भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ५..बुवा / स्वामी / महाराज व्हा

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
18 Sep 2009 - 9:48 am

भडकमकर मास्तरांचे करिअर गायडन्स वर्ग
अमुकतमुक बाबा/स्वामी/महाराज/मा /माता/अम्मा/ताई व्हा ------

या पूर्वीचे करिअर गायडन्स वर्गाचे धागे...
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग १ ...भंगडा पॉप आर्टिस्ट व्हा ...
http://www.misalpav.com/node/1425
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ...
http://www.misalpav.com/node/1451
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा...
http://www.misalpav.com/node/1560
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग ४ ...वसुली एजंट व्हा ...
http://www.misalpav.com/node/7995

वय लिंग भाषा शिक्षण जाती धर्म या कश्शाकश्शाचा अडसर नाही. या कोर्सला कोणीही ऎडमिशन घेऊ शकतो.
बुवाबाजी ही जातीधर्मापलिकडची फ़ार महत्त्वाची व्यवस्था आहे... आमच्या कोर्समध्ये सर्व प्रकारचे सर्व धर्मासाठी बुवा बनायचे शिक्षण दिले जाईल..
रूटीन हिंदू अध्यात्मिक टाईप किंवा मुस्लिम दर्गा टाईप किंवा ख्रिश्चन रोगनिवारण टाईप हे तीन प्रकार फ़ेमस आहेत. बाकी काही स्पेशल प्रकार शिकायचे असतील तर वेगळा आकार द्यावा लागेल.
शिक्षण : अत्यावश्यक नाही.
मात्र शहरी मध्यमवर्गीयावर छाप पाडण्यासाठी काही डिग्र्या विकत मिळवून देऊ...
मात्र अपेक्षित भक्तगणांप्रमाणे तुम्हाला बुवाबाजीची धोरणं ठरवावी लागतील .. कोणता धर्म, चमत्कार वगैरे माफ़क प्रमाणात शिकवू.... म्हणजे मोकळ्या हातातून पाहतापाहता उदी,अंगठी काढणे असले प्राथमिक चमत्कार शिकवले जातील...
( क्लासचा वैधानिक इशारा : चमत्काराच्या चकव्यात फ़ार अडकू नये. ते व्यवसायासाठी धोकादायक ठरू शकते), आम्ही बोलबच्चनगिरीवरच अधिक भर देतो. ते सेफ़ असते.

ज्ञानेश्वरी, गीता पूर्ण वाचायची अजिबात आवश्यकता नाही . काही महत्त्वाचे मुद्दे माहित असले की झालं.
प्राथमिक तत्त्वज्ञान , धर्म म्हणजे काय?उपनिषदे वगैरेच्या नावाखाली काहीही खपून जाते हे एक सामान्य निरीक्षण...
शिवाय " जास्त विचार न करता तू मला शरण ये ; म्हणजे मी तुझे अध्यात्मिक कल्याण करीन.. हा भवसागर तरून जायचा असेल तर तुला मी आणि फ़क्त मीच वाट दाखवू शकतो. तुला तुझ्या दैवानेच माझ्याकडे दीक्षा देण्यासाठी पाठवले आहे" इतकेच भक्ताच्या गळी उतरवले म्हणजे झाले...

भाषणबाजी: उत्तम बुवा बनण्यासाठी अतिप्रगत मेंदू किंवा हुशारी लागत नाही. कितीही मठ्ठ माणूस उत्तम बुवा बनू शकतो हे आमच्या क्लासमधल्या कित्येक विद्यार्थ्यांनी देशभर सिद्ध केले आहे. आणि गेल्या वर्षी झालेल्या क्लासच्या मेळाव्यात त्यांच्या यशाचे श्रेय क्लासच्या भाषणबाजी तंत्राला असल्याचे एकमुखाने मान्यही केले आहे.

एकनिष्ठ भक्तगण :

भक्तगण गोळा करणे हा मुद्दा बुवाबाजी शिकण्यातला सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. टार्गेट ठरवून त्याप्रमाणे ऎक्टिव्हिटी सुरू करणे आवश्यक असते.
बाबा कोणत्याही प्रकारचा असो , नेहमीचा अध्यात्मिक टाईप असो, वैज्ञानिक टाईप असो,निसर्गोपचार टाईप असो, आयुर्वेदा- योगा टाईप,वास्तुशास्त्र टाईप. यज्ञयाग टाईप असो, एकदा भक्तगण भजनी लागले की चिंता नसते. .. काही शंकेखोर प्रश्नकर्त्यांचे तोंड भक्तांकडून परस्पर बंद केले जाते, आपण फ़क्त मौनव्रत धारण करायचे.
दु:खी , संकटग्रस्त , कर्जबाजारी, स्वत:च्या किंवा कुटुंबियांच्या आजाराने गांजलेले, मूल नसलेले किंवा अतिमुलं असलेले , दरिद्री, अतिश्रीमंत सर्व प्रकारचे भक्तगण प्रथम जमवायला हवेत .एकदा भक्ताने तुम्हाला आपला मानले की सारासार विचार आणि विवेकबुद्धी आपोआप संपते, ही गोष्ट या व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक...

भक्तांना विशिष्ट रंगाचे कपडे, माळा, दोरे, ताईत , बिल्ला पेन मंत्र अशा वस्तू वापरायला लावणे.त्यातून एकजुटीची भावना निर्माण होते, सवय होते, वातावरण भारले जाते,सतत प्रवचनाच्या / उपासनेच्या माध्यमातून ब्रेनवॉशिंग, कंडिशनिंग चालू ठेवायला लागते.. तुम्हीच त्यांचे तारणहार , जणू ईश्वरी अवतारच हे त्याच्या मनावर बिंबवायला हवे. अशी बुद्धीहीन, कष्ट न करता यश हवे असलेली आळशी आणि निरुद्योगी माणसे या व्यवसायातले महत्त्वाचे सैनिक बनू शकतात. अशा भक्तांना मग भास भ्रम व्हायला लागतात, निरनिराळे सुवास यायला लागतात, गोड चव जाणवते, घंटा / आरती ऐकू यायला लागते, काही सुदैवी भक्तांना तर बाबाच देवाच्या रूपात दिसायला लागतो,... सुरुवातीच्या काळात असे भक्त वाढवण्यावर लक्ष हवे. हे लोकच आपली प्रचंड जहिरात करतात. बाबांचे गेल्या जन्मातले चमत्कार यावर काहीही अफ़वा पसरवतात. ( सुरुवातीच्या काळात या अफ़वा फ़ायदेशीर ठरतात, पण त्यावर फ़ार अवलंबून राहू नये.)

काही भक्तगण इतके भजनी लागतात की अविश्वासू माणसाला म्हणतात ,"बुवांनीच तुम्हाला अशी कल्पना दिली असणार ज्यामुळे तुम्च्या माध्यमातून बुवा आमची परीक्षा घेत असणार.. स्वामी महाराज की जय!"

ग्रामीण :

सुरुवात आडबाजूच्या दूरच्या एखाद्या देवळात भगवे कपडे घालून राहायला जावे... मौनव्रत, ध्यान , सूर्योपासना, यज्ञ वगैरे लक्षवेधी प्रकार करावेत... हळूहळू लोक भोवती जमतातच. त्यांच्यावर गोलगोल भाषणबाजी करून भोंगळ मार्गदर्शन करावे. कोणतेही कमिटमेंट करू नये.
देऊळ / मठ स्थापना कोणत्यातरी एस्टाब्लिश्ड परंतु सध्या मृत असलेल्या बुवा / बाबा / माता इ.इ. चा आपण अवतार आहोत अशी दवंडी पिटावी.... त्याच्या फोटोवर आपला फोटो मॉर्फ करून फोटो तयार करावेत. भक्तांना टोप्या, बिल्ले वाटावेत. किंवा कोण्या देवाचाच आपण अवतार आहोत असे मानावे.
उत्सव / वारी : लोकांना तुम्ही सातत्याने दिसला पाहिजे. त्यासाठी प्रसंग निर्माण करता आले पाहिजेत. रोजचे भजन, प्रवचन किंवा दर गुरुवारी समस्यानिवारण , दर पौर्णिमेला यात्रा..
वाहतूकव्यवस्था : आता ही यात्रा दूर ग्रामीण भागात असेल तर त्यासाठी वाहतूकव्यवस्था लागते, तर आपाप्ल्या शिष्यगणांच्या ट्रॅक्स, सुमो, टेम्पो, बस यांचा व्यवसाय त्यातून वाढीला लागू शकतो. शिवाय हे वाहतूकवाले आपली जहिरात करत राहतात ते वेगळे.
आनुषंगिक व्यापार : यात्रेच्या निमित्ताने मठाजवळ नारळ हार फ़ूलवाले, तसबिरी बिल्ला फोटोवाले, वाहनदुरुस्तीवाले असे व्यवसाय तयार होतात, यात्रा सतत चालू राहणे त्यांच्या व्यवसायासाठीही आवश्यक असते. तेही त्यासाठी भक्तांकडे आपली जाहिरात करत असतात.
अर्थव्यवस्था. ट्रस्ट वगैरे. : तसाही मठाला पैसा हिशोब कर असे काही नियम लागू करून घ्यायचेच नसतात. या मिळणार्‍या पैशांतून सेवकांची ( काही नतद्र्ष्ट लोक त्यांना गुंड म्हणतात) सेना बाळगता येते.. बेशिस्त भक्तांवर थोडासा ( सूक्ष्म !!) धाक आवश्यक असतोच ना...

शहरी :
शहरात तुलनेने सुशिक्षित / उच्चशिक्षित समाज जास्त असल्याने शहरात बुवाबाजी कमी चालते हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा.
शहरातही आपल्या धंद्याला प्रचंड स्कोप आहे.
प्राथमिक तत्त्वज्ञान तेच आहे फ़क्त मार्केटिंगसारख्या बाबींमध्ये फ़रक पडतो.

शहरी पीआर :
१. पुस्तक / प्रकाशनसंस्था : कोणत्याही विषयावर गोलगोल पुस्तके लिहिण्याचे तंत्र शिकवू.
२. नियतकालिक : स्वत;चे कौतुक, आणि सरकारला शिव्या देणारे नियतकालिक नेमाने काढावे.
३.प्रचारक : घरोघरी जाऊन लोकांना ज्ञान देणारे निष्ठावंत सेवक तयार करणे.
४. दूरदर्शन/ रेडिओ / पत्रकार असे मीडियात काम करणारे भक्तगण :
५. लोकल केबलचालकाशी लागेबांधे :
६. ऒडिओव्हिजुअल प्रचार. / फ़िल्म्स वगैरे.
७. स्वामींच्या प्रवचनांच्या आणि आरत्यांच्या सीडीज आणि कॅसेट्स
८. ट्रस्टची निर्मिती, ( कोठेही सही करू नये, लेखी करारमदार करू नयेत, मात्र ट्रस्टच्या सार्‍या नाड्या आपल्याच हातात ठेवाव्यात.त्यातर्फ़े जुजबी समाजसेवा, माध्यमे विकत घेणे चालू ठेवावे)...
९. मतांच्या आशेने लोक जमतात तेथे पुढारीही येतात आणि राजकीय पाठिंबा मिळवता येतो.

शिवाय हल्ली शहरी लोकांना नुसताच अध्यात्मिक बाबा पुरेसा वाटत नाही. त्याचा काहीतरी विशिष्ट यूएसपी लागतो. खालील काही विशिष्ट बाबागिरीची उदाहरणे दिली आहेत. त्यांची कॉम्बिनेशन्सही खूप इन्ट्रेष्टिंग होऊ शकतात.

अ.वैज्ञानिक हायटेक बाबा:
स्वत:च अंधश्रद्धा निर्मूलन करतो असे म्हणावे.
स्वत:ला विज्ञानमहर्षी, सायन्स बाबा,विज्ञानगुरु, विज्ञानानंद सरस्वती असली नावे घ्यावीत....
संस्थेची नावे विशिष्ट पद्धतीने द्यावीत..: सिद्ध योगिक सायन्स इन्स्टिट्यूट , सायंटिफ़िक ऍकॅडमी फ़ॉर योगिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट, कॉस्मिक एनर्जी रिसर्च सायन्स लॅबोरेटोरी,
सोसायटी फ़ॉर रिडंडंट एनर्जी फ़्लो स्टडी इन ध्यानचक्राज, रेडिएशन स्टडी इन्स्टिट्यूट फ़ॉर कुंडलिनी अवेकनिंग
इ.इ. अशी पुष्कळ नावे तयार करता येतात ज्यातून अर्थबोध काहीही होत नाही. ऊर्जा प्रक्षेपण, पॉझिटिव्ह एनर्जी,ऒरा , दिव्य प्रकाश, चेतासंस्थेची अजब दुनिया, दिव्य अनुभूती असे गोलगोल गोलगोल भरपूर बोलावे.पत्र्याच्या डब्यासारखी दिसणारी विविध दिवे लुकलुकवणारी यंत्रे संस्थेत बसवावीत, त्याखाली असेच गोलगोल विज्ञान लिहावे. स्वत:ला वाटेल ते अजब निष्कर्ष काढून ते सप्रमाण सिद्ध झाले आहेत असे आपल्याच नियतकालिकात १०० वेळा छापावे.
गोलगोल तत्त्वज्ञानाची पुस्तके लिहावीत. परामानसशास्त्र काय सांगते, असंअसं सांगते असं म्हणत वाट्टेल ते गोलगोल बोलावे. या गोलगोल बडबडीची विविध तंत्रे क्लासमध्ये सविस्तर शिकवली जातील.

ब.निसर्गोपचारवाला बाबा : काही शहरी जुनाट बरे न होणारे रोग घ्यावेत. पाच सहा महिन्यात मिळणारी एखादी डिग्री घ्यावी. ( किंवा अधिक खर्च करून आम्ही लगेच डिग्री देऊ)...
वर्तमानपत्रात आयुर्वेदावर गोलगोलगोल लेख लिहावेत. निसर्गोपचाराचं महत्त्व आणि ऎलोपॆथीला शिव्या घालाव्यात. प्रस्थापित वैद्यकीला जास्तीतजास्त शिव्या दिल्या की एकनिष्ठ भक्तगण तयार व्हायला मदत होते... रत्न थेरपी, चुंबक थेरपी, गायन वादन थेरपी, अभिनय थेरपी असली अनेक व्हेरिएशन लोकप्रिय असतात.

क.आसनवाला बाबा : योगावाले बाबा आता फ़ार झाले आहेत. ( मात्र हा धंदा अवघड. स्वत: आसने करून दाखवणे कठीण)... पण हा धंदा थोडा मॉडिफ़ाय केला तर या धंद्यालाही काही मरण नाही पण एक स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य टिकवण्यासाठी मग काहीतरी नवे शोधून काढणे आवश्यक आहे. उदा. आमच्या एका विद्यार्थ्याने ताएक्वोन्दो, ताइ ची, जुडो आणि भरतनाट्यम यातल्या मुद्रांवर आधारित आसनांची थेरपी शोधून काढली आहे... ती काही दिवसांतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

ड.यज्ञयागवाले बाबा : सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, अग्नीदेवाची पूजा, मंत्रांचे व्हायब्रेशन, विशिष्ट तुपाची आहुती, मंत्रभारित धूर यांच्या कॉंबिनेशनमुळे कॉस्मॉसमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, शिवाय आगीच्या ज्वाळा किती फ़ूट उंच गेल्या, यज्ञाने किती चौ.किमी. क्षेत्रफ़ळ भारित प्रेरित झाले, किती घनफ़ूट हवा शुद्ध झाली याचे वाटेटेल ते आकडे आणि इतर ट्रिक्स ट्रेनिंग क्लासमध्ये शिकवले जातील... याचे उपयोग विश्वशांती यज्ञ, दहशतवादमुक्ती यज्ञ, पाऊसपाडू यज्ञ, रोगनिवारक यज्ञ, स्वाईनफ़्लू मुक्ती यज्ञ असे अनेक इव्हेंट घेता येतील. ...
एक व्हेरिएशन म्हणून आमच्या क्लासच्या एका विद्यार्थ्याने दोन वर्षांपूर्वी उदबत्तीच्या कॉस्मिक एनर्जीवरती एक पेपर प्रेझेन्ट केला होता आणि बेस्ट इनोव्हेटिव्ह स्टुडंट ऑफ़ द इयरचं बक्षीस घेतले होते... ( क्लासने त्याला लगेच अमेरिकेला पाठवले. तिथे त्याच्या ज्ञानाचे चीज झाले.) सध्या हा "ट्रू इसेन्स नावाच्या इसेन्स स्टिक’स कॉस्मिक एनर्जी सायन्स रिसर्च लॅबच्या ग्लोबल विंगचा चीफ़ रिसर्च सायंटिस्ट आहे. त्याला काठमांडूच्या दिव्यशास्त्र अनुसंधान समिती या संस्थेचा विश्वशांती पुरस्कार दिला गेला आहे. हा पुरस्कार ( मिळवणारे लोक या पुरस्कारांना) प्रतिनोबेलच मानतात.अशा शिष्यांमुळेच आमच्या भडकमकर क्लासेसचे नाव तीन्ही लोकी दुमदुमत आहे, हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

.वास्तुशास्त्रवाले बाबा : लोकांना अज्ञाताची वाटणारी भीती हे कोणत्याही बुवाबाजीचे उत्तम हत्यार आहे. लोक कशालाही घाबरतात. धंद्यातले अपयश, कौटुंबिक कलह, मंदी हे काही मुख्य महत्त्वाचे मुद्दे... भिंती पाडा, टॉयलेट बदला, स्वयंपाकघर बदला, आरसे काढा, ठेवा,तोडा... शिल्पे बदला, मूर्ती बदला, विशिष्ट चित्रे, बाहुल्या, अंगठ्या, दोरे घरभर बांधा...
चेंडूतल्या गोलाकारामध्ये मोठी कॉस्मिक एनर्जी असते आणि त्यात्ली पॉझिटिव्हिटी ती घरात प्रक्षेपित करते, असं म्हणत एका वास्तुबाबाने एका उद्योगपती माणसाला गोलाकार चेंडूच्या आकाराच्या घरात राहायला लावले होते आणि घरात सगळीकडे चेंडू टांगायला लावले होते. ... आणि ऑफ़िसची इमारत एका मोठ्या अंड्याच्या आकाराची बांधायला लावली होती म्हणे.

फ़. तंत्रमंत्रवाले बाबा: रूटीन गंडेदोरे, ताईत, करणी, जारणमारण वगैरे प्रकार आता जुने झाले...आता आमच्या क्लासमध्ये ऍडव्हान्स्ड तांत्रिकमांत्रिक टेक्नॉलॉजी वापरून प्रेझेन्टेशन्स करायची फ़ॅशन आहे.... G लेव्हलच्या नरकामध्ये काही बलाढ्य विशिष्ट तांत्रिक आणि मांत्रिक राहतात , त्यांच्यावर मी मायक्रोलेव्हलवर ऍटॅक करून वॉर विन करतो , असे एक उत्तम प्रेझेन्टेशन आमच्या एका स्टुडंटने केले होते, तोही सध्या एक टॉपचा बाबा आहे.त्याच्याबरोबर आता पुष्कळ विद्वान लोक त्याला त्याच्या मायक्रोवॉरमध्ये मायक्रोसाथ देतात....

एक महत्त्वाची सूचना : हल्ली काही बुवाबाबा मंडळींनी ( आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी नव्हे) स्वत:च्या शारिरीक वासनापूर्तीसाठी या व्यवसायाकडे वळण्याचे ठरवले , त्यामुळे या व्यवसायाची खूप बदनामी झाली आहे... आमच्या क्लासमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांपैकी असे कोणी असतील की जे आबालवृद्ध स्त्री-पुरुष यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहायची इच्छा ठेवून क्लासला ऍडमिशन घेणार असेल तर आम्ही त्यांना वेळीच परावृत्त करतो. असले उद्योग आम्ही आमच्या क्लासमध्ये आजिबात शिकवत नाही. ... आमचे बुवाबाजी शिक्षण कोणत्याही गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन देत नाही.

ऎडव्हान्स्ड कोर्स :
फ़ार डीटेल्स सांगता येत नाहीत ..... थोडक्यात सांगतो. तत्त्व तेच, कॅनव्हास मोठा

१. माफ़क चमत्कार दाखवणे.
२. प्रचंड मोठा मठ उभारणे, विमानतळासहित काही विमाने आणि परदेशी उंची गाड्यांचा ताफ़ा बाळगणे
३. मोठमोठ्या राजकारण्यांशी लागेबांधे...
४.स्वत:चे टीव्ही चॆनल काढणे आणि रोज त्यावर लाईव्ह प्रवचन देणे.
५.जागोजागी सोन्याचे कळस असलेली, मार्बलची देवळे बांधणे,
६. परदेशी शिष्यगण / शिष्या बाळगणे.
७. परदेशात मठाची / आश्रमाची शाखा काढणे.
८. ट्रस्ट्च्या प्रचंड पैशांतून काही समाजोपयोगी कामे करणे.... हॉस्पिटल, शाळा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. वगैरे.
९. या कामांची प्रचंड जहिरात करणे आणि राजकारण्यांकडून सरकारी पैसा पुन्हा देणगी म्हणून मिळवणे.

अविश्वासू व्यक्ती : काही शंकेखोर मंडळी नाना प्रश्न विचारून भक्तांच्या मनात संदेह उत्पन्न करतात. अशा वेळी त्यांना बोलण्यात हरवावे आणि काही एस्टाब्लिश्ड पळवाटा शोधाव्यात. क्लासतर्फ़े त्याचे स्टडी मटेरियल दिले जाईल. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे:
१. हा श्रद्धेचा मार्ग आहे त्यामुळे चिकित्सा नाही., श्रद्धा असेल तर प्रचीती येइल.
२. विश्वास लागतो, श्रद्धेचा पुराव देता येत नाही.
३. कुठेतरी श्रद्धा ठेवावी लागते. ( तुम्ही आईन्स्टाईनला मागता का पुरावा?)
४.न दिसणार्‍या मनाच्या आजारांचा देता का पुरावा?
५.जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते.
६. तुम्हाला आमचा धर्म बुडवायचा आहे म्हणून तुम्ही आमच्या पाठी धावता आहात.
७.(शंकेखोर माणसाची जात शोधून काढावी ) ती जर तुमच्यापेक्षा वेगळी असेल तर जातिभेदामुळे द्वेषातून हे प्रकार होत आहेत असे म्हणावे.

आणि शेवटचा जालीम उपाय : असे प्रश्न विचारून तुम्ही भक्तांच्या भावन भडकावू नका, हे वाक्य म्हणताच विश्वासू भक्तसेनेतल्या मंडळींनी जाऊन शंकेखोरांवर शारीरिक हल्ला करण्याची व्यवस्था करावी.

इशारा :
बर्‍याचदा अननुभवी बुवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे कायद्याच्या कचाट्यात अडकतात, बिंग फ़ुटते, अटक शिक्षा इ.इ. चक्र मागे लागते.अशावेळी पोलिसांत ओळख, वकिलांच्यात उठबस,कायद्याचा माफ़क अभ्यास उपयोगी पडतो... शिवाय तुरुंगवास जरी झालाच तरी त्यातून डिप्रेस न होता पुढच्या वेळी चुका कशा टाळाव्यात याचेही मार्गदर्शन आम्ही करतो. ( मात्र आमच्या क्लासमधून पास होऊन गेलेल्या कोणासही आजपर्यंत तुरुंगवास भोगावा लागलेला नाही हे आम्ही आग्रहाने नमूद करू इच्छितो. )

बुवाबाजीचे हे फ़ार उत्कृष्ट करिअर आहे.

आमच्याच करिअर गायडन्स क्लास मधल्या इव्हेन्ट मॆनेजरचा कोर्स केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आणि स्वामीमहाराज कोर्सच्या अनेक विद्यार्थ्यांनी एकामेकांशी टाय-अप करून आपापले व्यवसाय देशाच्या कानाकोपर्‍यात नावारूपाला आणले आहेत. ( क्लासमध्ये आपल्याला त्यांची लिस्ट मिळू शकेल)...

भरपूर मान मिळवायचा, ऐश करत जगायचे, कसलीही जबाबदारी नाही, कामधंदा करायची आवश्यकता नाही आणि भरपूर कमवायचे शिवाय टॅक्स नाही,.. अहाहा काय सुंदर करियर आहे, कोर्स सुरू होताच ऍडमिशन फ़ुल्ल होणार... तेव्हा त्वरा करा, वाचताक्षणी आपली नावनोंदणी खालच्या मोकळ्या जागेत करा आणि आपली जागा निश्चित करा.

वावरविनोदप्रकटनविचारमत

प्रतिक्रिया

सहज's picture

18 Sep 2009 - 10:08 am | सहज

आपला देश व आपली संस्कृती व सर्वधर्मसमभाव यांचा प्रत्येक निरुपणात, प्रचार कार्यात उल्लेख केला की तुम्ही जगभर शाखा उघडू शकता!

आणि हो, शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी श्री श्री श्री भडकमकर महाराज की जय!!!!!!

मराठमोळा's picture

19 Sep 2009 - 6:12 pm | मराठमोळा

>>आपला देश व आपली संस्कृती व सर्वधर्मसमभाव यांचा प्रत्येक निरुपणात, प्रचार कार्यात उल्लेख केला की तुम्ही जगभर शाखा उघडू शकता!
आणि हो, शिक्षणसम्राट, शिक्षणमहर्षी श्री श्री श्री भडकमकर महाराज की जय!!!!!!

+१ सहमत आहे.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मा. श्री^३. गुरूजी भडकमकरशास्त्री यांसी,
साष्टांग प्रणिपात,

शहरी - विशेषतः उच्चवर्गीय मुमुक्षुंसाठी आवश्यक असणार्‍या गुरूंसाठी विशेष प्रशिक्षण उपलब्ध आहे काय? नसल्यास त्या प्रशिक्षणाचाही अंतर्भाव व्हावा. (अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स अर्थात उच्च प्रशिक्षणातील मुद्द्यांमध्ये भांग,चरस, अफू,गांजा, एलेस्डी, कोकेन इ. पदार्थांच्या सेवनाने होणार्‍या उन्मुक्त समाधी भावनेचा उल्लेख आढळत नाही. तसेच 'याच्यातून तिच्याकडे' किंवा 'गुह्येंद्रियांतून गुह्यज्ञान' अशा नवनवोन्मेषशाली विषयांचा उल्लेख आढळला नाही. या दोन 'विषयां'शिवाय उच्चवर्गीय मुमुक्षु समाधी अवस्थेत जाऊन ब्रह्मरंध्राशी तन्मय कसे होऊ शकतील?याचा कृपया विचार व्हावा.)

आपल्या प्रशिक्षण वर्गाची गुरूदक्षिणा किती आहे ते कृपया कळवावे. लवकरच सहभागी होत आहे.

गुरूनिर्माण प्रशिक्षण अभिलाषी,
विसुनाना

कवटी's picture

18 Sep 2009 - 10:52 am | कवटी

मास्तरांचा लेख ठिकच. पण विसुनानांची प्रतिक्रीया छप्पर फाड आहे.
दोघाना दंडवत.
विशेषतः नवनवोन्मेषशाली विषयांच्या सुचना एकदम जबरी.

कवटी

भोचक's picture

19 Sep 2009 - 5:20 pm | भोचक

मास्तरांचा लेख आणि विसुनानांची प्रतिक्रिया बेफाम. =)) :loll:=)) :loll:=)) :loll:=)) :loll:=)) :loll:
(भोचक)
तुम्ही अध्यात्मिक गुरू आहात काय ? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

श्रावण मोडक's picture

18 Sep 2009 - 10:52 am | श्रावण मोडक

श्री श्री श्री भडकमकर महाराज की जय!!!!!!

पाषाणभेद's picture

18 Sep 2009 - 11:13 am | पाषाणभेद

लय भारी गुरूदेव.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

धमाल मुलगा's picture

18 Sep 2009 - 2:06 pm | धमाल मुलगा

मास्तुरे,
पहा बरं, 'ओ सजना बरखा बहार आई'चा कसा उपयोग झाला ;)
सर्रर्रर्रकन (की फॉक्कन) लेख पडला की नाही?
बरं, लेख लिहायचा आळस होता तोही कसा निघुन गेला ना? मस्त फ्रेश वाटायला लागलं की नाही? अहो, ताकदच आहे तेवढी ह्या गाण्यात :P

बरं, मास्तर,
मला आयुर्वेदिक बाबा व्हायची फार फार ईच्छा आहे हो... आहे का काही पेश्शल कोर्स?

-धमालजी पितळे.

विसोबा खेचर's picture

18 Sep 2009 - 3:41 pm | विसोबा खेचर

अशक्य लेख!

जियो...!

तात्या.

दशानन's picture

18 Sep 2009 - 4:05 pm | दशानन

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

धनंजय's picture

18 Sep 2009 - 6:35 pm | धनंजय

महाराजांचे प्रवचन प्रातःस्मरणीय आहे!

संदीप चित्रे's picture

18 Sep 2009 - 7:02 pm | संदीप चित्रे

मास्तर !
वाक्यावाक्याला माझ्या टाळ्या घेतल्यायत तुम्ही !!
आज आमची book reading club meeting आहे तेव्हा सगळ्यांना तुमचा हा लेख वाचून दाखवीन.
जियो मास्तर ... keep up such excellent writings
>> ( क्लासचा वैधानिक इशारा : चमत्काराच्या चकव्यात फ़ार अडकू नये. ते व्यवसायासाठी धोकादायक ठरू शकते), आम्ही बोलबच्चनगिरीवरच अधिक भर देतो. ते सेफ़ असते.
=D> =D>

रेवती's picture

18 Sep 2009 - 7:07 pm | रेवती

धन्य आहात मास्तर!
आज फार हसवलत.

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2009 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

महान आहात ... फीचं काय ते व्यनीतून कळवा.

अदिती

सूहास's picture

18 Sep 2009 - 8:06 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =))
=)) =))
=))
=)) =)) =))
=)) =))
=)) =))
=))
< =))
=)) =))
चॅम्पियन गुरु...

सू हा स...

चतुरंग's picture

18 Sep 2009 - 8:27 pm | चतुरंग

ज ह ब ह र्‍या हा!!

संस्थेची नावे विशिष्ट पद्धतीने द्यावीत..: सिद्ध योगिक सायन्स इन्स्टिट्यूट , सायंटिफ़िक ऍकॅडमी फ़ॉर योगिक रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट, कॉस्मिक एनर्जी रिसर्च सायन्स लॅबोरेटोरी,
सोसायटी फ़ॉर रिडंडंट एनर्जी फ़्लो स्टडी इन ध्यानचक्राज, रेडिएशन स्टडी इन्स्टिट्यूट फ़ॉर कुंडलिनी अवेकनिंग

हे भयंकर आवडलं!! B)

बा़की जालिंदरबाबांच्या सेवेतून तुमच्यात झालेली अध्यात्मिक उन्नती पाहून मन भरुन आले. हे क्लासेस जोरदार चालणार ह्यात शंका नाही.

(चला माझी अभिमंत्रित चहा घेण्याची वेळ झाली!)

(जंतर्-मंतर)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Sep 2009 - 8:34 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर, कमाल केलीत... बर्‍याच विकेट्स घेतल्यात, जलिंदरबाबाची कृपा, दुसरं काय? आणि तुमचा सखोल अभ्यास आणि विचार पदोपदी दिसतोय.

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

18 Sep 2009 - 9:20 pm | टारझन

आरारारारा ................ मिपावर फडतूस लेखन करणार्‍यांचे लेखाचे जुलाब बंद करण्याविषयी काही करता येईल का मास्तर ?
=))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

लेखाचे जुलाब बंद करण्याविषयी काही करता येईल का मास्तर ?
नाही टार्‍या, मास्तरांसारख्या रंगकर्मीलाही ते शक्य नाही असं मला वाटतंय.
'त्यांना समजून घ्या' किंवा 'त्यांना आपलं म्हणा' एवढे दोनच उपाय शक्य आहेत! ;)

(समजूतदार)चतुरंग

स्वाती२'s picture

18 Sep 2009 - 11:14 pm | स्वाती२

लै भारी!

नंदन's picture

19 Sep 2009 - 6:28 am | नंदन

वाक्यावाक्याला टाळ्या घेणारा लेख!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2009 - 8:43 am | प्रकाश घाटपांडे

मास्तर लईच भारी हान्लाय. (अंनिस वार्तापत्राला हा लेख पाठवायला हवा. )
आता काही ठिकानी ल्वॉकच बाबा बनीवत्यात. कारन लोकांची ती गरज हाय. हल्ली प्रशिक्षना अभावी चांगले बाबा/बुवा मिळत नाही. एखाद्या बाबा बुवाचा अंनिस ने केल्यावर भंडाफोड केल्यावर लोकांना दुसरा बाबा/बुवा शोदावा लागतोय. आपन असे वर्ग चालु करुन एक प्रकारे समाजशेवाच करीत आहात. आमाला मंगेश पाडगावकरांचा उदासबोध आठवला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Sep 2009 - 5:34 pm | परिकथेतील राजकुमार

जालींदरबाबांचे पट्टशिष्य राजमान्य राजश्री श्री श्री भडकमकर बाबा क्लासेसवाले ह्यांच्या चारणी बालक पराचा साष्टांग नमस्कार.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विजुभाऊ's picture

20 Sep 2009 - 1:00 pm | विजुभाऊ

आमचे प्रश्न तुम्ही आंतर्ज्ञानाने जाणून घ्या आणि फी मध्ये थोडे कन्सेशन द्या.
बाबा प्रत्येक भक्ताला फी आंतर्ज्ञानाने सांगतात.
१०वीच्या गणीताचा पेपर बाबाना आंतर्ज्ञानाने जाणुन एका भक्ताला दिला. त्या भक्ताने त्याच्या शेकडो प्रती आश्रमाच्या जीर्णोद्धारासाठी देणग्या घेऊन सर्वाना वाटला आणि समाज सेवा केली.

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

राजेश घासकडवी's picture

23 Aug 2010 - 7:01 pm | राजेश घासकडवी

या मास्तरांनी आधीच लय डिटेलवार अभ्यासक्रम वगैरे पण तयार करून ठेवलाय. लय भारी.

१. हा श्रद्धेचा मार्ग आहे त्यामुळे चिकित्सा नाही., श्रद्धा असेल तर प्रचीती येइल.
२. विश्वास लागतो, श्रद्धेचा पुराव देता येत नाही.
३. कुठेतरी श्रद्धा ठेवावी लागते. ( तुम्ही आईन्स्टाईनला मागता का पुरावा?)
४.न दिसणार्‍या मनाच्या आजारांचा देता का पुरावा?
५.जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते.
६. तुम्हाला आमचा धर्म बुडवायचा आहे म्हणून तुम्ही आमच्या पाठी धावता आहात.
७.(शंकेखोर माणसाची जात शोधून काढावी ) ती जर तुमच्यापेक्षा वेगळी असेल तर जातिभेदामुळे द्वेषातून हे प्रकार होत आहेत असे म्हणावे.

हे शंकेखोर लोकांना पळवण्याचे मार्ग तर मस्तच.

पैसा's picture

23 Aug 2010 - 8:11 pm | पैसा

तुमचा या विषयाचा अभ्यास परिपूर्ण आहे आणि तुम्हाला भडकमकरबुवा नावाचे स्वत्।चे दुकान काढायला अजिबात हरकत नाही.
फक्त २ गोष्टी या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हव्यात. एक म्हणजे एन. आर. आय. बाबा कसे व्हावे, की ज्या योगे गोरे शिष्य-शिष्यिणी तथा डॉलर्स मिळतील. आणि एखाद्या राजकीय पुढार्‍याबरोबर संधान बांधून त्याचा गुरू कसा व्हावे, म्हणजे दोघांचेही उखळ पांढरे होईल.
बस्स. वत्सा तुजप्रत कल्याण असो.

खबो जाप's picture

7 Jan 2013 - 12:43 pm | खबो जाप

एव्हढ सगळ लिहायला कुठल्या बाबाची कृपा झाली ?


रत्न थेरपी, चुंबक थेरपी, गायन वादन थेरपी, अभिनय थेरपी असली अनेक व्हेरिएशन लोकप्रिय असतात.

चुकून चुंबन थेरपी असे वाचले:;-)

बॅटमॅन's picture

7 Jan 2013 - 12:49 pm | बॅटमॅन

काय लेख मास्तरसाहेब वा!!! मानलं तुम्हाला. आम्ही विज्ञानानंद कोर्समध्ये नाव घालू इच्छितो ;)

चित्रगुप्त's picture

7 Jan 2013 - 5:16 pm | चित्रगुप्त

मान गये मास्टर मोशाय.
आणखी महत्वाचे एक राहून गेले की काय ?
.... अतिशय श्रीमंत लोकांना आपल्या अमाप संपतीचा मरणानंतर स्वतःला (परलोकात) काहीही उपयोग नाही, याचे टेन्शन असते. तस्मात आमच्या मठाला/ट्रस्टला मोठी रक्कम देऊन त्याची हुंडी घ्या, म्हणजे ती रक्कम मेल्यानंतर तुम्हाला परलोकात मिळेल ...
आश्चर्य वाटेल पण यावर विश्वास ठेवणारे लोक प्रत्यक्षात आहेत, आणि त्यांनी दिलेल्या पैशातून ऐश करणारे, मोठमोठी मंदिरे उभारणारेही.
फार वर्षांपूर्वी यावर एक लेख वाचला होता, त्यात त्या स्वामींचे नावही दिलेले होते, परंतु आता ते नेमके कोण हे विस्मृतीत गेले आहे.

मन१'s picture

7 Jan 2013 - 5:25 pm | मन१

कहर आहे!

चौकटराजा's picture

7 Jan 2013 - 8:01 pm | चौकटराजा

बुवाबाजीचे हे फ़ार उत्कृष्ट करिअर आहे.]
या पेक्षाही " देउळ टाकणे" हे मस्त करियर आहे.
१९७४ ची गोष्ट. पुण्याच्या फर्गसन मधून बी एस सी झालेल्यांच्या एका गटाबरोबर सहलीस गेलो होतो. जाता जात पुढे काय करणार ? अशा गप्पा त्यांच्या चालू झाल्या. प्रत्येकाने आपापले बेत सांगितले एक " जोश्या" नावाचा पंटर त्यात होता. तो म्हणाला" तुम्ही काहीही म्हणा मला मात्र एक देउळ टाकावेसे वाटते.!" त्यानंतर डोंबीवलीच्या गणेश मंदिराची, शिरर्डीच्या साईबाबांची इतकेच काय आमच्या शिरगाव येथील प्रति शिर्डीची प्रगति पहाता " त्या" जोशाचे विचार किती द्रष्टेपणाचे होते हे समजते .