परिक्रमा

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
1 Jun 2022 - 11:12 pm

नर्मदा परिक्रमेचा आजचा अकरावा दिवस, चालून चालून पाय भेंडाळून गेलेत.. सुरुवातीला एकत्र असलेले आपापल्या सोयीनुसार , वेगानुसार पांगले आहेत.. दोन दिवस निबीड जंगलातला रस्ता आहे . अवचित एखादा वाटसरू दिसला की रस्ता चुकला नाही याचे समाधान मिळते...

संध्याकाळी दगडावर बसून नर्मदामैय्याचे विलोभनीय रूप बघत होतो तेव्हा डूबत्या सूर्यामागून एक उंच आकृती झपझप चालतं डोहाकडे आली ..धोतर , अंगरखा आणि डोईला मारवाड मुंडासे ! वाटसरू तहानलेला असावा.. येऊन गटागटा पाणी पिले , आमच्याकडे लक्ष नसावे बहुधा .. वाटसरू वस्त्रे काढून डोहात शिरला , मुंडासे काढले , केसांच्या दीर्घ जटा अस्ताव्यस्त पसरल्या..

डोहात मोठी डुबकी घेऊन तो वर आला आणि अर्घ्य देऊ लागला .. त्यावेळी वाऱ्याने उडवलेल्या कपाळावरील जटेच्या मागे एक खोलवर जखम दिसली.. नुकतीच झाल्यासारखी ..

आजवर ऐकलेले , कुठतरी वाचलेलं आणि सांगोवांगीच्या कथा म्हणून सोडून दिलेले अद्रूत समोर होते .. हे सत्य की भास.. की विलक्षण योगायोग?

अश्वत्थामा? माझ्या आणि सहचारीच्या मनात एकाच वेळी आलेला विचार आणि तोंडातून निघालेला अस्फुट शब्द त्याने बरोबर टिपला..

मान वळवून तो भेदक नजरेने आमच्याकडे बघू लागला .पुढील अन्हिके त्याने आटपती घेतली..बाहेर येऊन कपडे घालून तो वेगाने आमच्या दिशेने येऊ लागला .

संस्कृतीइतिहासकथाव्यक्तिचित्रअनुभव

प्रतिक्रिया

'श्री नर्मदा दर्शन' पुस्तकात बऱ्याच भाविकांचे अनुभव संकलित आहेत. अश्वत्थामा दिसला का हा प्रश्न नेहमीच विचारला जातो.

भागो's picture

2 Jun 2022 - 9:29 am | भागो

बर मग पुढे काय झालंं?

पुढचा भाग येणार आहे का?

करत असाल तर कृपया तुमचे सगळे अनुभव वाचायला आवडतील. परिक्रमे दरम्यान अश्वत्थामाबद्दल माझ्या माहितीतल्या बऱ्याच जणांकडून अनुभव ऐकला आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव खरंच रोचक आहे.

nanaba's picture

3 Jun 2022 - 8:18 am | nanaba

हा खरा अनुभव आहे का?

कंजूस's picture

3 Jun 2022 - 9:46 am | कंजूस

म्हणूनच कथा अधांतरी सोडली आहे. काहींना मैया दिसते.

सस्नेह's picture

3 Jun 2022 - 10:21 am | सस्नेह

परिक्रमा करत आहात का ?
मग बयाजवार येऊदे की डायरी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2022 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परिक्रमा करत आहात का ?
मग बयाजवार येऊदे की डायरी !

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

3 Jun 2022 - 11:54 am | चौथा कोनाडा

उत्कंठावर्धक चित्र दर्शी लेखन!

शेवटचे दोन परिच्छेद काल्पनिक असावेत की काय असं उगाच वाटून गेलं. अर्थात असल्या परिक्रमा केल्यावर विविध भास, साक्षात्कार होणे ओघाने आलेच.