✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

ख
खेडूत यांनी
Tue, 10/18/2016 - 12:04  ·  लेख
लेख
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते. कांही वृत्तवाहिन्यांच्या बातमीप्रमाणे ट्रॅक बंद पडल्यावर गायक आणि वादकांनी खरेच गायला-वाजवायला सुरुवात केली तेव्हा एनर्जी लेव्हल मधे कमालीचा फरक पडून गाणे नीरस झाले. बातमी: या जोडीची सगळी नाही तरी अनेक गाणी आवडतात. कलाकार म्हणून ते पुढेही आवडत रहातीलच. पण त्यांच्या किंवा अन्य कुणाच्या लाईव्ह कार्यक्रमात जाणे आता नकोसे वाटेल. तुमचे मत काय? या निमित्ताने मनात आलेले कांही प्रश्न असे: १. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? २. अन्य कलाकार असेच करत असतात का? ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिसाद
माध्यमवेध
बातमी

प्रतिक्रिया द्या
24017 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

जवळजवळ सर्वच कलाकार असे

एस
Tue, 10/18/2016 - 12:31 नवीन
जवळजवळ सर्वच कलाकार असे 'लिपसिंकिंग' करतात लाईव्ह शो मध्ये. त्यामुळे आश्चर्य वाटले नाही.
  • Log in or register to post comments

हेच बोलतो...

मोदक
Tue, 10/18/2016 - 13:40 नवीन
हेच बोलतो... ..आणि ही नवीन गोष्ट असेल असे वाटले नव्हते. एक साधा विचार करा. "मूळ गाण्यातला प्रत्येक सूर जुळवत, वाद्यांचे त्या त्या ठिकाणचे आवाज आजिबात न चुकता योग्य ठिकाणी वाजवत आणि स्टेजवर न दमता इतकी नाचानाची करत तेच गाणे तस्सेच्च म्हणले जाणे" आपल्याला दिसते तेंव्हा मागे गाणे सुरू आहे आणि गायक लोक्स नाटक करत आहेत हे सहज लक्षात येते. हल्ली फॉरवर्ड होत असलेल्या एक दोन रिअ‍ॅलिटी शो मधल्या मुलांच्या गाण्यालाही हीच शंका येते. अर्थात याला अपवाद वाटलेले अनेक कार्यक्रम आहेत.. सगळेच लोक असे करतात असे नक्कीच नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं

अनुप ढेरे
Tue, 10/18/2016 - 15:58 नवीन
स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केलेलं गाणं देखील खूप गायक ऑटो ट्यून मधून काढतात असं ऐकलेलं आहे ज्यात बेसुर सूर ठीक करता येतात सॉफ्टवेअरमधून. स्टूडिओमध्येदेखील जर एवढी वेळ येत असेल तर लाईवमध्ये बरोब्बर सुरात गाणं अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

बॉलीवूडमध्ये हा प्रकार तर

किसन शिंदे
Tue, 10/18/2016 - 12:36 नवीन
बॉलीवूडमध्ये हा प्रकार तर पूर्वीपासूनच सुरू आहे. आता परवाच्या लोकसत्तामध्ये कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीमधील आनंदजी यांनी किशोर कुमारबाबत सांगितलेला किस्साही अशाच प्रकारचा होता. त्या लेखातला काही भाग..
त्या वेळी किशोरवर आकाशवाणीचा अघोषित बॅन होता. ‘दूरदर्शन’वरही त्याची गाणी लागत नसत. आमच्या कार्यक्रमासाठी ‘दूरदर्शन’ने त्याला बोलावलं, पण त्यानं नकार दिला. आम्ही प्रयत्न करतो, असं म्हणालो. किशोर म्हणाला, ‘‘मी गाणार नाही.’’ मी म्हणालो, ‘‘अरे गाऊ नकोस. अ‍ॅक्टर म्हणून ये.’’ तो तयार झाला. मी एक युक्ती केली. ती आज उघडी करतोय. आम्ही मागे साऊंड ट्रॅक लावला व किशोरनं त्यावर ओठ हलवलेत फक्त. पण तो कार्यक्रम हिट झाला.
  • Log in or register to post comments

ही युक्ती नाही तर अत्यंत

पुंबा
Tue, 10/18/2016 - 12:39 नवीन
ही युक्ती नाही तर अत्यंत गलीच्छ फसवणूक आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ते निर्लजापणे सांगतात, म्हणून कलावंतांची कदर केली जात नाही या देशात. सगळ्यांचे पाय मातीचेच असतात हे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

...

