्वच बंद होत्या. मी येणार म्हणून एक स्वच्छ करून ठेवलेली होती. प्रत्येक बंगलीच्या समोर चिंचेचं ऐसपैस झाड. त्या भयाण संधीप्रकाशात मला इथे एकटायाला राहावं लागाणार याची जरा भितीच वाटली.

मग रंगा म्हणाला "सायेब राती कोरटात रातच्या पाळीला चार मानसं असत्यात पर ती म्होरच्या अंगाला असत्यात, इत माग कुनीबी फिरकत नाय, पर आजपासनं यक चक्कर माराया सांगतो मी त्येंना."

चला, म्हणजे कोणीतरी आहे म्हणायचं, जरा धीर आला. आत आलो. बंगली छानच होती. कामाच्या निमित्ताने का होईना बंगल्यात राहायला मिळणार होत. रंगाने हातातल्या पिशवीतून डबा बाहेर काढला.

"सायेब, आज गावात्न जेवान आनलयं, उद्यापासनं यक गडी यील सा वाजता जेवान बनवाया आन ह्य दुद फिरीजमदी ठुतो."

थोडा वेळ बसला आणी मग म्हणाला "सायेब जरा जपुन रावा, हवतर गावात जागा बगु तुमाला."
मग मात्र मी चिडलो "अरे मी इथेच राहणार, तु चिंता करू नकोस."

शेवटी त्याचा नाईलाज झाला. तो परत आतमध्ये गेला आणी एक कंदिल शिवाय चार-पाच मेणबत्त्या घेऊन आला.

"सायेब, पावसानं कदी कदी लाइट जातात मनुन ह्ये."

मी मानेनेच हो केलं.

रंगा निघुन गेला आणी पावसाचा जोर वाढला. मी पंलगावर आडवा पडलो, दिवसभराच्या धावपळीमुळे थकवा आला होता. ह्या रात्री हे ओसाड गाव, थंडीवार्‍यातलं हे माळरान, चायला कुठे अडकलो असं झालेलं. पडल्या पडल्या बाहेर बघितलं समोरची बंगली बंदच होती. बाहेर एक मोडकी खुर्ची आणी झोपाळा होता बाकी सगळा शुकशूकाटच. मधोमध असलेल्या लाईटच्या खांबावरचा दिवा शेवटचे क्षण मोजत लुकलूकता प्रकाश टाकत होता. रातकिड्यांनी कान किटवलं होतं. पाखरांचा आवाज, अचानक अंगावर काटा आला आणी जीव घाबराघूबरा झाला. काय झालं कळलं नाही. पटकन आत आलो आणि दार लावून घेतल ,कपडे बदलले आणी आतमध्ये डोकावलो , किचन लहानसच होत.
त्याच्या डाव्याबाजूला बेडरूम , तिथे सर्व पावसाने ओल आलेली होती..
भिंतीवरचे ते डाग भयानकच दिसत होते... जेऊन घेतलं. जेवण झाल्यावर सामान लावायला सुरूवात केली. संपुर्ण बंगल्यात एक कुबट वास पसरलेला होता. सगळं आवरेपर्यंत ९ वाजत आले. पंलगावर झोपुन बरोबर आणलेली पुस्तके बाहेर काढली आणी वाचायला सुरूवात केली. जेमतेम दहा मिनिटे झाली नसतील परत लख्खन वीज चमकली आणी मागुन तो प्रचंड गडगडाट!! काळजाचा ठोकाच चुकला, तेव्हढ्यात गपकन अंधार झाला. लाईट गेलेत हे कळायला मला ५ मिनिटे लागली.
नवीन जागेत अशा अंधारलेल्या आणी भयाण वातावरणात मेंदुने काम करायच थांबवलं बहुतेक, माझी तंतरली होती. कसातरी धडपडत कंदिलाला हात लावला, बाजुला मेणबत्त्या होत्या. जीव घाबराघुबरा झाला होता तेव्हढ्यात पायावरून काहितरी मऊ-ओलं हुळहूळत गेलं. अस्पष्ट किंकाळीच तोंडातून बाहेर पडली. हे होईपर्यंत मी मेणबत्ती पेटवली होती. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात ती कुबट खोली जास्तच भेसुर वाटु लागली. विचित्र सावल्या पसरल्यासारखं वाटत होतं. मेणबत्तीच्या ज्योतीबरोबर सावल्याही हलत होत्या. बेडरूम मध्ये एक कपाट होत.. त्यातल्या आरशात काहीतरी हलल ..
एक काळी सावली ... जणू काही जुन्या आरश्याच्या गर्भातूनच त्याचा जन्म झालेला होता अस..
आता तर जीव जाईल कि काय अस वाटलं.. ते माझंच प्रतिबिंब होत का?
काही कळायला मार्ग नव्हता
आयुष्यात एवढा कधी घाबरलो नव्हतो. डोंबिवलीतल्या उबदार घराची आठवण येत होती. पायावरून नक्की काय गेलं त्याचाही अंदाज येत नव्हता. हे कमी कि काय किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज आला. आता तर पाय लटपटायला लागले होते. आत कोणीतरी होतं, नक्कीच.

