प्रेर्ना - विळखा पाहू
तू मतदार माझा
भोट, भोंगळ अजीजी
तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा
मस्तवाल नेता मी ....
घेऊन जमेस तुला
निव्वळ उगी तुंबडी भरावी
बोभाटा करावा मी एव्हढा
की लाभावी मज(समोरची) वाटणी
सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.
वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला
प्रतिक्रिया
21 Apr 2019 - 8:30 am | चामुंडराय
हा हा ... भारी नाखु काका
सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदम पर्फेक्ट.
हि घ्या तुमची प्रेर्ना
ओळखली कि नाही ब्रोब्बर ?
21 Apr 2019 - 9:20 am | ज्ञानोबाचे पैजार
आणि समयोचित
आवडली
पैजारबुवा,
21 Apr 2019 - 9:25 am | स्वामि १
देशात सर्वत्र निवडून आल्यानंतर आमदार खासदार गब्बर होतात हे माहीत असूनही आपण ह्याला विरोध का नाही करत?
21 Apr 2019 - 9:27 am | स्वामि १
देशात सर्वत्र निवडून आल्यानंतर आमदार खासदार गब्बर होतात हे माहीत असूनही आपण ह्याला विरोध का नाही करत?
21 Apr 2019 - 10:17 am | अभ्या..
कारण आपण हात छाटलेले ठाकूर झालेलो असतो.
अजून वारा येऊन शाल उडालेली नाहीये म्हणून कळालेले नाहीय.
21 Apr 2019 - 11:57 am | mrcoolguynice
गब्बरसिंग व सांभा, यां दोघांच्या जोड़ीचा बंदोबस्त करायला हवा.
21 Apr 2019 - 4:22 pm | स्वामि १
ह्या चा बंदोबस्तात कसा करावा
21 Apr 2019 - 4:38 pm | अभ्या..
तुम्ही सांगणार होता ना स्वामी?
काही 10 12 कलमी कार्यक्रम किंवा प्रिंट बींट नाहीये का?
21 Apr 2019 - 5:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! रखरखीत वास्तव. :(
23 Apr 2019 - 3:35 pm | खिलजि
आईची आन
बोल्ले तो शॉल्ले वाल्ले लिखाण
समयोचित आणि सुपरहिट
बोल्ले तो राम का बाण
झंडूबाम , पीडाहारी बाम
" कौन कहता है नेताओको दर्द नाही होता "