आज पर्यंत मला प्रेम ह्या शब्दाचा अर्थ समजलाच नाही. प्रेम मी कधी अनुभवले नाही. जे काही बघितले, अनुभवले ते सगळे त्या प्रसंगानुसार एक तडजोड, कर्तव्य, असहायता असेच काहीसे होते. मी मित्र कधीच जोडले नाही कदाचित हा दोष माझाच असावा, मला मित्र जमविण्याची कला असते हेच माहीत नसावे हेच मान्य करणे बरे.
मुली हा प्रकार मला वयाच्या १८ वर्षा पर्यंत नीटसा समजलाच नव्हता. ह्याचे कारण वयाच्या ८ - १० वर्षाचा असताना एका खेळातून एका ६ - ७ वर्षाने मोठी असणार्या मुलीने मला त्या वयाला न शोभणार्या ( कदाचित शोभणार्याा ) गोष्टी शिकवायला सुरू केले होते. संसारी स्त्री-पुरुषांचे व काही मुला मुलींचे भर दिवसा चोरी छुपे चालणारे अनैतिक संबंध तिनेच मला फार जवळून दाखवले. ते जे काही मी केले बघितले हे चुकीचे अनैतिक होते हे मला लाथाबुक्के, काठीचा मार बसला तेव्हा समजले. अनैतिक संबंध वाल्यांना कोणी पकडले नाही. दोष माझाच असावा म्हणून मी पकडलो गेलो.
त्या नंतर मी कधी कोणाला भेटण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला नाही. समवयस्क मुले मुली तासनतास बोलत बसलेली पाहून मला आजही आच्श्रर्य वाटते. ज्या मुली लहान सहानं कामानिमित्त संपर्कात आल्या त्या वयाने माझ्या पेक्षा मोठ्या होत्या. अशाच कामातून एका समवयस्क मुली बरोबर माझ्या भेटी वाढू लागल्या. तीच्या घरी मी रोज जात असे. अधून मधून ती शरीर संबंधाचा विषय काढीत असे. मी माझा मार खाण्या पर्यंतचा अनुभव तिला सांगितला. तिने मला बावळट ठरवले व आम्ही दोघे वेगवेगळ्या कारणा करिता हसलो.
एकदा तिने मला त्यांची झोपण्याची जागा दाखवली. एक मोठा व तीन छोटे पलंग चार भिंतींना टेकून मांडलेले होते. आम्ही बाहेर जाऊन झाडा खाली बसलो. तिने बघितलेले व अनुभवलेले, त्या झोपेच्या जागेतील प्रसंगांचे वर्णन मला ऐकवले. तसे ते प्रसंग मला नवीन नव्हते, नावीन्यं होते ते तिच्याच घरातील नातेवाईकांचे आप्ताचे. सगळ्यात हटके वेगळे घडले ते असे की तिच्याच आईने आम्हा दोघांना, सावध करण्याकरिता सांगितलेले आजूबाजूच्या मंडळींचे " अफेअरस ". तेव्हा पासून मला नैतिक - अनैतिक संबंधांना अफेअरस म्हणतात हे समजले. कोण किती नैतिक - अनैतिक म्हणून मिरवून घेतो त्यानुसार नैतिकता - अनैतिकता ठरवली जाते हे पण समजले. " एक्स्टर्नल, इंटर्नल व फॉरिन अफेअरस " म्हणजे खर्याक अर्थाने प्रत्यक्षात काय ? हे माझ्या सारख्या समस्त रक्तदोषित विचार करणार्यांंना सहज समजू शकेल.