आशु जोग
Fri, 10/21/2016 - 23:48 नवीन
आणीबाणी ही देशाचीच फसवणूक होती. त्या काळात किशोरकुमार बाबतीत काय झालं होतं हे आधी जाणून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

१. हो

पुंबा
Tue, 10/18/2016 - 12:36 नवीन
१. हो २. दुर्दैवाने हो. अगदी लता, आशा, रेहमान वगैरेसुद्धा असे करत असत असे काल वाचले. ३. हो ४. चार पैसे फेकले की वृत्तपत्र नावाचे कुत्रे गोंडा घोळत येते असे ऐकून आहे. ५. त्याची गरज होती आणि सैराट deserved it. ६. आजीबात नाही. मुळात अश्या फसवनुकीत सहभाग घेने हेच प्रोफेशनल एथिक्सच्या विरोधात आहे. ७. मागता यायला हवेत. प्रेक्शकांची ही खुप मोठी फसवणूक आहे. ग्राहक न्यायालयात याबद्दल दाद मागता यायला हवी. अर्थात हे सिद्ध कसे करणार हा प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments

२. दुर्दैवाने हो. अगदी लता,

मराठी_माणूस
Tue, 10/18/2016 - 13:53 नवीन
२. दुर्दैवाने हो. अगदी लता, आशा, रेहमान वगैरेसुद्धा असे करत असत असे काल वाचले.
कुठे वाचले त्याचा संदर्भ देउ शकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

कुठाहेत आपले पुमुंग्रापं?

आदूबाळ
Tue, 10/18/2016 - 12:42 नवीन
कुठाहेत आपले पुमुंग्रापं?
  • Log in or register to post comments

ह्म्म

तुषार काळभोर
Tue, 10/18/2016 - 12:53 नवीन
१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? >>>>>हो, बहुतेक सर्व भारतीय कार्यक्रम (चित्रपटसंगीताशी संबंधित) हे रेकॉर्डेड असतात व आपल्यासाठी ते 'लाईव्ह असल्याचा आभास केला जातो. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? >>>>> (चित्रपट संगीताशि संबंधित बहुतेक सर्व कार्यक्रम) हो. सर्व अ‍ॅवॉर्ड सोहळ्यातील गाण्याचे कार्यक्रमसुद्धा. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? >>>>> त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने असं नव्हे, तर जास्त परफेक्शन साठी होत असेल. झटपट पैशांबाबतः तो कोणाला नको असतो? ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? >>>>> दिसतंय की! लोकसत्ता ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? >>>>> याड लागलं आणि सैराट झालं जी या दोन गाण्यांचा वाद्यमेळ अफाट सुंदर आहे. त्याला (जर)साठ-सत्तर लाख खर्च केले असतील, तर ते नक्कीच पैसा वसूल काम झालंय! ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? >>>>> अर्थात! लाईव्ह कार्यक्रमात/नाटकात/स्टेज शो मध्ये/सत्कार कार्यक्रमात/राजकीय सभांमध्ये अशा गडबड गोष्टी होतच असतात. त्यातून कार्यक्रम जास्तीत जास्त स्मुथली पुढे नेण्यात सूत्रसंचालकाचे खरे कसब असते. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? >>>>> डिस्क्लेमर वगैरे कोणी टाकणार नाही. तिकिटाचे पैसेही परत मागता येतील असे वाटत नाही. युक्तिवाद असा असू शकतो: ' अजय अतुल लाईव्ह असा कार्यक्रम होता. अजय अतुल तिथे प्रत्यक्ष उपस्थित होऊन गाणी गायल्याचा प्रत्यक्ष अभिनयही करीत होते. ते प्रत्यक्ष गाणी म्हणतील असा कुठेही उल्लेख आम्ही केला नव्हता' *माझी मते नेहमीच लवचिक असतात.
  • Log in or register to post comments

:)

