आमची प्रेर्ण्रा : चांदणचुरा - https://www.misalpav.com/node/49620
मागवतो चकणा जरा
नेक्स्ट पेग आधी
घाल पाणी, घाल सोडा
"कच्ची" पोटास बाधी ||
चालते व्हिस्की किंवा
रम माँन्कच्या वतीने
टाळतो आता बीयर
ढेरी सुटायच्या भीतीने ||
संपवला चकणा पुन्हा
न पिणार्या हातांनी
अन पिणारे केव्हाच गेले
उंच आकाशी विमानी ||
रंगते रात्र पुन्हा अन
पडे गफ्फांचा सडा,
किचन बंद होण्याआधी
मागवु चकणा जरा ||
- टल्ली
* वैधानिक सुचना : मद्यपान शरीरास हानीकारक आहे , पण जास्त चकणा खाणे हे त्याहुन जास्त हानिकारक आहे. जास्त चकणा खाल्ल्याने फक्त आठव्या पेग नंतर आपला "वकार युनुस" होतो अन नंतर अतिषय हुच्च दर्जाची बिर्याणी खाण्याच्या आनंदास आपण मुकतो.
प्रतिक्रिया
11 Dec 2021 - 8:01 pm | चित्रगुप्त
कविता काय किंवा चित्र वगैरे काय, ते जर 'कळत' नसेल, तर ते काहीतरी लई भारी, हुच्च दर्जाचे आहे, आपल्याला कळले नाही यात आपलीच काहीतरी चूक आहे, अशी ओशाळलेपणाची भावना वाचका/दर्शकाच्या मनात निर्माण करणे, हा आधुनिक कवी/चित्रकार इत्यादींचा आवडता उद्योग असतो, आणि अशांनाच वाहवा, गिर्हाईक, बक्षिसे, अध्यक्षपदे वगैरे मिळतात....
एकतर या कवितेत हळवा स्पर्श, हळव्या वाटा, हळवे श्वास, हळवे अमूक, हळवे तमूक, गंधित आणाभाका, कोवळी पहाट, लाजरे ओठ, तांबडी वाट, प्राजक्तफुलोरा, गहिवर, पैंजण, किणकिण वगैरे वगैरे काहीच नाही, त्यातून कहर म्हणजे ही कविता तर कुणालाही सहज पूर्णपणे कळेल अशी आहे, आता काय करावे बरे ?? कुठे फेडाल हे महत्पाप कविवर्य ?
11 Dec 2021 - 9:46 pm | Bhakti
हे हे =)
11 Dec 2021 - 8:37 pm | मुक्त विहारि
कधी बसायचे?
11 Dec 2021 - 9:45 pm | Bhakti
छ्या !
रंगते रात्र पुन्हा अन
पडे गफ्फांचा सडा,
किचन बंद होण्याआधी
मागवु चकणा जरा ||
हे मला का नाही सुचलं 😃
भारीच!
12 Dec 2021 - 1:15 am | ॲबसेंट माइंडेड ...
चिअर्स.
विडंबन आवडले.
12 Dec 2021 - 1:23 am | श्रीगणेशा
विडंबन जमले आहे.
आवडले, अगदी "चकणा जरा" शिर्षकासहित!
12 Dec 2021 - 5:49 pm | कर्नलतपस्वी
पहिला साधा मग पटियाली
नको सोडा नकोच पाणी
बर्फाच्या तुकड्यावरूनी
घसरत जाऊ गिरी शिखरावरती
मग नकोत काजू नकोत पापड
दिव्यत्वाची येईल झापड
मुक्त मनाने विहार करू
मग एव्हरेस्ट ही
रेश्ट न करता लिलया पार करू
12 Dec 2021 - 7:32 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
दर शनिवारी, आमची अशीच अवस्था असते... सुक्ष्मात जायचे आणि 3-13-1760 ह्या ग्रहावर फेरफेटका मारून यायचा...
13 Dec 2021 - 8:49 am | ज्ञानोबाचे पैजार
वैधानिक इशार्यासकट वाचली आणि आवडली,
कडव्या कडव्यात नशा ठासून भरला आहे.
वकार युनुस प्रसन्न होणे ही अत्यंत वैयक्तीक बाब आहे, कोणाला तो अर्ध्या पेगात पावतो तर कोणाला खंबा रिचवूनही दर्शन देत नाही.
पैजारबुवा,