लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे.
युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव.
अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय. जखमेच्या वेदना शमवण्या साठी तेल मागत सातपुड्याच्या पर्वत रांगात फिरतोय. त्याच प्रमाणे आपण, सामान्य माणूस, सुद्धा अविनाशी इच्छापूर्ती साठी व त्यातुन मिळणार्या समाधाना साठी वणवण भटकतोय आसे वाटते.
आपण नशीबवान, कमीत कमी आपल्याला मृत्यूचे वरदान आहे ते आपल्याला यातून सोडवणार आहे पण अश्वत्थाम्याचे काय? नियती त्याची सुटका कशी करणार आहे किंवा नाही. प्रत्येक शापाला उशाःप आहे. महाभारतात प्रत्येकाने निती नियमांचे उल्लंघन केले मग अश्वत्थाम्याने असे काय केले की त्याला यातून सुटका नाही?
आसा एक विचार नेहमी मनात येतो.
आपण सगळेच अश्वत्थामे
एक नाही अनेक अश्वत्थामे रोजच भेटतात.
मनाच्या पटलावर
भळभळणारी अदृश्य जखम घेऊन फिरतात.
पण त्याची कुणाला जाणीवच नसते.
प्रत्येकला आपलेच विश्व खरे वाटते.
लसलसणारे, स्वार्थी,लालची मन म्हणजेच भळभळणारी जखम.
प्रत्येकालाच त्या करता समाधान ब्राण्ड तेल हवे आसते.
अश्वत्थाम्यांच्या जगात कोण कुणाला तेल देणार.
भळभळणारी जखम आता मेल्यावरच भरणार.
आपण सगळेच अश्वत्थामे समाधान शोधतोय.
"तुझं आहे तुजपाशी", तरी जागा चुकतोय.
आपण सगळेच अश्वत्थामे अ-चिरंजीवी आहो.
याची जाणीव सर्वानाच राहो.
१४-७-२०२२
प्रतिक्रिया
14 Jul 2022 - 12:02 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
14 Jul 2022 - 9:20 pm | सुखी
छान लिहिलंय मुक्तक
14 Jul 2022 - 10:07 pm | श्रीगुरुजी
अश्वत्थामे नाही हो. अश्वत्थामा लिहा.
17 Jul 2022 - 9:10 am | प्रकाश घाटपांडे
अश्वत्थामाचे अनेकवचन आहे ते बोली भाषेतील.व्याकरणाला मान्य नसेल ही.
15 Jul 2022 - 3:09 pm | श्वेता व्यास
वाह, छान!
17 Jul 2022 - 10:21 am | कर्नलतपस्वी
मुवी,सुखी,श्रीगुरूजी,घाटपांडेजी, श्वेता
सर्वाचे प्रतिसादा बद्दल मनापासून आभार.
हुरूप येतो आणी काही लिहावेसे वाटते.
स्वानंदा करता लिहीत आसल्यामुळे कुठलाही खेद ,खंत नाही. पण वाचकांचे प्रतीसाद म्हणजे प्राणवायू,
विशेषतः जेव्हा श्रीगुरूजी,घाटपांडे सारखे वरीष्ठ सदस्यांकडून प्रतिसादाची पाठीवर थाप पडते तेव्हां एक एक प्रतीसाद शंभर पेक्षा जास्त वाटतो.
क लो आ
21 Jul 2022 - 2:54 pm | सिरुसेरि
सुरेख कथन . +१ . अश्वत्थामा याच्या जीवनाला अंत नाही . शापाला उ:शाप नाही . यामुळे अनेकांना त्याच्याबद्दल कुतुहल , सहानुभुती , आदर वाटत आला आहे .
हिमालय , नर्मदा परिक्रमा अशा ठिकाणी अनेक यात्रींनी अश्वत्थामा याची भेट झाल्याचा उल्लेख केला आहे .
या अनुभवांवरुन सुचलेल्या कथेची लिंक - https://www.misalpav.com/node/45815
29 Jul 2022 - 4:47 pm | कर्नलतपस्वी
धन्यवाद, यात्री वाचली,प्रतिसाद दिला आहे.
28 Jul 2022 - 10:48 pm | विजुभाऊ
कसली तरी भळभळणारी जखम प्रत्येकजणच वागवत असतो.
काहीवेळा तर त्याचाच आधार असतो आपल्याला
29 Jul 2022 - 4:49 pm | कर्नलतपस्वी
कदाचीत भळभळणारी जखम आहे म्हणून जीवंतपणाचा अहसास आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.