ग्रहण-५ अन्तिम

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
12 Nov 2011 - 6:21 pm

ग्रहण-१
ग्रहण-२
ग्रहण-३
ग्रहण-४

--------------------------------------------------------------------------------------------------

अप्पा जोशी

गाडी कोर्टाच्या आवारात घेतली आणि माळरानावर प्रचंड वीज कोसळली.तुफान पावसाला सुरुवात झाली होती. समर्थांना अशा जागा चटकन ओळखता येतात, त्यांच्या चेहऱ्यात झालेला बदल मला लगेच जाणवला. चेहऱ्यावरच्या आठ्या तीव्र झाल्या होत्या. इथे जे काही वावरत होत, जी शक्ती इकडच्या अणु रेणूत मिसळली होती, ती आमच्या येण्याने नक्कीच जागी झाली असणार.
थंडीने कुडकुडायला होत होतं. हर्षद अजूनही घाबरलेलाच होता. कोर्टाची ती इमारत मजबूत , विस्तीर्ण होती, पण आत्ता ती या क्षणाला विकृत , भेसूर वाटत होती. किर्र रान माजलेल होत. समोरचा अंधार इतका दाट होता कि गाडींच्या दिव्याचा प्रकाश चार फुटांवर जणू शोषला जात होता. गाडी बंगल्यासमोर आणली, लाईट गेलेले असल्याने काहीच दिसत नव्हत, गाडीतून उतरताच समोर विचित्रच दृश दिसलं. समोर एक बंगली होती, समोर चिंचेची झाड वेडीवाकडी वाढलेली होती, पण त्याही काळोखातून, त्या बंगलीत काहीतरी प्रकाश असल्यासारखं वाटत होत, मेणबत्तीचा कसा येईल न तेवढाच प्रकाश, पण याला हिरवट झाक होती.. समोर माजलेल्या गवतात दोन झोपाळे वाऱ्याने किरकिरत पुढे मागे होत होते. (पण वाऱ्यानेच? कारण त्यांची गती एकसारखी नव्हती.. एक झोपाळा पुढे गेला कि दुसरा मागे यायचा , जणू कोणीतरी त्यावर बसून झोकेच घेतंय.) अन्गावर काटा आला, घामाचा ओघळ मानेवरून घाली ओघळला , हुडहुडी भरली, भयानक दृश होत ते. तो कर्र SS आवाज मनाचा थरकाप उडवत होता. समर्थ तसेच ठामपणे उभे होते. जणू काही घडलंच नाही अशा थाटात ते आम्हाला आत घेऊन आले. हर्षद ने मेणबत्त्या आणि कंदील लावला. बाहेरच ते घर या तुफान पावसात भेसूर दिसत होत. संपूर्ण शेवाळलेल्या भिंती, वाढलेलं गवत, ते विकृत झोपाळे, गांजलेल्या तारांच कुंपण, आणि आतला तो गूढ प्रकाश.
मी दार आणि खिडकी लावून घेतली. हर्षद समर्थांच्या बाजूलाच बसलेला होता. समर्थ भिंतीला टेकून स्वस्थपणे बसलेले होते, मी पण पलंगावरून उठून त्यांच्यापाशी येऊन बसलो. रात्रीचे साडे नऊ वाजून गेलेले होते. अचानक आतून हसण्याचा आवाज यायला लागला, हर्षद आणि मी हादरलो.. इतके वर्ष समर्थांबरोबर असून देखील, अशा जागी मी गर्भगळीत होतो, मेंदू काम कारण सोडून देतो, हसण्याच्या जागी हळू हळू किंचाळण्याचा आवाज येत होता, बेडरूम च दार थडा थडा वाजत होतं.समर्थांचे डोळे अजूनही मिटलेले होते.. पण आता ते काहीतरी म्हणत होते, आता त्या आवाजाऐवजी मी समर्थांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागलो. २ मिनिटही गेली नसतील आणि समर्थ ताडकन उठले.. मी हि दचकलो, हातातल्या चांदीची मुठ असलेल्या त्यांच्या खास छडीने त्यांनी जमिनीवर जोरदार आघात केला. भूकंप झाल्यागत वाटल, कानाचे दडे बसले इतका आवाज झाला, प्रचंड वारं घोंगावायला लागलं , उभ राहाण कठीण झाल. अचानक घरातून अनेक काळ्या सावल्या इकडे तिकडे पळायला लागल्या, अनेक आमच्या अंगातून निघून गेल्या ... कोणीतरी मेंदू ओरबाडावा तस वाटल, अजूनही त्या सावल्या काठीखालून बाहेर येतच होत्या, हा धक्का सहन न होऊन हर्षद बशुद्ध झाला, मी हि त्याच अवस्थेत होतो, पण एका क्षणी सगळ थांबल, ती वावटळ निघून गेलेली होती. त्या एवढ्याश्या बंगल्यात त्या शक्तीने पूर्ण शक्तीनिशी आक्रमण केलेलं होत, पण समर्थांनी अजून ठिकाणी ठेचून त्यांना परतवून लावलेलं होत. समर्थ थकून खाली कोसळले. मी त्यांना लगेच उठवून खुर्चीत बसवलं .. हर्षद ला पलंगावर झोपवल. पाऊस अजूनही पडतच होता.काय कराव सुचत नव्हत, मी आता किचन मध्ये डोकावलो, पिशवीतून येताना दुध आणलाय हे विसरलो होतो, ते काढल.. सुदैवाने कॉफीची बाटली सापडली. गरमागरम कॉफी घेऊन बाहेर आलो. समर्थ आता सावरले होते. त्यांनी हर्षद च्या तोंडात एक गोळी सरकवली. मी त्यांना कॉफी दिली. पोटात कॉफी गेल्यावर बर वाटल, पण समर्थ काही बोलत नव्हते.. त्यांनी पटापट एक रांगोळी काढायला सुरुवात केली.. येस.. ते संरक्षण कवच होत.. पंचकोनी.. ते झाल्यावर त्यांनी पिशवीतून काही पांढरे दगड, आणि काळा दोरा काढला.. त्याचीही मांडणी त्यांनी विशिष्ट पद्धतीने केली. दिसायला हे दगड, हा दोरा.. काय रक्षण करणार? असे वाटू शकते.. पण त्यांच्या जगात याच्या व्याख्याच काही और असतात. समर्थांचं हे अस कवच होत.. कि त्यांचा सर्वात आवडता शत्रू 'मार्तंड' सुद्धा हे भेदू शकलेला नव्हता त्या खड्यांना दोर्याने बांधून झाल्यावर , त्या रांगोळीवर गादी घालून मी हर्षद ला खाली झोपवल, त्याच्या जीवाला आता काहीच धोका नव्हता.शिवाय त्या गोळीने त्याला आता जागहि आली नसती निदान ७ ८ तास तर नक्कीच.
समर्थ खुर्चीत बसले , डोळे मिटून काहीतरी ते विचार करत होते, घडल्याचा काटा ११ वर स्थिरावला होता, थोडा वेळ तसाच गेला, समर्थ परत ताडकन उठले, आता काय झाल? मी घाबरून इकडे तिकडे बघितलं, अप्पा चल, समर्थ म्हणाले, आता कुठे कशाला, वेग्रे विचरण्यात अर्थ नसतो हे माहित असल्याने मीही उठलो (पण याक्षणी त्या घरातून बाहेर पडावस वाटत नव्हत, न जाणो बाहेर कुठला आकार आपला ग्रास करायला टपलेला असेल) हा विचार करेस्तोवर समर्थ बाहेरही पडलेले होते. मी हर्षद कडे पाहिलं तो आता सुरक्षित होता. छत्र्या घेतल्या आणि बाहेर पडलो, दार लोटून घेतलं. बाहेरच्या वाऱ्यावर आल्यावर थंडी जाणवायला लागली, समोर बंगल्याकडे बघायचं धाडस झालंच नाही.. समर्थांकडे बघत त्यांच्या मागे चालू लागलो.
**********************************************
प्रचंड धुक त्या माळरानावर पसरलेलं होत, अशा अनोळखी, जागेत, या भयाण अंधारात , कोणी शहाणा माणूस जायची कल्पना सुद्धा करणार नाही.जेमतेम ३ -४ फुटावरच अंधुक दिसत होत, आम्ही खाली उतरत होतो, दूरवर नागरगोजे मिणमीणत्या दिव्यांमुळे दिसत होत. आता गावात जायचं असले तर गाडीने गेलो असतो .. मी विचार करत होतो, तेवढ्यात समर्थांनी रस्ताच बदलला आणि ते पठाराच्या मागे जायला लागले, जणू त्यांना कोणीतरी हि वाट दाखवत होत .. मी त्यांच्या मागे पळायला लागलो.. आता रस्ता असा नव्हताच.. शेताडी लागली होती.. कंबरेपर्यंत कसलस गवत माजलेल होत .. खाली मरणाचा चिखल, समर्थ एक अक्षर बोलत नव्हते., शेवटी एक थोड्याश्या मोकळ्या जागी आलो , आणि मला समजल आम्ही इथे कशाला आलेलो ते, दूरवर एक विहीर दिसत होती.. पण आसपास.. कायच्या काय रान माजलेल होत, बर्याच दिवसात ती वापरात आलेली नसावी, वर आकाश हळू हळू मोकळ होत होत.. मधेच ढग घुंगट घालून जात होते. तेवढ्यात भयंकर आवाज करत वीज कोसळली, आणि कोल्हेकुई सुरु झाली, मी समर्थांच्या अगदी जवळ होतो.
जसजस आम्ही पुढे सरकायला लागलो, तसतशी हवा शिळी व्हायला लागली, मगासचा तो गारठा आता विचित्रच वाटायला लागला.. वारं प्रचंड होतं.. ते गवताच रान त्या वाऱ्याने पिळवटून निघत होतं.. झाड मोडतील कि काय अस वाटत होतं, पण कसलाच आवाज येण बंद झालं ... सुन्न्न्न .................. कानांना दडा बसला कि काय.. ? पण एवढ्या सोसाट्याचा वाऱ्यात आमचा एक केसही हलत नव्हता... जणू काही समोरच दृश आम्ही चित्रपट गृहात बसून बघतोय कि काय अस वाटत होतं .. मी डोळे मिटून घेतले आणि कानात आवाज घुमला.. अप्पा मन थाऱ्यावर ठेव आपण तिच्या राज्यात आलोय, गंगीच्या .... मनाला फितूर होऊन देऊ नकोस.. ते कुठल्याही आकारात आपल्या समोर येतील. मी आहे. मी खोल श्वास घेऊन डोळे उघडले. धडधड्णार्या हृदयाचा आवाज आईकू येईल अशी शांतता. जसजस आम्ही विहिरीजवळ सरकायला लागलो, हवेचा दाब वाढायला लागला.. प्रचंड घुसमट होत होती.. समर्थ निर्भयपणे पुढे पुढे चालत होते, त्यांचा शुभ्र पंधरा झगा चिखलाने बरबटलेला होता, आता विहिरीतून, रडण्याचे अभद्र आवाज आईकायला यायला लागले, मला ते आवाज सहन होत नव्हते.. भीती मनावर नाचायला लागलेली होती , ती शेवाळलेली विहीर समोर आली, आणि समर्थ म्हणाले अप्पा थांब तिथेच मी सांगेन तुला पुढे यायला तुझी गरज नंतर आहे. मी तिथेच थबकलो, समर्थ तसेच पुढे गेले, आकाशातले ढग आता बाजूला झाले, आणि चंद्राच भेसूर केशरी बिंब दिसायला लागल.. सर्व निळा प्रकश आजूबाजूला पसरलेला होता आणि त्यात ते बिंब ..
आजूबाजूची एकही गोष्ट नजरेच्या टप्प्यात बसत नव्हती.. कागदी चित्रांप्रमाणे सर्व गोष्टी धूसर होत होत्या, हलत होत्या .. तेवढ्यात समर्थांनी हातातली काहीतरी गोष्ट विहिरीत फेकली ,.. दहा बारा सेकंद काहीच झाल नाही, एकदम मोठी काच फुटावी तास झाल.. अचानक कानाला बसलेला दडा निघाला .. आणि त्या सावटाची ती लाट आमच्यावर कोसळली. समर्थही दोन पावल मागे रेटले गेले.. मी तर पाला पाचोळ्यासारखा उडून गवतात फेकलो गेलो. मगाशी फक्त दिसणारा, जाणवणारा वारा, आता आम्हाला तडाखे देत होता, मला तर त्या गवतातून उभ राहणंही मुश्कील झालेलं होत. एवढ्यात समर्थ ओरडले अप्पा वर ये... ते आता मागे आलेले होते त्यांच्या हातात एक रत्न होत , अप्पा हे रत्न विहिरीत टाक , मी या वावटळीला थोपवतो .. त्यांनी दोन हात वर केले आणि काही अगम्य मंत्र पुटपुटायला सुरुवात केली... तो घोगावणारा वारा आता माझ्यापर्यंत येत नव्हता ... समर्थांना मात्र त्याचे तडाखे बसत होते .. त्यांचे केस वाऱ्यावर मोकळे सुटलेले होते.. पण चेहऱ्यावर विलक्षण तेज आलेल होत.. मी पळत पळत विहिरीपाशी आलो.. आत एक क्षणभर डोकावलो .. अरे देवा .. आतल्या एका पायरीवर गंगी बसलेली होती .. फुगून टम्म झालेलं प्रेत.. सोबत दोन मुली .. एकीच डोक ठेच्ल्यासार्ख चपत झालेलं , एकीला तर डोकच नव्हत .. गंगीच अभद्र हास्य बघून आता मी जिवंत राहणार नाही असाच वाटल... तेवढ्यात तिचे हात माझ्यापाशी सरकायला लागले , मी गोठून गेलो.. तो थंड हाताचा स्पर्श जेंव्हा झाला .. . ते शब्दात मी वर्णन करू शकत नाही.. ते बुबुळ नसलेले डोळे माझ्यावर रोखले गेले होते .... तेवढ्यात समर्थ गरजले , अप्पा रत्न विहिरीत फेक.. अचानक त्या वातावरणातून मी बाहेर आलो . आणि रत्न विहिरीत फेकून दिल .... त्याच क्षणी समर्थांनी थोपवलेली वावटाळ विहिरीत घुसली..... ती गंगी आणि तिच्या त्या मुलीही त्यात खेचल्या गेल्या .... दोन मिनिटांनी वातावरण पूर्ववत झाल ... समर्थ माझ्या खांद्यावर हात ठेवून उभे होते ... मी आता मागेही न बघता चालायला लागलो ..
***************************************
सकाळी जाग आली तेंव्हा ९ वाजून गेलेलं होते. समर्थ नव्हतेच, हर्षद पण उठलेला होता.. सोबत एक मुलगा होता त्याची त्याने रंगा म्हणून ओळख करून दिली. रंगानेच कॉफी केलेली होती . पोटात गरम गरम कॉफी जाताच बर वाटल .. पण अचानक कालच थरार आठवला ... असो.. आता त्यावर विचार करून काही फायदा नव्हता.. गंगी प्रकरण संपलेलं होत. हर्षद ला हे सर्व सांगितल्यावर त्याला आधी भीती, मग आश्चर्य . आणि मग आधार वाटला.. रंगा पण हबक्लेलाच होता .

तेवढ्यात समर्थ आले . अप्पा झाली का झोप त्यांनी हसत हसत विचारल. मी देखील हसलो. मग ते जरा गंभीर झाले, अप्पा आज खरा सामना आहे पण. .आज चंद्रग्रहण. त्यांची शक्ती आज परमोच्च पातळीवर जाणार. कालच त्यांनी आपल्याला त्यांच्या शक्तीची चुणूक दाखवून दिलेली आहेच. हर्षद तुझी तयारी आहे का मनाची.. हर्षद चांगलाच सावरलेला होता, होय समर्थ तुम्ही माझ्यासाठी इतक करत आहात, आता मी घाबरणार नाही, तुम्ही असताना मला कशाचीच भीती नाही . समर्थ फक्त हसले .
दुपारी समर्थांनी थोड जेवण घेतलं अगदी साध .. आम्ही थोडा वेळ झोपही घेतली , रात्री डोक ताळ्यावर असण गरजेच होत... पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, ती भकास बंगली आता मला अजूनच भयानक वाटायला लागलेली होती. समर्थांची तयारी साधारण पाच च्या सुमारास सुरु झाली.. पण आज कोण जाणे.. त्यांच्या चेहरा खूपच गंभीर होता. मधेच ते खांदे उडवायचे,... मान हलवायचे... काहीतरी भयानक घडणारे याची मला आता पूर्ण कल्पना आलेली होती. त्यांनी काही रत्न बाहेर विशिष्ट कोनात बसवली .. एक मोठ पिवळसर रंगाच रात्र त्यांच्या हातात होत.. त्यांनी ते मला दिलं, अप्पा मला गरज लागेल याची सर्वात शेवटी ... चंद्रग्रहण बरोबर ११.५५ ला लागणार आहे आणि १२.१७ ला सुटणार आहे .. तेवढ्या वेळात आपल्याला या शक्तीला संपवायचं.. पण खरा कस लागेल तो १० नंतर , कारण एकदा ग्रहणाचे वेध सुरु झाले.. ते पूर्ण शक्तीनिशी हर्षद वर कोसळतील , त्याला आपल्यातला बनवण्यासाठी ते हर एक प्रयत्न करतील. आपल्याला पण याचा खास धोका आहे . कालचा प्रकार बघता मला आता स्वतःलाच काही प्रश्न पडलेत.. इथे एकाच वेळी अनेक शक्तींबरोबर सामना आहे.. शिवाय परिस्थिती त्यांना अनुकूल ..
आपली तयारी कमी पडता कामा नये... समोर दिसताना हा बंगलाच दिसतोय, पण या बंगल्यात विलक्षण दाबाखाली विकृत काळा समुद्र पसरलाय , आपल्या बाह्य डोळ्यांना तो आता दिसत नाही पण या विकृत कल्पनांच्या, हिडीस विचारांच्या राक्षसी आकाराच्या लाटांचा स्पोट झाला तर टिकण कठीण असत .
समर्थ अस काही बोलायला लागले , कि माझा उरला सुरला धीरही संपत असे. पावसाचा जोर थोडा कमी झाला होता , गारठा कमालीचा वाढलेला होता , दिवस संपलेला होता, आणि रात्र आपल्या असंख्य जिभांनी त्या टेकडीला आपल्या पोटात घालत होती. आज पोर्णिमा होती , आणि ग्रहण. अभद्र युती ...
चंद्राच तांबूस बिंब आकाशात दिसत होत.. तार्यांचा प्रकाश मंदपणे खाली ओघळत होता.. अप्पा आता आपल्याला तिथे जायलाच हवे.. काही उपायांनी त्यांना संपवायचा विचार मी करतोय त्या साठी आत जायलाच हवे. ( माझी मनस्थिती खरच अवघड झेलेली होती.. हर्षद आणि रंगा पण हादरलेले होते ) आम्ही साधारण ८ च्या सुमारासच त्या बंगलीत शिरलो.. कुरकुरत गेट उघडल . आणि बंद झाल. आता भयाण खेळाला सुरुवात झालेली होती . आम्ही आत तर जातोय , पण बाहेर येऊ कि नाही शक्यता नव्हती.. पण अंतर्मनाचा समर्थांवर गाढ विश्वास होता.. आणि मला तेवढ पुरेस होत. आवारात वावर नसल्याने प्रचंड गवत माजलेल होत. चिंचेची वेडीवाकडी झाडे वाढलेली होती, अंधार जणू गोठल्यासारखा झालेला होता,
मला क्षणभर वाटले कि हा अंधार वेगळाच आहे, याला वजन आहे , याच जग वेगळंच आहे.. आपल्या श्वासासोबत हा आपल्या शरीरात जाऊन आपल्याला कधीही गिळकृत करेल.
अप्पा .. अप्पा भानावर ये .... तिकडे कसा काय गेलास.. समर्थ जोरात ओरडले. मी भानावर आलो .. बघितलं तर मी समर्थांपासून दूर एका कोपर्यात मांडी घालून बसलेलो होतो.. मी उठून धावलो.. त्यांचा अघोरी खेळ सुरु झालेला होत.. मनाच्या भिंती मजबूत करायला हव्यात .
समर्थांनी धक्का देऊन दार उघडल. आतून भयानक दुर्गंधी बाहेर आली, आम्ही नाकाला रुमाल लावूनच आत शिरलो , दरवाजा धाड्कन बंद झाला .. हर्षद गारठला
आत प्रचंड धूळ साठलेली होती .. बाहेरून येणारा चंद्रप्रकाश आत झिरपत होता. मला विजेचा बोर्ड दीसला.. मी जवळ गेलो तर कुठली तरी वस्तू आदळल्याने म्हणा का कशाने .. तो साफ तुटलेला होता ... पुस्तकांची एक शेल्फ होती , टेबलावर एक एक फोन अर्धवट लोंबकळत होता, वायर तुटलेली होती .... भिंतीना आतून प्रचंड ओल आलेली होती . सर्वात भयानक म्हणजे काळे केस सर्वत्र पसरलेले होते .. हर्षद ओरडला .. अप्पा ते बघा .. खिडकीतून २ ३ काळी मांजर आत उद्या मारून येताना दिसली .. पण नंतर ती अचानक गायबच झाली.. समर्थ ताठ उभे होते.... ते म्हणाले अप्पा "आपण त्यांच्यात आलो" .... रंगा थरथर कापत होता . समर्थांनी जमेल तेवढ झाडून घ्यायला लावल.. आम्ही त्याच्यावर ते सांगतील तशी आकृती काढली.. यावेळी हा त्रिकोण होता .. त्याच्या तिन्ही बाजूंना आम्ही मेणबत्त्या लावल्या .. सोबर काही भस्म, अंगारे . .त्याची पण रचना केली
आता काहीही झाल तरी हलायचं नाही काहीही म्हणजे काहीही ... समर्थ म्हणाले .. कोणीही दिसुन्देत हर्षद तू जागचा हलता कामा नयेस.. या त्रिकोणातून तू जर का बाहेर पडलास.. तर मला सुद्धा तुला वाचवण कठीण होईल .. हर्षद आत बसलेला होता.. आणि आम्ही तीन टोकावर . "रंगा " तुला इथे आणायचं कारण म्हणे या खास रचनेसाठी ३ माणसांची गरज लागते.. तुला जायचं असेल तर तू आत्ताही जाऊ शकतोस... पण नंतर तुला बाहेर जाता येणार नाही. .आणि गेलास तर हर्षद ला वाचवण अशक्य आहे ..
न्हाय म्या हिथच ऱ्हाणार.. रंगा म्हणाला ...
समर्थांच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधान आलं.. पण परत ते निश्चल झाले.. हळू हळू विचित्र आवाज ऐकायला यायला लागले, हवेतला दाब वाढायला लागला.. समर्थ सुद्धा मोठमोठ्याने मंत्रोच्चार करायला लागले . पण शरीराचा थरकाप उडालेला होता , मागे कोणीतरी आहे अस जाणवायला लागल.. मधेच उष्ण मधेच थंड श्वास मानेवर जाणवायला लागला .. दुर्गंधी यायला लागली , कोणीतरी विकृत हसत होत, भेकत होत.. पण कोणाचीही या त्रिकोणात यायची हिम्मत होत नव्हती. तेवढ्यात खिडकीत कोणीतरी दिसायला लागल.. रंगा घाबरून ओरडला दादासाहेब...
ते शीर नसलेलं शरीर लडबडत माझ्या अंगावर आलं.. समर्थांनी डोळे उघडलेले मला दिसले आणि माझ भान हरपलं
**********************************
हर्षद बोरकर

