कॉलेज कट्टा- भाग १

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
24 Oct 2009 - 5:08 pm

"ए बैला उठ ना. त्या कुलकर्ण्याचं लेक्चर आहे. उशीर झाला तर अटेंडंस लावणार नाही तो." मी शर्टची बटणे लावत सचिनला उठवण्याचा असफल प्रयत्न केला. "तु जा रे. झोपु दे मला आणी जाताना फॅन वाढव" सचिन तोंडावर पांघरुण ओढत म्हणाला. रुपेशच्या बाईकचा हॉर्न वाजला आणी मी तिसर्‍या मजल्यावरुन घाईने खाली आलो. "सच्या कुठाय रे?" रुपेशचा नेहमीचा प्रश्न. "पडलाय उतानी करुन" माझे ठरलेले उत्तर. "आणी बाकीचे?" - रुपेश. "असतील चहाच्या टपरीवर. चल लवकर. चहा घेऊन निघू."

सचिन, मी (शेखर), वैभव आणी तुषार चौघे रूम पार्टनर. ७-८ महिन्यापुर्वीच ईंजीनीयरींगला अ‍ॅडमिशन घेऊन पुण्यात आलेले आणी रुपेश, विजय, किरण आणी अजुन काही त्यांचे पुण्यातच स्थायिक असलेले मित्र. पहिल्या सेमीस्टर मधे सर्व व्यवस्थित पास झाल्याने आत्मविश्वास वाढलेला आणी चांगले मित्र मिळाल्याने सगळ काही मजेत चालु होतं.

"शेखर्‍या, तुझा टाय दे ना मला. एच ओ डी चं लेक्चर आहे आमचं. साला बाहेर तर हाकलतोच पण पुरी ईज्जत काढुन" - तुषार.
"केळ्या, तु सुधरणार नाहीस. धर" - मी.
"अरे नॉट बांधुन दे ना." - तुषार
"आयच्या गावात. भो....च्या, सकाळी धुवायला पण शेखर्‍याला बोलवतो का रे तु?" - रुपेश.
"तू चहा पी रे बेवड्या. चायला तोंड उघडलं की गटार" - तुषार

"चल बाबा लवकर". मी गरम चहा घशात ओतत रुपेशला म्हणालो. गाडी पार्क करुन वर्गापर्यंत पोहोचायला व्हायचा तो उशीर झालाच. त्यात कुल्क्या (आदरणीय कुलकर्णी सर) वेळेचा एकदम पक्का. बरोबर ८ च्या काट्याला साला वर्गात हजर. कधी आजारी पडत नाही आणी सुट्टी सुद्धा घेत नाही अशी साहेबांची ख्याती. वर्गात कुणी नसेल तर रिकाम्या वर्गाला शिकवण्याचा पराक्रम सुद्धा करुन झालेला.

"या, आलात. उपकार केलेत. तरुण मुलं तुम्ही. पहाटे उठुन योगासनं करावीत.जाऊ दे. बसा, पण हजेरी लावली जाणार नाही." - कुल्क्या
"चायला ज्यासाठी आलो तेच काम होणार नाही, ह्याच्या बकवास लेक्चर मधे ईंटरेस्ट आहे कुणाला?" - मी रुपेश च्या कानात पुटपुटलो.
"ते सोड रे दिप्ती काय दिसते बघ आज. आयला ही पोरगी जर मला पटली ना तर फाईव स्टार मधे पार्टी देईन" - दिप्तीला बघता येईल असा अँगल पकडुन रुपेश बेंचवर बसत मला म्हणाला.
"हमम्म्मम.. आज काय मग पिंक का व्हाईट?" - मी रुप्याला कोपर मारत विचारलं
"व्हाईट" - रुप्या म्हणाला आणी दोघेही खिंकाळलो. दिप्तीने कसं काय माहित पण वळुन आमच्याकडे पाहिलं आणी आम्ही गप्प झालो.

रुपेश. मध्यम बांध्याचा, थोडा गरम डोक्याचा आणी शिव्यांची खाण असलेला बहाद्दर ह्याच्या तोंडी कोणी लागत नसे. वडील बागायतदार, चांगली आर्थिक परिस्थिती पण राहणीमान शेतकर्‍यां सारखच. रुपेशकडुन एक गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे दोस्ती आणी दिलदारी. वेळ आली तर अंगावरचे कपडे काढुन देईन ईतका दिलदार.

सचिन. आयुष्यात ह्याच्यासारखा आळशी आणी निष्काळजी माणुस पाहिला नव्ह्ता. निद्रादेवी तर जरा जास्तच प्रसन्न होती साहेबांवर. १६ तास, १८ तास झोपण्याचे काही विक्रम ह्याच्या नावावर आहेत. पण सिनेमा म्हंटलं की हा चित्ता व्हायचा. गेल्या आठ महिन्यात आलेले सर्व सिनेमे पाहुन झाले होते आणी घरी सीडी चा ढिग लागलेला. मुळचा मुंबईचा पण पुण्यात अ‍ॅडमिशन का घेतली तर घरचे झोपु देत नाहीत आणी सारखं काम सांगतात म्हणुन. कारण न पटण्यासारखं असलं तरी हेच खरं होत. वडील माध्यमिक शिक्षक, रत्नागिरी कडे थोडीसी शेती, घरची परिस्थिती बर्‍यापैकी. सचिन गणितात एकदम हुशार आणी लॉजिक मधे सुद्धा. अवघड गणिते आणी कंप्युटर प्रोग्रॅम सुद्धा ह्याचे गुलाम.

वैभव - एकदम साधा, सरळ्मार्गी आणी शांत माणुस. थोडा विसरभोळा. कुणाच्या अध्यात ना मध्यात. चांगल्या बाईक, कपडे, सिनेमा कशाचं क्रेझ नाही, हेवा नाही. साधेपणा ठासुन भरला होता ह्याच्यात. हा दुसरा महात्मा गांधी होणार असे सगळे म्हणायचे. गुड बॉय जरी असला तरी आमच्यासारख्यांची साथ त्याने कधी सोडली नाही. उलट कॉलेजात नेहमी मदतच करायचा सर्वाना.

तुषार - तुषारला वडील नव्हते. पण परिस्थितीतुन तावुन सुलाखुन निघालेला असल्याने एकदम आत्मविश्वासी आणी आव्हाने पेलणारा. ह्याला गाड्यांचे ज्ञान फार. जगातल्या कोणत्याही गाडीची कसलीही माहिती विचारा. भयानक गाडीप्रेमी. गाडीचा विषय निघाला की एकदम वेडा व्हायचा आणी हजार वेळा सांगुन झालेली माहिती पुन्हा एकदा ऐकवायचा. "एक दिवस नक्की बी एम डब्ल्यु घेईन" असे नेहमी म्हणायचा. त्याच व्यक्तीमत्त्व प्रभाव पाडणारं होतं.

मी - शेखर. तर मी मुळचा नाशिकचा. वडील एका खाजगी कंपनीत कामाला. मुलाने ईंजीनीयरींग करुन आयटी मधे नोकरी मिळवावी अशी आई वडिलांची ईच्छा. ती पुर्ण करायला मी इथे येऊन पडलो होतो. रुममधे माझं थोडं वर्चस्व होतं कारण रुमची बरीच कामे मीच करायचो. ईलेक्ट्रिसिटी बिलापासुन भाडं देण्यात उशीर झाल्यावर घरमालकाला पटवण्यापर्यंत.

कॉलेज नविन असल्याने हॉस्टेल नव्हतं म्हणुन बाहेरच एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. ईंजीनीयरींगची सुरुवात तर चांगली झाली होती, पण सरळ मार्गी होईल ते कसलं अभियांत्रिकीचं शिक्षण? ;)

एका दिवशी आमचे दोन सिनियर ज्यांना कॉलेजचे गुंड म्हणता येईल, अचानक रुमवर आले. दोन दोन बीयर डाउन होते. आमची त्यांच्याशी चांगली ओळख होती पण ते रुमवर पहिल्यांदाच आले होते.

"आज माझा वाढदिवस आहे, चला पार्टीला. हॉटेल सह्याद्री मधे." - एक सिनियर साहेब म्हणाले.
हॉटेल सह्याद्री म्हणजे अट्टल बेवड्यांचा अड्डा. नको नको म्हणत आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार झालो

क्षमस्व पण क्रमशः
डिस्क्लेमरः ह्या कथेमधे सर्व पात्र काल्पनिक आहेत. कथा असभ्य वाटु शकते पण शक्य तितका सजीवपणा आणण्यासाठी हे करणं भाग होतं. कथेतील भाषा आणी शिव्यांच्या वापराबद्दल क्षमस्व.

आपला मराठमोळा

कथा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Oct 2009 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते

जमतंय. पुढच्या भागाची वाट नक्कीच बघायला लावताय...

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

24 Oct 2009 - 8:49 pm | टारझन

लेका मराठमोळ्या ...
इतका एव्हरग्रीन विषय निवडला .. किमान सुरुवात तरी धडाक्यात करायची ? बरं पात्रांची नावं प्रॉपरली मॅक्स एकदाच यायला हवी होती, सच्या,वैभ्या , तुषर्‍या .. इत्यादी अधीक चांगलं वाटतं .. आपला तात्या नाय का आजोबांना म्हातार्‍या म्हणतो ? त्यात असतं ते प्रेम.

असो .. आमच्या कुलकर्णी मास्तरला आम्ही कुल्ल्या म्हणायचो .. :) चिदांबरला चिद्दु .. आणि पुरी मॅडम ला ..... असो .. सगळ्यांचीच टोपणं असतात ! तोच खरा कॉलेजकट्टा !!

थोडक्यात अपेक्षाभंग झाला आहे, नकारात्मक प्रतिक्रिया ह्या साठीच की नेक्स्ट भाग भारी लिहाल ... आणि नक्कीच लिहू शकता आपण .. विश्वास आहे .

--(कॉलेजचा) कॅफेटेरिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

मराठमोळा's picture

26 Oct 2009 - 5:01 pm | मराठमोळा

टारझन,

थोडासा खुलासा..
>>इतका एव्हरग्रीन विषय निवडला .. किमान सुरुवात तरी धडाक्यात करायची ?

पहिल्यांदाच घराबाहेर पडलेली कथेतली ही मुले आता कुठे बाहेरचं जग बघताहेत. सगळ्या गाड्यांचा पिक अप सारखा नसतो ;)

>>>>थोडक्यात अपेक्षाभंग झाला आहे.
हरकत नाही. वेट अँड वॉच. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्रभो's picture

24 Oct 2009 - 5:27 pm | प्रभो

वाचतोय...येऊद्या

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया's picture

24 Oct 2009 - 7:06 pm | अवलिया

कुलकर्णी मास्तरला कुल्ल्या असं सभ्य नावाने हाक मारायची सोडुन कुल्क्या काय ? छ्या ! पुचाट गृप तुमचा !

असो, व्हाईट पिंक पर्फेक्ट... चालु द्या !
पूढचा भाग लवकर नाही आल्यास... काय घंटा करणार आम्ही ? येवु द्या तुमच्या सवडीने.

आमचा प्रतिसाद कालिजात शिकणे आणि शिकवणे या पलीकडे काही असते हे माहीत नसणा-या लोकांना असभ्य वाटेल पण त्याला आमचा इलाज नाही.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सूर्य's picture

24 Oct 2009 - 7:08 pm | सूर्य

मराठमोळ्या, आन दे जल्दी से..

- सूर्य.

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

3 Nov 2009 - 9:47 am | अमित बेधुन्द मन...

विसरलास का रे पुढ्चा भाग टाक कि लवकर