"कोण आहे आत?" मी घाबरुन बरळलो. हसल्यासारखा आवाज आला. आत जाऊ नको कि नाही? असहाय झालो होतो. बाजुला उभी केलेली एक मोडकी छत्री हातात घेतली, बुडत्याला काडीचा आधार. एक एक पाऊल टाकत आत शिरलो. किचनमध्ये भांडी पडलेली होती, बाहेर विजांचा नंगानाच सुरु होता
आणि..........
आणि खिडकीत हिरव्या डोळ्यांची दोन काळी मांजर जिभल्या चाटत बसलेली होती....

क्रमशः

कथाअनुभव

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

15 Sep 2011 - 7:37 pm | मृत्युन्जय

स्पावड्या पेटलाय पार सध्या. सायबानू मीच त्यो पेक्षा जास्त चांगले जमले आहे रे. येउद्यात अजुन.

क्राईममास्तर गोगो's picture

16 Sep 2011 - 2:25 pm | क्राईममास्तर गोगो

असेच म्हणतो.

हे झ्याक जमलय!
पुढचे लेखनही तयारच असेल अशी आशा करते.

मस्त रे , त्या गविंचं कुत्रं आणि तुझं मांजर, कसे काम करता रे एका बिल्डिंगमध्ये न भांडता.

असो, बाकी स्पावड्या एवढं चांगलं लिहितोस तर मध्ये मध्ये सोडुन का देतो रे उगाच. अजुन दोन वर्षांनी कुणी मिपावरच्या सम्रुद्ध लेखनाचा धागा काढला तर तुझं नाव पहिलं यायला पाहिजेल सांगुन ठेवतो, नाहीतर शाजी काय बंद नाय होत तोपर्यंत एक दोन तीन चार आणि मग लगेच फोटो.

मी-सौरभ's picture

15 Sep 2011 - 8:00 pm | मी-सौरभ

चाण लेकण...

स्पावड्या लगे रहो.. उत्कंठा ताणली गेली आहे. तेव्हा लवकरच पुढचा भाग टाकण्यात यावा.

- पिंगू

नगरीनिरंजन's picture

15 Sep 2011 - 8:37 pm | नगरीनिरंजन

मस्त रे! वातावरणनिर्मिती तर झकास झालीये!

शैलेन्द्र's picture

15 Sep 2011 - 8:42 pm | शैलेन्द्र

आयला.. मांजरं ..... जिभल्या चाटत होती? स्पावड्या, तुला उंदीर तर नाही ना समजले ते?..

बाकी, मस्त लेखन.. मजा येतीय.. मरु नकोस येवड्यात.. जरा खेळव मांजरांना .. आणि पटापट टाक..

सुहास झेले's picture

15 Sep 2011 - 8:52 pm | सुहास झेले

मस्त रे स्पावड्या... लवकर पुढला भाग येऊ देत :) :)

प्रास's picture

15 Sep 2011 - 9:11 pm | प्रास

आयला रात्रीचंच वाचायला घेतलंय.....

