दर महा १०% परतावा शक्य आहे का?

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
17 Jan 2019 - 3:51 pm

लोक हो

केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी
देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत).

सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो.

खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत.

10pc

गुंतवणूकलेख

प्रतिक्रिया

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 1:17 pm | ज्ञानव

तीन ट्रेडिंग सेशनमध्ये १५% चालला आहे. अर्थक्षेत्रावरच्यांना आम्ही किती घेतले आहेत ते माहित आहेच. पण वस्तुस्थिती बऱ्याच जणांना पचत नाही. ह्यचा अर्थ स्थिर मन आणि व्यवस्थित अभ्यास असेल तर १५% पण पडणाऱ्या शेअर्स मधून मिळू शकतात असा माझा दावा आहे.

माझ्या प्रकुतीबाहेर जाऊन बरीच टोलामारी झाली इथे. त्याचा आनंद जर कुणाला होत असेल तर त्यातूनही मी काहीतरी कमावलेच म्हणायचे.
बऱ्याच दिवसांनी इथे आलो होतो पण पुन्हा २०१३ सारखाच अनुभव यावा हे काही चांगले चित्र नाही.

मराठी कथालेखक's picture

22 Jan 2019 - 3:58 pm | मराठी कथालेखक

तुम्ही दिलेल्या तक्त्यात PRAJIND OP = 148 CL = 153.95 या महिन्याच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या किमती आहेत असे वाटते.
मग (153.95-148)*100/148 = 4.02 % असे येते. मग हे दरमहा १०% पेक्षा जास्त कसे ?
इथे CHG चे नेमके सूत्र आणि अर्थ काय आहे हे स्पष्ट होत नाही.

बाकी दरमहा १०% परताव्याबाबत -
या बाबत मी फार विश्वासाने काही सांगू शकणार नाही. पण कोणताही एक शेअर वर्षानुवर्षे दरमहा १०% परतावा देवू शकेल असे वाटत नाही. मात्र दरमहा १०% परतावा देणारा पोर्टफोलिओ कदाचित बांधता येवू शकेल पण त्याकरिता खूप जास्त अभ्यास (सांख्यिकी, कंपन्यांबद्दलची माहिती) करुन तो सतत अद्ययावत ठेवावा लागेल. भारतात राकेश झुणझुणवाला हे नाव खूप मोठे आहे. त्यांचे मॉडेल नेमके काय आहे माहित नाही. पण सामान्य कुवतीच्या गुंतवणूकदारांना दरमहा १०% नाही तरी दरवर्षी १५-२०% परतावा देणारा पोर्टफोलियो बांधता येणे अशक्य नाही. अर्थात त्याकरिता द्यावा लागणारा वेळ, चिकाटी आणि स्वतःच्या इतर जबाबदार्‍या , लागणारी तरलता , जोखीम घेण्याची क्षमता (ही वय, खर्च , उत्पन्नाचे स्थिर स्त्रोत ई वर अवलंबून असते) याचा विचार करता स्वतःची सगळीच गुंतवणू़ थेट शेअर्समध्ये करु नये हे शहाणपणाचे. लिक्विड/डेट फंड, सोने, जमीन ई इतर गुंतवणूकही काही प्रमाणात करत रहावी. यातही लिक्विड फंड उत्तम.

हा धागा आणि त्यावरचे सर्व प्रतिसाद वाचल्यावर असे लक्षात आले कि धागालेखक युयुत्सु यांचा मुद्दा आणि त्याच्या विरोधात असलेला डॉक्टर खरे साहेबांचा मुद्दा आणि दोन्हीच्या मागचे विचार मला पटले आहेत. थोडी विचित्र गोष्ट आहे खरी, पण तरीसुद्धा :)

>>>शेअर बाजारात पैसे मिळवता येतात. पण ते शिस्तबद्ध कार्यक्रम असेल तरच मिळवता येतात. अंदाजपंजे किंवा ऐकीव माहितीवर आधारित केलेला व्यवहार आतबट्ट्याचा असतो हे लक्षात ठेवावे. >>>

सहमत. हि गोष्ट नजरेआड करून शेअर्स कडे 'एक फायदेशीर ठरू शकणारा गुंतवणुकीचा पर्याय' ह्या दृष्टीने न बघता इंट्राडे ट्रेडिंग, F&O, पुट-कॉल च्या नादी लागल्यास लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाहीत हा स्वानुभव आहे.

आणि खरे साहेबांनी लिहिल्याप्रमाणे सातत्यपूर्ण परतावा मिळेलच ह्याची कुठलीही खात्री देता येत नाही. अभ्यास आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाच्या बरोबरीने नशिबाची साथही आवश्यक आहे. त्याच्या जीवावर तेजी असो कि मंदी कमावणारे कमावतात तर बहुतांश लोकं गमावतात!

तसेच वरती भंकस बाबांनी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे

>>>ब्रोकरेज हाउसेस चोर कंपन्या असतात. ह्यांच्या बोळ्याने दूध पिणारा हमखास तोंड पोळून घेतो >>>
हे देखील खरे आहे कारण,

खेलनेवाले कभी हारतें है तो कभी जितते है...लेकीन खिलानेवाले का घर हमेशा भरा रेहतां है!

शहेनशाह चित्रपटात जुगारी हॉटेल चालवणाऱ्या 'मुख्तारसिंग'च्या तोंडीचा हा डायलॉग शेअर ट्रेडिंगच्या बाबतीतही तंतोतंत लागू होतो. तुम्हाला फायदा होवो कि नुकसान हा भाग अलाहिदा, ब्रोकर्सना खरेदी/विक्रीच्या व्यवहारांवर त्यांचे कमिशन हे मिळतेच मिळते.

२००९ साली एका कुमुहुर्तावर शेअर ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली होती, आणि वर्षभरात चांगलेच हात पोळून घेतल्यावर त्याकडे आजतागायत पाठ फिरवली आहे.पण मध्यंतरी एक रोचक माहिती मिळाली आहे, त्या मॉडेल प्रमाणे वागून ह्यावर्षी पुनरागमन करायचा विचारही घोळतोय डोक्यात.

युयुत्सु's picture

22 Jan 2019 - 4:07 pm | युयुत्सु

इथे CHG चे नेमके सूत्र आणि अर्थ काय आहे हे स्पष्ट होत नाही.
मी इतर रकाने बघु नये असे म्हटले ते म्हणून्च... :) तो ओपन १६ जानेवारीच्या आठवड्याचा आहे.

मराठी कथालेखक's picture

22 Jan 2019 - 5:43 pm | मराठी कथालेखक

.. कळाले..धन्यवाद

संपत्तीची निर्मिती आणि आपण भारतीय

ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल भीति किंवा तिटकारा आहे त्यांनी Why Wall Street Matters
By WILLIAM D. COHAN हे पुस्तक अवश्य मिळवुन वाचावे.

सहज गंमत म्हणून स्टॉक मार्केटचा इतिहास आणि आपला इतिहास एका काल रेषेवर मांडायचा प्रयत्न केला तेव्हा काय दिसते हे पुढे सिले आहे . ही मांडणी अत्यंत जुजबी कल्पना येण्यासाठी केली आहे. पण त्यामुळे असे लक्षात येते जग जेव्हा नव्या आर्थिक कल्पना स्वीका्रून संपत्तीची निर्मिती करत होते, तेव्हा आपण परकीयांशी आणि स्वकीयांशी लढत होतो. या देशात कोणत्याही नव्या कल्पना निर्माण होत नव्हत्या. आजही फार काही होत आहे असे मला वाटत नाही (हे माझे वैयक्तिक मत आहे). आजही नव्या कल्पना आणी त्यातून मिळणारे संदेश आपण कसे झिडकारतो, हे वर्षभरापूर्वी माझ्या अधिजनुकशास्त्रावरच्या पोस्टवर झालेल्या चिखलफेकीतून स्पष्ट झालेच आहे.

तेव्हा दिशाभुल करणार्‍या विद्वानांना वेळीच ओळखा... -

१६०२ - जगातील १ल्या ॲमस्टरडॅम स्टॉक मार्केटची स्थापना
1659: Shivaji captures Satara from Sultanate of Bijapur, leads revolt against the Mughal empire
1661: Mumbai transferred from Portugal to Britain
1668: British government transfers Mumbai to British East India Company
1674: Shivaji declares himself King of the Marathas (see Maratha empire)
1680: Shivaji dies
1720: Bajirao I becomes Peshwa (Prime Minister)

१७०२ - पॅरीस स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना
1740: Death of Bajirao I
1756: Marathas capture the town of Attock (now in north-west Pakistan). Maratha empire reaches its largest extent.
14 January 1761: Maratha defeat at Third Battle of Panipat.
1775–1782: First Anglo-Maratha War

१७९० - फिलाडेल्फिया स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना
१८०१ - लंडन स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना
1803–1805: Second Anglo-Maratha War

१८०८ - मिलान स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना
१८१८ - न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना
1817–1818: Third Anglo-Maratha War
3 June 1818: Peshwa Bajirao II surrenders to the British
1827 11 April Jyotirao Phule is born (to 1890)

१८३१ - माद्रिद स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना

1853 16 April The first railway is established between Bombay and Thane.
1857 10 May Indian Rebellion of १८५७
1856 Lokmanya Tilak was born
1859 18 April Death of Tatya Tope
१८६१ टोरोंटॊ स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना
1869 Mahatma Gandhi was born
१८७२ ऑस्ट्रेलियन स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना
१८७५ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 7:56 am | ज्ञानव

२०१९ - १८७५ = १४४ वर्ष वाहत्या गंगेत अनेक अमराठी माणसे प्रवाह पतित झाली आणि काही वारली - काही तरली पण मराठीतलीच काही मंडळी निर्बुध्द, निरर्थक चर्चेच्या काथ्याकूटातून आपल्याला मिरवण्यात धन्यता मानत राहिली. पण आजची तरूण पिढी लाजवाब हुशार आहे माझ्याच समुहात विक्रम चिटगोपकर, पुष्कर कुळकर्णी, सौरभ आठवले ......किती तरी नावे मी ईथे देऊ शकतो जे अत्यंत हुशार आहेत आणि त्यांनी भलत्या विद्वानांच्या नादी न लागता यशस्वी रित्या सातत्याने ट्रेडिंग सुरू ठेवले आहे. १०% परतावा हा संशोधनाचा विषय म्हणून आला आहे त्यावर चर्चा होण्या ऐवजी काही वेगळेच जावईशोध लावणारे आणि साप साप म्हणून भूई थोपटणार्यांनी ह्या भूईवर येऊच नये कारण स्टाॅक ट्रेडिंग सोडा कुठलेही ट्रेडिंग हे येरा गबाळ्याचे काम नाही त्यासाठी बुद्धी स्थिर लागते. धागा काय जातीचा आहे आणि आपण विणतो. काय आहे हेच जर कळत नसेल तर....... असो.
मला सन फार्माने १०% ह्या महीन्यात दिले. पुढच्या महीन्यात ईथेच ईतर कुणी १०% दिले तर तेही ऊद्धृत करेनच. वर्षभर हा धागा खेचून मग ठरवू धाग्यातल्या प्रश्नाचे ऊत्तर !!

