(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून)
प्रोफाइलवरती बाई
अशि काही दिसते धासू
तो फोटो पाहुन येती
झुंडीने चावट वासू
कुणी भोजनपृच्छा करतो
कुणी थेट घालतो डोळा
बाईच्या भवती जमती
भुंगे सतराशे सोळा
बाईचे आशिक मुबलक
कुणि पुतण्या तर कुणि काका
रंगेल एकसे एक
बाईस मारिती हाका
मेसेज पटापट येती
गालात हासते बाई
पाहता गड्यांची गर्दी
तिज हसू अनावर होई
ती विचार करुनी लिहिते,
पुसते, -अन पुन्हा लिहिते
ते 'टायपिंग..' दिसताच
वासूंचे भान हरपते
डोळ्यात प्राण आणूनी
व्याकूळ पाहती वाट
कंठाशी येती प्राण
वासूंची हालत 'ताठ'
दो अशाच घटका जाती
मग 'टिंग!' वाजतो फोन
वासूंच्या टोळ्या येती
तो वाचण्यास धावून
उघडता फोनचा पडदा
बाईचे उत्तर दिसते
मितभाषी ती मुलखाची
'Hmm' इतुकेची लिहिते!
गर्दीचा पोपट होतो
पण उसने घेती हासू
आशेला नसते मरण
वासू जातीचे वासू!!
प्रतिक्रिया
26 Feb 2021 - 6:47 pm | टवाळ कार्टा
=))
26 Feb 2021 - 7:26 pm | सौंदाळा
मस्तच जमली आहे.
आता मिपावर पाशवी शक्तींचा वावर कमी झाला आहे त्यामुळे दंगा होणार नाही. झालाच आमची सिट रिझर्व करा.
बाकी वासूंच्या (आपलं ते प्रतिसादाच्या) प्रतिक्षेत.
27 Feb 2021 - 12:23 am | चलत मुसाफिर
धन्यवाद :-)
27 Feb 2021 - 11:45 am | उपयोजक
:)))
28 Feb 2021 - 9:48 am | बाजीगर
वाह वाह..मस्त
आवडली.
1 Mar 2021 - 4:47 pm | चलत मुसाफिर
धन्यवाद
7 Jul 2023 - 9:21 pm | चित्रगुप्त
शृङ्गारहास्य करुणरौद्रवीरभयानकाः।
बीभत्साद्भुतं इत्यष्टौ रसाः शान्तस्तथा मत:॥
-- पण्डित विश्वनाथ कृत – साहित्य दर्पण (३.१८)
या पारंपारिक नवरसांमधे आधुनिक काळात आणखी एक 'आचरट रस' सम्मिलित करावा, असे सुचवतो.
मस्त आचरट कविता मुसाफिरभौ.
कित्येक वर्षांपूर्वी वाचलेले भाऊ पाध्यांचे 'वासुनाका' आठवले.
मिपावरून पूर्वीच्या सगळ्या 'अनाहिता' ऊर्फ 'मिपाबायका' कुठे गायबल्यात कुणास ठाऊक.
8 Jul 2023 - 5:03 am | चलत मुसाफिर
इतक्या दिवसांनी कविता वर आलेली पाहून सासरी गेलेली लेक वर्षानुवर्षांनंतर भेटल्याचा राख आनंद झाला हो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
8 Jul 2023 - 5:04 am | चलत मुसाफिर
राख शब्दाकडे दुर्लक्ष करावे
8 Jul 2023 - 5:20 am | चलत मुसाफिर
म्हणजे J1 jhal ka हा भावविव्हळ प्रश्न. कविता लिहिली तेव्हा तो मराठी समाजमाध्यमी व्यासपीठांवर सर्वज्ञात होता. आता तसा आहे का कल्पना नाही
8 Jul 2023 - 8:43 am | तुषार काळभोर
हा सार्वकालिक आईस ब्रेकर आणि संवाद स्टार्टर आहे. (तज्ञांनी एखादा एक्झॉटिक मराठी शब्द शोधावा.)
अगदी स्मार्टफोनच्या आधीच्या काळात देखील एसेमेस आणि त्याही आधी फोनकॉल वर संवाद होत असे, तेव्हाही तो संवाद
काय चाललंय? काही नाही.
जेवण झालं का? नाही अजून, व्हायचंय/आताच झालं. तुझं?
यानेच सुरू व्हायचा.
8 Jul 2023 - 9:45 am | गवि
अगदी अगदी..
आणखी खूप आगोदर विशेषत: लहान शहरांत बाईमाणसाला एकटीने घराबाहेर पडताना एक भाजीची रिकामी पिशवी हाती बाळगावी लागे. बाई नुसतीच फिरायला बाहेर पडलीय किंवा मैत्रिणीच्या घरी गप्पा मारायला निघालीय असे समाजाला पचत नसावे. कारण दिसणारी प्रत्येक इतर बाई / व्यक्ती "काय कुठे चाललात?" असे हटकून विचारत असे.
त्यावर "भाजीला" / "भाजी आणायला" हे स्टँडर्ड उत्तर असे. किंबहुना हातात भाजीची पिशवी दिसली की मुळात हा प्रश्न येणेच कमी होत असे. :-))
8 Jul 2023 - 3:41 pm | चलत मुसाफिर
छान सूक्ष्म निरीक्षण
8 Jul 2023 - 7:57 am | विवेकपटाईत
मस्तच कविता
8 Jul 2023 - 3:41 pm | चलत मुसाफिर
प्रतिसादाबद्दल
8 Jul 2023 - 9:33 am | गवि
हा हा हा. मिस झाली होती ही धमाल कविता.
त्या hmm मध्येही हुंकार ऐकू येऊन वासू अधिकच ताठ होत असतील.
बाकी यावरून एक खूप जुने फॉरवर्ड किंवा जोक आठवला.
Feeling sad
असे मुलीने (उदा. स्टेटस किंवा कुठे) लिहिले तर.
मुलगा १. What happened baby?
मुलगा २. Hope you are safe. Please take care dear.
मुलगा ३. I am coming to meet you immediately
Feeling sad. असे मुलाने लिहिल्यावर.
मुलगा १. अब क्या हुआ बे?
मुलगा २. कौन मर गया?
मुलगा ३. हमेशा रोते ही रहियो दुखभरी आत्मा..
8 Jul 2023 - 3:43 pm | चलत मुसाफिर
कविता लिहिली त्याला 2 वर्षे उलटून गेली. तिला हा पुनर्जन्म कसा काय लाभला कोण जाणे!
धन्यवाद
10 Jul 2023 - 2:05 am | चित्रगुप्त
कविता लिहिली त्याला 2 वर्षे उलटून गेली. तिला हा पुनर्जन्म कसा काय लाभला कोण जाणे!
१. सातपाटील कुलवृत्तांताबद्दलचा लेख वाचून तो आवडणे.
२. सदर लेखकाचे 'यांचे सर्व लेखन' बघणे.
३. त्यातले 'प्रोफाईलवरती बाई' हे शीर्षक आकर्षक वाटणे
४. ती कविता वाचल्यावर आवडून प्रतिसाद देण्यातून कवितेचे पुनरागमन.
-- या निमित्ताने सदर लेखक आणि अन्य मिपाकरांना एक नम्र विनंती: आपापल्या प्रोफाईलावर अन्य काही नाही तरी निदान स्वतःच्या आवडीनिवडी, विशेषतः छंद इत्यादिंबद्दल जरूर लिहावे. बाकी माहिती उदा, निवसस्थान, वय वगैरेही दिल्यास चांगलेच . यातून समविचारांच्या अन्य मिपाकरांशी वैयक्तिक मैत्री होण्याची शक्यता दुणावते. मला असे काही चांगले मित्र लाभलेले आहे आणि अनेकांना लाभले असतील.
10 Jul 2023 - 6:24 am | चलत मुसाफिर
मनमोकळेपणाने दाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी लेखक कवी वगैरे काही नाही. गंमत म्हणून किंवा स्वतःच्या समाधानासाठी लिहीत असतो. मराठीपेक्षा इंग्रजीत लिहायला जास्त सोपे वाटते. एक प्रवासवर्णनाचा अनियमित ब्लॉग इंग्रजीत अनेक वर्षांपासून लिहीत आहे.
http://www.chalatmusafir.wordpress.com/
10 Jul 2023 - 9:27 am | वामन देशमुख
कविता आवडली. कशी काय मिस् झाली होती बुवा?
नवीन प्रतिक्रियाही आवडल्या.
10 Jul 2023 - 3:08 pm | चलत मुसाफिर
प्रोत्साहन दिल्याबद्दल
10 Jul 2023 - 6:15 pm | चांदणे संदीप
+१
+१
सं - दी - प
10 Jul 2023 - 6:41 pm | चलत मुसाफिर
या किंचित्कवीला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद.