अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात. त्यांची कुमारिकांच्या हातात दिवे घेउन स्वामीये अय्य्प्पा च्या जय घोषात निघणारी मिरवणुक मला मनापासुन आवडते यात त्यांच्या वाद्यांचा सुंदर लय अगदी मनात साठवुन ठेवावा असाच असतो... ज्या आवडीने मी गुजराती गरब्याला जात होतो त्याच आवडीने मी बंगाल्यांच्या काली पुजन [सरस्वती पुजन ] ला देखील गेलो आहे आणि आजही अय्यपांच्या कार्यक्रमात मी आवडीने जातो.
हरिवरासनम हे बहुतेक कधी तरी माझ्या कानावर पडले असावे पण हल्लीच ते वीणा वादनात मी ऐकले. अधिक शोध आणि इकडे तिकडे पाहताना हेच गीत के. जे. येसुदास यांनी गायन केले असल्याचे समजले आणि ते लोकप्रिय असल्याचे देखील कळले. अजुन शोध घेतल्यावर श्रीलथा हीने गायलेले हरिवरासनम ऐकले आणि या धाग्याची सुरुवात त्याने करावीशी वाटली.
या धाग्यात भक्तीमय गाणी देण्यावर भर देण्याची इच्छा असुन प्रतिसाद देणार्यांनी देखील अश्याच प्रकारची [ भक्ती गीत,अभंग, गाणी, स्तोत्र इ.इ.इ. ] त्यांना आवडलेली किंवा त्यांनी ऐकलेले अश्या प्रकारचे संगीत / गायन या धाग्यात देण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करत आहे. :)
मदनबाण.....
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
प्रतिक्रिया
18 May 2021 - 11:17 pm | गॉडजिला
मन एकदम प्रसन्न होते.
18 May 2021 - 11:28 pm | Ujjwal
Chupke Chupke Raat Din
18 May 2021 - 11:31 pm | Ujjwal
19 May 2021 - 9:18 pm | धर्मराजमुटके
सुरेल ! हरिनिवासनम आणि या दोन्ही मुळे मन आनंदित झाले.
19 May 2021 - 9:21 pm | धर्मराजमुटके
हरिनिवासनम हे हरिवरासनम असे वाचावे.
22 May 2021 - 8:32 pm | स्वलिखित
गुलाम अली ,
अजून हेच ऐकतोय आम्ही ,
19 May 2021 - 7:59 am | Bhakti
श्रीलथा यांनी सुंदर गाणं गायलय.धाग्याची थीम आवडली.
नमो नमोजी शंकरा (केदारनाथ _/\_)
क्या समय.. क्या प्रलय दोनों में तेरी महानता महानता.. महानता
Read more: https://www.hinditracks.in/namo-namo-lyrics-kedarnathiframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/dx4Teh-nv3A" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen>
19 May 2021 - 8:00 am | Bhakti
https://youtu.be/dx4Teh-nv3A
19 May 2021 - 8:05 am | प्रचेतस
सुपरनॅचरलचा सातवा सीजन सुरू आहे. मजा येते पाहायला.
19 May 2021 - 8:31 am | कॉमी
पहिला सिझन डाउनलोड ला टाकला आहे.
19 May 2021 - 8:35 am | प्रचेतस
१५ सीजन आहेत एकूण. :)
19 May 2021 - 10:33 am | कॉमी
चार दिवस सासूचे सारखे डेलीसोप म्हणून बघायला पाहिजे! भरपूर दिवस पुरेल.
19 May 2021 - 10:35 am | प्रचेतस
=))
19 May 2021 - 8:23 am | मदनबाण
[ प्रतिसाद देण्यार्यांना अजुन एक विनंती... प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे पुढे धागा उघडण्यास जड होणार नाही. ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami Vivekananda
19 May 2021 - 8:48 am | गॉडजिला
19 May 2021 - 10:42 am | उपयोजक
सालचा हिंदी सिनेमा आहे. कॉलेजात शिकणारी तीन मुले सायकलवरुन दक्षिण भारताच्या प्रवास करतात.यात मल्याळी अभिनेते मामुट्टी यांच्यासहित अजून काही दक्षिण भारतीय अभिनेते आहेत. काही महिन्यांपूर्वीच युट्यूबवर आला आहे. जरुर पहा.
https://youtu.be/QiWInLDA298
20 May 2021 - 3:25 pm | सिरुसेरि
सुरेख चित्रपट . +१
19 May 2021 - 12:37 pm | गॉडजिला
19 May 2021 - 3:31 pm | मदनबाण
२ दिवसांपूर्वीच श्री आद्य शंकराचार्य यांची जयंती हिंदूस्थानात साजरी झाली... हजारो वर्षांपुर्वी त्यांनी केलेली रचना आजही ऐकावी अशीच आहे.