आमचं टायमिंगच चुकतं मायला आणि त्यात तुमची ही सगळं डोळ्यासमोर उभं करायची लेखनशैली.

आता आज रात्रीच खपलो नाही तर पुढलं नक्की वाचेन, तुम्ही तेवढं ते लिखाण तयार ठेवा आणि टाका पटकन्....

पुलेप्र ;-)

आजच्या रात्रीतच खपलो तर मात्र...... जाऊ द्या!

पुलेशु :-(

:-)

@ प्रास,

या पेक्षा भयाण लिखाण वाचलेलं आहेस इथं, काही खपत नाहीस तु आणि अजुन कट्ट्यला येणं बाकी आहे तुझं, असो, आणि जरी काहि झालंच तर स्पावड्याला अजुन एक मांजर मिळेल नाहीतर माझ्या हेम्याला एक साथिदार. हाकानाका.

यकु's picture

15 Sep 2011 - 9:19 pm | यकु

वा वा वा!
मस्त जमलंय की.

क्लायमॅक्स रंगवताना ना. धा. जरा लक्ष देऊन वाच म्हणजे झालं ;-)

पत्रकार, ही ना. धा. काय भानगड आहे?

स्पावडयाची मांजर झक्कास आहे :)

प्रभो's picture

16 Sep 2011 - 11:29 pm | प्रभो

>>ना. धा. काय भानगड आहे?

ना धा म्हणजे नारायण धारप हो..

पल्लवी's picture

15 Sep 2011 - 9:19 pm | पल्लवी

आवडलं.

स्वाती२'s picture

15 Sep 2011 - 9:24 pm | स्वाती२

पुढील भाग लवकर येऊ दे.

निमिष ध.'s picture

15 Sep 2011 - 10:19 pm | निमिष ध.

एकदम मस्त !!

पुलेशु

हालोवीन चे दिवस सुरू झाले म्हणायचे !

प्रचेतस's picture

15 Sep 2011 - 10:23 pm | प्रचेतस

स्पावड्या, मस्तच लिहिलेय रे. + +१ टू ५० फक्त. मिपावरच्या समृद्ध लेखन करणार्‍या लेखकांमध्ये तुझं नाव आलंच पाहिजे.
कथानायकाला पहिल्याच दिवशी इतके भयाण अनुभव आलेत की पुढच्या २ महिन्यात त्याच्यापुढे काय वाढून ठेवलेय कुणास ठाउक तेव्हा पुढचे भाग आता लवकर लवकर टाक. उगाच उत्कंठा ताणून धरू नकोस.
आणि ती चंद्राच्या पार्श्वभूमीवरची काळ्या मांजराची भेदक हिरवी नजर एकदम जबरदस्त आणि समयोचित.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Sep 2011 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

स्पा महाराज की जय

काय मस्त वातावरण निर्मिती केली आहेस बेट्या...अता पुढचा भाग पण लवकर टाका हो ''स्पा'' महाराज

काही काही वाक्य वाचताना तर अंगाला कापरं :stare: भरत होतं, तुंम्ही आमचा येकदम स्पा-य-डर मेन करुन टाकलात...

मुळशीत एका कामाला गेलो होतो,तेंव्हा अदल्या रात्री आंम्हाला चार/पाच जणांना रहायला ही असाच १ जुना बंगला 'दिला' होता,त्याची आज अठवण झाली... :stare:

राजेश घासकडवी's picture

16 Sep 2011 - 12:09 am | राजेश घासकडवी

भयकथा लिहिण्याचं तंत्र छान साधलंय. नक्की काय होणार ही भीती हळुहळू चढवत नेलेली आहे.

वर्णन करण्याची शैली देखील आवडली.

त्या दगडी इमारतीला हिरवट शेवाळी झाक आलेली होती. वातावरणात एक प्रकारचा धुकट गारवा पसरलेला होता.