खेडूत
Tue, 10/18/2016 - 13:14 नवीन
:) मकरंद अनासपुरेंच्या अन्य सामाजिक कामांमुळे त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असतात, त्यामुळे असे वाटले, अन्यथा सूत्रसंचालकाने प्रसंगावधान राखून वेळ मारून नेणे योग्यच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

म्हणून सांगतो; मैफिल ऐकावी

वेल्लाभट
Tue, 10/18/2016 - 13:31 नवीन
म्हणून सांगतो; मैफिल ऐकावी शास्त्रीय, उपशास्त्रीय, अगदी सुगमही. ज्यात गायक वादक समोर स्प्ष्ट दिसतील. कॉन्सर्ट च्या नावाने पैसे वाया घालवू नये.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

आदूबाळ
Tue, 10/18/2016 - 13:34 नवीन
सहमत आहे. विशेषतः शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायक-वादकाने बुद्धीचा वापर केल्याचं स्पष्ट जाणवतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

+१

अंतरा आनंद
Wed, 10/19/2016 - 14:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अरेरे त्या अर्चित सिंग च्या शो पायी पण आमचे 2-5 दा पैसे गेले

वरुण मोहिते
Tue, 10/18/2016 - 14:15 नवीन
बायकोच्या हट्टामुळे. बाकी असा होतंच असतं त्यात काही नवीन नाही पण शास्त्रीय संगीत किंवा एखादा बॅण्ड परदेशी कलाकारांचा लाईव्ह बघणं हे बेस्ट त्यापेक्षा .
  • Log in or register to post comments

आमचा शंकर (महादेवन) नाही बरं

मराठी कथालेखक
Tue, 10/18/2016 - 14:28 नवीन
आमचा शंकर (महादेवन) नाही बरं त्यातला :)
  • Log in or register to post comments

मान्य..

योगी९००
Tue, 10/18/2016 - 15:20 नवीन
शंकर महादेवन असले प्रकार करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

अजय-अतुलनी मटा वर दिलेलं

गिरिजा देशपांडे
Tue, 10/18/2016 - 15:29 नवीन
अजय-अतुलनी मटा वर दिलेलं स्पष्टीकरण बाकी खरा खोटा त्यांचे तेच जाणोत
  • Log in or register to post comments

काय कळ्ळं नाही त्यांना नेमकं

आदूबाळ
Tue, 10/18/2016 - 16:07 नवीन
काय कळ्ळं नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरिजा देशपांडे

जाणीव पूर्वक गैरसमज पसरवले

विशुमित
Tue, 10/18/2016 - 16:35 नवीन
जाणीव पूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. काही अंशी मला ही तेच वाटत. http://www.loksatta.com/manoranjan-news/atul-gogavales-clarification-over-lip-syncing-row-1320720/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

त्यांचं म्हणणं असं दिसतंय की

खेडूत
Tue, 10/18/2016 - 16:41 नवीन
त्यांचं म्हणणं असं दिसतंय की मायनस ट्रॅकवर मुद्रित संगीताच्या साथीत ते खरंच गात होते आणि बंद पडून पुन्हा सुरू होताना टेक्निशियनने प्लस ट्रॅक लावला. हे खरं मानलं तर आधी वादक वाजवल्याचा अभिनयच करत होते असा होतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

एग्जॅक्टली! म्हणूनच "मग ऐंशी

आदूबाळ
Tue, 10/18/2016 - 17:08 नवीन
एग्जॅक्टली! म्हणूनच "मग ऐंशी वादकांचा ताफा आम्ही का नेला असता" वगैरे पोकळ वाटतं. @विशुमितः जाणीवपूर्वक गैरसमज का बरं पसरवले जातील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

हजारो वॅाट्स स्पिकर

कंजूस
Tue, 10/18/2016 - 15:48 नवीन
हजारो वॅाट्स स्पिकर ध्वनिवर्धक लावून अशा मोकळ्या जागेत शक्य नसावे.कारण नाजूक वाद्यांचा आवाज,गायकाचा आवाज माइक्रोफोनने पकडून मोठा करायचा उघड्यावर सोपे वाटत नाही. शास्त्रिय गायक ओरडून गात नाहीत.
  • Log in or register to post comments

रेड हँडेड!!