@ वरती सगळ्यांनी जी गाणी दिली आहेत, ती सर्व ऐकली. गॉडझिला तू फाल्गुनी पाठक चे जे गाणे दिले आहेस त्यातील वद्यां वरुन मला मी पाहिलेला एक सुंदर चित्रपट आठवला ! पुढच्या भागाची सुरुवात बहुतेक त्यानेच करीन. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami Vivekananda
19 May 2021 - 9:21 pm | मदनबाण
हिंदूस्थानात इतके दिव्य लोक होउन गेलेत की त्याची गणना करणे ही कठीण आहे, अशाच दिव्य लोकांच्या रचनाही तितक्याच दिव्य,प्रभावी आणि अद्भुत देखील आहेत.
माझा शोध कधी तरी अश्या रचनां पर्यंत मला घेउन पोहचतो आणि जे पहायला आणि ऐकायला मिळतं ते मी आधी कधीच ऐकलेले आणि पाहिलेले नसते.
अशीच एक रचना... [ *** रचनेच्या शेवटी ती कशी केली आहे हे देखील कळते. ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami Vivekananda
19 May 2021 - 10:29 pm | गॉडजिला
संस्कृत सुस्पष्ट बोलणे यासाठी जिभेवर असावे लागणारे नियंत्रण व त्यानुशनगे मेंदूकडून जिव्हेकडे संदेशवाहनात होणाऱ्या क्रिया या मेंदूच्या विकासाचा उत्कृष्ट व्यायाम आहे असे माझे फार पूर्वी पासून निरीक्षणात्मक मत आहे...
केंव्हाही आपण ताण तणावात असाल तर कोणतेही संस्कृत स्तोत्र निवडावे व खणखणीत पण धीरगंभीर आवाजात म्हणून घ्यावे... त्यातील शब्दाचा अर्थ शष्पही समजत नसला तरीही मनाला हलकेच वाटते हा अनुभव आहे
Times Music ची sacred chants of Shiva ही माझी अत्यन्त आवडती सीडी होती... Art of Living च्या लोकांनी अत्यन्त धीरगंभीर आवाजात म्हटलेले शिवोहम शिवोहम तर कहर... त्यातील आत्माष्ट्कम, भावन्याष्ट्कम, लिंगाष्ट्कम तत्काळ चित्त वृत्तीला लगाम लावतात...
30 May 2021 - 5:19 pm | मदनबाण
Art of Living च्या लोकांनी अत्यन्त धीरगंभीर आवाजात म्हटलेले शिवोहम शिवोहम तर कहर...
काही वर्षांपुर्वी मी मनिष व्यास यांनी गायलेले शिवोहम ऐकले होते ते आता आठवले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John Lennon
31 May 2021 - 7:34 pm | गॉडजिला
भारि आहे...
19 May 2021 - 9:27 pm | धर्मराजमुटके
माझे माहेर पंढरी
19 May 2021 - 11:16 pm | बांवरे
सोजुगादा - sojugada
विट्ठल पांडुरंग - Vithala
रंगम्मा - Rangamma
तुंग तिरदी tunga tiradi
पं भीमसेन जोशी - भाग्यदा लक्ष्मी bhagyada laxmi
थोडे वेगळे - ऐकण्यास्तव - मधुराश्टकम
20 May 2021 - 6:29 am | आगाऊ म्हादया......
टाकायलाच आलेलो.
गेलं वर्षभर वेड लागलंय मला त्या गीतामुळे
20 May 2021 - 10:24 am | तेजस आठवले
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा उत्तरा उन्नीकृष्णन ह्या गोड मुलीच्या गोड आवाजातही ऐकून बघा. https://www.youtube.com/watch?v=t5RFWwtb2Ms
Bhagyada lakshmi baramma nammamma ni sau|
Bhagyada lakshmi baramma||
Hejjaya mele hhejjeyanikkuta gejje kalgala dhvaniya madutha
sajjana sadhu pujeya velege majjigeyolagina benneyante||1||
Kanaka vrstiya kareyuta bare mana kamanaya siddhiya tore
dinakara koti tejadi holeva janakarayana kumari bega||2||
Attittalagalade bhaktara maneyali nitya mahotsava nitya sumangala
satyava toruva sadhu sajjanara cittadi holeva puttali bombe||3||
Sankhye illada bhagyava kottu kankana kaiya tiruvuta bare
kunkumankite pankaja locane venkataramanana binkada rani||4||
Sakkare tuppada kaluve harisi shukravaradha pujaya velage
akkareyulla alagiri rangana cokka purandara vithalana rani||5||
20 May 2021 - 7:13 am | Bhakti
हे स्त्रोत्र ऐकण्यासाठीची योग्य वेळ सांगा.मला वाटेल तेव्हा मी ऐकतेच,पण घरात मोठ्या आवाजात कधी लावावे ?