माझ्यासाठी समर्थांनी आणि अप्पांनी जीव पणाला लावलेला होता .. आणि आता त्यांच्याच जीव धोक्यात आहे असे वाटत होत... समोरचा अघोरी खेळ कधी थांबणार आहे, काही कळत नव्हत.. अप्पा .. अप्पा बेशुद्ध झालेले होते.. त्यांन काय दिसल कल्पना नाही.. आम्हाला काहीच दिसलेलं नव्हत ... अप्पाना समर्थांनी मुश्किलीने शुद्धीवर आणले.. त्या त्रिकोणात मी बर्यापैकी सुरक्षित होतो .. समर्थांनी घड्याळात पाहिलं १० वाजून गेले होते.. तेवढ्यात घोगरा.. बसका.. विच्त्र आवाज आईकायला आला.. ' तुला आमच्याबरोबर यायचंच आहे.. तू आमचा आहेस... हा तुला वाचवू शकणार नाही... मागोमाग.. भयानक हास्य... समोरची खुर्ची करकरत होती.. त्यावर आता काळे धुरकट लोट जमायला लागले होते.. त्याला मानवी आकार येत होता.... अचानक त्यातून लाल डोळे चमकले आणि मी हादरलो ...
समर्थ डोळे मिटूनच होते... . पण काय झाल कळलंच नाही.. खालची संपूर्ण फरशीच उखडली गेली.. समर्थ मागे फेकले गेले .... एक भयानक आकार वर यायला लागला . ... मी त्याच्या समोरच बसलो होतो.... विकृतीची परिसीमा होती.. .. मी घाबरून उठलो ... आणि पळायला लागलो.. दूर कुठून तरी कानावर आवाज येत होता.. हा भास आहे हर्षद पळू नकोस.. त्रिकोणा बाहेर जाऊ नकोस... अरे पण त्रिकोण होताच कुठे ?/.. फारशी सुद्धा नव्हती... मी घाबरून वाट दिसेल तिथे पळायला लागलो.. एक जिना वर जात होता .. मी वर आलो .... कठड्याला टेकून उभा राहिलो .. वर भणाण वार सुटलेलं होत .. मी गोठून गेलेलो होतो .. काहीच कळत नव्हत...
मी ओरडून मदतीसाठी हाक मारत होतो.. पण आवाज बाहेर निघतच विरत होता...
अचानक मी भानावर आलो... आजूबाजूला पाहिलं.. माझ्या रक्षणकर्त्यापासून मी दूर आलेलो होतो... त्याच्या कवचातून मी बाहेर आलो... मला बाहेर काढण्यासाठी हि त्यांचीच युक्ती नव्हती न.. समर्थांचे शब्द आठवले . काहीही झाल तरी जागचं हलायचं नाही ....
पायातलं बळ निघून गेलं, खाली कोसळलो .. पोटात ढवळत होत.. रडत होतो..... अचानक विच्त्र आवाज झाला... मी भेदरून आजूबाजूला पाहिलं.. एक भयानक आकाराची रांगोळी घाछीवर उमटलेली होती .. विचित्र आकार माझ्याभोवती जमलेले होते.. कठड्यावरूनही कोणीतरी भेलकांडत माझ्यापाशी येत होत... त्याच्या घशातून विचित्रच आवाज आला... "साय्बानु मीच त्यो"..... ...
मी संपलेलो होतो .......... अखेरची संधी मी समर्थांपासून दूर येवून गमावलेली होती
*******************************
अप्पा जोशी

मी शुद्धीवर आलो. .आणि हर्षद विचित्र ओरडत त्रिकोणाबाहेर पळून गेला.. समर्थ जीवाच्या आकांताने त्याला पकडायला उठले.. पण तो अंधारात गडप झाला...
खोली विचित्र काळ्या अंधारात खेचली जायला लागलेली होती.. समर्थ माझ्यापाशी आले...
अप्पा त्या कवचाचा आता काही उपयोग नाही.. आयत्या वेळी सगळी समीकरण बदलली आहेत.. हर्षद ला मी कितपत वाचवेन आणि मी देखील वाचेन कि नाही मला ठावूक नाही.. तू रंगा ला घेऊन ताबडतोब बाहेर पड.. त्यांनी एक ताईत घाई घाईने माझ्या हातात ठेवला.. हा तुला बाहेर पडायला मदत करेल..
अप्पा माझ काहीही होईल.. निरोपाच बोलायला देखील वेळ नाहीये आत्ता.. पण पण.. माझ कार्य तुलाच पुढे चालू ठेवायचं आहे ..
नाही समर्थ मी तुम्हाला सोडून बाहेर नाही जाणार .... मी ओरडलो.. समर्थांशिवाय .. अप्पा .. कधीच शक्य नाही ..
अप्पा हि माझी आज्ञा आहे .. तुला बाहेर पडावाच लागेल.. समर्थांची नजर कठोर झालेली होती.. मी तसाच डोळ्यातल पाणी पुसून निघालो रंगाचा हात धरलेलाच होता.. बाहेर पडताना काही वेगळेपणा जाणवला ,,, मी बघितलं तर रंगा नव्हताच.. दादासाहेबांच प्रेत माझ्यामागे उभ होत.. मी किंचाळलो.. हातातला ताईत त्याच्या अंगावर फेकला...
प्रचंड आगीचा डोंब उसळला आणि एक भयानक किंकाळी आकाशात घुमली .. दरवाजा सताड उघडा पडला .. रंगा मागून धावत येत होता.. त्याला घेऊन बाहेर पडलो .
मी रंगाला गावातल्या माणसांना बोलवायला सांगितल आणि आणि परत आत शिरायचा विचार करू लागलो... घड्याळात बघितलं ... १० मिनिटात ग्रहण लागणार होत. पण समर्थ..... मला आत जायलाच हव... .. मी आत घुसलो.. आत कोणीच नव्हत जिन्यावरून थोडा प्रकाश येत होता... मी तसाच वर आलो.. हातात ते पिवळ रत्न घट्ट पकडलेल होत . गच्चीत गेल्यावर धक्काच बसला.. एक हिडीस आकार चमकत होता.. त्यावर हर्षद भेदरून बसलेला होता.. समर्थ त्याच्या पुढे उभे होते.. मला पाहून समर्थांच्या डोळ्यात एक क्षणभर हास्य चमकल ... त्यांचा चेहरा आता पूर्वीसारखा दिसत होता. तेच तेज... मला समजेनास झाल .. मगाशी भेदरलेले समर्थ ते हेच का... नक्की काहीतरी त्यांचा डाव अनार यामागे.. एक खास पत्ता त्यांनी मागे ठेवलेलाच असणार...

