झक मारते राव तुमची स्कॉच !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 Oct 2010 - 3:10 pm

गेल्या वर्षभरात अलिबागच्या ४-५ तरी चकरा नक्की झाल्या असतील. एकदा आई-आण्णा आले होते तेव्हा त्यांना मुरुड जंजीरा बघायचा होता म्हणून, तर एकदा सासु-सासर्‍यांना बघायचा होता म्हणुन. तर एक - दोन वेळा आम्ही दोघे नवरा बायकोच बाईकवरुन फिरून आलेलो. येता जाता अलिबागच्या साधारण १०-१५ किमी अलिकडे 'पळी' गावापाशी एक पाटी बघीतली होती..

"डि. सॅमसन कोल्ड्रिंक्स....!"

कोल्ड्रिंक हाऊसच्या पाट्या तशा सगळीकडेच दिसतात, त्यामुळे दुर्लक्षच केले होते. नंतर कुणाकडून तरी ऐकले की ते केवळ कोल्ड्रिंक हाऊस नाही तर कोल्ड्रिंकची विशेषतः सोडा तयार करण्याची फॅक्टरी आहे. इथे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सोडा मिळतो, त्यातही आईसक्रीम सोडा नावाचा एक मस्त प्रकार प्यायला मिळतो. तेव्हा ठरवले की यावेळी अलिबागला जावू तेव्हा भेट द्यायची.

काल परवा परत एकदा नागाव बीचला चक्कर झाली.

नागावचा देखणा सागर किनारा

"माझी फ़ोटोग्राफी"

साहजिकच यावेळी परत नागाव बीचला गेलो तेव्हा त्या पाटीसमोरून जाताना भुवया उंचावल्या आणि आपोआप गाडीचे ब्रेक लागले.

एक छानसी कोकणातल्या एखाद्या वाडीतले घर शोभावे असे वाटणारी (निदान बाहेरुन तरी) अशी ही छोटीसी वास्तु आहे. आत गेलो तर काही लाकडी टेबल आणि खुर्च्या (खरे म्हणाल तर बाकडी) मांडलेली होती. समोर कुणीच दिसत नव्हतं....

"डि. सॅमसन कोल्ड्रिंक हाऊस"

"डि. सॅमसन कोल्ड्रिंक हाऊस-क्लोज अप"

मी "नमस्कार, कुणी आहे का?" म्हणून हाळी दिली. तसे एक सदगृहस्थ समोर आले. आम्ही बसल्या बसल्या समोरच्याच भिंतीवर लावलेला श्री. डि. सॅमसन उर्फ़ सॅमसन दिगोडकर यांचा फ़ोटो दिसला.

"डि. सॅमसन उर्फ़ श्री. सॅमसन दिगोडकर : आईसक्रीम सोड्याचे जनक"

त्यांच्याकडे मिळणार्‍या विविध सोड्यांचे दरपत्रक दाखवणारा बोर्ड दिसला.

"दरपत्रक"

आमचे आकर्षण अर्थातच तिथला "आईसक्रीम सोडा" होते. पण तिथली यादी पाहताना साहजिकच आत्तापर्यंतचा आवडता सोड्याचा प्रकार म्हणजे आमचा लाडका गोटी सोडा आठवला.

"गोटी सोडा {छायाचित्र आंतरजालावरुन साभार}"

देशावरच्या बहुतेक सर्व बस स्टँडच्या बाहेर सायकलवर मागच्या कॅरियरला लावलेल्या स्टँडवर अडकवलेले ते हिरव्यागार काचेच्या बाटल्यांचे क्रेट, बाटल्यांवर ठेवलेली कधी हिरवीगार तर कधी पिवळीशार लिंबं. सायकल मिडल स्टँडला लावून एका अंगाने तिच्या मधल्या नळीला आपल्या कंबरेचा आधार देत समोरच्या गिर्‍हाईकाला खुश करणारा तो आतिथ्यशील (?) सोडा विक्रेता.

अर्थात त्यातल्या त्यात व्यवसायात सेटल झालेला एखादा गोटी सोडावाला आपला स्वतःचा स्टॉल ताकण्यात यशस्वी होतो, पण गोटी सोडा प्यावा तो सायकलवरच्या विक्रेत्याकडुनच. कारण त्याच्या वागण्या-बोलण्यात अजुन ती दुकानधारक झाल्याची गुर्मी आलेली नसते.

{छायाचित्र आंतरजालावरुन साभार}

ती हिरव्या रंगाची काचेची बाटली. मग त्याचे ते बाटली जोरजोराने हलवून काचेच्या बाटलीच्या तोंडाशी असलेली काचेची गोटी अंगठ्याच्या साहाय्याने खाली बाटलीत पाडणे आणि फसफसणारा सोडा स्टीलच्या किंवा काचेच्या ग्लासात ओतून मग त्यावर थोडेसे मीठ किंवा मसाला भुरभुरून गिर्‍हाइकाला प्यायला देणे. एकदा का तो फसफसणारा गोटी सोडा तोंडाला लावला की....

झक मारते राव तुमची व्हिस्की आणि स्कॉच !

तर सांगायची गोष्ट अशी की आम्हाला सवय गोटी सोड्याची!

त्यानंतर कधीतरी कुर्ल्याला स्टेशनवर मसाला सोडा पिलेला, तोही आवडला होता. एका काचेच्या ग्लासात तो मशिनमधला फ़ाऊंटन सोडा घेवून ( पुष्कळ विक्रेते स्प्राईट ही वापरतात, त्यात मस्तपैकी लिंबू आणि गिहाईकाच्या मागणीनुसार जलजीरा पावडर मिक्स करुन दिलेला तो फ़सफ़सणारा सोडादेखील खुप आवडायचा.

त्यानंतर एकदा माथेरानला एका अशाच कोल्ड्रिंक स्टॉलवर गटागट पिलेले "मसाला थम्स अप" हे देखील भन्नाटच रसायन होते. बाटलीतले थम्स अप ग्लासमध्ये काढून त्यात लिंबू आणि चाट मसाला मिक्स करुन तो प्यायला दिला जातो. त्याचीही चव फंडु असते. तिथेच लिची सोडादेखील ट्राय केला होता.

"माथेरानचे ’मसाला थम्स अप’ हा पण एक मस्त अनुभव असतो.{छायाचित्र आंतरजालावरुन साभार}"

त्यामुळे आता आईसक्रीम सोडा काय आहे, हे जाणून घ्यायची इच्छा होती. ग्लास तोंडाला लावला, एका दमात संपवला, दुसरा मागवला...तोही संपला आणि जाणवलं की फारसं वेगळं नसलं तरी हे प्रकरण आपल्याला आवडलंय. थोडासा स्ट्रॉबेरी आईस्क्रीमसारखा लागणार गोडसर फ्लेवर होता, फार काही विशेष नव्हते पण आतापर्यंत पिलेल्या सोड्यापेक्षा हा प्रकारच वेगळा होता. खास म्हणजे सोडा पिताना छातीत होणारी जळजळ अजीबात जाणवत नव्हती तरीही सोडा पिताना मिळणारा आनंद मात्र तसाच होता. त्यानंतर साहजिकच तिथले आणखी एक्-दोन प्रकार ट्राय करुन झाले. पण आईसक्रीम सोड्याची चव त्याला नव्हती. तृषाशांती झाल्यावर आता लक्ष इकडे तिकडे वळले. भिंतीवर सगळीकडे वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून डि. सॅमसन यांच्या या सोडा फॅक्टरीबद्दल छापून आलेले लेख फ्रेम करुन चिकटवलेले / अडकवलेले होते. ते वाचताना मिळालेली माहिती अशी...

१९३८ साली डि. सॅमसन यांनी सोड्याची ही फॅक्टरी 'पळी' या गावात सुरू केले. दिगोडकर कुटूंबीय मुळचे ज्यु इस्त्रायलचे पण पिढ्यानुपिढ्या महाराष्ट्रात स्थायिक झालेले. महाराष्ट्रात अलिबाग मधील दिगोडे या गावी स्थायिक झाल्यामुळे बहुदा त्यांचे आडनाव दिगोडकर पडले असावे. बहुदा स्वातंत्र्यपूर्व काळात अलिबागच्या परिसरात ब्रिटीश अधिकार्‍यांचा पर्यटनस्थळ म्हणुन राबता असावा. त्याकाळी एतद्देशियांना 'सोडा' हे नाव देखील माहीत असण्याची शक्यता कमीच होती. पण सॅमसन यांनी ब्रिटीश अधिकार्‍यांची हि गरज ओळखुन पळी येथे ही सोडा बनवण्याची फॅक्टरी सुरू केली आणि बघता बघता सॅमसन यांच्या आईसक्रिम सोड्याची लोकप्रियता मुंबईच्या परिसरात सर्वत्र पसरली. त्यावेळी आत्ताचे तीन वीरा धरण अस्तित्वात नव्हते त्यामुळे बहुदा त्यांनी पाण्यासाठी एक विहीर बांधुन घेतली. मुळ पेट्रोमॅक्स आणि स्टोव्ह रिपेयरींगचा व्यवसाय करणारे सॅमसन दिगोडकर या सोडा फॅक्टरीच्या व्यवसायात आले आणि मुळ व्यवसाय मागेच पडला. त्यांच्यानंतर त्याचे चिरंजीव श्री. डॅनियल दिगोडकर यांनी ही फॅक्टरी अजुन वाढवली. साधारण १९५२ च्या दरम्यान बॉटलिंग मशिन घेवून व्यवसाय वाढवला. श्री. डॅनियल यांच्या मृत्युनंतर त्यांच्या भगिनी येलिझाबेन हा व्यवसाय सांभाळत होत्या. त्यांच्याबद्दल अद्ययावत माहिती नाही मिळू शकली. आजही अलिबाग, मुरूड कडे जाणारे पर्यटक इथे थांबून आईसक्रिम सोड्याचा आस्वाद घेतात. बाजारभावापेक्षा अतिशय कमी दरात (जवळ जवळ ५०% कमी) विकली जाणारी इथली थंडपेये खरोखर तहान भागवणारी, थकल्या जिवाला शांत करणारी अशी आहेत. विशेष म्हणजे कुठल्याही पेयाचा दर रुपये १० पेक्षा जास्त नाही. तुम्हाला बरोबर घेवून जायचे असल्यान पॅक (पेट) बॉटल्सदेखील मिळतात. किंमत साधारण २५ रुपये.

डि. सॅमसन यांनी १९३८ साली रुजवलेल्या या छोट्याश्या रोपट्याची ख्याती आज महाराष्ट्रभर झाली आहे.

मग कधी जायचं "पळी" गावचा डि. सॅमसन यांचा 'आईसक्रीम' सोडा प्यायला?

विशाल कुलकर्णी.

प्रवासछायाचित्रणलेखसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 3:11 pm | विशाल कुलकर्णी

प्रस्तुत लिखाण हे लेखकाचे स्वतःचे मत असुन मिपावरील तळीरामांना त्याबद्दल काही आक्षेप असल्यास दखल घेतली जाणार नाही. ;)

हुकूमावरून :)

मी-सौरभ's picture

2 Oct 2010 - 11:45 pm | मी-सौरभ

हुकूमावरून Smile

सस्नेह

??
ये बात कुछ जमी नही :)

विशाल कुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 10:49 am | विशाल कुलकर्णी

ते तसंच आहे,
सौरभभौ...., Please तुम्ही हे करायला पाहीजे.... सारखं ;)

धन्यु :)

इंटरनेटस्नेही's picture

3 Oct 2010 - 12:35 am | इंटरनेटस्नेही

गुड वन.

आइसक्रीम सोड्याची कहाणी मस्तच

असच म्हणतो..
(मसाला सोडाचा डायहार्ड फॅन ) गणपा

स्पा's picture

1 Oct 2010 - 3:27 pm | स्पा

क्या बात हे......