हे वाक्य वाचून एकदम जाणवलं की बऱ्याच नवीन लेखकांच्या लेखनात केवळ संवाद व प्रसंग यांचंच वर्णन असतं. आसपासचं वातावरण हा कथेचा महत्त्वाचा भाग असतो. त्यातले रंग, पोत, आकार, आवाज चित्रित केले तर कथा अधिक रसरशीत होते. तुम्ही हे चांगल्या प्रकारे केलेलं आहे.

असंच लिहीत रहा.

कवितानागेश's picture

16 Sep 2011 - 12:14 am | कवितानागेश

पुन्हा पुन्हा मांजरींबद्दल वाइट्साइट लिहितो हा स्पावड्या..... :(

-गरीब बिचारी माउ ;)

आत्मशून्य's picture

16 Sep 2011 - 1:23 am | आत्मशून्य

अवांतर :- तूझी ती कृष्णमर्जार प्रेमी अशीच काही तरी सही होती ना ?

शिल्पा ब's picture

16 Sep 2011 - 1:53 am | शिल्पा ब

भारी ए!!! पुढचे भाग टाक पटापट.

शुचि's picture

16 Sep 2011 - 4:39 am | शुचि

फारच छान.

किसन शिंदे's picture

16 Sep 2011 - 9:15 am | किसन शिंदे

अगदी छोट्या छोट्या बारकाव्यानिशी लेखन केलं आहे मग ते कोर्टाची इमारत आणी त्या बाजुचा परिसर असो वा जुन्या बंगलीमधील बेडरूमच्या भिजलेल्या कुबट वासाच्या भिंती असो आणी वातावरण निर्मिती जबरदस्तपणे उभी करण्यात आली आहे.

दुसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत रे पांड्या.

नंदन's picture

16 Sep 2011 - 9:29 am | नंदन

अगदी छोट्या छोट्या बारकाव्यानिशी लेखन केलं आहे मग ते कोर्टाची इमारत आणी त्या बाजुचा परिसर असो वा जुन्या बंगलीमधील बेडरूमच्या भिजलेल्या कुबट वासाच्या भिंती असो आणी वातावरण निर्मिती जबरदस्तपणे उभी करण्यात आली आहे.

असेच म्हणतो, पुढचा भाग लवकर येऊ दे हो कृमाप्रेमी :)

सोत्रि's picture

16 Sep 2011 - 9:40 am | सोत्रि

स्पावड्या,

मस्त, कडक वातावरण निर्मीती. मझा आला...

पु ले प्र....

- (घाबरलेला) सोकाजी

जाई.'s picture

16 Sep 2011 - 10:08 am | जाई.

उत्कंठा ताणली गेलीय

पुभाप्र

सूड's picture

16 Sep 2011 - 10:41 am | सूड

लेख आवडला, पण घाटवळणाच्या भाषेत कुठे-कुठे पाय घसरलाय. त्यामुळे पुलाव खाताना दाताखाली मिरी* आल्यासारखं वाटतं. बाकी कुठे नाव ठेवायला जागा नाही. पुभाप्र.

*खरंतर खडाच म्हणणार होतो, पण सिविरीटी कमी असल्याने मिरीवर भागवलंय.

किसन शिंदे's picture

16 Sep 2011 - 10:58 am | किसन शिंदे

पुलाव खायला मिळतोय ते बघ ना का उगा त्यात किडे आपलं ते खडे करतोयस..

ओ, आम्ही फक्त कंपूतल्याच लोकांना चान चान कमेंटा देतो. :D

पुलाव?

आँ..? ब्लू कोरलमधे काही पार्टी आहे काय? कळवा लेकोहो आम्हासही..

स्पावड्या. प्रतिसाद आधी देता आला नाही. जरा वेळ लागला.. झकास रे.. :) फॉर्मात आली आहे तुझी लेखणी.

प्रीत-मोहर's picture

16 Sep 2011 - 11:07 am | प्रीत-मोहर

मस्त रे स्पा :)

मनराव's picture

16 Sep 2011 - 1:16 pm | मनराव

मस्त जमलीय ...................

अवांतर: गवि तुम्च्या ब्राउ साठी या स्थळाचा (या मांजरींचा) विचार करा अन दोनिही कथा मिक्स करा........ ;)

विनीत संखे's picture

16 Sep 2011 - 2:15 pm | विनीत संखे

फोटू आन घोष्ट येक्दम बेस्स!

फुडं काय व्ह राव?

माणसाचं आयुष्य मोठं अनाकलनीय आहे. प्रत्येक पुढचा क्षण हा अनपेक्षित असतो. काही काही लोकांच आयुष्य तीस-चाळीस वर्ष तसच्या तसं जातं, काही बदल नाही..साचलेल्या डबक्याप्रमाणे.! पण काहींच आयुष्य..... असो

सुरवातीच्या वाक्यालाच टाळ्या घेतल्यास रे !

कथासुत्र आणी मांडणी छानच !!

पुढच्या भागांची वाट पहातो आहे

छोटा डॉन's picture

16 Sep 2011 - 2:46 pm | छोटा डॉन

पुढे ?

- छोटा डॉन

प्राजक्ता पवार's picture

16 Sep 2011 - 3:03 pm | प्राजक्ता पवार

मस्तं !

पियुशा's picture

16 Sep 2011 - 4:15 pm | पियुशा

का घाबरवतो आहेस ;)

विजुभाऊ's picture

16 Sep 2011 - 4:20 pm | विजुभाऊ

झकास

स्मिता.'s picture

16 Sep 2011 - 5:07 pm | स्मिता.

वातावरणनिर्मिती छान झालीये.
पुढचे भाग पटापट टाक नाहीतर भीती वाटत नाही ;)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2011 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

पुढे ?

श्यामल's picture

16 Sep 2011 - 5:45 pm | श्यामल

मस्त उत्कंठावर्धक भयकथा ! :smile:

इंटरनेटस्नेही's picture

16 Sep 2011 - 7:02 pm | इंटरनेटस्नेही

मस्त उत्कंठावर्धक भयकथा !
-
इंट्या कॉपीकॅट. :)

स्पावड्या लेका पुढचे भाग टाक पटापट

सुरेख.
सुरुवातीच्या दोन परिच्छेदातून उत्कंठा निर्माण करून शेवट्पर्यंत ती टिकवून ठेवली आहे.

वातावरण निर्मिती तर छानच. अगदी समोर बसून चित्र काढल्यागत वर्णनं करता तुम्ही.

याशिवाय, ...रातकिड्यांनी कान किटवलं होतं. पाखरांचा आवाज....वातावरणात एक प्रकारचा धुकट गारवा ..... पायावरून काहितरी मऊ-ओलं हुळहूळत जाणं..... संपुर्ण बंगल्यात एक कुबट वास .... असे ध्वनि, स्पर्श, घ्राणेंद्रियाच्या संवेदनांचे उल्लेख, यामुळे वर्णन आणखीनच जिवंत होत गेले आहे...

पुढील भागाच्या प्रतिक्षेत, शुभेच्छांसह.

स्पंदना's picture

18 Sep 2011 - 10:29 am | स्पंदना

लवकर लिही पुढच स्पाउ.

पैसा's picture

18 Sep 2011 - 11:07 am | पैसा

पुढच्या भागासाठी हे "अनुस्मारक". धारपांचं नाव घे आणि हो जा शुरू!

तिमा's picture

18 Sep 2011 - 11:15 am | तिमा

उत्कंठावर्धक! वातावरणनिर्मिती इतकी की 'विश्वजीत' झाल्यासारखं वाटलं.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

अप्पा जोगळेकर's picture

18 Sep 2011 - 2:56 pm | अप्पा जोगळेकर

पुढील भागाची आतुरतेने वाट पाहात आहे.

सविता००१'s picture

19 Sep 2011 - 1:46 pm | सविता००१

खूप छान लिहिले आहेस. पु.ले.शु.

अन्या दातार's picture

20 Sep 2011 - 10:05 am | अन्या दातार

मिपाचे ना.धा. होण्यास वेळ नाय लागणार तुम्हाला स्पाभाऊ.

पु.भा.प्र.