चांदणे संदीप's picture

23 Jan 2019 - 7:57 am | चांदणे संदीप

अवांतर प्रतिसाद:
अगदी अशाच प्रकारची, प्रत्येक शतकातली, विविध विषयावर, जग आणि आपण(भारतीय) यांसंदर्भात, विस्तृत माहिती मिळवावी याबाबत कित्येक दिवस, महिने, वर्ष प्रयत्न सुरू आहे पण आमची झुकझुकगाडी प्लॅटफॉर्म सोडीना. असो. अर्थकारणाशी संबधित ही माहिती रोचक आहे. तुमची ही मांडणी पाहून पुन्हा एकदा हॉर्न दिला आमच्या गार्डने. या मांडणीबद्दल धन्यवाद. :)

आता तुमचे चालूद्या. वाचतोय. ;)

Sandy

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 9:45 am | सुबोध खरे

माझ्या वर अनेक लोकांनी टीका केली चिखलफेक केली दूषणे दिली आहेत ती बाजूला ठेवून मी एकच सांगू इच्छितो कि शेअर बाजारात मी गेली २४ वर्षे आहे आणि त्यात गेली १२ वर्षे मी रोज त्यात सक्रिय आहे. यात ५ वर्षाचे एक आवर्तन (सायकल) गृहीत धरल्यास हे माझे बाजार पाहण्याचे तिसरे आवर्तन आहे. यात माझ्या निवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा मी बाजारात गुंतवलेला आहे.

या १२ वर्षात ट्रेडिंगमध्ये "अफाट नफा" मिळवून श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहिलेले किंवा घर बसल्या व्यापार करून बसून खातात येईल असे स्वप्न पाहिलेले असंख्य लोक पाहिलेले आहेत आणि पाहतो आहे.

परतावा तर सोडाच पण मूळ भांडवल गमावलेले आणि निराश होऊन बाजारातून बाहेर पडलेले अनेक लोक यात आहेत.

ट्रेडिंग हा अतिशय जोखमीचा रस्ता आहे त्यापेक्षा गुंतवणूकदार (इन्व्हेस्टर) हा जास्त खात्रीचा भाग आहे. १०० % + परताव्याच्या मृगजळाच्या मागे लागून अनेक लोक बुडण्याची शक्यताच जास्त आहे.

अभ्यास अभ्यास म्हणून जेवढा आवाज केला जात आहे त्याबद्दल मी एवढेच म्हणेन कि मला MBBS आणि MD ला १२ नंतर साडे आठ वर्षे लागली आणि त्यानंतर माझा त्याच विषयात २८ वर्षाचा अनुभव तेच तरी आज मला त्या विषयात १ % तरी समजते का हा प्रश्नच आहे.

हीच स्थिती अभियांत्रिकी किंवा वकिली किंवा इतर कोणत्याही व्यवसायाबाबत म्हणावी लागेल.

असे असताना मग बाजाराबाबत साडे चार दिवस अभ्यास करून हुशार होता येईल असे म्हणणे अतिशयोक्तीचेच होईल.

हा माझा येथील शेवटचा प्रतिसाद.

ज्यांना ट्रेडिंग मध्ये सातत्याने १० % दरमहा नफा मिळवता येईल असे वाटते आहे त्यांना माझ्या कडून शुभेच्छा.

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 10:38 am | ज्ञानव

अनेक वर्ष स्वतःच्याच विषयातले शिक्षण आणि अनुभव घेऊन १% तरी समजते का हा प्रश्न पडलेली व्यक्ती शेअर मार्केटवर अधिकार वाणीने काय चूक आणि काय बरोबर हे सांगते तेव्हा त्या व्यक्तीच्या मानसिक गोंधळाची / कोलाहलाची किंवा कुठल्यातरी पोटशुळाची कल्पना येते. आपल्या विषयातले (ज्यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे.) १% कळत नसताना इतरांना ब्रम्हज्ञान सांगत सुटायचे त्या पेक्षा आम्ही बरे आम्हाला आमच्या विषयातले पूर्ण ज्ञान आहे त्यामुळे योग्यायोग्य निर्णय आमच्यापुरते आम्ही घेऊच शकतो. १९८८ पासून मार्केटमध्ये आजही फुल टाईम ट्रेडरच आहे (कोट्याधीश हि आहे.) ह्या विषयातील सर्व खाचा खोचा जवळून पहिले आहे तरीही मला अज्ञात अशा कुठल्याही विषयावर /विषयाच्या धाग्यावर साधी उपस्थिती हि मी लावत नाही किंवा लावलेली नाही. इथे लोकं आपलाच हेका चालवून घेतानासुद्धा साधे विश्लेषण का करीत नाहीत कि आपले वय, हुद्दा, अनुभव लक्षात घेऊन जे आपल्यला समजत नाही त्यावर अवाक्षर हि न बोलता काही माहिती मिळत असेल तर तेव्हढी घ्यावी काही प्रश्न पडत असतील तर विचारावेत आणि स्वतः बरोबर इतर सर्वांना (त्यात धागाकर्ता आणि प्रतिसाद देणारेपण आले.) प्रबोधन करावे आणि सबका साथ सबका विकास हे तत्व अवलंबावे.

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 11:20 am | सुबोध खरे

“To myself I am only a child playing on the beach, while vast oceans of truth lie undiscovered before me”
― Isaac Newton

१९९५ साली मी उस्ताद अल्लारखां यांची मुलाखत ऐकली तेंव्हा ते ७६ वर्षाचे होते.

त्यांना विचारले कि आप ५० वर्ष से भी ज्यादा समयसे तबला बजा रहे है इसके बारे में आपको कैसे लग रहा है?

त्यावर त्यांनी उत्तर दिले कि अभी अभी ताल का कुछ अंदाज आ रहा है!

इतक्या मोठ्या माणसांची हि स्थिती तर माझ्यासारखा सामान्य माणूस (१% तरी समजते का हा प्रश्न पडलेली व्यक्ती) काय बोलणार?

त्या पेक्षा आम्ही बरे आम्हाला आमच्या विषयातले पूर्ण ज्ञान आहे

आपण या विषयात सर्वज्ञ आहातच.

तेंव्हा मी माझी सर्व विधाने मागे घेऊन आपणा सर्वांची बिनशर्त माफी मागतो.

आणि आपण म्हणत असाल तर ट्रेडिंग करून महिना १० % च काय पण महिना १०० % सुद्धा मिळू शकतील असे मान्य करतो.

माझ्या पुरता मी हा विषय संपवला आहे.

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 11:42 am | ज्ञानव

म्हणजे तुमच्या विषयातले १% ज्ञान हा विनय होता तर !!! मग ट्रेडिंग आणि गुंतवणुकीला लावलेले १००० रुपायचे बक्षीस आणि शिंपडलेले ज्ञानकण कशात मोजता आपण ? तिथे तर विनय दिसून आला नाही.

२०१३ साली आलेल्या ह्या धाग्यावर आणि आजच्या धाग्यावर तुम्ही दिलेल्या प्रतीक्रिया एक छापी आहेत.

माझ्या विषयात मी सर्वज्ञ आहेच पण माझा विषय काय आहे हे आधी समजून घ्या हि सविनय विनंती आहे.

आपल्याला प्रथे प्रमाणे शतक गाठायचे आहे ना मग हवे तर विषय संपला असे आपण डिक्लेअर करूयात कि!

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 11:52 am | सुबोध खरे

अच्छा हि ठसठस आहे का?

सोन्याचा भाव आज ३२००० आहे आणि २०१३ मध्ये २९६०० होता.

किती टक्के परतावा आहे हे कुणी ज्ञानी माणूस सांगेल एक?

मी तर १ % वाला आहे.

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 12:14 pm | ज्ञानव

पण २०१३ ते २०१९ पर्यंत आपल्यात काहीच बदल झाला नाही ह्याची आहे. ३२००० ते २९६०० ह्या दोन आकड्यातला प्रवास तुमच्या बुद्धी पलीकडचा तेव्हाही होता आणि आत्ता आही आहे. दुर्दैवाने १% वाला असण्यातच आनंद मानणारे आणि इतरांनी हि तसेच राहावे हा आग्रह धरणारे तुम्ही बदलला नाहीत ह्याची ठसठस आहे. आपल्याला विषयाचे शून्य ज्ञान आहे असे म्हणून विषय संपवणारे २०१३ सालचे तुम्ही आणि आजही विषय संपलाची ओरड करणारे तुम्ही मुळात विषय सुरु का करता? हे कळत नव्हते पण श्री युयुत्सुच्या कुठल्यातरी जुन्या लेखाची ठस ठस तुम्हाला इथे घेऊन आल्याचे नुकतेच वाचनात आले आणि उलगडा झाला कि तुमचा सर्वत्र संचार केवळ कधी काळी कुणीतरी दिलेली ठस ठस शमवण्या साठीच असतो.

अजून १० प्रतिसाद बाकी आहेत (पाच तुम्ही घ्या पाच मी घेतो ) शतकी धागा केल्याचे पुण्य तरी पदरात पाडून घेऊ कारण बाकी तर १०० प्रतीसादाद्तून काही अर्थ म्हणून निघेल असे नाहीच आहे.

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 1:02 pm | सुबोध खरे

जाऊ द्या हो

तुम्ही एकमेकांची तळी उचलण्यात धन्यता मानता आहात पण त्यात सरळ सरळ लोकांची दिशाभूल होते आहे ते पाहवत नाही म्हणून मी हे प्रतिसाद देतो.

मी कधीही कुणाला माझा ग्रुप जॉईन करा म्हणून आवाहन केले नाही (माझा कोणताही ग्रुप नाहीच)

किंवा माझ्याकडे सल्ला घ्यायला या म्हणून मिपावर जाहीरातही केलेली नाही.

उलट मिपाकरांना माझ्या दवाखान्यात मी फुकट सल्ला दिलेला आहे.

शेअर बाजारात मी प्रथम उतरलो ते १९९३ मध्ये तेंव्हा मी घेतलेले pantloons चे समभाग १० रुपयाला(at par) होते ते शेवटी २३०० रुपयाला विकून मला काही लक्ष रुपये मिळाले होते. हि माझी कामगिरी "अपवादात्मक" होती असेही मी लिहिलेले आहे.

परंतु गेल्या १२ वर्षात मी चक्रवाढ व्याजाने (CAGR) साधारण १० % करमुक्त उत्पन्न मिळवले आहे. यात डिव्हीडंड मिळवले तर ते ११. ५ % आणि १२ % च्या मध्ये येइल. मी त्यात समाधानी आहे. आणि मी कुणालाही सल्ला देत नाही. परंतु घामाचा पैसा बुडू नये इतकीच प्रामाणिक इच्छा आहे.

लोकांनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला त्याचे मला काहीच वाटत नाही. ते त्यांच्या विचारसरणीप्रमाणे वागले.

असो

ज्ञानव's picture

23 Jan 2019 - 8:04 pm | ज्ञानव

लोकं कमालीची हुशार असतात आहेत आणि राहतील. इतरांचे माहित नाही पण मी ग्रुपचे आव्हान केल्यावर आलेली मंडळी उत्तरोत्तर वाढतच गेली (आज अर्थक्षेत्रचे ९ ग्रुप आहेत. ) आणि मला त्यातून झालेला आर्थिक फायदा आहेच. पण श्याम भागवत (उत्तम विश्लेषक), विक्रम चीटगोपकर (हेवा वाटतो ह्यांचा इतका टेक्निकल अनालिसिस पक्का आहे.) ह्यांच्या सारख्या अनके व्यक्तीबरोबर संबंध आला. ज्यातले काही विषयातले माहीर होते काही नवीन होते त्यांनी हे मान्य केले अगदी फोन करून मान्य केले कि ह्या ग्रुपमुळे आम्हाला दिशा मिळाली. नवीन मुलांमध्ये तयार झालेले आणि यशस्वी झालेले ह्यांची नावे लिहित बसलो तर प्रतिसाद बराच मोठा होईल. त्यातले बरेच मिपाकर इथे आहेतच.

मी कधीही कुणाला माझा ग्रुप जॉईन करा म्हणून आवाहन केले नाही (माझा कोणताही ग्रुप नाहीच)
तुम्ही केला नाहीत....तुमची विचारसरणी तशी असेल. तुम्ही काय केलेत आणि काय करता त्याचे गोडवे तुम्हीच काय गाता ?

तुम्ही एकमेकांची तळी उचलण्यात धन्यता मानता आहात पण त्यात सरळ सरळ लोकांची दिशाभूल होते आहे ते पाहवत नाही म्हणून मी हे प्रतिसाद देतो.
आणि आम्ही / मी इथे दिशाभूल करायला आलो आहे हा सरळ सरळ आरोप करताय तुम्ही
ह्यावरून तुमचे संस्कार दिसले मला, कारण विचारसरणी शेवटी त्यावरच अवलंबून असते.

आज तीन वर्षे झाली ग्रुपला ज्याचे १००% श्रेय त्यातल्या सभासदांचे आहे. मी केवळ निमित्त ठरलो.
आम्ही कायम योग्य दिशा दाखवण्याचाच प्रयत्न करत आलो आहे आणि करत राहू.

# संपादक मंडळाने ह्या गंभीर आरोपावर योग्य ती कारवाई करावी हि माझी नम्र विनंती आहे.

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 8:21 pm | सुबोध खरे

दरमहा १०% परतावा.
20 Jan 2019 - 9:22 pm | ज्ञानव
हे सोदाहरण दिलेत तर चर्चेला उधाण येईल. बरेच पंटर आहेत इथे
.

हा आपला प्रतिसाद
एक साधा सरळ प्रश्न विचारतो आहे.
दरमहा १० टक्के परतावा सातत्याने मिळणे शक्य आहे का?

थॉर माणूस's picture

24 Jan 2019 - 1:33 am | थॉर माणूस

https://www.misalpav.com/comment/1021968#comment-1021968
निदान स्वतःच्या शब्दावर तरी ठाम रहा की हो खरे साहेब? शेवटचा म्हणून परत प्रतिसादांचा ढीग पाडलात. बरं मूळ प्रश्नाचे उत्तर सोयीस्कर रीत्या टाळून पुढे सरकण्याची आणि वर जे मुळात विषयाचा थोडाफार का होईना अभ्यास करून बोलतायत त्यांनाच कमी ठरवण्याची क्षमता मात्र दाद देण्याजोगी आहे.

बाकी "सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ वर्षात कोट्याधीश होता येते असा दावा मिसळपाव वर कुणी आणि कधी केला हे दाखवाल का जरा?"
हे दाखवताय ना? आपल्याला मुळ चर्चेचा विषय काय आहे हे माहिती असूनही तो आपल्याला हव्या त्या दिशेने वळवायला असले उपद्व्याप केले जातात. कुणीही कुठेही असा दावा केलेला नसताना उगाच छाती फुगवून बघा मी कशी या भोंदू लोकांची वाट लावतो टाईप प्रतिसादांची रांग लावून काय साधताय कुणास ठाऊक. वर हे कमी म्हणून ते च्यायलेंज आहेच. आता दावा कुणी केलाच नाही तर सिद्ध कसे करणार? म्हणजे तुमचे १००० सुरक्षीत वर जीतं मया करायला मोकळे. :)

बरं, आणखी हे नवे मनाचे दावे... आता हे कोण कधी म्हणाले सांगा बरे एकदा?
>>>असे असताना मग बाजाराबाबत साडे चार दिवस अभ्यास करून हुशार होता येईल असे म्हणणे अतिशयोक्तीचेच होईल.
इथे तर सगळे "स्वतःचा नीट अभ्यास असल्याशिवाय उड्या मारू नका" असेच म्हणताना दिसत आहेत.

>>>हे माझे बाजार पाहण्याचे तिसरे आवर्तन आहे. यात माझ्या निवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा मी बाजारात गुंतवलेला आहे.
बरं मग? याचा अर्थ आपण अनेक "गुंतवणूकदारांपैकी" एक आहात. समभाग गुंतवणूकदार आणि समभाग व्यापारी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथे गोंधळलात की संपले सगळे. एक गुंतवणूकदार म्हणून आपण वार्षिक १०-१५% परताव्यावरदेखील समाधानी राहू शकतो, पण व्यापारी यात इतका वेळ आणि कष्ट गुंतवतात की त्यांना असा परतावा कमी वाटू शकतो. थोडक्यात, टारगेट्स वेगवेगळे आहेत, म्हणून स्ट्रॅटेजीज आणि अर्थात रीस्क्स आणि रीटर्नस वेगवेगळे असणार. ट्रेडींगचा बेसिक फंडा: Hardest part of being a trader, sticking to your rules. स्वतःच्याच वाक्यांवर अंमल करणे किती अवघड असते याचे उदाहरण आपण बघतोच आहोत, मग बाजारात पैसे पणाला लागलेले असताना हा नियम पाळणे किती अवघड असेल विचार करा.

मार्केटस मधे सक्रिय असणे म्हणजे फक्त कुठेतरी मार्केटसंबंधी बातम्या रोज वाचल्या किंवा रोजच्या रोज ग्राफवर नजर ठेवली आणि बेसिक ट्रेंड ग्राफ वाचणे समजले की लोक स्वतःला तज्ञ समजायला लागतात. माझ्या माहितीतले एक व्यक्ती आहेत, पेशाने वकील आहेत पण ट्रेडींग फार गंभीरपणे करतात. म्हणजे उगाच अनुभव मोजून दाखवता यावा म्हणून नव्हे बरं का, अगदी मनापासून करतात. इतके की त्यांनी एक वेगळा फ्लॅट घेतलाय जिथे त्यांचे वकीली आणि ट्रेडींग चे काम शांतपणे करता येईल. तिथे गेलात तर भिंतींवर मोकळी जागा दिसत नाही अक्षरशः. सगळीकडे चार्टस लावलेले असतात. एक रूम वकीलीचे कागदपत्रांनी भरलेली आहे पण उरलेल्या ३ (किचनसुद्धा) फक्त ट्रेडींगशी रीलेटेड मटेरीअल असते. ३ काँप्यूटर्सचा सेटप सतत मार्केटवर लक्ष ठेऊन असतो. गेल्या वर्षी पायथॉन शिकले ते कारण त्यांना ऑटोमेटेड स्क्रिप्ट्स लिहायच्या होत्या ट्रेडींग साठी. आणि तरीही ते स्वत:ला मार्केटचा विद्यार्थी म्हणवतात!

एक्स्चेंज मार्केट ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही थोडा जरी अतीशहाणपणा करायला गेलात की तुम्हाला उचलून आपटले जाते. मी मी करणारे तर हमखास. पण जो कुणी खरंच जीव ओतून अभ्यास करायला आणि आपला अहं घरी ठेऊन शांत डोक्याने ट्रेड करायला तयार आहे तो पैसे कमावू शकतो.

सुबोध खरे's picture

24 Jan 2019 - 9:46 am | सुबोध खरे

मी शेवट्चा प्रतिसाद म्हटल्यावरही माझ्या वर चिखलफेक चालूच ठेवली होती यामुळे नाईलाजास्तव मला त्याचे खंडन करावे लागले. हि चिखलफेक केवळ माझ्या पदवी वर अनुभवावर आणि व्यवसायावरच असे नव्हे तर एकंदर माझ्या वयावर आणि व्यक्तीमत्त्वावर होती.

मी एक साधा मुद्दा पुढे केला की महिना ८- १० % परतावा हा सातत्याने जवळ जवळ अशक्य आहे आणि त्याला लागणारे साधे गणिती सूत्रही दाखवून दिले.त्याचे खंडन न करता केवळ चिखलफेक करून माझीच बरोबर पण कुणी मला सल्ला मागायला येऊ नका असेच पालुपद चालू ठेवले आहे.

मी मिपाकरांच्या वतीने एक साधी योजना त्यांच्या पुढे ठेवतो.

मी (किंवा कुणीही) दरमहा त्यांना १ हजार रुपये असे तीन वर्षे (एकंदर) ३६ हजार रुपये देतो.

तीन वर्षात ८ % परताव्याच्या चक्रवाढ व्याजाच्या सूत्राप्रमाणे https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestca...
हे पैसे २ लाख १८ हजार होतात.

यापैकी १ लाख १८ हजार रुपये त्यांनी घेऊन मला १ लाख रुपये परत करावे.
एक लाख रुपये परताव्यासाठी हा दर साधारण ४.८ % महिना (किंवा ५९ % वर्षाला) एवढाच येतो.

जरी परतावा कमी किंवा जास्त आला तरी मला त्यांनी फक्त १ लाख रुपयेच द्यावे आणि जरी मुदलात खोट आली तरी त्यांनी मला १ लाख रुपये परत करायचे.

माझ्या पैशावर त्यांना माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावण्याची संधी आहे.

कुणाची तयारी असेल तर मी स्टॅम्प पेपरवर करार करण्यास तयार आहे.

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 10:03 am | युयुत्सु

कुणाची तयारी असेल तर मी स्टॅम्प पेपरवर करार करण्यास तयार आहे.

जे करायला मला कायद्याने परवानगी नाही अशा कोणत्याही ट्रॅपमध्ये मला अडकायची इच्छा नाही कारण असे स्टॅम्प पेपर कोर्टात किती टिकतात याबद्दल मला शंका आहे ( नुकत्याच एका केस मध्ये वडिल आणि मुलगा यांच्यातला करार कोर्टाने रद्दबातल ठरवला).

सुबोध खरे's picture

24 Jan 2019 - 10:13 am | सुबोध खरे

हा हा हा

यु मेड माय डे

पैसे माझे आणि शेपूट तुम्ही घातली.

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 10:20 am | युयुत्सु

१. बेकायदेशीर किंवा शंकास्पद व्यवहारापासून स्वत:ला दूर ठेवणे याला "शेपूट घालणे" म्हणायचे असेल तर स्वत:च्या "कोडगेपणाला" (नाईलाजाने मला हा शब्द वापरावा लागत आहे) अवश्य कुरवाळा.

२. देवदयेने मला इतरांकडुन पैसे घेउन काहीही सिद्ध करायची गरज नाही कारण वयाच्या ४० व्या वर्षी निवृत्त होऊन सर्व आर्थिक जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडून मी स्वत:च्या टर्म्सवर आयुष्य जगत आहे.

सुबोध खरे's picture

24 Jan 2019 - 10:26 am | सुबोध खरे

मग इथे कशाला मी ८ % दरमहा कमावतो आहे म्हणून आपलीच टिमकी वाजवताय?

मूळ धागा फॉरेक्स चा होता त्यात शेअर बाजारात ८ ते १० % दरमहा कमावता येईल म्हणून शेखी मिरवली.

त्यानंतर हा धागा काढला

आता कायद्याच्या आड शेपूट घालताय?

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 10:36 am | युयुत्सु

तुमची एकंदर भाषा बघता तुमचा मानसिक तोल सुटत चालला आहे हे निश्चित. शुद्ध मराठीत लिहीलेले आपल्याला वाचता येत नसले तर ही कोणती विकृती समजायची याचा शोध डिएसेम मध्ये घ्यायला हवा.

सुबोध खरे's picture

24 Jan 2019 - 12:32 pm | सुबोध खरे

मूळ फॉरेक्स च्या धाग्यात तुम्हीच शेखी मिरवली होती ना?

मग प्रश्नचिन्ह टाकून सारवा सारवी करायला हा धागा टाकला.

परखड सत्य कटू असतंच

मिरच्या झोंबल्या का?

उगी उगी

निट वाचलेत का ? त्यात चक्रवाढ पद्धतीने पैसे हवेत. म्हणजे ३६००० हजाराचे लाखो रुपये तुम्ही करून द्या असे लाडिक आव्हान तुम्हाला करण्यात आले आहे. मूळ आणि संदर्भीय धाग्यात मला कुठे हि चक्रवाढ हा शब्द दिसला नाही अनवधानाने सुटला असेल तर दाखवून द्या. तुमचा दावा नव्हताच पण काहीजणांच्या दिव्य दृष्टीला त्यात दावा दिसला नव्हे दिसला च . पण असो तो तुमचा वाद आहे. मला ह्यातल्या चक्रवाढ ह्या शब्दामागची मानसिकता शंकास्पद वाटते आहे. चक्रवाढ गृहीत धरले होते कि आपसूक होतेच मनात बघा चेक करा मग आव्हानाचा विचार करा.
कारण इतराना सावध राहा म्हणून सल्ला देताना दरमहा १०% मिळत असतील तर हे वाचूनच तोंडाला पाणी सुटले आहे. (फसगत होण्याची सुरुवात अशीच होते पण ती सामान्य लोकांची.)
त्यामुळे इतरांना सावध व्हा सांगायचे आणि स्वतः चक्रवाढ व्याजाचे भांडे घेऊन पुढे पुढे करायचे हे खरे कारण असल्याचा बोध होतोय. म्हणजे मार्केटमध्ये लुटून घेणारे शेकड्याने असतात आणि आपण ते शोधत फिरत असतो असा आरोप करताना स्वतः मात्र चक्रवाढ वाढीने मला कमावून दाखवा बुवा ! तुम्हाला जमणारच नाही बघा! माझे (फुटकळ हजार रुपयाचे ) आव्हान आहे असे म्हणून येनकेन प्रकारे तुमच्या गळ्यात पडायचे आणि अगदी नाही घेतले तर शेपूट घातली म्हणायचं. बरे ३६००० रुपये तुम्हाला देऊन समजा तुम्ही लाखो कमावून सुद्धा दिले तरी तुम्हाला दान धर्मात हजारच देणार हं !
आणि जर का नाही कमावून दिलेत तर फुल्ल ढोल ताशे बजावून तुमची बदनामी पण करणार. रिस्क - रिवार्ड जमतंय का बघा हो त्या आधी....लोक CAGR ची टिमकी वाजवतात हल्ली. आपणच सावध राहायची वेळ आली आहे.
सर्व संदर्भीय दुवे धागे वाचून रचलेले / केलेलं आकांडतांडव पाहून इतकेच कळले कि खरोखरच खऱ्याची दुनिया नाही रे बाबा ! त्यामुळे आम्ही दिशाभूल करायला आलो आहे कि अन्य कुणी ते समस्तानी लक्षात घ्यावे हि विनंती.

आणि मी एक मिपाकर असल्याने माझ्यावतीने कुणीही कुणापुढेही कुठलीही योजना ठेऊ नये.

थॉर माणूस's picture

24 Jan 2019 - 11:56 pm | थॉर माणूस

>>>मी एक साधा मुद्दा पुढे केला की महिना ८- १० % परतावा हा सातत्याने जवळ जवळ अशक्य आहे
का पुढे केला म्हणे? कुणी दावा केला होता का की सातत्याने ८-१०% परतावा सहज शक्य आहे? अजूनही नुसतेच आरोप करताय, तिसर्‍यांदा विचारतोय तुम्हाला... ज्या १००० रुपये मिळवा योजनेची गर्जना केली होतीत ती कुठल्या प्रतिसादातल्या दाव्याच्या आधारावर? चक्रवाढ दराने परतव्याचा दावा कुठल्या व्यक्तीने केला? सलग ५ वर्षे दरमहा १०% मिळवण्याचा दावा कुणी केला? साडेचार दिवसात तज्ञ होण्याचा दावा कुणी केला? निदान लिंक्स तरी द्या म्हणजे त्या व्यक्तीला झापू आपण, हवे तर सगळे मिळून संपादकांना अशा सदस्यावर कारवाई करायला लावू.

नुसत्या नवनव्या योजना तोंडावर फेकल्याने स्वतःचे समाधान करता येते... बघा कुणीच कसे पुढे आले नाही वगैरे म्हणून. प्रत्यक्षात माहिती असलेले लोक असल्या स्टंट्सवर हसून पुढे जात असतात कारण दावा केलाच नाही तर सिद्ध काय करणार? :) इतके प्रतिसाद येऊन गेले तरी तुम्हाला ट्रेडींग आणि इन्वेस्टमेंट मधला फरक कळेना. प्रतिसादात नसलेले दावे तुम्हाला दिसतात पण प्रतिसादात असलेली माहिती तुम्हाला उमगेना. वर मुळात कुणीच न केलेल्या दाव्यांवर कसले कसले च्यायलेंज देत फिरताय. काय चालवलंय राव.

चला अजून एक उदाहरण देतो... या महिन्यात मी काही शेअर्समधे १००० रुपये लावले आणि ट्रेड करून १०० चा फायदा झाला, मागच्या महिन्यात मी काही शेअर्समधे २००० लावले होते आणि ट्रेडींग करून १९० चा फायदा कमावला, त्या आधी एका महिन्यात १००० च्या शेअर्स ट्रेडींग मधे ९० चा फायदा कमावला. आता मला सांगा मी
हे ३ महीने ८-१०% परतावा मिळवला की नाही? ट्रेडींग हे असे चालते. ते चक्रवाढ वगैरे प्रकार करायला आपण १००० रुपये मार्केटमधे ठेऊन त्याकडे नुसते बघत बसून ८-१०% ने वाढत नाहीत किंवा आलेले व्याज त्याच रेटने परतावा द्यायला जादूने त्याच शेअर्सच्या जुन्या किमतीवर जाऊन बसत नाही. असल्या अपेक्षांना गुंतवणूक म्हणतात ज्यासाठी लाँग टर्म ट्रेडींग किंवा फंड्स वगैरे आहेत, जे अर्थातच इतके मोठे रीटर्न्स देत नाहीत (आणि सिंपल इंटरेस्टवर चालतात). गुंतवणूकीचे गणित ट्रेडींगला लावणारे म्हणूनच ट्रेडींगमधे फारसे तगत नाहीत.

युयुत्सु's picture

23 Jan 2019 - 10:10 am | युयुत्सु

जी व्यक्ती खालील दोन विधाने करते -

१. "शेअर बाजारात मी गेली २४ वर्षे आहे आणि त्यात गेली १२ वर्षे मी रोज त्यात सक्रिय आहे."
- तरी सुद्धा नकारात्मक म्हणजे बहुधा अयशस्वी. आणी समजा यशस्वी असुन असे बोलत आहेत तर दिशाभूल करायचा उद्देश हा नक्की

२. "मी एवढेच म्हणेन कि मला MBBS आणि MD ला १२ नंतर साडे आठ वर्षे लागली आणि त्यानंतर माझा त्याच विषयात २८ वर्षाचा अनुभव तेच तरी आज मला त्या विषयात १ % तरी समजते का हा प्रश्नच आहे."

