ना देवेंद्र देव इथे
ना उद्धव आहे साव
आजही बळीराजा भीक मागतो
पण , त्याला काडीचा नाही भाव
संगीत खुर्ची चालू झाली
पवार वाजवतायत बिगुल
हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे
पण आपलीच बत्ती गुल
किती बघावं , काय बघावं
कळत नाही काहीच
जो तो आम्हाला नाग वाटतो
आपला वाली कुणी नाहीच
का लावला डाग नखाला ?
डोक्याची झालीय भेळ
कोण बसणार खुर्चीवरती
यातच चाललाय वेळ
लाज बाळगा जरा मनाची
पुरे हि शोभायात्रा
लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत
कि वेड्यांची भरलीय जत्रा
कुणीही बसावे , काही करावे
आता मेलेय माझे मन
डाग पुन्हा कधी लावणार नाही
हा करतोय आज मी पण
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
27 Nov 2019 - 1:08 pm | मुक्त विहारि
आवडली. ..
27 Nov 2019 - 4:15 pm | खिलजि
धन्यवाद मुवि काका
27 Nov 2019 - 6:26 pm | मुक्त विहारि
छान आहे कविता. ...
27 Nov 2019 - 5:55 pm | यशोधरा
पर्फेक्ट.
30 Nov 2019 - 3:41 pm | खिलजि
@ मुविकाका
धन्यवाद कविता वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल दिलाय ओ .. असो आपला हा प्रतिसाद वाचून मला आपण जुन्याजाणत्या मिपाकराबरोबर संवाद साधल्यासारखं वाटलं .. हलकेच घ्या आणि परत प्रतिसाद नका .. हवंतर व्यनि करा ..
@ यशोधरा ताई
धन्यवाद
30 Nov 2019 - 10:26 pm | जॉनविक्क
याsssलाss राजकारण ऐसे नाव