माझी शाळा, निसर्ग शाळा - भाग २

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
8 Jan 2022 - 6:05 pm

(याआधीचा भाग इथे लिहिला होता -- माझी शाळा, निसर्ग शाळा)
तोरणा विद्यालय

साधारण जुलै २०२१ मधे आम्हां माजी विद्यार्थ्यांनी खूप वर्षांनी ऑनलाईन एकत्र येऊन, प्रत्यक्ष भेट वगैरे खर्च टाळून, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का यावर चर्चा सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थांसाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य यावर एकमत झालं.
एकत्र येऊन काम करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने असेल कदाचित, उपक्रमातील पहिला टप्पा थोडा उशिराने, पण व्यवस्थितपणे, मागच्या महिन्यात पार पडला.

आधीचा लेख वाचून आपले मिपाकर, इतिहास संशोधक आणि लेखक, मनो, यांनी स्वतः लिहिलेलं पानिपत युद्धावरील पुस्तक (Battle of Panipat) शाळेसाठी भेट म्हणून दिलं.
तोरणा विद्यालय - Battle of Panipat

इतिहास, विज्ञान, कला, खेळ इत्यादी विषयावरील प्रत्येक इयत्तेला साजेल अशी वेगवेगळी ३६ मराठी पुस्तके पुण्यातील मेहता पब्लिशिंग हाऊस येथून ऑनलाईन खरेदी केली. आणि शैक्षणिक साहित्य ITC कंपनीच्या पुण्यातील अन्वी डिस्ट्रीब्युटर्सकडून ऑनलाईन खरेदी केले. दोन्हीही ठिकाणी चर्चा करून जास्तीत जास्त सवलत मिळवता आली.
तोरणा विद्यालय - मराठी पुस्तके

साध्या कार्यक्रमात, काही मोजक्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आलं. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी व स्वतःचा प्रवास यावर सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तोरणा विद्यालय -  मराठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य वितरण

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करून उपक्रमातील पहिल्या टप्प्याची सांगता झाली.
तोरणा विद्यालय - सांगता

खूप छोट्या अशा उपक्रमातून बरंच काही शिकता आलं.
१) समूह म्हणून एकत्र येण्याचा उत्साह एखाद्या चांगल्या कार्यात केंद्रित करता येतो.
२) चर्चा करून एकमेकांकडून शिकण्यासारखं खूप काही असतं.
३) कितीही साधं, छोटंसं कार्य असलं तरी त्यातून जोडली जाणारी माणसे आणि विचार एक वेगळंच समाधान आणि आनंद देऊन जातात.
४) एकत्र काम करताना स्वयंस्फूर्तीतून आलेलं योगदान संपूर्ण समूहाला सकारात्मक ऊर्जा आणि दिशा देतं.

पुढील दिशा:
१) शाळेच्या इतरही बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना प्रेरित करणं.
२) प्रेरणा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांशी माजी विद्यार्थ्यांचा संरचित (structured) संवाद घडवून आणणं.
३) करियर तज्ञांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणं (वर्ग १० वी ते १२ वी)

मिपावरील आधीच्या लेखावरील प्रतिसादांतून खूप काही शिकता आलं.
मिपाकरांचे आभार! _/\_

समाजलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

8 Jan 2022 - 8:20 pm | कर्नलतपस्वी

छान उपक्रम

श्रीगणेशा's picture

9 Jan 2022 - 2:02 am | श्रीगणेशा

धन्यवाद कर्नल साहेब _/\_
छोटीशी सुरुवात झाली आहे, पुढील वाट शोधणं चालू आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2022 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्तम उपक्रम. या वाट्सॅपमुळे आम्हीही शाळामित्र एकत्र आलो आहोत. कोणाच्या तरी डोक्यातून येतं आपण शाळेसाठी यंव करु आणि त्यंव करु. पण आमची जिल्हा परिषद शाळेत आता विद्यांर्थ्यांचा वाणवा आहे, इंग्रजी शाळांमुळे काही जि.प. शाळांचे अस्तित्व आता आठवणीपूरते उरले आहे. बघू तुमचं लेखन उपक्रम किती प्रेरणा देते ते.... आमच्या मित्रांचा उत्साह भेटणे बसणे आणि इतकाच मर्यादित झालाय.

-दिलीप बिरुटे

श्रीगणेशा's picture

9 Jan 2022 - 12:16 pm | श्रीगणेशा

धन्यवाद सर _/\_
आमचाही उत्साह किती दिवस टिकतो याचीही उत्सुकता आहे!

पाषाणभेद's picture

9 Jan 2022 - 10:47 am | पाषाणभेद

"अशीच आमुची शाळा असती सुंदर शिक्षणाप्रती
आम्हीही हुषार झालो असतो" वदले पाषाणभेदी!

श्रीगणेशा's picture

9 Jan 2022 - 12:30 pm | श्रीगणेशा

धन्यवाद पाषाणभेद _/\_
"नॉस्टॅल्जिया" हा शब्द हल्ली बऱ्याचदा नकारात्मकतेनेच वापरला जातो. जे चांगलं, सुंदर होतं ते प्रत्यक्षात जपणं जरी जमलं नाही तरी आठवणीत तरी अभिमानानं जपायला हवं!

अनन्त्_यात्री's picture

9 Jan 2022 - 12:55 pm | अनन्त्_यात्री

शुभेच्छा!

श्रीगणेशा's picture

9 Jan 2022 - 11:12 pm | श्रीगणेशा

धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_

अक्षय देपोलकर's picture

10 Jan 2022 - 8:22 am | अक्षय देपोलकर

चांगला उपक्रम..
पुढच्या सगळ्या कामांसाठी शुभेच्छा

चौथा कोनाडा's picture

10 Jan 2022 - 1:05 pm | चौथा कोनाडा

अ ति शय कौतुकास्पद आणि प्रेरणादायी !
सर्व सहभागींचे हार्दिक अभिनंदन !
🏆
हॅट्स ऑफ !

सौंदाळा's picture

10 Jan 2022 - 1:18 pm | सौंदाळा

अभिनंदन
खूपच छान उपक्रम

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2022 - 2:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

आपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा!! अशीच वाटचाल पुढे चालु राहो.

श्रीगणेशा's picture

12 Jan 2022 - 12:20 am | श्रीगणेशा

धन्यवाद अक्षय देपोलकर, चौको, सौंदाळा, राजेंद्र मेहेंदळे _/\_

कुमार१'s picture

15 Jan 2022 - 9:20 am | कुमार१

आपल्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा!!

श्रीगणेशा's picture

16 Jan 2022 - 3:35 pm | श्रीगणेशा

धन्यवाद कुमार सर _/\_

सिरुसेरि's picture

20 Jan 2022 - 11:08 am | सिरुसेरि

प्रेरणादायी आणी सर्वांनी आदर्श घ्यावा असा सुरेख उपक्रम आहे . अभिनंदन आणी शुभेच्छा .