अहो त्या मुलीने मला फार मोठा धक्का दिला. हि मी करून घेतलेली समजूत. माझ्या घरी कधीही न आलेली त्या दिवशी भर उन्हात सायकल वरून माझ्या घरी आली होती. तिला माझ्याशी लग्न करायचे होते. मी लग्नाचा विचार करणे शक्यच नव्हते. तीच्या घरातून तिला विरोध होता. लग्नाआधी आई झाली की मान्यता मिळेल म्हणून तिचा तो प्रयत्न होता. मी घाबरलो होतो. मला लग्नाआधी बाप व्हायचे नव्हते. तिला मी नकार दिला. काही दिवसातच ते " अफेअर " संपले. जे काही घडले हे नैतिक - अनैतिक ठरवणार कोण ? शेवटी - नशीब माझे!
नशीब माझे - भाग – ११ 10/3/09
काय नैतिक - अनैतिक हे ठरवण्याचा प्रश्न काही वर्षांनी पुन्हा एकदा माझ्या समोर उभा ठाकला. ह्या प्रसंगात मी फार सावध होतो. सावज बनलो नाही.
कंपनीत माझ्या बरोबर काम करणार्या एका कलाकाराशी (पुढे कळेल) ओळख वाढली. त्याने मला त्याच्या घरी नेले, बायको मुलीची ओळख करून दिली. मला लहान मुलांना खेळवण्याची फार लहानपणापासून सवय असल्याने फार कमी वेळात त्या लहान चिमुकलीशी ओळख झाली. जेवताना ती माझ्या मांडीवर येऊन बसली, चार घास आवडीने खाल्ले आणि थोड्या वेळात माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली. त्या दोघांनी माझे कौतुक केले. मी एकटा जीव सदाशिव होतो, दोघांनी रात्री त्यांच्याच घरात राहण्याचा आग्रह केला. मी नाकारला व राहत्या जागी झोपायला निघून गेलो.
काही दिवसातच तीन दिवसांची सलग सुट्टी होती. दोघांनी आग्रहाने त्यांच्या घरी राहायला बोलावले. तीन दिवस घरच जेवण मिळेल व तीन रात्री स्वच्छ जागेत झोपायला मिळेल ह्या विचाराने लगेच आमंत्रण मान्य केले. ह्याचे कारण कामाच्या जागेपासून दोन मिनिटाच्या वाटेवर, एका खोलीत ८ पलंग असलेली, त्यातल्या एका पलंगाची ती जागा फार कमी पैशात मिळाली होती. त्या पगारात तेवढेच शक्य होते. त्या जागेत मी एकटाच मराठी होतो बाकी सगळे गैर मराठी होते. निद्रानाशाच्या आजाराला इथूनच सुरुवात झाली होती.
असो, संध्याकाळी कलाकार मित्राच्या घरी गेलो. त्याच्या बायकोने व मुलीने गोड लाडिक हास्य देत माझे स्वागत केले. गप्पा, गाणी, विनोद रंगले त्यात साधे सोज्वळ घरगुती जेवण मला मेजवानी सारखेच होते. ती धाकटी चिमुरडी पोर माझा खिसा मुठीत घट्ट धरून माझ्या खांद्यावर झोपली होती. कसेबसे सावरत तिची झोपमोड न करता मी शांतपणे गादीवर आडवा झालो. दिवा विझला, बर्याबच वेळाने नवरा बायको दोघे बाहेर आली, मुलीला उचलण्याचा प्रयत्न झाला माझी झोप मोड होवू नये म्हणून मुलीला माझ्या जवळ सोडून पार्टिशनच्या मागे झोपायला आत गेले. मला नवीन वातावरणात नीट झोप लागत नव्हती. मला त्या ८ पलंगी खोलीच्या वातावरणाची थोडी फार सवय झालेली होती. ते भे/बे सुर घोरणे, खोकणे, गावठी दारु/विडीचे वास, त्या नवीन जागेत नव्हते.