बाजीप्रभू
Tue, 10/18/2016 - 16:11 नवीन
२००३ साली अमेरिकेच्या कुठल्यातरी इनॉग्रेशन डेच्या दिवशी गायिका बेयोँसे आणि तिचा वाद्यवृंद नाटक करतांना रेड हँडेड पकडला गेला होता. लोकांनी आणि मीडियाने खूप "पिसं" काढली, माफी मागायला लावली. ओबामाभाऊ सुद्धा रेड हँडेड पकडला गेला होता एकदा. हा पहा व्हिडीओ, Obama
  • Log in or register to post comments

भारतातले सर्व गायन-रियालिटी-शोजचे ग्राण्ड फिनाले

तुषार काळभोर
Tue, 10/18/2016 - 16:38 नवीन
भारतातले सर्व गायन-रियालिटी-शोजचे ग्राण्ड फिनाले - महाअंतिम फेर्‍या - या रेकॉर्डेडच असतात.
  • Log in or register to post comments

याच्यापेक्षा पुर्वीचे ते

मराठी_माणूस
Tue, 10/18/2016 - 16:54 नवीन
याच्यापेक्षा पुर्वीचे ते मेलडी मेकर्स सारखे ऑर्केस्ट्रॉ चांगले म्हणायचे, जे काय सादर होत असे ते १००% लाईव्ह. गेले ते दिन गेले.
  • Log in or register to post comments

गायक तुमच्यासमोर तीन तास आले

कंजूस
Tue, 10/18/2016 - 16:56 नवीन
गायक तुमच्यासमोर तीन तास आले,कार्यक्रम सादर केला आणखी काय पाहिजे? हीच गोष्ट शाळाकॅालेजच्या शिक्षणाची आहेच. तुम्ही चांगल्या संस्थेत पैसे खल्च करून मुलांना पाठवता मग आखी दहापट फी क्लासची का भरता? तुमची मुलं तुम्हाला फसवतातच ना?
  • Log in or register to post comments

तसे नव्हे. ही तुलना पटली नाही

खेडूत
Tue, 10/18/2016 - 17:06 नवीन
तसे नव्हे. ही तुलना पटली नाही. गायक तुमच्यासाठी गायला येतोय म्हणून हजार रूपये तिकीट काढून आपण जातो. गाणे शंभर टक्के ' मूळ आहे तसेच' ऐकण्याची अपेक्षा नसतेच. तान्त्रिक/ नैसर्गिक मर्यादा येत असतील तर तसे स्पष्ट सांगावे, हरकत असायचे कारण नाही. शंकर महादेवन, शौनक अभिषेकी किंवा राहुल देशपांडे यांची मैफिल ऐकली तर अनेकदा गाणे मूळ गाण्यापेक्षा पूर्ण वेगळेच सादर केले जाते. ते चांगलेही वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हवा येऊ द्या कार्यक्रमात बरीच

कंजूस
Wed, 10/19/2016 - 03:58 नवीन
हवा येऊ द्या कार्यक्रमात बरीच गाणीे तरी माइक सिस्टिम स्थानिकच असते ती मंत्र्यांच्या भाषणात वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

जर प्री रेकॉर्डेड ट्रॅक वर ही

पद्मावति
Tue, 10/18/2016 - 17:23 नवीन
जर प्री रेकॉर्डेड ट्रॅक वर ही मंडळी लीप सिंक करत असतील तरीही हरकत नाही. फक्त मग त्याला लाईव शो म्हणू नये इतकेच मला वाटते. बाकी कॉन्सर्ट मधे प्रचंड ऑडियेन्स मधे खर्या गाण्याचा बहुतेक आवाजही नीट पोहोचणार नाही आणि लाईव शो मधे गायकाच्या किंवा वाद्यवृंदाच्या चुकीमुळे पूर्ण शोचा विचका होऊ शकतो त्यामुळे हे प्री रेकॉर्डेड प्रकार सुरू झाले असावेत. ते ठीकच आहे पण मग ते स्पष्टपणे सांगावे.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर

हृषीकेश पालोदकर
Wed, 10/19/2016 - 17:50 नवीन
अगदी बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा

रेवती
Tue, 10/18/2016 - 17:36 नवीन
१. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? उत्तर- हो, हा प्रकार होतो असेच फार्फार वर्षांपूर्वीच ऐकले होते. आपण त्याची सवय करायला नको, या कार्य्क्रमान्ला जाऊ नये असे मला वाटते. २. अन्य कलाकार असेच करत असतात का? उत्तर- तसे ऐकले तरी आहे. शिवाय या धाग्यानिमित्ताने जर एखादा तूनळीवरील लाईव्ह शोचा व्हिडिओ पाहिलात तर आवडण्यासारखे काही दिसत नाही. ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? उत्तर- अजय अतुल काय किंवा कोणी दुसरे काय, मर्यादा प्रत्येकालाच असतात. जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमातील एक गाणे ऐकण्यात आले, त्यातील संगीत लक्षपूर्वक ऐकले तर सैराटमधील एका गाण्याची आठवण यावी असे आहे. ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? उत्तर- ही बातमी होती हे माहित नसल्याने पास. ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? उत्तर- माहित नाही. तरी संगीत चांगले झाले असल्यास ठीक आहे असे म्हणावे लागेल. ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? उत्तर- असे केले हे माहित नव्हते पण केले असल्यास चुकीचे आहे तरी मित्र मित्रांना सांभाळून घेतायत असे म्हणावे लागेल, फक्त सांभाळून घेण्याचा मार्ग प्रेक्षकांच्या खिश्यातून जातोय. ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का? उत्तर- तिकिटांचे पैसे परत मागता यावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

हा प्रकार नवीन नाही

फेरफटका
Tue, 10/18/2016 - 19:37 नवीन
हा प्रकार नवीन नाही. माझा एक अनुभव म्हणजे १९९९ साली ३१ डिसेंबर चा एक शो आम्ही परगावी एका रिसॉर्ट मधे केला होता. तेव्हा गायक / निवेदक जरी लाईव्ह गात असले, तरी सगळं संगीत हे ट्रॅक वर होतं आणी मागे ठेवलेल्या वाद्यांवर बसलेले वादक 'अभिनय' करत होते. ह्या प्रकाराचं आश्चर्य वाटावं ईतका हा प्रकार नवीन नक्कीच नाहीये. उघड्या मैदानात, प्रेक्षकांच्या जल्लोशात, नाचताना वगैरे गाण्याचे सूर संभाळता येतील हे खूप अवघड आहे. इच्छूकांनी चालत चालत गाणं गुणगुणून बघावं.
  • Log in or register to post comments

बऱ्याचदा तांत्रिक कारणामुळे

शब्दबम्बाळ
Tue, 10/18/2016 - 20:19 नवीन
बऱ्याचदा तांत्रिक कारणामुळे(स्पीकर अथवा माईक खराब) लाईव्ह कार्यक्रम खराब होऊ शकतो. त्यातल्या त्यात तो कार्यक्रम संगीताचा असला कि जास्तच काळजी! लोक भरमसाठ किमतीची तिकिटे काढून येतात त्यांना दोषरहित आणि खिळवून ठेवणारा अनुभव देण्यासाठी लिपसिंक केले जात असावे. 13-14 वर्षांपूर्वी शाळेत असताना नाटक सादर करताना आम्हीही हि गोष्ट केली होती. शाळेमध्ये मिळणारे माईक कायम मधेच खराब व्हायचे किंवा किssssss कुssss असले चित्र विचित्र आवाज काढायचे ज्याने सादरीकरणातली सगळी मजा निघून जायची. हे टाळण्यासाठी आम्ही आख्खे नाटक कॅसेटवर रेकॉर्ड केले. हे करण्यामागे प्रेक्षकांना चांगले सादरीकरण पाहाता यावे हाच हेतू होता आणि रेकॉर्डिंग वर लीपसिंक करायला सुद्धा खूप मेहनत लागली होती! मग इथे जर यांनी पूर्ण गाणी लिपसिंक केली (असतील) तर त्यामागे देखील मेहनत असणारच आहे... अरिजित सिंग ने सादर केलेला रेडिओ मिरची अवॉर्ड मधला परफॉर्मन्स खूप छान आहे! त्याचा ऑडिओ जवळपास रोज ऐकतो. पण त्या कार्यक्रमात देखील त्याने लिपसिंक केले होते! :) गाण्याची लिंक, 3:33 मिनिट च्या इथे पहा, गाण्यात 'हलकासा' शब्द आहे पण तो 'थोडासा' असे बोलतो! ;)
  • Log in or register to post comments