म्ह० डॉकटर म्हणून यांना किती गांभिर्याने घ्यायचे हा प्रश्न उरतो.

याउलट मला माझा आय० आय० टी० मधला डॉक्टर मित्र आठवतो. त्याने मला homeostasis च्या तत्त्वामधून आख्खे मेडीसीन कसे derive करता येते, हे समजावल्यावर माझी विचार करायची पद्धत आमुलाग्र बदलून गेली होती. त्याशिवाय त्याने मला हृदयाचे ठोके कसे ऐकायचे हे शिकवले. त्यामुळे माझा उत्साह इतका वाढला की मी तेव्हा missing heartbeat, mitral murmur चे निदान करू शकलो होतो.

आता राहिला मुद्दा यांनी नुकत्याच होमिओपथीवर केलेल्या शेरेबाजीचा. मी त्या धाग्यावर अनेक "सर्जरी" देखिल प्लासिबो असल्याचा पुरावा देण्यासाठी एका सर्जनच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. तिथे यांनी काही अवाक्षर काढल्याचे आठवत नाही. काढले असल्यास माझ्या नजरेतून निसटल्याबद्दल क्षमस्व!

असो. काही माणसांना सावध करणे आणि दिशाभूल करणे यातला फरक कळत नाही..एम्पॉवर करणे दूरची गोष्ट.

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 10:38 am | सुबोध खरे

डॉकटर म्हणून यांना किती गांभिर्याने घ्यायचे हा प्रश्न उरतो.

जाऊ द्या हो
तुमचे "महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत" हे विधान सप्रमाण खोडून काढल्यापासून तुम्ही बिथरला आहात आणि अशी वैयक्तिक शेरेबाजी करता आहात
त्याला अर्थात डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी There has been unfortunate and erroneous use of terms such as “ किडकी प्रजा” “किडकी बीज “ हा प्रतिसाद दिल्याने हा सूर्य हा जयद्रथ झाला म्हणून काही बोलता आले नाही.
अतिशयोक्ती केल्यामुळे चांगल्या लेखाचा विपरीत अर्थ निघतो याचे ते उत्तम उदाहरण आहे.

बाकी तुमच्या प्राणायामाच्या लेखातही अनेक अतिशयोक्त विधाने होती त्याकडेही मी दुर्लक्षच करायचे ठरवले आहे.( उगाच स्कोअर सेटलिंग चा आरोप नको)
आता हि तसेच करत आहात.

टोकाचा मतभेद असणे आणि ते व्यक्त करणे हि ठीक आहे पण आपल्या सारख्या विद्वान आणि उच्च शिक्षित व्यक्तीकडून अशी विधाने आणि वैयक्तिक शेरेबाजी आली नसती तर बरे झाले असते एवढेच वाटते.

आपल्याला शुभेच्छा.

युयुत्सु's picture

23 Jan 2019 - 10:48 am | युयुत्सु

माझे ते विधान " सप्रमाण खोडून काढले" असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या भ्रमाला अवश्य कुरवाळा.

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 10:52 am | सुबोध खरे

"महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत"

आजही तुमचं तेच मत कायम असेल तर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

युयुत्सु's picture

23 Jan 2019 - 10:57 am | युयुत्सु

तुमच्या प्राणायामाच्या लेखातही अनेक अतिशयोक्त विधाने होती त्याकडेही मी दुर्लक्षच करायचे ठरवले आहे.

तुम्हाला कुणी अडवले आहे/होते?

युयुत्सु's picture

23 Jan 2019 - 12:59 pm | युयुत्सु

सती जायचे अन कुले भाजले म्हणून परत फिरायचे

मार्केटमध्ये आपटलेल्याना ही म्हण चपखल लागु पडते. तुम्ही योग्य ती सर्व काळजी घेतली असेल तर नंतर भाजलं म्हणुन आरडा-ओरडा करण्याला अर्थ नसतो. मागील वर्षी मार्केट खाली आले, ते आवश्यकच होते. तुमची निवड चांगली असेल तर ती परत प्रवेश करायची संधी असते. मुळात दीर्घकाळासाठी गुंतवणुक असेल तर त्यासाठी योग्य तो वेळ द्यायलाच हवा. दरम्यानचे चढउतार हे ignore करता यायला हवेत.

"हा माझा शेवटचा प्रतिसाद" म्हणून आरोळी ठोकल्यावर लोक परत परत येत राहतात हे अस्थिर मनाचे निदर्शक आहे. अशी माणसे मार्केट मध्ये यशस्वी कशी होणार.

सुबोध खरे's picture

23 Jan 2019 - 1:04 pm | सुबोध खरे

अशी माणसे मार्केट मध्ये यशस्वी कशी होणार.
वर उत्तर दिले आहे

उपेक्षित's picture

23 Jan 2019 - 1:03 pm | उपेक्षित

@ खरे डॉक

शेवटचा प्रतिसाद देतोय तुम्हाला रादर द्यावा लागतोय.

सर्वात प्रथम १ गोष्ट क्लियर करतो मी स्वतः ट्रेडिंग मध्ये नाहीये आणि पुढच्या निदान ५ वर्षात तरी नसेन कारण त्यासाठी लागणारा वेळ, अभ्यास आणि संयम माझ्याकडे सध्याला नाहीये.

राहता राहिला तुमच्यावर टीका करण्याचा तर डॉक मला वाटते तुम्ही तितके परिपक्व अक्की आहात कि टीका सुद्धा खिलाडूपणे घ्यावी कारण इथे जरी मी तुमच्यावर टीका केली असली तरी तुमच्या बर्याच लेखांचा मी चाहता आहे आणि त्याबाबत तुमचा नक्की आदराच आहे.

पण तोच आदर तुमच्याकडून इतरांना का मिळत नाही ? कधी विचारा स्वतः ला,

इथे ट्रेडिंग मधील अनुभवी लोक काही गोष्टी मांडताना दिसत आहेत त्यांना निदान त्यांचे म्हणणे तरी मांडूद्या ? कारण तुम्ही जसे तुमच्या क्षेत्रात यशस्वी आहात तसे बाकीचे हि आहेत कि हो, मग त्यांना त्यांचा आदर मिळालाच पाहिजे न ?

so तुमचा एक हितचिंतक म्हणून तुम्हाला एक कळकळीची इनंती करतो कि दुसर्याच्या ज्ञानाचा आणि कार्याचा आदर ठेवा तरच तुम्हालाही आदर मिळेल.

आणि ते बालिशपणे स्कोर सेटलिंग वगैरे परत विचारपण नका करू आपल्याला त्याची गरज नाही जे असेल ते त्वांडावर बोलून मोकळा होणार्यातला हाये म्या.

शेअर मार्केट .. एक असा जुगार जो तुम्ही बिनदिक्कतपणे अगदी तुमच्या घरातल्यासमोरही खेळू शकता आणि त्यात कंगाल झालात तरी फारफार तर एक दोन शिव्या पडतील पण तुमच्या घरातलेच काही लोक इतरांना सांगत सुटतील कि आमचा हा कि नई शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवतो ..
तर अश्या शेअर मार्केटचा भाव खरा वधारला तो हर्षद मेहेताच्या कारामतीमुळे . त्या वल्लीने शेअर मार्केट खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवलं .. मी हि त्याला अपवाद नव्हतो .. माझी सुरुवात मी २००८ साली केली . आजही त्या मध्ये उभा आहे आणि खेळतो आहे .. लाखाचे बारा हजार झालेले आहेत . माझे मलाच माहित आहेत किती टाकलेले आणि आता उरलेले आहेत ते . मूळ गुंतवलेली रक्कम , या इथे आत , खोल आत लपवून ठेवण्यात आलेली आहे .. ती जर कधी मी बाहेर काढली तर मला काही नाही होणार पण माझी बायको आणि बाबा जवळजवळ तीनचार महिने तरी व्यवस्थित झोपू शकणार नाहीत , किंबहुना तो आकडा ऐकला तर त्यांची झोपच उडेल ..
आता इथे धागा आलाच आहे तर त्यापैकी दोन किस्से सांगतो .. फार मजेशीर आहेत ..

१) मी शेअर मार्केट चालू केले २००८ साली .. डिमॅट वगैरे सर्व उघडले . आता घ्यायचं काय ? बोहनी काय करायची ? सर्व धुंडाळून मग मला एक नाव आवडलं " वीर एनर्जी " .. आहाहा काय नाव सालं , नावातच दम आहे , हेच घ्यायचं " मनातल्या मनात बोललो आणि घेऊन टाकले ५००० शेअर्स . एक शेअर मला वाटत त्यावेळेला ३ रुपयाने पडला असेल ..
काही महिन्यांनी मी माझ्या साहेबाला हि गोष्ट सांगितली . मी सांगितले कि अमुक शेअर्स घेतले आहेत .. त्यांनी मला विचारलं कुठल्या ग्रेडमध्ये खेळतो .. प्रश्न डोक्यावरून गेला .. मी निरुत्तर होतो . मग त्यांनी मला सांगितलं कि तू आता सध्या कुठलीही रिस्क घेऊ नकोस . अवर्गात गुंतवणूक करत राहा आणि दीर्घकालीन कर . परतावा अवश्य मिळेल .. आज्ञा लगेच अमलात आणली आणि तिथेच माझी पुरेपूर लागली हे मला आता काही महिन्यांपूर्वी कळले .. काय दुर्दैवविलास बघा .. जो शेअर त्याच नाव गाव मला अगदी मनापासून आवडलं होत आणि माझा पहिला शेअर म्हणून मी कधीही विसरणार नव्हतो तो शेअर आज जर माझ्याकडे असता तर अन्दाजे मी २.५ करोड रुपयांचा धनी असतो .. असो ..होत कधी कधी असे

२) माझा मित्रपरिवार एकदम मोठा आहे . त्यात काही लोक असेही आहेत कि जे आज आपण पडद्यावरही बघतो तर काही नामचीन हिरेव्यापारी .. अर्थात बालपणीचे सवंगडी असल्याने , कधीकधी अवांतर गप्पाही रंगतात . अश्याच एका मित्राला मी काही वर्षांपूर्वी भेटलो . नक्की वर्ष आठवत नाही पण बहुतेक सलमान खानचा " वाँटेड " का " दबंग दोघांपैकी एक आला होता . त्याला मी सांगितलं कि बाबा रे मी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहे .. तुला काय वाटत ? तो म्हणाला त्याला काहीही इंटरेस्ट नाही त्यामध्ये .. मी पुन्हा पुन्हा तेच विषय उगाळत राहिलो मग वैतागून त्याने विचारलं कि तू खरंच पैसे लावणार असशील तर सांग मी एक टीप देतो . मी लगेच हो म्हणालो. तो म्हणाला कि मी जेव्हा नबोलें तेव्हा तू त्यामधून बाहेर पडायचं . मी होकार दर्शविला . मग त्याने मला सांगितलं कि सलमानचा दबंग हिट झालाय आणि आता पुढील येणारा वांटेडही चालेल बहुधा .. चालला तर तुझी चांदी आहे आणि नाहीतरी भरपूर मिळेल पण मी सांगेन तेव्हा कुठलाही मोह ना बाळगता बाहेर पड .
झालं त्याने नाव सांगितलं " श्री अष्टविनायक सिनेव्हिजन " . त्यावेळेला ५० रुपयाने तो शेअर होता .. चिंधीगिरी केली , फक्त २०० शेअर घेतले .. शेअर घेतल्यावर नेहेमी बघणे आले . दिवाळीपर्यंत तो तसूभरही हलला नाही . मी माझ्या साहेबाला सांगून ठेवले होते पण त्यानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने मी २०० च घेतले होते . दिवाळीनंतर तो घोडा जब्बरदस्त पळत होता .. इतका पळाला कि विचारू नका .. ५० चे काही दिवसातच सरळ १७५ आणि नंतर स्प्लित काय झाला, बोनस शेअर काय दिले आणि अजून काय काय . पण चिंधीगिरी केल्यामुळे फारसा काही फायदा झाला नाही तरी झाला . नाही म्हंटले तरी ५०००० निघाले . माझ्या मित्राने अगदी निष्ठेने मला फोन करून ते त्वरित विकण्यास सांगितले आणि मी विकले . उत्सुकतेखातीर त्याने मला माझी त्यामधील गुंतवणूक विचारली आणि उत्तर ऐकून जी काही बडबड केली ती विचारू नका .. असो

हे झाले दोन किस्से .. फक्त दोन .. अजूनही बरेच घडलेले आहेत .. टंकाळा आलेला आहे त्यामुळे क्षमस्व

मी २०० रुपये भाव झाल्यावर खूप फायदा झाला असे वाटून त्वरीत विकुन टाकले. आता बोला :-)

मृत्युन्जय's picture

23 Jan 2019 - 6:14 pm | मृत्युन्जय

मला काय वाटते की या धाग्यावर सगळ्यांना एकच गोष्ट म्हणायची आहे. पण नक्की कोण काय म्हणाले याबद्दल प्रचंड गोंधळ होउन मूळ मुद्दा मागेच पडला आहे.

युयुत्सु काकांनी त्यांची शेयर ओळखण्याची पद्धत उलगडुन सांगितली तर आवडेल (आधीच सांगितली असेल आणि धाग्याच्या गदारोळात ती हरवली असेल तर उत्तमच.

उपेक्षित's picture

23 Jan 2019 - 7:18 pm | उपेक्षित

100 झाले, हल्ली सत्कार बित्कार करत नाय वाटत कोणी, जुने मिपा राहिले नाय आता :)

दीपक११७७'s picture

23 Jan 2019 - 11:23 pm | दीपक११७७

हे सांगण्याचे कारण असे की माझ्यापेक्षा निश्चितपणे कैकपटीने हूशार अशी एक व्यक्ती ( आय० आय० टी० मद्रासची गोल्डमेडॅलिस्ट) मला योगायोगाने नेट्वर भेटली ....................त्याने केलेले एक विधान मला आश्चर्यचकीत करून गेले. तो म्हणाला, In stock market 100% profit( return?) in a year is very common.

मलै एक समजुन नाही -हायलं .......

जर एवढ गोल्ड मेडलिस्ट ने सांगल्यावर, मिपा वर १०% परतावा मिळतो का? असे विचारण्यात काय पाईंट आहे.

१०% च माझ माॅडेल विकण्यात का वेळ घालावा?

Blackcat's picture

24 Jan 2019 - 2:34 am | Blackcat (not verified)

शेअर मार्केट वर फक्त 3 लोकच पैसे मिळवू शकतात

1.ब्रोकर
2. फी घेऊन टिपा देणारे
3. या विषयावर पुस्तक , सॉफ्टवेअर , क्लास इ इ विद्या विकणारे

उरलेले सर्व ओम फट स्वाहा.

Blackcat's picture

24 Jan 2019 - 2:37 am | Blackcat (not verified)
Blackcat's picture

24 Jan 2019 - 2:39 am | Blackcat (not verified)

https://www.maayboli.com/node/30579

पण फारसे जमले नाही

या बातमीतले भाकीत जर खरे ठरले तर महिन्याला १०% देऊ शकणार्‍या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असा मला तरी दृढ विश्वास आहे.

मॅक्रो फॅक्टर्सचा अन्वयार्थ लावायची कुवत सगळ्यांच्यामध्ये नसते (१% मध्ये तर अजिबात नसते), हे आपणच समजुन घ्यायला हवे.

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 9:10 am | युयुत्सु

लोकहॊ

९ जानेवारीला माझ्या मॉडेलने सुचवलेला ईन्फ़ो एज इंडीया घेतला. तो आता साडेपाच टक्के वर आहे आणि येत्या काही दिवसात मला १०% मिळतील याची खात्री आहे.

थोडं समजावून सांगता का .. हे मॉडेल कसे काम करते आणि आपण सांगितलेले सॉफ्टवेअर कसा असे करायचा .आणि शेअर कसे ओळखायचे

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 10:30 am | युयुत्सु

माझ्या शेअर निवडायच्या मॉडेल विषयी मी थोडी कल्पना यावी इतके (https://www.misalpav.com/comment/1021594#comment-1021594) वर लिहीले आहे. तपशील देऊ शकत नाही कारण बेंजामिन ग्राहमच्या प्रसिद्ध पुस्तकात ज्या स्ट्रॅटेजिज खुल्या होतात त्या काम करायच्या लवकरच थांबतात असे म्हटले आहे. सॉफ्टवेअर बद्दल वर लिहीले आहेच (https://www.misalpav.com/comment/1021462#comment-1021462)

Blackcat's picture

24 Jan 2019 - 5:40 pm | Blackcat (not verified)

बेंजामिन ग्राहमच्या प्रसिद्ध पुस्तकात ज्या स्ट्रॅटेजिज खुल्या होतात त्या काम करायच्या लवकरच थांबतात

हे त्याने खुले केले तरी त्याचे पुस्तक चाललेच ना ?

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 2:58 pm | युयुत्सु

आज हा १७९० पर्यंत गेला होता. म्हणजे ८.५% मिळाले असते. दुपारी झोपायला नको होते. :) पण अजुन वेळ गेली नाही.

Blackcat's picture

24 Jan 2019 - 12:57 pm | Blackcat (not verified)

कमोडिटीमध्ये कुणी नाही का ?

Blackcat's picture

24 Jan 2019 - 1:42 pm | Blackcat (not verified)

कुंडली बघून कोणता शेअर वर जाईल , कोणता खाली , हे समजते का ?

युयुत्सु's picture

24 Jan 2019 - 2:50 pm | युयुत्सु

अमिब्रोकर हे असेच लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. ते वापरून अल्गोट्रेडींग करता येते. ही एक अशी तयार अल्गोट्रेडींग आहे, असे वाटते.

मी माझे स्वत:चे अल्गो तयार केले आहेत. पण ते सुपरवाईज्ड आहेत. स्वयंचालित नाहीत. पण माझ्यासाठी ते पुरेसे आहेत.

मी कुंडली बघायचो. आता बंद केले आहे. कुंडलीचा मी ट्रेडींगसाठी वापर करत नाही ( माझ्याकडच्या सॉफ्टवेअरमध्ये अमावस्या आणि पौर्णिमा आलेखावर मांडता येतात).

हे अल्गो कसे तयार करतात अमी याची माहिती कुठे भेटेल .कृपया थोडी माहिती द्या

शब्दानुज's picture

24 Jan 2019 - 11:33 pm | शब्दानुज

आज दुध का दुध पानी का पानी करण्याचा एक उपाय माझ्याकडे आहे.

हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. (माझा आणि या अॅपचा दुराव्ययानेही संबंध नाही)
यात आपल्याला वर्चुअर ट्रेडींग करता येते. म्हणजेच ख-या नावाचे शेअर ख-या किंमतीत खोटी खोटी खरेदी करता येतात. शेअरच्या अॅपमधल्या किंमती आणि बाजारातील किंमत यात थोडा फरक असतो.

बाकी हे अॅप आपल्याला शेअर बाजारात आपण किती नफा कमवू शकलो असतो हे व्हर्चुअली दाखवतात.

युयुत्सु यांना आपला दावा सिद्ध करायचाच असेल तर अॅप डाऊनलोड करुन त्यावरुन शेअरची खरेदी करावी.महिना अखेरीस ते या अॅपमधून त्यांनी निवडलेल्या शेअरचा स्टेटस दाखवू शकतात.

यात कुठेच कुणाचेच पैसे खिशातून जाणार नसल्याने कोर्ट वगैरे भानगड नसतील. दुध का दुध पानी का पानी मात्र करता येईल.

बाकी हे करायचे की नाही ती युयुत्सु यांची मर्जी. ते त्यांनी करावेच असा आमचा हट्ट वगैरे नाही. पण आपण हे जर केलेत तर पुरावे हातात असल्याने आपल्या दाव्याला पुष्टी मिळेल.

असे काहीही न करण्याचा आपणाला पुर्ण अधिकार आहेच.

बाकी मिपाकरांनीही हे अॅप वापरून पहायला हरकत नाही. खरोखर पैसे बुडण्यापेक्षा आपला अभ्यास किती हे समजून घेण्यासाठी हे उपयोगी ठरेल.
"माझा आणि या अॅपचा दुराव्ययानेही संबंध नाही"

युयुत्सु's picture

25 Jan 2019 - 8:13 am | युयुत्सु

शब्दानुज,

या ॲपच्या लिंकबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

ॲप उतरवुन घेतले आहे. "खरे" तर मला या ॲपचा माझ्या अल्गोच्या फाईन ट्युनिंगसाठी खुप उपयोग होईल कारण मी दर वेळेला माझ्या मॉडेल ने सुचवलेले शेअर्स पैसे अडकलेले असल्यास घेऊ शकत नाही. ते इथे मला जमेल असे वाटत आहे.

पण या ॲपवर प्राथमिक नजर टाकली असता आपल्याला हवा तो शेअर शोधणे अतिशय जिकीरीचे आहे. पण प्रयत्न करून बघतो.

मी आपल्या सूचनेचा खुल्या मनाने विचार करत आहे, हे लक्षात आले असेलच!

शब्दानुज's picture

26 Jan 2019 - 4:38 pm | शब्दानुज

आपणास जर मी सुचवलेल्या अॅपमद्दे शेअर शोधण्यास अडचण येत असेल तर या दुस-या अॅपमधून तुम्ही शेअर सर्च करून पाहू शकता. हे काहीसे सपोर्टींग अॅपसारखे आहे पहिल्या अॅपसाठी.
https://play.google.com/store/apps/details?id=com.alifesoftware.stockscr...

बाकीच्या टेक्नीकल गोष्टी तुम्ही अॅप वापरायला चालू केलेत की कळत जातील. मलाही मूळात शेअर बाजाराची माहिती नसल्याने यात मी फार खोल गेलेलो नाही.

युयुत्सु's picture

26 Jan 2019 - 5:06 pm | युयुत्सु

तुमच्या १ल्या~ॲप वर मी सर्व आता जमवले आहे . पण तुम्हाला जे हवे त्यासाठी थोडी वाट पहा.

युयुत्सु's picture

26 Jan 2019 - 7:57 pm | युयुत्सु

या आणी अशा संकेताचे अर्थ ज्यांना लावता येतात तेच मार्केटमध्ये पैसे कमवु शकतात.

युयुत्सु's picture

27 Jan 2019 - 10:28 am | युयुत्सु

माझ्या धाग्यावर झालेल्या गदारोळात एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे दूर्लक्ष झाले. स्टॉक निवडायचे निकष विशिष्ट क्रमाने बदलले तर खालिल चित्र दिसते -

१०% पेक्षा जास्त
परतावा दिलेले स्टॉक
गेला १ आठवडा - २
गेले २ आठवडे - ५
गेले ३ आठवडे - १३
गेले ४ आठवडे - १९
गेले ५ आठवडे - २५
गेले ६ आठवडे - ४१
गेले ७ आठवडे - ६५
गेले ८ आठवडे - ४९
गेले ९ आठवडे - ६०
गेले १० आठवडे - ५६

हे जर परताव्याचे प्रमाण १०% पेक्षा ८% वर आणले तर याच संधींची संख्या आणखी वाढते. अभ्यास (तुमचे मॉडेल) व्यवस्थित असेल तर या संधी पकडता येणे कठीण अजिबात नाही.

हे फक्त ग्लास अर्धा भरलेला ज्यांना दिसतो त्यांनाच दिसते. मार्केट्च्या नावाने शंख करणा-यांना हे कधीच दिसणार नाही.
जाता जाता - हा प्रतिसाद टंकत असताना हे माझे मॉडेल पॉलिश करायच्या आणखी कल्पना सुचल्या, त्यामुळे मी आत्ता खुष आहे.

मी या धाग्यावर माझ्या मॉडेलने सुचवलेल्या स्टॉकचे उदा० म्हणून federal bank चे उदाहरण दिले होते. आजच ही बातमी वाचायला मिळाली
आणि मी बरोबर असल्याचा आणखी एक संकेत मिळाला. स्वत:च्या अभ्यासाला पर्याय नाही.

युयुत्सु's picture

4 Feb 2019 - 8:59 am | युयुत्सु

कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की मी हा धागा थंड झाल्यावर पण महिन्याला ८-१०% मिळु शकतात का या दृष्टीने अत्यंत गंभीरपणे विचार सुरु केला आणि स्वत:लाच आह्वान दिले.

मग संशोधन करत पूर्वलक्षी पद्धतीने (historically) असा परतावा देईल असा अल्गॉरीदम विकसित करायचा प्रयत्न केला आणि सध्या सरासरी महिना ८.५% देणारा अल्गॉरीदम विकसित केला आहे.

यात एक ग्यानबाची मेख आहे, ती अशी की अल्गॉरीदमने समजा क्ष इतक्या कंपन्या सुचविल्या तर सर्व क्ष कंपन्यांचे समभाग विकत घेणे आवश्यक ठरते. तेव्हढे भांडवल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हा अल्गॉरीदम डोळे मिटून (संगणकाने करायच्या ट्रेडींगसाठी असल्याने) करण्यासाठी असल्याने मध्येच आपण काही लुड्बुड केली तर परताव्यावर परिणाम होऊ शकतो.

मार्केट गडगडत असताना हा अल्गॉरीदम कसा काम करतो हे अजून तपासलेले नाही. पण इकॉनॉमी जेव्हा गती घेते तेव्हा डोळे मिटून हा अल्गॉरीदम वापरता येईल. यात मला एका प्रश्नाचे उत्तर अजून सापडलेले नाही. गेले काही दिवस महिन्याला अंदाजे ३०-३५ कंपन्या १०% पेक्षा अधिक परतावा देत असताना माझा अल्गॉरीदम फक्त १०-१५ कंपन्या सुचवून सरासरी ८.५ % देत आहे. तेव्हा ही तफावत का हे शोधायचा प्रयत्न चालु आहे.

टीप - अल्गोट्रेडींगची संकल्पना ज्यांना ठाऊक आहे त्यांना मी काय म्हणतो ते कळणे अवघड जाऊ नये. १% वाल्या ’विद्वानांनी’ या फंदात अजिबात पडू नये.

युयुत्सु's picture

7 Feb 2019 - 10:32 am | युयुत्सु

तर मंडळी,

३० जानेवारीला प्राज इं० घेतला. तो आजच लाभांश धरून ६.६२% वर आहे. ही एका आठवड्यतली कामगिरी आहे. माझ्या मॉडेलप्रमाणे तो आणखी वर जाणार आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

7 Feb 2019 - 10:59 am | हणमंतअण्णा शंकर...

इतके ट्रेडस लावले तर ते बिझिनेस इन्कम होणार नाही का? टॅक्स च्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे. कृपया यावर प्रकाश टाकाल का? (सध्या माझे स्ट्रीक आणि ट्रेंडलाईन वरती अल्गोज रन होतात)

युयुत्सु's picture

7 Feb 2019 - 11:09 am | युयुत्सु

प्रश्न चांगला आहे आणि मला पण पडला होता. कारण Frequent trading ची व्याख्या संदिग्ध आहे. मला एका ब्रोकरने त्याच्या सेमिनारमध्ये असे सांगितले की
की income की prophit हे आपणच एकदा सुरुवातीला घोषित करायचे असते (त्याने एका सर्क्युलरचा संदर्भ दिला होता).

पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर ’ज्ञानव किंवा कुणी करतज्ञ चांगले देतील.

युयुत्सु's picture

7 Feb 2019 - 1:42 pm | युयुत्सु

तर मंडळी

९ जानेवारीला Info Edge India घेतला. आज ७.१२ % (लाभांश धरून) नफा मिळवून काढुन टाकला.

युयुत्सु's picture

7 Feb 2019 - 2:44 pm | युयुत्सु

तर मंडळी

त्या एक टक्कावाल्याना सांगा. प्राज इं० आत्ता ८.८४% वर पोचला आहे. तो पण एका आठवड्यात.

युयुत्सु's picture

21 Feb 2019 - 10:50 am | युयुत्सु

लोकहो,

Neuland Laboratories - १८ जानेवरीला ५७७.५९ ला घेतला आणि आज ६४८ ला काढला एकूण नफा १२.१९% आणी तोही ३ दिवसात!

१८ जानेवारी ते २१ फेब्रुवारी तीन दिवस कसे झाले? बाकी धागा व प्रतिसाद रोचक आहेत. धन्यवाद!

युयुत्सु's picture

24 Feb 2019 - 5:20 pm | युयुत्सु

टंकण दोष. क्षमस्व. १८ फेब्रु पाहिजे

शब्दानुज's picture

24 Feb 2019 - 2:48 pm | शब्दानुज

युयुत्सु आपणास याबाबत आधीच्या चर्चेतही सांगितले होते की आपण वा अन्य कोणी "एखाद्या" शेअरवर १० टक्के नफा कमवू शकता. यात कोणताही वाद नव्हताच.

"एकूण" गुंतवलेल्या रकमेवर "एकूण " मिळकत १० टक्के असू शकती का हा मुद्दा चर्चेचा होता.अशा एक एकट्या शेअरच्या उदाहरणावरून आपला मुद्दा सिद्ध होत नाही.

जर आपण निवडलेले शेअर नुकसानमद्धे जात असतील (जर असतील तर) तर ते मात्र तुम्ही इथे देण्यात टाळाटाळ करत आहात. केवळ ज्या शेअरमद्धे आपण नफा कमावला त्याचेच उदाहरण देत आहात.

जोपर्यंत आपण पुर्ण महिनाचा , पुर्ण गुंतवणूकीचा लेखाजोखा ( फायद्या तोट्यासहित) इथे दाखवत नाहीत तोपर्यंत तुमचा दावा सिद्ध होत नाही.

रचाक्याने

बाकी आमच्या सारख्या लोकांना (ज्यांना शेअरचा 'श'हि कळत नाही त्यांच्यासाठी ) किती टक्के नफा यापेक्षा गुंतवणूकीचा अभ्यास जास्त महत्वाचा वाटतो. ते सोडून इतर धाग्यांप्रमाणे यातही सर्वांनी (दुर्दैवाने लेखक महोदयांनाही) वाद घालण्यात उर्जा वाया घालवली आहे.

जरी पुढे मागे जावून आपण हे सिद्ध जरी करून दाखवले तरी त्याचा इतरांना काहीच उपयोग नाही कारण तुम्ही तुमच्या पद्धती , अभ्यास उघड करायला तुम्ही तयार नाहीत. यासाठी आपण दिलेली कारणेही न पटणारी होती.

आपल्या ज्ञानाबद्दल आदर बाळगूनही हे खेदाने म्हणावेसे वाटते की या धाग्याचे प्रयोजन 'मी कसा परतावा देवु शकतो पहा ' असे होते. त्यामूळे धागा दुसरीकडेच गेला.

आपण सप्रमाण सिद्धता देवून जर आपल्या पद्धती वा किमान ठोकताळे समजावून दिले असते आणि इतरांच्या काही पद्धती तपासून ,जोखून पाहिल्या असत्या तर सगळ्यांनाच फायदा झाला असता.

असो. हा प्रतिसाद आपण वैयक्तिकरित्या घेणार नाहित ही आशा आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.

ज्ञानव's picture

25 Feb 2019 - 9:08 am | ज्ञानव

दरमहा १०% परतावा.
20 Jan 2019 - 9:22 pm | ज्ञानव
हे सोदाहरण दिलेत तर चर्चेला उधाण येईल. बरेच पंटर आहेत इथे.

माझा पहिला प्रतिसाद हाच होता. जो तुम्ही (शब्दानुज) विस्तृतपणे मांडला आहे.

पुढे त्याला वादाचे वळण देणारे सत्याचे प्रयोग बरेच झाले. दरमहा १०% परतावा मिळू शकतो का ? ही अप्सराच बऱ्याच विश्वामित्रांना ह्या धाग्यावर खेचून घेऊन आली अन्यथा जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी वाचून सोडून दिले असते. म्हणजे ज्यांना मार्केटमधले कळते त्यांनी कळते म्हणून सोडून द्यावे आणि ज्यांना कळत नाही त्यांनी एकतर सोडून द्यावे किंवा वाचनमात्र राहावे; पण इतरांना सावध करण्याचा आव आणून १०% महिना कसे बुवा मिळवतात? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे गेल्या ३० वर्षात बरेच पाहिले आहेत. त्यांचा प्रयत्न असा असतो कि जर मेख कळली तर आपला फायदाच आणि असे काही नसते हे कळले तर बघा मी म्हणत नव्हतो असे म्हणून स्वतःचे सत्कार समारंभ करून घ्यायला मोकळे म्हणजे तिथे हि माझाच फायदा. हेजिंगच एक प्रकारे. विषयाला धरून प्रश्न विचारले जात असतानाच किंवा धागा विषयाला धरून पुढे सरकत असतानाच त्याला वेगळे वळण देणारे झारीतले शुक्राचार्य पदोपदी आडवे येणे नवीन नाही. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे युयुत्सुनि आपली पाने ओपन करून दाखवावीत किंवा आपले मुद्दे विषयाला धरून मांडावेत हेच मला प्रेरित होते. मूळ धाग्यातील ? लक्षात घेऊन त्यावर सर्वांनी आपली मते मांडणे अपेक्षित होते पण............................

उपाशी बोका's picture

20 Mar 2019 - 9:03 am | उपाशी बोका

काय ज्ञानव सर, तुमचे सोन्याचे ट्रेडिंग आणि तुमची ती सिस्टीम यांचे काय झाले? कशी काय प्रगती चालू आहे? जुना संदर्भ देतो शोधून हवा असेल तर.

सुबोध खरे's picture

25 Feb 2019 - 9:38 am | सुबोध खरे

Mr X-- when someone says stupid and absurd things what do you do?

ME --I say, you are right

Mr X-- but that is ridiculous

ME -- you are right

थॉर माणूस's picture

1 Mar 2019 - 6:30 am | थॉर माणूस

२३ जानेवारीला शेवटचा म्हणून वर किती प्रतिसाद टाकलेत हो खरे साहेब? :)
बरं आता माझ्यावर चिखलफेक करतात म्हणून येतो वगैरे म्हणू नका, एका जुन्या आयडीचा ट्रक ठराविक कंपू इथे अजूनही फिरवत असतो पण तो आयडी त्या प्रत्येक धाग्यावर स्वतःचा इगो कुरवाळायला टोमणे मारत फिरताना दिसला नाही मला तरी. जातो म्हणाला आणि गेला (आता दुसर्‍या आयडीने आला असेल तर गोष्ट वेगळी पण तो आयडी परत नाही आला :) ). याला म्हणतात निग्रह.

असो तुमच्याशी चर्चा करताना काय करायला हवे त्याची हिंट दिल्याबद्दल धन्यवाद... So Khare sir, you are right.

युयुत्सुनि आपली पाने ओपन करून दाखवावीत

मी माझे सर्व पत्ते कधीही उघड करणार नाही. मागच्याच आठवडात श्री० विवेक बजाज नावाच्या एका अत्यंत हूशार तज्ञाची कार्यशाळा मी अटेंड केली. या गृहस्थानी पण आपल्या स्ट्रॅटेजीज खुल्या केल्यास त्या काम करत नाहीत असेच सांगितले. शिवाय अशा माध्यमांवर सविस्तर लिहीणे (त्यातही आर्थिक व्यवहारांवर) अत्यंत मनस्ताप देणारे ठरते, असा माझा अनुभव आहे. डमी व्यवहार करून हे खरखोटे करता येईल पण त्यासाठी पुरेसा वेळ द्यायला द्यायला हवा.

कोरा वर मूळ प्रश्न मी जेव्हा विचारला तेव्हा "अशक्य नाही पण अवघड आहे" असे उत्तर मिळाले.

आपला फोलिओ जर ४ ते ५ स्टॉक पर्यंत मर्यादित असेल तर एकूण गुंतवणुकीवर असा परतावा मिळवता येईल असे वाटते. पण त्यापेक्षा जास्त असल्यास हे अवघड होत जाईल. सध्या माझ्याकडे ५०+ स्टॉक्स आहेत (हे असे का याची माझी कारणे आहेत आणि त्याची चर्चा इथे मला अभिप्रेत नाही), त्यामुळे मला स्वत:ला एकूण गुंतवणुकीवर असा परतावा मिळवणे अवघड आहे.

मला असे वाटते मी लिहीताना संदिग्धता टाळण्याचा शक्य तेव्हढा प्रयत्न केला आहे.

ज्ञानव's picture

25 Feb 2019 - 10:15 am | ज्ञानव

दरमहा १०% परतावा.
20 Jan 2019 - 9:17 pm | ज्ञानव
शक्य आहे. पण मिळत नाही.

श्री युयुत्सु,
मार्केटमध्ये लाखो strategy ज आहेत. त्यातल्या काही उत्तम चालतात. साधी wma क्रॉस ओव्हर पण उत्तम चालते. त्यामुळे काय वर्क आऊट होईल त्याची चिंता करण्यापेक्षा ते वर्क आउट होण्यासाठीचा संयम आणि शिस्त आपल्याकडे आहे का हयावर फोकस होणे गरजेचे असते.
बजाज काय म्हणतो ते सोडून द्या.

पण जर तुम्ही तुमचे पत्ते ओपन करणार नसाल तर हा व्यर्थ धागा काढण्यामागचे तुमचे प्रयोजन काय ? ते स्पष्ट केलेत तर बरे होईल.

उपाशी बोका's picture

20 Mar 2019 - 9:19 am | उपाशी बोका

१. स्वत:च्या अभ्यासाला पर्याय नाही.
२. मी माझे सर्व पत्ते कधीही उघड करणार नाही.
वरील दोन्ही मुद्द्यांशी सहमत.

बाकी एकंदर सगळा धागा भलताच विनोदी आहे. मला तर लाँग-टर्म महिना २ टक्के फक्त परतावा मिळाला (ते पण साधे व्याज, चक्रवाढ व्याज न्हवे) तरी मला हर्षवायू होईल.

युयुत्सु's picture

25 Feb 2019 - 10:05 am | युयुत्सु

मंडळी ते जाऊ दे.

आज ३० जानेवारीला घेतलेला प्राज इं० आज ९.३७% फायदा घेऊन काढून टाकला.

युयुत्सु's picture

25 Feb 2019 - 10:24 am | युयुत्सु

पण जर तुम्ही तुमचे पत्ते ओपन करणार नसाल तर हा व्यर्थ धागा काढण्यामागचे तुमचे प्रयोजन काय ?

मूळ प्रश्नावर लाऊडथिंकींग करणे आणि संधी असतात का, या प्रश्नाचे उत्तर शोधणे इतकेच अभिप्रेत आहे.

मराठी_माणूस's picture

25 Feb 2019 - 11:34 am | मराठी_माणूस

आज लोकसत्ता अर्थवृत्तांता मधे आलेल्या खालील लेखा बाबत काय मत आहे. पुस्तकी मुल्या पेक्षा बाजार भाव कमी आहे. अर्थात हा एकच निकष नसणार.
https://www.loksatta.com/arthvrutant-news/best-investment-options-in-ind...

युयुत्सु's picture

25 Feb 2019 - 11:44 am | युयुत्सु

अजुन महिनाभर घसरगुंडी चालु राहिल हे नक्की. मग घेण्याचा विचार करता येईल.

मराठी_माणूस's picture

25 Feb 2019 - 11:48 am | मराठी_माणूस

धन्यवाद

मराठी_माणूस's picture

5 Mar 2019 - 12:49 pm | मराठी_माणूस

हा तर वेगाने वर जाताना दिसत आहे.

युयुत्सु's picture

5 Mar 2019 - 1:07 pm | युयुत्सु

ट्रेण्ड कन्फर्म झाला नाही.

युयुत्सु's picture

1 Mar 2019 - 12:44 pm | युयुत्सु

तर मंडळी

२१ आणि २७ फेब्रु०ला घेतलेले NCC आणि GAIL आत्ता ४.९० % आणि ३.६७% वर आहेत. आणखी प्रगती झाली की इथे सांगेनच.

शब्दानुज's picture

1 Mar 2019 - 1:54 pm | शब्दानुज

५०-६० शेअरवर "एकूण" गुंतवणूकीवर १० % दरमहा परतावा मिळणे अवघड आहे.

दरमहा "काही" कंपन्या १०% परतावा महिन्यात देतात. अशा संधी बाजारात असतात.आपला अभ्यास असेल तर त्या कंपन्यपैकी आपल्याला काही आधी घेऊन ठेवता येतात. केवळ त्या ठराविक शेअरवर १०% टक्के परतावा मिळतो , पुर्ण पोर्टफोलिअोवर नव्हे.

काहीच शेअरचा प्रश्न असल्याने जरी ठराविक शेअरवर १०% महिना परतावा मिळाला तर मिळणारी रक्कम कमीच असते. (लाखाच्या तुलनेत )त्यामूळे कोणी महिन्यात अब्जाधीश होत नाही.

आपला पोर्टफोलिअो वर "एकूण वार्षिक" परतावा २५% , ५०% पर्यंत जावू शकतो.

मला वाटते यावर सगळेच सहमत होतील. अजून काही चर्चा करण्यासारखे उरले आहे असे वाटत नाही.

युयुत्सु's picture

1 Mar 2019 - 2:29 pm | युयुत्सु

आपला पोर्टफोलिअो वर "एकूण वार्षिक" परतावा २५% , ५०% पर्यंत जावू शकतो.

हे वाक्य असे पाहिजे

आपला पोर्टफोलिअो वर "एकूण वार्षिक" परतावा २५% , ५०% पर्यंत किंवा अधिक ही जावू शकतो.