प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
21 Dec 2019 - 11:00 am

मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे.

तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो. तसेच तो प्रवास पायी, सायकलपासून ते थेट आगगाडी, बस, खाजगी कार, आगबोट इत्यादी विविध वाहनांमधूनही होत असतो. अशा प्रकारच्या प्रवासासाठी तयारीचा वेळ काही वेळा अगदी काही मिनिटांचाही असू शकतो. अशा कमी वेळात लगेचच तयारी करुन प्रवासाला निघणे होते. मग आहे ते सामान पिशवीत भरले जाते किंवा महत्वाची वस्तू राहून जाते. गेलेल्या ठिकाणी मग आपल्याला लागणारी वस्तू पुन्हा घ्यावी लागते.

प्रवासाच्या तयारीला काय काय गोष्टी लागू शकतात याची संभाव्य यादी कुणी केलीही असेल. मला आठवते की खूप पुर्वी मायक्रोसॉप्टच्या ऑफीससूटमध्ये एका अ‍ॅप्लीकेशनमध्ये अशी विस्कळीत यादीचे टेम्प्लेट होते. इंटरनेटवर शोध घेतांना अशा रितीची चेकलिस्ट भेटूही शकते पण ती इंग्रजीत आहे आणि ती आपल्या राहणीमानाप्रमाणे नसावी. अर्थातच अशी यादी परिपूर्ण असूच शकत नाही. कारण व्यक्तीपरत्वे गरजा भिन्न होत जातात. मला एखादी गोष्ट आवश्यक असेल ती दुसर्‍याला अवांतर वाटेल.

खाली अशा प्रवासाला लागणार्‍या किंवा प्रवासात उपयोगी पडणार्‍या वस्तूंची यादी दिलेली आहे. सदर यादी वस्तूंच्या कोणत्याही क्रमाने नाही. सदर यादीत एका ओळीत एकच वस्तू येईल अशी बनवली आहे जेणे करून याची प्रिंट घेवून प्रवासाला निघण्यापुर्वी टिकमार्क करत वस्तू गोळा करायला सोप्या व्हाव्यात.

आपण हि यादी नजरेखालून घाला. काय वस्तू असाव्यात, काय नसाव्यात ते येथे लिहा म्हणजे चर्चाही होईल अन यादीपण परिपुर्ण होत जाईल.

टूथ ब्रश
पेस्ट
दाढीचे सामान
कंगवा
सेफ्टी पीन्स
सौंदर्यप्रसाधने
अंडरपॅंट, बनीयन
टॉवेल
साबण
प्रवासात उलटी न होवू देणारी गोळी (अ‍ॅव्होमीन किंवा इतर)
रक्तदाब, मधूमेह किंवा नेहमी लागणारी औषधे, क्रिम
डोकेदूखीवरचा बाम, आयोडीन, अमृतांजन, झेंडू तत्सम
इस्त्री केलेले ड्रेस
एक्स्ट्रा पिशवी
प्लॅस्टीक कॅरी बॅग
एखादी स्लिपर, चप्पल
गरम कपडे, मफलर, टोपी
कानात घालायचा कापूस
नाईट पॅंट, रात्रीचे कपडे
चष्मा घर
उन्हाची टोपी, गॉगल
छत्री, रेनकोट (हवामानाप्रमाणे)
मोबाईल
चार्जर, पॉवरबँक
हेडफोन
सेल्फी स्टिक
कॅमेरा
चटई
फळे कापण्याचा चाकू
जूने वर्तमानपत्र
पैसे, सुट्टे पैसे
क्रेडीट, डेबीट, ट्राव्हल कार्ड
फास्टॅग रिचार्ज केले का?
लिहीण्यासाठी पेन
कागद
जेथे जायचे तेथले फोन क्रमांक (कागदावर लिहीलेला असावा. मोबाईल कधीही दगा देवू शकतो.)
महत्वाचे फोन क्रमांक लिहीलेला कागद
जाण्याचा रस्ता असलेला नकाशा, पत्ता इ.
वाहनासंदर्भात कागदपत्र जसे आर सी बूक, ड्रायव्हींग लायसन्स
पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड
आपल्या पत्याचे ओळखपत्र (आपल्याकडच्या बॅगांमध्ये असे ओळखपत्र टाकून ठेवावे. हरवल्यास बॅग परत मिळण्याची शक्यता वाढते. स्वानूभव आहे.)
जेवणाचा शिधा किंवा डबा
इतर वेळेचा खाऊ
बिस्कीट, मॅगी
लहान मूल असल्यास त्यांचा खाऊ, दूधाची सोय.
पाण्याच्या बाटल्या
फर्स्ट एड
स्वतःची गाडी असल्यास गाडीसाठीच्या वस्तू वाढतात त्या लक्षात ठेवणे. (जसे आरसी बूक, स्टेपनी, गाडीतले ऑईल, हवा, पाणी, पेट्रोल, लायसन्स इत्यादी.)
इतर सदस्य बरोबर असतील तर या यादीतील वस्तू त्यांच्या गरजेप्रमाणे परत वरतून चेक करत येणे.
ट्रेकींग, एखादी मोहीमेसाठी प्रवास असेल तर गरजेप्रमाणे पुन्हा या वस्तू वरतून चेक करत येणे.
अधिकच्या वस्तू.....
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------
--------------------------

जीवनमानप्रवासभूगोलदेशांतरअनुभवमतशिफारससल्लामाहितीचौकशीमदत

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Dec 2019 - 2:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

स्वतः गाडी चालवणार असाल तर आवडत्या गाण्यांची सी डी किंवा पेन ड्राईव्ह
सोफ्रामायसीन आणि कैलासजिवन
परदेशी जाणार असाल तर युनिव्हर्सल अ‍ॅडाप्टर
सुई दोरा आणि काही बटणे
कपडे वाळत घालायला दोरी
आणि एखादी रिकामी बाटली किंवा टमरेल (परदेशात बर्‍याच वेळा टमरेल किंवा हँड स्प्रे नसला की पंचाईत होते)

अजून आठवले की लिहितो

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2019 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या प्रवासाबरोबर सामानाचा एक टेंपोच घ्यायला सुचवत आहात की काय...? कुठेही जायचं तर एक तर कमी ओझं असलं पाहिजे. कमी बॅगा. अतिशय महत्वाचं जे असेल तेच घ्यावं उगा बॅगेत ओझं नसलं पाहिजे. आता आपण मोबाईल आणि सध्याच्या धावपळीच्या जगात नसत्या तापांनी विसरभोळे होत चाललेले आहोत. (असा काही विदा नाही पण वाटतं. ) प्रवास पाहून पैसे, आवश्यक सामानासहित एका व्यक्तीला एक बॅग. बस संपलं.

काही आठवलं तर लिहितो.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

21 Dec 2019 - 5:20 pm | दादा कोंडके

माझे दोन थेंब,

१. डिल्डो, मास्टरबेटर/वायब्रेटर
२. जेली
३. निरोध
४. वायग्रा
५. हॉटेलजवळ असणारे मसाज सेंटर्सच फोन नंबंर्स

जॉनविक्क's picture

21 Dec 2019 - 9:17 pm | जॉनविक्क

असे लिहायचे अगदी बोटांवर आले होते, पण धागकर्त्याचीहात आखडता घेतला :) आपण लिहून माझा भार हलका केला.

आपल्या लिस्टशी सहमत.

जॉनविक्क's picture

21 Dec 2019 - 9:18 pm | जॉनविक्क

पण धागकर्त्याचीहात आखडता घेतला

पण धागकर्त्याची भावना ओळखून हात आखडता घेतला असे वाचावे

दादा कोंडके's picture

23 Dec 2019 - 1:22 am | दादा कोंडके

भावना पतिव्रता प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच मी अतिशय सिरियसली प्रतिसाद दिला आहे.

माझ्या मते या प्रवासासाठी लागणार्‍या गरजेच्या वस्तू आहेत. नेहमी प्रवास करणारे म्हणजे मोठ्ठे मार्केटींग ऑफिसर्स ते एम आर, आउटस्टेशन ड्रायवर्स ते देवस्थाने फिरणारे यात्रिक (इथं देवळं, वारी, पालखी, चर्च, मशिदी, दर्गा वगैरे सगळं आलं उगाच वस्सकन अंगावर येउ नये) यांना उपयोगाचे आहेत. बहुतेकजण उघड उघड मान्य करणार नाहीच कारण आपला समाज म्हणजे हिप्पोक्राईट.... (नेहमीच टॅण टॅण सुरू..*)

*पुलंच्या म्हैस मधून साभार.

दुर्गविहारी's picture

21 Dec 2019 - 7:10 pm | दुर्गविहारी

उत्तम धागा ! हा भटकंती विभागात काढला असता तर बरे झाले असते. ट्रेकविषयक लिखाण मी करत असल्याने, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अश्या तिन्ही ऋतुत कोणती काळजी घ्यायची याचे तीन वेगळे धागे काढले होते, त्याच्या लिंक देतो.

पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks )

हिवाळी भटकंती: ट्रिक्स आणि टिप्स !

उन्हाळी ट्रेक, घ्यावयाची काळजी ( Summer Treks: Tips)

मुक्त विहारि's picture

21 Dec 2019 - 9:14 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. ..

आम्ही आमच्या बॅगा भरायचे काम आमच्या सौ. कडे दिले आहे.

आम्ही फक्त ओझे उचलतो.

वामन देशमुख's picture

21 Dec 2019 - 11:28 pm | वामन देशमुख

कोणे एके काळी (म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी) प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची मी केलेली यादी खाली देत आहे, या यादीतील वस्तूंमध्ये खालील कारणांमुळे बदल / वाढ / घट होऊ शकते -

  • प्रवासाचा काळ :- एक-दोन दिवस / एक आठवडा / एका आठवड्याहून अधिक
  • प्रवासाचा प्रकार :- विमान / रेल्वे / बस / कार / बाईक / सायकल
  • प्रवासी - तरुण पुरुष / स्त्री- पुरुष जोडी / पती पत्नी मुले / कुटुंब इ.
  • इतर निकष :-

प्रवासासाठी घ्यावयाच्या वस्तूंची यादी -

खाद्यपदार्थ :-
सातूचे पीठ, बत्ताशे, पिठीसाखर, पोहे, चिवडा, लाडू, मेतकुट, बिस्किटे, चॉकलेट्स इ.

इतर सामग्री: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे)
आरसा, कंगवा, साबण, टूथ-पेस्ट, ब्रश शाम्पू, पेपर-सोप, खोबरेल, टिश्यू-पेपर, टूथपिक्स, इअर-बड्स

औषधी: (सर्व वस्तू एका लहान पाउचमध्ये एकत्र ठेवणे)
बीपीच्या गोळ्या, डायबेटिकच्या गोळ्या, डोळ्यांचे ड्रॉप्स
इनो, झंडूबाम, ओडोमॉस, सर्दी-ताप-अंगदुखीच्या गोळ्या, स्ट्रेपसील, ग्लुकॉन-डी

प्राथमोपचाराचे साहित्य: (औषधांच्या पाउचमध्ये ठेवणे )
बँड-एडच्या पट्ट्या, पांढरे बँडेज, क्रेप बँडेज (गुलाबी), कापूस, कात्री, आयोडीन/मलम/ पावडर, डेटॉल,

कपडे व इतर वस्तू:
शर्ट, टी शर्ट्स, पँट्स, साड्या व इतर कपडे, टॉवेल/पंचा, स्कार्फ, रुमाल, शाल, बेडशीट, इ.
चप्पल, बूट, सॉक्स,

उपयुक्त वस्तू: (लगेच सापडतील अश्या ठिकाणी, उदा, बॅगेच्या बाहेरील खिश्यात ठेवणे)
साखळी, कुलूप-चावी, बॅग, खांद्यावरची पर्स, औषधे ठेवण्याची पाउच, चिल्लर पैसे/नोटा ठेवण्यासाठी लहान पाउच,
लहानसहान वस्तू ठेवण्यासाठी लहान पिशवी/ पाउच, कॅरीबॅग, इ.
नायलॉनची दोरी, सुई-दोरा, सेफ्टी-पिना, आगपेटी व मेणबत्ती, बॅटरी, इ.
नेल-कटर, कात्री, छोटा चाकू, छोटा स्टीलचा ग्लास, चमचा, हवेची उशी, इ.
मोबाइल, चार्जर, इअर फोन, पॉवर बँक, कॅमेरा, घड्याळ, चष्मा, गॉगल इ.

महत्वाचे साहित्य: (खांद्यावरील पर्समध्ये ठेवणे)
ओळखपत्र, फोटो, रोख रक्कम, एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड, तिकिटे, कोरे कागद, डायरी, पेन, पोथ्या, इ.

याशिवाय लागणाऱ्या इतर वस्तू :-

चौकटराजा's picture

22 Dec 2019 - 11:11 pm | चौकटराजा

मी भारतात पुश्कळ प्रवास केला आहे . कुठलेही कार्ड प्रवासाला नेले नाही .काही अडले नाही.
प्रथमोपचार साधने नेऊन उगीच वजन वाढवू नये.
एख्गादा कोरा कागद बरोबर घ्यावा पेन घ्यावे बाकी स्टेशनरी जास्त घेऊ नये .
उगीच जास्त फळे बरोबर घेऊन वजन वाढवू नये.
स्त्रीयानी अनावश्यक पणे सौंदर्य प्रसाधने घेऊन पर्स चे वजन वाढवू नये. सर्व कुटुंबात मिळून एकच कंगवा चालू शकतो.
प्रवासात नेलकटर ची काय गरज आहे ? नखे प्रवासाला निघतानाच कापून निघावे.
पुरूषांनी पुरती शेव्हींग क्रिमची बाटली घेऊ नयेच सुटे थोडे बरोबर घ्यावे ! काही बिघडत नाही.
ग्रुप मध्ये एडस किंवा टीबी चा रोगी नसेल तर प्रत्त्येकास एक टॉवेल घेण्याची घेण्याची गरज नाही . दोघात एक टॉवेल एका आंघोळीला पुरतो.
पैसे जास्त गेले तरी चालतील पण चार चाके असलेली बॅग घ्यावी.
कुलुपे सर्वांच्या सर्व नंबर ची घ्यावी. चावी हरवली वगैर समस्याच उद्भवत नाही.
सीजन नसल्यास उगीचच छत्री बरोबर नकोत. युरोप मात्र याला अपवाद !
यात्रा कंपनी बरोबर प्रवास नसेल तर कपड्याची जबाबदारी (वजनाची) ज्याची त्याने घ्यावी असा नियम करावा .बायका मुकाटपणे कमी कपडे घेण्यास तयार होतात.
जितके दिवस प्रवास आहे तितक्याच दिवस पुरेल इतकी टूथपेस्ट ,खोबरेल तेल साबण वडी घ्यावी .
बचकाभर रबर बँड बरोबर घेऊ नयेत.
सेफ्टी पिनांचे अख्ख्ये पाकीट बरोबर घ्यायची जरूर नसते.
प्रवासात रोज एक नवा सेंट अंगावर करायचाच कशाला ? अनेक सेंट चा ज्याला शौक आहे त्याने उचलायच्या बँगेतच अशा वस्तू भराव्यात.
प्रवासात तुमचे परस्पर प्रेम जरा बाजूला ठेवून ज्याचे ओझे त्यानेच उचलायचे असा नियम केल्यास सगळे प्रश्न सुटतात . प्रत्येक वेळी तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी हमाल मिळेलच याची गँरंटी अजिबात नसते.

ती म्हणाली, मग लग्न करून काय उपयोग?

लग्न करून एक गाढवपणा सिद्ध केलाच आहे. त्यामुळे आता ओझे बाळगणे, भागच आहे...

डासांपासून बचावासाठी ओडोमास, गुड नाईट फॅब्रिक रॉल ऑन, कच्छवा छाप वगैरे तत्सम.

आणि अंगावर कपडा असेल तर कुठल्याही प्रवासात काही आडत नाही जर आडमार्गाने जात नसाल तर

चिकित्सक's picture

3 Jan 2020 - 6:21 pm | चिकित्सक

प्रवासात लहान मुल असतील तर त्यांच्या साठी डाइपर , साबण , वाइप्स , टॉवेल , फॉर्मुला मिल्क , थर्मस , गरम पाणी आणि खेळणी , फोल्डिंग पाळणा घेणे भाग आहे | नुकताच पुणे ते भोपाळ ट्रेन ने प्रवास केला आणि ह्या पैकी एक जरी वस्तू विसरता काय भोगावलागत ह्याच अनुभव घेतला आहे!!