खरं तर बोलण्यासारखं काहीच

संदीप डांगे
Tue, 10/18/2016 - 20:21 नवीन
खरं तर बोलण्यासारखं काहीच नाही आणि खूप काही आहेही, अनेकांनी इथे मांडले आहेसुद्धा, Live concert हे फक्त शास्त्रीय संगीत व रॉक यांचीच टिकेट काढून बघायला जावी, बाकी सगळा काळाबाजार आहे! पूर्वमुद्रित रेकॉर्डवर गाणारे लोक ज्या कॉन्सर्ट सादर करतात त्यात गाणे ऐकण्यापेक्षा गाणारे, जे सेलिब्रिटी आहेत त्यांना गाताना बघायला जाणे जास्त महत्वाचे असते, कोणी दुकानाची फीत कापायला येणे आणि हि गाणी ऐकायला जाणे यात फार फरक नाही. सेलेब्रिटी प्रत्यक्ष बघायला मिळणे हेच फलित, बाकी काही नाही, तसेच जे काही लोक्स पैसे लुबाडल्याबद्दल कुरबुर करतायत ते लोक ते ऐकत असलेले प्रत्येक गाणे, बघत असलेला प्रत्येक चित्रपट विकत घेऊन ऐकत/बघत असतील तर माझा त्यांच्या फसवल्या गेल्याच्या भावनेला बिनशर्त पाठिंबा आहे. अन्यथा ह्या कलाकारांच्या कलाकृती फुकट उपभोगायच्या आणि त्यांनी फसवले कि बोंबाबोंब करायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. ;)
  • Log in or register to post comments

चुकीचे समर्थन

हुप्प्या
Tue, 10/18/2016 - 21:47 नवीन
एका चुकीचे समर्थन करण्याकरता दुसर्‍या चुकीकडे बोट दाखवणे काही पटत नाही. काही लोक फुकट डिव्हीडी, व्हिडियो बघतात म्हणून लाइव्ह कन्सर्ट मधे गाणे म्हणण्याचे नाटक करणे न्याय्य ठरते हे काही पटत नाही. सगळे कॉन्सर्टला आलेले तमाम प्रेक्षक हे फुकट डीव्हीडी वालेच होते ह्याला काय पुरावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नीट वाचा हो, 'तमाम प्रेक्षक'

संदीप डांगे
Tue, 10/18/2016 - 22:09 नवीन
नीट वाचा हो, 'तमाम प्रेक्षक' हे शब्द मी वापरले नाहीत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

जर तर

हुप्प्या
Tue, 10/18/2016 - 22:17 नवीन
जर सगळे प्रेक्षक बेकायदा गाणी ऐकणारे आहेत असा काही पुरावा असता तर सरसकटीकरण कदाचित (होय, कदाचितच) योग्य ठरले असते. पण तसे काही नसले तर तो मुद्द पूर्ण गैरलागू आहे. तिकिट काढून आलेल्या ग्राहकाला पूर्ण माहिती न देता असा प्रकार करणे हे चूकच. मग तक्रार करणारे गिर्‍हाईक हे आदर्श नागरिक आहे का, त्याने वा तिने कधी कुठला कायदा मोडला आहे का असा उलटा कांगावा करणे चूक आहे. अशा प्रकारचा आदर्श नागरिक नसेल तर त्याला वा तिला अशी तक्रार करण्याचा हक्कच नाही वगैरे म्हणणे पूर्णपणे गैरलागू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

परत तेच?

संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 00:19 नवीन
परत तेच? मी कुठे सरसकटीकरण केले ते दाखवाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

तसेच सगळे प्रेक्षक बेकायदा

संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 00:23 नवीन
तसेच सगळे प्रेक्षक बेकायदा गाणी ऐकणारे नाहीतच ह्याचाही काय पुरावा आहे? माझे विधान कोणतेही प्रामाणिक प्रेक्षक उगाच अंगावर घेणार नाहीत, पण चोराच्या मनात चांदणे असेल तर नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

अत्यंत गैरलागू मुद्दा

हुप्प्या
Wed, 10/19/2016 - 07:15 नवीन
प्रेक्षकांच्या ग्राहक म्हणून हक्काचा हा प्रश्न आहे. ज्यांनी तिकिटे काढून हा शो पाहिला त्यांची फसवणूक झाली आहे का हाच चर्चेचा मुद्दा आहे. आता त्याला प्रेक्षक स्वत: किती प्रामाणिक आहेत वगैरे फाटे फोडणे हे साफ गैरलागू आहे. काही मोजके वा बरेच वा सगळेच प्रेक्षक कधी ना कधी वा कधीतरी बेकायदा सिनेमे बघत वा बेकायदा गाणी ऐकत असतील का ह्या मुद्द्याचा प्रस्तुत चर्चेशी काहीही संबंध नाही. उपस्थित प्रेक्षकांपैकी ज्यांना आपली फसवणूक झाली असे वाटते आहे त्यांना त्याची तक्रार करण्याचा हक्क आहे. एखादा फसवणूक झाली म्हणून तक्रार घेऊन आला तर तू कधी बिनातिकिट प्रवास केला असशील तर तुला फसवणुकीची तक्रार दाखल करायचा हक्कच नाही असे म्हणण्यासारखे आहे. केवळ आदर्श, कधीही कायदा न मोडलेल्या स्त्री वा पुरुषालाच फसवणुकीची तक्रार करण्याचा हक्क आहे असे म्हणणे हे आततायीपणाचे आणि चूक आहे. जाता जाता: मी आजपर्यंत असले कन्सर्ट कधी पाहिले नाहीत आणि भविष्यात पाहीन असे वाटत नाही त्यामुळे चोराच्या मनात चांदणे वगैरे वैयक्तिक आरोपांचे आणखी नवीन फाटे फोडू नये. मुख्य मुद्द्यावरच रहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझा काय मुद्दा होता हे

संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 07:55 नवीन
माझा काय मुद्दा होता हे तुम्ही नीट समजून घेतला नाही तेव्हा असो. बाकी आता फसवणुकीची तक्रार दाखल करण्याबद्दल, तर कायदेशिरपणे तसे कोणीही करू शकतो, ग्राहक म्हणून प्रत्येकाचा तो हक्क आहे, माझा मुद्दा नैतिकतेबद्दल होता, कायदेशीर बद्दल नाही, तो मुद्दा वेगळा. कोर्टात ही फसवणूक सिद्ध करणे अवघड आहे त्यामुळे असो. अजय अतुलवर बहिष्कार घालत असतील तरी माझं काही वाया जात नाही.. ;) आपण सिग्नल मोडायचा पण तोच दुसर्याने मोडला कि बोंबाबोंब करायची यात तुमच्या मते काही गैर नसेल तर ठीक आहे,असो. तरीही मी सर्वांच्या सर्वच प्रेक्षक अगदी तस्सेच दांभिक असतात असं कुठेही कधीही म्हटले नाही - फक्त एक दृष्टिकोन दिला, विनाकारण माझ्या मुद्द्याला गैरलागू म्हणण्याची गरज नव्हती, नसलेले शब्द माझ्या तोंडी कोंबण्याची गरज नव्हती, तेव्हा तेही असोच. चर्चेबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

तसेच जे काही लोक्स पैसे

भालचंद्र_पराडकर
Fri, 10/21/2016 - 13:25 नवीन
तसेच जे काही लोक्स पैसे लुबाडल्याबद्दल कुरबुर करतायत ते लोक ते ऐकत असलेले प्रत्येक गाणे, बघत असलेला प्रत्येक चित्रपट विकत घेऊन ऐकत/बघत असतील तर माझा त्यांच्या फसवल्या गेल्याच्या भावनेला बिनशर्त पाठिंबा आहे. अन्यथा ह्या कलाकारांच्या कलाकृती फुकट उपभोगायच्या आणि त्यांनी फसवले कि बोंबाबोंब करायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. ;) ही पण बाजू मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पुन्हा एक प्रयत्न

हुप्प्या
Sat, 10/22/2016 - 05:29 नवीन
-- आपण सिग्नल मोडायचा पण तोच दुसर्याने मोडला कि बोंबाबोंब करायची यात तुमच्या मते काही गैर नसेल तर ठीक आहे,असो. इथे जे दोन गुन्हे आपण एकाच पारड्यात तोलत आहात ते एकसारखे नाहीत. एका बाजूला काही कलाकारांनी आपले नाव वापरुन हजारो प्रेक्षकांना लाईव्ह शोची तिकिटे विकली आहेत. आणि प्रत्यक्षात शो लाईव्ह नव्हताच. दुसर्या बाजूला काही प्रेक्षकांनी कधीतरी फुकट वा स्वस्तात बेकायदा पद्धतीने गाणी ऐकली असतील असा आपला दावा. हे दोन पूर्ण दोन वेगळे गुन्हे आहेत. वेगळ्या पातळीवरचे गुन्हे आहेत. दोन्ही गुन्ह्यांकरता वेगळ्या शिक्षा आहेत. ह्यातला दोन नंबरचा गुन्हा ज्यांनी केला आहे त्यांना एक नंबरच्या गुन्ह्याबद्दल दाद मागायचा हक्क नाही हा आपला तर्क साफ चुकीचा आहे. त्याला कायदेशीर वा नैतिक आधार मलातरी आढळलेला नाही. बेकायदा गाणी ऐकणे वा पहाणे हा एक स्वतंत्र विषय आहे. तोही अत्यंत किचकट विषय आहे. लाईव्ह शो बाबतच्या फसवणूकीचा मुद्द्दा चर्चेत असतना तो उकरुन काढण्याचे प्रयोजन समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ओके, फाईन. असो!

संदीप डांगे
Sat, 10/22/2016 - 09:07 नवीन
ओके, फाईन. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

शकिरा .........

रॉजरमूर
Tue, 10/18/2016 - 20:42 नवीन
शकिरा ......... शकिरा ने ही 2006 मध्ये जर्मनीत त झालेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या उदघाटनाला हाच प्रकार केला होता . त्यावेळेस तिने "हीप्स डोन्ट लाय " या गाण्याचे "बाम्बो" हे रिमिक्स व्हर्शन गायले होते . त्या प्रचंड स्टेडियम मध्ये प्रेक्षकांच्या कोलाहलात हा परफॉर्मन्स तिने दिला होता . व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसतंय की ती ओठ हलवतेय आणि वादक नाटक करताहेत . बाम्बो
  • Log in or register to post comments

अजय अतुल मधल्या अजय चा जबडा

अविनाशकुलकर्णी
Tue, 10/18/2016 - 21:01 नवीन
अजय अतुल मधल्या अजय चा जबडा जबरी आहे..गायला लागला की कळते.. असे वाटते ्की हा कुणाला तरी गीळणार
  • Log in or register to post comments

हे भारी निरीक्षण आहे. यासाठी

खटपट्या
Tue, 10/18/2016 - 22:10 नवीन
हे भारी निरीक्षण आहे. यासाठी तुम्हाला सलाम. व्यंगचित्रकार असेच काही शोधत असतात... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

मागे एका कार्यक्रमात वैभव

मार्मिक गोडसे
Fri, 10/21/2016 - 14:45 नवीन
मागे एका कार्यक्रमात वैभव मांगलेंनी अजयच्या जबड्याची हुबेहूब नक्कल केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

डिसक्लेमर

हुप्प्या
Tue, 10/18/2016 - 21:50 नवीन
काही लोकांना असे नकली कन्सर्ट करण्यात वावगे वाटत नाही असे दिसते आहे. ग्राहकाला ह्याची माहिती असावी म्हणून कन्सर्टच्या जाहिरातीत निदान बारीक अक्षरात तळटीप असावी की सर्व गाणी ही प्रत्यक्ष गायलेली असतीलच असे नाही. काही गाणी पार्श्वसंगीताच्या स्वरूपात सादर होतील. अशी माहिती आधीच दिलेली असेल तर ग्राहक तशी अपेक्षा ठेवूनच जातील आणि असा अपेक्षाभंग होणार नाही. व्यक्तिशः मला तरी असा प्रकार आवडत नाही. भरपूर पैसे देऊन अशा प्रकारचे शो बघण्याची माझी तरी इच्छा नाही. ज्यांना हा प्रकार रुचतो त्यांनी तो जरुर पहावा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा