(सूरनळीचे उपयोग)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
9 Dec 2019 - 9:12 am

एका कोपर्‍यात अंग फुगवून बसली होती सूरनळी
टोकावरल्या डोळ्यांनी मला पाहत होती ||

माझ्याशी बोलायला लागली ती जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही माहित आहे ही आहे थापेची गोळी ||

"
अनेक गोष्टीं मधे उपयोग माझे जळी स्थ्ळी
तरी तुम्ही का बोलतात घालून घे रे सूरनळी
हेअर पीन ने कान कोराल तर त्याने सूजेल कानाची पळी ||

पूर्वी आदेशांना होता मोठा बाजार भाव
साहेबांच्या मागे धावायचे सगळे रंक आणि राव
आता मात्र न्याय आहे बळी तो कान पिळी ||

कधीही मी कामी येई सुटता कानी खाज
कोणत्याही कागदाचा तुकडा शोधा सोडून लाज
मोठ्या निगुतीने मग त्याची गुंडाळी वळी ||

उपयोग संपल्यावर तुम्ही मला कचर्‍यात टाकता
चोळामोळा करता आणि कुठेही भिरकावता
क्षणार्धात माझा उपयोग तुम्ही विसरुन जाता
मी मात्र तुडवली जाते कोणाच्याही पायदळी ||

कानात फिरवा बघा कशी झोप उडते
नाकात फिरवलेत तर फटाफट शिंक येते
नाक मोकळे होताच चेहर्‍याला येईल झळाळी ||

इतक्यात घाईने गुरुजी आले वर्गात
काय कचरा केला आहे? ओरडले मला जोरात
त्यांच्या ओरडण्याची मी केली मग सुरनळी
आणि विचारले घालू का ती योग्य स्थळी ||

पैजारबुवा,

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचारोळ्याप्रेमकाव्यइंदुरीउपहाराचे पदार्थऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

9 Dec 2019 - 9:55 am | यशोधरा

=))

कंजूस's picture

9 Dec 2019 - 10:02 am | कंजूस

इंदुरी ट्याग कशाला तो सुरनळीला?

जॉनविक्क's picture

9 Dec 2019 - 1:36 pm | जॉनविक्क

कहर!

पाषाणभेद's picture

9 Dec 2019 - 2:42 pm | पाषाणभेद

पैजारबुवा, मूळ कविता झाकून ठेवली तर लग्नाच्या बाजारात हिलाच जास्त मागणी असेल.

एकदम झकास!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Dec 2019 - 4:30 pm | ज्ञानोबाचे पैजार

पाभे क्षमा करा पेरणा लिवायची राहिली.
कच्चा माल उत्तम प्रतिचा असेल तरच उत्तम दर्जाचे विडंबनारिष्ट बनवता येते.
पैजारबुवा,

खिलजि's picture

12 Dec 2019 - 2:51 pm | खिलजि

काल वाचायचं राहूनच गेलं .. झक्कास झालंय ,, फक्कड

मुक्त विहारि's picture

14 Dec 2019 - 3:38 pm | मुक्त विहारि

आवडलं. ..

प्राची अश्विनी's picture

16 Dec 2019 - 11:40 am | प्राची अश्विनी

:):)