धागा चालेना, धागा पळेना... धागा संथ चाली, काही केल्या पेटेना

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
23 Jun 2019 - 6:53 am

कवी " बी " यांना विनम्र अभिवादन

धागा चालेना, धागा पळेना
धागा संथ चाली, काही केल्या पेटेना

गेलो ट्यार्पीच्या बनी
म्हंटली ट्रोलांसवे गाणी
आम्ही सुरात सूर मिळवून रे

गेलो डू-आयडीच्या बनी
डूख धरला मी मनी
ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे

चल ये रे, ये रे ट्रोल्या
टोचू उचकवू घालु काड्या
टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक

हे मिपाचे अंगण
अम्हां दिले आहे आंदण
ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे

आयडी विषयाचे किडे
यांची धाव प्रतिसादाकडे
आपण करू शुद्ध "पिंक"पान रे

धागा पेटला आला बहरून
ट्रोलांनी दिला विषय भरकटून

कोण मी - ट्रोल? कोठे डू-आयडी जण रे

vidambanकाहीच्या काही कवितामुक्त कविताविडंबन

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

23 Jun 2019 - 7:17 am | श्वेता२४

झकास जमलीय. मस्तच

यशोधरा's picture

23 Jun 2019 - 8:18 am | यशोधरा

=))

दुर्गविहारी's picture

23 Jun 2019 - 1:05 pm | दुर्गविहारी

मस्त लिहीले आहे.

जॉनविक्क's picture

23 Jun 2019 - 1:15 pm | जॉनविक्क

फक्त इतकेच सिमीत राहू नका, अजून विविध विषय हाताळा. आपल्या क्रिएटिव्हिटीला सलाम.

जालिम लोशन's picture

23 Jun 2019 - 2:13 pm | जालिम लोशन

:-)

नाखु's picture

23 Jun 2019 - 6:28 pm | नाखु

हे मिपाचे अंगण
अम्हां दिले आहे आंदण
ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे

हेच गेल्या दोन-तीन वर्षांत अनुभवयास येत आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jun 2019 - 12:29 am | डॉ सुहास म्हात्रे

=))

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jun 2019 - 10:08 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त, झकास लिवले आहे, माझे हे हात शिवशिवत आहेत.
डोक्यातले बटाटे शिजायला लागले आहेत.
टाकतोच यावर अजून फोडणी,

पैजारबुवा,

इरामयी's picture

24 Jun 2019 - 4:32 pm | इरामयी

अगाध!

सर्व प्रतिसादकांचे आभार _/\_

धागा चालेना, धागा पळेना
दहाच्या पुढे काही जाईना !!

प्रतिक्रिया लिहिता येतात पण मला नवीन धागा च सुरु करीत येत नाहीये ?
उजव्या बाजूस "नवीन लेखन" असे शीर्षक दिसतंय त्यावर टिचकी मारल्यानंतर काही तरी लिहिण्याची खिडकी उघडेल असे वाटले होते परंतु तसे ना होता
"नवे लेखन" हि यादी समोर येते?
कोणी म्हणते मिपा वॉर सध्या काही तरी तांत्रिक अडचण आहे , कारभारी म्हणतात कि "नवीन लेखन" यावर टिचकी मारा

दुसरे असे कि समजा परवलीचा शब्द बदलला , इमेल आले कि एक एरर संदेश येतो !
काय कळत नाहीये

चामुंडराय's picture

27 Jun 2019 - 7:52 am | चामुंडराय

नव्या लिखाणावर टिचकी मारल्यावर साहित्य प्रकार निवडा आणि लिखाण करा
मात्र कृषी आणि प्रश्नोत्तरे साठी ऍक्सेस डिनायीड येतो आहे.

काही प्रॉब्लेम आहे का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2019 - 11:24 am | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर नवीन धागा लिहिण्यासाठी...

१. "लेखन करा" या पर्यायावर क्लिक करा. ("नवीन लेखन" नाही... तो मिपावर नवीनच प्रसिद्ध झालेले लेख दाखवतो.)

२. पुढे आलेल्या पानावर धाग्यांच्या प्रकारांची यादी दिसेल, त्यातून हव्या असलेल्या धाग्याच्या प्रकारावर क्लिक करा.

३. त्यानंतर पुढे आलेल्या पानावरील एडिटबॉक्समध्ये धाग्याचा मजकूर लिहा व (असल्यास) चित्रे टाका. चित्रे टाकण्यासाठीची प्रक्रिया येथे सापडेल.

४. लेखाच्या वर असलेल्या, सर्वात वरच्या टेक्स्टबॉक्समध्ये लेखाचे शीर्षक लिहा.

५. लेखाच्या प्रकाराप्रमाणे, (लेखाच्या वर असलेल्या टेक्स्टबॉक्समध्ये) त्याचे वर्गिकरण लिहा किंवा (लेखाच्या खाली असलेल्या टेक्स्टबॉक्समध्ये) त्याचा लेखनप्रकार आणि लेखनविषय निवडा.

६. लेखाच्या खाली असलेला "पूर्वपरिक्षण" पर्याय वापरून तात्पुरत्या प्रसिद्ध होणार्‍या लेखाचे (जो फक्त तुम्हालाच दिसतो) परिक्षण करा. जरूर असल्यास मजकूर/चित्रांत योग्य ते बदल (संपादन) करा आणि परत पूर्वपरिक्षण करा. लेख प्रकाशित करण्याअगोदर, हे तुम्ही कितीही वेळा करू शकता.

७. प्रकाशित केलेल्या लेखात तुम्हाला बदल (संपादन) करता येणार नाही. म्हणून, लेख समाधानकारक झाला आहे अशी खात्री झाल्यावरच "पूर्वपरिक्षण" पर्यायाच्या लगतच असलेला "प्रकाशित करा" हा पर्याय वापरा.

विशेष सूचना :

अर्धवट लिहिलेला मजकूर साठवण्याची सोय मिपावर नाही. त्यामुळे...

१. अनेक बैठकींत लेख लिहित असल्यास, अर्धवट लिहिलेला मजकूर एमएस वर्ड किंवा तत्सम मजकूर (टेक्स्ट) साठविणारे अ‍ॅप्लिकेशन वापरून स्वतंत्रपणे साठवून ठेवा. परत मिपावर आल्यावर तो मजकूर मिपावर कॉपी करून लेखाचा पुढचा मजकूर लिहायला सुरुवात करा.

२. किंवा, मजकूर लिहायला दुसरे एखादे सोईस्कर अ‍ॅप्लिकेशन वापरून पूर्ण केलेला लेख मिपावर कॉपी करून तो प्रसिद्ध करा.

गड्डा झब्बू's picture

27 Jun 2019 - 1:38 pm | गड्डा झब्बू

>>>आयडी विषयाचे किडे
यांची धाव प्रतिसादाकडे
आपण करू शुद्ध "पिंक"पान रे>>>
+1

खिलजि's picture

29 Jun 2019 - 4:19 pm | खिलजि

जबराव जबराव जबराव

आवडेश भारी आवडेश