मुंबई

यकु's picture
यकु in जे न देखे रवी...
21 Nov 2010 - 6:40 pm

मुंबईमुंबई पाहिली मुंबई
जीवंत नगरी ती मरती मुंबई
जगती मुंबई, खाती मुंबई, पिती मुंबई
पळती मुंबई जळती मुंबई
हसती मुंबई खेळती मुंबई

झुकझुक गाड्या अचाट वेळा
ढण ढण भोंगा गाडीत झोपा
भजनकिर्तन
भिक्षेकरिता
निर्लज्ज नर्तन

पंचम तारा आलिशान कारा
स्पेशल स्यूट अन सर्व पसारा
फुका जन्मती मुकाट मरती
जगती आणि पुन्हा निपजती
इथेच बंगले इथेच कारा
ऐंशीच वर्षे किती पसारा

लोकल रिक्षा विमान एस्ट्या
गुगल फोन अन कडक नोटा
बारच नाही बाला सुध्दा
पितापिताना उलट्या नुस्त्या

जगताजगता मरण धडकते
पुरतच नाही जग हे रडते

भयानकबिभत्सरौद्ररससंस्कृतीकवितामुक्तकशब्दक्रीडासमाजजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

गवि's picture

21 Nov 2010 - 7:20 pm | गवि

दादर नाही परवडणारे..
मध्यममार्गी लटकत जारे..
लोकलद्वारी चरचर वारे..
गालावरती ओघळ खारे..
मुलुंड नाहुर भांडुप प्यारे..

तुमच्या प्रत्येक ओळीपुढे गडबडून लोळणारी एक एक स्मायली.
=) )=) )=) ) =) ) =) ) =) )
=) ) =) ) =) ) =) )
=) )

मेघवेडा's picture

21 Nov 2010 - 8:48 pm | मेघवेडा

खरंय.. चरचरीत सत्य! मलाही काही सुचलं :

इकडे आमच्या वेष्टर्नावर
मिराभायंदर कधीच सरले
तुमच्या-आमच्यासाठी आता
वसई विरार तेवढे उरले

आणखी आपण थोडंच सरकू
वसई विरार आहे बरे
दादर,पार्ल्याच्या भावातच
येतील तिकडे दोन घरे!

लोकल जाईल ढाणूस आता
सरकायाला जागा झाली
आणखी सरकत आमची मुंबै
गुजरातेपर्यंत आली!

असाच सरकत एके दिवशी
'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल
कुणास ठाऊक केव्हा आमच्या
मुंबईला तो वापीस येईल!

स्पा's picture

21 Nov 2010 - 8:51 pm | स्पा

मेव्या १ number रे..................... अजून लिहायला हवं होतंस.............

+१

असाच सरकत एके दिवशी
'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल
कुणास ठाऊक केव्हा आमच्या
मुंबईला तो वापीस येईल!

हे विशेष आवडले.

नंदन's picture

22 Nov 2010 - 3:45 pm | नंदन

असाच सरकत एके दिवशी
'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल
कुणास ठाऊक केव्हा आमच्या
मुंबईला तो वापीस येईल!

झकास!

(एक प.रे.कर)

प्रभो's picture

22 Nov 2010 - 7:59 pm | प्रभो

+१

मस्तच....

पुष्कर जोशी's picture

15 Apr 2013 - 5:35 pm | पुष्कर जोशी
पुष्करिणी's picture

22 Nov 2010 - 11:33 pm | पुष्करिणी

छानच हो मेघवेडा-जी

स्पा's picture

21 Nov 2010 - 8:36 pm | स्पा

खतरनाक...................

प्रत्येक शब्द .. आणि ओळ...... मुंबई दर्शन घडवून आणते....

पैसा's picture

21 Nov 2010 - 10:54 pm | पैसा

मुंबईचा फटका! सॉल्लिट्ट! आम्हाला मुंबै अशीच दिसते. चुकून मुंबईत कधी जावं लागलं तर कधी परत जाईन असं होत!
@गगनविहारी आणि मेवे... मस्त कविता!

नंदू's picture

22 Nov 2010 - 5:12 am | नंदू

शरदिनीतैंची छाप जाणवत्येय.

त्यांच्या कवितेतला अर्थ फळ्यावरची अक्षरे पुसून टाकावीत आणि नुसतेच चित्रविचित्र आकार दिसावेत तसा असे.
छाप मुंबईत पाहिलेल्या पळापळीची आणि गतीची आहे.

लुटा लुफ्त अकबर खानच्या उड्यांचा!

ह्या: एवढं सायलेंट गाणं! कधीचं आहे?

गणेशा's picture

22 Nov 2010 - 3:14 pm | गणेशा

मस्त कविता ...