अप्पा ते ओरडले ... ग्रहण लागल्यावर या खोबणीत ते रत्न बसव.. त्यांनी एक आकार माझ्याकडे फेकला.. ती एक लाकडी चौकट होती .. ते आकार आता त्यांच्याकडे सरकायला लागले ... मी भेदरून पाहत होतो... अचानक समर्थ एका पायावर उभे राहिले ... दोन्ही हात वर गेले ... डोळे मिटले.. आणि तोंडातून ते ब्रम्हास्त्र बाहेर पडल .. "तस्मार अर्चना ".... या बद्दल मी साफ विसरूनच गेलो होतो... विश्वातल्या हव्या त्या व्यक्तीला .. कुठल्याही शक्तीला.. पंच महाभूतांना सुद्धा काही वेळ थोपवून धरण्याची शक्ती .. ते भयानक वर्ण आईकताच ते काळे आकार तसेच थांबले ...... जणू त्यांचे दगडच झाले .. आणि ग्रहण लागल... समर्थ ओरडले.. अप्पा ...
मी लगेच ते रत्न त्या खोबणीत बसवलं.... एका क्षणात त्या अघोरी शक्ती.. त्या रत्नात खेचल्या गेल्या.. त्या रत्नातून.. विजेसारखे.. प्रत्येक विशिष्ट ठिकाणी बसवलेल्या रत्नातून जात जात शेवटी त्या आकाशात मिसळून गेल्या...... ग्रहण संपले ..

***********************
नागरगोज्यातला शेवटचा दिवस....

हर्षद सारखी सारखी समर्थांची माफी मागत होता... समर्थ हसून त्याला सांगत होते.. अरे हर्षद तो त्यांचा डाव होता.. आणि असे काही होणार हे मला माहीतच होते.. त्यांनी तुझ्या.... इतकेच काय, अप्पाच्याही मनावर ताबा मिळवलेला होता.. फक्त त्यांना माझ मन वाचता येत नव्हत...

म्हणूनच अप्पा मी तुला तस्मार अर्च्नेबद्दल आधीच सांगितल नाही.. कारण मग त्यांना तेही आधीच कळलं असत.
तुझ्या मनात मी संकटात सापडलोय हेच विचार असल्याने ते निर्धास्त होते.. पण अप्पा .. हा समर्थ इतकाही कच्चा नाही बर का..
त्यांनी एवढे म्हणून होईस्तोवर मी आणि हर्षद त्यांच्या पाया पडलेलो होतो .
हर्षद च्या आयुष्याला लागलेलं ग्रहण सुटलेलं होत.. आणि आम्ही परत आमच्या मार्गावर निघालेलो होतो.. नव्या थराराच्या प्रतीक्षेत

the end or to be continued... किंवा कसेही ;)

कथा

प्रतिक्रिया

इष्टुर फाकडा's picture

12 Nov 2011 - 7:14 pm | इष्टुर फाकडा

स्पा....तुम्ही आमचा माज मोडलात...तुम्हांस साष्टांग दंडवत !!!!

रामदास's picture

12 Nov 2011 - 8:18 pm | रामदास

अप्पा त्या कवचाचा आता काही उपयोग नाही.. आयत्या वेळी सगळी समीकरण बदलली आहेत.. हर्षद ला मी कितपत वाचवेन आणि मी देखील वाचेन कि नाही मला ठावूक नाही.
घाबरवून टाकलंत राव !!!

५० फक्त's picture

12 Nov 2011 - 8:26 pm | ५० फक्त

अपेक्षित शेवट पण ' कसेही असल्याने ' पुढचं वस्त्र विणायला मोकळे सोडलेले धागे दिसले.

बाकी एकदम मस्त वाचायला मजा आली,

स्वापड्या माझ्यासाठी थोडं अवघड करुन ठेवलंस, बघु ट्राय करतो आता पुन्हा नव्यानं, हेम्याला लावतो कामाला.

पैसा's picture

12 Nov 2011 - 9:18 pm | पैसा

ते शेवटचे 'किंवा कसेही' अंमळ गूढ वाटते आहे.

वाचवत नाहीय रे..
आता मनातून न लिहील्यानं वाचवत नाहीय की फार भीतीदायक लिहील्यानं वाचवत नाहीय हे ठरवण्याचं तुझ्यावर सोडतो ;-)

रेवती's picture

12 Nov 2011 - 9:37 pm | रेवती

हम्म्म...
बासं झालं आता घाबरवणं......

मस्त मस्त.. नारायण धारपांची आठवण झाली. शेवट पण सुसाट.

- पिंगू

निमिष ध.'s picture

12 Nov 2011 - 10:43 pm | निमिष ध.

बापरे एकदम छान जमली आहे कथा. शेवट एकदम झकास ! वाचून एकदम सगळे डोळ्यासमोर आले. जबरी !!

स्मिता.'s picture

12 Nov 2011 - 11:26 pm | स्मिता.

संपली बाबा एकदाची ही भयकथा! शेवट अपेक्षित असला तरी थरार मस्त जमलाय... सिरीयलमध्ये असतो तसा.

सुहास झेले's picture

13 Nov 2011 - 2:38 am | सुहास झेले

जबरा !!

शिल्पा ब's picture

13 Nov 2011 - 3:48 am | शिल्पा ब

गोष्ट छान. अगदी ताईत, ब्रम्हास्त्र, दोरे वगैरे वगैरे...

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Nov 2011 - 10:08 am | ज्ञानोबाचे पैजार

वेगवान कथा आणि तीचा तितकाच मस्त शेवट, जियो स्पावड्या, छा गये तुम, शेवट पर्यंत खिळवुन ठेवलस.
पुलेशु

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2011 - 1:41 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा स्पावड्या..छान संपवलीस कथा...भयकथा झाली...अता रोमान्स कथा येऊ द्या... मला खात्री आहे,जमेल तुंम्हाला ;-)

मी-सौरभ's picture

13 Nov 2011 - 11:06 pm | मी-सौरभ

बुवा

म्याबी हीच ईनंती करणार होतो ;)

स्पाडू: घे की जरा मनावर

एन्ड अपेक्षित
तरीही शेवटपर्यत कथेने खिळवून ठेवलं
मस्त

श्यामल's picture

13 Nov 2011 - 3:52 pm | श्यामल

पुर्वानुभवावरुन शेवट रात्री वाचायचा नाही असे ठरवले. मुद्दामहुन दिवसाढवळ्या वाचायला घेतला आणि श्वास रोखुन धरुन घाईघाईत शेवट वाचला खरा पण........... श्वास बंद पडुन आम्हीही गंगी आणि दादासाहेबांच्या टीममध्ये सामिल होतोय की काय असं वाटायला लागलं !..............स्पा, अरे बाबा काय जबरदस्त शेवट लिहिलायस !

धमाल मुलगा's picture

13 Nov 2011 - 8:15 pm | धमाल मुलगा

ष्टुरी भारी झालीए रे. नादखुळाच!

समर्थ, आप्पा भारी जमून गेलेयत. तडतडता हिरवट प्रकाश मात्र मिस करतोय. :)

एक मात्र राहून राहून वाटतंय, तू मनापासून शेवटचा भाग उतरवलेला नाहीस. चौथ्या भागातली वातावरण निर्मीती जशी झकास जमवलीस, तशी इथेही आहेच, पण उरकतं घेतलंयस असं माझं ठाम मत.
उत्कंठा आणि रंगत एव्हढ्या उंचीवर पोचल्यानंतर खर्‍या मुकाबल्यात मात्र लुटूपुटूच्या लढाईसारखं थोडक्यात उरकणं हे त्या कथेवर आणि लेखकावर स्पावड्यानं केलेला अन्याव आहे. :)
हवं तर प्रकाशीत करु नकोस, पण हा शेवटाचा भाग पुन्हा तबियतीत लिहून काढ. अशा झकास कथेची अशी बोळवण नको रे करुस. तू उत्तम लिहितोयस म्हणून सांगावसं वाटलं इतकंच.

>>the end or to be continued... किंवा कसेही
असं म्हणून चालत नसतंय बाबा! अशोक समर्थांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. असं थांबून चालणारच नाहीए. :)

विजुभाऊ's picture

14 Nov 2011 - 1:48 pm | विजुभाऊ

धमालकाशी सहमत

अर्धवटराव's picture

13 Nov 2011 - 10:51 pm | अर्धवटराव

मित्रा... लय भारी झाला हा भाग, आणि शेवट सुद्धा.

अर्धवटराव

जबरी.. नाधांच्या तोडीस तोड... जबरी टरकायला लावणारी आहे स्टोरी..

आता स्पावड्या दपां, नाधा, रम वगैरेंच्या पंक्तीत जाऊन बसलाच आहे असं म्हणायला हरकत नाही.

किसन शिंदे's picture

14 Nov 2011 - 3:15 pm | किसन शिंदे

अगदी हेच म्हणतो.

विशाखा राऊत's picture

14 Nov 2011 - 3:09 pm | विशाखा राऊत

जबरदस्त :)

विनीत संखे's picture

14 Nov 2011 - 7:28 pm | विनीत संखे

छान! पण आवरल्या सारखं वाटलं आणि लबाड शेळक्यांच्या भुताचं काय झालं?

अप्रतिम अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम...

खुपच जबरद्स्त पणॅ आणि वातावरण निर्मित लिखान ....
असेच लिहित रहा... वाचत आहे ...

प्रचेतस's picture

15 Nov 2011 - 10:49 pm | प्रचेतस

जबरदस्त.
मिपावरील सर्वोत्कृष्ट कथांच्या यादीत ग्रहणचा समावेश नक्कीच आहे.
धम्याशी सहमत. शेवटचा संघर्ष लवकर आटोपता घेतलास.

प्यारे१'s picture

16 Nov 2011 - 3:31 pm | प्यारे१

श्श्श्श्श्श्श्श्श्श्श......... कोई है!

स्पावड्या, एक 'तीत' मला पण दे ना! अशुद्धलेखनाच्या ब्रेकमुळे मधे मधे वाचलो नाहीतर-
प्यारे मु पो कोर्टामागची विहीर
-झालं असतं.

सुहास..'s picture

17 Nov 2011 - 12:24 pm | सुहास..

the end or to be continued... किंवा कसेही.................... >>.

अजुन येवु देत,

थरारक कथा आहे ! लेखनाला बहर आला आहे तुझ्या

अद्द्या's picture

1 Jul 2015 - 4:29 pm | अद्द्या

नारायण धारप वाचलेत थोडे .

त्यामुळे . .
मस्तच . .

च्यायला आत्ता इंटरकॉम वाजला तरी भीती वाटली २-३ सेकंद

शि बि आय's picture

1 Jul 2015 - 4:44 pm | शि बि आय

जबरदस्तच !!!! दिवसा उजेडी देखील घाम फोडलात

जडभरत's picture

2 Jul 2015 - 11:32 am | जडभरत

नमस्कार स्पा भाऊ,
कथा आजच वाचून पूर्ण केली. खूप मस्त! त्या भयकारी वातावरणात अर्धा एक तास जणू हरवुनच गेलो होतो. मजा आली.
सकाळ असल्याने भीती वाटणार नाही. पण रात्री लाईट लावूनच झोपावे लागणार.

आईला आत्ताच साला फोन वाजला आणि असला दचकलो, ए बाबा ही सगळी मंंडळी खरोखरची तर नाहीत ना. समर्थांनी त्यांना नक्की ते कुठल्या काय पोकळीत पाठवलंय ना?

पण प्रतिसाद देणार्‍या तमाम मंडळींना एक विनंती, की ह्या गोष्टी केवळ मजा, अंधश्रद्धा किंवा थोताड समजू नका! अशाच एका अघोरी शक्तीचे भयानक कारनामे मी स्वतः बघितले आहेत. अनुभवलेले आहेत. माझ्या एका अत्यंत प्राणप्रिय व्यक्तिच्या बाबतीत. अर्थात भयकथेतल्याप्रमाणे वातावरण, पाऊस-विजा, जुने बंगले, शापित घराणी असा काही प्रकार या कथेत नव्हता. पण तीव्रता तितकीच. अगदी जीव द्यावा अशी वेळ आणणारी दुष्ट शक्ती. शेवटी असाच एक समर्थांसारखा पाठिराखा भेटला आणि ६ महिने घोंघावणारं ते भयानक वादळ शेवटी थांबलं.

कधीतरी पुढेमागे मुंबैत कट्टा आयोजित केलात आणि मी येऊ शकलो तर ती कथा सांगेन!

तुडतुडी's picture

17 Jul 2015 - 4:42 pm | तुडतुडी

जडभरत…
तुम्ही प्रत्येक भयकथेच्या प्रतिसादात मी पाहिलंय , मी अनुभवलंय असं सांगता . पण लिवा म्हणलं कि प्रत्यक्षात सांगेन म्हणता .
जर तुम्हाला लिहायचं नसतं तर उगीच कशाला टिंग्या सोडता . एकदाचं काय ते लिहून टाका

बॅटमॅन's picture

17 Jul 2015 - 4:54 pm | बॅटमॅन

तुम्ही प्रत्येक भारतीय संस्कृतीच्या प्रतिसादात मी पाहिलंय , सगळं काही आहे असं सांगता . पण काय आहे, अध्याय क्रमांक लिवा म्हणलं कि तुम्हीच बघा म्हणता .
जर तुम्हाला माहिती नसतं तर उगीच कशाला टिंग्या सोडता . एकदाचं काय ते लिहून टाका

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2015 - 7:26 pm | अत्रुप्त आत्मा

आग्गाग्गागा! :-D खाटुक खुटुक खुटुक! :-D

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Jul 2015 - 6:57 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरे हे कसे काय बुआ सुटले!!!! अफाट आहे हे ग्रहण