निरोधला विरोध!!!
निरोधला विरोध!
पुरुष उवाच या तरुणाईच्या डोक्याला खुराक देणाऱ्या २००९च्या दिवाळी अंकात ‘निरोधला विरोध’ कोठे कोठे अन् कसा कसा होतो याचे मोठे अभ्यासपूर्ण रेखाटन केलेले होते. एका नामांकित लेखकाने एड्सग्रस्तांसाठी सामाजिक कार्य करतांना अनावधानानेच या विषयाला तोंड फोडले आहे. निरोधच्या वापराला विरोध जसा सुशिक्षितांकडून होतो त्याच प्रमाणात अशिक्षितांकडूनही होत असतो. यामागील कारणमिमांसा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला व त्याचे निरीक्षण किंवा परीक्षण म्हणजे हा लेख होय.
प्रथम त्याने ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली. तेव्हा असे निष्कर्ष समोर आले की गावातील प्रत्येकाला प्रत्येकजण नावानिशी ओळखत असतो. अशावेळी मेडिकल दुकानात जाऊन ‘पाकिटा’ची मागणी करणे त्यांना संकोच उत्पन्न करणारे वाटते. चार चौघांत जर अशी खरेदी झाली तर ‘आज रात्रीचा आपला मुक्काम घरी की दारी’ या अर्थाच्या नजरेचा सामना करावा लागतो. शिवाय दुसऱ्या दिवशी जवळच्या मित्रांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागते. त्यात न लिहिता येण्याजोगे प्रश्न असतात. आणखी एक समस्या म्हणजे गावाकडच्या घरात प्रत्येक कुटुंबियांचा या खोलीतून त्या खोलीत मुक्त संचार असतो. म्हाताऱ्या कोताऱ्यांना काही काम नसल्याने घरातील सांदीकोपरा किंवा ‘हातूर्ण-पान्घुर्ण’ आवरताना सदरहू साधन सापडण्याची दाट शक्यता असते. पोरं टोरं असली रंगीत पाकिटे फोडून त्याचे फुगे अंगणभर उडवू शकतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरी सर्व काळजी घेऊन हे साधन व्यवस्थित वापरलं तरी दुसऱ्या दिवशी कोठे जाऊन टाकायचे हा प्रश्न उभा राहतो. गावातला कचरा वर्षानुवर्षे एकाच स्वमालकीच्या उकीरड्यात साठत असतो. अशा ठिकाणी रंगी बेरंगी पाकीट दिसले किंवा पडलेले आढळले तर कुत्री मांजरं कोंबड्या पुन्हा त्या फुग्यांची वरात अंगणापर्यंत घेऊन येऊ शकतात. एकत्र कुटुंब असल्याने फार कमी वेळा जवळ येणे होत असल्याने ऐनवेळी तसेच अल्पवधीत हे साधन उपलब्ध होईलच असेही नाही आणि चार पाच मिनिटांसाठी ते उलगडून लावणे, गुंडाळून काढणे, गाठ मारणे इतका द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरळसोट कार्यभाग उरकून बाहेर पडवीत परतलेलं बरं असं वाटून निरोधला विरोध केला जातो.
ग्रामीण भागातील महिलांना या विषयावर बोलतं करणं महाकठीण काम ठरलं. पण ज्या कोणी बोलल्या त्यांच्या मते हे साधन वापरणं, न वापरणं हे सर्वस्वी नवरे मंडळीच ठरवतात. महिलांच्या मताला फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा नको असतांना दिवस राहणे, ते खाली करून घ्यावे लागणे इ. समस्यांना तोंड द्यावे लागते. घरोघरी ही साधने पुरविणाऱ्या आरोग्यसेविकांना चार-चौघींत हे साधन मागणे म्हणजे चेष्टेचा विषयच ठरतो. याउपर जरी हे साधन मागून घेतले तरी ठेवायचे कोठे? ऐनवेळी आवाज न करता दडवलेल्या ठिकाणाहून काढून ह्यांना द्यायचे कसे? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. वापरलेलं साधन उघड्या कचऱ्यात टाकायची देखील सोय नसते. त्यापेक्षा होईल तसे दोन चार पोरं निपजायची अन् सरळ सरकारी शिबिरात नाव नोंदवून ‘नळ्या’ बांधून घ्यायच्या, हेच ग्रामीण महिलांना सर्वात सोप्पं वाटतं. ‘एकदा का लाईटवरचं ऑपरेशन करून घेतलं की आमच्याबी जीवाला घोर न्हाई आन ह्येंच्याबी!’ असं बऱ्याचजणी सहजच बोलून गेल्या.
शहरी भागात तरी या साधनाचा चांगला प्रसार झाला असेल या हेतूने चर्चा केली असता वेगळीच परिस्थिती समोर आली. तरुणाईचा कल विदाऊट कॉन्टॅक्ट ठेवण्याकडे असून ७२ तासाच्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव्ह पिल्स वापरण्याकडे अधिक असल्याचे जाणवले. काही मुले म्हणाली की गर्लफ्रेंड सोबत एकांतात, झाडी झुडपात रोमान्स करतांना ऐनवेळी हाताशी हे साधन असेलच असे नाही. साधन न वापरताच आनंद घ्यावा लागतो. असेही काहीजण म्हणाले. याशिवाय काहीजणी ‘तुझ्या मनात आधीपासूनच हे होतं म्हणून तू तयारीनिशी आलास’ असं म्हणत फुरंगटून बसतात. त्यापेक्षा हे साधन जवळ बाळगलं जात नाही. त्यापेक्षा रोमान्सच्या अंतिमक्षणी हे साधन न वापरणेच योग्य ठरते. असेही काही युवा प्रेमी बोलून गेले. काही पोरांना विदाऊट मध्येच जास्त थ्रिल वाटतं. म्हणून ते अजिबात वापरीत नाहीत. त्यातील धोके समजावून सांगितले तरी त्याकडे कानाडोळा करून मस्ती मौज लुटण्यासाठी हा आडपडदा कशाला? असा प्रतिप्रश्न त्यांनीच विचारल्यावर लेखक महाशय अक्षरशः निरुत्तर झाले.
सुशिक्षित शहरी दाम्पत्यांना स्पर्शानंदातच अधिक रस असल्याने ते क्वचित हे साधन वापरतात असे कळले. काहींना ‘नॅचरल’मध्ये खूप काही हवेहवेसे मिळत जाते. त्यामुळे त्या आनंदात आडकाठी ठरणारे हे साधन वापरण्याचे या महिला व पुरुष धुडकावून लावतात. काहींना हे कसे वापरायचे तेच कळलेले नसते व काहीतरी भयंकर चूक होईल अशा भीतीने ते वापरणे टाळले जाते. काहींना ते वापरण्यात वाया जाणारा वेळ दवडायचा नसतो. वृत्तपत्रांच्या मलपृष्ठावरील या साधनाच्या फ्लेवरयुक्त जाहिरातीत काहीही तथ्य नसल्याचे अनेक महिला सांगतात व हे साधन टाळण्याचे सुचवतात. काहीजण कॅलेंडर पद्धत वापरून मुक्ततेचा आनंद उपभोगतात तर काहीजणांना कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या कोंडलेल्या भावना भडाभड व्यक्त करायच्या असतात...
एकंदर काय तर शहरात बरीच प्रायव्हसी जरी मिळत असली तरी निरोधला विरोध कायमच दिसून येतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
:)
Submitted by डॉ.श्रीराम दिवटे
प्रकाटाआ
बेक्कार विकेट काढली राव
मारलं बूच ?
... व्यासंग दांडगा आहे
५० जण वाचुन गेले
आवरा...............................................
लेखाचं शीर्षक पाहिल्याबरोबरच
हा हा हा...
या वरून आठवलं,
पब्लीक कुठपण काय्पन
अहो काय करणार...बाकीची सगळी
काहि वर्षा पुर्वी आमच्या
तर मग काय.... मोफत मिळायचे
मोफत मिळाले तर काय ??? आनि
निरोध मोफतही मिळतात आणि
लिखाण
ग्रामीण दांपत्याची खरोखरच
विषय महत्त्वचा आहे