काही वेळाने ए ग्रेड सिनेमाची ध्वनी फीत हळू आवाजात सुरू झाली. नंतर जिंकू किंवा मरू अशी स्थिती होती आणि मग सगळं कस शांत शांत झाले. माझे डोके मन सुन्न झाले होते. किती वेळ निघून गेला कळले नाही. त्याची बायको बाहेर आली पाणी पिऊन माझ्या अंगावरची चादर नीटनेटकी करून आंत निघून गेली. थोड्याच वेळात ध्वनिफीत पुन्हा सुरू झाली. माझी स्थिती " कळेना अजुनी माझे मला असामी काय गुन्हा केला? " झाली होती. मला ताप भरल्यासारखे वाटू लागले. बर्या च वेळानंतर, खरंच माझ्या कानांनी ऐकले " थांबा जरा पाणी पिऊन येते " मी नक्की काय ते समजलो. ति बाहेर येण्या आधीच आवाज न करता बाल्कनीत जाऊन उभा राहिलो. गादी रिकामी पाहून ति बाल्कनीत आली, मी डोके धरून उभा होतो. ह्या दोघांनी माझा हजेरीपट केला होता. तिने माझ्या हातावर एक गोळी ठेवली, घ्या व शांत झोपा म्हणत आत निघून गेली. तुम्ही मला सांगा दोष माझा होता की - नशीब माझे!
नशीब माझे - भाग – १२ 10/4/09
सकाळी जरा उशीराने माझ्या तोंडावर गार पाण्याचे थेंब पडल्याने मला जाग आली. नंतर कळले ते थेंब मुद्दाम उडवले होते. मित्राची बायको त्या चिमुरडीला उचलण्या करता खाली वाकली होती. समोर दिसणारा नजारा आगळा वेगळा आनंद देऊन गेला. पण मी सावध होतो. तिने गोड लडिवाळ हसत मला विचारले " चहा, कॉफी का . . ? अशाच थाटात होते. मी - "जे द्याल ते आनंदाने घेईन. तुम्ही काय चांगले बनवता ?" ति - "अहो मी तुम्हाला आवड विचारली !" मी - "गरम काय आहे ते बघायचे व खिशात पैसे असतील तर घ्यायचे हीच आवड उरली आहे" ति - "तुम्ही फारच अरसिक आहात".
आता तिला मी काय सांगणार, ८ पलंगी वातावरणाची रोजची सकाळ आणि ही सकाळ ह्यांच्या तुलनेत मी अडकलो होतो. माझा कलाकार मित्र कामा निमित्त बाहेर गेला होता दुपारच्या जेवणा पर्यंत परतणार होता. मी वर्तमान पत्र चाळत असताना तिने ही कॉफी म्हणत माझे लक्ष वेधले, समोरचा नजारा थोडा जास्तच आकर्षक होता. तिने खाली वाकून कप माझ्या हातात दिला. स्वतः:चा कप उचलून पाय दुमडीत समोरच्या सोफ्यावर बसली. मी कॉफीचे कौतुक केले. ती - "चांगली फक्त कॉफीच, तुम्ही पुरुष इतके कंजूष आहात ना !" मी - "गैरसमजूत होणार नसेल तर सकाळचा नजारा व आता जो बघतो आहे तो फारच गोड लोभस होता व आहे." ती फार छान लाजली व गोड खळखळून हसली. तेव्हा ते हास्य मला निरागस वाटले.
तिला उत्सुकता होती म्हणून मी माझे आजवरचे मुलींच्या बाबतीतले माझे अनुभव सांगितले. त्या दोघांचे कसे जमले असेल हे समजण्याची उत्सुकता मला होतीच. त्या भेटी ते प्रसंग सांगताना ति चक्क लाजत मुरडत नखरे करत जुन्या आठवणी सांगण्यात मग्न होती. आजी - माजी विद्यार्थी मेळाव्यात त्यांची भेट झाली होती. त्या काळच्या स्कर्ट फॅशनचा गैर फायदा घेऊन ह्या मित्राने तिच्यावर दबाव आणला होता. कलाकार मित्र पदवीधर होता त्यामुळे चांगली नोकरी होती. हिला त्या घटकेला सगळे आकर्षक वाटले. शरीर संबंध वाढत गेले. परिणाम व्हायचा तो झाला. तडजोड म्हणून दोघांच्या आप्तांनी लग्नाला मंजुरी दिली. त्यांचे गांव नोकरी सोडून त्यांना लहान मुलीला घेऊन ह्या नवीन जागेत यावे लागले, वगैरे ती सांगत होती. तेवढ्यात तिची मुलगी रडत उठली. आम्ही भूतकाळातून वर्तमानात आलो.
