एक हवीहवीशी शाळा
शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल.
पुण्याजवळील शिक्रापूर नजीक वाबळेवाडी नावाचं गाव आहे. तिथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेची ही गोष्ट आहे. २०१२ साली दत्तत्रय वरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. शाळेतील प्रवेशांचं घटणारं प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची कमी होत चाललेली ओढ, या गोष्टींची वरे सरांना कल्पना होती. त्या गोष्टी गांभीर्याने घ्यायचा त्यांनी निर्धार केला. सर्वप्रथम त्यांनी गावक-यांशी संवाद साधला आणि शाळेत शिक्षक, किंवा शिक्षण या बरोबरच वातावरण हे शिक्षणासाठी पूरक असायला हवं हे गावक-यांना पटवून दिलं. यासोबतच 'कुठलीही बाहेरची आर्थिक मदत न घेणे' या आणखी एका गोष्टीवर सरांचं, गावक-यांचं एकमत झालं.
इच्छाशक्ती असली की काहीही साध्य होतं या उक्तीला सार्थ ठरवत १७ लाख रुपये जमा झाले. वरे सरांवर गावकर्यांनी पूर्ण विश्वास टाकला. त्यांच्या देखरेखीखाली शाळेचा कायापालट झाला. निधी कमी असल्याने कंत्राटी कामगारही नेमले गेले नाहीत, वरे सर व आणखी दोन शिक्षकांनीच ही प्रचंड जबाबदारी उचलली व चोख पार पाडली.
वातानुकुलित वर्ग, सौर ऊर्जा, वायफाय, संगणक, विज्ञान, कार्यानुभव, भाषा, क्रीडा याकरिता स्वतंत्र व सुसज्ज कक्ष, आणि एक बोटॅनिकल गार्डन, या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या. इथे शिक्षक फक्त पुस्तकंच नव्हे तर प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना शिकवतात. मुलं वाचनालय, इंटरनेट ही माध्यम मुक्तपणे वापरून माहिती घेऊ शकतात, यातून स्वशिक्षणाचीही ओळख त्यांना होते. आवडते विषय शिकण्याची मुभा इथल्या प्रत्येक मुलाला आहे, त्यामुळे आज खेळ शिकला, उद्या भाषा, हे स्वातंत्र्य आहे.
एके काळी ३० बळे बळे येणारी मुलं असणारी ही शाळा आज ९० मुलांना शिकवते व शाळा संपल्यावर या मुलांना अक्षरशः शाळेतून हाकलावं लागतं. सकाळी ८ ते संध्याकाळी ७-७ वाजेपर्यंत ही मुलं शाळेत रमतात. वरे सरांचं तत्वच हे आहे की शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया असायला हवी आणि त्याचंच एक आदर्श उदाहरण त्यांनी वाबळेवाडीच्या शाळेमार्फत जगासमोर उभं केलं आहे.
एकीकडे मुंबई-ठाण्यातल्या मानाच्या शाळा इंग्रजी माध्यम, संक्रमण, स्पर्धेचा काळ, काळाची पावलं वगैरे कारणं देत पळवाटा शोधत आहेत, निधीच्या रकमा वाढल्या तरी शिक्षणाचा दर्जा वाढत नाहीये, आणि मुलांचा सोडून बाकी सगळ्यांचा विकास होतोय.असं असताना वरे सरांनी समर्थपणे उद्धार केलेलं हे विद्येचं मंदिर सगळ्या शाळांनी, शिक्षकांनी एकदा बघायला हवं.
करायचं असेल काही तर माध्यमं आड येत नाहीत, सरकारकडून मिळणारी अनुदानं कमी पडत नाहीत, आणि मुलांचं भलं होणार असेल तर पालक कसलीही मदत करायला तयार असतात, हे लोकांना कळलं तर वाबळेवाडीच्या शाळेचं अनुकरण राज्यातल्या अनेक शाळांना करता येईल आणि वरे सरांचं यश कितीतरी पटीने मोठं होईल.
खालील फोटो आंतरजालावरून साभार.
एक दुवा:
http://www.thebetterindia.com/47989/wablewadi-zilla-parishad-school-air-conditioned-e-learning-tablets-dattatreya-ware-ac-classrooms/
इतर अनेक दुवे जालावर उपलब्ध होतील. गूगलावे.
एक दुवा:
http://www.thebetterindia.com/47989/wablewadi-zilla-parishad-school-air-conditioned-e-learning-tablets-dattatreya-ware-ac-classrooms/
इतर अनेक दुवे जालावर उपलब्ध होतील. गूगलावे.
प्रतिक्रिया
व्वा..
अर्रे वाह...
मोबाईल नंबर शोधावा लागेल. मला
मलापण
चांगली बातमी.
मस्त (माहीती)
छान माहिती वेल्लाभट!
कौतुकास्पद! पालकांकडून खंडीभर
सगळ्यांना __/\__
खूप छान
धन्यवाद
अरे वा
अत्यंत स्पृहणिय काम आहे हे !!
__/\__
+१
अरे वा..
तोत्तोचॅनची आठवण आली.
_/\_
अत्यंत आवडला हा लेख! एक
अत्यंत चांगला उपक्रम !!
तुमच्या सगळ्यांच्या
छान उपक्रम सरांना नमस्कार
_/\_
प्रेरक..
खूप साधी माणसं खरेच काहीतरी
__/\__
अगोदर पाहिलेली ही न्यूज.
अप्रतिम ... __/\__ ...
वाबळेवाडीस भेट देण्यात आलेली
गुड
+१
व्वा!
आमच्या पर्यंत ही माहिती
+१
अशीच एक जि. प. शाळा माझी बहिण
स्तुत्य उपक्रम. वरे सर हाडाचे