सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
18 May 2021 - 10:48 pm

अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात. त्यांची कुमारिकांच्या हातात दिवे घेउन स्वामीये अय्य्प्पा च्या जय घोषात निघणारी मिरवणुक मला मनापासुन आवडते यात त्यांच्या वाद्यांचा सुंदर लय अगदी मनात साठवुन ठेवावा असाच असतो... ज्या आवडीने मी गुजराती गरब्याला जात होतो त्याच आवडीने मी बंगाल्यांच्या काली पुजन [सरस्वती पुजन ] ला देखील गेलो आहे आणि आजही अय्यपांच्या कार्यक्रमात मी आवडीने जातो.
हरिवरासनम हे बहुतेक कधी तरी माझ्या कानावर पडले असावे पण हल्लीच ते वीणा वादनात मी ऐकले. अधिक शोध आणि इकडे तिकडे पाहताना हेच गीत के. जे. येसुदास यांनी गायन केले असल्याचे समजले आणि ते लोकप्रिय असल्याचे देखील कळले. अजुन शोध घेतल्यावर श्रीलथा हीने गायलेले हरिवरासनम ऐकले आणि या धाग्याची सुरुवात त्याने करावीशी वाटली.
या धाग्यात भक्तीमय गाणी देण्यावर भर देण्याची इच्छा असुन प्रतिसाद देणार्‍यांनी देखील अश्याच प्रकारची [ भक्ती गीत,अभंग, गाणी, स्तोत्र इ.इ.इ. ] त्यांना आवडलेली किंवा त्यांनी ऐकलेले अश्या प्रकारचे संगीत / गायन या धाग्यात देण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करत आहे. :)

मदनबाण.....

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ५

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 Jun 2021 - 11:06 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The two most important things to do for self-defense are not to take a martial arts class or get a gun, but to think like the opposition and know where you're most at risk. :- Barry Eisler

गुल्लू दादा's picture

16 Jun 2021 - 11:41 am | गुल्लू दादा

खूप दिवसांनी काही भारी पाहायला आणि ऐकायला मिळालं
https://youtu.be/czky74Y1lpI
मनोज मुंतशीर यांचे मनापासून आभार.

मदनबाण's picture

18 Jun 2021 - 7:00 pm | मदनबाण

गुल्लू तुमचे ही लिंक इथे दिल्या बद्धल अनेक आभार.
पहिला अंक ऐकला, आता दुसरा ऐकतो आहे.
https://www.youtube.com/watch?v=SzhQNJeZlrI

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

मदनबाण's picture

18 Jun 2021 - 8:47 pm | मदनबाण

रुक सका ना गान सुनकर
महाराणा के प्रताप का
सुन कर अभिमान हुवा प्रबल
मेरे मन के सागर का
हे भारत के हिंदू जनजन
अब तो प्रबल करलो
अधर्म के विरोध मे अपना मन...

सगळे ६ भाग पाहिले / ऐकले , ७ वा भाग अजुन यायचा आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

मदनबाण's picture

29 Jun 2021 - 8:21 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।

मदनबाण's picture

29 Jun 2021 - 11:31 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।

मदनबाण's picture

30 Jun 2021 - 9:00 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha

मदनबाण's picture

13 Jul 2021 - 8:40 am | मदनबाण

दत्त संप्रदयाचा प्रसार महाराष्ट्र, गुजरात,कर्नाटक आणि थोड्या फार प्रमाणात मध्य प्रदेशात झालेला आहे.
रंग अवधूत महाराज / स्वामी यांनी दत्त बावनी ची रचना केली ती गुजराती भाषेत आहे. मी लहानपणा पासुन ती ऐकली आणि म्हंटली देखील आहे. काही काळा पूर्वी ही दत्त बावनी विविध रागात माझ्या ऐकण्यात आली होती. त्यातील मला आवडलेल्या रागात असलेली खाली देत आहे.

P1

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

मदनबाण's picture

13 Jul 2021 - 8:43 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

मी रुद्र अनेक वेळा ऐकले आहे, पण Naan Kadavul चित्रपटातले ओम शिवोहम ऐकल्यावर माझी रुद्रात रुची फारच अधिक वाढली कारण या गाण्यात रुद्रातील नमकाच्या काही ओळी आहेत.इलैयाराजा यांच्या संगीताचा प्रभाव मला अधिक उत्तम स्वरुपाच्या रुद्र शोधाकडे नेण्यास कारणीभूत ठरला.त्यानंतर मी अनेक रुद्र ऐकली... विविध रुद्र ऐकुन शेवटी मी द घनपाठी या युट्यूब चॅनलवर शोध घेत घेत पोहचलो. हा चॅनल म्हणजे जणु अमोघ रत्नांचा खजीनाच आहे.
यात मला रुद्र घनपाठात देखील ऐकावयास मिळाले ! :) आज पहिला श्रावण सोमवार आहे, या निमित्त्याने रुद्र पाठ इथे देत आहे.
[ Om Shiva Hom ]

============================================================================================

============================================================================================
रुद्र घन पाठात :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Mahanubhavudu Full Video Song HD | Mahanubhavudu Video Songs | Sharwanand | Mehreen | Mango Music

आज गणेश चतुर्थी निमित्त्याने अमृतराय रचित कटाव इथे देत आहे.

या कटाव बद्धल अधिक माहिती इथे मिळेल :- अमृतराय यांच्या कटाववृत्तामधील गणेश स्तुती : एक सुखद प्रवास !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Cover

श्वेता२४'s picture

5 Sep 2022 - 11:09 am | श्वेता२४

कालच दाक्षिणात्य हिंदी डब साई पल्लवी अभिनीत 'गार्गी' हा सिनेमा पाहिला. क्राईम-सस्पेन्स -कोर्ट ड्रामा प्रकारचा हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. चित्रपटाचा शेवट अनपेक्षित व धक्कादायक. प्रत्येक पालकाने अवश्य पहावा असा चित्रपट. यू ट्यूबवर आहे.

इरफान खान नंतर सहजसुंदर अभिनय पाहायला मिळेल का याची चुटपुट होती पण तो आला तो लढला,तो जिंकला-पंकज त्रिपाठी याने ती पोकळी भरून काढली.पंकज त्रिपाठी याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सध्या त्यांची क्रिमिनल जस्टीन -एक अधुरा सच ही वेब सिरीज hotstar वर पाहत आहे.दर शुक्रवारी पुढील भाग प्रदर्शित होते.तीन भाग प्रदर्शित आहेत.