संध्याकाळी त्याचे अजून काही मित्र गोळा झाले छान मैफिल जमली. रात्री उशीर झाल्याने त्या मैफिलीतील एका वयस्काला सोबत म्हणून मित्र सोडायला गेला. मी त्या एक वर्षाच्या मुलीला सोफ्यावर झोपवले. त्या पोरीने माझे बोट घट्ट धरून ठेवले होते. अजून मित्र परतला नव्हता. कसेबसे सांभाळत त्या चिमुरडीला घेऊन मी गादीवर आडवा झालो. तिची आई पार्टिशनाच्या मागे जाऊन नवर्यालची वाट बघत थांबली होती. खूप उशिरा बाहेरचे दार वाजले, तिने सावकाश दार उघडले. त्या शांत स्वच्छ वातावरणात मी दारूंचा वास लगेच ओळखला. थोड्याच वेळात दबल्या आवाजातल्या तिच्या वेदना व त्याची जबरदस्ती बाहेर समजण्या इतपत वाढली. पण नंतर सारे काही शांत झाले. त्याचे मोठ्या आवाजात घोरणे सुरू झाले. ति तोंडात रुमाल घालून बराच वेळ हुंदके देत बाल्कनीत उभी होती. मी लहानपणाचा मार अजून विसरलो नव्हतो. त्या नवरा बायकोच्या भांडणात मी नाक खुपसणे योग्य वाटले नाही.
झोपेने केव्हा घेरले कळले नाही. सकाळी ऊन तोंडावर आल्याने जाग आली. बाहेर मी जागा झाल्याची चाहूल तिला लागली. मित्र कामानिमित्त बाहेर गेला होता. कसेबसे हास्य तोंडावर आणीत तिने गरम कॉफी करते म्हणून सांगितले. मी वर्तमानपत्र चाळत बसलो होतो. कॉफीचा एक कप माझ्या हातात देत तिचा कप घेऊन ति समोर सोफ्यात बसली, नजारा केविलवाणा होता. तिला खूप काही सांगायचे होते, मला पण समजून घ्यायचे होते. माझा प्रश्न होता मीच का ? शेवटी काय - नशीब माझे.
नशीब माझे - भाग – १३ 10/5/09
तो गोड लडिवाळ आणि हा केविलवाणा नजारा, हा २४ तासांत घडलेला फरक मी समजवून घेण्याच्या प्रयत्नात होतो. तिने एकेक कोडी उलगडायला सुरुवात केली. दैनंदिन रटाळ वाटणार्याम दुनियेत ह्या कलाकार मित्राची ओळख तिला आकर्षक वाटली होती. त्याने दिलेले शृंगाराचे धडे व त्यातून शरीर सुखाचे प्रयोग करणे फार धाडसी वाटले होते. पुढे त्या प्रयोगांची भूक वाढली. आजूबाजूच्या मंडळीत चर्चा सुरू झाली. शेवटी व्हायचा तो परिणाम झालाच. परिणाम टाळणे त्याच्या पुरुषार्थाला मान्य नव्हते. मुलगी जन्माला आली. हा कलाकार ढसढसा रडला होता. कारण फारच हास्यास्पद होते. पहिला मुलगाच असेल अशी लावलेली पैज तो हरला होता.
गावठी दारू पिणे सुरू झाले, त्या नशेत शारीरिक जोर जबरदस्ती सुरू झाली. हिचा विरोध मोडण्या करता ह्याने बाहेर बायका शोधल्या होत्या. त्या रात्रीचा दारूचा वास, ती जोर जबरदस्ती, त्याचा अर्थ मला समजला. त्या शारीरिक जखमा मला जास्त स्पष्ट दिसल्या. केविलवाण्या नजार्याहचा अर्थ समजला होता, पण तो गोड लडिवाळ नजारा काय होता ? तिने कॉफीचे कप गोळा केले, आंत जाऊन तोंड डोळे पुसत ती बाहेर आली. माझ्या शेजारी थोडे अंतर ठेवून बसली.तिच्या कडे बघून मी चकीत झालो तो गोड लडिवाळ नजारा घेऊन ती जवळ येऊन बसली होती. कलाकाराची बायको चांगलीच नटी होती. तिने त्या ध्वनी फीत रात्रीचे स्पष्टीकरण जास्त नमकीन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो प्रयोग त्या आधी बर्या चवेळा यशस्वी झाला होता. पण ह्या वेळचा आनंद हरवलेला नवरा परत सापडल्याचा होता. म्हणून त्या खुशीत त्या सकाळी माझे आभार मानण्या करता तिने तो नजराणा पेश केला होता. " पण तू अगदीच अरसिकता दाखवलीस" म्हणत मला चिमटा घेतला. ति तुम्ही वरून तू वर घसरली होती, मी मात्र अजून तुम्हीची मर्यादा पाळून होतो. त्या अदाकारी पासून सावध होतो.
त्या रात्री पुन्हा तो कलाकार बाहेर निघून गेला. तिला त्यांच्या शारीरिक प्रयोगांचे वर्णन करण्याची संधी मिळाली. त्या सगळ्याचा आता मला त्रास होऊ लागला होता. मी तसे तिला सांगितले. उलट तिने चूक माझी दाखवली, " मला सांग तुला पुरुषी भावना नाहीत का ? मी चिडलो " तुला शंका असेल तर तूच चाचणी कर, कारण ह्यात पकडला गेलो तर नुकसान माझे आहे हे नक्की ! " ति चिडून आंत निघून गेली. (एवढेच लिहिण्याचे तारतम्य मला आहे. धाडसी वाचकांनो माफ करा.)
ती रात्र कशीबशी मी तिथे काढली. दुपारी जेवणानंतर त्या दोघांचे आभार मानीत मी तिथून पळ काढला. कंपनीत इतर सहकार्यांथना झाल्या प्रकाराची थोडक्यात माहिती दिली व त्यांना सावध केले. कदाचित माझी कलाकाराबरोबर हाणामारीची शक्यता असल्याची कल्पना दिली. पुढे काही दिवस त्या नटीचे फोन मला आले. मी त्यांच्या घरी जाणे टाळले. पण तिला व तिच्या मुलीला सार्वजनिक जागी भटकायला घेऊन गेलो होतो. शेवटी अपेक्षित घडले, कलाकार हातोडी घेऊन मला मारायला धावला. त्याचा हात वर जाताक्षणी त्याच्या नाकावर मी जोरात बुक्का हाणला. त्याचा तोल गेला बरळू लागला. बाजूच्या बघ्यांनी त्याला सावरले व चुपचाप घरी जायला सांगितले.
हे सगळे एक एक अनुभवलेले प्रसंग मी लिहून ठेवतो आहे. प्रत्येकाने कुवती नुसार त्यांची चिरफाड करावी. अहो ह्या प्रसंगा नंतर मी फार बदललो. मी नशीब माझे म्हणणे सोडून दिले. आता - नशीब त्यांचे.
नशीब त्यांचे - भाग १४ 10/8/09
बॅंकेत नोकरी होती म्हणून एकाने मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम जुळवून आणला होता. मी तर फक्त एसेस्सी होतो. ति वाणिज्य विषयात दुसर्याी वर्षाला महाविद्यालयात शिकत होती. त्याचे मला कौतुक मुळीच नव्हते, मला शिकवलेल्या पेक्षा शिकलेली व्यक्ती जास्त मोलाची होती. जमलेल्या मंडळींनी माझे शिक्षण, पगार, राहती जागा वगैरे प्रश्न विचारले व त्यावर विनोद सुरू होते. त्यांच्या विनोदात सहभागी होत मी पण विचारले होते, माहिती जीला लग्न करायचे होते तिच्या करता होती की माझे "माप" काढण्याचा प्रकार होता. मी जमलेल्यांना बाहेर जाण्याची विनंती केली होती, मुलीला एकटी बसवून विचारले होते, " आईबाबांच्या दबावा मुळे इथे आहेस की तुला मनापासून जोडीदार शोधावा आणि त्याच्या बरोबरीने पुढील वाटचाल करावी असे ठरवले आहेस ?" तिने एका तुटक वाक्यात सांगून टाकले होते, "आईबाबांच्या दबावा मुळे."
मी तिच्या समोर कोपरापासून हात जोडत तिचे आभार मानले होते. बाहेर जाऊन जमलेल्यांना स्पष्ट सांगितले होते " अहो तुमच्या मुलीला लग्न म्हणजे काय ह्याची माहिती द्या, त्यातच तुमचे आणि तिचे भले होईल." नशीब त्यांचे मी त्यांना फसवले नव्हते. असेच काहीसे बर्यााच वेळा घडले. योगायोग बघा आज माझ्या मोठ्या मुलाच्या बाबतीत त्याचीच पुनरावृत्ती होते आहे. वडिलधारी मंडळी बाजारात कांदेबटाटे निवड करण्यासारखे प्रश्न विचारीत येतात व न बोलता दुसर्याा दुकानात शोधायला निघून जातात. मुलाला कोण साथी मिळणार ह्याची उत्सुकता अजून कायम आहे.
असो, बॅंकेची नोकरी सोडून एका कंपनीत गेलो १९७६. प्रथम वयस्क मालकाशी बोलणी झाली. त्याचे प्रश्न विचारणे संपल्यावर मी प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली, त्याने दिली. मी विचारले होते १ - त्या कंपनीत कामगारांची उलाढाल कशामुळे, किती असते ? २ - मला काम देण्या इतके काम आहे का ? ३ - दिलेल्या वेळेच्या आंत काम पूर्ण केल्यास दुसरे काम माझ्या करता मिळे पर्यंतच्या वेळात मी कामा संबंधीचे वाचन करू शकतो का ? तो थोडा वेळ माझ्या कडे बघत बसला होता. आजपर्यंत असे प्रश्न त्याला कोणी विचारले नव्हते. त्याने योग्य ती उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला एका प्रश्नाचे माझे खरे उत्तर ऐकायचे होते. मी असे प्रश्न विचारण्याचे धाडस का केले होते. "मी पगार देणार्याा मालकाचा नोकर नाही. माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळवणे एवढेच नाते आणि उद्देश." माझ्या उत्तराचे त्याला कौतुक वाटले होते.
जेवढा पगार देणे त्याला शक्य होते तेवढेच काम त्याने मला देण्याची व्यवस्था केली. जेव्हा माझ्या कामात कोणी ढवळाढवळ केली, तेव्हा त्याने पुढे येऊन मदत केली होती. इतरांच्या कामाची ओळख करून घेणे माझा छंद होता त्यामुळे एकदा एका मोठ्या प्रकल्पाला दोष सूचक गजर ( फॉल्ट आलार्म ) जरुर भासली, मी ते साधन काही तासात, दुसर्याा कामात वापरात असलेल्या भागांची जुळणी करून बनवून दिले, पुढे एक अधिक सोय म्हणून ते साधन प्रत्येक मशीनाला अविभाज्य भाग म्हणून जोडण्यात आले. दुसरा मोठा प्रकल्प काही कारणा करता रेंगाळला होता. सगळी यंत्र साधने वेगवेळी केली की अपेक्षीत काम करीत होते. परंतु एकत्र जोडली की काम थांबायचे. जुळणी विभाग प्रमुखाने दोष माझा असल्याचे मालकाला सांगितले होते. दूरवर पसरलेल्या हजार बाराशे तारांचा शोध व जुळणी आमच्या तिथल्या गुरख्याच्या मदतीने मी पूर्ण केली होती. त्या करता मी दोन बारके विजेचे दिवे वापरले होते. एक दिवा माझ्या हातात होता दुसरा त्या गुरख्याच्या हातात होता. तारांच्या संचाच्या (४१ तारांचे आरमर्ड केबल) क्रमांकानुसार संचाच्या कवचाला दिव्याची तार जोडून दिव्याची दुसरी तार मी संचातील एका तारेला जोडायचो त्यावर नकाश्यात दाखवलेला क्रमांक चढवायचो. तिकडे तो गुरखा तसेच करीत असे. दिवा लागला की एक क्षण थांबायचे मग त्याने तीन वेळा दिवा चालूबंद करायचा, ह्याचा अर्थ हवी असलेली तार सापडली. मी दोन दिवसात ते काम पूर्ण केले होते.
प्रकल्प रेंगाळल्यामुळे कंपनीला दर दिवशी हिशोबाने खूप मोठे नुकसान सोसावे लागत होते. मी, मालक, जुळणी विभाग प्रमुख व प्रकल्पाचा नकाशा बनवणारा मुख्य अधिकारी सगळे एकत्र जमलो, मला तारांचा शोध कसा घेतला ह्याचे प्रात्यक्षिक दाखवावे लागले. काम तंतोतंत असल्याची कबुली प्रत्येकाला द्यावी लागली. मग दोष कसा शोधणार ह्यावर वादावादी सुरू झाली. मी मालकाची माफी मागितं सांगितले, मी इंजिनिअर नाही पण अनुभवी आहे. नियंत्रण तारसंच व माहिती शोधक तारसंच नकाश्यात दाखवल्याप्रमाणे एकत्र बांधले होते, ते वेगळे करून दोन्ही तारसंचातील अंतर जास्त वाढवल्यास हा दोष काढता येईल असे सुचवले. त्या प्रमाणे एका यंत्र साधनावर प्रयोग झाला. अपेक्षित कार्य सुरू झाले. माझे तोंड भरून कौतुक झाले. पण एक पैसा बक्षीस किंवा पगार वाढ झाली नाही. दोषारोप, भांडणे झाली. मी नोकरी सोडली. पण एक चांगली संधी मिळाली. माझा आत्मविश्वास वाढला. शेवटी - नशीब त्यांचे.
प्रतिक्रिया
23 Dec 2009 - 1:24 am | प्राजु
मी ही पाहिले..
पण आपले लेखन संपादन मध्ये दिसते आहे. तेच मी दुसर्या खिडकीत कॉपी पेस्ट करून प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पण ते ही होत नाहिये.
यात घातपात नक्कीच नाहीये, आम्ही आमच्याकडून लेख प्रकाशित करण्याची धडपड करत आहोत. निलकांतशीही बोलावे लागेल या बाबतीत.
लेख दिसतो आहे आता.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
23 Dec 2009 - 1:29 am | विकास
मी ते कापून गमभन मधे घेतले आणि तिथे परत सिलेक्ट करून इथे चिकटवले! आता दिसत आहे...
फक्त हा दुवा दिसत नाही आहे: नशीब भाग ७,८,९ एकत्रित :?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
23 Dec 2009 - 2:02 am | विनायक रानडे
मनापासून आभार तुम्हा प्रत्येकाचे, सकाळपासुन कितीदा प्रयत्न केले, काही कळेना असा मी काय गुन्हा केला. . .
23 Dec 2009 - 2:25 am | प्राजु
क्वाईट इंटरेस्टींग. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
23 Dec 2009 - 10:40 am | jaypal
लेख माला आवडली
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Dec 2009 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
24 Dec 2009 - 12:03 pm | sneharani
मस्त लिहलयं!