20 May 2021 - 8:03 am | गॉडजिला
सकाळी शुचिर्भूत आवस्थेत लाल वस्त्रावर दुर्गा देवीचा फोटो/मूर्ती ठेऊन महिषासुर मर्दिनी स्तोत्राचा पाठ केला जातो (विषेशतः नवरात्रात)...
दुर्गादेवीचे स्वरूप तसे उग्र आहे पण हृदय तितकेच कोमल परिणामी हे स्तोत्र सप्तशतीचा भाग जर नसेल (मला नेमकी कल्पना नाही) तर कधीही केंव्हाही कसेही गुणगुणायला हरकत नसावी... जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत
20 May 2021 - 10:31 am | तेजस आठवले
भक्तीताई,
अशी काही वेळ काळ नसावी. अर्थात देवाची भक्ती करण्यासाठी कुठलीही वेळ चांगलीच.
https://sanskritdocuments.org/doc_devii/mahisha_mean.html इथे हे स्तोत्र आहेच. जिभेला वळण लागण्यासाठी अतिशय उत्तम आहे.
जर समजा तुम्हाला बघून कठीण वाटले तरी एवढे कठीण नाही. ५-६ अक्षरे झाली की संधीवविग्रह करावा आणि म्हणावे.
अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्ड गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते ।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४॥
इंग्रजी अर्थ : O One who split the heads (of demons) into hundreds of pieces and One who cut the trunks of great battle elephants . whose great lion is skilled in terrifying valor in tearing apart the temples of enemy elephants . One who has cut down into pieces the heads of enemy chieftains with the strength of her own arms.
20 May 2021 - 11:19 am | Bhakti
माझंही हेच मत आहे.पण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको म्हणून विचारले.मी यूट्यूब वर लिरीकल व्हिडिओ लावून मुलीबरोबर म्हणते कधीकधी, त्यामुळे तिला उच्चार नाही पण त्या स्तोत्राचा ताल समजला आहे आणि आवड निर्माण होते.
20 May 2021 - 10:38 am | तेजस आठवले
https://sanskritdocuments.org/doc_devii/gangAlaharI.html
जगन्नाथ पंडितांच्या सर्वच रचना अतिशय अप्रतिम आहेत. माझ्या विशेष आवडीची रचना म्हणजे गंगालाहिरी स्तोत्र. म्हणायला अतिशय सुमधुर आहे.
त्याहून महत्वाचे म्हणजे भाषेचे अप्रतिम सौंदर्य त्यात उलगडले आहे.
20 May 2021 - 4:05 pm | वामन देशमुख
जगन्नाथ पंडितांच्या या रचनांची ऑडिओ कुठे उपलब्ध आहे का?
20 May 2021 - 12:10 pm | Ujjwal
नमो नमो जी शंकरा
20 May 2021 - 7:39 pm | मदनबाण
मला जितक आठवतं त्या नुसार माझ्या बालपणी अनेक वेळा विष्णु सहस्त्रनाम माझ्या कानावर पडलेले आहे, कोणाच्या घरी पहाटे ते लावले जात असे [ बहुधा ते दाक्षिणात्य असावेत. ]
कोठेतरी ते सहस्त्रनाम अंतरमनात कायमचे भिनले असावे... काळ जसा पुढे गेला तसे तो आवाज एम एस सुब्बलक्ष्मी यांचा आहे हे मला कळले.
बहुधा हिंदूस्थानात सगळ्यात जास्त म्हंटले गेलेले / जाणारे आणि सगळ्यात जास्त ऐकले गेलेले हे एकमेव सहस्त्रनाम असावे. या सहस्त्रनामाचे अन्यन साधारण महत्व आहे. या मागे असलेली एक कथा / गोष्ट जी मला ठावूक आहे ती इथे सांगतो. :- महाभारतात भीष्म शरपंजरी अवस्थेत जेव्हा पडुन होते, तेव्हा भगवान श्री कृष्णाने त्यांना पांडवांना उपदेश करण्यास सांगितले. भिष्मांनी जो उपदेश केला त्यात त्यांनी पांडवांना विष्णु सहस्त्रनाम देखील सांगितले ज्यास तिथेच उपस्थित असलेल्या भगवान श्री कृष्णाचे अनुमोदन देखील होते. त्यामुळे हे एकमेव सहस्त्रनाम आहे ज्यास साक्षात भगवंताचे अनुमोदन लाभले आहे.
याच्या खालोखाल ललिता / ललिथा सहस्त्रनाम आहे, जे मुख्यत्वे दक्षिण भारतातच ऐकले जाते.
इथे वेळे संदर्भात विचारणा झाली त्यावर :- मी काही या विषयातील तज्ञ नाही / ना जाणकर आहे, भगवंताचे नाम केव्हाही घ्यावे... पण काही रचना अश्या असाव्यात / आहेत ज्यात काळ / वेळ महत्वाचा असतो. उदा. काकड आरती ही पहाटेच केली जाते आणि शेजारती ही रात्री केली जाते. अजुन उदा. ध्यावयाचे झाल्यास रात्री सूक्तम हे रात्रीच म्हणावयास हवे.
***********************************************************************************
तंत्रोक्त रात्री सूक्तम :-
जाता जाता :-
@ गॉडजिला
मागच्या प्रतिसादात हे सांगायचे राहुनच गेले होते की तुझ्यामुळे अनेक वर्षांनी मी आता कोठे धावे मन हे ऐकले, त्या बद्धल विशेष आभार. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “I realized then that even though I was a tiny speck in an infinite cosmos, a blip on the timeline of eternity, I was not without purpose.“ :- R.J. Anderson
20 May 2021 - 10:20 pm | Bhakti
भिष्मांनी जो उपदेश केला त्यात त्यांनी पांडवांना विष्णु सहस्त्रनाम देखील सांगितले ज्यास तिथेच उपस्थित असलेल्या भगवान श्री कृष्णाचे अनुमोदन देखील होते. त्यामुळे हे एकमेव सहस्त्रनाम आहे ज्यास साक्षात भगवंताचे अनुमोदन लाभले आहे.
एम एस सुब्बलक्ष्मी म्हणजेच चैतन्य!
20 May 2021 - 10:15 pm | Bhakti
आरती देणे-मशाल जळणे
२.अत्तर शिंपडणे-कबूतर पंखांची फडफड
३.फुलं वाहणे-झाडांहून अलगद फुलं पडणे
हे योगायोग आणि गाणं 'दोन' कान्हा साठी, कृष्णभक्ती
20 May 2021 - 10:53 pm | गॉडजिला
21 May 2021 - 8:57 pm | Bhakti
22 May 2021 - 8:13 pm | मदनबाण
विष्णु सहस्त्रनामा नंतर सगळ्यात जास्त माझ्या कानावर अनेकदा पडलेले स्वर्गीय शब्द !
श्री व्येंकटेश सुप्रभातम
कनकधारा अष्टवम्
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “When you connect to the silence within you, that is when you can make sense of the disturbance going on around you.“ :- Stephen Richards
22 May 2021 - 8:51 pm | उपयोजक
https://youtu.be/vDTDBgX360M
23 May 2021 - 6:16 pm | गॉडजिला
नेत्र मिटुन याचा घेउ तितका अस्वाद कमीच.
23 May 2021 - 8:06 pm | Bhakti
राम राम
श्री राम
कल्याण करी रामराया
https://youtu.be/hUEjo2rBNMg
23 May 2021 - 6:17 pm | गॉडजिला
23 May 2021 - 7:47 pm | शा वि कु
माझा अगदी आवडता ऍनिमेशनपट आहे हा.
23 May 2021 - 6:32 pm | कॉमी
टिमोथी कॅल्मेट बद्दल लिहिल्याने कॉल मी बाय युअर नेम पुन्हा बघितला.
इटली मधील सुरेख ठिकाणं, सुंदर 'कमिंग ऑफ एज' प्रेमकथा, अतिशय सुंदर संवाद. मस्त सिनेमा.
24 May 2021 - 7:52 pm | मदनबाण
उद्या नृसिंह जयंती आहे, त्या निमित्त्याने नृसिंह कवच इथे देत आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
“Inside us there is something that has no name, that something is what we are.“ :- JoséSaramago
24 May 2021 - 8:04 pm | मदनबाण
भो शम्भो शिव शम्भो स्वयंभो हे बर्याच वेळा ऐकले आहे, अनेक गायकांनी ते गायले आहे. मला आवडलेले असे दोन व्हिडियो आज सोमवारच्या निमित्त्याने देत आहे.
**********************************************************************************
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
“Inside us there is something that has no name, that something is what we are.“ :- JoséSaramago
25 May 2021 - 1:02 am | बांवरे
आणि श्रवणीय आहे.
- धन्यवाद !
25 May 2021 - 12:55 am | बांवरे
इथे ऐका
पहिल्या - 'आजं' ... (ज पुर्णोच्चार ) पासुन अतिशय सुरेल गाणे तितक्याच सुरेख चालीत बान्धलेले.
25 May 2021 - 6:34 pm | गॉडजिला
27 May 2021 - 2:41 pm | चौकस२१२
"व्हाईट रोब डान्स" म्हणतात ते हेच का?
आवाज मुट करून बघितलं .. लै येड्यासारखा वाटलं
आणि तो आसनावर बसलेला बाबा कोण ? किती प्रति ओशो झालेत आज काल ?
27 May 2021 - 4:02 pm | गॉडजिला
लै येड्यासारखा वाटलं
ओह माई गुडनस खरे बोलताय का ? यु गॉट दं शॉट बरंका... हे जे येड्यासारखं वाटणं आहे हि तर तटस्थतेची सुरुवात आहे... बस आता आपल्या यच्चयावत कृतीही अशाच दूरवरून बघता आल्या व त्यातील वेडेपणा उमजून येऊ लागला की समजो मंजिल नजदिक है
27 May 2021 - 5:08 pm | चौकस२१२
येड्यासारखा वाटलं
हाःहाःहा .. व्हय पण "ती लोक येडी हायेत कि काय" असं वाटलं//// मी नाही येडा झालो !
27 May 2021 - 7:18 pm | गॉडजिला
आहो तेच हो, ते लोक जे वेड्यासारखे वाट्ले कारण तुम्हि त्याना त्रयस्थपणे तठ्स्थपणे बघितलेत, तुम्हि त्याना त्याण्च्या चश्म्यातुन बघितले नाहित बस अगदि हिच स्थिति स्वताचे विचार व क्रुति त्रयस्थपणे बघायला जमल्यावर येउ लागते आणी हसु येते पण त्याच वेळी माझी क्रुति म्हऩजे मि नाही ही बाब विचार न्हवे तर अनुभव बनते व तो अनुभव जि अवस्था घेते तिचे मुलस्वरुपहि उलगडायला सुरुवात होते कारण आनखी काही असतच नाही उरतच नाही :)
म्हणुन तुमचा प्रतिसाद कितिही मिश्कील असला तरी त्यामागील कार्यभाव फॉलो करता आला तर विश्व एक न संपनारे रोमांच बनुन जाते
25 May 2021 - 11:01 pm | Bhakti
एक नंबर भाऊ!!
हे गाणं मी असंख्य वेळा ऐकलं आहे.पण काल पहिल्यांदा पाहिलं.किती म्हणजे म्हणजे किती सुंदर आहे. :)
26 May 2021 - 12:10 am | Ujjwal
सध्या बिंजवॉचिंग चालू आहे. आत्ताच्या नेटफ्लिक्स च्या जमान्यापेक्षा कितीतरी सरस. मालिका बंगाली असली तरी मराठी कलाकार भरपूर आहेत. त्यांचा मराठी लहेजा उठून दिसतो.
29 May 2021 - 2:12 pm | गॉडजिला
दुसऱयांदा तुनळीवर सहज बघता बघता सुकन्या कुलकर्णी, आणि विशेषतः प्रतीक्षा लोणकरला मालिकेत बघताना सुखद धक्काच बसला होता
26 May 2021 - 10:18 am | १.५ शहाणा
राधे नंतर काल मित्राने सांगितले म्हणून Sandeep aur pinky faraar बघितला , खूप पेशन पाहिजे लई बोर झालो , मित्राला शिव्या घातल्या .
26 May 2021 - 11:49 pm | मदनबाण
@ बांवरे :- तुम्ही दिलेल गाणे ऐकलं.
माझं ऑल टाइम फेव्हरेट निर्गुणी भजन :- या भजनामुळे मला निर्गुणी भजनाची ओढ आणि गोडी निर्माण झाली.
तसेच मला संत कबीर यांचे फ्युजन गाणे देखील फार आवलेले आहे :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Hindu Dharma is the quintessence of our national life, hold fast to it if you want your country to survive, or else you would be wiped out in three generations." :- Swami Vivekanand
27 May 2021 - 1:09 am | बांवरे
राहुल देशपांडेंच्न्ह्या आवाजात ऐकतो आहे .
माझे आवडते निर्गुणी भजन - उड जायगा हंस अकेला - गायक कुमार गंधर्व
27 May 2021 - 5:53 pm | Bhakti
https://youtu.be/tu_o0UvLNwQ
28 May 2021 - 8:15 am | मदनबाण
भाग्यदा लक्ष्मी :---
@ बांवरे :- उड जायगा हंस अकेला माझे देखील आवडते भजन आहे, त्याच बरोबर केशवा केशवा देखील तितकेच आवडते आहे.
मन तडपत :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
“After silence, that which comes nearest to expressing the inexpressible is music.” – Aldous Huxley
28 May 2021 - 12:02 pm | Bhakti
सुरेख !
सूर्यागायत्री खुपच वर्षांनी पाहतेय, ऐकतेय.
तिचे हे गाणं पहिल्यांदा ऐकलं होतं.
28 May 2021 - 8:26 am | जुइ
हनुमान चालिसा - एम एस सुब्ललक्ष्मी यांनी गायलेले.
28 May 2021 - 12:03 pm | Bhakti
छान आहे.
2 Jun 2021 - 12:53 am | बांवरे
काय सुरेख !!!!
राम लक्ष्मण जानकी
जय बोलो हनुमानकी ...
28 May 2021 - 10:47 pm | मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
“After silence, that which comes nearest to expressing the inexpressible is music.” – Aldous
29 May 2021 - 10:32 am | Bhakti
गणेश चतुर्थी! बाप्पा मोरया!
29 May 2021 - 6:23 pm | मदनबाण
***********************************************************************************
श्री सूक्त :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Be happy for this moment. This moment is your life. :- Omar Khayyam
30 May 2021 - 9:00 pm | गॉडजिला
1 Jun 2021 - 10:14 pm | मदनबाण
***********************************************************************************
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve Jobs
2 Jun 2021 - 12:58 am | बांवरे
घनपाठाच्या धाटणीने गायलेले गणानां त्वा गणपतिं स्तोत्र अतिशय उत्तम !
परत परत ऐकण्याजोगे.
2 Jun 2021 - 7:37 pm | मदनबाण
घनपाठाच्या धाटणीने गायलेले गणानां त्वा गणपतिं स्तोत्र अतिशय उत्तम !
कोणीतरी अधोरेखीत केलेला शब्द वापरुन या धाग्यावर काही तरी प्रतिसाद देइल, अशी माझी मनोमन धारणा होती. हे स्तोत्र इथे देताना मुख्य हेतु तोच होता.
या अधोरेखीत शब्दावर पुढचा नविन धागा काढला तर चालेल काय ? असा प्रश्न मी हा धागा वाचणार्या सर्व मंडळींना करत आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “If you tell the truth, you don't have to remember anything.” :- Mark Twain
1 Jun 2021 - 10:16 pm | Bhakti
अवांतर-तान्हाजी-अनसंग वारियर मधली गाणी मी फिरायला जाताना आवर्जून ऐकते.पण सिनेमा पहिल्यांदा मागच्या महिन्यात पाहिला.तिनक तिनक गाणं पाहून खुपचं भरून येत.सुंदर वेगळ्या प्रकारचा आवाज भावपूर्ण गाण्याला वापरला आहे.
https://youtu.be/IUPUWcN2YWY
3 Jun 2021 - 12:37 pm | कॉमी
ला ला लँड हा माझा खुप आवडता सिनेमा आहे.त्याचे सुरुवातीचे गाणे इतके जबरदस्त आणि एका सलग शॉट मध्ये चित्रीत केले आहे की डायरेक्टर आणि नर्तकांच्या कौशल्याने थक्क व्हायला होते. गाण्याचे बोल सुद्धा छान आहेत. LA म्हणजे लॉस अॅन्जेलिस मध्ये मुंबई सारखेच तरुण कलाकार कामासाठी येतात. आणि सर्व अपयशांचा सामना करत सुद्धा ते कसे प्रयत्न करतात असे गाणे आहे. (Hence the name La La Land.)
ला ला लँड आणि पर्वा पाहिलेल्या द डिसायपल मध्ये एक स्मान धागा आहे असे अचानक वाटले. ला ला... मध्येसुद्धा जॅझ या संगीत प्रकाराची साधना आणि वैयक्तीक यश अश्या दोन गोष्टींमध्ये नायकाला निवडायचे असते. अर्थात, ला ला.. बर्याच पैलूंमध्ये बॉलिवूड सिनेमांसारखा आहे. नायक, नायिका, सरतशेवटी यश इत्यादी. द डिसायपल हा कोठेही जरासुद्धा नाटकी आणि क्लिशे होत नाही.
3 Jun 2021 - 2:08 pm | गॉडजिला
नेमका इथेच तर फरक आहे... नायक नायिका त्यांचे सुत जमणे इथं पर्यंत सर्व व्यवस्थित. पण खरे वळण तिथे येते जेंव्हा नायक नायिकेला करीअर साठी रिलेशनशीप तोडावी लागेल हे सुचवतो व त्यासाठी पुढाकारही घेतो आणी दोघे विभक्त होतात व आपली स्वपे पुर्ण करतात... अर्थातच रिलेशनशीपचा बळी देउन... ये बात बिलकुल अन-बॉलीवूड आहे.
3 Jun 2021 - 2:48 pm | कॉमी
हा ते मात्र खरं. त्याबाबतीत अगदी अन-बॉलिवूड आहे.
3 Jun 2021 - 2:56 pm | गॉडजिला
मला ला ला लँडला जॅझ ची उपमा दिलेली खुप आवडली, इथे प्रत्येक जण स्वतंत्र आहे, आपापल्या क्रुतीत दंग आहे तरीही या सर्वांचा मिळुन एक रिदम तयार होतो, जॅझमधेही वरुन सर्व एका लयीत वाटले तरी आतुन प्रत्येक जण स्वतःचे संगीत तयार करत आहे वगैरे वगैरे वगैरे... फिलॉस्फी.
आणी हो चितरपट पाहुन झाल्यावर र्हीथीक रायन गोस्लींगला ढापतो की गोस्लींग रितीकची स्टाइल मारतो यावादाचा निर्णय मी त्यांच्या त्यांच्या फॅन वर सोपवतो.
3 Jun 2021 - 2:51 pm | कॉमी
पण शेवटी यश येतेच हा क्लिशे आणि बॉलिवुडी विचार आहे. अर्थात ह्याचाने सिनेमाच्या दर्जात काही फरक पडत नाही, सिनेमा भारीच आहे.
3 Jun 2021 - 2:57 pm | गॉडजिला
हे एकदम समांतर प्रकरण आहे... यश मिळवण्यासाठी कित्येक प्रिय गोश्टींवर पाणी सोडावे लागते असा संदेश आहे...
3 Jun 2021 - 3:19 pm | कॉमी
मला ला ला लँड मध्ये "पाणी सोडल्यामुळे यश मिळाले" असे को-रिलेशन दिसले नाही. ते आधीच वेगळे झाले असतात, आणि आता जर तिला संधी मिळाली तर त्यांचे पुन्हा एकत्र येणे शक्य सुद्धा नसते.
बॉलिवुडी म्हणणे अयोग्य आहे असे मला पण वाटले आता. कारण हे हॉलिवुड मध्ये पण असतेच. (आणि बॉलिवुड हे माझ्यामते अपमानकारक विशेषण नाही, हे स्पष्ट करतो.)
बॉलिवूड असो वा हॉलिवुड, अश्या टाईपचा सिनेमा आपल्याला बर्याचदा दिसतोच की, अतीव कष्ट, मोठे बलिदान केल्यामुळे तेव्हढेच दिव्य यश मिळते. ही कल्पना इतक्या सिनेमातून पाहीली आहे म्हणुन क्लिशे वाटले.
पण द डीसायपल म्हणजे त्याच्या संपूर्ण विरुद्ध जाणारी गोष्ट आहे. स्वतःच्या कष्टांना आणि बलिदानांना रोमॅन्टिसाईझ करणार्या तरुणाची गोष्ट आहे. तो ज्या साधनेत असतो ते कधीच फळाला येत नाही, त्याचे बलिदान किंवा कष्ट कमी पडलेत असे दर्शक म्हणुन मला तरी म्हणावे वाटले नाही.
ला ला.. मध्ये जॅझची फिलॉसॉफी मस्त सांगितली आहे असे मला पण वाटले.
3 Jun 2021 - 4:56 pm | गॉडजिला
ब्रेकप वाज फाउंडेशन ऑफ सक्सेस...
वॉच द सिन...
3 Jun 2021 - 5:21 pm | गॉडजिला
movie is all about dream, and not supposed to be romance. because at the beginning it shows how much both of 'em really obsessed by their dreams that they hope gonna happened soon, they dating because they both shared same goals, but to achieved that they realize they both must go in separate ways actually kinda love the ending tho' especially at the epilogue bc both of 'em could change their dream to be together. but in reality it's different
3 Jun 2021 - 5:31 pm | कॉमी
तो सीन बघूनच प्रतिसाद दिला होता.
शेवटचे "what could have been" गाणे आहे ना, ज्यात जर त्यांचे आधी भांडण झाले नसते तर त्यांचे आयुष्य कसे असले असते असा सिनॅरिओ त्यात चित्रीत केला आहे. त्यात ते एकत्रित आणि यशस्वी दाखवले आहेत.
त्यांचे सॅक्रिफाइज हे त्यांच्या यषाचे कारण असा अर्थ मी काढला नाही बुवा. ते आधीच वेगळे झाले असतात आणि आता परत येणे त्यांना करियरच्या आड येणारे वाटते. जर ते आधी वेगळे झाले नसते, तर एकत्रित राहून सुद्धा तीने ती ऑडिशन दिलीच असती, आणि ती जिंकलीच असती. त्याने त्याचा क्लब पॅरिस मध्ये काढला असता.
एनीवे, ज्याच्या त्याचा नजरिया !
3 Jun 2021 - 5:54 pm | गॉडजिला
आणि त्यांनी सेपरेट व्हायचा निर्णय घेतल्याने मिळालेले यश हे वास्तव आहे. दोन्ही गोश्टी आपण मिळवु शकत नाही हा संदेश आहे.
टायटॅनिकमधेही शेवटी रोज जॅकला मिळते असा प्रसंग आहे पण ते बोट बुडली नसती तर या नंतरचे स्वप्नरंजन आहे इथेहि तोच मामला आहे
3 Jun 2021 - 6:22 pm | कॉमी
मला हा संदेश वाटला नाही. तसे झाले हे खरे, पण ते काही एकुलते एक आउटकम होते असे मला वाटत नाही. करिअर च्या असलेल्या स्थितीमुळे पुन्हा एकत्र न येणे ते इष्ट मानतात हे तर आहेच, पण ते बलिदान दिल्याशिवाय यश मिळाले असते असे नाही वाटले मला.
जॅक आणि रोज ची स्थिती खूप वेगळी असते हा गॉजिरा. तुलना बरोबर नाही. तिथे दोघे किंवा दोघांपैकी एकजण मरणारच असतो. फक्त मरणार कोण हा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांचे स्वप्नरंजन खरोखर स्वप्नरंजनच आहे. इथे तसे नाही.
असो, पिंडे पिंडे मत:भिन्नता.
3 Jun 2021 - 6:42 pm | गॉडजिला
दॅट्स ओके, पण सांगितलेले असे आहे की जर तुमच्या अँबिशन मोठ्या असतील तर त्यसाठी प्रसंगी तुम्हाला तुमच्या इतर सर्वगोश्टींचा बळी द्यावा लागु शकतो. आणी ला ला लँडचे वेगळेपणच हे आहे की आपल्या महत्वाकांक्षांसाठी नात्याचा बळी ते समजुतदारपणे व म्युचुअली देउन ते मार्गस्थ होतात... किंबहुना नायक त्यासाठी पुढाकार घेतो...
इथं बॉलीवुड असते तर एकाचे सॅक्रीफिकेशन व दुसर्याने यशाच्या पायर्या चढत जाताना त्यांच्या (भोवतालच्या लोकांनी मुद्दम पेरलेल्यागैरसमजुतीमधुन )नात्याचा बळी पोराबाळंची हेळसांड व शेवटी म्या चुकलं म्हणत मिलन असा शेवट दिसला असता.. पण लाला लँडमधे मिलन हे एक स्वप्न उरते आणी समजुतदार्पणे नात्याचा दिलेला बळी हा त्यासाठीचा त्याग ठरतो...हा त्याग हा बॉलीवुडी हमखास यशाचा मार्ग आजिबात नाही.. ति फक्त एक वास्तव किंमत आहे जी महत्वाकांक्षेपायी चुकवावी लागते, इतकचं.
3 Jun 2021 - 7:22 pm | कॉमी
मान्य.
10 Jun 2021 - 2:04 pm | गॉडजिला
रासक्रिडाकरतावनमाळीहोsssssss