वेळ मिळालेला दिसतोय लिखाणाला.......

आता " भार्गव" आणि " बिलंदर" ला काढा बाहेर राव........

आंबोळी's picture

1 Oct 2010 - 5:11 pm | आंबोळी

स्पाशी सहमत...

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 4:03 pm | धमाल मुलगा

जल्लां फोटु काय बघायला मिळेनात बा.
असुद्या..तुझ्यासोबतच एकडाव सॅमसनकडं चक्कर मारु तेव्हा याचि देहि याचि डोळा पाहुन घेऊ. कसें? :)

स्वाती२'s picture

1 Oct 2010 - 4:38 pm | स्वाती२

अहाहा! किती जुन्या आठवणी जागवल्यात! गेल्याच आठवड्यात आठवण झाली होती. दर पत्रक वाचून किती काळ उलटलाय याची जाणिव झाली. मात्र माझ्या जिभेला अजुनही ती चव आठवतेय.

योगप्रभू's picture

1 Oct 2010 - 5:38 pm | योगप्रभू

विशल्या लई भारी.
आइस्क्रिम सोड्याच्या आठवणी फसफसून आल्या.
अरे आणखी पण एक सोडा बेहतरीन आहे. आम्ही हरिहरेश्वरला प्यायलो होतो. तिथे वेगवेगळ्या सरबतांमध्ये सोडा घालून जलजिरा आणि पुदीना सीरप टाकून मस्त सोडा देतात. पयल्या घोटात फ्रेश. तर आम्ही जांभूळ सोडा घेतला. जांभळाचे सरबत असलेला सोडा. क्या बात है. दर्दी आहेस म्हणून सांगतो. एकदा ट्राय कर.

विशाल कुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 6:06 pm | विशाल कुलकर्णी

केलाय दादानु तो सोडा पण ट्राय केलाय. हरिहरेश्वरला मंदीराच्या रस्त्यावर प्रवेशकमानीपाशीच मिळतो. पहिल्यांदा ग्लासात अर्धेच द्रव ओतले जाते, मग त्यात कसलेशे चुर्ण टाकतात कि तो फसफसुन वर येतो, त्याच अवस्थेत प्यायचा. फेस जरा कमी झाला की शिल्लक द्रव आणि पुन्हा ते चुर्ण. झकासच होती ती चव.
च्यामारी माझ्याकडे नेमके पिकासा ब्लॉक आहे नाहीतर फोटोपण टाकला असता तिथला, बघू घरी गेलो की टाकतो.

बाकी समद्यास्नी धंकु बर्का !

अरुण मनोहर's picture

1 Oct 2010 - 5:55 pm | अरुण मनोहर

म्हणूनच आम्ही नेहमी व्हिस्की सोडा व्हिस्की सोडा असे ओरडत असतो!
(काट मारलेली विंकची स्मायली इथे आहे असे समजा)

अशोक पतिल's picture

1 Oct 2010 - 7:00 pm | अशोक पतिल

विशाल ,
ह लेख वाचल्यावर खरेच लहानपन च्या आठवणी जाग्या झाल्या वडील लहानपणी सोडा प्यायला न्यायचे तेव्हा गोटी सोड्या चा आवाज आठवला.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Oct 2010 - 7:06 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम फसफसणारे लेखन विशालभौ.

आईसक्रिम सोड्याचा फोटु ?

सहज's picture

2 Oct 2010 - 6:41 am | सहज

एकदम फसफसणारे लेखन विशालभौ.

शुचि's picture

1 Oct 2010 - 8:25 pm | शुचि

लेख आवडला.

शिल्पा ब's picture

2 Oct 2010 - 12:00 am | शिल्पा ब

लेख आवडला...मी कुठलाच सोडा पीत नाही..आणि त्यात अजून वरून काय काय चूर्ण बीर्ण टाकून असेल तर शक्यच नाही.
असो.

पैसा's picture

2 Oct 2010 - 5:53 pm | पैसा

असेच म्हणाते

विशालभाउ,कधी आमच्या कोल्हापूरात आला तर शिवाजी पुतळ्याच्या एम्पायर मध्ये सोड्याचे १ सो १ प्रकार मिळतात,भवानी मंडपातला खोन्द्रेंचा पाचक सोडा (डबल स्ट्राँग) सुद्धा पिउन बघा !

अन्ननलिका पार खंगाळून निघती खोंद्रेंच्या सोड्यानं .

मी सोडावगैरे पीत नाही पण हे वाचल्यावर एकदा तरी भेट देइनच. गोटी सोडा म्हणजे काय हे माहित नव्हते.

सध्या तरी हे अप्राप्यच..त्यामुळे जळजळ झाली... म्हणजे इनो / सोडा घ्यायला हवा :D

-----------------------------
गुहागरला गेलो होतो तेव्हा एका अशाच छोट्याश्या हॉटेलात अप्रतिम दही-खिचडी खाल्ली होती.
आता ती खरच अप्रतिम होती का पोटात खड्डा पडल्यामुळे तशी वाटली, देव जाणे.

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 5:47 pm | गुंडोपंत

वा अनवट विषयावरचा मस्त लेख. अगदी बीचपासून सुरुवात केल्याने मजा आली.

सोडा मस्तच असणार पण मी कधी प्यायलो नाही. गेलो कधी तर नक्की पीइन.
पण मी आमच्या दामोदर टॉकीजच्या समोर राऊत कोल्ड्रींक हाऊस आहे. तेथे मसाला सोडा पीत असतो. काय झकास असतो तो. कधी आलात नाशकात तर नक्की प्या!
बाकी व्हिस्की हा प्रकार मला काही आवडत नाही.... त्यामुळे शीर्षक पटलेच!

सद्दाम हुसैन's picture

3 Oct 2010 - 12:45 am | सद्दाम हुसैन

माशाल्लाह् .. क्या गुस्ताख लौंडा है ये उइ !
सोडा तो हमारे महल की शान, हमारे घर के आगे एक सोडा का गाडी खडा होता था , वहा पे हम सब आवारा लोग मिल के १०-१० गिल्लास सोडा मारते थे उई , उसका यादे ताजा हो गया ऊई , अब तो इन सब को हम सिर्फ मिस्सलपाव पे विशालमियाँ के मेहेरबानीसे देख पा रहे उई!
शबाब के बाद अगर कुछ अल्लाह ने बनाया है तो वो है ये सोडा, गोटी सोडा हमारा तो जान-ए-सोडा है उई !

लेकिन ऐ साला, ये पुरा काला काला मोटा मोटा क्यो लिखा उई ? सोडा पिके हालत खराब हुई क्या उई ??

सद्दाम हुसैन

विसोबा खेचर's picture

3 Oct 2010 - 12:34 pm | विसोबा खेचर

केवळ सुरेख..

अन्य शब्द नाहीत...

तात्या.

--
आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

प्रभो's picture

3 Oct 2010 - 10:19 pm | प्रभो

मस्त रे विशल्याभाव..... :)

विशाल कुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 10:52 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद सगळ्यांचे :)

विशल्या,
ते सोड्याचे सगळे ठीक आहे रे पण मधल्यामध्ये 'झक मारते ती तुमची स्कॉच' म्हणून व्हिस्कीचा उद्धार कशाला केलास? त्या सोड्यात ब्ल्यू लेबलचा एक पेग टाकून प्यायलास का कधी? किमान सिग्नेचरचा तरी.
अपमान! घोर अपमान. आता बस बोंबलत गोटी सोडा पीत. तू आमच्या डावातून कटाप :)

विशाल कुलकर्णी's picture

4 Oct 2010 - 2:53 pm | विशाल कुलकर्णी

चार वर्षापुर्वी नाईलाजाने सगलं सोडावं लागलं सायबा, म्हणुन असा सुड उगवतोय ;)

स्पा's picture

4 Oct 2010 - 12:19 pm | स्पा

thumps up + जलजीरा .................

कडक लागतं

एकदा ट्राय करून बघा .............